नमस्कार,
एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत.
यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया.
चला तर मग.. आपले लक्ष्य ठरवा, इथे लिहा आणि १० व ११ डिसेंबरला पूर्ण करा.
मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणार म्हणून हा विकांत निवडला
काहिंना गुरुवार (७ डिसेंबर) किंवा सोमवार (१२ डिसेंबर) आठवड्याची सुट्टी असते, त्यांनी ते दिवस फिटनेस विकांत समजुन व्यायाम करण्यास करण्यास हरकत नाही
*************************
नेहमीप्रमाणे कांही सूचना.
१) आपण लक्ष्य ठरवून आपणच पार करायचे आहे त्यामुळे आपली स्वतःशी स्पर्धा असणार आहे.
२) कोणताही व्यायामप्रकार ठरवा आणि दोन दिवसात लक्ष्य पूर्ण करा.
३) भरपूर फोटो काढा.. व्यायाम न करणार्या मिपाकरांना इनो घ्यायला लागेल याची काळजी घ्या..!! ;)
*************************
प्रतिक्रिया
4 Dec 2016 - 8:59 pm | मोदक
मालक, तुमचा आकडा बोला :D
5 Dec 2016 - 5:47 am | प्रशांत
विकांत ला २०० किमी सायकलींग
आठवड्यात ३०० किमी होईल
4 Dec 2016 - 9:07 pm | कंजूस
व्यायाम असा करत नाही नेहमी/नियमित/रोज. परंतू ट्रेकिंग चालेल का?
# करून आल्यावर सांगितले तर ?अगोदर इथे काय करणार लिहायचे आहे ध्येय?
4 Dec 2016 - 10:14 pm | मोदक
आल्यावर सांगा, आणि ट्रेक केलात तर झकास भटकंतीचा धागा येऊद्या.
8 Dec 2016 - 6:50 pm | कंजूस
घरातून निघाल्यावर लवकर ट्रेक सुरू करायचा तर माथेरान ही योग्य जागा आहे माझ्यासाठी.
विकांताला जमणार नाही म्हणून आज माथेरान पनोरमा पॅाइंट ते नेरळ स्टेशन ट्रेक केला. वर जाताना बसने गेलो. ( कधी जाताना चालत जातो आणि येताना वाहनाने येतो. )वेळ मजेत जातो ,हातपाय हलतात त्याला काहीजण व्यायाम म्हणतात. किती चाललो वगैरे मोजदाद करण्याची सोय झालीय फोनात तेही केले.
१) दस्तुरी नाका -पनोरमा- दस्तुरी नाका
पाच किमी चाल. पावणे दोन तास.
२) दस्तुरी नाका ते नेरळ स्टेशन उतरून-
साडेसहा किमी दोन तास.
ट्रेक फोटो थोडक्यात-
माथेरानमध्ये स्वागत करणारा वनखात्याचा फलक. घाबरू नका, वाघ नाहीत इथे.
दस्तुरी नाका ( अमन लॅाज रेल्वे स्टेशन ) ते नेरळ रेल्वे स्टेशन रूट ट्रेस.
माथेरानमधल्या नेहमीच्याच गार हिरव्या सावलीतल्या लालमातीच्या वाटा.
माथेरानचे पर्यटक प्रवेश शुल्क ५० रु असले तरी पनोरमा पॅाइंटकडे जाण्यासाठी नाही. :) :) :)
( नेरळ ते माथेरान टॅक्सी भाडे -
पूर्ण टॅक्सी रु ३६०/
अथवा प्रत्येकी ९०/७०/६० .
बस :-तिकिट प्रत्येकी रु २५.
वेळ सकाळी ८.३०, १२.३०
परतीची ९.१५, दु १.००
मिनी ट्रेन - मार्च महिन्यापासून बेमुदत बंद आहे. त्यामुळे पर्यटक संख्या रोडावली आहे.
रिलायंस जियो मिनिट्रेन आणि टॅक्सीचे लॅाजिस्टिक्स हातात घेणार आहेत अशी वदंता टॅक्सीवालेच पसरवत आहेत. एकूण अशा गमतीजमती ऐकत आणि पाच कप चा पिऊन व्यायामाच्या विकांताला जुम्म्याला सुरवात करून ब्याटन मिपाकरांकडे पास करण्यात आनंद होत आहे.
