अमेरिकेतले अनुभव - मेडिकल ट्रीटमेंट आणि इन्शुरन्स

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
1 Sep 2016 - 2:22 am

पिराताईंच्या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे अमेरिकेतील मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा किती गंडलेला प्रकार आहे हा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव.

ही घटना घडली त्यावेळेला मी न्यू यॉर्क मध्ये कामाला व जर्सी मध्ये राहायला होतो. माझी पत्नी व मुली सुट्टीसाठी साधारण ३ महिने म्हणून अमेरिकेला आल्या होत्या. ते यायच्या आधी मी माझ्या कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समध्ये माझ्या पत्नी व मुलींना सामील करण्यासाठी म्हणून विनंती केली. ती नाकारली गेली आणि कारण काय तर म्हणे ते फारच कमी दिवस येत आहेत. वर सांगितलं की त्यातूनही मला पाहिजे असेल तर मी घेऊ शकतो पण मग उर्वरित पूर्ण वर्षाचे पैसे भरायला लागतील. म्हणजे ते आले एप्रिलमध्ये आणि जाणार होते जुलै मध्ये, पण डिसेंबर पर्यंत पैसे भरायला लागतील म्हणून सांगितलं. बरं महिन्याचा हप्ता जवळपास $४०० होत होता. मग आपला मध्यमवर्गीय विचार करून मी इन्शुरन्स घ्यायचा नाही असं ठरवलं. किरकोळ आजारांसाठी लागणारी औषधं भारतातून येताना बरोबर आणायला सांगितली.

ते प्रथमच न्यू यॉर्कमध्ये आले असल्याने भरपूर भटकंती सुरु होती. अश्यातच वेस्ट कोस्टची ट्रिप ठरली. ग्रँड कॅन्यनला माझी ४ वर्षांची मुलगी माझ्याच बरोबर आलेल्या एका व्यक्तीमुळे जवळपास ४ फूट उंचीच्या दगडावरून पडली (त्यातले खास भारतीय व्यक्तींचे वागणे व तो अनुभव दुसऱ्या लेखात सांगीन). मुलीचा पाय दुखावला पण फ्रॅक्चर आहे का नाही ते कळेना. गाडीत बसल्यावर ती शांत झाली आणि मग आम्ही ४-५ तासांचा प्रवास करून वेगासमध्ये परत आलो. पायाला नक्की फ्रॅक्चर आहे का नुसताच मुरगळलाय ते कळत नव्हतं त्यामुळे आम्ही दोघे (मी आणि पत्नी) चर्चा करत होतो की काय करावं. अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंटच्या आणि खर्चाच्या भयानक कथा ऐकल्या होत्याच. त्यात इन्शुरन्स नसल्यामुळे कसं आणि काय होणार याची पण चिंता होती.

वेगासला येईपर्यंत तसा उशीर झाला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला एका हॉस्पिटल मध्ये नेलं. तातडीच्या सेवेमध्ये (ER) हॉस्पिटलने दाखल करून घेतलं व आमची रवानगी एका खोलीत झाली. थोड्या वेळाने एक नर्स येऊन वय, वजन, उंची ई घेऊन गेली. मग अर्धा तास झाला, एक तास झाला आम्ही आपले वाट बघतोय. मध्ये २ वेळा विचारून आलो तर नुसतंच डॉक्टर येताहेत (Doctor is on his way) असं सांगत होते. डॉक्टर पण ग्रँड कॅन्यनहून येत होता की काय कोण जाणे. साधारण दीड तासाने एक माणूस डुलतडुलत आला म्हणलं चला आता उपचार चालू होतील, तर तो निघाला X-Ray काढणारा. पाय वेडावाकडा करून करून त्याने ५-६ X-Ray काढले व परत आमची रवानगी एका खोलीत झाली. आधीच्या अनुभवावरून फार लवकर काही होईल अशी आशा नव्हती पण यावेळेला फक्त ३ तासांनी डॉक्टर आले. तोपर्यंत आम्हाला फ्रॅक्चर आहे वा नाही हे पण कोणी सांगत नव्हतं.

अमेरिकन प्रथेप्रमाणे छान छान बोलून डॉक्टरांनी सुरुवात केली. इथे माझ्या मनात मी म्हणतोय बाकी सगळं राहूद्या हो, आधी सांगा काय झालंय ते. पण नाही... आधी आमच्याशी, मग मुलीशी छान छान बोलून डॉक्टरांनी ५-७ मिनटं घालवलीच, मग मुद्द्यावर आले. घोट्याच्या २-३ इंच वर नडगीला अगदी बारीक (Hairline) फ्रॅक्चर होतं पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या आत्ताच्या फ्रॅक्चरच्या थोडं वर एक जुनं फ्रॅक्चर पण होतं जे भरून आलं होतं. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला की ती या आधी कधी अशी पडली नाही किंवा पाय दुखतोय अशी तक्रार पण केली नाही, मग असं जुनं फ्रॅक्चर असणे कसं शक्य आहे? पण तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदाच येताय त्यामुळे आधीचं आम्हाला काही माहित नाही आणि जे दिसतंय ते आम्ही सांगतोय असं उत्तर देऊन प्रश्नच फेटाळून लावला.

आता प्लॅस्टर घालायचं का विचारल्यावर नर्स येऊन घालेल म्हणाले. नशिबाने या वेळेला नर्स लवकर आली पण हातातलं सामान प्लॅस्टरचं वाटत नव्हतं. तिने पायाची पाहणी केली आणि मग एक पट्टीसारखं काहीतरी काढलं. जवळपास २ इंच रुंद आणि ३ फूट लांब असेल. ते पाण्यात भिजवलं आणि पोटरीच्या खालून अगदी तळपायाच्या बोटांपर्यंत लावून त्याला पायाचा आकार दिला आणि ते वाळल्यावर स्ट्रेच बँडेज गुंडाळून टाकलं. एवढ्यात झालं का अश्या मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघितले तर म्हणाले झालं सगळं. तेवढ्यात परत डॉक्टर आले आणि म्हणाले तिला जर वाटलं तर २ आठवड्याने ते बॅंडेज बदलून टाका. मी त्यांना सांगितलं की आम्ही इथे राहत नाही व २ दिवसात परत जर्सीला जाणार आहे, तर म्हणाले घरीच बदलून टाका. आम्ही विचारलं की तिचे X-Rays आणि रिपोर्ट्स मिळतील का? कारण जर जर्सीमध्ये डॉक्टरांना दाखवायचं असेल तर उपयोगी पडेल. तर CD वर कॉपी करून देतो म्हणाले. मी परत जुन्या फ्रॅक्चरचा विषय काढला, तर म्हणे तिची हाडं ठिसूळ आहेत. त्यावर लवकरात लवकर टेस्ट्स आणि ट्रीटमेंट करून घ्या. प्रकरण वाढलं तर ती नुसतं चालता चालता पडली तरी फ्रॅक्चर होईल. हे ऐकून आम्ही दोघे एकदम टेंशनमध्ये आलो.

तेवढ्यात ते धडकी भरवणारे वाक्य आलं - बिल भरून या. जड पायांनी आणि धडधडत्या छातीने मी गेलो. बिलिंग डेस्कवरची स्त्री आणि माझा संवाद खालील प्रमाणे -

ती: इन्शुरन्स कोणता आहे?
मी: नाहीये. मी थोडक्यात तिला परिस्थिती समजवायचा प्रयत्न केला.
परत मीच: घाबरत तिला बिल विचारलं
ती: ३,५०० डॉलर्स

माझ्या पोटात गोळा आला. जे भारतात ३,५०० रुपयात (तेव्हा) झालं असतं त्याला जवळपास २,००,००० रुपये द्यायचे? तिला बहुतेक ते माझ्या चेहऱ्यावर दिसलं असावं.

ती: तुम्ही भरू शकता का?
मी: हे बरेच पैसे आहेत.
ती: तुम्ही यातले २०% भरू शकता का? $६०० वगैरे.

माझ्या मनात एकदम बऱ्याच भावना आणि प्रश्न आले. त्यामुळे चेहऱ्यावर बावळट भाव आले असावेत.
तिने पटकन माझ्याकडे एक फॉर्म दिला आणि म्हणाली हा भर, ६०० डॉलर दे की तुझं काम झालं.

मी: (अविश्वासाने) बाकीचे पैसे मी नाही भरायचे?
ती: नाही. त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ.

मी फॉर्म भरून दिला.

ती: हे ६०० डॉलर्स तुला एकदम भरता येणार नसतील तर आपण महिन्याला ठराविक रक्कम ठरवू तेवढे भर.

मला अगदी गहिवरून आलं... मनात म्हणलं माउली (दिसायला आणि वयाने ती तशी नव्हती म्हणा) तुझे चरणकमल कुठे आहेत. पण स्वतःला सावरलं, कारण इथल्या प्रथेप्रमाणे मिठी मारायला पाहिजे, पण मग बाजूला उभ्या असलेल्या माझ्या धर्मपत्नीकडे बघून भावना आवरायलाच लागल्या. मला झालेल्या फ्रॅक्चर्ससाठी यांनी सवलत दिली असती की नाही जाणे.

मी: ६०० डॉलर्स भरतो.

पुढे एका विभागात जाऊन मी रिपोर्ट्सची CD घेतली व सकाळी ८ ला ER मध्ये गेलेलो आम्ही साधारण संध्याकाळी ५ नंतर बाहेर पडलो. यात खरं काम किती वेळाचं तर फार तर १ तास, बाकी वेळ नुसतच बसून.
उर्वरित ट्रिप तशीच लेकीचा "प्लॅस्टर" मधला पाय घेऊन पार पाडली.

समारोप

जर्सीला परत गेल्यावर ते रिपोर्ट्सचं पाकीट उघडलं. याआधी ते वाचायला वेळ झाला नव्हता. ३ पानी रिपोर्ट वाचता वाचता दुसऱ्या पानावर एका परिच्छेदात काय लिहिलं होतं त्याचा संदर्भच लागेना. लिहिलं होतं - किडनीच्या आजाराचे डिटेल्स, किडनीमधून स्टेंट टाकल्याचे आणि अजून कसलेकसले मार्क्स आहेत. आम्हाला दोघांनाही काय करावे ते कळेना. भारतात आमच्या डॉक्टरना फोन झाले. अमेरिकेतल्या डॉक्टर असलेल्या माझ्या चुलत बहिणीला विचारून झालं पण कोणाला काही कळेना. मग दुसऱ्या दिवशी वेगासमधल्या हॉस्पिटलला फोन केला. त्यांनी शांतपणे सांगितलं की टाईप करताना चुकलं असेल. म्हणलं प्रत्येक पानावर रुग्णाचं नाव लिहिलंय आणि पानावरचा एकच परिच्छेद कसा चुकू शकतो? तर ते म्हणे झालं असेल चुकून, तुम्ही दुर्लक्ष करा.

पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मला बायकोमुलींची सुट्टी वाढवायला लागली. आमच्या आधीच्या प्लॅनप्रमाणे बायकोमुलीं सुट्टीनंतर परत जाणार होते व मी एकटा अमेरिकेत राहणार होतो. परंतु, मुलीच्या हाडांच्या ठिसूळपणाचं पुढे योग्य निदान आणि उपचार करावे म्हणून आम्ही सगळ्यांनीच अमेरिकेतला गाशा गुंडाळून परत जायचं ठरवलं. दरम्यान पुढील १-२ महिन्यांमध्ये त्या हॉस्पिटलमधल्या वेगवेगळ्या विभागांकडून $५०-$६० ची २-३ बिलं आली, जी मी भरली.

भारतात परत आल्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ् आहेत त्यांना दाखवलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे Dexa Scan केलं. त्याचे रिपोर्ट्स व अमेरिकेतले रिपोर्ट्स घेऊन आम्ही डॉक्टरांसमोर बसलो. Dexa Scan रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणले ती व्यवस्थित आहे, तिला काहीही झालेलं नाहीये. मी अमेरिकेतले रिपोर्ट्स दाखवले. ते बघून ते म्हणाले कि अमेरिकन स्टॅंडर्डप्रमाणे सगळ्याच भारतीयांची बोन डेन्सिटी कमी असते. त्यामुळे ते लोक म्हणतात की तुमची हाडं ठिसूळ आहेत. पण तसं काही नसतं आणि तुमच्या मुलीलाही काही झालेलं नाहीये.

अशी ही अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्सची गम्मत.

जीवनमानदेशांतरअनुभव

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

2 Sep 2016 - 7:01 am | अनन्त अवधुत

पण ओबामा केअर आल्यापासून इन्शुरन्स कडून डॉक्टर्सना कुठल्याही तपासणीसाठी जे प्री-अप्रूव्हल मिळायचे त्याला फार वेळ लागतोय असे मला डेंटिस्ट कडे कळले होते.

बहुगुणी's picture

1 Sep 2016 - 11:45 pm | बहुगुणी

काही नेहेमी सांगितली जाणारी कारणं:

  • इथल्या प्रॅक्टिसमध्ये मेडिको-लीगल अ‍ॅक्शनच्या दबावाखाली कदाचित अनावश्यक अशा अतिरेकी निदान-चाचण्या,
  • औषध कंपन्यांनी आणि वैद्यकीय उपकरण कंपन्यांनी पेटंट्सच्या खर्चाच्या (आणि क्लिनिकल ट्रायल्स मध्ये अयशस्वी ठरणार्‍या कँडिडेट ड्रग्ज च्या खर्चाच्या) कारणास्तव चढत्या किंमती ठेवणं, तसंच
  • मानवी वेळाच्या (लेबर चार्जेस) तुलनेने आधिक किंमती.

या दुव्यातूनः

It is difficult to untangle precisely why prices are higher in the U.S., but two things are apparent: U.S. physicians get higher incomes than in other countries and the U.S. uses more expensive diagnostic procedures. More generally, with so many different kinds of insurance, no one organization has a strong incentive to cut out wasteful practices and ensure that all Americans get value for the very high levels of expenditure incurred when they are sick.

मला भीती आहे ती ही हेच सगळं इंन्शुअरन्स कंपन्यांच्या सुळसुळाटाने भारतातही येऊ घातलं आहे, नव्हे मोठ्या शहरांमध्ये ऑलरेडी आलेलं आहे!

जाता जाता: ही किंमतीतील वाढ गेल्या १५ वर्षा॓ंत किती अतोनात आहे ते पहाण्यासारखं आहे!

मोठ्या शहरांमध्ये ऑलरेडी आलेलं आहे!
सहमत. माझ्याबाबतीतही तेच झाले. २४ तास ऑब्झर्वेशनखाली ठेवून मग कास्ट घालू म्हणाले. का ते माहित नाहे व तो इन्शू. कंपनीचा नियम आहे म्हणाले. तसे येथे होत नाही. त्यावेळी भारतात मला आलेली ती अडचणच होती......फक्त परवडत होते म्हणून ते झाले. नाहीतर १ दिवस वाट पहावी लागली असती. माझ्या वडिलांनाही इन्शू. कं. च्या नियमामुळे अमूक एक ट्रीटमेंटच करून घ्यायला हवी अशी सक्ती केली गेली होती. त्यांनी इन्शू. नाकारून हवी ते ट्रीटमेंत चांगल्या हॉस्पि. मध्ये कमी दरात करून घेतली.

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 2:03 am | संदीप डांगे

ट्रेडमार्क, खरंच धागा काढून तुम्हीं खूप चांगले काम केलेत, बरीच चांगली आणि उपयुक्त माहिती सर्वाना मिळाली,

911 च्या तात्काळ मेडिक सर्वीसासारखी आपल्याकडे महाराष्ट्रात ambulance सेवा सुरू झाली आहे, 15 मिन turn around time आहे, शहरात लोकांना माहित नाही पण खेड्यापाड्यात, गावांमध्ये चांगली चालू आहे, 108 ला कॉल करावा!

पिवळा डांबिस's picture

2 Sep 2016 - 8:07 am | पिवळा डांबिस

911 च्या तात्काळ मेडिक सर्वीसासारखी आपल्याकडे महाराष्ट्रात ambulance सेवा सुरू झाली आहे, 15 मिन turn around time आहे, शहरात लोकांना माहित नाही पण खेड्यापाड्यात, गावांमध्ये चांगली चालू आहे,

:)
हे जर खरं असेल तर आनंदच आहे.
विशेषतः खेड्यापाड्यांत, गावांमध्ये ९११ च्या तोडीची सेवा मिळत असेल तर हार्दिक अभिनंदन!
मला हल्लीची भारतीय शहरांतली विशेष माहिती नाही, खेड्यापाड्यां- गावांची तर कधीच अजिबात माहिती नव्हती. तेंव्हा भारतातील जाणकारांकडून अधिक माहितीच्या अपेक्षेत....

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 9:02 am | संदीप डांगे

सद्यस्थितीत मी नगर, नाशिक, पुणे ह्या तिन्ही जिल्ह्यांत कामानिमित्त भरपूर प्रवास करतोय, वरील अनुभव स्वत:चे निरिक्षण आहे. पक्षाची जाहिरात नाही, ;)

अभिजीत अवलिया's picture

2 Sep 2016 - 2:44 am | अभिजीत अवलिया

बाकी ते 3500 डॉलरचे बिल 600 डॉलर केल्याबद्दल त्या बाईची खणा नारळाने ओटी भरायला पाहिजे होती.

ट्रेड मार्क's picture

2 Sep 2016 - 5:17 am | ट्रेड मार्क

फेफा साहेब म्हणल्याप्रमाणे मीही इथली प्रथा पाळावी म्हणून तिला मिठी मारणार होतो. पण विचार का रद्द करावा लागला ते लेखात सांगितलंच आहे. ;)

जनरली कसलेही बील लावत नाहीत. रुट कॅनाल, सिरॅमीक क्राउन वगैरे यासाठी पण को-पे घेत नाहीत. सेवा उत्तम असते. सगळे पैसे ईंशुरंस कंपनीकडुन वसुल करुन घेतात.

बाकी ई.आर. चा अनुभव अमेरीकेत सगळीकडे सारखाच दीसेल. खरोखर ईमर्जन्सी असेल तर तात्काळ उपचार मिळतात. नाहीतर जेवढावेळ थांबु शकतो तेवढा वेळ बसउन ठेवतात.

ईकडे कायद्याने कुणालाही वैद्यकीय सेवा ईमर्जन्सी मध्ये नाकारु शकत नाहीत. ईंशुरंस कींवा पैसे नसले तरीही. त्यामुळे बरेच गरीब, गरजु, ईलिगल ईमिग्रंटस, होमलेस, भिकारी, ड्रग अ‍ॅडीक्ट वगैरे लोक बारीक सारीक उपचारा साठी ईआर मध्ये बिनदीक्कत उपचार घेतात. त्यांची बिले थोडीफार सरकार कडुन मिळतात. पण त्या मुळे बाकी लोकांसाठी वैद्यकीय सेवा महाग होते.

तसेही अती बील लावले तर लोक पैसे बुडवण्याची भीती असते. म्हणुन बहुतेक हॉस्पिटलस इंशुरन्स नसणार्‍यांना स्वतःहुन डीस्काउंट देतात.

हो, मी आधी इथल्या एका डेंटिस्ट कडे जात होतो. पहिल्या तपासणीसाठी गेल्यावर त्याने जवळ जवळ 9000 चा प्लॅन मला दिला. प्लॅन 3-4 वर्षासाठी होता. या 3-4 वर्षात मला 2000 बिल भरावे लागणार होते. मी नाही म्हणालो. दुसऱयांदा क्लिंनिंग साठी गेल्यावर पण परत तीच उजळणी झाली. आधी त्याच्या असिस्टंटने, मग त्याने डेंटल प्लॅन सांगितला. अर्थात मी परत एकदा त्या ट्रीटमेंटला नाही म्हणालो.
पुढच्यावर्षी कळले कि तो डेंटिस्ट आता प्लॅन मध्ये नाही. पुढचा डेंटिस्ट नेमका पंजाबी मुंडा सापडला. "तेरे दातो को कुछ नहीं हुआ है | एक रूट कॅनाल कराना पडेगा." असे म्हणून विषय संपवला. ते रूट कॅनाल पण त्याने 2 वर्षांनी केले. खर्च 500 डॉलर्स.

लंबूटांग's picture

2 Sep 2016 - 10:27 am | लंबूटांग

याआधी एका हेल्थ केअर कंपनीत काम करत असल्याने आणि त्या कंपनीचे घोषवाक्य काहीसे "आपली (अमेरिकेची) हेल्थकेअर सिस्टम ब्रोकन आहे आणि आपण ती फिक्स करायची आहे" असे काहीसे असल्याने ह्या हेल्थ केअर आणि इन्शुरन्स प्रकाराची जरा नीट माहिती कळली.

होते काय की या ज्या मोठमोठ्या इन्शुरन्स कंपन्या असतात त्या प्रत्येक सेवेसाठी दर ठरवतात. उदाहरणार्थ तुम्ही एक्स रे काढलात तर त्यासाठी आमच्या मते $१०० हा रास्त दर आहे आणि आम्ही तेव्हढाच परतावा देऊ. मग आता आपल्याकडून इन्शुरन्स खरेदी करणाऱ्या लोकांना एखाद्या डॉक्टरने $२०० चार्ज केले तर त्यांना उरलेले $१०० स्वतःच्या खिशातून भरावे लागतील आणि असे सारखे व्हायला लागले तर मग लोक आपला इन्शुरन्स घेणार नाहीत. म्हणून मग दुसरी चतुराई म्हणजे ह्या कंपन्या काही डॉक्टरांच्या हापिसाशी (हॉस्पिटल्सशी नाही* ह्याबद्दल नंतर) करार करतात. की तुम्ही आमच्या नेटवर्क मध्ये आलात तर आम्ही इतके इतके पैसे ह्या ह्या गोष्टीसाठी मान्य करतो. मग अशा डॉक्टरांना इन-नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणतात. मग आता ह्या डॉक्टर्सना आपल्या नेटवर्क मध्ये येण्याचे आकर्षण म्हणून आऊट ऑफ नेटवर्क प्रोव्हायडर्स साठी कमी दर मान्य केले जातात. उदा. आऊट ऑफ नेटवर्क प्रोव्हायडर्सकडे गेलात तर आम्ही फक्त $५० च देऊ. तुमच्या इन्शुरन्स प्लॅन प्रमाणे हे दर बदलतात. काही ठिकाणी काही टक्केच रक्कम दिली जाते वगैरे वगैरे. तसेच प्रत्येक सेवेसाठी तुम्हाला को पे भरावा लागू शकतो.

