पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!!?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
1 Dec 2016 - 8:29 pm

२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही.
बायकाही पुरुषांचे लैंगिक शोषण करतात /करु शकतात असे गृहीतक जर कुणी मांडले तर ते एकतर खोटे आहे अथवा हास्यास्पद आहे असे समजले जाते.पण काही पुरुषांना बायकांचे वाईट अनुभव येतात हे खरे आहे.कायद्याचे संरक्षण सर्व बाबतीत स्त्रीला असल्याने पुरुषांना कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न पडतो.काहीही झालं तरी चूक पुरुषाचीच असते असा प्रवाद असल्याने स्त्रीच्या अत्याचाराला बळी पडलेले पुरुष कुठेच दाद मागायला जात नाहीत.
मलाही माझ्या वैयक्तीत आयुष्यात अश्या स्त्रीयांचे वाईट अनुभव आले होते.पैकी खाली काही देत आहे.
अनुभव१
मी कॉलेजला असताना ,२००४ ला पहिल्यांदा मला बायकाही क्रुर वागु शकतात व पुरुषांचा यथेच्य विनयभंग करु शकतात याचा अनुभव आला.झालं होतं असं कि आमच्या केमिस्ट्री लॅब मध्ये एक महिला लॅब अटेडंट होती.एकदा माझ्याकडून practicle चालू असताना महागडा थर्मामीटर फुटला.मला शिव्या बसल्याच पण त्या महिला लॅब अटेंडंट्लाही शाब्दीक मार सर्वांसमोर मिळाला,का ते माहीत नाहि.पण तीने त्या दिवसापासुन मला त्रास द्यायला सुरवात केली.सर्वांसमोर मला तब्येतीवरुन चिडवणे ,practicleला आवश्यक वस्तु देताना सहेतुक स्पर्श करणे ,रोखुण बघणे,माझ्या मित्रांना खाजगित मी तिच्या प्रेमात पडलो आहे असे अप्रत्यक्ष सांगणे असे अनेक प्रकार तिने केले.
तिच्या प्रेमात पडण्याचा प्रश्नच नव्हता,दिसायला बरी असली तरी मला तिच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता.माझं लक्ष फक्त अभ्यासावर होते.२००४ च्या त्या सहा सात महिण्यात तिच्या harassment चा व unwanted sexual advancesचा मला मानसिक त्रास झाला.मित्र म्हणायचे एंजॉय कर,पण आवडत नसलेल्या बाईची नकोशी जवळीक एंजॉय कशी करायची.तक्रार करायला गेलो असतो तर मीच तिला exploit करतोय असा अर्थ लगेच काढला गेला असता,ते मला नको होते.ति तेव्हा तिशीत होती ,मॅरीड होती.पण स्त्री असुन इतकी सायकोपॅथिक कशी हा प्रश्न मला अजुनही पडतो.
अनुभव २
एकदा महामंडळाच्या लालडब्याने प्रवास करताना एक मध्यमवयीन महीला माझ्या शेजारी येऊन बसली.बस कधी सुटणार वगैरे चौकश्या करायच्या त्यातिच्या माझ्याकडे करुन झाल्या.बस सुटल्यावर यथावकाश बसमधले दिवे घालवल्यावर तिने मला खेटायला सुरवात केली,असेल चालू म्हणुन मी दुर्लक्ष केले .पण तिने चक्क त्या अंधारल्या बसमध्ये माझा हात हातात घेतला .मध्यममार्गी व पांढरपेशा मानसिकतेमुळे मी ओशाळलो.हात झटकम सोडवून घेतला व सीट बदलुन बसलो.तिचा स्टॉप आल्यावर तिने वळुन माझ्याकडे बघितले ,व ' मी फार काही गमावले ,असा हसरा कटाक्ष टाकून निघुन गेली.तिच्या अश्या वागण्याने मला त्या प्रसंगात काही सुचले नाही..आपणच संधी गमावली का ? असा एक पुरुषी विचारही मनात येऊन गेला .पण पांढरपेशी मानसिकता असल्याने गप्प राहीलो.