9 Dec 2016 - 12:45 am | एस
क्या बात है! जियो.
माथेरानला पावसाळ्यात खास छायाचित्रणासाठी यायचं आहे. तेव्हा तुमचं मार्गदर्शन नक्कीच घेणेत येईल.
9 Dec 2016 - 9:58 pm | प्रशांत
माथेरान ला जाण्याचा प्लान झाला कि टिप्स घेतो तुमच्याकडुन
10 Dec 2016 - 12:01 am | मोदक
"सायकलवर" हे शब्द अॅड करा मालक.
10 Dec 2016 - 10:43 am | कंजूस
एस ,प्रशांत मागे एक माथेरानचा धागा काढून बरीच माहिती लिहिली आहे. परंतू नेरळ- माथेरानचे टॅक्सीवाले फारच विचित्रपणा करताहेत. ट्रेन बंद पाडली आहे.पर्यटकांवर परिणाम झालाय. जाण्याअगोदर नक्की माहिती देतो.
10 Dec 2016 - 7:38 pm | रेवती
छान कंजूसकाका!
4 Dec 2016 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज चक्क प्रशांत म्हणजे आपले मिपाचे तंत्रज्ञ मॉड्यूल, मिपा फ्यासिलिटी, आणि इतर गोष्टी पाहणारे मिपा सर्वेसर्वा (नं २) यांनी चक्क धागा काढला, खरं तर त्यांनी नेहमी लिहिले पाहिजे. आवडीचा विषय सायकलिंग आणि व्यक्तिगत आयुष्यात शिक्षक होता होता, वेगळ्या क्षेत्रात कसं आलो वगैरे. बाकी, मूळ विषयावर प्रशांत यांच्या धागा धक्क्यातून सावरलो की लिहितो.
-दिलीप बिरुटे
(प्रशांतचा मित्र)
4 Dec 2016 - 10:13 pm | मोदक
=))
5 Dec 2016 - 10:03 am | ज्ञानोबाचे पैजार
हे वाचल्यावर तुम्हीच पुण्याला सायकलने येताय असे वाटले आणि तुमच्या बद्दल वटत असलेला आदर क्षणभरासाठी का होइना द्वीगूणीत झाला.
पैजारबुवा,
5 Dec 2016 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पैजारबुवा... मला सायकल चालवून आता किमान १५ वर्ष झाले असतील. मला सायकल चालविणे शक्य नाही. बाकी, असलेल्या आदराबद्दल आभारी. पण, मला आदर शब्द मिपावर वाचला की धक्काच बसतो, मिपावर कोणाबद्दलचा आदर कोणत्याही गोष्टीने तापमानासारखा वाढतो, कमी होतो आणि अगदी शून्य सेल्सियसपासून मायनस कितीही जाऊ शकतो. ;)
-दिलीप बिरुटे
7 Dec 2016 - 9:28 pm | प्रशांत
सर तुम्ही १५ मिनिटांत १५ वर्षापुर्वीसारखी सायकल चालवाल तेहि १५ किमि
8 Dec 2016 - 12:35 pm | मोदक
अरे ते नियमीतपणे बॅडमिंटन खेळतात.. मी तर म्हणतो ते २० - २५ किमी सहज चालवतील.
काय सर.. बरोबर ना..?
4 Dec 2016 - 10:39 pm | चांदणे संदीप
सर्व मिपाकरांना फिटनेस विकांताच्या शुभेच्छा!!
याठिकाणी आम्हीही एखादा मजला जिन्याचा चढून जायचा निश्चय करीत आहोत. (याकामी वेळेचं बंधन नसणार बर्का!)
ता.क. (भात) : जिना चढण्याला व्यायामप्रकारात न गणल्याने मिपामालकांचा तीव्र निशेध!!!
Sandy
5 Dec 2016 - 1:09 am | रेवती
चालेल. मीही सूर्यनमस्कार घालीन व कळवीन.
5 Dec 2016 - 1:31 am | मोदक
विकांताला किमान 250 किमी सायकलिंग.
मालकांच्या आज्ञेला मान देऊन या आठवड्यात जास्तीत जास्त सायकलिंग केले जाईल.