आता गम्मत अशी सुरू होते की एक डॉक्टरचे ऑफिस कितीही इन्शुरन्स कंपन्यांच्या नेटवर्क मध्ये असू शकते. बरं त्या प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचे हजारो प्लॅन्स असू शकतात. म्हणून मग डॉक्टरचे ऑफिस क्लेम फाईल करताना काय करते की आम्हाला $५०० डॉलर्स द्या असे सांगते. मग ते इन्शुरन्स कंपनीकडे गेल्यावर इन्शुरन्स कंपनी सांगते की, हे बघा ह्या आपल्या कराराप्रमाणे तुम्ही ह्या सेवेसाठी फक्त $१००च आकारू शकता. मग इन्शुरन्स कंपनी तुम्हाला एक Explanation of benefits (EOB ) नावाचे डॉक्युमेंट पाठवते ज्यात हे सर्व लिहिलेले असते की डॉक्टरने इतका चार्ज केला, आपल्या कराराप्रमाणे आम्ही इतके पैसे देऊ. हा डॉक्टर आपल्या नेटवर्क मध्ये असल्याने इतकेच चार्ज करू शकतो. तुमच्या प्लॅन प्रमाणे बहुतेक तुम्हाला इतके पैसे वरती भरावे लागतील (को पे). डॉक्टर्सचे ऑफिस मग गपचुप करार मान्य करते आणि तुम्हाला बिल पाठवते (गरज असल्यास).

तर होते काय की ह्या सर्व डॉक्टरच्या ऑफिसेस कडे इन्शुरन्स असलेल्या लोकांसाठी एक आणि नसलेल्या लोकांसाठी एक असे दर असतात. कारण की जर इन्शुरन्स कंपनी पैसे द्यायला तयार आहे तर शक्य तितके जास्ती चार्ज करून maximum पैसे पदरात पाडून घेऊयात असा साधा हिशेब. ट्रेड मार्क यांच्या केस मध्ये हेच झाले. $३५०० हा बाय डिफॉल्ट इन्शुरन्स असलेल्यांसाठीचा दर. मग नसलेल्यांसाठीचा दर म्हणजे शुद्ध घासाघीस. तुम्ही किती पैसे भरू शकता? २०%? ठीक आहे तेव्हढे द्या. अर्थात ह्याला लिमिट आहे. जर सारखेच नाही नाही सांगत राहिलात तर मग financial aid वगैरे साठी फॉर्म्स देतात.

स्वतःचा अनुभव सांगतो. बायकोला घेऊन एकदा ER मध्ये जावे लागले. सर्व ट्रीटमेंट होऊन घरी आलो. इन्शुरन्स असल्याने $१०० का काहीसा कोपे होता तेव्हढ्याचे बिल अपेक्षित होते. EOB न येता बिलच आले. हॉस्पिटलने आमचा इन्शुरन्स नंबरच टाकला नव्हता सिस्टम मध्ये. सर्व सेवांचे मिळून बिल होते $११००. त्यांना फोन करून सांगितले आमच्याकडे इन्शुरन्स आहे, हे सर्व डिटेल्स. ते म्हणाले ठीक आहे नवीन बिल येईल वाट बघा. यथावकाश EOB आणि बिल दोन्ही आले. त्याच सेवांसाठी हॉस्पिटलने दार आकाराला होता $१०,००० (इन्शुरन्स कंपनीबरोबर ठरलेले दर आठवत नाहीत). यात एका सेंटचीही अतिशयोक्ती नाहीये.

आता आम्हाला $१०० असा fixed को पे होता म्हणून ठीक. पण जर का २०% असता तर? ज्या कामाला बिना इन्शुरन्सचे $११०० झालेहोते त्याच कामाला इन्शुरन्स सकट $२००० द्यायला लागले असते.

बरे आता सर्वच डॉक्टर्स असे चार्जेस आकारायला लागल्याने इन्शुरन्स कंपन्यांचे महिन्याचे प्रिमियम वाढतात. बिल येईपर्यंत तुम्हाला किती पैसे भरावे लागतील ते कळत नाही. मग ह्याला उपाय म्हणून पूर्व परवानगी (pre authorization). म्हणजे आम्ही ह्या रुग्णावर ही ही ट्रीटमेंट करणार आहोत. तुम्ही ह्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी किती दर मान्य करता असे इन्शुरन्स कंपनीला डॉक्टरचे ऑफिस विचारते. मग त्यांच्याकडून उत्तर आल्यावर पुढच्या गोष्टी. अर्थात हे सगळे व्हायला एक दोन आठवडे लागू शकतात.

वर लिहिल्याप्रमाणे दुसरा प्रॉब्लेम म्हणजे हॉस्पिटल नेटवर्क मध्ये आहे म्हणजे जो डॉक्टर तुमच्यावर उपचार करतो आहे तो नेटवर्क मध्ये असेलच असे नाही (ज्याचा अनुभव आम्हाला नुकताच आला). चिरंजीव पायऱ्यांवरून गडगडत खाली गेल्यामुळे ER ची वारी झाली. नेहेमीच्या हॉस्पिटल मधेच ER आहे त्यामुळे आमचा इन्शुरन्स इन नेटवर्क आहे माहिती होते. तिथे ज्या डॉक्टरने आमच्या मुलाला बघितले तो मात्र आऊट ऑफ नेटवर्क होता त्यामुळे को पे च्या बरोबर $१४४ अधिक द्यावे लागले.

असो. मध्यरात्री प्रतिसाद टंकल्याने थोडा विस्कळीत झाला आहे.

ट्रेड मार्क's picture

2 Sep 2016 - 7:28 pm | ट्रेड मार्क

पण मग असे असेल तर इन्शुरन्स न घेणं फायदेशीर नाही का?

ग्रुप इन्शुरन्स असेल तरी ४ जणांच्या कुटुंबासाठी साधारण $४०० प्रतिमहिना प्रीमियम पडतो (मला तरी). इन्शुरन्स वापरा अथवा नाही पण वर्षाला $४८०० द्यायचेच. वर को-पे आणि Deductible ची भानगड आहेच.

समजा इन्शुरन्स नाही म्हणून कमी पैश्यात काम होत असेल तर चांगलंय की. तसंही इन्शुरन्स आहे किंवा नाही यावर वैद्यकीय सेवेची प्रत ठरत नाही.

सुबोध खरे's picture

2 Sep 2016 - 11:42 am | सुबोध खरे

अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा defensive medicine आहे. प्रत्येक रुग्णाकडे संशयाने पाहिले जाते. साधारण १५ % डॉक्टरवर दरवर्षी हलगर्जीपणासाठी खटला भरला जातो. ( किंवा प्रत्येक डॉक्टर वर दर सात वर्षांनी). हा खटला कितीही क्षुल्लक कारणासाठी झाला आणि सुरुवातीपासूनच माहिती असली कि निष्पन्न होणार नाही तरीही त्या भयानक अनुभवातून गेलेला डॉक्टर हा संशयग्रस्त होतो आणि गरज नसताना अनेक चाचण्या लिहून देतो.
रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडला कि वकील लोक त्याला गाठून लगेच विचारतात तुम्हाला खटला करायचा आहे का? वकिलाची फी काही नसते पण खटल्यात तुम्हाला जी नुकसानभरपाई मिळेल त्याचा अर्धा हिस्सा त्यांना द्यायचा. यामुळे रुग्णाचे हि काही जात नाही आणि वकिलांना जाताजाता मिळाले तर भरपूर पैसे मिळून जातात.
साधारण स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा सर्जनचा निष्काळजीपणाविरुद्ध संरक्षणाच्या विमा,याचा हप्ता ५०,०००/- डॉलर्स वार्षिक एवढा असतो. यामुळे अमेरिकेतील वैद्यकीय सेवा अतिशय खर्चिक झाली आहे.
अमेरिकेत emergency आणीबाणीच्या सेवा उत्तम आहे परंतु urgent निकडीची सेवा मात्र आपल्याला बराच वेळ लागू शकतो. उदा. अंगाला खाज येते आहे. अशावेळेस पूर्ण चाचण्या केल्याशिवाय कोणतीही गोळी मिळत नाही.
खर्च हा एक मुद्दा वगळला तर तेथे मूलभूत वैद्यकीय सुविधांचा "सरासरी" दर्जा हा इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहे.
भारतासारख्या देशाशी त्याची तुलना होऊच शकत नाही. कारण उत्तर भारतात सरकारी वैद्यकीय सुविधा या नगण्यच आहेत आणि ज्या आहेत त्या भ्रष्टाचार आणि अनास्थेने पोखरलेल्या आहेत.
याला एक सन्माननीय अपवाद म्हणजे गोवा राज्य. येथे मिळणाऱ्या सरकारी सुविधा खरोखरच उत्तम आहेत.

मराठी_माणूस's picture

2 Sep 2016 - 2:31 pm | मराठी_माणूस

डॉक्टरवर दरवर्षी हलगर्जीपणासाठी खटला भरला जातो. ( किंवा प्रत्येक डॉक्टर वर दर सात वर्षांनी). हा खटला कितीही क्षुल्लक कारणासाठी झाला आणि सुरुवातीपासूनच माहिती असली कि निष्पन्न होणार नाही तरीही त्या भयानक अनुभवातून गेलेला डॉक्टर .......

असे जर असेल तर एखाद्याला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन काय असेल ?

सुबोध खरे's picture

2 Sep 2016 - 2:46 pm | सुबोध खरे

म्हणून तर अमेरिकेत तेथील लोक फारसे डॉक्टर होण्याच्या नादाला लागत नाहीत.एक तर शिक्षण अभ्यास क्रम फार लांब आहे आणि खर्चपण अफाट आहे. उलट आपल्याकडचे लोकच मुलाला डॉक्टर करायचा प्रयत्न करतात. पण डॉक्टर ला पैसे भरपूर मिळतात. नुसते लोकम करताना १ लाख डॉलर्स मिळतात. सर्जन रेडियोलॉजिस्ट तज्ज्ञ याना ३ लाख डॉलर्स (वर्षाला) मिळतात

ट्रेड मार्क's picture

2 Sep 2016 - 7:20 pm | ट्रेड मार्क

डॉक्टरांवर होणाऱ्या केसेसची कॉस्ट कव्हर करण्यासाठी पण इन्शुरन्स असेलच की ;)

साधारण स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा सर्जनचा निष्काळजीपणाविरुद्ध संरक्षणाच्या विमा,याचा हप्ता ५०,०००/- डॉलर्स वार्षिक एवढा असतो. यामुळे अमेरिकेतील वैद्यकीय सेवा अतिशय खर्चिक झाली आहे.
वर लिहिलेल्या दुव्यात हे लिहिले आहे

रामपुरी's picture

2 Sep 2016 - 7:14 pm | रामपुरी

ER मध्ये गेल्यावर एवढे बिल अपेक्षितच आहे. या उदाहरणामध्ये कदाचित तुम्ही UC वापरू शकला असता. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमचा एक मित्र उठसूठ ER मध्ये पळतो. अर्थातच मग त्यामुळे भरमसाठ प्रिमियम्चा विमा घ्यावा लागतो.

