नमस्कार मंडळी
आज केलेला व्यायाम च्या सुपरहिट्ट यशानंतर सादर आहे पुढील भाग.. आज केलेली खादाडी..!!!!
(जुनी मिपाकरं - डोळे टवकारू नका, इथे फक्त खादाडीचेच फोटो असणार आहेत)
तुम्ही घरी, बाहेर हॉटेलात, गडावर, प्रवासात कुठेही खादाडी केली असेल आणि ते मिपाकरांना सांगायचे असेल तर इथे सांगा.
एखादे नवीन ठिकाण सापडले असेल किंवा तेथील एखादा पदार्थ विशेष आवडला असेल तर तसेही सांगा.
मी सुरूवात करतो..
भांडारकर रस्त्यावर रेसीपी नामक ठिकाणी चिकन थाळी हादडली. आवडली - परत नक्की नावे असे ठिकाण आहे.
चिकन आळणी रस्सा.
स्पेशल चिकन थाळी.
चला तर मग.. आपल्या आवडीचे पदार्थ इथे टाकूया.. आणि मिपाकरांना जळवूया..! ;)
प्रतिक्रिया
28 Jul 2017 - 7:50 pm | मनिमौ
वळताना एक सांगली भेळ गाडी आहे. तिथली भडंग भेळ मस्त. तसच हिंदवी स्वराज्य चा साबुदाणा वडा
29 Jul 2017 - 9:15 am | सिरुसेरि
सांबाची भेळ ? का त्रिमुर्ती भेळ ?
4 Aug 2017 - 10:14 pm | मोदक
गिरीजा बाहेरची कल्पना भेळ खाल्ली आहे का..? ती पण चांगली असते.
28 Jul 2017 - 8:11 pm | उगा काहितरीच
साई चौक , सांगवी ! कर्जत वडापाव , एक नंबर !
28 Jul 2017 - 8:48 pm | हतोळकरांचा प्रसाद
मोदकशेठ, आमाला बुलीवलं नाय म्हून णिशेध!
श्रावण सुरु व्हायच्या आधी हिंजवडीत सुरु झालेल्या जय मल्हार ला जाऊन आलो, चिकन आणि मटन दोन्ही थाळ्या मस्त होत्या.
4 Aug 2017 - 9:07 pm | कपिलमुनी
एक्झट लोकेशन कुठशी
4 Aug 2017 - 9:57 pm | हतोळकरांचा प्रसाद
मेझ्झानाईन कडून भूमकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागल्यावर १०० ते १५० मीटरवर डाव्या हाताला!
4 Aug 2017 - 10:16 pm | मोदक
मुनी चेकव रे एकदा सवडीने.
4 Aug 2017 - 10:02 pm | कपिलमुनी
एक्झट लोकेशन कुठशी
28 Jul 2017 - 9:21 pm | गणामास्तर
रेसिपी मला चवीच्या बाबतीत ठीकठाक वाटले.
रच्याकने ते रेसिपी जोशी वडेवाल्यांचे आहे.
28 Jul 2017 - 9:33 pm | दशानन
आज नानापेठेत कोल्हापुरी मिसळ (भिडे यांची) खाल्ली, अप्रतिम चव .
स्थान- दर्गा जवळची गल्ली.
28 Jul 2017 - 10:31 pm | अत्रुप्त आत्मा
नोटेड!
28 Jul 2017 - 11:08 pm | दशानन
एकदा टेस्ट करून बघाच :)
28 Jul 2017 - 10:55 pm | दिवाना हु
<img src="https://s17.postimg.org/z8ig0uzf3/IMG_20170608_204520.jpg" width="640" height="480" alt="icy spicy connaught garden aurangabad" />
29 Jul 2017 - 10:27 am | तुषार काळभोर
जळजळ झालेली आहे...
दसर्यापर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.
विजयादशमीला हडपसर ते डेक्कन शिमोल्लंघन करण्यात येईल!
29 Jul 2017 - 10:34 am | इरसाल कार्टं
मुंबई कट्ट्याचे फोटो टाका कि मोदकराव
29 Jul 2017 - 10:35 am | पिवळा डांबिस
आज लंच टाईममध्ये आमच्या इथे 'मीटरी' नांवाच्या रेस्टॉरंटमध्ये 'कोलॉसल' बीफ बर्गर खाल्ला, अप्रतिम चव!