5 Dec 2016 - 4:54 am | कंजूस
{हम}रस्त्यावर सायकल चालवायची भिती वाटते {आणि गंमतही नसते.}जर्मनीतले सायकलपट्ट्या पाहिल्यावर तशा कोकणात असत्या तर फार मजा आली असती हा विचार येऊन गेला. मुंबईतले लोक गेटवेहून बोटीत सायकल टाकून रेवस/मांडवा येथे गेले असते आणि तिथे सायकलने किनाय्राने कितीतरी दूर जाता आले असते. बाजुच्या घरांत सायकली ठेवून राहाणे /जेवणे हा व्यवसाय झाला असता.दोघांचा फायदा.
5 Dec 2016 - 6:00 am | एस
विनंतीला मान दिल्याबद्दल मोदकरावांचे आणि प्रशांतमालकांचे आभार! लैच भारी उपक्रम आहे. यात अजून एक व्हेरिएशन आणता येईल. प्रत्येक व्यायामप्रकाराचे एक मोठे उद्दिष्ट ठेवायचे आणि मिपाकरांना त्यातला छोटा-छोटा जमेल तितका वाटा उचलायचे आवाहन करायचे.
उदा. मिपाचे सायकलिंग लक्ष्य - समजा १००० किमी
मग यातले कोण किती पूर्ण करणार? मोदकरावांनी जाहीर केल्याप्रमाणे ते २५० किमीचे लक्ष्य ठेवताहेत. आता उरले ७५० किमी. बोला, अजून कोणकोण आहेत? मी पन्नास किमी उचलतो. आता ७०० च राहिले.
मिपाचे सूर्यनमस्कार लक्ष्य - १२ × १२ असे १४४ सूर्यनमस्कार ठेवले तर कोणकोण किती सूर्यनमस्कार घालणार? मी १२ सूर्यनमस्कार घालेन. १३२ राहिले. रेवाक्का, तुम्ही किती सूर्यनमस्कार घालणार?
मिपाचे चालण्याचे लक्ष्य - किती ठेवूयात? ५०० किमी? मी ५ किमी चालेन. (१० करण्याचा प्रयत्न करेन.)
मिपाचे धावण्याचे लक्ष्य - मॅरेथॉन ठेवूयात का? ४२.१९५ किमी? कोण किती धावणार? बोला. हे अंतर कमी वाटत असल्यास डबल मॅरेथॉन करता येईल.
अजून असेच इतर व्यायामप्रकारांचे लक्ष्य ठेवता येईल. पोहणे, जिम, इ. ते-ते प्रकार करत असलेल्यांनी इथे लक्ष्य जाहीर करावे.
वर दिलेले आकडे मी असेच सुचले तसे टाकले आहेत. जास्त प्रतिसाद मिळाला तर लक्ष्य वाढवता येऊ शकते. विकांत संपल्यावर इथे आलेल्या प्रतिसादांवरून त्यातले किती अंतर/लक्ष्य मिपाकरांनी मिळून पूर्ण केले हे आकडेवारीसह लिहायचे.
अजून कोणाला काय सुचतंय का, सांगा.
5 Dec 2016 - 6:59 am | पिलीयन रायडर
गुड आयडिया!
माझे १२ सुर्यनमस्कार धरा. बाकी जिम मध्ये काही केलं तर कळवेन.
5 Dec 2016 - 7:42 am | डॉ श्रीहास
पुण्यालाच येतो आहे ..... माझे २५० (१०-१२ किमी कमी जास्त) होतीलच.
5 Dec 2016 - 7:00 am | अजया
दहा तारखेला ५० सूर्य नमस्कार घालणार.तशीही जागतिक सु न दिनाची तयारी सुरु आहेच.
अकराला ट्रेक आहे नाहीतर दोन दिवसात शंभर झाले असते.
5 Dec 2016 - 7:38 am | डॉ श्रीहास
माझ्या या औरंगाबाद ते पुणे सायकल सफरीला जो अफलातून पाठींबा आणि एसरावाच्या आयडीयाला मोदकराव व प्रशांत मालकांनी दिलेलं स्वरुप याचा पाठींबा मला पुणे प्रवासाची ताकद देउन गेल,परवाच रात्री ६ लोकांसोबत एक सपोर्ट व्हेईकल घेऊन रात्रीची १०० किमी ची राईड ४:१९ तासात पुर्ण केली.... ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा मिळेल... शिवाय मला पुण्यात आल्यावर गप्पांची अफलातून भेट मिळणार ती वेगळीच....
