सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
5 Dec 2016 - 8:15 pm

'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली. 'का करू सजनी आये ना बालम' या ठुमरीतुन ति भेटत नसल्याची जी व्याकुळता पेश केलित ती अगदी लाजवाब आहे.
'हंगामा है क्यूँ बरपा' म्हणा,
'हम तेरे शहर में आये है मुसाफिर की तरह' किंवा 'वो जो हम में तुम में करार था' सगळच एक से बढ़ कर एक.....
सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'....

गझलसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

सानझरी's picture

5 Dec 2016 - 8:25 pm | सानझरी

वाह!! झकास धागा.. आवारगी माझ्या आवडीच्या ग़झल पैकी एक..
अंदाज़ अपने देखते हैं आईने में वो
और ये भी देखते हैं कि कोई देखता न हो।

इक अजनबी झोंके ने जब पूछा, मेरे ग़म का सबब
सहरा की भीगी रेत मैंने लिखा.. आवारगी..

स्वलिखित's picture

6 Dec 2016 - 10:47 am | स्वलिखित

मस्ती भरी नजर का नशा है मुझे अभी,
ए जाम दुर रख दो
पिलुंगा फिर कभी...

वेल्लाभट's picture

6 Dec 2016 - 12:30 pm | वेल्लाभट

ब्लॉग दुवा

तुमच्या पोस्ट वरून प्रेरणा घेऊन मीही शुभेच्छा दिल्या.

चुपके चुपके आमच्या आयुष्यात आलात
मनात हंगामा करून आवारगी चं दान दिलंत
भावनांची बिन बारिश बरसात केलीत
आम्ही अपनी धुन में रहायला लागलो
कुणी ए हुस्न-ए-बेपर्वाह शोधायला लागलो
बेचैन बहुत फिरना, अपनी तस्वीर को देखना
नेहमीचंच झालं मग, खुशबू जैसे लोग मिलना
वो कभी मिल जाए तो म्हणत ये दिल, ये पागल दिल होणं
इतनी मुद्दत बाद मिले तो हाल ऐसा नही के म्हणणं
महफिल में बार बार, उनसे नैन मिला कर बघणं
पत्ता पत्ता बूटा शोधत फासल्यांची बोच सलणं
मनातलं मग न सांगता, तुमच्या त्या ग़ज़लेला कळणं

आमचं सुदैव, तुम्हाला याची देही ऐकू शकलो
शब्दसुरांचा अजोड मिलाफ प्रत्यक्षात जगू शकलो
ग़ज़ल ऐकली ना, की दिल धडकने का सबब काय ते कळतं
काढलंच कुणी वेड्यात, तर मेरे शौक़ दा नै इतबार तैनु ओठी येतं
खुली जो आंख तो जाना, की गोष्टी बाकी राहिल्यात काही
फिरून येतो पुन्हा हुरूप की, ये कहानी फिर सही

माझ्यापुरतं सांगायचं तर ग़ज़ल = ग़ुलाम अली = दैवत.
ये कहने के लिये भी हम बहोत छोटे है, पर
सालगिरह मुबारक ग़ुलाम अली साहब!
५ डिसेंबर १९४०

जयन्त बा शिम्पि's picture

7 Dec 2016 - 4:45 am | जयन्त बा शिम्पि

सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.
हमे तो ये सुनकर " दिलमें इक लहेरसी उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी " ऐसा ही महसूस हुआ.
फिर मनमें गीत आने लगा, " फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम,ऐ सनम, हम ना भुलेंगे तुम्हें , अल्ला कसम ,"

गुलाम अली साहेबांनी जे दिलंय ते वर्णनापलीकडलं आणि आभार मानण्यापलीकडलं आहे. जे ऐकत ऐकत मोठा झालो ते सर्व आता स्वतःच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनलंय. ते आता आमच्यासोबतच जाणार.

जियो साहब...

कपिलमुनी's picture

7 Dec 2016 - 11:52 am | कपिलमुनी

पाक कलाकारांवर घातलेली बंदी आठवली !
म्हणजे यांचा कलेचा आस्वाद तर हवा पण त्याचे पैसे त्यांना द्यायला नको !

ही खूप कठीण निवड आहे कपिलमुनी. कलाकाराबद्दलचं प्रेम, कलेबद्दलचं प्रेम तितकंच निर्मळ आहे जितका स्पष्ट राग त्या कलाकाराच्या देशाबद्दल आहे.
आणि निर्णय राजकीय किंवा तात्विक असू शकतो, पण मनाला या दोनही गोष्टी कळत नाहीत. कसा मार्ग निघायचा? कठीणच.

तेजस आठवले's picture

10 Dec 2016 - 8:43 pm | तेजस आठवले

असे नाही.कला, संगीत हे सगळ्याच्या पलीकडचे आहे, दैवी आहे असे म्हटले तरी चालेल. पाक कलाकार इकडे भारतात येऊन काही उपद्व्याप करू नयेत म्हणून बंदी घालणे योग्य ठरते. बाकी कोणी त्यांचे पैसे बुडवले आहेत का ?

म्हणजे यांचा कलेचा आस्वाद तर हवा पण त्याचे पैसे त्यांना द्यायला नको !

याच न्यायाने आपण पण असे म्हणू कि इकडे येऊन पैसे मिळवतात आणि त्याच पैशाने निरपराध लोक मारतात.

तेजस आठवले's picture

10 Dec 2016 - 8:36 pm | तेजस आठवले

"का करू सजनी आये ना बालम" हे बडे गुलाम अली खान यांच्या आवाजात ऐकल्यानंतर परत दुसऱ्या कोणाच्या आवाजात ऐकायला जड जाते. येशुदास ने पण त्याचे एक व्हर्जन म्हटले आहे पण फारसे खास नाही.