एस्कीमो

वडगावकर's picture
वडगावकर in जनातलं, मनातलं
25 Feb 2017 - 2:22 pm

काल दुपारची गोष्ट.... साधारण साडेतीन चार.....

आळशीपणाची दुलई अंगावर पांघरून मस्तपैकी पुस्तक वाचत लोळत पडलो होतो....

आज आंघोळ होणार आहे की नाही?....कमरेवर दोन्ही हात ठेऊन मान तिरकी करत तिने विचारलं
खरं म्हणजे तो प्रष्ण नव्हता....
ती धमकी होती.....

काळ आंघोळ केली होती ना!...आज नाही केली तर नाही चालणार का?
काल जेवण केलं होतं ना,मग आज केलं नाहीतर चालणार नाही का?...हातात टॉवेल कोंबत तिने विचारलं

मी आता पुढच्या जन्मी एस्कीमोच होणार आहे....मी हसत म्हणालो
काहो बाबा?...एक्सिमो कशाला?...छोटे नवाब का एंट्री के साथ सवाल....

आबे येडे....वहां पे ईत्ती ठंडी मे कोयी एक्सिमो नहाता होगा क्या ?...
वा,बाबा मी पण तुमच्या बरोबर एक्सिमो होणार....त्याने लगेच आपली पण ऍडव्हान्स बुकींग करून टाकली....

एक्सिमो होऊन कायमस्वरूपी आंघोळीला कट मारायची आयडीया त्याला भयंकर आवडली असावी....

कपाळावर हात मारत ती हतबलपणे हसली....आणी ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटली....

तो शब्द मी लगेच ओळखला....
बेशरम....
आता, इतक्या वर्षात एव्हडा गेस तर येतो ना राव....

तिने दिलेलं अवॉर्ड मी लगेच त्याच्या बरोबर शेअर करून टाकलं....
फिफ्टी फिफ्टी...एक पर्सेंट भी कम नही...
मनावरचं ओझं लगेच पन्नास टक्क्यांनी हलकं झालं....

आपण नेहमी ईतके सुखी आणी आनंदी का असतो ह्या रहस्याचा शोध लागला

निर्लज्जम सदासुखी....

गालातल्या गालात हसत मी बाथरूम चं दार ढकललं.....

नाट्यविचार

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

25 Feb 2017 - 3:12 pm | संजय क्षीरसागर

.

हा पर्याय निवडायचा राहीला वाटतं !

वडगावकर's picture

25 Feb 2017 - 3:28 pm | वडगावकर

नसीहत के लिये शुक्रिया जनाब,लेकिन ये बाल कथा के साथ साथ बाल के बाप की भी कथा है :-)

अभ्या..'s picture

25 Feb 2017 - 4:35 pm | अभ्या..

संजयजी,
३.०१ ला जनातलं मनातलं ला तुमचा लेख तयार करत होतात, अजून आला नाही हो,
शिवाय एचपीची सर्विस भंगार हो गॅसला. बीपीसीएल भारी, तुमच्या नावावर करा वाटल्यास एक एक्स्ट्रा टाकी. ;)
.
(हल्के घ्या बरं का)

संजय पाटिल's picture

25 Feb 2017 - 5:49 pm | संजय पाटिल

३.०१ ला जनातलं मनातलं ला तुमचा लेख तयार करत होतात, अजून आला नाही हो
त्याचाच तर स्क्रीन शॉट आहे हा..
बाकी सर अजून विंडोज एक्स्पी वापरतात हे एक निरीक्षण नोंदवतो आणि खाली बसतो.

त्यात काय पाटील, एक्सपी भारीय हो. , मी पण वापरतो.

सतिश गावडे's picture

26 Feb 2017 - 10:03 am | सतिश गावडे

सरांचा याहूमेल आयडीसुद्धा दिसतोय.

बाय द वे, एक्सपी खरंच भारी होती. मात्र उद्योगांना सतत नविन काही आणत राहावं लागतं. एखादे उत्पादन कितीही चांगले असले आणि कितीही खपत असले तरी उद्योग त्यावरच थांबत नाहीत. हुंडाईची सँट्रो तुफान चालली तरीही त्यांनी "i xx" आणली.

संजय पाटिल's picture

26 Feb 2017 - 9:46 pm | संजय पाटिल

सहमत...

ह्याबाबतीत एकदा एका वाहन निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते की जेव्हा एखाद्या गाडी बनवणाऱ्या कंपनीचे एखादे मॉडेल खूप जास्त लोकप्रिय होते तेव्हा त्याचा फटका त्या कंपनीच्या बाकीच्या मॉडेलच्या विक्रीला बसतो. त्यामुळे असे लोकप्रिय मॉडेल बऱ्याचदा बंद देखील करावे लागते कारण त्यामुळे इतर मॉडेल्सला बाजारात मागणी वाढते.

उगा काहितरीच's picture

25 Feb 2017 - 4:02 pm | उगा काहितरीच

गालातल्या गालात हसत मी बाथरूम चं दार ढकललं.....

हे महत्वाचं !

वडगावकर's picture

26 Feb 2017 - 9:52 am | वडगावकर

मी जर बाथरूम चं दार ढकललं नसत तर दारासकट आत ढकलल्या गेलो असतो :-)

सतिश गावडे's picture

26 Feb 2017 - 10:04 am | सतिश गावडे

हे असं खुसखुशीत, हलकंफुलकं नसतं लिहायचं हो. मिपावरील लेखन कसं गंभीर आणि लोकांना अजिबात न कळणारं हवं.

वडगावकर's picture

26 Feb 2017 - 11:39 am | वडगावकर

ओहो....असंय का?....हे तर माहीतच नव्हतं राव
आता उद्या पासून पायथॅगोरियन फिलॉसॉफी,थिऑसॉफी,क्वांटम मेकॅनिक्स या विषयावर लेख लिहायला चालू करतो....
मग समीक्षेच्या ठेकेदारांना करुद्या समीक्षण...मजा आयेगा खेल मे
फुल्टू,भाऊ पाध्ये चा वासूनाकाचं करून टाकू :-)

अभिदेश's picture

28 Feb 2017 - 1:30 am | अभिदेश

तुम्ही आंघोळीचा उत्सव नाही केला त्यामुळे ही बालकथा वाटली असेल सं. क्षी. ना...

बाबौ....
आंघोळीचा उत्सव?,ते काय असतं?
म्हणजे लिरिल च्या जाहिराती मधल्या सारखं किंवा राम तेरी गंगा मैली मधल्या गंगा सारखं चौकात वगैरे उभं राहून आंघोळ करायची कि काय? :-)
जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावं,म्हणजे तसा प्रयत्न करून बघता येईल :-)

संजय पाटिल's picture

28 Feb 2017 - 10:58 am | संजय पाटिल

सोडून ध्या... फार गहन विषय आहे तो!
बायदवे खुसखुशीत लेख...

संजय क्षीरसागर's picture

28 Feb 2017 - 12:48 pm | संजय क्षीरसागर

`स्नानोत्सव : सामान्यांचा परमानंद' असा लेख लिहीणार होतो. पण म्हटलं जाऊं द्या पब्लिक आधीच रिंगोत्सव आणि भोजनोत्सवानं हैराणे त्यात अजून भर नको !