परत एकदा एसराव,मोदक आणि प्रशांत यांचे आभार.... _/\_
5 Dec 2016 - 10:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, तुम्ही औरंगाबादहुन पुण्याला सायकलवर जाणार वाचून पोटात गोळाच आला. बाकी, डॉक्टर औरंगाबादहून निघाल्यावर कळवा. आणि अंदाजे गोदावरीच्या पुलावर किती वाजेला पोहोचाल ते सांगा. गोदावरीच्या पुलावर उभा राहून मी आपलं स्वागत करीन. थोडं बसू (गप्पा मारू) आणि मग तुम्ही पुढे रवाना व्हा.... कसं ?
-दिलीप बिरुटे
5 Dec 2016 - 11:03 am | प्रशांत
म्हणजे सर तुमचा वॉक होईल :)
5 Dec 2016 - 5:28 pm | डॉ श्रीहास
मी सकाळी ४:३० ते ५ च्या दरम्यान निघणार आहे.... त्यामुळे फारच सकाळी तुम्हाला फक्त गप्पांसाठी बोलवायला जीवावर येतंय .... 44 किमी साठी 1:45 तास लागेल .... पण तुम्ही आलातच (म्हणजे यालच :)) तर 5-10 मिनीट्स नक्कीच थांबेन ....
10 Dec 2016 - 10:55 am | कुंदन
४:३० ते ५ च्या दरम्यान प्रा डॉ उठले तर येतील ना.
हल्ली त्यांचे घड्याळ बंद आहे.
5 Dec 2016 - 8:12 am | रेवती
मी १२ सू न घालीन हो एसभाऊ, जमल्यास जास्त घालीन.
5 Dec 2016 - 10:14 am | सस्नेह
मीपण १२ . पण एका दमात नाय बॉ !
5 Dec 2016 - 8:16 am | कैलासवासी सोन्याबापु
माफ करा मी काहीही करू शकत नाहीये/शकणार नाहीये :'(
5 Dec 2016 - 8:18 am | रेवती
अहो बापूसाहेब तुम्ही बसल्याबसल्या हातांचे व्यायाम करा नैतर पाठीला आधार देऊन व्यायामप्रकार करा.
5 Dec 2016 - 8:19 am | कैलासवासी सोन्याबापु
स्विमिंग करतो, जमल्यास 5 किमी (तुकड्या तुकड्यात)
5 Dec 2016 - 9:00 am | पैसा
कुछ तूफानी करते हैं! आमच्यासारखे म्हातारे काय करणार! वय झालं आता. =))
बघते, प्रशांतने एका ओळीपेक्षा मोठा धागा काहाडलाय म्हणून दोन दिवसात १२ किमि चालणे आणि २५ सूर्यनमस्कार जमवीन कसेतरी.
5 Dec 2016 - 9:43 am | कंजूस
कुवारबावचे पाणी आणा एक घागर.
5 Dec 2016 - 9:50 am | पैसा
ते वेटलिफ्टिंगमधे जमा होईल काय? =))
5 Dec 2016 - 10:47 am | कंजूस
वेटलिफ्टिंगचा धागा कोणी वजनदार मिपाकर काहाडतील.तिकडे पाठवू.
10 Dec 2016 - 12:08 pm | पैसा
मी सकाळी चार किमि केलेत (विथ एअरोबिक्स). आज अजून ४ तरी होतील. उद्या परत तेवढेच. माझे टार्गेट दोन दिवसात १२ होते. नक्कीच क्रॉस करणार. परवा पाय थोडा मुरगळल्याने सूर्यनमस्कार घालायची मात्र रिस्क घेत नाही.
12 Dec 2016 - 12:55 pm | पैसा
एकूण १५ किमि २ दिवसात मिळून (विथ एअरोबिक्स). सूर्यनमस्कार मात्र जमले नाहीत. पुढच्या आरोग्य सप्ताहात नक्की जमवीन. मुख्य म्हणजे मधेच थांबवणार नाही असे ठरवले आहे.
12 Dec 2016 - 2:28 pm | प्रशांत
मस्त
5 Dec 2016 - 9:23 am | इशा१२३
१ तारखेपासून जागतिक सुर्यनमस्कारदिनासाठी जास्त सराव सुरु केलाच आहे.त्यादिवशी १०८ सूर्यनमस्कार घालायचा संकल्प आहे.तूर्तास ६० सूर्यनमस्कार नक्की घालेन.
