भारताचा एक खरा पण अप्रसिद्ध नायक (अनसंग हिरो) : माथुन्नी मॅथ्यूज

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
21 May 2017 - 11:47 pm

काही माणसे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता, जगावेगळे धैर्य दाखवून, आपल्याशी तसा काही तडक संबंध नसलेल्या लोकांना वाचविण्यासाठी असामान्य कार्य करतात. अश्या माणसांना बर्‍याचदा पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि थोडीबहूत मिळाली तरी, यातली बरीच माणसे प्रसिद्धिपराङमुख असल्याने, जनतेच्या आठवणीतून सहज निघून जातात. मात्र, अशी माणसे खर्‍या अर्थाने नायक (हिरो) असतात.

असाच एक, मुथुन्नी मॅथ्युज नावाचा, भारतिय सुपुत्र आणि नायक काल (२० मे २०१७ रोजी) आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. आज हे नाव कोणाला सहजपणे आठवणार नाही. पण या दु:खद क्षणी त्याच्या कामगिरीची आठवण करणे आवश्यक आहे.


मुथुन्नी मॅथ्युज

सद्दाम हुसेनने २ ऑगस्ट १९९० साली कुवेतवर हल्ला केला आणि जेमतेम दोन दिवसांत ते चिमुकले राष्ट्र पादाक्रांत केले. कुवेतमध्ये कामासाठी आलेले आणि इराक-कुवेत शत्रूत्वाशी काहीही देणे घेणे नसलेले सुमारे २ लाखांच्या आसपास भारतिय नागरिक मात्र या युद्धाच्या धुमश्चक्रीत सापडले आणि नंतर अनेक दिवस इराकी सैन्याच्या ताब्यातील कुवेतमध्ये अन्नपाण्याविना अडकून पडले. आपल्या कुटुंबासह तेथून पळून जाण्याइतकी ओळख आणि क्षमता असलेल्या मुथुन्नी मॅथ्युजने तेथेच राहून युद्धाने होरपळलेल्या आणि सर्वस्व गमावलेल्या आपल्या देशबांधवांना देशात परतण्यासाठी मदत करण्याचे ठरवले. त्याने स्वतःच्या पैशांचा व ओळखीचा वापर करून हजारो लोकांना अन्नपाणी पुरवले आणि भारतिय सरकारने लोकांच्या परतीसाठी विमानव्यवस्था करेपर्यंत त्यांना तगून रहायला मदत केली. या काळात मॅथ्युजने दिल्लीतील भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून, त्यांच्या मागे लागून, एक प्रकारे कुवेतमधील भारताच्या "अनधिकृत प्रतिनिधी"ची भूमिका वटवली आणि सुमारे दीड-दोन लाख भारतियांना भारतात सुखरूप परतण्यासाठी मदत केली.

या घटनेवर आधारीत असलेला "एअरलिफ्ट (Airlift)" नावाचा एक हिंदी चलतचित्रपट काही काळापूर्वी प्रदर्शित झाला आहे. त्यात अक्षय कुमारने मॅथ्युजची भूमिका केली आहे.

वीस वर्षाचे तरूण मॅथ्युज १९५६ साली कामाच्या शोधात कुवेतमध्ये पोहोचले. टंकलेखक म्हणून टोयोटा कंपनीत नोकरीला लागलेल्या या तरूणाने त्याच कंपनीतून १९८९ साली व्यवस्थापकिय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) या पदावरून निवृत्ती स्विकारली ! त्यानंतर त्यांनी कुवेतमध्येच स्वतःचा कार रेंटल आणि जनरल ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. याशिवाय, ते कुवेतमधिल जब्रिया इंडियन स्कूलचे अध्यक्ष व इंडियन आर्ट सर्कलचे संस्थापक सदस्य होते. त्यांच्या समाजोपयोगी कामामुळे ते कुवेतमध्ये "टोयोटा सनी (Toyota Sunny)" या नावाने प्रसिद्ध होते.

कुवेतमधिल युद्धाचा ज्वर उतरल्यावर जरी हा नायक सर्वसाधारण भारतियाच्या स्मृतीतून निघून गेला असला तरी, ज्यांना युद्धाच्या रणधुमाळीतून बाहेर काढून भारतात सुखरूप परतायला मदत केली ते सुमारे २ लाख भारतिय आणि त्यांचे कुटुंबिय टोयोटा सनीचे ऋण विसरणे शक्य नाही !

या असामान्य भारतिय वीराला त्याच्या मृत्युसमयी अनेकनेक सॅल्युट्स आणि भावपूर्ण श्रद्धांजली !

