मिपा फिटनेस विकांत

प्रशांत's picture
प्रशांत in जनातलं, मनातलं
4 Dec 2016 - 8:39 pm

नमस्कार,

एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत.

यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया.

चला तर मग.. आपले लक्ष्य ठरवा, इथे लिहा आणि १० व ११ डिसेंबरला पूर्ण करा.

मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणार म्हणून हा विकांत निवडला

काहिंना गुरुवार (७ डिसेंबर) किंवा सोमवार (१२ डिसेंबर) आठवड्याची सुट्टी असते, त्यांनी ते दिवस फिटनेस विकांत समजुन व्यायाम करण्यास करण्यास हरकत नाही

*************************

नेहमीप्रमाणे कांही सूचना.

१) आपण लक्ष्य ठरवून आपणच पार करायचे आहे त्यामुळे आपली स्वतःशी स्पर्धा असणार आहे.
२) कोणताही व्यायामप्रकार ठरवा आणि दोन दिवसात लक्ष्य पूर्ण करा.
३) भरपूर फोटो काढा.. व्यायाम न करणार्‍या मिपाकरांना इनो घ्यायला लागेल याची काळजी घ्या..!! ;)

*************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

7 Dec 2016 - 9:41 pm | प्रशांत

एस, रेवती , पिलीयन रायडर, अजया, स्नेहांकिता, इशा१२३, सानझरी, खेडूत, प्रीत-मोहर, अनिरुद्ध.वैद्य,लीमाउजेट,पिंगू आणि चतुरंग व ईतर मिपाकर यांना यांच्यासोबत २४ (१२+१२ असे) सूर्यनमस्कार घालण्यात येतील

रविवारी ट्रेक असल्याने आजच ५० सुन घातले.
आता उद्या ५०!

प्रशांत's picture

9 Dec 2016 - 10:04 pm | प्रशांत

ट्रेकचा वृतांत येवु द्या

आनंदयात्री's picture

7 Dec 2016 - 10:33 pm | आनंदयात्री

शनवार रैवार मिळून ८ माईल ट्रेडमिल वॉकिंगचे उद्दिष्ट ठेवतोय. उत्तम उपक्रम. व्यायामातल्या सातत्यासाठी मोटिव्हेशनची गरज वारंवार भासते, ती अश्या धाग्यातून मिळो. धन्यवाद.

कुंदन's picture

7 Dec 2016 - 11:05 pm | कुंदन

Prophet Muhammad कृपेने मोठा विकांत मिळेल.

मोठा विकांत असल्याने ६० की मी होतील ३ दिवसात.

इरसाल कार्टं's picture

8 Dec 2016 - 12:19 pm | इरसाल कार्टं

हरिश्चंद्रगड चे ट्रेकिंग करणार आहे. ११ आणि १२ डिसेंबर ला. चालेल ना?

एका अटीवर.. इथे फोटो टाकायचे किंवा स्वतंत्र धागा टाकायचा ;)

इरसाल कार्टं's picture

8 Dec 2016 - 11:11 pm | इरसाल कार्टं

ते सांगणे नलगे.

प्रशांत's picture

9 Dec 2016 - 10:05 pm | प्रशांत

तर येवु द्या फोटो येथे आणि भट्कंती मधे

इरसाल कार्टं's picture

9 Dec 2016 - 10:34 pm | इरसाल कार्टं

तयारी चालू झालीय, चौथी वेळ असली हरिश्चंद्रगड ट्रेकची तरी एक्सायटिंग वाटतंय.

कंजूस's picture

8 Dec 2016 - 7:47 pm | कंजूस

माझं चुकलं का?

नीलमोहर's picture

8 Dec 2016 - 8:05 pm | नीलमोहर

एरवी नियमित चालणं असतं, सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, आठवण आणि इच्छा झाली की कधीतरी असतात,

मात्र एक वर्षाचं बाळ सांभाळणे, त्याच्या मागे पळणे हा जगातील सगळ्यात मोठा व्यायाम आहे म्हणतात,
आता तुम्हीच सांगा मालक, अजून वेगळ्या व्यायामाची गरज आणि त्यासाठी स्टॅमिना असेल का :)
तरीही मालकांनी कधी नव्हे ते धागा काढलाय म्हटल्यावर प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्या जाईल.

प्रशांत's picture

9 Dec 2016 - 10:14 pm | प्रशांत

मात्र एक वर्षाचं बाळ सांभाळणे, त्याच्या मागे पळणे हा जगातील सगळ्यात मोठा व्यायाम आहे म्हणतात,

नाहि यावर डॉ. अधीक सांगतील.