5 Dec 2016 - 9:56 am | ज्ञानोबाचे पैजार
कल्पना उत्तम आहे.
फक्त एक विनम्र आणि कळकळीची सूचना जे मिपाकर रोज नियमित व्यायाम करत नाहित त्यांनी इकडे फोटो टाकण्यासाठी म्हणून उगाच अचरटपणा ने एकाच दिवशी भरपुर व्यायाम करायचा प्रयत्न करु नये. इनो हे दुधारी शस्त्र आहे हे ल्क्षात ठेवावे.
जेवढा व्यायाम आपण नियमित करतो त्याच्या साधारण १.२५ ते १.५ पट जास्त व्यायाम करायला हरकत नाही. नाहितर पुढचा पूर्ण आठवडा न ओळखणारे लोक सुध्दा जवळ येउन विचारतील "मिपाकर आहात वाटतं? वाटलच मला... लंगडत चालताय त्यावरुन ओळखले हो... हॅ..हॅ..हॅ.."
मी गुरुवार दि ८ डिसेंबर साठी ३० सुर्यनमस्कार आणि ३० किमी सायकलिंग आणि ३०० दोरीच्या उड्यांचे लक्ष स्वतःपूढे ठेवत आहे. (मालकांसाठी गुरुवार ७ डिसेंबरला असला तरी आमच्या सारख्या कामगार वर्गासाठी तो ८ डिसेंबर रोजीच आहे.)
पैजारबुवा,
7 Dec 2016 - 4:12 pm | बाळ सप्रे
दोरीच्या उड्या हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. यात उड्यांच्या कार्डीओ अॅक्टीविटीबरोबरच दोरी अडकू नये म्हणून करावी लागणारी एकाग्रता हा अधिकचा फायदा आहे. दोरीमुळे हात सतत बिझी असतात त्यामुळे ओघळणारा घाम पुसणे, खाजवणे वगैरे ना देखिल वेळ देता येत नाही.
यात दोरी सतत अडकल्याने निराश होउन जास्त उड्या मारण्याचा नाद सोडून देतो. खरतर ३००-४०० उड्या जेमतेम ३-४ मिनिटात होतात. एखादा जर १५-२० मिनिटं धावू शकत असेल तर उड्यादेखिल १० मिनिटे मारू शकतो. अडकल्यावर न थांबता लगेच पुन्हा सुरु ठेवायचं उड्यांच सत्र. हळूहळू सवय झाली की दोरी अडकण्याचं प्रमाणदेखिल कमी होतं.
7 Dec 2016 - 4:42 pm | वेल्लाभट
बरोबर आहे. उड्या मारु शकण्याची वेळ अर्धी लिहिलीत हे योग्य केलंत. धावताना एका दिशेत शरिराला गती असते आणि ती एकप्रकारे तुम्हाला मदतच करते, त्यामुळे पोठर्यांवर ताण विशेषत्वाने कमी पडतो. उड्या मारताना एक तर शरीर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेत ढकलायचं असतं व त्यातलं जवळजवळ सगळं काम पोठर्या करतात. उड्या मारताना पोठर्या चटकन फेल होतात, धावताना हाच स्टॅमिना जास्त काळ टिकतो.
9 Dec 2016 - 11:52 am | वामन देशमुख
दोरीवरच्या उड्या, धावणे, जॉगिंग, चालणे इ. मुळे गुढघ्यांची झीज होते का?
आइ मीन, या व्यायामप्रकारांमुळे (अनेक फायदे होतात हे माहित व मान्य आहे, त्याशिवाय) शरीराची हानी होते का?
9 Dec 2016 - 12:02 pm | बाळ सप्रे
नाही..
शरीराची झीज कायमच होत असते. व भरून पण येत असते.. या अॅक्टिविटिजमुळे जास्त झीज असं काही होत नाही.. उलट स्ट्रेंग्थ वाढते असाच अनुभव आहे..
