मी जालावरची चित्रपटाची परीक्षणे वाचत नाही फारशी... पण टीव्हीवरती काही चॅनलवरती या चित्रपटाविषयी संमिश्र परीक्षणे पाहिली, काही समीक्षकांनी चित्रपटाला मजबूत झोडलेलाही पाहिले..... त्यामुळे चित्रपटाविषयी अपेक्षा आधीच कमी झालेल्या होत्या.... तरीही एका मित्राच्या आग्रहाने सिनेमा पहायचा योग आला...
... अपेक्षा अगदीच खाली असल्याने मला चित्रपट आवडला, असा निष्कर्ष मी काढला.......
....प्रियदर्शनचा सिनेमा म्हणजे कुठल्याशा मल्याळम किंवा तमिळ सिनेमाची फ्रेम टू फ्रेम कॉपी असणार हे खरंच... तसंच आहे...
गोष्ट साधीच... बिल्लु ( इरफान खान) नावाच्या एका गरीब कर्जबाजारी केशकर्तनालयाच्या मालकाच्या गावात साहिर खान ( शाहरूख) हा नट शूटिंग करण्यासाठी येतो आणि गाववाल्यांचा काही कारणाने असा समज होतो की साहिर हा बिल्लुचा लहानपणीचा दोस्त आहे... आणि लोक बिल्लुला डोक्यावर घेतात , तो " नको नको , असं समजू नका "म्हणत असतानाही साहिरशी भेट घडवण्यासाठी त्याला गळ घालतात... पोरांच्या शाळेमध्ये हेडमास्तरीणबाई काहीही करून साहिरला शाळेत आणा तर तुमच्या पोरांची फी माफ होईल, असल्या अटीही घालतात्...त्यातून थोडासा गोंधळ वगैरे.... खास प्रियदर्शन स्टाईल ...... शेवटी ही कृष्ण - सुदामा टाईप गोष्ट पूर्ण होते
...
सिनेमात वैताग आणणार्या गोष्टीही पुष्कळ आहेत...
१.प्रियदर्शनचा ( बर्याचदा तो दक्षिणी भडकपणा डोक्यात जातो... ..).... आता सवयच झालीय म्हणा...
२.शाहरूख खान सुपरस्टार म्हणून त्याचे अति कौतुक माजवलेले दाखवलेले आहे... कंटाळा आला.
३.शाहरूखची गाणी अत्यंत टुकार आहेत....( एक से एक सुंदर ललना उदा.दीपिका करीना प्रियंका सोबत असल्या म्हणून काय झालं?) गोष्टीत अडथळा म्हणून अजिबात म्हणजे अजिबातच बघवली नाहीत...
पण इतक्या सगळ्या वाईट गोष्टी असूनही मला सिनेमा सुसह्य वाटला...
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हीरो इरफान खान...हा सिनेमा शाहरूख खानचा नाहीच, म्हटलं तरी चालेल......
इरफान खान मला नेहमी आवडतोच पण इतर ठिकाणी तो माजोरडा वगैरे असतो, इथे अगदी उलट... अप्रतिम काम केलं आहे त्याने ... लारा दत्ताचेही काम योग्य.
पाहणार असतील त्या लोकांसाठी स्पॉइलर ऍलर्ट :
१.बिल्लु साहिरला फोन करण्यासाठी टेलिफोन बूथमध्ये जातो, गावकरी बाहेरून त्याचं बोलणं ऐकत आहेत... आणि तिकडे त्याला फोनवर असिस्टंटच्या शिव्या पडत आहेत...पण तो चेहर्यावर काही दाखवत नाहीये, हा सीन झकास आहे...
२. शाळेतला साहिरच्या भाषणाचा सीन इरफानने दूरवरून ऐकणे हा सीनही छान...
३. आणि शेवटचा आधीचे गाव सोडल्यानंतर मी तुला परत भेटायचा का प्रयत्न केला नाही ते सांगणारा इरफान मस्तच...
असो...प्रियदर्शनच्या सिनेमात मराठी अभिनेतेही बरेच दिसतात, तेही आहेतच..