उद्या शनिवारी लेकाला प्रॉमिस केल्याप्रमाणे एलेच्या एका अस्सल इराणी हाटेलांत जाऊन लुसलुशीत कबाब (शीग आणि पीसेस) खायचा प्लान केला आहे....
29 Jul 2017 - 10:51 am | वरुण मोहिते
गोवन पदार्थांसाठी छान . . बऱ्याचदा जातो . पापलेट आणि स्क्विड घेतलेले .उत्तम .जाण्यायोग्य ठिकाण . बोंबील फार प्रसिद्ध आहेत तिकडचे .तरीही अस्सल खव्वयांनी नारळी पौर्णिमेनंतर च जावे .
२) मागच्या आठवड्यात सिंगापुर ला असताना आवडलेली खादाडी ओशन करी फिश हेड हे रेस्टॉरंट .
29 Jul 2017 - 2:07 pm | त्रिवेणी
आमच्या सोसायटी शेजारी नवीन छोट हॉटेल सुरू झालंय तिथली चिकन हंडी. चव मस्त होती एकदम आणि हाफ हंडी दोघात खाऊन उरली.
31 Jul 2017 - 10:02 pm | मोदक
या हॉटेलचा पत्ता देता का?
29 Jul 2017 - 4:06 pm | अमरप्रेम
फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटलं !!!
31 Jul 2017 - 8:35 pm | मित्रहो
हैद्राबादला सायकलींग करताना काही ठरलेली खादाडीची ठिकाणे. इकडली ठिकाणी ही दोसा इडलीचीच असतात. बीएचइएल मधली इडली, थोड लांब गेल तर शंकरपल्लीची इडली, ब्रेव्हेच्या वेळेला इथल्या इडलीचा सर्वांना खूप उपयोग होतो त्यामुळेच त्यादिवशी भरपूर गर्दी असते. कधी शहरात जायची इच्छा झाली तर चारमिनारला गोविंद बंडी दोसा किंवा सचिवालयासमोरील बंडीवरचा दोसा. रामबंडीविषयी ऐकले पण खाल्ले नाही. परवा बीएचइएल मधली इडली खाल्ली आणि काल शंकरपल्लीला दोसा.
आता विषय निघाला म्हणून आठवले. बंगलोर म्हैसूर मार्गावरील माझी दोन आवडीची ठिकाणी एक कामत लोकरुची आणि मदुर (नक्की उच्चार माहीत नाही) वडा. कामतमधे कसल्यातरी पानात गुंडाळलेली इडली आणि तिथले जेवण वा. त्या भाकरी तर मस्त.
31 Jul 2017 - 9:33 pm | जेम्स वांड
कामतमधे कसल्यातरी पानात गुंडाळलेली इडली
तुम्ही बहुतेक केवड्याच्या पानात गुंडाळलेल्या इडली बद्दल बोलता आहात, आमच्या मुंबईच्या एका पाहुण्यांनी खायला घातली होती ती एकदा, माटुंग्याचे हॉटेल होते एक (नाव विसरलो) फर्मास होती. (ती केवड्याच्या पानात गुंडाळत नाहीत नुसते तर इडली पात्राच्या बेसला ते ठेऊन त्यावर पीठ घालून करतात असे सांगितल्याचं किंचित आठवतं
2 Aug 2017 - 1:47 pm | मित्रहो
कि अजून दुसरे ते माहीत नाही पण आता जालावर वाचले त्याला मुद्दे इडली म्हणतात. बनवायची पद्धत तुम्ही म्हणता तशीच असते.
4 Aug 2017 - 8:40 am | कबीरा
वहीच चारमिनार क्या बाबा जिसपे अपने इस्माईल भाई बैठे ले पिचले २५ साल से?
4 Aug 2017 - 6:33 pm | मित्रहो
अंग्रेज 1, 2 आया गया पर इस्माइल भाई हवीच है बे है.
4 Aug 2017 - 8:48 pm | मित्रहो
फोनमुळे गडबड झाली
अंग्रेज 1, 2 आया गया पर इस्माइल भाई वहीच बैठे है
5 Aug 2017 - 4:57 am | ब्रिटिश टिंग्या
कटाची आमटी अन् पुरणपोळी.
5 Aug 2017 - 9:54 am | तुषार काळभोर
.
5 Aug 2017 - 11:40 am | गवि
अनेक नोंदींमधे (घरी बनवलेले पदार्थ वगळता) त्या त्या हॉटेल / खानावळ, स्टॉल, टपरी वगैरेविषयी फार तपशील दिसत नाही. किमान इच्छुकाला तिथे पोहोचता येईल इतपत पत्ता आणि इतर आवश्यक तपशील देण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा.
