वाघोबा वाघोबा किती वाजले
वाघोबा वाघोबा किती वाजले,
पाऊस न येताच राजीनामे भिजले|
वाघोबा वाघोबा किती वाजले,
म्याव म्याव च्या डरकाळीने घसे बसले|
वाघोबा वाघोबा किती वाजले,
भूकंपाच्या धमकीने हसू फुटले|
वाघोबा वाघोबा किती वाजले,
आदिलशहा* येताच शेपूट घातले|
वाघोबा वाघोबा किती वाजले,
यांच्या मर्कटलीलांनी केजरीवाल लाजले|
वाघोबा वाघोबा किती वाजले,
धाकल्याच्या चतुराईने थोरले बिथरले|
वाघोबा वाघोबा किती वाजले,
बनियासमोर** लोटांगण घातले|
वाघोबा वाघोबा किती वाजले,
यांच्या वल्गनांनी मावळे शरमले|
वाघोबा वाघोबा किती वाजले,
असा पक्ष, असे नेते हे दुर्दैव आपुले|
(* - विधानसभा निवडणुकीत उधोजींनी अमित शहांचा उल्लेख 'आदिलशहा' असा केला होता.
** - मुंबई महापालिका निवडणुकीआधी गुजरात्यांची मते मिळविण्यासाठी उधोजींनी हार्दिक पटेलला मातोश्रीवर निमंत्रित करून त्याच्याकडून पाठिंबा मिळविला होता.)
प्रतिक्रिया
21 Jun 2017 - 3:56 pm | अभिजीत अवलिया
बडबडगीतासारखे वाटतेय :)
राग मानू नका :)
21 Jun 2017 - 4:01 pm | जेम्स वांड
हार्दिक पटेल बनिया नाही हा तांत्रिक भाग वगळता फर्मासच जमलं आहे काव्य, खूप आवडलं.
21 Jun 2017 - 4:20 pm | विशुमित
जे न देखे रवी... या सदरामध्ये देखील गुरुजींचा दमदार शिरकाव.
अभिनंदन..!!
(कृपया हलके घ्या )
21 Jun 2017 - 4:36 pm | अरूण गंगाधर कोर्डे
सद्यस्थितीवरील कविता चांगली जमवली आहे.
21 Jun 2017 - 8:43 pm | ज्योति अळवणी
म्याव म्याव वाल्या वाघोबानी वाचावी अशी कविता. मस्त