माझी काही ट्युलिप्स पेंटिंग्स

सप्तरंगी's picture
सप्तरंगी in मिपा कलादालन
21 Apr 2017 - 8:01 pm

मिपाकर्स,

ऑइल पेंटिंग मध्ये काम सुरु करून तपे ओलांडली , ती तपे ओलांडताना पण मध्ये मध्ये काही काळ जात राहिला जेंव्हा इतर व्यापांमुळे हि कला जोपासणे शक्य नव्हते. पण पूर्णविराम न देता अल्पविरामावर विसावा घेत का होईना पण चालत राहिले. जेंव्हा जमत नव्हते तेंव्हा बंद केले , थोडा वेळ मिळाला तेंव्हा त्या वेळेत होईल ते केले आणि भरपूर वेळ होता तेंव्हा झोकूनही दिले. त्यामुळे कशातच प्रभुत्व असे नसले तरी सगळेच थोडे थोडे जमू लागले , मग काही पेंटिंग्स केली , काही गिफ्ट दिली, काही विकली, काही exhibition मध्ये लागली.

या सर्व प्रोसेस मध्ये सर्वात जास्त काय मिळाले ते समाधान. आणि प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकायला मिळाले, अजूनही मिळते आहे. शिकणे सोडायचे नाही असे ठरवून आजही वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत चालते आहे.... त्या शिकण्यातील थोडासा , माझ्या काही रंगांचा प्रवास मी इथे मांडते आहे.

माझी काही ऑइल - acrylic पेंटिंग्स शेअर करण्याचा मानस आहे जी मी इथे मिपा वर येऊन २-३ वर्षे झाली तरीही -करू- बघू- काय होईल केल्याने- कोणाला पडलय आणि कोणाचे अडलेय माझ्या पेंटिंग्सने- कुठे लिहीत बसणार मराठी मध्ये, तेवढ्या वेळात जग जिंकून येईन - असा काहीही विचार करत केली नाहीत.....आत्ताही अगदी विचार केलाय म्हणजे सगळे पटापट शेअर करेनच असे नाही पण माझ्या भोवर्यातून बाहेर यायचा प्रयत्न करेन म्हणतेय.

आवडले काही तर जरूर सांगा, इंटरेस्ट असल्यास किंवा सगळे काम बघावे वाटल्यास / लिंक हवी असल्यास व्यनि का काय म्हणतात तो करा. अगदी नाही आवडले तरी सांगा , क्रिटिकस कडूनही शिकायलाच मिळेल.

*****सांगण्याची आवश्यकता नसेल तरीही सांगणे इष्ट्य : ओरिजिनल फोटो आणि पेंटिंग्सचा copyright पूर्णत्वे माझा आहे.

धन्यवाद !!!
3 Tulips

Summer Breeze

प्रतिक्रिया

मितान's picture

21 Apr 2017 - 8:21 pm | मितान

अतिशय सुंदर !!!!!!

दशानन's picture

21 Apr 2017 - 8:27 pm | दशानन

वाह सुंदर!!!

फ्रेनी's picture

21 Apr 2017 - 9:21 pm | फ्रेनी

सुरेख !

नेत्रवेधक आहेत. छान.

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2017 - 10:49 pm | पिलीयन रायडर

आवडले. फारच छान कला आहे तुमच्या हातात. आणि बघा आता हा प्रतिसाद दिला की तुमचा धागा तुम्हाला वर आलेला दिसेल. (नवे लेखन ह्या टॅब मध्ये.)

सप्तरंगी's picture

22 Apr 2017 - 2:31 am | सप्तरंगी

थँक यु पीरा. हो ते कळले आता , पण कलादालनात काहीच दिसत नाही.

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 10:49 pm | यशोधरा

वा! सुर्रेख!

विचित्रा's picture

21 Apr 2017 - 11:04 pm | विचित्रा

सुंदर

रुपी's picture

21 Apr 2017 - 11:28 pm | रुपी

फार सुरेख!
दुसरे तर छायाचित्रच वाटावे इतके छान आहे.

खुपच सुन्दर काढली आहेत तुम्ही ही चित्रे.. अशीच अजुन येऊद्यात.

सप्तरंगी, एक व्हिडीओ बनवून टाका की चित्र काढतानाचा.

