सामाजिक उपक्रम - २०१७

निशदे's picture
निशदे in जनातलं, मनातलं
9 Mar 2017 - 1:41 am

नमस्कार,
मित्रपरिवाराच्या साथीने गेली ७ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहोत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो.

उपक्रमाविषयी थोडेसे:
माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. देणग्या मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये मागविण्यात येतात. देणग्या त्या त्या संस्थांच्या खात्यात जमा करावयाच्या असतात व संस्थेने त्यातून खरेदी केलेल्या वस्तूंची पावती व फोटो देणे त्यांना बंधनकारक असते. त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते. थोडक्यात सांगायचं तर हा उपक्रम गरजु संस्था व देणगीदार ह्यांच्यातले एक माध्यम आहे. आम्ही स्वयंसेवक कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करीत नाही. या उपक्रमाचे धागे आम्ही मायबोलीवर यापूर्वी तयार केलेले होते. यावर्षापासून असाच धागा मिपावरही सुरू करायची आमची इच्छा होती.

आतापर्यंत खालील संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली आहे - -
१. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग २. शबरी सेवा समिती, ता. कर्जत ३. सुमति बालवन, पुणे ४. अनामप्रेम, अहमदनगर ५. माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला - सोलापूर, ६. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ ७. परिवर्तन संस्था, डोंबिवली 8. सावली सेवा ट्रस्ट, पुणे इत्यादि...

यावर्षी निवडलेल्या संस्थांना गरज असलेल्या गोष्टींची यादी मागवण्यात आली होती.
देणग्या खालील पद्धतीने स्वीकारल्या जातील,
१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.
२) एप्रिलपासून, किती देणगी मिळत आहे ते पाहून सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतून त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतून काय सामान घेता येईल, ते कोठून घेता येईल वगैरे ठरवले जाईल.
३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायची, संस्थेच्या अकाउंटची माहिती इत्यादी कळवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा करु शकता. संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथेही लिहिण्यात येईल.
४) देणगीदारांनी देणगी पाठवल्यावर स्वयंसेवकांपैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे महत्वाचे आहे. त्याप्रमाणे संस्थेला कळवले जाईल.
५) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडून खातरजमा केली जाईल.
६) सर्व जुळले की मग वस्तू विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.
७) वस्तू खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.

ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे. बाकी काम उपक्रमाचे स्वयंसेवक करतील.
काही संस्था अभारतीय चलन पण स्वीकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी संपर्क किंवा विपुद्वारे स्वयंसेवकांशी संपर्क साधावा. जे मिसळपावचे सभासद नाहीत परंतु मदत करण्यासाठी उत्सुक आहेत ते सुनिधीशी lataismusic@yahoo.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

स्वयंसेवकः
अतरंगी, अरुंधती, निशदे
, सुनिधी, कविन, महेंद्र ढवाण, प्राची

या वर्षीच्या संस्था:
या वर्षीच्या उपक्रमाद्वारे मदत केल्या जाणार्‍या संस्था खालीलप्रमाणे आहेत.
(सर्व संस्थांची माहिती पहिल्या काही प्रतिसादांमध्ये टाकली आहे)
१. सहारा अनाथालय, गेवराई, बीड
२. सुहीत जीवन ट्रस्ट, पेण
३. अनुराधा किल्लेदार प्रशाला, सांगली
४. घरकूल परिवार
५. माउली सेवा प्रतिष्ठान

मागील काही वर्षी केल्या गेलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल खाली वाचता येईल - -
सामाजिक उपक्रम २०१६
सामाजिक उपक्रम २०१५
सामाजिक उपक्रम २०१४
सामाजिक उपक्रम २०१३
सामाजिक उपक्रम २०१२
सामाजिक उपक्रम २०११
सामाजिक उपक्रम २०१०

मागील काही वर्षातल्या कामाचा आढावा खाली वाचता येईल
सामाजिक उपक्रम २०१६- आढावा
सामाजिक उपक्रम २०१५- आढावा
सामाजिक उपक्रम २०१४- आढावा