अर्जंट केअरला जाणे हाही चांगला पर्याय आहे. आणखी एक नवा प्रकार येऊ घातलाय. नाव विसरले. माझी डॉ. मैत्रिण सांगत होती.

किरकोळ दुखण्यासाठी झटपट ट्रीटमेंट हवी असेल तर MinuteClinic किंवा Healthcare Clinic हे पर्याय आहेत. [walk-in medical clinics are staffed by nurse practitioners and physician assistants who specialize in family health care and are trained to diagnose, treat and write prescriptions for common family illnesses such as strep throat and ear, eye, sinus, bladder and bronchial infections. Minor wounds, abrasions and joint sprains are treated, and common vaccinations such as influenza, tetanus, pneumovax, and Hepatitis A & B are available at all locations.]

ट्रेड मार्क's picture

2 Sep 2016 - 7:38 pm | ट्रेड मार्क

तेव्हा मी पण नवीनच होतो हामेरिकेत. इथे कोणाला माहित ER काय आणि UC काय. त्यावेळेला आम्ही आपले गूगलबाबाची मदत घेऊन हाडाचे डॉक्टर असलेले जे हॉस्पिटल दिसलं त्यात गेलो. हे सगळे शब्द आणि थोडंफार जे काही कळलंय ते त्या प्रसंगातून गेलो त्यामुळे कळलंय.

UC मध्ये बहुतांशी इन्शुरन्स नसलेले लोक जातात असं मला वाटतं. खखोदेजा आणि UCवाजा.

रामपुरी's picture

2 Sep 2016 - 8:03 pm | रामपुरी

पण इन्शुरन्स नसेल तर अर्जंट केअर मध्ये बर्‍यापैकी स्वस्तात उपचार होतात. उलट इन्शुरन्स असेल तर बिल जास्त होते. विकांताला अचानक उद्भवलेली किरकोळ दुखणी, स्टिचेस इत्यादी गोष्टीसाठी ER पेक्षा UC बरे पडते. साधारण त्याच दर्जाची सेवा आणि रास्त दर ( त्यातल्या त्यात :)) .

रेवती's picture

3 Sep 2016 - 12:11 am | रेवती

मागील वर्षी मे महिन्यात माझ्या मुलाचा उजवा हात खेळताना दुखावला व नंतर सुजला, त्यादिवशी नेहमीच्या पिडि.च्या ऑफिसला सुट्टी होती.. माझ्या भावाने व मी त्याला जवळच्या अर्जंट केअरला नेले. त्यांनी इन्शू.ची माहिती घेऊन लगेच तपासण्या करून सर्व ओक्के असल्याबद्दल सांगितले व आमचे काम झाले. को पे $५०० ला थोडा कमी आला. दोन महिन्यांनी पुन्हा खेळताना मित्र एकमेकांवर पडले व याचा डावा हात दुखावला. दुसर्‍या दिवशी सुजला व दुखणे सुरु झाल्यावर मुलाच्या डॉ. च्या ऑफिसला नेले. तेथेही एक्स रे वगैरे झाले व डॉ तुम्हाला फोनवर सांगतील म्हणून बोळवण केली. निघण्याआधी मुलाच्या हाताला स्प्लिन्ट घालून इमोबिलाईझ केला. संध्याकाळी फोन येऊन हात ओक्के आहे पण स्प्लिंट काही दिवस ठेवा असे म्हणाले. काही दिवसात जमेल तेंव्हा येऊन एक्स रे ची सीडी घेऊन जावा म्हणाले. को पे $ ५०० पेक्षा थोडा जास्त आला. या दोन्हीत अर्जंट केअरचा अनुभव चांगला होता.

पिलीयन रायडर's picture

10 Sep 2016 - 10:47 pm | पिलीयन रायडर

दोन महत्वाचे प्रश्न आहेत

१. आज अबीरच्या पब्लिक स्कुल्च्या अ‍ॅडमिशन साठी गेलो होतो. मिळेल की नाही हे अजुन दोन आठवड्यात कळेल. पण त्यांनी आम्हाला त्याच्या मेडिकल हिस्टरीमुळे डॉक्टर कडुन तो फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीसाठी ओके आहे अशी नोट आणायला सांगितली आहे. इथे तर भेटेल तो पिडीयाट्रिशियन कार्डिओलॉजिस्ट कडे जा"च" म्हणत आहे. आम्ही नुकत्याच भारतात सर्व टेस्ट केल्या आहेत हे सांगुनही आणि रिपोर्ट्स दाखवुनही सगळ्यांचा अमेरिकन डॉक्टरलाच दाखवायचा आग्रह आहे. इन्शुरन्स मध्ये काय कव्हर आहे हे मला माहित नाही पण दाट शंका आहे की ते डिडक्टीबल मीट झाल्याशिवाय स्वतः काही देणार नाहीत. आणि कार्डिओलॉजिस्ट सुद्धा २डी इको वगैरे परत करायला लावणार कारण त्याशिवाय तो काही मत देणार नाहीच.

काय करावे?

२. एका मित्राला नुकताच मुलगा झाला. गरोदरपणात जेनेटिक डिसऑर्डर नाहीत ना हे चेक करायला एक टेस्ट करुन घेतली डॉक्टरांनी. बिल आलं ८००० $. इन्शुरन्सने तिथेच फेटाळलं. हॉस्पिटलकडे बिल परत गेलं. आता त्यांनी ते परत इन्शुरन्सला पाठवलं. आता परत ते बिल आल्यावर मात्र इन्शुरन्स ने एकही पै आम्ही भरणार नाही असा पवित्रा घेतला आहे आणि बिल मित्राला दिलं आहे. कारण ही टेस्ट आवश्यक टेस्ट मध्ये नव्हतीच म्हणे. डिडक्टिबल वगैरे सगळं मजबुत मीट झालेलं आहेच. तरीही त्याला हे बिल आलंय. तो अर्थात अपील करणार आहे म्हणाला. पण अजुन काय करता येईल?

नेत्रेश's picture

11 Sep 2016 - 4:22 am | नेत्रेश

१. मुलाच्या चाचण्यांचे रीपोर्ट घेउन लोकल भारतीय डॉक्टरकडे जा. बरेच भारतीय डॉक्टर ग्रीनकार्ड करणार्‍या भारतीयांची मेडीकल ७५ ते १०० डॉलर्समधे क्लियर करतात. त्यांच्याकडुन तुम्हाला पाहीजे ती नोट मीळेल. ईंशुरंसची गरज नाही.

२. जनरली अशा टेस्टसाठी ईंशुरंस कंपनीकडुन प्रिऑथरायझेशन घ्यायला सांगतात. ती टेस्ट ईंशुअरंसमध्ये कव्हर आहे की नाही ते आधीच समजते. तुमच्या मित्राला साधे सरळ सोल्युशन पाहीजे असल्यास हॉस्पिटल बरोबर निगोशियेट करुन बील कमी करुन घ्यायला सांगा. थोडे तंगवल्यावर ८००० चे ८०० भागेल. तसेही ईंशुरंस कंपनीने त्यांना २००० ते ४००० च दीले असते. आणी कलेक्षन मध्ये ८० ते १०० डॉलरर्सच मिळतील

ट्रेड मार्क's picture

11 Sep 2016 - 4:34 am | ट्रेड मार्क

हॉस्पिटलबरोबर पण बोला. पण सगळ्याआधी त्याने गृहपाठ करायला पाहिजे.

आणि हो फ्रंट डेस्कवरच्या ललनांशी बोलून काही होत नाही. त्यांना काही कळत नसतं. बिलिंग सेक्शनकडे जा किंवा अश्या गोष्टींवर जो निर्णय घेत असेल त्याशी बोला.

ट्रेड मार्क's picture

11 Sep 2016 - 4:29 am | ट्रेड मार्क

इन्शुरन्सकडे चौकशी

१. तुम्ही तुमच्या इन्शुरन्सकडे नीट चौकशी करा. एवढे पैसे नाही लागत. मी माझ्या इन्शुरन्सच्या कॉस्ट एस्टीमेटर मध्ये बघितलं तर Cardiac Stress Test w/Echoची टोटल कॉस्ट $१२५ पेक्षाही कमी दाखवली.

तुम्ही खालील ठिकाणी गेला होतात का? त्यांना फोन करून त्यांच्याकडे पेडियाट्रिक कार्डिओलॉजी आहे का विचारा.

Riverside Pediatric Group PC; 324 Palisade Ave Fl 2, Jersey City, NJ 07307 फोन (201) 863-3346

तुम्ही जर्सी सिटी मध्ये राहता तिथे तर इतके भारतीय डॉक्टर्स आहेत की कोणीही सहज मार्गदर्शन करतील. मला २-३ वेळा खूप चांगला अनुभव आलाय. नेवार्क अव्हेन्यूवर (आत लिबर्टी अव्हेन्यूला जायचं - पत्ता बहुतेक १०, लिबर्टी अवेन्यू) डॉ. शर्मा म्हणून आहेत ते पण हार्ट स्पेशालिस्ट आहेत. त्यांचा फोन नंबर २०१-२२२-६५४५ आहे. ते वयस्कर आहेत आणि बोलायला/ वागायला एकदम छान आहेत. मला माझ्या मुलींसाठी मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे होतं तर मस्त गप्पा मारल्या आमच्याशी सर्टिफिकेट दिलं आणि पैसे विचारले तर याचे कसले पैसे घ्यायचे म्हणे. आग्रह करून सुद्धा माझ्याकडून एक पैसा घेतला नाही. तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकले तर उत्तमच नाहीतर ते मार्गदर्शन नक्कीच करतील.

२. तुमचा मित्र आऊट ऑफ नेटवर्क हॉस्पिटलमध्ये गेला होता का? नाहीतर एवढा खर्च येत नाही. संपूर्ण डिलेव्हरीचा खर्च ३-५ हजारापर्यंत येतो. कुठलीही टेस्ट वा ट्रीटमेंट सांगितली तर ती करायच्या आधीच एकूण खर्च किती, इन्शुरन्स मध्ये कव्हर होतं का? असेल तर किती आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या खिश्यातुन किती पैसे जाणार हे विचारणं अत्यावश्यक आहे. अजिबात लाजायचं नाही.