अनुभव ३
आमच्या इथल्या एका नवीन शॉपिंग सेंटरमधे गेलो होतो,खरेदी झाल्यावर काउंटरपाशी आलो.काउंटरवर एक मुलगी बसली होती.
काउंटरवरची ती-( हसुन) आवडले तुम्हाला?
मी- काय ते?
ती- (डोळ्यात रोखुन बघत)आमचे शॉपिंग सेंटर?
मी- हं,बिल करताय ना?
ती-( माझ्या डोळ्याशी भिडवलेले डोळे न हलवता) करतेय की!
मी- कीती झाले?
ती- (लाडात येऊन) लीहलेय की त्याच्यावर!
मी बिल देऊन पुढे गेल्यावर मागे वळुण पाहिले, तिने शेजारच्या काऊंटरवरच्या टगीला टाळी दिली व कसा नजरेने गार केला' असा भाव चेहर्यावर आणला.
तर मंडळी पुरुषांचाही विनयभंग होतो.एक स्त्री तो करु शकते.आज स्त्री सुरक्षेविषयी काथ्याकुट होत असताना ही बाजुही पुढे आलि पाहिजे असे वाटल्याने अनेक अनुभवापैकी हे काही अनुभव शेअर केलेत.आपल्याला आवडलेल्या स्त्रीचा सहवास मिळावा असे मला वाटायचे / वाटते,तसा तो मिळालाही.पण हे unwanted sexual advances ही वाट्याला आले.मान्य, स्त्री इतका पुरुषांना याचा त्रास होत नाही ,पण आखीर मर्द भी इन्सान होता है ना.त्याचि काळजि करणारे कुणीच नाही,तसे कायदे नाहीत हे पाहुन खेद वाटल्याशिवाय रहात नाहि.

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 8:32 pm | टवाळ कार्टा

इथेही काही आगाऊ मिपाबायका आहेत म्हणे, सांभाळून रहा =))

Deserter's picture

1 Dec 2016 - 8:36 pm | Deserter

किती फेकाल काय मर्यादा आहे की नाही

बाकी हे शॉपिंग सेंटर आहे कुठे ? पत्ता टाका कि .,.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 9:13 pm | टवाळ कार्टा

+६६१११११११११११६१

सामान्य वाचक's picture

1 Dec 2016 - 9:04 pm | सामान्य वाचक

त्यांच्या वरही बऱ्याच मुली भाळायच्या म्हणे

पगला गजोधर's picture

1 Dec 2016 - 9:09 pm | पगला गजोधर

टॅफीजी

आता तुमच्यासाठी माझे 2 प्रश्न

1. तुमच्याकडे स्वतःची एखादी जुनी लुना आहे का ?
2. तुमचे आडनाव "ब्रम्हे" आहे का ? तुम्ही किंवा एखाद्या नातेवाईकाने, मुक्तपीठमधे काही लेख लिहीलेले का ?

श्रीगुरुजी's picture

1 Dec 2016 - 9:10 pm | श्रीगुरुजी

मी बिल देऊन पुढे गेल्यावर मागे वळुण पाहिले, तिने शेजारच्या काऊंटरवरच्या टगीला टाळी दिली व कसा नजरेने गार केला' असा भाव चेहर्यावर आणला.

त्या दुकानात गेला होता त्यावेळी चुकुन तुमचं पोस्ट उघडं होतं का हो? बहुतेक ते उघडं असावं म्हणूनच त्या महिला तुमची फिरकी घेत असाव्यात. तुम्हाला वाटलं की त्या आपल्या विनयभंग करताहेत. पण त्या तुमच्या पोस्टाकडे बघून टिंगल करत असाव्यात. असो. बाहेर जाताना यापुढे काळजी घ्या.

कानडाऊ योगेशु's picture

2 Dec 2016 - 1:33 pm | कानडाऊ योगेशु

मी चुकुन लिंगल असे वाचले.