उपक्रमाबाबत कसलेही प्रश्न असल्यास प्रतिसादात अथवा स्वयंसेवकांना व्य.नि. करावा.
*मिपा व्यवस्थापनाचा सदर उपक्रमाशी कसलाही संबंध नाही.*

समाजआरोग्यऔषधोपचारप्रकटन

प्रतिक्रिया

निशदे's picture

9 Mar 2017 - 1:42 am | निशदे

संस्थेचे नाव:- सहारा अनाथालय.
संस्थेचा पत्ता:- सहारा अनाथालय परिवार, बालग्राम, गेवराई, बीड.
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ८५ मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम.
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
1) 10 बंक बेड (अंदाजे खर्च 60,000 ते 65,000 रु.).
2) 3 कपाटे (अंदाजे खर्च 18,000 ते 19,500 रु.).
3) 2 पाण्याच्या टाक्या 2000 लिटर क्षमतेच्या (अंदाजे खर्च 18,000 रु.).
4) सोलर वॉटर हिटर (अंदाजे खर्च 25,000 रु.)
5) वॉटर कुलर
6) इनव्हर्टर 300 के व्ही. (35000)
4) किराणा साहित्य
१. तूरडाळ 100 किलो.
२. खाद्य तेल 60 किलो.
३. निरमा 30 किलो.
४. कपडा साबण 2 बॉक्स.
५. मटकी 30 किलो.
६. बाथसोप 16 डझन
७. पोहा 50 किलो.
८. शेंगदाणा 50 किलो.
९. साखर 50 किलो.
१०. वाटाणा 25 किलो.
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- संतोष गर्जे, +९१९७६३०३१०२०
नोंदणी क्रमांक :- Mumbai Public Trust Act 1950-F- 13146 Beed.
वेबसाईट:- http://www.aaifoundation.org/

निशदे's picture

9 Mar 2017 - 1:43 am | निशदे

संस्थेचे नाव:- सुहित जीवन ट्रस्ट
रजिस्ट्रेशन नंबर : ऐ-४२८ (रायगड),तालुका पेण, जिल्हा रायगड
संस्थेचा पत्ता: सुहित जीवन ट्रस्ट, दामोदर नगर, चिंचपाडा, पेण ४०२ १०७
ता. पेण, जिल्हा: रायगड

संस्थेचे कार्य:
संस्थेचा मुख्य उद्देश: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे पुनर्वसन करणे.
१) सुमंगल विद्यालय: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलामुलींसाठीची ही शाळा जवळपासच्या ४१ गावांमधल्या मुला मुलींच्या शिक्षणाची गरज पूर्ण करते. आर्थिकदृष्ट्य़ा मागास असलेल्या मुलांसाठी नि:शुल्क सेवा दिली जाते. घरातून शाळेत ने आण करण्यासाठी शाळेची स्वत:ची बस सेवा उपलब्ध आहे.
२) एकलव्य वोकेशनल केंद्र (एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र) : येथील विकलांग मुलांना स्वावलंबी बनवण्याचे काम हे केंद्र करते. २०१०मध्ये ११ मुलांना घेऊन सुरू झालेल्या या केंद्रात आज ४४ मुलेमुली आहेत.
३) लाईट हाऊस स्पेशल टिचर्स ट्रेनिंग सेंटर (विशेष शिक्षक प्रशिक्षण केंद्र) : मानसिक विकलांग शाळांमधून शिकवण्यासाठी ज्या विशेष शिक्षकांची गरज भासते त्याकरिता या विषयातील तज्ज्ञ शिक्षक तयार करण्याचे काम येथील डिएडच्या अभ्यासक्रमात होते. (रिहॅबिलिटेशन काऊंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची या अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली आहे.)

आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे.