तो इन्शुरन्स कंपनीशी बोलू शकतो की एका टेस्टसाठी ८००० खूप जास्त रक्कम आहे आणि हे भरणं शक्य नाही असं पण सांगू शकतो. पण याच्या आधी त्याने थोडा गृहपाठ करावा. नक्की कसली टेस्ट होती (नाव काय आणि त्याचा नक्की उपयोग काय) हे बघायचं. तीच टेस्ट आवश्यक आहे का पर्यायी टेस्ट आहे, त्या टेस्टची साधारण किंमत किती आहे इतर ठिकाणी याचा अभ्यास पाहिजे. तरच भांडता येईल. आणि हो बिनधास्त भांडायचं काही होत नाही. ते नीट बोलत नसतील तर सांगायचं की ही अतिशय वाईट ग्राहक सेवा आहे आणि जे बोलतोय ते सगळं रेकॉर्ड होतंय याची पण आठवण करून द्यायची. एकदा योग्य उत्तर नाही मिळालं तर परत फोन करायचा.

पिलीयन रायडर's picture

11 Sep 2016 - 8:28 am | पिलीयन रायडर

धन्यवाद!!

१. मी Riverside Pediatric Group ला गेले आहे. तिथेच पहिल्यांदा डॉ. तृप्ती पटेल ह्यांच्याकडे अबीरला नेलं. पण ते लांब होतं म्हणुन जवळच्या रिव्हरसाईडच्याच दुसर्‍या ब्रांचला गेलो. तेव्हाही पटेल ह्यांनी काही त्रास नसला तरी कार्डीओलॉजिस्टला दाखवावं लागेलच, त्याशिवाय ग्रीन सिग्नल मी देऊ शकणार नाही असं सांगितलं होतं.

शर्मा डॉक्टरांचे नाव मी वाचलेले आहे एकदा कार्डिओलॉजिस्ट शोधताना. पण आता नक्की आठवत नाही की कोणत्या वेबसाईटवर सापडलं होतं. तुम्ही दिलेल्या नंबरवर करुन पाहिन फोन. त्यांचे पुर्ण नाव आठवत आहे का तुम्हाला? मला ह्या पत्त्यावर सापडले नाहीत ते (गुगल वर). पण हेच जर भेटले तर फार बरं होईल! मला भारताचे रिपोर्ट्स आणि २डी इकोची सिडी दाखवुनही कदाचित नोट मिळुन जाईल.

बर्थ डिफेक्ट साठी हीच टेस्ट मला ५००$ दाखवत आहे...

२. मित्र एकदम खमक्या आहे. तो खिंड लढवणारच आहे. पण तरीही तुमच्या सगळ्यांचे सल्ले त्याला कळवते.

ट्रेड मार्क's picture

13 Sep 2016 - 12:03 am | ट्रेड मार्क

पूर्ण नाव आठवत नाहीये आता

पूर्ण नाव आठवत नाहीये आता, ४ वर्ष झाली त्या गोष्टीला. पण तुम्ही न्यूअर्क अव्हेन्यूवरून लिबर्टी अव्हेन्यूला वळलात की लगेच आहे. शेजारी Eggomannia नावाचं रेस्टॉरंट आहे. नाहीतर फोन करणे उत्तम.

यावर दिसतंय का बघा: https://www.google.com/maps/@40.7359793,-74.0649287,3a,25.6y,107.69h,93.35t/data=!3m6!1e1!3m4!1syrQSQInlJ-XJy-PeedUGpw!2e0!7i13312!8i6656!6m1!1e1

पिलीयन रायडर's picture

13 Sep 2016 - 12:08 am | पिलीयन रायडर

Eggomannia माहिती आहे. जाऊनच पाहुन येते. फक्त ह्यांनी आमचा इन्शुरन्स घेतला पाहिजे.

टिवटिव's picture

12 Sep 2016 - 10:28 pm | टिवटिव

ती टेस्ट इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. मित्राला नटेराच्या बिलाचि वाट बघायला सांगा. नंतर नटेरा ला कॉल करायचा ते १००/२०० मध्ये अ‍ॅडजस्ट करतात. माझ्या टिममेट ची केस पाहिलि आहे आणि मी पण बिलाचीच वाट बघतोय.

Rahul D's picture

11 Sep 2016 - 9:56 am | Rahul D

मी भारतात एका अग्रगण्य इन्शुरन्स मध्यस्थ संस्थेत आहे. माझ्या क्लायंटच्या कामगारांना क्लेमसाठी मी मदत करतो. चांगले वाईट अनुभव येतात. भारतात इन्शुरन्स बाबतीत जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे.

सप्तरंगी's picture

13 Sep 2016 - 6:44 pm | सप्तरंगी

@ट्रेडमार्क -हे असेही असते हे माहिती नव्हते . किती चुकीचे आहे असे अव्वा च्या सव्वा ३५०० डॉलर्सचे बिल सांगणे आणि मग नंतर एका झटक्यात ते ६०० वर आणणे . किमान मेडिकल / वैद्यकीय क्षेत्रात (तेही अमेरिकेसारख्या देशात) असे होऊ नये. मूलभूत गरजांसाठी असे लोकांना वेठीवर धरणे योग्य नाही. नशीब तुम्हाला त्याचा फटका बसला नाही, एखाद्याने रिऍक्ट केलेच नसते तर त्याला सगळे पैसे भरावे लागले असते.

पिलीयन रायडर's picture

13 Sep 2016 - 6:53 pm | पिलीयन रायडर

इथले मेडिकल सेंटर एवढे महाग का आहे असा प्रश्न असताना चेपुवर ही एक प्रतिक्रिया वाचली.. मी अजुनही सावरते आहे..

You should try Bayonne Medical Center if you think this is bad --$70,000 for two nights when I had a diverticulitis attack -- all I got was IV fluids and an antibiotic and a liquid diet. My best friend: $212,000 for ten days of treatment for cellulitis-BTW, she developed a secondary infection after two days there!

पगार असतो हा लोकांचा.. एवढाही नाही अनेकांना.. इथेच कुणी तरी लिहीलं होतं ना की ४०,०००-५०,०००$ पगार आहेत अ‍ॅव्हरेज.. कसं काय एवढं बिल होतं?

सप्तरंगी's picture

13 Sep 2016 - 7:11 pm | सप्तरंगी

@ ट्रेडमार्क @ पिरा हे तर विश्वास ठेवायलाही अवघड जातेय . आम्ही आत्तापर्यंत आमच्याकडच्या युरोप मधील डॉक्टर्स ना , मेडिकल सिस्टिम ला नवे ठेवत होतो कारण आम्हाला ट्रीटमेंट डॉक्टरची अँपॉईंटमेन्टच मिळतच नाही, मिळालीच तर तुम्ही अगदी गयावाया करून किती दुखते आहे हे सांगितले तर एखाद्यावेळेस अँटिबायोटिक्स मिळू शकते नाहीतर पॅरासिटामोल वरच जगावे लागते. कारण त्यांचे सगळे लगाम इन्शुरन्स कंपनीच्या हातात असतात म्हणे. पण तुमचे US चे बिल / आकडे पाहून मेडिकल सिस्टिम तुमच्याकडेही वाईटच आहे हे दिसते आहे, अर्थात वेगळ्या प्रकारे ! खरोखर वाईट वाटते अश्या मूलभूत गरजा गरजांसाठी पण इतका त्रास सहन करावा लागतो तेंव्हा. फिट राहणे , आजारीच न पडणे गरजेचे आहे काळजी घ्या !

माझ्या पत्नीची दाढ खूप दुखत होती म्हणून दंतवैद्याला फोन केला तर तपासणीसाठी २ दिवसांनंतरची अपॉइंटमेंट मिळाली. त्यात निदान झाले की दाढ काढायला लागेल. आम्हाला वाटलं की लगेच काढून टाकतील, त्याला किती वेळ लागतोय. पण नाही, तब्बल १४ दिवसांनी बोलावलं आम्हाला. १० दिवसांचा वेदनाशामक व अँटिबायोटिक्सचा कोर्स दिला. दाढ खूपच दुखत होती म्हणून ४ दिवसांनी परत फोन केला की जरा लवकरची तारीख मिळतेय का तर दुसऱ्या गोळ्या सांगितल्या पण तारीख तीच. १४ दिवस फार हाल झाले तिचे कारण सततच्या दुखण्यामुळे काही खाता येईना आणि झोपही लागेना. एवढं करून दाढ काढायला फक्त ५ मिनिटं आणि मला भरावे लागलेले बिल $ ६० (इन्शुरन्सला जवळपास $ २५०).

अगदीच बरं नसेल तर UC वा ER मध्ये जा मात्र जास्त बिल भरायची तयारी ठेवा. इथे प्रकार असा आहे की तुम्हाला ते आजाराने मरू देणार नाहीत पण बिलाने मारतील. त्यामुळे शक्यतो आजारी न पडणे हे सर्वात चांगले.

अर्थात, मला आलेल्या अनुभवासारखे मार्ग आहेत आणि अजून इतरही मार्ग असतील.

एवढं करून दाढ काढायला फक्त ५ मिनिटं आणि मला भरावे लागलेले बिल $ ६० (इन्शुरन्सला जवळपास $ २५०).
अरेरे, तुम्ही डॉक्टरला आधीच सांगितले असते तर तीच दाढ हळूहळू काढायला त्याने ५ मिनिटांऐवजी १ तास घेतला असता.

ट्रेड मार्क's picture

14 Sep 2016 - 1:48 am | ट्रेड मार्क

विनोद विनोद म्हणतात तो हाच का?

असो. तुम्हाला मुद्दा कळला असावा अशी अशा करतो.

पिलीयन रायडर's picture

13 Sep 2016 - 7:52 pm | पिलीयन रायडर

आता ही इथली सिस्टिम आहे. त्याला मान्य करावे लागेल. पण खरं सांगते, एवढे अनुभव वाचुनही मला अजुनही इथे हॉस्पिटल्सची भीतीच वाटते खुप. माझ्या एका मैत्रिणीचे पोट गेले एक आठवडा दुखत आहे. तिला वाटतय की किडनी स्टोन असावा..पण नक्की काही समजत नाहीये. तिला डॉक्टरकडे जायचं तर आहे, पण मनात अर्थातच भीती आहे की कायच टेस्ट करायला लावतील आणि कितीच बिल येईल. शेवटी आज जातेय.

इथे अनेक कुटूंब आहेत ज्यांना कंपनीने प्रोजेक्ट पुरतं पाठवलं आहे. इथे कंपनीने जे दिले ते इन्शुरन्स आहेत. आणि काहींना एक रुपयाही न देता इथे डिलीव्हरी सुद्धा करुन मिळाली आहे तर काहींना ४-५ हजार डॉलर्स खर्च आलाय. नशिबाने अनेकांना दुसर्‍या टाईपचाच इन्शुरन्स आहे. पगार वाईट नसले तरी फार उच्च नाहीत. सेव्हिंग तर होत नाहीच, सेट अप करण्यात जुन्या बचतीतुन पैसे वापरले जातात. मुलांना शाळेत / पाळणाघरात टाकलंय (इतक्या लहान वयात पब्लिक्स्कुल नाहीये, पण सवय व्हावी म्हणुन चार तास..) तर ७००$ फीस आहे. अशात मेडिकलचे ५००$ बिल ही मोठी गोष्ट आहे. लहान मुल असल्याने कधीही डॉक्टरकडे जावं लागेल ते सांगता येत नाही. त्याला टाळुही शकत नाही आणि अंगावरही काढु शकत नाही.