इरसाल's picture

1 Dec 2016 - 9:32 pm | इरसाल

अनोळखी मुलीला स्वतःच्या लुनावर बसवुन वर ४००० (त्या काळात ) देणारे ब्र्ह्मे....हेच ते.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Dec 2016 - 9:36 pm | माम्लेदारचा पन्खा

आत्महत्या ते विनयभंग......एक प्रवास......

स्किझोफ्रेनिया....एक आभास.....

रामन राघव....एक त्रास......

हागणदारीमुक्त मिपा...एक आस....

(कॉपीराईट विकत घ्यावा लागेल...इच्छुकांनी नोंद घेणे !)

खटपट्या's picture

1 Dec 2016 - 10:11 pm | खटपट्या

लोल

वरुण मोहिते's picture

1 Dec 2016 - 10:22 pm | वरुण मोहिते

टफी तुमचा नंबर द्या ना .. साताऱ्याला येऊ मटण खाऊ . मज्जा करू. तुमची ओळख आहे तिथल्या मॉल ला पण जाऊ . मजा येईल मस्त पिकनिक होईल . बाई बाटली मटणाची ताटली ..हाय काय नाय काय .सगळे प्रश्न पण सोडवू .नंबर पाठवा ना पण . भेटूया आपण .

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

1 Dec 2016 - 10:33 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

बाई बाटली मटणाची
ताटली>>>>>>> नको,माणसानं चारित्र्यशील असावे,तरच तुमचा आदर राखला जातो.

सूड's picture

1 Dec 2016 - 10:51 pm | सूड

अरेरे

निर्भयाच्या बाबतीत घडलेली घटना व इतर तुमच्यासोबत घडलेल्या घटना याची जुळणा पटत नाही मनाला. ती अतिशय क्रुर अशी घटना होती व त्यामुळे किमान स्त्री-अस्तित्वाबद्दल एक सकारात्मक चर्चा घडली देशभरामध्ये व त्या मुलीला/स्त्रीला ज्या यातना भोगाव्या लागल्या त्याबद्दल क्षणमात्र विचार न करता आपल्या अनुभवासोबत तुम्ही ती घटना जोडावी व कोणीच त्याबदल तुम्हाला जाब विचारु नये याचे जास्त नवल वाटत आहे.
येथे जे संपादक आहेत त्यांना काय रुल्स आहेत? काय नियम आहेत म्हणजे ते कधी कार्यरत होतात ?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

1 Dec 2016 - 11:06 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

अहो निओ१ ,निर्भयाच्या प्रकरणानंतर जे पिटीशन आले होते ते मी साईन केले होते व PMO ला पाठवले होते.ज्याद्वारे स्त्री सुरक्षेविषयी कायदे कडक केले गेले.

मग ?? असे समजू की तुमच्यामुळे कायदे झाले?
अरे मित्रा, तुम्ही बुद्धी कुठे गेली? चांगले वाईट यातील भेद तरी उमजतो आहे का तुम्हाला ?

त्यांनी आधीच डोके चालत नाही हे स्पष्ट केले आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Dec 2016 - 8:02 am | मिसळलेला काव्यप्रेमी

डोके चालो न चालो, ह्याच्या सृजनशीलतेला सलाम... __/\__

पुष्कर जोशी's picture

2 Dec 2016 - 8:14 am | पुष्कर जोशी

१. हे अनुभव एकाच व्यक्तीला आलेले नसावेत ...
२. हे अनुभव भारतातील नसावेत
३. हे कोणत्या तरी ईंग्रजी फोरम चे भाषांतर असावे.

होय ना ..!?

तुमच्या अनुभवांवरून तुम्ही मदनाचा पुतळा आहात असे भासते.