फिट्नेस विकांतापासुन सुरुवात करा आणि नियमित करण्याचा प्रयत्न करा.

नियमित व्यायाम करावा म्हणुन मी मित्रासोबत पैज लावतो ज्याने महिन्यात जास्त खाद खाडे केलेत त्यानी पार्टि द्यावी.

मिपाकरांनो, उठा, चला, उठा, राष्ट्रवीर हो! सुसज्ज व्हा उठा चला...

(आठवण करून दिली. आत्ता झोपा. अजून एक दिवस आहे. शनवार मात्र गाजवा!)

गुरूवारवाले, काय अपडेट?

डॉ श्रीहास's picture

9 Dec 2016 - 8:31 am | डॉ श्रीहास

गेल्या ३ दिवसात.... १२३ किमी सायकलींग झालंय... आता मोठी राईड रविवारची !!

देशपांडेमामा's picture

9 Dec 2016 - 1:11 pm | देशपांडेमामा

डॉक तुम्हाला सदिच्छा देण्यासाठी मीसुध्द्धा उद्या (शनिवारी ) २०० किमी सायकलींग करणार आहे :-)

देश

डॉ श्रीहास's picture

9 Dec 2016 - 7:04 pm | डॉ श्रीहास

तुम्हाला २०० किमी ब्रेव्हे साठी शुभेच्छा...

प्रशांत's picture

9 Dec 2016 - 10:16 pm | प्रशांत

मामा उद्या सकाळी पुणे विद्यापिठात भेटण्याचा प्रयत्न करतो

सप्तरंगी's picture

9 Dec 2016 - 8:36 pm | सप्तरंगी

चांगले motivation आहे. मी आठवड्यातुन ५ वेळा ४km चालते (फास्ट वॉक), आठवड्याला २०km , एरवी शनिवार-रविवार दांडी मारते पण या शनिवारी आणि रविवारी १०km फास्ट वॉक नक्की करेन.

सहा सूर्यनमस्कार घालून झाले आहेत. उद्या उर्वरित सहा. आता सायकलिंग सुरू. @श्रीहासराव, निघालात का औरंगाबादवरून? प्राडॉंची भेट झाली का?

दोन डॉक्टरांची ऐतिहासिक भेट उद्या होईल.

डॉ श्रीहास's picture

10 Dec 2016 - 2:34 pm | डॉ श्रीहास

_/\_

डॉ श्रीहास's picture

10 Dec 2016 - 2:36 pm | डॉ श्रीहास

डाॅ. बिरूटेंना भेटणार.... फोटो सर टाकतीलच वृत्तांतासकट..

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Dec 2016 - 10:00 am | अनिरुद्ध.वैद्य

विकांताच ६० सुर्य नमस्काराचं टारगेट पुर्ण झाल :) ६० झाल्यावरही उत्साह होता, म्हणुन अजुन १२ घालुन घेतले.
तेव्हा, आजचा आकडा ७२.

संध्याकाळी इच्छा झाली तर जीममध्ये जाईल. उद्या जीमला सुटी असल्याने परत सुन घालीन अथवा माझी पण सुट्टी ;)

सगळ्यांना शुभेच्छा!

सामान्य वाचक's picture

10 Dec 2016 - 10:15 am | सामान्य वाचक

आणि 1तास strength training

प्रशांत's picture

10 Dec 2016 - 10:20 am | प्रशांत

मिपा फिटनेस विकांत राइड

५६.४ किमि २ तास ३७ मिनिट सरासरी वेग २१.६ किमि.
+ १२ सुर्यनमस्कार

डॉ श्रीहास's picture

10 Dec 2016 - 4:26 pm | डॉ श्रीहास

लिडींग फ्राॅम द फ्रंट ....

प्रशांत's picture

12 Dec 2016 - 3:01 pm | प्रशांत

रविवार ची राइड ठरल्याप्रमाणे झाली.मी, नकुल, सागर आणि मोदक रांजनगाव पर्यंय सायकल ने गेलो आणि डॉ सोबत पुण्याला आलो
माझी १०६ किमी सायकलींग झाली
.

अरिंजय's picture

12 Dec 2016 - 4:41 pm | अरिंजय

जोरदार राईडी झाल्या सगळ्यांच्या. सर्वांचे अभिनंदन.