सप्तरंगी's picture

22 Apr 2017 - 2:41 am | सप्तरंगी

आजपर्यंत तरी काढला नाही व्हिडिओ. वरील दोन्ही पेंटिंग्स अनुक्रमे ६०*९० cm आणि ५०*७० cm ची आहेत. अशी पेंटिंग्स बनवायला २०-४० असे कितीही तास लागतात. लागणारा वेळ किती रंग , काम आहे त्यावर अवलंबुन आहे. टाइम लॅप्स व्हिडिओ बनवला तरच समजेल काय सुरु आहे ते. साध्या व्हिडिओ मध्ये काहीही समजणार नाही , कारण बारीक बारीक काम (डिटेल्स ) करायला खूप वेळ लागतो.
सगळ्यांचे आभार !!

जर एक एक्स्ट्रा मोबाईल अस्सल तर, मोबाईलला असा फोकस करा की तुमचा केनवोस फोकस होईल, रेकॉर्ड करा व विंडोज व्हिडीओ मध्ये एडिट करुन तुम्हाला हवे ते दाखवा :D
थोडे किचकट वाटेल सुरुवातीला पण नन्तर तुम्हाला पण आनन्द वाटेल याची खात्री.

रातराणी's picture

22 Apr 2017 - 12:12 am | रातराणी

भारी !

भिंगरी's picture

22 Apr 2017 - 12:16 am | भिंगरी

खुपच सुंदर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2017 - 12:46 am | डॉ सुहास म्हात्रे

अतिशय सुंदर चित्रे आहेत ! अजून येऊ द्यात.

सप्तरंगी's picture

22 Apr 2017 - 2:41 am | सप्तरंगी

आजपर्यंत तरी काढला नाही व्हिडिओ. वरील दोन्ही पेंटिंग्स अनुक्रमे ६०*९० cm आणि ५०*७० cm ची आहेत. अशी पेंटिंग्स बनवायला २०-४० असे कितीही तास लागतात. लागणारा वेळ किती रंग , काम आहे त्यावर अवलंबुन आहे. टाइम लॅप्स व्हिडिओ बनवला तरच समजेल काय सुरु आहे ते. साध्या व्हिडिओ मध्ये काहीही समजणार नाही , कारण बारीक बारीक काम (डिटेल्स ) करायला खूप वेळ लागतो.
सगळ्यांचे आभार !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Apr 2017 - 11:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अतिशय उत्तम आहेत पेंटिंग्ज. खरचं टाईम लॅप्स फोटोग्राफी करुन बघा.

पैसा's picture

22 Apr 2017 - 12:30 pm | पैसा

अजून येऊ द्या!

बाबा योगिराज's picture

22 Apr 2017 - 1:18 pm | बाबा योगिराज

सुंदर आहेत.

बाबा योगिराज

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2017 - 5:18 pm | संजय क्षीरसागर

राग मानू नका पण तुम्ही चित्रकलेचं शिक्षण (निदान एखादा क्लास वगैरे लावून तरी) घेतलं आहे का ? कारण छंद म्हणून ठीक असली तरी चित्रं अत्यंत सुमार आहेत. त्यात काँपोझिशनचा लवलेश नाही. शिवाय तुमच्या रेषेत दिसत लय नाही आणि रंगसंगती सौंदर्य दृष्टीचा आभाव दर्शवते. ही चित्रं तुम्ही समोर ट्युलिप्स ठेवून काढली आहेत की रेफरंस चित्रावरुन कॉपी केली आहेत ? अर्थात, दुसरी शक्यताच जास्त आहे. त्या केसमधे रेफरंससाठी चांगली निवड करा. कॉपी राईट वगैरे एकदा तुमची स्टाईल एस्टॅब्लिश झाल्यावरच्या गोष्टी आहेत. इतक्या प्रायमरी चित्रांबाबतीत त्याची काळजी सोडा.

अभ्या..'s picture

24 Apr 2017 - 2:40 pm | अभ्या..

वाक्यावाक्याशी सहमत आहे.

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2017 - 5:19 pm | संजय क्षीरसागर

शिवाय तुमच्या रेषेत लय दिसत नाही.

इरसाल कार्टं's picture

22 Apr 2017 - 5:23 pm | इरसाल कार्टं

अतिशय सुंदर चित्रे आहेत ! अजून येऊ द्यात.

