आये , सरकारनी हजार पाचशेच्या नोटा बंद केल्यात.नाय बदलल्यातं त्याला किंमत ऱ्हाणार नाय", किसना म्हातारीला म्हणाला.
"माह्याकं काह्याचा पैका." म्हातारी फणकारली.
"हां ! माजघरात ठिवलेत गठुड्यात. पण अडनडीला म्हून रुपया द्याची वासना झाली नाही" सून आतून कडाडली.
"तू माह्या पैशावंच टपून बस. औशादपाण्याला कवा धीला मोकळ्या मनानी पैका? " म्हातारी तणतणत परसदारी निघून गेली.
पायरीवर तिचा नातू डोक्याला हात लावून बसला होता.
"कारे दत्तूबाळा?" म्हातारीने विचारले.
"आज्जे पुण्याला पोलिसभरती हाये. गाडीभाडं आन एक दिवस रहायला हजार रुपय लागतील. बापूकं नायहेत येव्ह्ढे पैशे." दत्तू म्हणाला.
"अरं द्यावा !!", म्हातारी कणवेनी म्हणाली, " माह्याकं तुह्या आत्त्यानी दिलीली हजारची नोट हाये. जा घिऊन!”
प्रतिक्रिया
10 Feb 2017 - 10:41 pm | जव्हेरगंज
वास्तववादी आणि मस्त...!!!
11 Feb 2017 - 11:15 am | सिरुसेरि
मजेशीर कथा
12 Feb 2017 - 1:27 pm | चौथा कोनाडा
मस्त, सुरेख शशक !
नातवाच्या अडनडीला म्हातारीचा आधार !
या म्हातारी प्रमाणे ज्यांनी पुंजी म्हणुन दडवुन ठेवल्या अन जुन्या नोटा वठवल्या नाहीत त्या पुंजीचे कागद झाले !
12 Feb 2017 - 1:33 pm | बबन ताम्बे
खरे आहे. ज्यांनी कुणालाच कळू नये म्हणून दडवून ठेवला तो पैसा वाया गेला .