मोदक's picture

12 Dec 2016 - 6:39 pm | मोदक

धन्यवाद हो..

माझे काल १३० किमी झाले आणि संपूर्ण आठवड्यात ३१० किमी झाले. :)

इरसाल कार्टं's picture

12 Dec 2016 - 11:04 pm | इरसाल कार्टं

हे भारी आहे, तुम्हाला पुण्यासारख्या शहरात राहून पण सायकलिंग करता येते, इकडे आम्ही गावाकडे आहोत पण रस्ते खूप खराब आहेत छोटे मोठे सगळे. किमान सायकलिंगच्या लायकीचे तर अजिबात नाहीत.
असो, आम्ही हरिश्चंद्रगड ची ट्रेक संपवून आलोय आत्ताच अन हॉटेलात आलोय.
छान झाली ट्रेक अन त्या निमित्ताने फिटनेस वीकांतही.
फोटो टाकेनाच उद्या परवा.

कंजूस's picture

10 Dec 2016 - 10:53 am | कंजूस

प्रशांत, स्ट्रावामधले "elevation 290 meters" हे अल्टिट्युडचे मोजमाप इतर gps route tracerप्रमाणेच गंडलेलं असतं का? खरे gps unit altitude किती दाखवते पुणे/पिंपरी/चिंचवडची? ५५०मिटर्स ना?

अहो ते सायकलने किती चढ चढलात त्याची बेरीज करतं. म्हणून इतके एलेव्हेशन गेन. अल्टिट्यूड गेन नाही.

कात्रज चढून गेलात तर २९० मि गेन होत असेल. पिंचिंत चढ उताराचे मोजले गेलेत वाटतं. धन्यवाद.

कंजूस's picture

10 Dec 2016 - 10:55 am | कंजूस

altitude/elevation gain 29 meters ठीक वाटते.

70 किमी सायकल राईड पूर्ण.

डॉ श्रीहास's picture

10 Dec 2016 - 4:25 pm | डॉ श्रीहास

जोरदार ७० !!

मोदक's picture

10 Dec 2016 - 7:10 pm | मोदक

व्वाह..!!!!

मी थोडे स्ट्रेचेस आणि १२ सूर्यनमस्कार घातले. उजवा हात अजूनही पूर्णपणे टेकवता येत नाहीये तरी जमले म्हणायचे.

चतुरंग's picture

10 Dec 2016 - 7:56 pm | चतुरंग

फारच एनर्जेटिक वाटतंय!
आता उद्या ५० घालणार.

(आनंदी)रंगा

कुठल्याही प्रकारचा व्यायाम केला तरी इथे टाका. 'फिटनेस' महत्त्वाचा आहे. व्यायामप्रकार आपापल्या आवडीनुसार करायचा आहे.

काल आणि आज मिळून १० किमी चालण झालेय आणि तेही दिवसभरात.

अरिंजय's picture

10 Dec 2016 - 10:49 pm | अरिंजय

विकांताच्या पहिल्या दिवसाची सायकल राईड ४४.८ किमी.

आज सहा सूर्यनमस्कार झाले. एकूण काल आणि आज मिळून बारा पूर्ण झाले.

पाय मुरगळल्यामुळे चालण्याचे लक्ष्य पूर्ण करता येणार नाही मात्र! :-(

सामान्य वाचक's picture

11 Dec 2016 - 9:50 am | सामान्य वाचक

जॉग झाले आज

देशपांडेमामा's picture

11 Dec 2016 - 10:17 am | देशपांडेमामा

200 किमीची BRM 10 तासांमध्ये पूर्ण केली

देश

एस's picture

11 Dec 2016 - 10:27 am | एस

बापरे! जबरदस्त!

पैसा's picture

11 Dec 2016 - 10:26 am | पैसा

सगळ्या सायकलवाल्यांना साष्टांग नमस्कार!

मी आज हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. ह्या वीक च 50 चं टारगेट होतं 47 झाले. शुक्र-शनी रेस्ट घेतली आजच्यासाठी.

माझ्याबरोबर मिपाकर अमित जोशी सुद्धा होते. त्यांनीही पूर्ण केली.

अरिंजय's picture

12 Dec 2016 - 4:36 pm | अरिंजय

अभिनंदन शलभराव

प्रशांत's picture

12 Dec 2016 - 6:12 pm | प्रशांत

अभिनंदन

अनिल मोरे's picture

11 Dec 2016 - 10:08 pm | अनिल मोरे

Today I finished Vasai-Virar Half Marathon in 1hr 50mins

कंजूस's picture

12 Dec 2016 - 7:24 am | कंजूस

व्वा वा!