खटपट्या's picture

22 Apr 2017 - 11:18 pm | खटपट्या

छान

काही लोकांना फाट्यावर मारा! ते काही बरळू देत तुम्ही तुमच्या आवडीचे करत रहा!

संजय क्षीरसागर's picture

23 Apr 2017 - 12:01 am | संजय क्षीरसागर

ज्यांना काँपोझिशन कशाला म्हणतात, रेषेत लय असते म्हणजे नक्की काय असतं आणि रंगसंगतीच्या बॅलन्सचा तर गंधच नाही, त्यांची प्रशंसा म्हणजे बहिरा शास्त्रीय संगीताला दाद देतो तसा प्रकार आहे. तो फाट्यावर मारल्याशिवाय तुमची काही प्रगती होणार नाही.

सप्तरंगी's picture

24 Apr 2017 - 12:15 pm | सप्तरंगी

@दशानन
आभार, हो प्रत्येकाने कोण काय म्हणेल याचा विचार न करता जे जे आवडेल , करता येईल ते करत राहावे, आपण लोकांना बदलु शकत नाही.

सप्तरंगी's picture

24 Apr 2017 - 12:06 pm | सप्तरंगी

@ संजय क्षीरसागर
प्रत्येकच गोष्ट सगळ्यांना आवडतेच असे नाही. माझेही काम सगळ्यांना आवडावेच असा माझा मुळीच अट्टाहास नाही. कधीच नसतो. ज्यात मला आनंद , समाधान मिळते ते मी करते. मग ते सगळ्यांना आवडेल असे कसे असेल,

खूप आर्टिस्टची पेंटिंग्स पाहून प्रत्येकच वेळी मला ती तितकी आवडतातच असे नाही पण त्या मी माझ्या लिमिटेशन्स, त्यांची आवड वगैरे आहे असे मानते. ( त्या माझ्या लिमिटेशन्सच असतीलच असेही नाही ) पण कला कोणत्याही साच्यामध्ये बांधुन ठेवायची नसते. कलाकाराने मुक्तपणे काम करावे आणि त्याला तसे करू दिले जावे हे तर जगजाहीर आहे.

कोणतेही पेंटिंग सुमार वाटूच शकते (वाटते म्हणजे असतेच असेही नाही ) पण ते सांगण्याची एक ' सभ्य' अशी पद्धत असते याची आपणांस जाणीव नाही असे दिसते. कारण तुमची एकंदरीत भाषाच समोरच्याचा अनादर करणारी, कमी लेखणारी आहे. अर्थात त्यामुळे राग वगैरे मानण्याचा प्रश्नच येत नाही पण अश्या वृत्तीची कीवच वाटते.

एखाद्या जाणकाराने चिकित्सा करताना पेंटिंग सुमार वाटण्याबद्दलचे निकष जरा सविस्तरपणे सभ्य भाषेत सांगितले असते, त्यातुन viewpoint कळला असता पण तुमची भाषा जाणकाराची वाटत नाही. कोणत्याही जाणकारानेही constructive criticism दिला असता.

मी काय आहे आणि काय नाही याची मला नक्कीच जाण आहे आणि analysis करण्यासाठी माझ्याकडे जी एक प्रॉपर टीम आहे जी त्यावर काम करून आपले निकष आणि दर्जा ठरवते.

तुमच्या एकंदरीत attitude आणि भाषेमुळे तुमच्या बाकी कोणत्याही प्रश्नांना उत्तरे द्यायची, आणि माझा अमूल्य वेळ अजून वाया घालवायची, मला बिलकुलच गरज वाटत नाही.

