हिंदी सिनेमांना थीम संगीत नसतेच असे नाही, पण पण त्यांची धाव ही "टायटल साँग" पुरतीच मर्यादित. कोणे एके काळी हिंदी सिनेमांना टायटल साँग असणे अनिवार्य होते. उदा, "जब प्यार किसि से होता है" किंवा "युं तो हमनें लाख हसीन देखे है." किंवा मग टायटल साँग नसेल तर, मग जंगली सिनेमातील "ऐहसान तेरा हो गा मुझपर" हे गाणे. सगळ्यात शेवटचा "टायटल साँग" वाला सिनेमा बघीतला तो "सनम तेरी कसम"
तसे थीम म्युझिकचा प्रयोग हिंदी सिनेमांनी पण केला आहेच, "इत्तेफाक" ह्या सिनेमाची पण सुरुवातीला "कॅलिडोस्कोपिक" बॅकगाऊंड वर नावे दाखवली आहेत.पण हे असे काही सिनेमे अपवाद म्हणूनच.
हिंदी सिनेमांत गाजलेली थीम म्युझिक दोनच एक म्हणजे शोले आणि दुसरा डॉन (अमिताभह्या, दोघांचीही थीम म्युझिक अप्रतिम.
पण मग पुढे इंग्रजी सिनेमे बघायचे व्यसन लागले आणि आम्ही नकळत इंग्रजी "थीम म्युझिक"च्या प्रेमात पडलो.
मुळात "थीम म्युझिक" असे हवे की ते चित्रपटाच्या कथेला पूरक हवे किंवा कथा नायकाची वैशिष्ट्ये समजायला हवीत. आल्फ्रेड हिचकॉकला "थीम म्युझिकचे" महत्व फार उत्तम रित्या समजलेले होते. असे माझे निरिक्षण.
"सायको" हा सिनेमा खरोखरच उत्तम होता पण त्याला सुरुवातीच्या "थीम न्युझिक" मुळे सिनेमा पहिल्या क्षणापासूनच पकड घेतो.
https://www.youtube.com/watch?v=Tek8QmKRODw
तसेच हिचकॉकचा व्हर्टिगो, https://www.youtube.com/watch?v=4CZfSc6nJ8U आणि "रियर विंडो" https://www.youtube.com/watch?v=4No2ZhJwVGU
"डायल M फॉर मर्डर" https://www.youtube.com/watch?v=3GZt8n-PGyg
आणि
मला आवडलेले "नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट" https://www.youtube.com/watch?v=KVUnUmPV33c
=========
इंग्रजी सिनेमांचा विषय आणि मग त्यात काऊ बॉईज नसतील तर मग कसे?
"द गूड, द बॅड अँड द अग्ली" https://www.youtube.com/watch?v=h1PfrmCGFnk
युल ब्रायनरचा "द मॅग्निफिशंट सेव्हन" https://www.youtube.com/watch?v=yulmgTcGLZw
मॅकेनाज गोल्डचे "ओल्ड टर्की बझार्ड" https://www.youtube.com/watch?v=h7mVLWcMm-U
==========
मला आवडलेली अजून काही थीम म्युसिक.
इंडियाना जोन्स https://www.youtube.com/watch?v=-bTpp8PQSog
सुपर मॅन https://www.youtube.com/watch?v=e9vrfEoc8_g
स्टार वॉर्स https://www.youtube.com/watch?v=_D0ZQPqeJkk
ई. टी. https://www.youtube.com/watch?v=O15x-B8PgeE
द गन्स ऑफ नॅव्हेरॉन https://www.youtube.com/watch?v=Ewi1LRld5_k
व्हेर इगल डेअर https://www.youtube.com/watch?v=8XKGhG0W0LQ
द लाँगेस्ट डे https://www.youtube.com/watch?v=gZ7hYEJt2UY
सेव्हिंग प्राय्व्हेट रायन https://www.youtube.com/watch?v=y-lyqc0ZDCA
मिलियन डॉलर बेबी https://www.youtube.com/watch?v=fQgIQ65XdDU
टर्मिनेटर https://www.youtube.com/watch?v=mpMg1upld0w
गॉडफादर https://www.youtube.com/watch?v=1aV9X2d-f5g
गॉन इन सिक्स्टी सेकड्स https://www.youtube.com/watch?v=Q8HTUTP7ohQ
नॅशनल ट्रेझर https://www.youtube.com/watch?v=YFrfAM0U_5M
द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय https://www.youtube.com/watch?v=83bmsluWHZc
द ग्रेट एस्केप https://www.youtube.com/watch?v=MbsuAbTTsV8
मिशन इंपॉसिबल https://www.youtube.com/watch?v=XAYhNHhxN0A
पायरेट्स ऑफ द कॅरेबियन https://www.youtube.com/watch?v=27mB8verLK8
कम सप्टेंबर https://www.youtube.com/watch?v=te7I_ta7Vzc (ह्याने बर्याच काळ मोहिनी घातली होती, जवळपास प्रत्येक जादूच्या कार्यक्रमात ह्या संगीताचा वापर ऐकला आहे.)