१. रसिका जोशी - हेडमास्तरीण
२. अतुल परचुरे - मला ऍक्टिंग येते, रोल द्या म्हणणारा गेस्ट हाउस मॅनेजर .. याला दोन मोठे सीन आहेत.
३. मनोज जोशी - शाळेच्या संचालक मंडळापैकी एक
४. अमेय वाघ - ( हा पुण्याचा तरूण अभिनेता ... बी एम्सीसी ची जोरात धावलेली सायकल एकांकिका आणि लूज कंट्रोल नाटकात याच्या चांगल्या भूमिका होत्या).. रोल अगदीच नगण्य छोटासा असला तरी त्याला पाहून मजा वाटली..
थोडक्यात काय, कंटाळवाणी गाणी आणि तोच तोच शाहरूख सहन करायची तयारी असली तर मात्र चित्रपट पाहण्यास हरकत नाही...
प्रतिक्रिया
16 Feb 2009 - 12:27 am | प्राजु
चांगला वाटला. (कारण या आधी चांदनी चौक टू चायना ....... हा सहन केला होता अक्षरशः) त्यामानाने या सिनेमातून बर्या प्रमाणात करमणून झाली.
राजपाल यादव ची एन्ट्री आवडली. गाडीचे दार घेऊन सायकल वर मागे बसून राजपाल यादव निघालेला सीन.. छान आहे तो.
इरफान खान.. जबरदस्त. त्याची बायको झालेली लारा दत्ता.. बरी आहे.
एकूण चित्रपट एकदा बघावा असा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Feb 2009 - 4:42 am | भाग्यश्री
अरे वा.. पाहायला पाहीजे.. अमेय वाघ बद्दल खूप ऐकून आहे. या पिक्चरच्या निमित्ताने त्याचा अभिनय पाहता येईल.
http://bhagyashreee.blogspot.com/
17 Feb 2009 - 9:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मास्तर, परीक्षणाबद्दल आभार. आता पिच्चर बघायला हरकत नाही असं दिसत आहे. पण भडकमकर मास्तर इश्टाईल तुफान फटकेबाजी नाही मिळाली या वेळेस! :-(
अपडेटः मास्तच पिच्चर पाहीला, इरफानसाठीच पाहिला. मस्तच आहे ... इरफान.
प्रियदर्शनचा पिक्चर वाटत नाही कारण शेवटी अतिशय बिनडोक मारामारी नाही.
अदिती
16 Feb 2009 - 8:47 am | परिकथेतील राजकुमार
मास्तर परिक्षण आणी निरिक्षण एकदम मस्तच.
नाभिक समाजाच्या लोकांनसाठी खास शो आयोजीत करुन शाहरुखने वेगळ्या प्रकारे ह्या चित्रपटाची प्रसिद्धी चालु केलीच होती, त्यात काल/परवा त्याच्या घरावर फेकल्या गेलेल्या बाटल्यांच्या बातमीने अजुन वाढ होइल असे वाटते.
प्रियदर्शन हा तसा खास मल्टिप्लेक्सचे दर्शक डोळ्यासमोर ठेउन चित्रपट न बनवणारा माणुस , त्यामुळे त्याचे चित्रपट बघताना उगाच कारण नसताना केलेला चकचकीतपणा आणी पैशाची उधळपट्टी नसते असे आपले एक माझे मत आहे. पण कधी कधी उगाचच त्याने दाखवलेल्या गावांना एक खास दाक्षीणात्यी टच असतो असे राहुन राहुन वाटते.
चित्रपट बघितलाच तर इरफान खान साठीच बघणार हे निश्चीत. कारण शाहरुख ह्या 'प्रदर्शनीय वस्तुची' आता खरच एलर्जी झाली आहे. दुरचीत्रवाणी संचावर शाहरुख, रेडिओचा आवाज शाहरुख, रस्त्याच्या १० पैकी ६ होर्डिंग्जवर शाहरुख. नको नको केलय मेल्यानी. कधी कधी वाटते 'थोडा और विश करो, शाहरुख को फिनीश करो.' अमेय वाघ या चित्रपटात आहे हे ऐकुन खरच बरे वाटले. श्रेयश तळपदे सारखे तरुण कलाकार हिंदी चित्रपटात आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेच आहेत, त्यात अमेयचीही भर पडावी अशी आशा. अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी सारख्यांनाही लवकरात लवकर मोठ्या संधी मिळो ही प्रार्थना.