बाळ सप्रे's picture

12 Dec 2016 - 12:28 pm | बाळ सप्रे

अभिनंदन... खूपच चांगला वेग आहे..

शलभ's picture

12 Dec 2016 - 2:35 pm | शलभ

+१
खुपच मस्त वेग..

तुम्ही रनींगवर काहीतरी लिहा की.. (सायकलिंग सारखे..)

माझी तर आत कुठे सुरुवात आहे. अजून १-२ वर्षांनी लिहू शकेन रनिंग चालू राहिले तर..:)
हीच विनंती बाळ सप्रेंना करूयात.

प्रशांत's picture

12 Dec 2016 - 6:12 pm | प्रशांत

माझी तर आत कुठे सुरुवात आहे.

तुम्हि आता लिहायला सुद्धा सुरुवात करा बाळ सप्रेंना आपण त्यात भर टाकायला विनंती करु..

अरिंजय's picture

12 Dec 2016 - 4:38 pm | अरिंजय

अभिनंदन मोरेसाहेब. वेळ पण भारी नोंदवलीत.

प्रशांत's picture

12 Dec 2016 - 6:10 pm | प्रशांत

अभिनंदन

अनिल मोरे's picture

12 Dec 2016 - 10:16 pm | अनिल मोरे

धन्यवाद!!!

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Dec 2016 - 12:20 am | लॉरी टांगटूंगकर

दोन्ही दिवस प्रत्येकी दोनेक किमी धावलो. तेवढीच सायकल. पंधरा पुलप्स. पन्नास पुशप्स.
बाकी वजनं घेउन हातं-पायं हलवले.
तद्नंतर ढेरी साठे क्रंचेस, क्रोस क्रंचेस, रिव्हर्स क्रंचेस झोपून सायकल वगैरे प्रकार केले. मग घरी येउन दुपारभर झोपा काढल्या.

एस's picture

12 Dec 2016 - 12:31 am | एस

मिपा फिटनेस विकांतात अहमहमिकेने भाग घेतलेल्या सर्व मिपाकरांचे जोरदार अभिनंदन आणि आभार! या उपक्रमाला उचलून धरणारे श्री. मोदकराव आणि श्री. प्रशांतराव यांचे आभार. हा एका-दोन दिवसांचा उपक्रम न राहता आपल्या रोजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. पुनरेकवार सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचेही आभार. धन्यवाद! _/\_

विंजिनेर's picture

12 Dec 2016 - 1:20 am | विंजिनेर

हिरव्या पच्चीम किनार्‍यावरचा रविवार अंमळ बाकी आहे. आभार प्रदर्शनाची घाई नको :)

विंजिनेर's picture

12 Dec 2016 - 1:17 am | विंजिनेर

साडे आठ माईल्स "ईझी" रन मिपा फि. विकांताय स्वाहा - इदं मिपा फि. विकांताय - इदं न मम |
एकूण आठवड्यातले माईलेज - २० मैल (३० किमी मात्र)

साडेचार किमी चालल्या गेले आहे. पायाला जरा दुखापत झाल्याने कमी झालं अंतर. पण विकांत अगदीच लोळण्यात न गेल्याचं समाधान.

प्रीत-मोहर's picture

12 Dec 2016 - 12:56 pm | प्रीत-मोहर

मी पाय पुन्हा दुखावुन घेतल्यामुळे, चालणे नाही जमवले पण सुन झाले २५.

आता हा वॉर्मअप समजून त्या व्यायामाची उष्णता कमी होण्याच्या आत पुढचा उपक्रम ठरवावा ही विनंती.

यंदा चालणे / धावणे या विशिष्ट व्यायामावर भर देणारा सप्ताह ठेवूया का? वर्किंग डेजसहित एका आठवड्यात किती किलोमीटर जमतात ते पाहू या? (आपापल्या शक्त्यनुसार पण किंचित जास्तीचा चॅलेंज घेऊन).

प्रशांत's picture

12 Dec 2016 - 2:52 pm | प्रशांत

आता हा वॉर्मअप समजून त्या व्यायामाची उष्णता कमी होण्याच्या आत पुढचा उपक्रम ठरवावा ही विनंती

हो नक्की.

अरिंजय's picture

12 Dec 2016 - 6:17 pm | अरिंजय

सप्ताह करा, हरकत नाही.

