रोमिओगिरी..

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
11 Feb 2009 - 6:52 pm

"जरा बरी पोरगी दिसली रे दिसली की खिश्यातुन दोन रुपयाचा कंगवा काढुन केसाला भांग पाडुन, साजरं तोंड करून मोकळे " हे वाक्य आमच्या ऒरगॊनिक केमेस्ट्रीच्या सरांनी कॊलेजमध्ये असताना कित्येकदा तरी वर्गातील मुलांना ऐकवले आहे, प्रत्येक वेळी त्या वाक्यावर आम्ही मुली हसु ओठात दाबत मनातील आनंद एकमेकींना डोळ्यातुन दाखवुन देत असु.

एक वेळ कॊलेज मधील लेक्चर बंक केले तर चालेल पण संध्याकाळी महाव्दार रोड चुकता कामा नये असा अधिलिखित नियम काही रोमिओंचा असायचा. कार्टी वर्गात दिसायची नाहीत पण त्या रोड वर मात्र नक्की दिसतील. ;) असे आमचे सर वरचे वर म्हणायचे.

तर अशा ह्या रोमिंओची व्हॆलेन्टाईन डे च्या निमित्त्ताने होणारी धांदल आमच्या ग्रुप मधल्या, वर्गातील, ओळखीच्या मुलींनी सांगितलेली, काही प्रत्यक्ष पाहिलेली गमंती आज मी तुम्हाला सांगणार आहे.

आमच्या गुप मध्ये दोघी तिघी खुप सुंदर मुली होत्या आणि त्याच्यावर आमच्या वर्गातील काही रोमिओ फिदा होते पण त्या काही त्यांना घास घालत नव्हत्या त्यामुळे आम्ही त्या रोमोऒंना "सटरफटर" म्हणायचो, तर व्हॆलेन्टाईन डे आला ही ह्यांच्यात कोठुन एनर्जी यायची काय माहित कसा शोध काढुन त्या मुलींना एकटे गाठायचे आणि पचका करून घ्यायचे ते काही कळले नाही. तर असेच व्हॆलेन्टाईन डे ला आम्ही ९ मैत्रीणी एका ठिकाणी पेस्ट्री खायला थांबलो होतो,वर्गातील एक रोमिओ आला एका मैत्रीणीला तुझ्याशी बोलायचे आहे पण तुझ्या मैत्रीणी पासुन जरा दुर जाऊ, रस्त्याच्या पलिकडे असलेल्या बसस्टॊपपाशी मी तुझी वाट पहात आहे नाही आलीस तर घरा पर्यत येईन असे धमकी वजा विनंती करून तो बसस्टॊप पाशी जाऊन उभा राहिला मैत्रीण दोन मिनीटात समाचार घेऊन आलेच करून डोळा मारून गेली. त्या रोमिओने मैत्रीणीला कॆडबरीचा बॊक्स दिला, आम्ही एका बाजुला पेस्ट्रीखात बसलो होतो तिच्याकडे लक्ष नाही असे दाखवत होतो पण सगळे लक्ष तिच्याकडेच होते, तीने तो बॊक्स घेतला, ओपन केला त्या रोमिओच्या चेह-यावर आनंद दिसु लागला.. पण पुढच्या क्षणीच तीने त्यातील सगळ्या कॆडबरीज आजुबाजुला फेकुन तो बॊक्स त्याच्या डोक्यावरून मागे फेकुन देऊन आमच्यात येऊन पेस्ट्री खायला बसली, तिला आम्ही इतके झापले की अग कॆडबरी फेकण्या पेक्षा तसाच बॊक्स फेकला असतास तर तो रोमिओ गेल्यावर तर आपण सगळ्यांनी त्या कॆडबरीज खाल्या नसत्या काय ? पुन्हा अशी चुक करू नको असा दम ही दिला. ;)

असेच एका व्हॆलेन्टाईन डे ला कॊलेज जवळच्या आर्चिस गॆलरी गिफ्ट शॊपी मध्ये आम्ही ५/६ जणी मस्त पैकी फिरत होतो, तेथे एक कॊलेज मधील रोमिओ प्रकटला त्याच्या हातात रेड रोजचा बुके होता, त्याने कोणाला समजायच्या आत तो बुके एका मैत्रीणीच्या पायापुढे ठेवला, तेवढ्यात आमच्यातील एक जण म्हणाली "अग हा काय तुला जिवंतपणीच श्रध्दांजली वाहत आहे वाटत" तिच्या बोलण्याला लाजुन तो जो पसार झाला तो ४ दिवस कोठेच दिसला नाही. :)