9 Dec 2016 - 12:05 pm | सामान्य वाचक
धापधाप उडया मारल्या
चुकी च्या पद्धतीने आघात केले, तर हानी होईल
उलटपक्षी, calcium ची कमी असते, त्यासाठी धावणे आणि उड्या हा उत्तम व्यायाम आहे bone density वाढवण्यासाठी
असे dr नि सांगितले आहे
9 Dec 2016 - 11:50 am | ज्ञानोबाचे पैजार
काल सकाळी ४.३० ला उठलो. इतर व्यायामा बरोबर ३० सुर्यनमस्कार घातले (रोज १२ घालतो) मग साधारण सकाळी ६ वाजताच सायकल घेउन बाहेर पडलो. माझ्या बरोबर माझी मुलगी (इ.८वी) पण तिची सायकल घेउन आली. सिंहगड रोड नवश्या मारुती - सारसबाग - शनिवार वाडा - बालगंधर्व - बीएमसीसी - नळस्टॉप - मृत्युंजय मंदीर - वनदेवी मंदीर -राजाराम पुल - नवश्या मारुती असा फेरफटका मारला. साधारण सात साडेसात वाजता परत आलो. दोघांचे मिळून ३० किमी झाले असतील.
येताना स्विकार मधून ८ प्लेट उप्पीट पार्सल घेतले होते. सहकुटूंब गरम गरम चहा आणि उप्पीट हादडले.
दुपारी जेवल्यावर झोपायला मिळाले नाही. ब्यांकेच्या लायनीत उभे रहावे लागले.
संध्याकाळी १००० दोरीच्या उड्या मारल्या. (३००+२००+२००+१००+१००+१००) शेवटच्या १०० उड्या मारताना हालत खराब झाली होती.
या सगळ्याचा परीणाम म्हणजे रात्री ९.३० ला झोपलो.
अशा रीतीने मिपा फिटनेस विकांताच्या निमित्ताने केलेला संकल्प तडीस नेला.
पैजारबुवा,
9 Dec 2016 - 12:45 pm | एस
_/\_
9 Dec 2016 - 1:32 pm | कंजूस
वाचताना दम लागतोय ज्ञानाचे पैजारबुवा.
9 Dec 2016 - 1:25 pm | शलभ
मस्त..
9 Dec 2016 - 10:02 pm | प्रशांत
विआ विकांतला (शनी\रवी) कधी\काहि सायकलिंग करत असाल तर कळवा, भेटु
5 Dec 2016 - 11:11 am | बाबा योगिराज
सर्व प्रथम पुणे प्रवासासाठी शुभेच्छा.
मला अजून तरी मोठी राईड जमत नाही, परंतु आज पासून पुढील रविवार पर्यंत 200 ते 225 किलो मीटर चे लक्ष मी घेतो.
डॉक, जाताना प्राडॉ (बिरुटे सर) सरांना नक्की भेट.
जर वेळ जमला तर मी तुला सोबती म्हणून गंगापूर फाट्या पर्यंत यायचा प्रयत्न जरूर करेन.
बाबा योगीराज
9 Dec 2016 - 1:35 pm | कंजूस
>>225 किलो मीटर चे लक्ष मी घेतो.>>
मी एकदा चुकून लक्ष लिहिल्यावर डॅाक्टरांनी एक हजारवेळा लक्ष्य लिहवून घेतले होते मिपापहिलीत असताना.
5 Dec 2016 - 11:18 am | सानझरी
मी विकांताला १० किमी चालेन आणि २४ सूर्यनमस्कार घालेन..
5 Dec 2016 - 11:24 am | खेडूत
छान उपक्रम..
मीही तसेच. १० चालणे, २५ नमस्कार!!
12 Dec 2016 - 12:45 pm | सानझरी
शनिवारी दंत दुखीमुळे चालायला नाही जाऊ शकले. फक्त ६ सूर्यनमस्कार घातले. काल फ्लेमिंगो बघायला भिगवणला गेलेले, सो मी टार्गेट पूर्ण करू शकले नाही.. :(
5 Dec 2016 - 11:29 am | अंजनेय
पुण्यनगरी मध्ये डॉक भाऊंचे हार्दिक स्वागत.
कृतिभिमुख उत्कृष्ट उपक्रम आयोजिल्याबद्दल प्रशांतरावांचे अभिनंदन!
प्रशांत माझे चांगले मित्र आणि सायकलिंग चे गुरु आहेत.
त्यामुळे गुरुदक्षिणा म्हणून या विकांताला किमान ५० किमी सायकलिंग आणि जमल्यास १२ सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प करत आहे.
