रीमा लागूू . . . . भावपूर्ण श्रध्दांजली !

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
18 May 2017 - 10:02 am

रीमा लागू यांचे हृदयविकाराने निधन . . . .

अनपेक्षित . . अचानक . . . या बातमीनं त्यांच्या एक से बढकर एक भूमिका डोळ्यासमोर येत आहेत . . . . नाटक ,चित्रपट, टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमातून आपली वेगळी छाप सोडणारी अष्टपैलू अभिनेत्री आता आपल्याला परत दिसणार नाही याचं मनापासून वाईट वाटतं आहे . . . . विनोदी ,गंभीर, कारुण्यपूर्ण अशा कुठल्याही भूमिकेसाठी ती नेहमीच योग्य होती . . . . नावातच "मा"असल्याने आईची भूमिका तिने यथायोग्य वठवली . . . . . "माझं घर माझा संसार" मधली तिची वास्तवाजवळ जाणारी भूमिका दुसऱ्या कुणालाही शोभून दिसली नसती . . .

माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर श्रीमान श्रीमती आणि तू तू मैं मैं पाहिल्याशिवाय एकही दिवस जेवण व्हायचं नाही इतका मी त्या सिरीयल्सच्या प्रेमात पडलो होतो . . . . आजही कुठल्याही विनोदी मालिकेपेक्षा त्या सरस आहेत . . . .

हे असे कलाकार लोक नुसते जात नाहीत तर त्यांच्या बरोबर आपलंही भावविश्व घेऊन जातात . . . कोणी दिला हा अधिकार यांना . . . . .

रीमाताई . . . नॉट फेअर !

कलाबातमी

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

18 May 2017 - 10:44 am | अनुप ढेरे

धक्कादायक बातमी.
श्रद्धांजली __/\__!

विशुमित's picture

18 May 2017 - 11:14 am | विशुमित

खूप धक्कादायक बातमी...!!

रीमा लागू माझ्या आजोबांची सगळ्यात फेव्हरेट अभिनेत्री. भयानक क्रेझ तिच्याबद्दल. कामा निम्मित बाहेर असल्या कारणाने मी त्यांच्या जवळ नाही. त्यांना नक्कीच जबरदस्त धक्का बसला असणार.

भावपूर्ण श्रद्धांजली..!!

अनुप ढेरे's picture

18 May 2017 - 11:20 am | अनुप ढेरे

सिंहासन, वास्तव, आपली माणसं मधल्या भूमिका लक्षात रहाणार्‍या आहेत. श्रीमान श्रीमती या सिरियल मधली भूमिका देखील छान होती.

सिंहासनमधिल त्यांची भुमिका लक्षात राहण्यासारखी.
त्यांचे एक नाटक, बहुधा 'नातीगोती'(?), ज्यात अतुल परचुरे त्यांचा मुलगा असतो टिव्हीवर पाहिले होते. त्यातला त्यांचा अभिनय खुप आवडला.
किती फ्रेश वाटायच्या कुठल्याही रोलमध्ये त्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

किसन शिंदे's picture

18 May 2017 - 11:41 am | किसन शिंदे

भावपूर्ण श्रद्धांजली !!

गामा पैलवान's picture

18 May 2017 - 11:50 am | गामा पैलवान

या गुणी अभिनेत्रीस श्रद्धांजली.

-गा.पै.

अवांतर : किशोरीताई गेल्यानंतर एकही धागा निघाला नव्हता. मात्र या प्रसंगी ताबडतोब धागा निघाला. असं का होत असावं?

कपिलमुनी's picture

18 May 2017 - 1:47 pm | कपिलमुनी

एखाद्या संगीतप्रेमीने काढला असता तर समयोचित झाले असते !
बादवे तुम्ही का नाही काढलात ?

गामा पैलवान's picture

18 May 2017 - 7:11 pm | गामा पैलवान

अवांतर :

कपिलमुनी, त्यांच्यावर काय लिहिणार मी! फक्त एका ओळीची श्रद्धांजली! म्हंटलं संगीतातले एव्हढे दर्दी लोकं इथे असतांना आपण काय मोठा प्रकाश पाडणार आहोत. :-(

आ.न.,
-गा.पै.

अमोल काम्बले's picture

18 May 2017 - 12:24 pm | अमोल काम्बले

भावपूर्ण श्रद्धांजली..!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2017 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

भावपूर्ण श्रद्धांजली !!

भावपूर्ण श्रद्धांजली !!

पद्मावति's picture

18 May 2017 - 1:12 pm | पद्मावति

हे असे कलाकार लोक नुसते जात नाहीत तर त्यांच्या बरोबर आपलंही भावविश्व घेऊन जातात . . . कोणी दिला हा अधिकार यांना . . . . .

रीमाताई . . . नॉट फेअर !

खरय अगदी :(

मित्रहो's picture

18 May 2017 - 1:42 pm | मित्रहो

भावपूर्ण श्रद्धांजली
सिनेमातल्या आईच्या भूमिका जरी गाजल्या तरी काही नाटकातल्या भूमिका अप्रतिम होत्या.

रीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली..

रेवती's picture

18 May 2017 - 8:31 pm | रेवती

वाईट झालं.
रीमाताईंना श्रद्धांजली.