संपर्क व्यक्ती:- डॉ. सुरेखा पाटील - Ph.D in Education (Mental Retardation)
09892191918/ 09423379210/ 02143-253085
e-mail :- suhitjeevantrust@gmail.com
dr.surekha26@gmail.com
sjt3pen@gmail.com

वेबसा‌ईट : www.suhitjivan.org

संस्थेला यावर्षी ज्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी खालीलप्रमाणे:.
1. Sound System with Amplifier 1 Pair: 45,000/-
2. Therapy Ball (Big): 1: 1,000/-
3. Folding C P Chair: 1: 12,500/-
4. Balance Beam: 1 Set: 20,000/-
5. Bolster: 2 Pair: 2,000/-
6. Therapy Mirror: 2 Pc: 4,000/-
7. static cycle: 1: 15,000/-
8. Balance Board: 1: 5,000/-
(Total) : 1,04,500/-

रुस्तम's picture

9 Mar 2017 - 3:25 pm | रुस्तम

वेबसा‌ईट: http://www.suhitjeevan.org/

संस्थेचे नाव:- अनुराधा किल्लेदार नवजीवन प्रशाला
संस्थेचा पत्ता: रामनगर, सांगली -कोल्हापूर रस्त्यालगत, सांगली.

संस्थेचे कार्य: या भागात बहुतांश वस्ती भाजी फळे विकणारे, बांधकाम मजूर आणि असेच किरकोळ उद्योग मजुरी करणारे यांची आहे. १९९८पासून काही ध्येयवादी शिक्षकांनी इथे ही प्राथमिक शाळा सुरु केली. सर्व जातीधर्माच्या मुलांना भारतीयतेचे संस्कार मिळावेत अशा दृष्टीने शाळेचे उपक्रम योजले जातात. आपण सांगलीस याल तेव्हा ही शाळा पाहण्यासाठी आवर्जून भेट द्यावी.

आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे.

संपर्क व्यक्ती:- श्री. गडगे, श्री. सागर फडके
09890321103 (Gadage) / Cell – 09423869385, 0233-2332385
e-mail :- sagar.ca@gmail.com

वेबसाईट : सध्या काम सुरु केले आहे.

संस्थेला यावर्षी खालील अतीमहत्वाच्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी:
१. भरपूर चित्रे असलेली पुस्तके अथवा एन्सायक्लोपिडीया खरेदी करणे (अंदाजे रु.४,५००/- ते ५,०००/-)
२. स्थानिक एन्.जी.ओ. च्या मदतीने आरोग्यशिबीर घेऊन, वैद्यकीय सल्ल्याने मुलांना आहारपूरके व औषधे वितरित करणे. (अंदाजे रु.१५,०००/- ते रु. २०,०००/-)
३. १००-१५० मुलांसाठी नवीन शालेय वर्षासाठी दप्तर आणि गणवेश खरेदी करणे. . (अंदाजे रु.१५,०००/-)

संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे's picture

9 Mar 2017 - 1:48 am | निशदे

संस्थेचे नाव:- घरकुल परिवार
पत्ता:- आनंद नगर, पिंपळगाव बाहुला, त्र्यंबक रोड, नाशिक 422213.
संस्थेचे कार्यक्षेत्र::-
प्रौढ मतिमंद महिलांच्या पुनर्वसन आणि सबलीकरणासाठी निवासी व्यवस्था
मतिमंद महिलांचे सक्षमीकरण
मतिमंद स्त्रियांचा नैसर्गिक कल आणि उपजत गुण ओळखून विकसित करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे.
ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे अशा मतिमंद स्त्रियांना सुरक्षित व प्रेमळ निवारा देणे.

संस्थेचे प्रकल्प व आर्थिक गरजा : संस्थेकडे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेशासाठी विनंती येत असते (सध्याची प्रतीक्षा यादी 12 जणींची आहे ). संस्था निवड व्यवस्था अजून 50 जणींसाठी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या नवीन निवासी व्यवस्थेसाठी संस्थेला खालील गोष्टींची गरज आहे.
१) जेवणाची टेबले - 25. (प्रति टेबल 15,000 रु. खर्च)
२) जेवणाच्या खुर्च्या - 50 (प्रति खुर्ची 2,000 रु. खर्च)
३) बेड - 50 (प्रति बेड 3,000 रु. खर्च)

रजिस्ट्रेशन क्रमांक : f 9220

आयकरातील सवलत:- 80G

संपर्क : सौ विद्या फडके +919860552324
वेबसाईट :- www.gharkulparivar.org
Documentary: https://www.youtube.com/watch?v=4Q5g2j7w-Ok

संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे's picture

9 Mar 2017 - 1:49 am | निशदे

संस्थेचे नाव:- माऊली सेवा प्रतिष्ठान
संस्थेचा पत्ता: शिंगावे, अहमदनगर, (अहमदनगर-शिर्डी रस्त्यावर)

संस्थेचे कार्य: माऊली सेवा प्रतिष्ठान समाजाने नाकारलेल्या मनोरुग्ण स्त्रिया व त्यांच्या मुलांसाठी काम करते. डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे यांनी सुरू केलेल्या या संस्थेने आजच्या घडीला सुमारे १०५ स्त्रिया व १४ मुले यांच्यासाठी कायम निवासाची व्यवस्था केली आहे. मनोरुग्ण स्त्रियांना अन्न, वस्त्र, निवारा व काम मिळवून देण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठान झटत आहे.

आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे.

संपर्क:- डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे
फोन / मोबाईल क्र. : +91-9860847954
ईमेल: rajendra.dhamane@gmail.com

वेबसाईट : http://msp.org.in/index.htm

संस्थेला यावर्षी खालील महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे:
सोनी कंपनीची ऑडिओ सिस्टीम (MHC-v440 ) ही सर्वसमावेशक सिस्टीम माऊली सेवा प्रतिष्ठानला विकत घ्यायची आहे. सदर उपकरणाचा उपयोग महिलांना मुख्यत्वेकरून संगीतामार्फत थेरपीसाठी तसेच करमणुकीसाठी होईल. यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा होते असा डॉक्टरांचा अनुभव आहे.
किं. रु. २८,५००/-

अतिशय स्तुत्य उपक्रम. नक्कीच प्रसार केला जाईल.

निशदे's picture

9 Mar 2017 - 10:07 pm | निशदे

धन्यवाद एस.
कृपया अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. अशा संस्थांना मदत आपणच करू शकतो.

निखील आता मी ही आलेय इथे. नवीन असल्याने गोंधळ होईल सुरवातीला पण जमेल तशी अपडेट्स द्यायला मदत इथेही करेनच :)

अरुंधती's picture

9 Mar 2017 - 10:36 am | अरुंधती

उपक्रमाचा धागा पाहिला. उत्तम सुरुवात झाली आहे. :)

महेन्द्र ढवाण's picture

9 Mar 2017 - 10:37 am | महेन्द्र ढवाण

निखिल - हे अगदी मस्त झाले आत्ता आपण थोड्या जास्त संस्थांना मदत मिळवुन देऊ शकू

महेन्द्र ढवाण's picture

14 Mar 2017 - 1:18 pm | महेन्द्र ढवाण

चला तर चंगली झाली सुरवात

नमस्कार मिपाकरहो,
सांगायला आनंद वाटतो की या धाग्यामुळे सहारा अनाथालय संस्थेस लंडनस्थित काळे ट्रस्टकडून भरघोस देणगी मिळाली आहे. सदर ट्रस्टकडून मिपाकर अनिवासी यांचे माध्यमातून सहारा अनाथालयास पंचावन्न हजार पाचशे पंचाहत्तर रुपये देणगीदाखल मिळाले. या रकमेतून मुलांसाठी बंक बेड्स तयार करवून घेतले असून बेड्सचे फोटो व देणगीची पावती देणगीदारांपर्यंत पोचली आहे.
काळे ट्रस्ट व अनिवासी यांचे मन:पूर्वक आभार! :)

अरुंधती's picture

22 Jun 2017 - 12:37 pm | अरुंधती

वरील संस्थांपैकी सर्वच संस्थांना देणगीदारांनी देणग्या देऊ केल्या आहेत हे नमूद करायचे राहून गेले. :)

एस's picture

22 Jun 2017 - 3:33 pm | एस

ग्रेट! खूपच छान!

आदूबाळ's picture

22 Jun 2017 - 2:05 pm | आदूबाळ

वा! अभिनंदन!

अरुंधती's picture

23 Jun 2017 - 5:42 pm | अरुंधती

प्रतिसादकांना मन:पूर्वक धन्यवाद!