त्यामुळे तुम्ही म्हणताय तेच माझेही मत आहे. मुलभुत सुविधांना इतका पैसा लागायला नको..

अभिजीत अवलिया's picture

13 Sep 2016 - 8:07 pm | अभिजीत अवलिया

70000$ आणी 210000$ हे आकडे वाचून मला चक्कर यायची वेळ आलीय. हे आकडे INR मध्ये पण फार मोठे आहेत. अजून अडीच महिने माझे उरलेत इथे. ते कसे तरी पार पडावेत आणी ह्यांच्या दवाखान्याचा अनुभव येऊ नये हीच अपेक्षा.

पिलीयन रायडर's picture

3 Nov 2016 - 8:23 pm | पिलीयन रायडर

काही घडामोडी:-

१. मी इथेच लिहीले होते की डोळ्यांच्या तपासणीचे बिल ५८६$ आले. ज्यात आम्हाला ८२$ भरायचे होते. माझा डोळ्याचा इन्शुरन्स आहे. मी इन्शुरन्सवाल्यांसोबत चॅट करुन विचारलं की इतकं बिल असु शकतं का? त्याने सांगितलं की तुझा डोळ्याचा इन्शुरन्स आहे, पण तो वापरला गेला नाही. कारण बिल "मेडीकल डायग्नोसिस" असे लावले आहे. तर तू हॉस्पिटलाला कॉल करुन विचार की हे असे का? आणि तसे नसेल तर हे वार्षिक तपासणीमध्ये १०$ मध्ये व्हायला हवं.

मी हॉस्पिटलला कॉल करुन चुकुन वेगळाच इन्शुरन्स दिलाय. तुम्ही डोळ्यांचा विमा वापरा आणि हे मेडिकल डायग्नॉसिस काही नाही, सरळ वार्षिक वेल व्हिजन चेक मध्ये टाका.

टाकलं! बिल १०$!

२. एक्स रे चे बिल मला खुप जास्त वाटत होते (४००$). म्हणुन मी त्या हॉस्पिटलच्या फेसबुक पेजवर सहज म्हणुन रिव्ह्यु लिहीला की इतके बिल कशामुळे? तर त्यांचा रिप्लाय आला की अमुक अमुक माणसाला कॉल करा. फोन केला असता मदतीचे आश्वासन मिळाले आणि बिल कमीही केले. (आता २००$!). ३ महिने झाले अजुन मला बिल आलेलं नाही (रिमाईंडर म्हणुन अजुनही ४००$ चेच बिल येत आहे..) पण मला फोनवर काल सांगण्यात आले की बिल भरु नकात, आम्ही पाठ्वतोय २००$ च सुधारित बिल. :)

३. अबीरच्या हार्टच्या चेकपचे बिल आले आहे. भारतात ४००० रुपयात होणार्‍या तपासण्यांचे बिल ४०००$ आहे! पण इन्शुरन्सने कव्हर करुनही आम्हाला १२००$ बिल आले आहे. (आधी जे ३०००$ सांगितले होते.) हे बिल बरोबर आहे की नाही माहिती नाही. एकदा डॉक्टरांना बोलावे का असे वाटतेय, पण त्यांनाही सारखा सारखा काय त्रास द्यायचा.. हा ही आकडा कमी नाही. तेव्हा हे बिल कमी करायला आता काय करावे अशा विचारात आहे. एकदा हॉस्पिटललाच फोन करुन पहावा असे वाटतेय.. कुणाला FSA कार्ड म्हणजे काय हे माहिती आहे का? मी इन्शुरन्सवाल्याला विचारलं तर त्याने हा पर्याय सांगितलाय. मला माहिती काढुन फोन करायचा आहे. (हे जर ते अकाऊंट असेल ज्यात तुम्ही केवळ वैद्यकीय खर्चांसाठी पैसे टाकता तर आमचे तसे खाते नाही... )

ट्रेड मार्क's picture

3 Nov 2016 - 11:58 pm | ट्रेड मार्क

एक्स रे बिल कमी केलं ते चांगलं झालं पण रिमाईंडर कोण पाठवत आहे? बिल कमी केले आहे आणि हे बिल भरू नका म्हणून सांगणारा ई-मेल वगैरे काही लेखी तुमच्याकडे आहे का? नसेल तर परत फोन करून त्यांना विचारा आणि सांगा की ते कलेक्शनला पाठवू नका. सहसा ३ रिमाईंडर नंतर बिल कलेक्शनला जातं. म्हणजे तुम्ही बिल भरत नाही म्हणून ते एका कलेक्शन एजन्सीकडे दिलं जातं. मग ते वसूल करायचे प्रयत्न करतात. पण भारतातल्यासारखे धमकीचे फोन, गुंड पाठवणे हे प्रकार नसतात. याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो ज्यामुळे क्रेडिट कार्ड मिळायला, कर्ज मिळायला (गाडीसाठी वगैरे) त्रास होतो आणि ही नोंद पुढची ७ वर्ष तरी क्रेडिट रिपोर्टवर रहाते.

FSA म्हणजे Flexible Spending Account. हे तेच अकाउंट आहे ज्यात तुम्ही केवळ वैद्यकीय खर्चांसाठी पैसे टाकता. तुमचे हे खाते नाही ते ठीक आहे कारण हे खाते म्हणजे use it or lose it असते. माझ्या मते तुम्ही डॉक्टरांशी/ हॉस्पिटलशी पण बोला आणि इन्शुरन्सशी पण बोला. बिलाचे डिटेल्स पण मागून घ्या. तुम्हाला एवढे पैसे का भरायला लागणार हे पण विचारा. तुम्हाला तपासण्या करायच्या आधी एवढं बिल येईल याची कल्पना दिली होती का?

पिलीयन रायडर's picture

4 Nov 2016 - 1:36 am | पिलीयन रायडर

एक्स रे बिल पुन्हा वाढवलं.. आता ३००$ केलं. म्हणे चुकुन दुसरे रेट लावले होते :(

बिलाचे डिटेल्स आहेत माझ्याकडे. मी सगळ्यांशीच बोलुन पहाणार आहे.

नक्की आकडा नव्हता सांगितला. पण ३०००$ खुप जास्त आहे. इतके येणार नाही असे डोक्टर म्हणाले होते. स्पेशालिस्ट्चे बिल जास्तच असते म्हणा. पण मी बोलते ना सगळ्यांशीच..

डॉ. नी ३ एक्स रेज काढवले होते त्याचा को पे मला इन्शु कं ने १२० $ सांगितला आहे. आपले प्लॅन्स सारखे नसतील पण तरी सांगून ठेवते.

अनन्त अवधुत's picture

4 Nov 2016 - 12:12 am | अनन्त अवधुत

Flexible Spending Account हे फक्त वैद्यकीय खर्चासाठी असलेले कार्ड आहे. तुम्हाला जर कल्पना आहे कि आऊट ऑफ पॉकेट आपला दवाखान्याचा $ xyz खर्च होणारच आहे तर हे कार्ड असणे फायद्याचे ठरते. FSA कार्डाला अधिकतम किंमत आहे ती किती आहे याची काही कल्पना नाही.

यात पगाराच्या प्री टॅक्स अमाऊंट मधून ठरवलेली रक्कम वळती करून घेतल्या जाते.
उदा. समजा जर तुम्ही $1200 चे FSA कार्ड घेतले तर तुम्हाला वेगळे डेबिट कार्ड मिळते त्यात $ 1200 प्री लोड असतात.
मग हे $1200 तुमच्या पगारातून दर महिना $100 (1200/12=100) कट करतात.
फायदा:
1. हे $1200 तुमच्या प्री टॅक्स पगारातून जात असल्याने आयकर वाचतो.
2. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला $1200 मेडिकल खर्चासाठी उपलब्ध होतात.
3. जिथे आऊट ऑफ पॉकेट खर्च आहे तिथे हे कार्ड वापरता येते (उदा. को-पे )
4. इन्शुरन्स मध्ये ज्या गोष्टी कव्हर होत नाहीत त्याचे खर्च FSA मधून करता येतात. (उदा डेंटल , चष्मा यांच्या सगळ्याच गोष्टी इन्शुरन्स मध्ये कव्हर नसतात. इन्शुरन्स एका चष्म्याचा खर्च कव्हर करतात पण दुसरा चष्मा करावा लागला तर तो आऊट ऑफ पॉकेट होतो)
Cons:
1. FSA हे Use It or Lose It अकाउंट आहे, त्यामुळे जर ठरवलेला पैसा त्या कालावधीत नाही वापरला तर सरकारजमा होतो (वाया जातो :)) जनरली FSA ची कालमर्यादा पुढील वर्षाच्या 31 मार्च पर्यंत असते (प्लीज इन्शुरन्स सोबत या बाबत बोलून घ्या काही ठिकाणी ती 31 डिसेम्बर पर्यंत पण असते)
2. तुमच्या कडे जर HRA (एम्प्लॉयर फंडेड हेल्थ अकाउंट) अकाउंट पण असेल तर आधी पैसा कुठल्या अकाउंट चा वापरणार हे पण माहिती करून घ्या. कारण HRA चा पैसा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड होतो

एफ एस ए कार्ड आम्ही वापरतो. मलातर गेल्या दोन चार वर्षात फारच उपयोगी पडतेय. तू वर्षभर कोपे किती आले वगैरे अंदाज घ्यावास असे वाटतेय. बाकी, जिथे जिथे फोन करून काहीतरी कमी होईल असे वाटतेय तिथे फोन कर. उपयोग होईलच असे नाही पण बरेचदा उपाय सुचवले जातात. माझा एक को पे ३०० $ आलाय पण तो जास्त वाटतोय. मग त्यांनी प्रश्नावली पाठवली व त्यावरून ठरवू म्हणालेत. आम्ही उत्तरे लिहून पाठवलीत, अजून सुधारीत बिल आले नाही. पण वाट पाहीन. $ १२०० ही मोठी रक्कम आहे.

पिलीयन रायडर's picture

4 Nov 2016 - 1:45 am | पिलीयन रायडर

हो ना.. पण जिथे एक्स रे चे ४०० लावत आहेत तिथे हार्ट्चे १२०० बरोबरच आहेत!!

आणि हे दरवर्षी बरं का!!

आजानुकर्ण's picture

3 Nov 2016 - 11:37 pm | आजानुकर्ण

इन्शुरन्सच्या वेगवेगळ्या संकल्पनांची माहिती
http://www.bcbsla.com/FindAPlan/gettingstarted/Pages/UnderstandInsurance...

एफएसए आणि एचएसएबद्दल माहिती
https://www.healthinsurance.org/faqs/what-is-the-difference-between-a-me...

