२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं.
म्हटलेच होते...
होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते
धीर देती ते जणु हरलो पुरा मी
मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते
एक मिटते वाट अन खुलतेही एक
प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते
वाटली होतीच भीती या क्षणाची
मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते
वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व
आसवांना मी प्रलय म्हटलेच होते
- अपूर्व ओक
२०-३-१७
प्रतिक्रिया
21 Mar 2017 - 2:07 pm | शार्दुल_हातोळकर
सुरेख !!
21 Mar 2017 - 4:44 pm | पैसा
आवडली
21 Mar 2017 - 5:12 pm | समाधान राऊत
धीर देती ते जणु हरलो पुरा मी
मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते
21 Mar 2017 - 5:52 pm | निनाव
//वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व
आसवांना मी प्रलय म्हटलेच होते // हे खूपच आवडली कविता.. खरे तर गजलच.
21 Mar 2017 - 8:15 pm | स्रुजा
सगळ्यात शेवटी तुझं नाव येतं कवितेचा भाग बनून ती तुझी सवय ( का नाईलाज ;)) आवडेश ! गजल सुरेख !
22 Mar 2017 - 7:30 am | वेल्लाभट
धन्यवाद
असं नाही काही. ग़ज़लेत शेवटच्या शेरात 'शायर का तखल्लुस' असण्याचं चलन म्हण, पद्धत म्हण, स्टाईल म्हण पूर्वीपासून आहे. अशा आणि प्रामुख्याने शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात.
माझा आपला तसा प्रयत्न असतो इतकंच. :)
21 Mar 2017 - 9:53 pm | संदीप-लेले
छान
21 Mar 2017 - 10:38 pm | सत्यजित...
आवडली गझल!
21 Mar 2017 - 11:25 pm | पिलीयन रायडर
होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते
वाह!!!
21 Mar 2017 - 11:34 pm | चतुरंग
वेगळीच आहे गजल.
आमचा नजराणा इथे आहे! ;)
-रंगा
22 Mar 2017 - 7:18 am | वेल्लाभट
शार्दुल, समाधान, निनाव, पैतै, फुत्कार, सत्यजित, पिरा, चतुरंगभाऊ धन्यवाद
22 Mar 2017 - 9:57 am | चौकटराजा
गजल विचारपूर्वक पणे लिहिलेली सबब अपूर्व !
24 Mar 2017 - 6:10 pm | वेल्लाभट
धन्यवाद चौ.रा.काका
22 Mar 2017 - 7:03 pm | विशाल कुलकर्णी
सुरेख गझल ! राग येणार नसेल तर एक सुचवू? शक्यतो सुट घ्यायचा मोह टाळता येतो का पाहा. मीहि, प्रीति यात हि किंवा ति हे दीर्घ हवेत. फार काही फरक नाही पड़त पण गझलेचा निर्दोषपणा कमी होतो. आगावूपणाबद्दल क्षमस्व _/!\_
24 Mar 2017 - 6:02 pm | वेल्लाभट
बरोबर आहे. पुढील वेळी नक्की हे टाळण्याचा प्रयत्न करतो.
22 Mar 2017 - 7:38 pm | सूड
अभय सोडून काहीही व्हा वेल्लाकाका.
22 Mar 2017 - 8:44 pm | विशाल कुलकर्णी
अगदी अगदी :P
24 Mar 2017 - 6:03 pm | वेल्लाभट
हाहाहा. नाही रे बाबा.