एखाद्या देखण्या ठिकाणी जाणे झाल्यास इनोचा खप नक्कीच वाढवू.
6 Dec 2016 - 1:10 pm | डॉ श्रीहास
धन्स ..._/\_
10 Dec 2016 - 9:25 pm | अंजनेय
आज प्रशांत यांच्यासोबत राईड करण्याचा सुयोग जुळून आल्यामुळे एकूण ६६.४ किमी सायकलिंग करण्यात आले आहे. डांगे चौक- विद्यापीठ परिसर- नेकलेस रोड- बावधन- चांदणी चौक- सुस रोड-बाणेर-बालेवाडी-देहू रोड-तळेगाव खिंड- डांगे चौक परत अशी राईड करण्यात आली आहे. संकल्पपूर्ती करण्यात आली आहे.
नेहमीचा मार्ग असल्याने आणि प्रशांत राव सोबत असल्यामुळे फोटू साठी टाइम पास करू शकलो नाही. मागून लगेच गिअर अप- गिअर अप असा करडा आवाज ऐकायला येतो. तरीही चोरून काही फोटू काढलेच.
5 Dec 2016 - 11:56 am | प्रीत-मोहर
दर वीकांताला प्रवासात असल्याने, मी वीकडेज ला थोडा जास्तीचा व्यायाम करेन . सुन जमु शकते. माझे २५ सुन, योगासनं आणि प्राणायम
5 Dec 2016 - 1:12 pm | गवि
उत्तम मोटिव्हेशनवाला उपक्रम प्रशांत.. फक्त केवळ विकांताऐवजी पूर्ण आठवडा (फिटनेस वीक) सुचवायला हवा होता.
मी नुकतंच चालणं सुरु केलंय. पण तुम्हा व्यायामपटूंसमोर अद्याप ते फारच लिंबूटिंबू आहे. विकान्ताला ६ किमी चालेन.
7 Dec 2016 - 9:02 pm | प्रशांत
जानेवारी मधे फिटनेस वीक ठेवायचा प्रयन्त करु..
सहि
फिटनेस वीकला ४० किमि चालने होईल यासाठी शुभेच्छा
- प्रशांत
5 Dec 2016 - 1:40 pm | अनिरुद्ध.वैद्य
नक्की आकडा पुर्ण झाल्यावर टाकेल. सध्यातरी, ६० पकडुन चाललोय.
5 Dec 2016 - 2:15 pm | शलभ
माझी ह्या रविवारी हाफ मॅरॅथॉन आहे. ती पकडून ह्या आठवड्याचे ५० किमी रनिंग.
5 Dec 2016 - 2:22 pm | मोदक
त्यातले आज १५ झाले.. म्हणजे आता चार दिवसात फक्त १५ किमीच पळणार..?
5 Dec 2016 - 3:32 pm | शलभ
हो. ५-५ किमी ३-४ दिवस. मोठ्या रन च्या आधी उगाच ड्रेन होण्यात अर्थ नाही.नाहीतर हाफ मॅरॅथॉन अवघड जाईल.
9 Dec 2016 - 12:50 pm | माझीही शॅम्पेन
कुठली हाफ मॅरेथॉन वसई विरार की गोवा ?
हाफ मॅरेथॉन साठी हार्दिक शुभेच्छा _/\_
9 Dec 2016 - 1:25 pm | शलभ
वसई-विरार..
धन्यवाद.. _/\_
5 Dec 2016 - 2:27 pm | सूड
मी एका लॅपनंतर थांबतो त्याऐवजी दोन लॅप्सनंतर थांबायचं लक्ष्य ठेवेन. फक्त कितीही फोटो काढू म्हटलं तरी ते शक्य होईलसं दिसत नाहीय.
5 Dec 2016 - 4:19 pm | कवितानागेश
आणि सूर्यनमस्कार घालेन.
...अर्थातच लवकर उठले तर!
नाहीतर संध्याकाळी वेळ मिळाला कि चांद्रनमस्कार! ;)
5 Dec 2016 - 5:30 pm | सस्नेह
चांद्रनमस्कार =))
7 Dec 2016 - 1:26 am | रेवती
हा हा हा.
5 Dec 2016 - 5:24 pm | साधा मुलगा
मी विकांताला १२ किमी धावणे आणि चालण्याचं उद्दिष्ट आहे त्यापैकी किमान ८ किमी धावण्याचा प्रयत्न राहील.