इतिहासव्यक्तिचित्रप्रकटन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2017 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा

__/\__

गामा पैलवान's picture

22 May 2017 - 12:24 am | गामा पैलवान

माथुन्नी मॅथ्यूज यांना आदरपूर्वक श्रद्धांजली. त्यांना शांती लाभो. 'एअरलिफ्ट' चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्यांचा उल्लेखही नाही हे खटकलं.

-गा.पै.

खेडूत's picture

22 May 2017 - 12:30 am | खेडूत

मॅथ्युज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. !

खूप छान माहिती. एयरलिफ्ट सिनेमा आवडला होता.
श्री. मॅथ्यूज यांना श्रद्धांजली.

जावई's picture

22 May 2017 - 6:33 am | जावई

श्री. मॅथ्यूज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सुखीमाणूस's picture

22 May 2017 - 6:54 am | सुखीमाणूस
सुखीमाणूस's picture

22 May 2017 - 6:54 am | सुखीमाणूस
सुखीमाणूस's picture

22 May 2017 - 6:55 am | सुखीमाणूस
साधा मुलगा's picture

22 May 2017 - 8:08 am | साधा मुलगा

भावपूर्ण श्रद्धांजली_/\_
@गा.पै. मला वाटते चित्रपटाच्या शेवटी उल्लेख केला आहे, त्यावेळच्या लोकांचे फोटो पण दाखवले आहेत.

भारताच्या ह्या सुपुत्राला विनम्र श्रद्धांजली!

चौकटराजा's picture

22 May 2017 - 9:42 am | चौकटराजा

आजच्या युगात " व्हेस्टेड इन्ट्रेस्ट " नसेल तर माणूस एक श्वास देखीला जादा घेत नाही . १९९० म्हण्जे आजच्या इतका आत्मकेंद्री समाज जरी नव्हता तरीही या व्यक्तीने केलेले धाड्स व कार्य असामान्यच ! श्री मॅथ्युज याना त्यांच्या कृतीशीलते बद्द्ल आदरांजली बाकी भारतात नेते, बुवा, साधू, गुरू या बोलघेवड्यांची कमी नाही.

दशानन's picture

22 May 2017 - 9:47 am | दशानन

__/\__

कल्पने पलीकडील देखील अचाट कृत्य करण्याची इच्छा व त्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याची प्रवृत्ती असलेली अशी काही वेडी लोक असतात यावर कदाचित पुढील पिढी विश्वास नाही ठेवणार, पण अशी ना तशी माणुसकी त्यांना दर्शन देत राहील.
रोल मॉडेल शोधत फिरत असणाऱ्या लोकांना आपण मेन "रोल"मध्ये यावे असे जेव्हा वाटू लागेल तेव्हा अश्या अचाट सामर्थ दाखवणार्या हिरोना समाधान लाभेल.

कानडाऊ योगेशु's picture

22 May 2017 - 10:17 am | कानडाऊ योगेशु

भावपूर्ण श्रध्दांजली!

पैसा's picture

22 May 2017 - 11:18 am | पैसा

_/\_ नतमस्तक आहे.

टवाळ कार्टा's picture

22 May 2017 - 12:05 pm | टवाळ कार्टा

_/\_

अनिंद्य's picture

22 May 2017 - 12:39 pm | अनिंद्य

प्रसंगोचित, उत्तम लेख !

सूड's picture

22 May 2017 - 12:46 pm | सूड

___/\___

प्रचेतस's picture

22 May 2017 - 1:36 pm | प्रचेतस

समयोचित लेख.

___/\___

नि३सोलपुरकर's picture

22 May 2017 - 1:43 pm | नि३सोलपुरकर

भावपूर्ण श्रध्दांजली! __/\__.

पद्मावति's picture

22 May 2017 - 1:43 pm | पद्मावति

सुन्दर लेख __/\__

भावपूर्ण श्रध्दांजली! __/\__

समयोचित लेख.

सचिन काळे's picture

22 May 2017 - 4:27 pm | सचिन काळे

प्रसंगोचित, उत्तम लेख !
भावपूर्ण श्रध्दांजली! __/\__

गामा पैलवान's picture

22 May 2017 - 5:55 pm | गामा पैलवान
डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2017 - 6:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

कुवेतवरील इराकी आक्रमणाच्या वेळी तेथिल तत्कालीन भारतिय दुतावास आणि (एक मध्यम स्तराचा अधिकारी सोडता) तत्कालीन भारतीय परराष्ट्र खात्याची कामगिरी एकंदरीत फार अभिमानास्पद नव्हती असे म्हणतात. चित्रपट पाहिला असेल तर ते आडून का होईना पण स्पष्ट होतेच.