मिनेश's picture

2 Dec 2016 - 4:38 pm | मिनेश

मटणाचा पुतळा आहेत ते. कारण बुद्धी आधीच निघून गेलीये

स्त्री अथवा पुरुष कोणीही असेल / असो, विरुद्धलिंगी व्यक्तिने कधीही सुचक अथवा सरळ सरळ आपल्या इच्छा व्यक्त केल्या असेल तर, आपला तो सन्मान समझावा आणि आपण किती सामान्य असूनही त्या व्यक्तिने नकळतच आपल्या अस्मिता अथवा अंहकाराला खतपाणीच घातले आहे असा भाव असु द्यावा.

शेवटी आपण सर्व वासना<च्या आधिन आहोत याचे साक्षिदार म्हणून त्या त्या व्यक्तिबद्दल करुणाही वाटली पाहिजे.

स्त्री अथवा पुरुष कोणीही असेल / असो, विरुद्धलिंगी व्यक्तिने कधीही सुचक अथवा सरळ सरळ आपल्या इच्छा व्यक्त केल्या असेल तर, आपला तो सन्मान समझावा

सहमत!!

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2016 - 3:54 pm | टवाळ कार्टा

असं कसं असं कसं
स्त्रीने असे केले तर ते पुरुषाला आकर्षित करण्यासाठीचे विभ्रम आणि पुरुषाने असे केले तर तो विनयभंग अशी साधी सरळ व्याख्या माहित नाही अज्जून?

त्यानिमित्ताने हा व्हिडो आठवला. पोरींच्या जीभेवर जी काही सरस्वती नाचत्ये की बस रे बस.

आवर्जून बघा. एखादी मुलगी जेव्हा "तिच्याकडे काय बघतो रे" विचारते; तेव्हा त्यात "माझ्याकडे का बघत नाहीस" असा छुपा अर्थ असतो हे दाखवणारा प्रचंड हास्यास्पद व्हिडिओ आहे. =))

सस्नेह's picture

2 Dec 2016 - 11:49 am | सस्नेह

उगी, उगी ! त्या टग्या बायकांचं घर आपण उन्हात बांधू हं.
तुम्ही असं करा, उद्यापासून बुरखा घेऊन बाहेर जात जा अं ! कोणी काही करणार नाही, मग !

अजया's picture

2 Dec 2016 - 4:17 pm | अजया

=))))
टग्या बायका!

एकुलता एक डॉन's picture

2 Dec 2016 - 12:35 pm | एकुलता एक डॉन

तुम्ही जर चेमिस्ट्री केली तर तुम्हाला शॉपिंग माल कसे लारवाडु शकता ?

भम्पक's picture

2 Dec 2016 - 12:52 pm | भम्पक

अरे टरब्या जरा गप पड ना यार . लय पकवतो बाबा तू.

पाटीलभाऊ's picture

2 Dec 2016 - 1:17 pm | पाटीलभाऊ

हाहाहा...!

आदूबाळ's picture

2 Dec 2016 - 1:32 pm | आदूबाळ

मांडीला छळ वाटत असेल तर स्टरेच बँडेज लावा.

पाटीलभाऊ's picture

2 Dec 2016 - 1:59 pm | पाटीलभाऊ

सध्या मिपाकरांचा (अ)विनय(कायदे)भंग चालू आहे, तो कसा कमी करता येईल ???

प्रसाद गोडबोले's picture

2 Dec 2016 - 2:27 pm | प्रसाद गोडबोले

पुरुषांचाही विनयभंग होतो?
>>> होतो ना , कोण म्हणते होत नाही ? कालच परत एकदा व्हिडिओ पाहिला , "फ्रॉम डॉन टिल ड्स्ट" ह्या चित्रपटात सलमादीदींनी क्वांन्टिनरावांचा कसला विनयभंग केला आहे ... दुत्त दुत्त ...

गामा पैलवान's picture

2 Dec 2016 - 4:11 pm | गामा पैलवान

टफि,

तुम्ही म्हणता ते खरंय. एकंदरीत पुरुषांनी इतकं नीतिमान राहायला हवं की विनयभंग करायची कुण्या स्त्रीची छाती झाली नाय पाहिजे. (द्व्यर्थ अनभिप्रेत).