पाटीलभाऊ's picture

12 Dec 2016 - 2:48 pm | पाटीलभाऊ

हा वीकांत फक्त भटकण्यात गेला...त्यामुळे काहीही व्यायाम झाला नाही :(
पण हि कसर या आठवड्यात भरून काढण्यात येईल.

डॉ श्रीहास's picture

12 Dec 2016 - 3:05 pm | डॉ श्रीहास

२३० किमी १० तासात .... माझी पहिली डबल सेंच्युरी !!

पाटीलभाऊ's picture

12 Dec 2016 - 3:10 pm | पाटीलभाऊ

_/\_

देशपांडेमामा's picture

12 Dec 2016 - 3:16 pm | देशपांडेमामा

डॉक रॉक्स !!!

देश

डॉक पुन्हा एकदा अभिनंदन! भेटून खरंच छान वाटलं काल सगळ्यांना! कीप रायडींग!
आता लक्ष २०१७! डेक्कन क्लीफ हँगर! किंवा BRM कम्प्लिट करा सगळी सिरीज!

शलभ's picture

12 Dec 2016 - 4:09 pm | शलभ

सही... ____/\____
अभिनंदन...

दाते प्रसाद's picture

12 Dec 2016 - 4:15 pm | दाते प्रसाद

अभिनंदन डॉक्टर

२३ किमीचा सरासरी वेग -- जबरदस्त

खतराच हो डॉक. जबरदस्त एकदम.

बाळ सप्रे's picture

12 Dec 2016 - 5:20 pm | बाळ सप्रे

देशपांडेमामा आणी डॉ श्रीहास.. जबरदस्त सायकलिंग.. कीप इट अप !!

प्रशांत's picture

12 Dec 2016 - 6:37 pm | प्रशांत

शक्य असेल त्यांनी सायकलिंगसाठी मिपा सायकल सायकल हा strava ग्रुप जॉईल करा आणि धावणे\चालणे या साठी मिपा रनर्स हा ग्रुप जॉईल करा.

पिलीयन रायडर's picture

12 Dec 2016 - 10:14 pm | पिलीयन रायडर

मुलाला शुक्रवार रात्रीतुन ताप आल्याने पुढचे दोन दिवस त्याच्याच मागे गेलेत. सपशेल विसरुन गेले की असं काही करायचं होतं. अजुन २ दिवस तर असेच जातील. झोप होत नाहीये नीट त्यामुळे सुर्यनमस्कार घालायला गेले तर साष्टांग नमस्कार घालताना तिथेच झोपुन जाईन! जे काही करेन ते लिहीते इथे.

आज तीन किमी सलग. तुलनेत वाढीव वेगाने.

इथल्या इतरांच्या मानाने तीन किमी म्हणजे काहीच नाही. पण एकेकाळी अर्धा किमीदेखील चालण्याची मारामार होती, त्या तुलनेत ही वाढलेली स्टॅमिनापातळी फार आनंददायक वाटते.

हळूहळू साडेतीन मग चार असं करता येईल.

आज तीन किमी सलग. तुलनेत वाढीव वेगाने.

इथल्या इतरांच्या मानाने तीन किमी म्हणजे काहीच नाही. पण एकेकाळी अर्धा किमीदेखील चालण्याची मारामार होती, त्या तुलनेत ही वाढलेली स्टॅमिनापातळी फार आनंददायक वाटते.

हळूहळू साडेतीन मग चार असं करता येईल.

चंबा मुतनाळ's picture

1 Jan 2017 - 6:10 pm | चंबा मुतनाळ

आज नववर्षानिमित्त पुण्यात ९ किमी धावलो

चंबा मुतनाळ's picture

1 Jan 2017 - 6:10 pm | चंबा मुतनाळ

आज नववर्षानिमित्त पुण्यात ९ किमी धावलो

मित्रहो's picture

1 Jan 2017 - 10:09 pm | मित्रहो

काल नवीन वर्षाचा निरोप १०२ किमी सायकल हैद्राबाद ते चेवेला आणि तसेच परत. मस्त रोड आहे. आज रिकव्हरी राइड ४५ किमी चिलकूर आणि आसपास. एकूणच आठवडाभरात २०३ किमी. साऱ्या राइड एकट्यानेच. बरेच दिवसानंतर मिपावर आलो. दहा ते बारा डिसेंबर मधे सुद्धा एक शतकी राइड ११५ किमी. हैद्राबाद क्लब राइडच्या मार्गाने. भयंकर हाल झाले होते. प्रचंड भूक लागली आणि खायला काही मिळत नव्हते. सध्याच्या वातावरणात सकाळी थंडीचा आळस सोडला तर मग सायकलींगला भरपूर मजा येते.
२०१६ मधे ४५०० किमी सायकल चालविली. सायकलींग साठी वर्ष मस्त गेले. एकदम पैसा वसूल.