एका मित्राची मजा ( त्याची सर्व लक्षण मुलीं कडुन मार खायची होती, पण नशिब चांगले असावे त्याचे ) त्याला कोणतीही मुलगी आवडायची त्याला चॊईसच नाही असे आम्ही म्हणायचो, आणी हा मुलींशी बोलण्यातही पटाईत, तर पुन्हा त्याला एक मुलगी आवडली, त्याने जाऊन त्या मुलीला मस्का मारायला चालु केले, सर्व ऐकुन घेतल्यावर ती मुलगी म्हणाली पण "माझे ना लग्न ठरले आहे", त्यावर हा हुशार म्हणतो, हो का, मग ठीक आहे, तुझ्या बरोबर असलेल्या मैत्रीणीचे अजुन लग्न वैगरे ठरले नाही ना. ;)
तुम्हाला काही गंमती जमती माहित असतील तर आम्हाला ही सांगा. :)

मौजमजामत

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

11 Feb 2009 - 6:57 pm | अविनाशकुलकर्णी

=)) =)) =)) =)) =)) =)) खुप मजेदार..छान..आवडले

आनंदयात्री's picture

11 Feb 2009 - 6:56 pm | आनंदयात्री

मस्त लिहले आहेस. मोक्याच्या वेळी विषय !!

विसोबा खेचर's picture

12 Feb 2009 - 2:17 pm | विसोबा खेचर

हेच बोल्तो..!

संदीप चित्रे's picture

11 Feb 2009 - 6:57 pm | संदीप चित्रे

किस्से मस्त आहेत.
>> अग हा काय तुला जिवंतपणीच श्रध्दांजली वाहत आहे वाटत"
हहपुवा :)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Feb 2009 - 7:00 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त... आमच्या वेळी हे सगळे डे वगैरे नुकतेच सुरू झाले होते. व्हॅलेंटाइन डे इतकं माहित नव्हतं. पण रोझ डे, साडी डे वगैरे जोरात असायचे. जसं आठवेल तसं सांगतो.

अवांतरः आमच्यात फक्त लग्नातच घास घालतात (भरवतात). ;)

बिपिन कार्यकर्ते

ज्ञ's picture

11 Feb 2009 - 7:01 pm | ज्ञ

पोरांनी केली की ती रोमिओगिरी. आणि पोरींनी केली तर काय तिला ज्युलियटगिरी, लैलागिरी असे काही म्हणायचे का??? ;)
:/

छोटा डॉन's picture

11 Feb 2009 - 7:02 pm | छोटा डॉन

१४ फेब. च्या मुहुर्तावर ज्याम भारी लेख आला आहे.
मस्त गं शितल, धमाल लेख आहे.
वाचुन हसुन हसुन पडायची वेळ आली होती ...

स्वानुभव असा काही नसल्याने इतरांचे "किस्से " वाचण्यास उत्सुक.

अवांतर : "पोरींचा खेळ होतो, पोरांचा गेम होतो " असे आमचा एक नेहमीच नकाराधिकार वापरला गेलेला मित्र म्हणायचा ;)
------
छोटा डॉन

तसा सिग्नल हवा,पण मुला॑नी काही केल की लगेच लागले खडे फोडायला(काथ्याकुट करायला)

मी ज्या माता/भगीनी बघीतल्यात ज्या त्या दिवशी छान छान कपडे घालुन वाट पहात असतात्,जर विश्वास नसेल तर "नेस वाडिया"ला चक्कर मारा

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

त्रास's picture

11 Feb 2009 - 8:14 pm | त्रास

एफ़ सी ला रोज बघायला मिळणारा खेळ आहे हा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2009 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अग हा काय तुला जिवंतपणीच श्रध्दांजली वाहत आहे वाटत"
हा हा हा :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Feb 2009 - 11:17 am | घाशीराम कोतवाल १.२

=)) =)) सहमत
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

त्रास's picture

11 Feb 2009 - 7:25 pm | त्रास

मुली फार हुशार असतात.
त्यांना पाठीला व कानाच्या बाजुलापण डोळे असतात.
आणि महत्वाचे म्हणजे, त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे न बघणाऱ्या क्षुद्र जीवांना ओळखता येते.