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

2 Dec 2016 - 4:14 pm | मराठी कथालेखक

मुलीकडून sexual advances चा अनुभव मलाही आहे. पण ती मुलगी स्वभावाने वाईट नव्हती किंवा तिचा कुटील हेतू नव्ह्ता म्हणून दुर्लक्ष केले.
कुणा मुलीने पाहताक्षणी प्रेमात पडावं वा तिला मी आवडावं असं का॑ही माझं व्यक्तीमत्व नाही. ऑर्कुट्च्या जमान्यात एका मुलीशी ओळख झाली होती. शिकलेली आणि स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी होती. आम्ही काही वेळा भेटलो. भेटल्यावर काहीना काही निमित्ताने हाताला खांद्याला स्पर्श करणे , रस्ता ओलांडताना हात पकडणे ई. ती काही विशेष सुंदर नव्हती आणि मला तिच्यात तसा काही रस नव्ह्ता. पण तिचा काही त्रासही नव्ह्ता म्हणून दुर्लक्ष केले.
पुढे माझ्या फ्रेंडलिस्ट मधील माझ्या एका मित्रावर तिची नजर गेली. तो माझा चांगला मित्र होता (आणि आहे). त्याचे फोटो तिला आवडलेत. त्याच्याशी ओळख करुन दे असा तिने हट्ट केला. मग मी त्यांचि ऑर्कुटवरुनच ओळख करुन दिली. त्यावेळी तो भारताबाहेर होता. नंतर एकदा सुटीत आल्यावर आम्ही तिघे भेटलो. पण मी मुद्दामच उशीरा गेलो. हॉटेलात जेवणानंतर ती निघून गेली. मग मित्राने मला सांगितले की ती मुद्दामच स्पर्श करत होती वगैरे...मी त्याला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.

हे आवडले नाही. बाह्य सौंदर्यावर आपण किती दिवस लक्ष देणार आहो?

स्त्री पुरुष संबंध म्हणजे स्पर्षही नको असा निकष कसा ठेवता येईल?

२० /२५ वर्षापूर्वी माझ्या वहिनींना मी डबलसिट नेणे टाळत असे कारण स्पर्ष घडतो. हे मी माझ्या एका मित्राला सांगितल्यानंतर त्याने माझी चांगली कान उघाडणी केली.

एक स्त्री ही स्त्री आहे हे तिच्यासाठी पुरेसे नाही का?

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 1:05 pm | मराठी कथालेखक

वा वा..स्त्रीने विनाकारण स्पर्श केला तर पुरुषाने समजून घ्यावे आणि हेच पुरुषाने केले तर ?
आणि तसंही आम्ही फार जास्त वेळा भेटलो नाही, त्यामुळे मी त्या गोष्टीचा बाउ केला नाही. तसेच तिच्याशी मैत्रीही तोडली नाही. आजही ती माझ्या फेसबूकच्या फ्रेंडलिस्ट मध्ये आहे आणि तिला हवं तेव्हा ती मला फोनही करते.

एक स्त्री ही स्त्री आहे हे तिच्यासाठी पुरेसे नाही का?

तिच्यासाठी ते पुरेसं आहेच की. पण तुम्ही हे वाक्य इथे नेमकं का म्हंटलंय ते सांगा. मग मी उत्तर देतो.

बाह्य सौंदर्यावर आपण किती दिवस लक्ष देणार आहो?

हे तुम्ही माझ्या

ती काही विशेष सुंदर नव्हती आणि मला तिच्यात तसा काही रस नव्ह्ता

या वाक्यामुळे म्हंटलंय का ?
बाह्य सौंदर्यामुळे एखादी मुलगी आकर्षक वाटते, तिच्याविषयी ओढ निर्माण होते तर हे स्वाभाविकच आहे ना. आणि तसेच सुंदर नसल्याने एखाद्या मुलीबद्दल 'तसे' काही आकर्षण निर्माण झाले नाही तर त्यात काय चूक ? जबरदस्तीने तर आकर्षण वाटून घेता येत नाही ना.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 1:08 pm | मराठी कथालेखक

स्त्री पुरुष संबंध म्हणजे स्पर्षही नको असा निकष कसा ठेवता येईल?