राजेंद्र देवी's picture

2 Jan 2017 - 1:59 pm | राजेंद्र देवी

हे असेच चालायचे ...

लहानपणी एक पाय नाचिव रे गोविंदा किंवा चाल चाल बाळा तुझ्या पायात वाळा पासून चालणे सुरू झाले ते तेवढ्यापुरतेच मर्यादित होते. म्हणजे तसे लहानपणापासून आपण किती चाललो हे आपणास लक्षात येत नाही. गावी १०वी पर्यंत पायात चप्पल हा प्रकार नव्हता. सगळीकडे अनवाणीच फिरायचे. ११वी ला अहमदनगराला शिकण्यास गेलो अन पायात पहिल्यांदा स्लीपर आली. नगरला असताना जवळच असणारे केडगाव येथे एकदा यात्रेसाठी चालत गेलो होतो. नंतर कॉलेज शिक्षण घेण्यासाठी पुन्हा गावी परत आलो. कॉलेज शिक्षण पूर्णं करून नोकरीसाठी पुणे गाठले व येथेच स्थायिक झालो. असो हा थोडक्यात पूर्व इतिहास. पुण्यात सायकल स्कूटर अन नोकरीच्या जागी कंपनीच्या बसने प्रवास अन बैठे काम म्हणजे थोडक्यात चालणे हा प्रकार फारच कमी. फक्त गणपती पाहण्यासाठी जे काही पायी हिंडलो असेल तेवढेच. माझ्या कंपनीतील सहकारी सतत कुठे ना कुठेतरी पायी दौरा करीत असत व त्याचे रसभरीत वर्णन करीत असत. ते ऐकून मलाही वाटे की आपणही थोडे चालावे म्हणून सरावासाठी रोज १-२ की.मी. सुरुवात केली. वयाची पन्नाशी उलटून गेल्याने हा सराव हळूहळू वाढवितं होतो. शेवटी एकदा सहकाऱ्यांना सांगितले की मला पण तुमच्या बरोबर पायी यावयाचे आहे. पहिली भ्रमंती ठरविली कात्रज बोगदा. म्हणजे कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. तेथून बसने घरी. ६.३० ते १०.३० या वेळेत हे चालने पूर्णं केले. पौर्णिमेची रात्र असल्याने मजा आली. बोगद्यामध्ये जरी दिवे असले तरी बॅटरी वापरणे अपरिहार्य होते कारण लोखंडी ऍगल पायात आडवे येत होते अन गाड्यांचा धूर पण भरपूर होता

