माझी काही ट्युलिप्स पेंटिंग्स
मिपाकर्स,
ऑइल पेंटिंग मध्ये काम सुरु करून तपे ओलांडली , ती तपे ओलांडताना पण मध्ये मध्ये काही काळ जात राहिला जेंव्हा इतर व्यापांमुळे हि कला जोपासणे शक्य नव्हते. पण पूर्णविराम न देता अल्पविरामावर विसावा घेत का होईना पण चालत राहिले. जेंव्हा जमत नव्हते तेंव्हा बंद केले , थोडा वेळ मिळाला तेंव्हा त्या वेळेत होईल ते केले आणि भरपूर वेळ होता तेंव्हा झोकूनही दिले. त्यामुळे कशातच प्रभुत्व असे नसले तरी सगळेच थोडे थोडे जमू लागले , मग काही पेंटिंग्स केली , काही गिफ्ट दिली, काही विकली, काही exhibition मध्ये लागली.
या सर्व प्रोसेस मध्ये सर्वात जास्त काय मिळाले ते समाधान. आणि प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकायला मिळाले, अजूनही मिळते आहे. शिकणे सोडायचे नाही असे ठरवून आजही वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत चालते आहे.... त्या शिकण्यातील थोडासा , माझ्या काही रंगांचा प्रवास मी इथे मांडते आहे.
माझी काही ऑइल - acrylic पेंटिंग्स शेअर करण्याचा मानस आहे जी मी इथे मिपा वर येऊन २-३ वर्षे झाली तरीही -करू- बघू- काय होईल केल्याने- कोणाला पडलय आणि कोणाचे अडलेय माझ्या पेंटिंग्सने- कुठे लिहीत बसणार मराठी मध्ये, तेवढ्या वेळात जग जिंकून येईन - असा काहीही विचार करत केली नाहीत.....आत्ताही अगदी विचार केलाय म्हणजे सगळे पटापट शेअर करेनच असे नाही पण माझ्या भोवर्यातून बाहेर यायचा प्रयत्न करेन म्हणतेय.
आवडले काही तर जरूर सांगा, इंटरेस्ट असल्यास किंवा सगळे काम बघावे वाटल्यास / लिंक हवी असल्यास व्यनि का काय म्हणतात तो करा. अगदी नाही आवडले तरी सांगा , क्रिटिकस कडूनही शिकायलाच मिळेल.
*****सांगण्याची आवश्यकता नसेल तरीही सांगणे इष्ट्य : ओरिजिनल फोटो आणि पेंटिंग्सचा copyright पूर्णत्वे माझा आहे.
धन्यवाद !!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर !!!!!!
वाह सुंदर!!!
सुरेख !
नेत्रवेधक आहेत. छान.
आवडले. फारच छान कला आहे
थँक यु पीरा. हो ते कळले आता
वा! सुर्रेख!
+१
फार सुरेख!
खुपच सुन्दर काढली आहेत तुम्ही
सप्तरंगी, एक व्हिडीओ बनवून
आजपर्यंत तरी काढला नाही
जर एक एक्स्ट्रा मोबाईल अस्सल
भारी !
खुपच सुंदर!
अतिशय सुंदर चित्रे आहेत !
अनुक्रमे ६०*९० cm आणि ५०*७० cm
अतिशय उत्तम आहेत पेंटिंग्ज.
खूप छान!
वाह
बाईश्री !
वाक्यावाक्याशी सहमत आहे.
.
अतिशय सुंदर चित्रे.
छान
काही लोकांना फाट्यावर मारा!
बरोब्बर !
@दशानन
@ संजय क्षीरसागर
बाईश्री,
अगदी नाही आवडले तरी सांगा , क्रिटिकस कडूनही शिकायलाच मिळेल.)प्रतिसाद दिला. तुम्ही जर खरंच कलेकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहात असता तर तुम्हाला किमान प्रतिसाद कळला तरी असता आणि तुमचं उत्तर त्या अनुषंगानं आलं असतं. बाकीच्या सदस्यांचं जाऊं द्या, माझा प्रतिसाद दिसला की त्यांचं पित्त वाढतं आणि मग विषयातला शून्य गंध असला तरी ते काहीबाही ठोकण्याचा प्रयत्न करतात (आणि मग तोंडघशी पडतात). पण तुम्हाला बहुदा फक्त प्रशंसाच हवी म्हणून धागा काढला आहे असं दिसतं..... तर चालू द्या तुमची चित्रकला तुमची `टीम' वगैरे काय निकष लावते त्यानुसार.ओ पिकासोचे आजोबा
तुम्ही शोधलंय आणि ही तुमचीच दिव्य आवड आहे
अहो तुम्हालाच दिव्यज्ञान आहे
प्रतिसादकाचा अॅटिट्युड
अभ्या... क्रीटक करणे वाईट
क्रिटिक वगैरे कसंय ना राजा की
मला तुझा मुद्दा मान्य आहेच रे
आय होप माझा मुद्दा समजला असेल
उदा.
@दशानन
अभ्या शेठ तुमचा दृष्टिकोन खूप भावला...!!
@ अभ्या,
पटत नाहीये म्हणून लिहायचेच नाही?
बाकीच्या सदस्यांचं जाऊं द्या,
चित्रे आवडली.
सुरेख रंगारंग पेंटिन्ग्ज !
मला चित्रकलेतलं काही कळत नाही
उलटसुलट मतं येणारच.
थँक यु, मी मिपा वर काही
तुम्ही टाका हो तुमची चित्रे