डिडक्टिबल आणि औटऑफ पॉकेट खर्च भरला जात नाही तोपर्यंत इन्शुरन्सचे संपूर्ण फायदे मिळ नाहीत. आजाराची शक्यता जास्त असेल (किंवा लहान मुले वगैरे) तर कमी डिडक्टिबल-जास्त प्रीमियम असा पर्याय काही लोक निवडतात. आजाराची माफक शक्यता आणि स्थिर प्रकृतीचे वय असलेली मुले असल्यास जास्त डिडक्टिबल-कमी प्रीमियम + एफएसए असा कॉम्बो घेतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2016 - 12:07 am | डॉ सुहास म्हात्रे

मेडिकल बिलांबद्दल इतका सगळा "सुसंवाद" वाचून अमेरिकेत गेलो की सतत मनात तो धसका राहणार आहे. O:

अभिजीत अवलिया's picture

4 Nov 2016 - 2:09 am | अभिजीत अवलिया

समजा एखादी व्यक्ती गरीब किंवा मध्यमवर्गीय आहे. तिला काहीतरी इमरजेंसी मुळे दवाखान्यात भरती करावे लागले आणी ती बरी झाल्यावर बिल भरू शकत नाहीये (आर्थिक परिस्थितीमुळे) तर काय करतात इकडे त्या व्यक्तीचे ?

राघवेंद्र's picture

4 Nov 2016 - 7:47 pm | राघवेंद्र

खरंच गरीब असेल किंवा अत्यावश्यक कारण असेल तर राज्य सरकार पैसे भरते. एक केस बघितली आहे.
खूप बिल आले असेल तर आणि भरायचेच असेल तर शून्य व्याज दरावर दर महिन्या चा हप्ता दवाखान्यामध्ये भरू शकतो.
चॅरिटी संस्था कडे पण मदत मागु शकतो

ट्रेड मार्क's picture

7 Nov 2016 - 8:37 pm | ट्रेड मार्क

तुम्ही जर का जाहीर केलं की तुम्ही पैसे भरू शकत नाही तर फारसं काही होत नाही. माझ्या केस मध्ये पण मी सांगितलंच ना की हे पैसे जास्त आहेत आणि तेवढ्याच एका वाक्यावर त्यांनी ८०% सूट दिली. इथे एक चांगलं आहे ते म्हणजे रुग्णाकडे पैसे नाहीत म्हणून डॉक्टर उपचार करणं नाकारू शकत नाहीत. नियमाप्रमाणे उपचार करणे बंधनकारक आहे, पैश्याचा विषय नंतर येतो.

अजून एक केस म्हणजे माझ्या टीममधल्या एकाचे सासरे इथे आल्यावर दुसऱ्याच आठवड्यात माउंटन्समध्ये फिरायला गेले तर तिथे वर त्यांना हार्ट अटॅक आला. एअर ऍम्ब्युलन्सने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे फारसे उपचार करण्याची सोय नव्हती म्हणून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे तपासण्या केल्या तर ४ ब्लॉक्स आहेत असं आढळलं. त्यांची शल्यक्रिया आणि ७ दिवस हॉस्पिटलमध्ये (त्यातले ३ दिवस तरी ICU मध्ये याचा खर्च $१ लाखांच्या वर झाला. परंतु त्याला पैसे भरायला लागले नाही. पण त्याच्याच सासूला डायबेटीसमुळे पायाला काहीतरी झालं आणि त्याची शल्यक्रिया करायला लागली त्याचा खर्च $३५-४०००० झाला त्याचे पैसे मात्र भरायला सांगितले. एकरकमी जमणार नाहीत म्हणून दरमहा हप्ता लावून दिला.

हे बहुतेक उपचारासाठी तुम्ही कुठे जाता, तुमची काय माहिती सांगता, आधी काय उपचार झालेत व त्याचं बिल भरलंय/ नाही भरलंय वगैरे गोष्टींवर अवलंबून असावं.

काही दिवसांसाठी जेव्हा जेष्ट नागरिक अमेरिकेत येतात तेव्हा त्यांचा इंश्युरंस कुठला घ्यावा. विशेषत: जेव्हा ते चांगले हिंडते फिरते असतात आणि कुठलाहि आधीचा आजार किंवा तशी लक्षणं नसतात तेव्हा. जाणकारांनी यावर पण प्रकाश टाकावा.

अनन्त अवधुत's picture

10 May 2017 - 3:15 am | अनन्त अवधुत

इन्शुबाय वर तुलना करून विमा घेता येतो. विमा लवकर घ्या, कारण काही काही स्टेट्स मध्ये काही विमा घेता येत नाहीत. उदा. एचसीसी विमा वॉशिंग्टन राज्यातल्या लोकांना घेता येत नाही. त्यामुळे विमा घेताना ती व्यक्ती (जिच्यानावे विमा घेतलाय) वॉशिंग्टन मध्ये नसावी.
एचसीसी विमा असेल तर 'इन नेटवर्क' डॉक्टर कंपनीला बिल करू शकतात. बहुतेक इतर विमा कंपन्या विमाधारकाला आधी बिल द्यायला लावून नंतर पैसे परत करतात.
मी एचसीसी बद्दल बोललो कारण मी तो विमा घेतला होता. देवाच्या दयेने वापरावा लागला नाही. त्यामुळे त्याबद्दल अनुभव नाही. तुमचे पण विम्याचे पैसे फुकट जावोत :)

ट्रेड मार्क's picture

11 May 2017 - 2:21 am | ट्रेड मार्क

जर का तब्येत ठणठणीत असेल तर विम्याचे पैसे खरंच वाया जातात. पण कळीचा मुद्दा हा आहे की जर गरज पडली तर काय? विमा कंपनी पैसे देते का? माझ्या थोड्याफार आणि ऐकीव अनुभवावरून सांगतो की विमा कंपन्या बहुतांशी जबाबदारी नाकारतात. आधीपासून असलेला आजार आहे किंवा या आजाराला विमा संरक्षण नाही असं सांगून वाटेला लावतात.

किरकोळ आजार म्हणजे सर्दी/ ताप वगैरे पासून ते थोडं फार वैद्यकीय सल्ला व उपचार पाहिजे असेल तर विम्याची गरजही नाही. तुमच्या भागात महाराष्ट्र मंडळ/ मंदिर/ ट्रस्ट/ संस्था असेल तर त्यांच्याकडून एखाद्या भारतीय डॉक्टरकडे उपचार होऊन जातात. पण जर मोठा आजार उद्भवला तर काय? उदा. म्हणून आपण हृदयविकार घेऊ. आता यात –

१. विमा आहे - हा साधारणपणे $५०,००० ते $१००,००० पर्यंत असतो. पण आधीपासून असलेले आजार यात कव्हर नाही ही मुख्य अट असते. आता ह्रदयविकार असा १-२ महिन्यात एवढा बळावत नाही, त्यामुळे ही आधीपासूनची परिस्थिती (Pre-exsting condition) आहे असं विमा कंपनी सहज म्हणू शकते. हॉस्पिटल विमा कंपनीला बिल पाठवते आणि विमा कंपनी ते नाकारते. हॉस्पिटलमध्ये आपण फॉर्म सही करून दिलेला असतो. त्यात विमा आहे असं आपण सांगतो, आणि त्याखाली एक डिक्लरेशन असतं, "विमा कंपनी जे पैसे देणार नाही ते पैसे द्यायला मी बांधील आहे.". हॉस्पिटल सरळ तुमच्यावर टाकून मोकळं होतं कारण तुमच्याकडे विमा आहे. पण विमा कंपनी सहकार्य करत नाहीये. शेवटी बिल भरायची जबाबदारी तुमचीच आहे.

२. विमा नाही - यात तुम्ही विमा नाही हे आधीच सांगितलेलं असतं. अमेरिकेतल्या नियमांप्रमाणे विमा नाही किंवा पैसे नाही म्हणून वैद्यकीय सेवा नाकारता येत नाही. हॉस्पिटलसुध्दा किंमत लावताना विमा नाही हे लक्षात घेते. जर बिल तुमच्या आवाक्याबाहेरचं असेल तर अश्या पेशंटला मदत करणाऱ्या संस्था हॉस्पिटलला माहित असतात. त्यामुळे तुम्हाला कमी पैसे भरायला लागतात, जे माझ्या केसमध्ये झालं. या लेखातल्या एका प्रतिक्रियेत माझ्या मित्राचा अनुभव सांगितला आहे. त्याने त्याच्या आईसाठी विमा घेतला होता. दुर्दैवाने त्यांना हार्ट ऍटॅक आला, ४ दिवस ICU मध्ये राहून त्यांचा मृत्यू झाला, बिल $१३०,००० झालं. विमा कंपनीने हार्ट कंडिशन्स या अचानक उद्भवत नसून आधीपासूनच आजार या सबबीखाली पैसे द्यायचे नाकारले. पैसे न भरल्याने कलेक्शनला गेलं, जवळपास ८-१० वर्ष झाली माझा मित्र अजूनही ती केस लढवतोय.

माझ्या मते - तब्येत ठणठणीत असली तरी

- येण्याआधी भारतातच ECG सकट संपूर्ण शरीराची तपासणी, रक्त, लघवी तपासणी करून घ्यावी.
- रोज घ्यायला लागणारी औषधं, त्यांच्या पूर्ण वास्तव्याचा कालावधीत पुरतील, एवढी आणावी. थोडी जास्तच आणली तरी चालतील.
- सर्दी, खोकला, ताप यासाठी त्यांना चालतात अशी औषधं आणावी.
- ऍलर्जीच्या थोड्या गोळ्या आणाव्यात.
- बाकी नेहमीचं म्हणजे हवामान बघून त्याप्रमाणे त्यांना कपडे घालायला सांगणं, खाण्यापिण्याची पथ्य हे तर आपण करतोच

अजून एक महत्वाचं म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्यावा असं मला वाटतं. हा फक्त विमान प्रवासापुरताच असतो. यात विमान चुकणे, सामान हरवणे याबरोबरच मेडिकल कव्हरेज पण पाहिजे. कारण विमानात तब्येतीचा त्रास झाला तर महागात पडतं.

ही माझी वैयक्तिक मतं आहेत. इन्शुरन्स अजिबातच कामाचा नाही असं माझं म्हणणं नाही. इन्शुरन्स घ्यावा का नाही हे ज्याचं त्याने ठरवावं.

पिलीयन रायडर's picture

11 May 2017 - 2:27 am | पिलीयन रायडर

योग्य वेळेला योग्य चर्चा! सध्या मी हेच शोधत आहे. आई येत आहे. पण तिला काहीही आजार किंवा गोळी नाही. अनेकांनी सांगितले म्हणुन विमा घ्यावा ह्या विचारात होते.

पण हा प्रतिसाद वाचुन आता मी जरा गडबडलेय. (तरी पाच पन्नास डॉलरचा तरी इन्शुरन्स घ्यावा का ह्या विचारात आहे.) मी इन्शुबाय वर पाहिले, ४५$ मध्येही एक विमा सापडला. घ्यावा का?

आणि हो.. ह्यात ट्रॅव्हल आणि मेडिकल दोन्ही एकत्र असतं ना?