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2017 - 2:14 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही डायरेक्ट `कॉपी राइट पूर्णत्वे माझा' वगैरे लिहील्यामुळे स्पष्ट लिहीलं. आणि निकष सुद्धा सरळ सांगितले आहेत. मी स्वतः जरी चित्र काढत नसलो तरी माझा मुलगा आर्टिस्ट आहे (फाईन आर्ट अँड ग्राफिक डिझाईन). त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासून घरात कलेतल्या सौंदर्यावर चर्चा होत असते (गेली किमान दहा वर्ष !). त्याची निर्मिती प्रक्रिया, त्याची एकसोएक चित्रं, त्याच्या सहाध्यायींची चित्रं, त्याच्या शिक्षकांशी सौंदर्यशास्त्रावर झालेल्या चर्चा. त्यानी आणलेल्या पुस्तकातल्या चित्रांवर आस्वादकांनी लिहीलेले व्यासंगी लेख, या विषयात रस असल्यानं पाहिलेली प्रदर्शनं, इथल्या रवी परांजपे, मिलींद मुळीक वगैरेंशी असलेल्या ओळखींमुळे त्यांचा कलेकडे पाहाण्याचा दृष्टीकोन..... इतकी व्यापक बॅकग्राऊंड वरच्या प्रतिसादामागे आहे.

यामुळे तुमच्या चित्रावर, तुम्हीच म्हटल्यामुळे (अगदी नाही आवडले तरी सांगा , क्रिटिकस कडूनही शिकायलाच मिळेल.) प्रतिसाद दिला. तुम्ही जर खरंच कलेकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहात असता तर तुम्हाला किमान प्रतिसाद कळला तरी असता आणि तुमचं उत्तर त्या अनुषंगानं आलं असतं. बाकीच्या सदस्यांचं जाऊं द्या, माझा प्रतिसाद दिसला की त्यांचं पित्त वाढतं आणि मग विषयातला शून्य गंध असला तरी ते काहीबाही ठोकण्याचा प्रयत्न करतात (आणि मग तोंडघशी पडतात). पण तुम्हाला बहुदा फक्त प्रशंसाच हवी म्हणून धागा काढला आहे असं दिसतं..... तर चालू द्या तुमची चित्रकला तुमची `टीम' वगैरे काय निकष लावते त्यानुसार.

दशानन's picture

24 Apr 2017 - 2:26 pm | दशानन

Images

यावर जरा भाष्य करा पाहू!

तेव्हा तुम्हीच रसग्रहाण करावं हे उत्तम !

अहो तुम्हालाच दिव्यज्ञान आहे असे तुमचे मत आहे, लिव्हा की ;)
जरा वाईच मदत करतो गुगल करायला सोपं होईल तुम्हाला
"Anything that excites me for any reason, I will photograph; not searching for unusual subject matter, but making the commonplace unusual"

प्रतिसादकाचा अ‍ॅटिट्युड काढतानाचा धागालेखकाचा आधीच्या धाग्यातील अन ह्या प्रतिसादातील अ‍ॅटिट्युड पटला नाही. ह्यामुळेच प्रतिसाद देऊसा वाटत नव्हता.
पण फक्त चान चान म्हणून घ्यायला धागा असेल तर अवघड आहे. अ‍ॅनालिसिस टिम बिम तर फारच....
असो.

दशानन's picture

24 Apr 2017 - 2:54 pm | दशानन

अभ्या... क्रीटक करणे वाईट नाही. अत्यन्त सुंदर प्रकारे सांगता येऊ शकले असते ना सक्षीना? कारण नसताना तिरकस प्रतिसाद व उद्धट प्रतिसाद यात फरक आहे. मी या लेखिकेचे आधीचे धागे पाहिले नाही आहेत हाच पाहिला. प्रतिवाद करावा पण तो कडवट असू नये. आणि जर सल्ला देणे आहेच तर भाषा नम्र असावी का नको हे सांगा.

*हा माझा दृष्टिकोन आहे.

क्रिटिक वगैरे कसंय ना राजा की एकदा चित्र काढलं की चित्रकाराची चित्रातली इन्वॉल्वमेंट संपली मानणारा मी माणूस आहे. पण कलाकृती हि एका अर्थाने कलाकाराचे अपत्य असते सो त्याची पाठराखण करणे सोबत येते. क्रिटिक्स करणारा माणूस काय तोलामोलाचा आहे ते क्रिटिक्स मधूनच कळलेले असते. सो अशावेळी आपला तो बाब्या टाईप विचार सोडून काही सुधारणा होईल का ते बघणे अन्यथा आपली कलाकॄती परफेक्ट आहे ह्या मुद्द्यावर अडून बसणे ह्या दोनच गोष्टी राहतात. राहता राहिला भाषेचा विचार तर संजयजींच्या प्रतिसादात मला काहीही वावगे/कडवट्/उध्दट वाटले नाही. माझ्या एखाद्या चित्राला अशा भाषेत प्रतिसाद आला असता तर बिल्कुल वाईट वाटले नसते. आणि आजपर्यंत वाटलेले नाहीये. कारण हि टिका का आवडले नाही त्या कारणासहित केलेली आहे. माझी अ‍ॅनालिसिस टीम वगैरे बाळगण्याइतका मोठ्ठा आर्टिस्ट नाहीये पण ह्या फिल्डमध्ये अ‍ॅक्टिव्ह १५-२० वर्षे घालवून आणि मिपावरच्याच चित्रगुप्तसरांसारख्या कलाकारांची विचारसरणी पाहून चित्रे अन क्रिटिक्स ह्याबाबत माझा वेगळा विचार नाहीये हे पटलेले आहे.
* ऑफकोर्स हा माझाच दृष्टीकोन आहे.