5 Aug 2017 - 12:59 pm | मृत्युन्जय
Stew Art Baner
प्रत्येक वेळेस बाहेर जाउन तेच ते पंजाबी खायचा आताशा कंटाळा यायला लागला आहे. तसाही घासफूस खाणार्या माणसांचे ऑप्शन्स कमी असतात. प्रत्येक वेळेस जाउन तेच ते पनीर टिक्का मसाला, कढाई, हंडी, मेथी मटरमलाइ, चना मसाला आणि त्याच्या बरोबर खाण्यासाठी किचन मधुन ताटात येइतो वात्त्तड झालेल्या रोट्या वगैरे खाउन कंटाळाच येतो आजकाल. त्यामुळे सध्या बरेचदा नविन काहितरी ट्राय करायची हुक्की येते. ९०% वेळा वेगळी चव आवडौन जाते. १०% वेळा प्रयोग फसतो . पण ते ठीक आहे. असेच २ वर्षाकाठी कोथरुडला स्ट्यु आर्ट नावाच्या छोट्ञाश्या रेस्टोरंट मध्ये गेलो होतो. ( पौड रोड वर, दुर्गा कॉफीच्या समोरच्या बाजुच्या एका लेन मध्ये, खेळिया समोर). त्यावेळेस ते खुपच आवडले होते. पण कर्मधर्मसंयोगाने परत जाणे झाले नाही.
नुकतेच यांची दुसरी शाखा बाणेरला हापिसजवळ सुरु झाल्याने जाउन आलो (पत्ता: कपिल मल्हार सोसायटीसमोर, बाणेर रोड, बाणेर, पुणे). मागच्यावेळेस प्रमाणेच याही वेळेस मजा आ गया.
स्ट्यु आर्ट म्हणजे थोडक्यात सांगायचे तर वेगवेगळ्या प्रकारचे रस्से. रस्सा आणि स्ट्यु मध्ये थोडा फरक असतो (स्ट्यु थोडा जास्त घट्ट असतो कारण त्यात घन पदार्थांची संख्या आधिक असते. पण गोळाबेरीज थोडीफार तशीच.) इच्छुकांनी स्ट्यु म्हणून सर्च मारावा.
आम्ही तीन प्रकारचे स्ट्यु घेतले. ग्रीक्क स्ट्यु, पिरि पिरि स्ट्यु आणि हंगेरियन गुलाश. यातला हंगेरियन गुलाश पु लंच्या अपुर्वाई मुळे वाचुन माहिती होता. पिरी पिरी स्ट्यु म्हणजे थोडक्यात पिरी पिरी सॉस वापरुन केलेला स्ट्यु. माझ्या माहितीप्रमाणे पिरी पिरी हा मिरच्यांचा एक प्रकार आहे. त्याचा सॉस बनवताना त्यात अजुनही काही पदार्थ टाकतात. ग्रीक स्ट्यु नक्की काय असतो ते काही कळाले नाही पण चव दर्जेदार होती.
सगळेच स्ट्यु चविष्ट होते यात वादच नाही. स्ट्यु बरोबर थोडा भात आणि गार्लिक ब्रेड चे २ वाटे दिले जातात (स्ट्ञु आर्ट मध्ये). तोंडी लावायला आम्ही चीज गारिल्क ब्रेड घेतला होता. शिवाय टेंडर कोकोनट मोइतो आणि पोमेग्रेनेट मोइतो होते. (मोइतो हा उच्चार बरोबर असावा बहुधा अशी आशा करतो.) मोइतो ची चव भन्नाट आणि युनिक होती.
साधारण पणे अन्न समोर आल्यावर त्याचे फोटो काढण्याइतपत दम मला धरवत नाही. पण यावेळेस काढले. त्यापैकी काही खाली देत आहे.
ग्रीक स्ट्यु
पिरी पिरी स्ट्यु
हंगेरियन गुलाश
टेंडर कोकोनत मोइतो
चीज गार्लिक ब्रेड
सगळ्याचे मिळुन साधारण १००० रुपयाचे बिल आले. त्यात तिघांचे जेवण झाले (फार हेवी नाही झाले).