ट्रेड मार्क's picture

11 May 2017 - 8:50 pm | ट्रेड मार्क

थोडंफार कव्हरेज आणि जास्त मनाचे समाधान म्हणून घ्यायला हरकत नाही. विमा घेताना खालील गोष्टी बघायला पाहिजेत -

१. कव्हरेज - किती डॉलर्सचं कव्हरेज आहे.
२. कुठले आजार कव्हर करतात - आधी म्हणल्याप्रमाणे जुने आजार बहुतेक विमा प्लॅन्स कव्हर करत नाहीत, अर्थात जास्त प्रीमियम देऊन असे प्लॅन्स घेता येतात. त्यामुळे स्वस्तातला प्लॅन हा तत्कालीन आजार अथवा दुखापत यासाठी उपयोगी होऊ शकेल.
३. कोपे (Copay) - डॉक्टरच्या प्रत्येक भेटीला तुम्हाला किती हिस्सा भरायला लागतो. स्वस्तातल्या विम्यांमधे कोपे जास्त असतो. एक डॉक्टरच्या भेटीला साधारणपणे $२००-$२५० घेतात. आता यात जर कोपे $१००-$१५० असेल तर फारसा फायदा नाही. अर्जंट केअर (ER नव्हे) मध्ये गेलं तर साधारणतः तेवढाच खर्च येतो.
४. Deductible - हा सगळ्यात फसवा प्रकार असतो. यात अशी अट असते की एक ठराविक रक्कम तुम्ही भरल्याशिवाय इन्शुरन्स काही देणं लागत नाही. उदा. तुमचा विमा अगदी $५०,००० चा असेल पण $४,५०० Deductible असेल तर हा Deductible पूर्ण होईपर्यंत तुम्ही पैसे भरायचे. जेव्हा तुमचे $४,५०० पूर्ण भरून होतील त्यानंतर मग विमा कंपनी पैसे भरेल.
५. कुठले उपचार कव्हर नाहीत - सर्वसाधारपणे एक्स-रे कव्हर करत नाहीत किंवा अगदी थोडी रक्कम देतात. साधा पाय मुरगळला तर ४-५ एक्स-रे सहज काढतात आणि त्याचे $४००-५०० लावतात. मग हे एकतर सगळे पैसे तुम्हाला भरायला लागतात किंवा विमा कंपनी फक्त $१०० – १२५ देते व बाकी तुम्ही भरायचे. काही प्रकारच्या टेस्ट्स कव्हर नसतात, फिजिओथेरपी कव्हर नसते ईई.

पिराताई, तुम्ही तर जर्सी सिटीत राहताय. जर प्रसंग आलाच तर ढिगानी भारतीय डॉक्टर मिळतील. महाराष्ट्र मंडळ/ गुजराथी मंडळ यांच्याशी थोडा संपर्क साधून ठेवा, त्यांच्याकडे अश्या काही काळासाठी येणाऱ्या ज्येष्ठांवर कमी पैश्यात उपचार करणारे डॉक्टर असतात.

पण वर म्हणल्याप्रमाणे, विमा घ्यायचा का नाही हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने विचार करून निर्णय घ्या.

ट्रॅव्हल आणि मेडिकल दोन्ही या इन्शुरन्स मध्ये नसेल. ट्रॅव्हल इन्शुरन्स वेगळा घ्यावा लागतो जो फक्त प्रवासात येणाऱ्या अडचणींपासून ते वैद्यकीय सेवा या पर्यंत कव्हर करू शकतो. पण तो फक्त प्रवासापुरताच असतो. व्हिजिटर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागतो. कोणी यात जाणकार असेल तर अधिक सांगू शकेल.

एक सूचना: विमा घेणार असाल तर भारतीय कंपन्या (ICICI वगैरे) देतात त्याला इथे कोणी विचारत नाही. insubuy किंवा visitorscoverage यावरून घ्यावा.

पिलीयन रायडर's picture

11 May 2017 - 8:58 pm | पिलीयन रायडर

भारतीय विम्याचा विचार करत होते खरं तर. पण इथे उपयोगाचा नसेल तर....

बाकी मलाही विम्याची आवश्यकता आहे का असेच वाटत आहे. कारण विम्याचा माझाही आजवरच अनुभव असाच आहे की खिशातुन पुष्कळ पैसे द्यावे लागतात (डिडक्टिबल मुळे). त्यापेक्षा विमाच नसेल तर बिल कमी लावतात हे ही पाहण्यात आहे. आणि इथे पुष्कळ भारतीय डॉक्टर आहेत हे ही बरोबर आहे. त्याचा बराच फायदा होतो.

मोदक's picture

11 May 2017 - 9:35 am | मोदक

सहज एक शंका...

- रोज घ्यायला लागणारी औषधं, त्यांच्या पूर्ण वास्तव्याचा कालावधीत पुरतील, एवढी आणावी. थोडी जास्तच आणली तरी चालतील.

आपल्या सोबत औषधे ठेवण्याबद्दल कांही बंधन नसते का..? समजा मी ६ महिन्यांसाठी येणार आहे आणि बीपीच्या रोजच्या एक / दोन गोळ्या + बफर अशा ४०० गोळ्या सोबत ठेवल्या तर CBP वाले तसेच सोडतील का..?

आणि या एकाच आजाराच्या गोळ्या झाल्या. सिनीयर सिटीझनना असे वेगवेगळे आजार असू शकतात.

ट्रेड मार्क's picture

11 May 2017 - 9:04 pm | ट्रेड मार्क

माझे वडील येतात तेव्हा त्यांची ६ महिन्यांची औषधं घेऊन येतात. ज्यात ३-४ प्रकारच्या तरी गोळ्या असतात, वर बाकी जनरल औषधं (गोळ्या/ बाटल्या) असतातच. एका प्रकारच्या औषधाच्या जवळपास २० स्ट्रिप्स अश्या टोटल ८० ते १०० स्ट्रिप्स असतात. काही लिक्विडच्या बाटल्या असतात. थोडक्यात अर्धी ब्याग औषधांनीच भरलेली असते. या औषधांचं प्रिस्क्रिप्शन आणि मेडिकल रिपोर्ट्सची फाईल पण ब्यागेत ठेवतात. आत्तापर्यंतच्या ३-४ फेऱ्यांमध्ये एकदाही त्रास झाला नाही (लाकूड स्पर्श).

सध्या नवीन हामेरिकेत नवीन म्यानेजमेंट आल्यापासून काय परिस्थिती आहे माहित नाही. कशामुळेही त्रास होऊ शकतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2017 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

या औषधांचं प्रिस्क्रिप्शन आणि मेडिकल रिपोर्ट्सची फाईल पण ब्यागेत ठेवतात.

हे महत्वाचे आहे. योग्य संबंधीत कागदपत्रे बरोबर असल्यास, स्वतःसाठी प्रवासाच्या कालावधीसाठी लागणारी औषधे बरोबर नेण्यास सहसा कोठेच आडकाठी नसते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2017 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

या औषधांचं प्रिस्क्रिप्शन आणि मेडिकल रिपोर्ट्सची फाईल पण ब्यागेत ठेवतात.

हे महत्वाचे आहे. योग्य संबंधीत कागदपत्रे बरोबर असल्यास, स्वतःसाठी प्रवासाच्या कालावधीसाठी लागणारी औषधे बरोबर नेण्यास सहसा कोठेच आडकाठी नसते.

लॉरी टांगटूंगकर's picture

11 May 2017 - 9:42 am | लॉरी टांगटूंगकर

ट्रेमा सरः आकडेवारी बघायला आवडेल. ईन्शोरन्स ओम्बुड्समन वगैरे गोष्टी असतांना असं होणं एकंदर अवघड वाटतं आहे.

वर म्हणल्याप्रमाणे स्वानुभव व इतरांकडून ऐकलेले त्यांचे अनुभव यावरून सांगतोय. मुळात इन्शुरन्स कंपनी ही त्यांचा फायदा बघत असते. अश्या परदेशात भेटीला येणाऱ्यांची सोय हा भाग कदाचित त्यांच्यासाठी दुय्यम असावा. कारण येणाऱ्या लोकांमध्ये जास्तकरून ज्येष्ठ नागरिक असतात. त्यामुळे त्यांच्यात रक्तदाब, रक्तातील साखर हे सर्वसामान्य रोग आहेत. प्रत्येकाला ते उपचाराचा खर्च देत बसले तर लवकरच गाशा गुंडाळायला लागेल. त्यामुळे कशाचं कव्हरेज नाहीये हे नीट तपासून बघणं गरजेचं आहे.

ईन्शोरन्स ओम्बुड्समन वगैरे असतात, पण एवढं भांडत बसणं आपल्याला शक्य झालं पाहिजे. इन्शुरन्स घेताना pre-existing साठी नाही असं सांगितलं असेल. तर एखाद्याला कोलेस्टेरॉलचा त्रास आधीपासून आहे, त्यामुळे त्याबरोबर रक्तदाब पण आहे. अश्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर इन्शुरन्स कंपनी म्हणू शकते की मूळ कारण कोलेस्टेरॉल आहे, जे आधीपासूनच आहे, म्हणून काहीही देय नाही.

यात कोणी जाणकार, या क्षेत्रात काम करणारे अधिक सांगू शकतील.

इन्शुरन्स ही संकल्पना ज्याच्या डोक्यातून निघालीये त्याला मानलं पाहिजे. लुटण्याचे अधिकृत मार्ग तयार करून दिलेत.

सही रे सई's picture

12 May 2017 - 2:39 am | सही रे सई

खुपच माहितीपूर्ण प्रतिसाद.. धन्यवाद येव्हढी इत्यंभूत माहीती दिल्याबद्दल.

आनंदयात्री's picture

11 May 2017 - 9:50 pm | आनंदयात्री

इतरांनी म्हटल्याप्रमाणे इंश्युबाय वैगेरे साइट्सवरून कोट्स घेऊन तुम्हाला सहज इंश्युरन्स घेता येईल. जुने आजार जरी कव्हर होत नसतील तरी लहान सहान दुखणी (बग बाइट्स सारखे) आणि लहान-मोठ्या अपघातासारख्या परिस्थितीत हा इंश्युरन्स कामी येतो. ९९.९९% वेळा जरी काहीच झाले नाही तरी अश्या गोष्टी सांगून होत नाहीत. त्यामुळे इंश्युरन्स घ्यावा असे वैयक्तिक मत आहे.

अंतु बर्वा's picture

11 May 2017 - 10:50 pm | अंतु बर्वा

आत्ताच पंधरा दिवसांपुर्वी आई आलीये तेव्हा आजुबाजुला मित्रमंडळात चौकशी करुन इंन्सुबायवरुन अ‍ॅटलास अमेरिका हा प्लान घेतला. साधारण $२६० वगैरे खर्च आला. वर ट्रेमा यांनी म्हटल्याप्रमाणे भारतातुन विमा घेउ नये, कारण इथल्या डॉक्टर्सना आणी त्यांच्या बिलिंग ऑफिस्ना भारतीय विमा कंपनीशी क्लेम सेटलमेंटसाठी कराव्या लागणार्या उस्तर्वार्या करण्याची ना इच्छा असते ना तेवढा पेशन्स. आणि जरी इन्शुरन्स आधीचा आजार कवर करीत नसेल तरीही साध्या ताप/सर्दी/खोकला/पडणे झडणे अशा गोष्टींसाठी विमा असलेला बरा. मी स्वतः एका मित्राच्या आईचा जवळ्जवळ $१०,००० चा क्लेम पास झालेला पाहिला आहे.