मला तुझा मुद्दा मान्य आहेच रे, पण आपला आपला दृष्टिकोन आहे रे. असे आहे मला चित्र कळतात की नाही हे तू तेथे बसून कसे सांगणार? आणि माझा प्रतिसाद (पहिला या धाग्यावर) कॉमन होता, तो कोणी आपल्या अंगावर ओढून घ्यावा ही त्यांची इच्छा! मी त्याला प्रतिवाद पण नाही केला.

दुसऱ्याचे खच्चीकरण न करता व्यवस्थित समजावता येतं. हे माझे प्रामाणिक मत आहे, त्यांना एवढी माहिती आहे तर त्यांच्या कडून अजून अपेक्षा वाढतात हेच त्यांना कळत नाही आहे म्हणून त्यांना वाटते की त्यांच्या बद्दलच सगळे वाईट / मुद्दाम लिहीत आहेत. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे.

मला एखादी गोष्ट आवडते हीच गोष्ट माझ्या साठी मोठी आहे तशीच ती लेखिकेला पण मोठी आहे ना? प्रत्येक गोष्टीत आपण जर परफेकट असतो तर ...?

आय होप माझा मुद्दा समजला असेल.

आय होप माझा मुद्दा समजला असेल.

नाही समजला

दशानन's picture

24 Apr 2017 - 3:58 pm | दशानन

अभ्या,
सिंपल गोष्ट आहे रे.
समज तू एक ग्राफिक तयार केलेस, मी पाहिले की काही गोष्टी क्लियर नाही आहेत, तेव्हा मी काय हे यात काहीच क्लास नाही, तुला काही कळतच नाही तू दुसरे चित्र पाहून कॉपी मारली आहेस, नाही नक्कीच कॉपी केली आहेस इत्यादी बोललो तर कसे?
आणि,

अभ्या, प्रयत्न चांगला आहे , पण प्रेरणाम्हणून तू इतर कोणते चित्र निवडले होतेस का? हे बघ या चित्रात अमुक अमुक जागी चूक आहे किंवा तुला ते कव्हर करता आले नाही आहे. थोडा परत अभ्यास कर, कॉपी कर पण त्यात तुझे काही तरी दिसू दे, मग जेव्हा पूर्ण चित्र तुझे असेल तेव्हा येथे प्रकाशित कर. समजू शकतोस म्हणून जरा स्पष्ट लिहतो आहे, नाही आवडले लिहलेले तरी तुमची मर्जी, थोडा जाणकार आहे म्हणून मी माझे मत व्यक्त केले.

आता यातील योग्य कोणते?

सप्तरंगी's picture

28 Apr 2017 - 1:56 pm | सप्तरंगी

@दशानन
मी नसताना खिंड लढवल्याबद्दल थँक्स:)) मला हेच म्हणायचे होते

""""एकदा चित्र काढलं की चित्रकाराची चित्रातली इन्वॉल्वमेंट संपली मानणारा मी माणूस आहे."""
विशेष आवडलं.

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2017 - 3:26 pm | संजय क्षीरसागर

तरी पहिल्या धाग्यावर मी काही बोललो नाही पण इथे कॉपी राइट वगैरे म्हणजे लै झालं ! आणि आता तर 'अ‍ॅनालिसिस टिम' वगैरे काय लेवलच्या गोष्टी चालल्यात याची तुला कल्पना आलीचे . तरी बरं क्युरेटर वगैरे नाही निवडला अजून !