हॅरी पॉटर https://www.youtube.com/watch?v=Htaj3o3JD8I
कॅच मी इफ यु कॅन https://www.youtube.com/watch?v=gaLDyrun_Cc
पिंक पँथर https://www.youtube.com/watch?v=9OPc7MRm4Y8
आणि
आणि
आणि
१९६२ पासून अद्यापही तितकेच श्रवणिय
जेम्स बाँड https://www.youtube.com/watch?v=ye8KvYKn9-0
प्रतिक्रिया
26 Jun 2017 - 4:39 pm | सतीश कुडतरकर
रॉकी - https://www.youtube.com/watch?v=I33u_इल्ली३व
हा कसा काय मिसला.
26 Jun 2017 - 4:40 pm | सतीश कुडतरकर
https://www.youtube.com/watch?v=I33u_EHLI3w
हा कसा काय मिसला.
26 Jun 2017 - 4:50 pm | सुधांशुनूलकर
फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर
26 Jun 2017 - 4:52 pm | योगेश लक्ष्मण बोरोले
'फिडलर आॅन द रुफ'
26 Jun 2017 - 5:08 pm | दशानन
ऑल टाईम फेवरेट "Wall-E"
26 Jun 2017 - 5:28 pm | चेतन गावडे
टॉम क्रूज़चा बेस्ट पिक्चर - द लास्ट सामुराई - https://www.youtube.com/watch?v=स्विउयवत७केक & https://www.youtube.com/watch?v=-०ओ७८क्काय६ए - हान्स झिमरच उत्कृष्ट संगीत
26 Jun 2017 - 5:30 pm | एस
हिंदी किंवा भारतीय चित्रपटांतही थीम संगीताचा वापर (किंवा स्वतंत्र विचार) केलेला दिसतो. उत्तम उदाहरण म्हणजे 'सरकार' चित्रपटाचे कै. अनिल मोहिले यांनी दिलेले पार्श्वसंगीत. 'गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा....'.
ए. आर. रहमान यांनीही अफलातून पार्श्वसंगीत दिले आहे काही चित्रपटांना.
मराठीत 'जोगवा', 'किल्ला' अशा चित्रपटांचेही पार्श्वसंगीत श्रवणीय आहे.
26 Jun 2017 - 5:38 pm | मुक्त विहारि
दाऊदचा उदय आणि आमचा हिंदी चित्रपट संन्यास, हा निव्वळ योगायोग.
28 Jun 2017 - 10:52 am | अप्पा जोगळेकर
सरकार चित्रपटात नुसता अंधार आहे. आणि ते गोविंदा गोविंदा इतक्या जोरात वाजते की कान किटतात आणि आशय पोचवणारे डायलॉग इतक्या हळू आवाजात आहेत की काहीच कळत नाही.
26 Jun 2017 - 5:45 pm | कपिलमुनी
Good Bad Ugly ची थीम
https://youtu.be/AFa1-kciCb4
26 Jun 2017 - 6:42 pm | स्रुजा
१०० फीट जर्नी चं ही पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. तो सिनेमाच फार सुंदर आहे आणि रेहमानचं संगीत बाप !!
26 Jun 2017 - 7:28 pm | मुक्त विहारि
एका नितांत सुंदर सिनेमाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद....
27 Jun 2017 - 9:57 am | धर्मराजमुटके
माझी आवडती थिम म्हणजे जनु बांडेच्या फिल्मचे टायटल मुझिक !
