पाकिस्तानचा "बुरखा' फाटला

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
12 Feb 2009 - 2:56 pm

मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजला नाही, या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंधच नाही, असे तुणतणे वाजविणाऱ्या पाकिस्तानने अखेर या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजल्याचे मान्य केले. वारंवार खोटे बोलणाऱ्या पाकिस्तानचा खरा (काळा) चेहरा तेथील सरकारने आज स्वत:च जगासमोर उघड केला आहे. मात्र, देशविहीन शक्तींचे (नॉन स्टेट ऍक्‍टर) हे कारस्थान असून, त्यांनी स्वत:चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे कृत्य केल्याची सारवासारव पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी केली आहे. तसेच रशिया, इटली, स्पेन आणि अमेरिका हे देशही मुंबई हल्ल्याशी संबंधित असून, या देशांतही कटाचा काही भाग शिजला आहे. या देशांप्रमाणेच पाकिस्तान हा एक देश आहे, असेही या मंत्र्याने म्हटले आहे.
मुंबईवरील हल्ला झाल्यानंतर त्यासंबंधीचे पुरावे भारताने पाकिस्तानच्या थोबाडावर फेकले होते. या पुराव्यांनी थोबडा फुटले असतानाही पाक सरकारने वेळोवेळी हात झटकले. हल्लाप्रकरणातील जिवंत पकडला गेलेला आरोपी अजमल कसाबही हा पाकिस्तानी नागरिक नाही, अशी धादांत खोटी भूमिकाही पाकिस्तान सरकारने ठामपणे घेतली होती. मात्र, भारताचे पुरावे भक्कम असल्यामुळे पाकिस्तानला काळवंडलेल्या चेहऱ्याने सत्य कबूल करावे लागले.
मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग होता, असे त्यांनी म्हणणे ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे. आता हल्ल्याशी संबंधित आरोपींना ताब्यात मिळविण्यासाठी भारताने तातडीने प्रयत्न करायला हवेत.

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

12 Feb 2009 - 3:07 pm | सायली पानसे

मांजर डोळे मिटुन दुध पिते पण जगाला खर काय ते दिसतच कि.
हि त्यांची नवि चाल असावि.... आता ते आपल्या सरकार कडे कसाब ला मागतिल... कि ईन्क्वायरि करता कसाब ला द्या.... मग झाल...आधि त्या कसाब ला गेट वे ऑफ इंडिया समोर जाहिर फाशि द्यायल हवि.... मग करा काय करयचे ते.
ह्यावेळेला सोडता कामा नये सरकार ने...पापाचा घडा आता भरला आहे ..

अन्वय's picture

12 Feb 2009 - 3:27 pm | अन्वय

कसाबला जाहीर फाशी हीच शिक्षा योग्य असली, तरी त्याला आताच मारणे उचित ठरणार नाही. कारण पाकिस्तानचा बुरखा फाडणारा तोच एकमेव माणूस भारताच्या ताब्यात आहे. त्याला मारणे म्हणजे मुंबई हल्ल्यातील सर्व पुरावे नष्ट करण्यासारखे आहे.

मराठी_माणूस's picture

12 Feb 2009 - 3:07 pm | मराठी_माणूस

आरोपींना ताब्यात मिळविण्यासाठी भारताने तातडीने प्रयत्न करायला हवेत.

बरोबर , पण दाउद आजता गायत आपल्या हातात आलेला नाही ही वस्तुस्थीती आहे

अन्वय's picture

12 Feb 2009 - 3:22 pm | अन्वय

खरं आहे. "आता हल्ल्याशी संबंधित आरोपींना ताब्यात मिळविण्यासाठी भारताने तातडीने प्रयत्न करायला हवेत' असे मी म्हटले आहे, ते दाऊदमुळेच. कारण तोच भारतावरील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे. त्याच्या मदतीशिवाय एकाही पाकड्याला भारतात हल्ला काय, प्रवेशही करता येणार नाही. त्याला ताब्यात मिळविण्यासाठी आता भारताने पाकिस्तानवर आणखी दबाव टाकायला पाहिजे.

मृगनयनी's picture

12 Feb 2009 - 3:53 pm | मृगनयनी

खरं आहे. "आता हल्ल्याशी संबंधित आरोपींना ताब्यात मिळविण्यासाठी भारताने तातडीने प्रयत्न करायला हवेत' असे मी म्हटले आहे, ते दाऊदमुळेच. कारण तोच भारतावरील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे. त्याच्या मदतीशिवाय एकाही पाकड्याला भारतात हल्ला काय, प्रवेशही करता येणार नाही. त्याला ताब्यात मिळविण्यासाठी आता भारताने पाकिस्तानवर आणखी दबाव टाकायला पाहिजे.

»

सहमत!

पण दबाव टाकल्यानन्तर पाकिस्तान इतक्या सहजासहजी मानेल,असे वाटत नाही.
आजवर भारताकडे पाकविरूद्ध इतके पुरावे आहेत, तरीपण आपण निषेध करण्यापलिकडे आणि सिद्धांत मांडण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. कारण कोणत्याही देशावर हल्ला करण्यापूर्वी , अमेरिकेची परवानगी घ्यायचा आपण करार केलेला आहे.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

सायली पानसे's picture

12 Feb 2009 - 3:16 pm | सायली पानसे

ईथे दुबईत आमच्या घराजवळ्च्या नविन मशिदिच्या उद्घाटनाला दाउद भाउ आले होते प्रमुख पाहुणे म्हणुन..... पुर्ण सेक्युरिटि समवेत.... सरकारि तसेच वैयक्तिक ... दाउद चा बंगला टॅक्सी वाले दाखवतात...........
तरी सरकार साठि दाउद बेपत्ता आहे.