कात्रजच्या या यशस्वी चालीनंतर काही दिवसांनी ठरविले की ऑफिस सुटले की अकुर्डी ते देहू हे अंतर चालत जावयाचे. हे अंतर फक्त १२ की. मी. होते. तुकारामाच्या समाघीचे दर्शन घेऊन व येताना बसने घरी परतलो. चालताना भंडारा डोंगर पाहिला व पुढील वेळी येथे यावयाचे ठरवले पण तो योग आला नाही. अशा प्रकारे पायी चालण्याचा छंदच जडला. असेच एकदा सहजच ठरविले की का आपण ऑफिसमधून घरी बसने जाण्यापेक्षा चालतच जाऊ नये ? झाले. अकुर्डी ते दगडूशेठ गणपती असे २० की. मी. अंतर ५.३० ते रात्री ९.३० वेळेत पूर्णं केले. जुलै महिन्यात (भर पावसात) सहकाऱ्यांनी ठरविले म्हणून सिंहगडावर जायचे ठरले. पहाटे ५ वा. स्वारगेट ला रेनकोट वै. घालून हजर. पाऊस चालूच होता. मित्रांची वाट पाहत होतो पण कोणी आलेले दिसले नाही. वाटले पुढील थांब्यावर येतील पण कोणी आले नाही. आता काय करावयाचे. वाट माहिती नाही. योगायोगाने बसमध्ये एक कंपनीतील ओळखीचा चेहरा दिसला. तो खूपच अनुभवी होता अन मी नवशिका. असो. त्याच्याबरोबर सिंहगड भर पावसात चढावयास सुरुवात केली पण त्याचा वेग जास्ती होता व त्याला माझ्यावेगाने चालणे अवघड वाटत होते. शेवटी त्याला पुढे जाण्यास सांगून मी माझी चढाई चालूच ठेवली. पाऊस भरपूर होता. वरून पावसाच्या धारा अन रेनकोट मध्य घामाच्या धारा. पायवाटेवरून पाण्याचे लोट वाहत होते त्यामुळे त्या पाण्यातूनच वाट तुडवीत होतो. रस्ता नीट कळत नव्हता. पावसामुळे थोडेच लोक आले होते व ते पण केव्हाच वर चढून गेले होते. कसाबसा धापा टाकत पाऊण सिंहगड सर केला तेव्हा माझ्याबरोबर असणारा कंपनीतील सहकारी वर जाऊन परत फिरला होता. त्याने धीर दिला अन म्हणाला आता थोडेच राहिले आहे, बरोबर येऊ का? त्याला नकार दिला अन सांगितले की मी ह्या पावसात आता तुझ्याबरोबर परत उतरणार नाही. तू जा. मी जीपने खाली येईन. आणि मी देवाचे नाव घेत तसाच गड सर केला. हा अनुभव फारच वेगळा अन रोमांचकारी होता. जीपने उतरून बसने घरी परतलो अन मित्रांना फोन केला की ते का आले नाही. त्यांना तर मी सिंहगडावर जाऊन आलो यावर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटले की मी काही या पावसात येत नाही व त्यांनी पण पावसामुळे येणे रद्द केले.

यानंतर साघारणतः पुढच्या महिन्यात कंपनी(अकुर्डी) ते आळंदी असे चालत जायचे ठरले अन १८ की. मी. प्रवास ४ तासात पूर्णं केला. आळंदीला दर्शन घेऊन बसने घरी परतलो. घरची मंडळी म्हणू लागली की एवढे चालू नका पण चालायची खुमखुमी काही कमी होत नव्हती. एकदा रविवारी कोथरुडला नातेवाइकांकडे जायचे होते. तेव्हा सहज गंमत म्हणून बसने न जाता मी ते ८ की. मी. अंतर चालत गेलो. परगावी सुद्धा हातात सामान वै. नसेल तर स्टॅड ते घर चालतच जायचो. सकाळी चालण्याची मजा काही औरच आहे. अजिबात थकवा जाणवत नाही. थोड्याचं दिवसाने टूम निघाली. राजगड करायचा आहे. अर्थात पौर्णिमेची रात्र निवडली होती. गुंजवणे मार्गे जायचे ठरले. कंपनी सुटल्यावर स्वारगेट वरून निघालो अन रात्री ८ वा̱. गुंजवणे ला पोहचलो. रात्रीच गड चढावयास सुरवात करून १२ वा. वर गडावरती पोहचलो. तेथील मंदिरात जेवण करून झोपलो. सकाळी बालेकिल्ला केला , संजीवनी माची केली अन दुपारी २ वा. गड उतरण्यास सुरुवात केली. गुंजवणे ते कात्रज जीप व नंतर बसने घरी. (या लेखात गडाचे वर्णन वै. लिहितं नाही कारण ते सर्वत्र उपलब्ध आहे. ) असो. काही दिवसांनी पुन्हा कंपनीच्या बसने तळेगावला उतरून तेथून चालत शिरगाव (प्रती शिर्डी) ला १६ की. मी. चालत मुंबई पुणे मार्गे अकुर्डीला आलो अन बसने घरी.

काही दिवसानंतर पुन्हा टूम निघाली की आळंदीला जायचे पण या वेळेस ते दगडूशेठ ते आळंदी असे २४ की. मी. चालावयाचे. पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत ते पूर्णं केले. अधे मध्ये २-३ वेळा रवीवारी सिंहगड चढणे उतरणे चालूच होते. आता चालण्यास वेग आला होता व सरावलो होतो. साधारणतः ५० मिनिटात वर जाता येत होते. वर पोहताच १ ग्लास सरबत अन लगेच परत खाली उतरणे. पण राजगडच्या ट्रेकने गड पुन्हा पुन्हा बोलवू लागले होते. सर्वांनी ठरविले की यावेळी हरिश्चंद्र गड करूया. मग काय ऑफिस सुटले की राजगुरुनगरला उतरून खिरेश्वर ला बसने गेलो. रात्री (पौर्णिमा) ९ वाजता सुरुवात केली अन टोलार खिंडीत १२ वा. पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा गड चढावयास सुरुवात केली. रात्री २वा. गडावर पोहचलो. गुहेत जागा नसल्याने तेथील झोपडीत आश्रय घेतला. फेब्रुवारी महिना होता तरीपण गडावर खुप थंडी होती. सकाळी स्नान करून तारामती पॉइंट पाहून दुपारी विश्रांती घेतली. ४ वाजता प्रसिद्धं कोंकण कडा पाहण्यास गेलो. अप्रतिम व अवर्णीनीय. तेथून गुहेत जागा मिळवली. रात्री खिचडी खाऊनं झोपलो. सकाळी उठून पाचनाई मार्गे गड उतरलो व पुण्यास परतलो.