27 Jun 2017 - 10:27 am | मराठी_माणूस
आकाशवाणीवर पुर्वी (साधारण ७५-७६ च्या सुमारास) दोन कार्यक्रमाच्या मधे, थोडा वेळ असेल तर फिलर म्हणुन एक मेंडोलीन ची (भैरवीतील असावी) धुन लावली जायची ती फर छान होती. कोणाला त्या बद्दल माहीती आहे का ? (सध्या पण एक मेंडोलीन ची धुन वाजवली जाते पण ही ती नव्हे)
27 Jun 2017 - 10:51 am | jp_pankaj
https://youtu.be/0X3Me_MVR90
Die hard ३ - die with vengance
माझी आवडती थीम
27 Jun 2017 - 10:51 am | jp_pankaj
https://youtu.be/0X3Me_MVR90
Die hard ३ - die with vengance
माझी आवडती थीम
27 Jun 2017 - 11:44 pm | श्रीगुरुजी
हे जबरदस्त थीम म्युझिक
https://youtu.be/vihnAK114N8
28 Jun 2017 - 7:51 am | तुषार काळभोर
खाली खाली वाचत येताना, हाच विचार चालू होता की अजून त्याचा उल्लेख कसा नाही केला.
रच्याकने, माझ्या वैयक्तिक आवडीचे:
द गुड, द बॅड, द अगलीचं (हे खरं तर सैफ अली खान च्या कोणत्या तरी नव्वदीतल्या पिक्चरमध्ये पाहिल्यांदा ऐकलेलं)
जेम्स बॉण्ड (हे पण आधी कितीतरी मराठी हिंदी पिक्चरमध्ये पाहिल्यांदा ऐकलेलं, 2003 मध्ये डाय अनादर डे पाहीपर्यंत)
मिशन impossible: 2002 मध्ये पहिल्यांदा व्हीसीडीवर पाहिलेला MI2 . टॉम भाऊ कडा चढून जाताना पहिला अन याड लागलं!
सायको: हे पहिल्यांदा ऐकलं, फाईंडिंग निमो बघताना. दातांच्या डॉक्टरची भाची दवाखान्यात येते तेव्हा.
किलबिल: ओ रेन ईशी हॉटेलमध्ये तिच्या गॅंगबरोबर चालत येते, तेव्हाचं पार्श्वसंगीत.
(लुनी टून्स) द रोड रनर शो: ह्यात coyote त्याचा प्लॅन तयार करताना जे वाजतं, ते. हे पण बऱ्याच मराठी चित्रपटांच्या विनोदी ऍक्शन सीन्स मध्ये ऐकून माहिती होतं)
28 Jun 2017 - 7:57 am | तुषार काळभोर
आता लगेच आठवलेलं, नटरंग मधलं किशोर कदम सोनाली कुलकर्णीला वरातीत पाहतो, ते म्युजिक!
28 Jun 2017 - 8:58 am | हर्मायनी
The Grand Budapest Hotel या सिनेमाला २०१५ चा बेस्ट स्कोर साठीचं ऑस्कर हि मिळाले आहे.. उत्तम संगीत..
अवांतर : यातला मि. गुस्ताव हाच Voldemort आहे यावर विश्वासच बसत नाही..
28 Jun 2017 - 10:23 am | शुभां म.
Ghost writer मधील गूढ संगीत, अगदी पहिल्या शॉट पासूनच हा चित्रपट काही तर वेगळा असल्याचे सूचक करतो.
रोमन पोलान्स्की यांची अजून ऐक अप्रतिम निर्मिती.
28 Jun 2017 - 10:46 am | सिरुसेरि
गोल्डन आय , डाय अनादर डे
28 Jun 2017 - 12:44 pm | अभिजित - १
the last of the Mohicans - https://www.youtube.com/watch?v=9tjdswqGGVg&ytbChannel=EpicMusicChannel8
the departed - https://www.youtube.com/watch?v=WqffDwfu-1w&ytbChannel=Darth%20Vader
ओरिजिनल नाहीत हे माहित आहे तरीही ..
29 Jun 2017 - 9:42 am | वामन देशमुख
माझी सर्वाधिक आवडती थीम धूनः टर्मिनेटर .
4 Jul 2017 - 8:18 am | चौकटराजा
गन्स ऑफ नॅव्हरॉन
फॉर अ फ्यू डोलर्स मोर
व्हेअर इगल्स डेअर