तरी पहिल्या धाग्यावर मी काही बोललो नाही पण इथे कॉपी राइट वगैरे म्हणजे लै झालं ! आणि आता तर 'अ‍ॅनालिसिस टिम' वगैरे काय लेवलच्या गोष्टी चालल्यात याची तुला कल्पना आलीचे .

copyright असेल, analysis टीमही असेल तरी फक्त तुम्हाला आवडत किंवा पटत नाहीये म्हणून लिहायचेच नाही असे नाही होऊ शकत.

बाकीच्या सदस्यांचं जाऊं द्या, माझा प्रतिसाद दिसला की त्यांचं पित्त वाढतं

म्हणजे तुम्ही सतत असेच लिहिता तर..ते दिसतेच आहे

सतिश गावडे's picture

24 Apr 2017 - 5:49 pm | सतिश गावडे

खुप सुंदर. काढली आहेत तुम्ही ही चित्रे.

चौथा कोनाडा's picture

25 Apr 2017 - 1:10 pm | चौथा कोनाडा

सुरेख रंगारंग पेंटिन्ग्ज !
इथल्या तज्ज्ञ लोकांना काय म्हणायचे आहे हे समजून त्या दिशेनेही विचार करा.
येवु द्यात अजून !

मला चित्रकलेतलं काही कळत नाही, त्यामुळे तुम्ही काढलेली ट्युलिप्सची चित्रे सुंदर आहेत. बाकी गोष्टींवर जाणकार आणि ज्यांना सगळ्यातलं सगळ्ळं कळतं अशा व्यक्ती प्रकाश टाकतील.

गवि's picture

25 Apr 2017 - 6:08 pm | गवि

उलटसुलट मतं येणारच.

मला तरी पेंटिंग्ज फार आवडली. असा कलाकार हात आपल्याला मिळाला नाही म्हणून हळहळ वाटतच असते. विशेषतः अभ्या आणि इतर अस्सल कलाकारांची कामं पाहून.

तुम्हाला इतकीच विनंती की ड्रॉईंग / पेंटिंग्ज या कलेची सुरुवात करु इच्छिणार्यांना प्लीज काही सुरुवातीच्या संकल्पना, रंगांचे प्रकार, कागद / कॅनव्हासचे प्रकार, ब्रशचे प्रकार आणि त्यांचे उपयोग हे सर्व उदाहरणांसहित दाखवणारा लेख ,/ लेखमाला लिहावी अशी विनंती. आमच्यासारख्या ज्या दुर्दैवी लोकांनी शाळेनंतर हा चित्रकलेचा दोर कापून टाकला आहे त्यांना पुन्हा एकदा या सुंदर कलेचा धागा पुन्हा जोडण्याची संधी मिळावी.

याकरिता मिसळपावकडून कोणतीही मदत लागली तर सांगा. सर्व कलाकारांनी एकत्र येऊन हे अन्नछत्र उघडावं अशी मनापासून विनंती.

सप्तरंगी's picture

28 Apr 2017 - 1:24 pm | सप्तरंगी

थँक यु, मी मिपा वर काही टाकलेच नाही फारसे, एकदा लिहिले तर इतका गोंधळ सुरु आहे परत हिम्मत करू लिहायची :))

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2017 - 10:48 am | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही टाका हो तुमची चित्रे आणि लेखन ! रोज एकदोनदा तरी स्वघोषित अहंपणाची शेखी मिरविल्याशिवाय दोन घास गळ्याखाली ज्यांच्या जात नाहीत असे महाभाग जगात खूप आहेत. त्यांची पत्रास बाळगून आपण का आपला आनंद त्यांना हिरावून द्यायचा ? हे त्यांच्या मानसिक इनसिक्युरिटीचे लक्षण असते. आपण आपले, त्यांची कीव करत, "... हाथी चले अपनी चाल" हे तत्व बाळगून आपला कलानंद साजरा करीत रहावे !

तसेही पाहिले तर, या धाग्यावर कुत्सित टीका करणारे अतीअल्पसंख्य आहेत. त्यामानाने, चित्रे आवडली असे म्हणणारे रसिक आणि त्यांचे समतोल रसग्रहण करणारे सुशिक्षित जाणकार अनेक पटींनी जास्त आहेत, हे विसरू नका !