अधूनमधून कंपनी (अकुर्डी) ते घरी (रविवार पेठ) अशी चालत जाण्याची हुक्की येई. हे २० की. मी. अंतर अंदाजे ४ तासात पूर्णं होई. असेच एका रवीवारी चतुर्थी येत होती. हा योग साधून आम्ही सारस बाग गणपती ते थेउर २५ की. मी. सोलापूर रस्त्याने गेलो. पहाटे ५ ला सुरुवात केली व १० वा. थेउरला पोहचलो. १ तास रांगेत उभे राहिलो व दर्शन घेतले अन बसने घरी परत. आमचे सर्व चालणे साधारणात १ महिन्याच्या अंतराने असे. वातावरण , वेळ, प्रसंग पाहून ठरवीत असू.

मध्ये बरेच दिवस हालचाल नव्हती अन चुळबूळ सुरू झाली कारण माझे एक सहकारी श्री. मराठे हे चालण्यात एकदम तरबेज. त्यांनी ३-४ वेळा पुणे ते अक्कलकोट, पुणे ते पंढरपूर, पुणे ते पंढरपूर व तेथून अक्कलकोट असे पायी प्रवास रोज ५० ते ६० की. मी. वेगाने पूर्णं केले होते. २५० ते३००की. मी. चालणे व बसने परत. अर्थात माझी तेवढी तयारी नसे. पण मला वाटे की आपण एका दिवसात किती चालू शकू? हे पाहावे म्हणून त्यांना एकदिवसीय पायी प्रवासाचे मनोगत सांगितले अन ठरले की चालत नारायणपुरला जायचे. रात्री ८ वा. (पौर्णिमा) शंकर महाराज मठापासून सुरुवात केली. कात्रज बोगद्याजवळ नास्ता केला. पुढे कैलास ची भेळ रात्री १२ वा. खाऊनं पहाटे ४ वाजता नसरापुर फाटा गाठला. पाय खूपच दुखू लागले होते अन फोड पण आले होते. परत फिरावे असे वाटू लागले पण मन हार मानावयास तयार नव्हते. शेवटी तसेच चालत चालत पहाटे ६ वाजता बालाजीला (नारायणपुर) पोहचलो. तेथे अंघोळ करून दर्शन घेतले व जीप/ बसने घरी परत आलो. हा ४२ की. मी. चा टप्पा गाठू शकलो. आतापर्यंतचा हा माझा सर्वात मोठा पल्ला.

पण हायरे दैवा ... पुढे पुढे माझे गुडघे दुखू लागले. औषधाने थोडे बरे वाटे पण त्रास वाढू लागला. डॉ. नि चालण्यास बंदी केली आणि माझा २-३ वर्षाचा चालीत्सोव बंद पडला. मनाची खुप तयारी असली तरी आता शरीर साथ देईनासे झाले. आता गरजेपुरते थोडे चालतो. असो हे सर्व जसे आठवेल तसे लिहून काढले आहे. आपण काय करू शकतो हे आपणास केल्याशिवाय कळत नाही. आपली ताकद आपण अजमावून पाहत नाही. पन्नाशीनंतर मी हे सर्व करू शकलो यावर माझाच विश्वास बसत नाही. अजूनही खुप चालावे वाटते. दुर्ग खुणावतात पण ... हे असेच चालायचे

राजेंद्र देवी.

नितीन पाठक's picture

2 Jan 2017 - 2:15 pm | नितीन पाठक

२०१७,
नवीन वर्षाची सुरूवात चांगली झाली. सकळी नेहमीप्रमाणे ६.५ किमी चालणे आणि संध्याकाळी ४१.९ किमी सायकलींग केली.