माझ्या माहितीनुसार स्ट्यु आर्ट फक्त स्ट्यु सर्व्ह करणारे (मेन कॉर्स म्हणुन एरवी तिथे इतर (काही ) स्टार्टर्स वगैरे मिळतात) भारतातले पहिलेच हॉटेल आहे.
आणि हो थत्ते नावाच्ग्या महाराष्ट्रीयन माणसाचे आहे. त्यामुळे जरुर जाउन या.
6 Aug 2017 - 4:45 pm | मोदक
झक्कास रे... नक्की जाऊन बघणेत येईल..!
18 Aug 2017 - 12:29 pm | अभिजीत अवलिया
बरेच नाव ऐकून ह्या हॉटेलच्या कोथरूड ब्रांचला १३ ऑगस्टला गेलो होतो.हंगेरियन गुलाश आणि एक केरला फ्राय असे काहीतरी नाव असलेला पदार्थ मागितला.
केरला फ्राय म्हणजे चिकनचे १०-१२छोटे तुकडे कढीपत्त्यात परतवून एका बाउल मधून दिले होते. भरीला भरपूर मीठ घातले होते. अतिशय खारट लागत होते. आणि किंमत बहुतेक २२०रू होती.
हंगेरियन गुलाश (चिकन) म्हणजे फोटोत आहे तेच फक्त करी मध्ये भाज्यांऐवजी ५-६ चिकनचे तुकडे होते.
ह्या दोनही डिशचे GST लावून ६०५ रु झाले. दोन्ही पदार्थांची quantity इतकी कमी होती की मी एकटाच ८-१० केरला फ्राय किंवा ४ हंगेरियन गुलाश संपवले असते. त्यामुळे मजबूत आहार असणाऱ्यांनी तितक्याच मजबूत बिलाची तयारी ठेवून जावे. वैयक्तिकरित्या मला चव आवडली नाही हे नमूद करतो. व्हेज पदार्थ कसे असतील माहीत नाही.
5 Aug 2017 - 2:19 pm | वरुण मोहिते
सिमला ढाबा म्हणून एक ढाबा आहे . एकदम टिपिकल. पण त्यांचे फूड जबरदस्त आहे . नॉनव्हेज खाणाऱ्यांनी आवर्जून थांबावे असे ठिकाण . चिकन आणि मटण साठी . तसेच तिकडचे आलू पराठे फार फेमस आहेत . पूर्वी त्या रस्त्याने गेलो कि नेहमी जायचो तिथे . आताच बऱ्याच दिवसांनी २-४ दिवसांपूर्वी गेलेलो.
अँबियन्स खास नाही त्यामुळे फॅमिली सोबत असाल तर आपापली मर्जी . म्हणजे येतात तिथे फॅमिली तरी . त्या रोड ला बरेच ढाबे ,मोठे हॉटेल्स आहेत.तरी
स्थानिकांमध्ये हा ढाबा प्रसिद्ध आहे .
..
7 Aug 2017 - 1:58 pm | मनिमौ
नोंद घेतलेली आहे. लौकरच जाईन
8 Aug 2017 - 5:25 pm | मोदक
सोमवारी बंद असते. मग काल पोलका डॉट्सला जाऊन चिकनचे एक स्टार्टर आणि थाई रेड करी खाल्ली.
फोटो देतो लवकरच.
7 Aug 2017 - 2:03 pm | मनिमौ
सरमिसळ. पाच सहा प्रकारची मिसळ मिळते. त्याचबरोबर देशी थंड पेय आणी ईडली वगैरे. मिसळीची चव छान आहे. स्वच्छ आणी छोटेसे हाॅटेल आहे
18 Aug 2017 - 7:20 pm | उपेक्षित
सरमिसळ आपल्या दोस्ताची आहे बरका जाऊन याच मंडळी एकदा आग्रहाची विनंती....
8 Aug 2017 - 4:53 pm | साधा मुलगा
माहीम जवळ शीतला देवी मंदिर मार्ग गल्लीत एक icy spicy म्हणून एक chinese रेस्टॉरंट आहे, आज तिथे मांचाव सूप आणि फ्राईड रईस खाल्ला, veg नॉन वेग दोन्ही चांगले आहे, सातही दिवस चालू असते.
17 Aug 2017 - 7:08 pm | मोदक
डॉ श्रीहास यांच्या पुणे दौर्यात आंम्ही पोलका डॉट्सला भेट दिली..
स्टार्टर मध्ये फिलिपिनो बार्बेक्यु चिकन आणि मेन कोर्सला व्हेज थाई रेड करी...