अश्या पार्श्वभूमीवर, मॅथ्युज यांच्या कामगिरीला पुरेशी प्रसिद्धी देण्याने, सरकारी अनास्था आणि अकार्यक्षमता उघडी पडली असती. अर्थातच, त्यावेळी त्या घटनेतील कामगिरीचे श्रेय घेताना मॅथ्युज हे नाव (सोईस्करपणे) विसरले गेले. सरकारी कारभारात हे नवीन नाही ! :(

या घटनेला दोन दशकांपेक्षा जास्त वेळ झाला असला तरी चित्रपट वादग्रस्त होऊ नये यासाठी बरीच सावधगिरी घेतलेली दिसते... त्यामुळे तो सर्वच घटनेचे पूर्णपणे सत्यदर्शन करत नाही.

त्याकाळी कुवेतमध्ये सुमारे ६ लाखावर भारतीय होते असे म्हणतात. त्यातल्या ज्याना जमले ते जॉर्डन अथवा इराकमध्ये पळून गेले, ज्यांना जमले नाही किंवा शक्य नव्हते त्यांना कुवेतमध्येच देवाचा धावा करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अर्थातच, खूप गाजावाजा झाल्यावर घटनेच्या शेवटच्या काळात सरकारी यंत्रणेला जाग आली. त्यानंतर, मात्र अनेक ठिकाणी (कुवेत; अम्मान, जॉर्डन; बसरा, इराक; इ) कोणत्याही संसाधनाशिवाय अडकून पडलेल्या व पारपत्रे नसलेल्या भारतियांना देशात परत आणण्यासाठी झालेल्या कारवाईत सरकारबरोबर एअर इंडियाने व इंडियन एअरलाईन्सने मानाची कामगिरी बजावली. त्यासंबधिची त्रोटक माहिती अशी...

* निर्वासन (इव्हॅक्युएशन) कामगिरीचा कालखंड : १८ ऑगस्ट ते २० ऑक्टोबर १९९०
* विमान सेवा कंपन्या : एअर इंडिया व इंडियन एअरलाईन्स (भारतिय सैनिकी व मुलकी विमानव्यवस्थेखाली ही कारवाई करण्यास करण्यास कुवेती सरकार (इन एक्झाईल) आणि युएनने मनाई केल्यामुळे ही वाहतूक युएनच्या बॅनरखाली केली गेली.)
* एकूण विमानभरार्‍या : ४८८
* अम्मान (जॉर्डन) ते मुंबई (एका दिशेने ४,११७ किमी अंतर)

साधा मुलगा's picture

24 May 2017 - 4:52 pm | साधा मुलगा

हि लिंक पहा:
यात ५ मिनिटे ४२ सेकंद नंतर क्रेडीट दिलेले आहे.

गामा पैलवान's picture

24 May 2017 - 6:36 pm | गामा पैलवान

धन्यवाद, साधा मुलगा!
आ.न.,
-गा.पै.

खुपच सुंदर लेख. दुर्दैवाने बर्‍याच व्यक्तिंचे महानपण ते गेल्यानंतर समजते.

चित्रगुप्त's picture

22 May 2017 - 8:30 pm | चित्रगुप्त

मॅथूज यांना श्रद्धांजली.
सिनेमात त्यांचे नाव 'रणजीत कट्याल' असे आहे, हा बॉलिवुडातील पंजाब्यांच्या वर्चस्वाचा परिणाम म्हणावा काय?

टवाळ कार्टा's picture

22 May 2017 - 8:36 pm | टवाळ कार्टा

अर्थातच

हीरो अक्षय कुमार फिक्स असताना नाव पंजाबीच बरे वाटनार.
तो कुठल्याही अँगलने केरली सीरियन ख्रिस्टी वाटला नसता.

मराठी_माणूस's picture

23 May 2017 - 10:43 am | मराठी_माणूस

मग रजनीकांत ला घ्यायचे.

जेम्स वांड's picture

29 May 2017 - 10:26 am | जेम्स वांड

मथुन्नी मॅथ्यूज ह्यांनी घेतलेल्या मेहनातीत त्यांच्या सोबत 'हरभजनसिंह बेदी' नावाचे एक पंजाबी गृहस्थ सुद्धा खांद्याला खांदा लावून उभे होते, असं कुवैत एअरलिफ्टचं विकिपीडिया पेज सांगतंय. त्यामुळे अक्षयकुमार पंजाबी दाखवणे बरेच संयुक्तिक वाटते.

'१,७०,००० भारतीय' एअरलिफ्ट करायची स्टोरी कोणी दाखवत असेल तर त्यात पंजाबी गैर पंजाबी वगैरे अप्रस्तुत वाटून गेले

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2017 - 1:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

पंजाबी गैर पंजाबी वगैरे अप्रस्तुत वाटून गेले

याच्याशी १००% सहमत.

