मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रीमा लागूू . . . . भावपूर्ण श्रध्दांजली !

माम्लेदारचा पन्खा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रीमा लागू यांचे हृदयविकाराने निधन . . . . अनपेक्षित . . अचानक . . . या बातमीनं त्यांच्या एक से बढकर एक भूमिका डोळ्यासमोर येत आहेत . . . . नाटक ,चित्रपट, टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमातून आपली वेगळी छाप सोडणारी अष्टपैलू अभिनेत्री आता आपल्याला परत दिसणार नाही याचं मनापासून वाईट वाटतं आहे . . . . विनोदी ,गंभीर, कारुण्यपूर्ण अशा कुठल्याही भूमिकेसाठी ती नेहमीच योग्य होती . . . . नावातच "मा"असल्याने आईची भूमिका तिने यथायोग्य वठवली . . . . . "माझं घर माझा संसार" मधली तिची वास्तवाजवळ जाणारी भूमिका दुसऱ्या कुणालाही शोभून दिसली नसती . . . माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर श्रीमान श्रीमती आणि तू तू मैं मैं पाहिल्याशिवाय एकही दिवस जेवण व्हायचं नाही इतका मी त्या सिरीयल्सच्या प्रेमात पडलो होतो . . . . आजही कुठल्याही विनोदी मालिकेपेक्षा त्या सरस आहेत . . . . हे असे कलाकार लोक नुसते जात नाहीत तर त्यांच्या बरोबर आपलंही भावविश्व घेऊन जातात . . . कोणी दिला हा अधिकार यांना . . . . . रीमाताई . . . नॉट फेअर !

वाचन 7441 प्रतिक्रिया 0