निकष ठरवण्याचे अधिकार कुणाकडे ? फक्त स्त्रीकडेच का ? एखाद्या मुलीला/स्त्रीला आवडत नसेल तर साधा हँडशेकही टाळला जातोच ना ? मग असाच एखादा आगंतुक/न आवडणारा स्पर्श टाळण्याचा /त्यास विरोध करण्याचा हक्क पुरुषालाही आहेच.

हा मुद्दा प्रत्येकाच्या आकलन, अनुभवाने आणि अपेक्षानेच सिद्ध होऊ शकतो.

सरसकट विधाने करता येणार नाही हे मान्य.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 3:14 pm | मराठी कथालेखक

इथे त्या मैत्रीणीच्य भावना स्पष्ट होत्या. माझं राहू द्या हव तर. निदान माझ्या मित्राच्या बाबतीत तरी त्याचे फोटो पाहून म्हणजे बाह्य रुप पाहूनच ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. त्यामुळे आकर्षणाच्या प्रभावामुळेच ती असे स्पर्श करीत होती हे नाकारता येणार नाही.

(माझे वय ५२आहे.) कामभावनेच्या संदर्भातील कोणताही निष्कर्ष हा त्या व्यक्तिवर कधीकधी अन्यायकारक अथवा आपले आकलन अपूरे आहे असे दाखवू शकतो.

मानवी संबंधात मी एकच तत्त्व वापरतो की १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपाराध्यावर अन्याय झाला नाही पाहिजे.

माझे वय यासाठी लिहिले की जगाचा बरा आणि वाईट असा अनुभव गाठीशी आहे.

बाकी आपण प्रगल्भ आहात हे मी जाणतोच.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 3:40 pm | मराठी कथालेखक

मी आधीच लिहिले आहे की ती मुलगी तशी वाईट नव्ह्ती किंवा तिचा हेतू पण काही वाईट नव्ह्ता म्हणून मी या गोष्टीचा बाऊ केला नाही. मित्रालाही तोच सल्ला दिला. पण तिच्याकडून असे अगंतूक स्पर्श मला आवडले नव्हते. जर आम्ही वरचेवर भेटलो असतो तर मात्र मला तिला कदाचित स्पष्टपणे सांगावच लागलं असतं.
बाकी समोरच्याचा हेतू काहीही असला किंवा त्याबाबतचे माझे आकलन कितीही अपुरे असले तरी तिची आपल्या बाबत एखादी कृती "ना आवडण्याचा" वा त्या कृतीस विरोध करण्याचा माझा अधिकार तुम्ही प्रगल्भपणे मान्य कराल अशी अपेक्षा आहे..

वेल्लाभट's picture

5 Dec 2016 - 3:50 pm | वेल्लाभट

विनयभंगाचं माहित नाही; पण तुमचा 'विवेक'भंग नक्कीच झालाय. त्याबद्दल खेद वाटतो.

`फ्लर्ट करणे` ह्याला मराठीत विनयभंग म्हणतात का ? माझ्या मते विनयभंग मध्ये शारीरिक जबरदस्ती अभिप्रेत आहे.

"विनयभंग" हा शब्द lightly वापरल्याने कदाचित ज्या महिलांना आणि पुरुषांना खरोखर शारीरिक जबरदस्ती सहन करावी लागते त्यांच्या समस्यांना आपण कमी कमी लेखत आहात असा आभास होतो. तुम्हाला कदाचित विनोद बुद्धीने लिहावे असे वाटले असेल पण "विनयभंग" हा शब्द कदाचित चुकीचा आहे.

कलंत्री's picture

6 Dec 2016 - 10:29 am | कलंत्री

हा शब्द योग्य वाटतो.