पण, श्रेयनिर्देश करायची वेळ आली तेव्हा सरकारने त्या कारवाईच्या खर्‍या निस्वार्थ नायकांची योग्य ती दखल घेतली नव्हती आणि आजही सर्वसामान्य माणसाला त्यांची नावेही माहीत नाहीत, हे दुर्दैवी सत्य मानावेच लागेल.

जेम्स वांड's picture

29 May 2017 - 2:02 pm | जेम्स वांड

ह्याबद्दल दुमत नाहीच, सरकारने श्रेयनामावलीत यथायोग्य निर्देशन नाही केलेलं ह्या विभूतींचे. मी फक्त सिनेमा बद्दल बोललो होतो सर.

निशाचर's picture

22 May 2017 - 8:46 pm | निशाचर

_/\_

सतिश गावडे's picture

22 May 2017 - 10:08 pm | सतिश गावडे

समयोचित लेख. ईच्छा शक्तीच्या जोरावर काही वेळा एखादी व्यक्ती एखाद्या अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून कसा मार्ग काढू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

समयोचित लेख. हे कार्य खरोखरच खूप महान होते.
या कामगिरीमुळे एअर इंडियाच्या नावावरही गिनेस बूकमध्ये रेकॉर्ड आहे.

किसन शिंदे's picture

23 May 2017 - 9:56 am | किसन शिंदे

एअरलिफ्ट नंतर या माणसाबद्दल बरंच वाचायला मिळालं होतं.

सविता००१'s picture

23 May 2017 - 3:46 pm | सविता००१

__________/\_________

Nitin Palkar's picture

23 May 2017 - 8:44 pm | Nitin Palkar

_/\_

Nitin Palkar's picture

23 May 2017 - 8:44 pm | Nitin Palkar

_/\_

चौथा कोनाडा's picture

23 May 2017 - 10:10 pm | चौथा कोनाडा

स्वकियाना मायदेशी परतायला अचाट मदत करणार्‍या देवदुताची दुर्दम्य कहाणी म्हण्जे मुथुन्नी मॅथ्युज !
सुंदर लेख, डॉ साहेब __/\__

एअरलिफ्ट मुळे मुथुन्नी मॅथ्युज जगामध्ये प्रकाश झोतात आले.
कालांतराने एअरलिफ्ट म्हटले मॅथ्युज हेच नाव उच्चारले जाईल, फिल्मी 'रणजीत कट्याल' पुसट झालेला असेल!

सौन्दर्य's picture

24 May 2017 - 12:20 am | सौन्दर्य

इतकी चांगली माहिती पुरविल्याबद्दल आभार.
ह्या अन संग हिरोला श्रद्धांजली.

अमोल काम्बले's picture

24 May 2017 - 11:37 am | अमोल काम्बले

भावपूर्ण श्रध्दांजली! _/\_

रामपुरी's picture

25 May 2017 - 3:17 am | रामपुरी

"एअरलिफ्ट" बघायच्या आधी हे नाव माहीत नव्हते हे इथे सखेद कबूल करावेसे वाटते.

अमु१२३'s picture

25 May 2017 - 1:07 pm | अमु१२३

RIP ..

मदनबाण's picture

30 May 2017 - 9:10 pm | मदनबाण

_/\_
आपण सदैव अश्या वीरांची आणि देशासाठी प्राण त्याग करणार्‍या परमवीरांची आठवण ठेवली पाहिजे...
या लेखामुळे सद्दाम ने पेटवुन दिलेल्या तेल विहरी आठवल्या ! मला जितकं आठवतं त्याप्रमाणे या तेल विहरी पेटवुन दिल्यामुळे इतक प्रदुषण झाल होतं कि नंतरच्या काळात काश्मिर मध्ये काळा बर्फ पडला होता !

जाता जाता :- Vishwa Samvad Kendra JNU मधुन काही वेळा पूर्वीच पोस्ट झालेला व्हिडियो इथे देउन जातो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Heysa rudhrassa Heysarabhadra samudhrassa... :) :- Baahubali 2

एकन्दरित असे बरेच दुर्लक्शित लोका आहेत कि ज्यान्ना त्यन्च्य कामाचा श्रेय मिळाला नाहि

अमोल निकस's picture

7 Jun 2017 - 7:46 am | अमोल निकस

खूप छान माहिती आहे

मुक्त विहारि's picture

15 Jun 2017 - 8:01 am | मुक्त विहारि

लेख आवडला

अभिजीत अवलिया's picture

15 Jun 2017 - 8:13 am | अभिजीत अवलिया

!!! भावपूर्ण श्रध्दांजली !!!

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

16 Jun 2017 - 8:02 am | योगेश लक्ष्मण बोरोले

छान लेख लिहीलात. टोयाटा सनीला श्रद्धांजली. तुमचे मनापासुन आभार.

स्नेहनिल's picture

17 Jun 2017 - 11:26 pm | स्नेहनिल

___^____