प्रेरणा?
खायला कशाला हवी प्रेरणा? पण तरीही विचारलीत तर ही घ्या
नका रांधू भुसकटे ती मला खवळून खाऊ द्या
वडा तळलाच आहे तर मला निथळून खाऊ द्या!
नको ते रोजचे रडणे, सॅलड अन ब्रेडचे तुकडे
मुलायम लागते हलवा-पुरी कवळून खाऊ द्या!
घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक 'केकां'नो
पहाटे 'कॉफि'ला तुमच्या सवे हुरळून खाऊ द्या!
अश्या बेरंग खाण्याची कुठे उरते खूण 'मागे'?
तांबडा रंग तर्रीचा करी 'मिसळू'न खाऊ द्या!
मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली वाढले आहे(च)..तर उधळून खाऊ द्या!
नको मश्रूम, नको कळणे, नका डाएटवरी राहू
क्रीम आहेच तर लस्सी जरा ढवळून खाऊ द्या!
जगाच्या मध्यरात्रीला असे या चार पावांनो
तकाकी पावभाजीची बटर वितळून खाऊ द्या!
—(खाद्यजित)रंगा
प्रतिक्रिया
20 Apr 2017 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही ह्ही ह्ही ही!
21 Apr 2017 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे
भारी ! =))
21 Apr 2017 - 12:17 am | दशानन
झक्कास!!!
21 Apr 2017 - 12:34 am | पद्मावति
:) मस्तच.
21 Apr 2017 - 12:41 am | सत्यजित...
खासंच जमले आहे हे खवय्या विडंबन!
जरा घाईत पोस्टलेत का?की विडंबन म्हणून फारच लाईटली घेतलेत?अजून खुस-खुशीत,रस-रशीतपणे खुलवता आले असते सहज!
मतल्यात,
नका रांधू असे उसणे,मला खवळून खाऊ द्या..
नंतरच्या शेरात,
मुलायम लागतो हलवा...(नुसताच खाल्ला तर!)पुरी कवळून खाऊ द्या!
केक खाता येईल,काॅफी प्यावी लागेल! शेर ढेर!
'तर्री + करी'ने फिकेपणाच येईल!
फिक्या,बेरंग खाण्याची कुठे उरते खूण मागे?
तांबडी तेज तर्री..भाकरी मिसळून खाऊ द्या!
खाऊ द्या या रदिफेस 'उधळून' हा काफिया न्याय देत नाही असे वाटते!'खवळून' पुन्हा वापरला असता तरी चालले असते!
लस्सीच्या शेरांत वृत्त भंगते आहे!
नको काजू?नको पिस्ते? पुरे डाएट,जाऊ द्या
जरा आईस्क्रीम-लस्सी,मला मिसळून खाऊ द्या!
असो!पण एक छान विडंबन दिलेत वाचायला! त्यातही माझ्या गझलेचे! हा अनुभव 'मिपा'वरच पहिल्यांदा अनुभवायला मिळाला! पण याआधीच्या एक-दोन रचना 'विडंबन' म्हणावे अश्याही वाटल्या नव्हत्या मला! हे विडंबन मात्र झक्कासंच!
21 Apr 2017 - 1:29 am | सत्यजित...
'जरा आइस्क्रीम लस्सी-मधे ढवळून खाऊ द्या!'*
21 Apr 2017 - 9:34 pm | चतुरंग
मूळ विडंबन केवळ दहा मिनिटात केले होते.
साफसफाई जरा अधिक करायला हवी होती हे खरे म्हणजे वृत्तभंग टाळता आला असता....
वृत्तबद्ध विडंबन, वानगीदाखल सुमंदारमालेतल्या एका गजलेचे हे विडंबन बघा ...
http://www.misalpav.com/node/10819
21 Apr 2017 - 8:17 am | मितान
वाह वाह !!! :))
21 Apr 2017 - 8:51 am | माहितगार
:) मस्त आहे !
21 Apr 2017 - 11:02 am | टवाळ कार्टा
खिक्क
21 Apr 2017 - 11:36 am | वेल्लाभट
जबराट ! जबराट आणि निव्वळ जबराट ! ! ! ! !
अशी विडंबनं वाचून मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो :)
21 Apr 2017 - 11:46 am | सूड
भारीच!!
21 Apr 2017 - 11:56 am | वेल्लाभट
आमची भर :)
कसा यावा स्वाद गाडीचा घरातील भोजनाला
हायजिनची घोर चिंता जरा नकळून खाऊ द्या
होऊदे जेवण तुडुंब तडस लागू दे जराशी
एक मोदक शेवटाचा जरा विव्हळून खाऊ द्या
अन्न देव, भक्त आम्ही, सेवनातच पूजन
भक्तिभावे घास घास जरा चघळून खाऊ द्या
- वेल्लाभट
21 Apr 2017 - 4:26 pm | अरूण गंगाधर कोर्डे
कविता गंमतशीर आहे. अशा रितीने जुळवणे कठीण आहे. पु.ले.शु.