कलंत्री's picture

19 May 2017 - 9:23 am | कलंत्री

नाट्यक्षेत्र अथवा चित्रपटक्षेत्रातील लोकांना कामाचा ताण आणि खाण्यापिण्यातील अनियमतीतता, जागरणे यामूळे नकळतच शरीरावर कोठेतरी बदल दुष्परिणाम होत असावेत.

या क्षेत्रातील लोकांनी शरीराची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

पैसा's picture

19 May 2017 - 10:08 am | पैसा

खूपच धक्कादायक बातमी. विशेषतः मराठी कलाकारांचे असे अकाली जाणे खूपवेळा ऐकू येत आहे.

रामदास२९'s picture

19 May 2017 - 12:19 pm | रामदास२९

भावपूर्ण श्रद्धांजली..!!

रीमा लागू यांच्याविषयी माझ्या मनातून कधीच न पुसली जाणारी एक आठवण आहे, जी मी आपणां सर्वांबरोबर शेयर करू इच्छितो. १९८५-८६ साली मी मुंबईत डिग्री कॉलेजमध्ये शिकत होतो. माझे साहित्यिक वाचन भरपूर होतं. सिनेमे, नाटकंही तेवढीच पहायचो. नाटक सादर करताना प्रेक्षकांशी समोरासमोर होणाऱ्या सुसंवादाच्या आकर्षणापायी तेव्हा मला नाटकात काम करण्याची प्रचंड आवड निर्माण झाली होती. मी कॉलेजमध्ये सादर होणाऱ्या नाटकात भाग घेई. त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या श्री.कृ.रा.सावंत यांचा 'नाट्य प्रशिक्षण कोर्स'ही मी यशस्वीरित्या पूर्ण केला होता. नाट्याभिनय क्षेत्रात शिरण्याचा माझा मानस असल्याने मी लोकांच्या ओळखी काढत होतो. तेव्हा माझी अशा एका व्यक्तींची ओळख झाली ज्यांची व्यावसायिक नाट्यक्षेत्रात असणाऱ्या निर्मात्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्या व्यक्तींच्या ओळखीने मी एका हॉलमध्ये चालणाऱ्या व्यावसायिक नाटकांच्या तालमी पहायला रोज हजर रहात असे.

असेच एके दिवशी माझी नाटकाची आवड पाहून तालमीत असणाऱ्या एका बॅकस्टेज आर्टीस्टने शिवाजी मंदिर येथे 'सविता दामोदर परांजपे' या नाटकाचा प्रयोग बॅकस्टेजने पहाण्याची मला संधी दिली. नाट्यगृहात मी उशिरा गेलो तेव्हा प्रयोग अर्धा होत आला होता. स्टेजच्या बाजूच्या अंधाऱ्या विंगेमध्ये 'प्रकाश योजना' करणारी व्यक्ती आपल्या साहित्यानीशी हजर असते. त्याच्याबाजूला उभ्याने मी प्रयोग पहात होतो. विंगेमध्ये सर्वत्र अंधार होता. स्टेजवर रीमा लागू आणि राजन ताम्हाणे यांचा प्रवेश चालू होता. संवादांची आतिषबाजी होत होती.

आणि अचानक तो क्षण आला. रीमा लागू यांचा प्रवेश संपला. त्यांनी स्टेजवरून एक्झिट घेतली आणि विंगेमध्ये अंधारात मी उभा होतो तेथून अवघ्या सातआठ फुट पलीकडे त्या सरसर येऊन उभ्या राहिल्या.

बापरे!! काय रोमांचक क्षण होता तो!! गूढ नाटक असल्याने स्टेजवर रंगीबेरंगी प्रकाशात चाललेला राजन ताम्हाणे यांचा गूढ अभिनय आणि संवाद. नाट्यगृह तुडुंब भरलेले असूनही भांबावून चिडीचूप बसलेला एकूणएक प्रेक्षक. बाजूला विंगेच्या आतमध्ये अंधारात उभा असलेला प्रकाशयोजनाकार आणि त्याच्या बाजूला हबकून उभा असलेला मी. आणि माझ्यापासून अवघ्या सात आठ फुटांवर माझ्याकडे रोखून पहाणाऱ्या, पांढऱ्या शुभ्र साडी परिधान केलेल्या रीमा लागू......

तेव्हा त्या ऐन तिशीत असाव्यात. किती करारी आणि लोभसवाणं व्यक्तिमत्त्व दिसत होतं त्यांचं. मला माझ्या काळजाची धडधड जोरात ऐकू येऊ लागली होती.

रीमा लागू यांचा लगेच पुन्हा स्टेजवर प्रवेश होता. फक्त एका मिनिटाकरिता त्या विंगेमध्ये माझ्यासमोर काही न बोलता स्तब्ध उभ्या होत्या आणि मग पुन्हा स्टेजवर गेल्या.

झालेल्या प्रसंगाचे माझ्या मनावर एवढे दडपण आले की मी गुपचूप मागच्यामागे बॅकस्टेजच्या बाहेर पडून नाट्यगृहाच्या बाहेर आलो.

एवढ्या वर्षांनंतरही विंगेच्या अंधारात एका मिनिटाकरिता पाहिलेली रीमा लागू यांची छवी माझ्या डोळ्यांपुढे अजूनही तशीच्या तशी दिसते आहे.

मी रीमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.