अरे मजनु थोडा का आम्हा भेटला असतास तु
एकही आसु खरोखर गाळला नसतास तु
एक नाही लाख लैला मिळवील्या असत्या आम्ही
मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही..
आमचे राज्य
16 Feb 2009 - 11:43 am | निखिल देशपांडे
चित्रपट आवडला....... इरफान खान चा अभिनय आवडला.......
एका सिन मध्ये मराठि दिनदर्शिका दाखवलि आहे.... उत्तर प्रदेश मधल्या गावत मराठि दिन्दर्शिका बघुन मजा वाटलि....
16 Feb 2009 - 1:24 pm | दगड
आधीचे गाव सोडल्यानंतर मी तुला परत भेटायचा का प्रयत्न केला नाही ते सांगणारा इरफान मस्तच...
हा सीन खुपच आवड्ला... माझ्या पण डोळ्यात पाणी आल होत...
17 Feb 2009 - 3:50 pm | बाप्पा
मरठी सोडुन मी सहसा चित्रपट पाहत नाही. परंतु आपल्या परीक्षणानंतर आता पाहायला हरकत नाही असे वाटते. तसं शाहरूख खान (हाकल्या) म्हटले की मळमळुन यावे एव्हडा त्याचा अभीनय वाह्यात असतो. तरीही प्रयत्न करु पाहण्याचा.
17 Feb 2009 - 4:44 pm | चाणक्य
पु.ल. देशपांडेंच्या 'तुम्हाला पुणेकर व्हायचंय की.....' मधल्या पुणेकर शिक्षकाचं (येरगुंडकर च नाव होतं ना ?) भाषण आठवलं.
मास्तर ह.घ्या. ;)
17 Feb 2009 - 5:13 pm | मेघना भुस्कुटे
खरंय, वर कुणीतरी म्हटलंय तसं, 'मास्तर टच' नाहीय! पण आता सिनेमा पाहावा लागणारसं दिसतंय. इरफान मला प्रचंड आवडतो हे आणखी एक कारण.
17 Feb 2009 - 7:08 pm | टिउ
अतुल परचुरेनी चांगला अभिनय केलाय...जत्रेतल्या शुटींगच्या वेळचा त्याचा सिन बघुन अख्खं थिएटर हसुन हसुन पडलं!
अवांतरः अमेय वाघ? हा कोण आहे? म्हणजे चित्रपटातलं कुठलं पात्र?
17 Feb 2009 - 11:48 pm | भडकमकर मास्तर
अमेय वाघ? हा कोण आहे? म्हणजे चित्रपटातलं कुठलं पात्र?
समोरच्या प्रतिस्पर्धी नाभिकाचा असिस्टंट.... जो बिल्लु बरा आहे असं काही एक दोन वाक्ये म्हणतो
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Feb 2009 - 9:31 pm | मानस
सुरेख, छोटेखानी परीक्षण आवडलं.
एक सुधारणा सुचवावीशी वाटते ....
मनोज जोशी - शाळेच्या संचालक मंडळापैकी एक
हा बहुतेक 'गुजराथी' नट आहे असे वाटते .....
17 Feb 2009 - 11:49 pm | भडकमकर मास्तर
हा बहुतेक 'गुजराथी' नट आहे असे वाटते
खरे आहे.. पण मराठीतही त्याने भरपूर काम केले आहे त्यामुळे तसे म्हटले इतकेच...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Feb 2009 - 7:34 am | कोदरकर
इरफान खान मला नेहमी आवडतोच पण इतर ठिकाणी तो माजोरडा वगैरे असतो, इथे अगदी उलट.....
इरफान खान भारीच आहे.. माजोरडा वगैरे असतो हे ठीक.. पण अपना आसमान पहाच....