नेमक हे व्यासपीठ शुध्द आहे,नाहीतर, त्याच्या आयला..XXXXXX XXXXXX XXXXXX XXXX

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

अभिष्टा's picture

12 Feb 2009 - 3:44 pm | अभिष्टा

काही बुरखा फाटला बिटला नाहिये आणि फाटला तरी ते निर्लज्जपणे ठिगळ लावून घेतात. त्यांचा बुरखा टरकावून चिंध्या करुन फेकून दिला पाहिजे म्हणजे शिवायला काही उरणारच नाही.
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा

गणा मास्तर's picture

12 Feb 2009 - 7:21 pm | गणा मास्तर

ह्या कबुलीजबाबाचा पुर्ण फायदा करुन घेतला पाहिजे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

विसोबा खेचर's picture

12 Feb 2009 - 10:35 pm | विसोबा खेचर

एक नंबरचे मा***द आहेत साले!

तात्या.

चित्रादेव's picture

13 Feb 2009 - 12:42 am | चित्रादेव

पण ही अमेरीका मध्येच घूसखोरी करून भारताने काय करावे नी काय करू नये सांगणारी कोण?
ते नै का लहान मूल आई मी खेळायला जावू का? अशी आईची परवानगी घेते तसेच भारताने अमेरीकाशी 'तो' मुर्ख करार(कोणत्याही देशावर हल्ला करण्यापूर्वी , अमेरिकेची परवानगी घ्यायच) केला आहे.

शेवटी काय अमेरीकेचा फायदा आहे ना. एका प्रकारे अमेरीकेने पण पाकीला पाठीशी घातलेच आहे.

वाहीदा's picture

13 Feb 2009 - 2:11 pm | वाहीदा

यांना तर आधी देवा धर्माच्या नावाखाली हरामखोर पणा करतात म्हणुन फटकेच द्यायला पाहीजेत !
उनके वतन की बुनीयाद ही नफरत पे बनी है ....
जिनकी नियत मै ही खोट हो... वो ईमान कहां से लायेंगे ??
मुसलमान नहीं , बेईमान है पाकीस्तान ....
ईस्लाम को बदनाम कर के रख दिया अपने मतलब परस्ती के लिये

खुदगर्ज .... कमजब्त !

~ वाहीदा

शंकरराव's picture

13 Feb 2009 - 2:14 pm | शंकरराव

व्वा व्वा !!
सुभान अल्लाह .. बाहिदा जी क्या खुब कही आपने.. इन लब्जोंको हमारा सलाम

शंकरराव

डी.पी.शर्मांनी लिहिलेलं आय.एस.आय. च्या कारवाया वाचा.

२६/११ काहीच वाटणार नाही.

आणि या सर्वांच्या पाठी डॉलरची जादूची कांडी फिरवणारा टोपीवाला जादूगार आहे, हे पुराव्यानिशी पटेल.

आपला नम्र,
वडापाव

वडापाव's picture

14 Feb 2009 - 6:32 pm | वडापाव

डी. पी. शर्मा चुकून लिहिले.

पी. डी. शर्मा

आपला नम्र,
वडापाव

मराठी_माणूस's picture

16 Feb 2009 - 7:00 am | मराठी_माणूस

ह्याच जादुगाराची तोंड फाटेपर्यंत (टंकुन बोट दुखे पर्यंत) स्तुती करणारे आपलेच कितितरी लोक आहेत.

सिद्धेश's picture

13 Feb 2009 - 9:23 pm | सिद्धेश

अशा प्रसंगी नेहमी भारताचा बायनेपणा नडतो. ईस्राईलने फक्त तस्करीच्या कारणावरुन जबरदस्त धुमाकूळ घातला. कोणतीही जीवित हानी झालेली नसताना.
आणि आपल्याकडे अतिरेकी मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात घुसतात काय आणि दोनशे लोक मारतात काय आणि आपण नुसते पुरावे शोधत बसलोय. अशा वेळेला एक घाव दोन तुकडे हेच योग्य. भारतात लोकशाहीचा अतिरेक झाल्याने कोणतेही निर्णय झटपट घेता येत नाहीत.त्यामुळे आपण नुसते 'पापस्तानला' गुदगुल्या केल्यासारखे पुरावे शोधत बसलोय आणि त्यान्च्या प्रतिक्रिया मागतोय भोसकत नाही.

हरकाम्या's picture

14 Feb 2009 - 11:57 am | हरकाम्या

मुळात पाकिस्तानने बुरखा घातलेला नाही आपण डोळ्यावर चांगुलपणाची झापडे लावलेली आहेत त्यामुळे हे घडतय.
शिवाय आपली पाहुण्याच्या ***** विंचु मारण्याची सवय अजुन गेलेली नाही. त्याचीच फळे आपण भोगतो आहोत,
आणि पुधे ही भोगणार आहोत्.शिवाय आपल्यातले घरभेदी आपण शोधु शकत नाही त त्याची ही फळे आपण चाखतो आहोतच.