10 Dec 2016 - 9:03 am | साधा मुलगा
पैकी 3.2 किमी धावणे आणि 2 किमी चालणे पूर्ण केले आहे.
10 Dec 2016 - 7:01 pm | साधा मुलगा
अजून 2 किमी धावणे आणि 2 किमी चालणे संध्याकाळी झाले आहे.
13 Dec 2016 - 9:30 pm | साधा मुलगा
13 Dec 2016 - 9:30 pm | साधा मुलगा
13 Dec 2016 - 9:33 pm | साधा मुलगा
13 Dec 2016 - 9:33 pm | साधा मुलगा
काही अपरिहार्य कारणांमुळे मला विकांताला काही करता आले नाही पण म्हणून आज 4 किमी धावून आणि 2 किमी चालून टार्गेट पेक्षा जास्त व्यायाम केला. सर्व मिपाकरांचे अभिनंदन!!उपक्रमात सहभागी झाल्याचे समाधान वाटत आहे.
5 Dec 2016 - 5:34 pm | साधा मुलगा
चायला मागे नवी मुंबई कट्ट्याचे फोटो पाहून मिपाकरांना फिटनेसची गरज आहे असे वाटले होते, आता बघतो तर एक सो एक लोक इथे मिळत आहे , १०० किमी सायकलिंग काय, १० किमी धावणे काय, ६०-७० सूर्यनमस्कार काय, इथे ३-४ किमी धावून आपला स्टॅमिना संपतो, मानलं बुआ मिपाकरांना _/\_
5 Dec 2016 - 6:38 pm | अल्पिनिस्ते
येत्या शनिवारी ३५ किमी सायकलिंग करेन.. रविवारी जमत नाहिये वैयक्तिक कामामुळे :(
5 Dec 2016 - 7:01 pm | वरुण मोहिते
घरी ट्रेंड मिल डंबेल्स असूनसुद्धा कधी व्यायाम केला नाही पहिल्यापासून आम्ही स्लिम अँड ट्रिम हो. त्यामुळे हातावर फिटबीट बांधणं आणि फिरणं याउपर व्यायाम नाही :) . ट्रेकिंग करतो स्विमिन्ग करतो पण नियमित काहीच नाही . जिमखाना आणि एक क्लब ला मेम्बरशिप असून काही केलं नाही. चांगला उपक्रम ५ किमी धावण्यात येईल आमच्या इथल्या मैदानात .
5 Dec 2016 - 9:14 pm | अंतु बर्वा
दिवसाआड अडिच मैल धावतोय. विकांताला ३ मैल धावण्याचा प्रयत्न करेन...
7 Dec 2016 - 9:09 am | पिंगू
सूर्यनमस्कार घालण्यात येतील..
7 Dec 2016 - 8:17 pm | प्रशांत
प्रतिसादा बद्दल सर्वांचे मनापासुन आभार्स...
सर्वांनी फिटनेस विकांताची तयारी सुरु केली असेलच... नाहि का?
7 Dec 2016 - 8:35 pm | गवि
हो. आमच्या शून्य किमी चालण्याच्या सवयीप्रमाणे पाहता ६ किमी विकांती (३+३) हे मोठंच आव्हान आहे. इथले दिग्गज फिट लोक पाहून अतिन्यूनगंड येत आहे. पण गेला महिनाभर या धाग्यांना वाचून चालणं सुरु केलंय.
कालपर्यंत २ आणि आज सलग तीन किमीपर्यंत स्टॅमिना वाढवण्याचा प्रयत्न केला. आज तीन किमी सलग जमले. विकांताचं ध्येय पूर्ण करण्याची ही पूर्वतयारी आहे. इतरांच्या मानाने हे ध्येय चिमुकलंच आहे. पण अनेक वर्षं कसल्याच व्यायामाची सवय नसलेल्याला हे ध्येय सध्या जास्तच आहे.
सर्वांनी एकमेकांना अशीच स्फूर्ती देत रहा.
8 Dec 2016 - 12:38 pm | मोदक
__/\__
7 Dec 2016 - 8:32 pm | चतुरंग
तयारी सुरु केलीए! दोन्ही दिवस प्रत्येकी ५० सूर्यनमस्काराचे (एकूण १००) लक्ष्य ठेवले आहे!
-रंगा