प्राजु's picture

11 Feb 2009 - 7:58 pm | प्राजु

मजा आली..
एक किस्सा..
आमच्या कॉलेजच्या कँटीनमध्ये एकदा आम्ही कटवडा खात होतो..
एक हिरो आला आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या मैत्रीणीला त्याने "तुझ्याशी थोडं बोलायचं आहे " असं सांगितलं. ती म्हणाली, "मला बोलायचं नाहीये..." तो "प्लिज प्लिज" असं म्हणत तीला फोर्स करू लागला. ती वैतागली आणि माझ्याकडे बघू लागली.
मी म्हणाले त्याला, "अहो, तिला नाही बोलायचं तर का तुम्ही फोर्स करता आहात?"
तो मला म्हणाला, " हे बघा, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका.."
मी उठले आणि टेबलाच्या दुसर्‍या बाजूला जाऊन उभी राहिले.. आणि पुन्हा म्हणाले..
" बरं मी कडेला कडेला बोलते...तुम्ही तिला फोर्स करू नका.." कँटिन मध्ये असलेल्या सर्वांचे लक्ष जवळ जवळ आमच्याकडेच होते. त्यामुळे एक जोरदार हशा पिकला आणि तो बिचारा इकडे तिकडे बघत ओशाळत निघून गेला. :)

दुसरा एक किस्सा..
व्हॅलेंटाईन डे दिवशी, सगळी मुले टाय मध्ये होती. माझ्या एका मैत्रीणीवर लाईन मारणारा मुलगा .. तो ही नटून थटून आला होता. आमही फिजिक्स च्या लॅब च्या बाहेर उभे होते. तो लॅब मधून आला... आणि अगदी लाडात येऊन माझ्या मैत्रीणीला म्हणाला.." ए.... ए... मी कसा दिसतोय सांग की गं..." तीने दुर्लक्ष केलं.. तो पुन्हा.."ए... सांग की.. सांग की.." ती चिडली.. "ओ.. जावा तुम्ही इथून.." असं काहीसं बोलली. पण तो जातीचा रोडरोमीओ होता..."असं काय करतीस सांग.. की.. " असं म्हणू लागला.
ती खूप चिडली. आणि माझ्याकडे बघून म्हणाली..,"प्राजक्ता, बेडूक बघितला आहेस का कधी?... तो घाणीत ओरडत असतो तो...?" मी सुद्धा साळसूद्पणे "नाही.." म्हणाले. ती म्हणाली, " हा बघ.. आज टाय घालून इथे आलाय.." लॅब बाहेर बरिच गर्दी होती. सगळे जण जोरदार हसायला लागले आणि तो बेडूक निघून गेला. :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

11 Feb 2009 - 8:02 pm | छोटा डॉन

अफाट किस्सा आहेत बै, मस्त मज्जा आली ...!

>>मी उठले आणि टेबलाच्या दुसर्‍या बाजूला जाऊन उभी राहिले.. आणि पुन्हा म्हणाले..
>>" बरं मी कडेला कडेला बोलते...तुम्ही तिला फोर्स करू नका.."
=)) =)) =))
आई आई ग्ग्गं ऽऽऽऽ
काय ज्याम पोपट केलास त्याचा, खत्तरनाक ...!

------
छोटा डॉन

=)) =))
प्राजु,
खतरनाक किस्से आहेत तु सांगितलेले.

रेवती's picture

11 Feb 2009 - 8:07 pm | रेवती

बापरे!
ही असली धाडसी कामं करणारी मुलं बघीतली की हे पुर्वजन्मीचे शिवाजीमहाराजांचे मावळे असावेत असे वाटते.
फक्त जरा लढाईचं काम नाहीये या जन्मी!
प्राजु, तू म्हणजे अगदी वाटच लावलीस.... बेडकाची!;)

रेवती

जयवी's picture

11 Feb 2009 - 11:03 pm | जयवी

प्राजु....थोर आहेस :)

वाहीदा's picture

12 Feb 2009 - 2:13 pm | वाहीदा

चित्र डोळ्यासमोर तराळते आहे... काय कल्पना आहे...st xavier college of mumbai आणी बेड्काचे अफाट नाते आहे ते आठवले .... ;-)

शंकरराव's picture

12 Feb 2009 - 7:12 pm | शंकरराव

काय काय वाचावे .. एकूण रोमिओगिरी मस्त लिहीले आहे व प्रतिसाद अप्रतिम आहेत.
जिथे मनाला खटकले ते असे .....

तेरे हुस्नका जल्वा कयामत ना बने
डर है वो 'टाय' मकरुह का फंदा ना बने

अलहिदा अजूबा थी उसकी किस्मत
जहा मेंढक्कोंने भी जताई निस्बत..

अब क्या रहेगा उसका जवाब.. बता ऍ मेरे ईल् हाम
उसके ईकरार को नाचीज करेंगे सलाम
या फिर गाली गलोछ सलावात को भी सलाम

गालिबराव

रेवती's picture

11 Feb 2009 - 8:01 pm | रेवती

तू तर भारीच आहेस बाई शितल!
१४ फेब्रू.चे चांगले निमित्त शोधले आहेस.
छोटा लेख वाचून करमणूक झाली.

रेवती

त्रास's picture

11 Feb 2009 - 8:02 pm | त्रास

मैत्रिणींचे किस्से रंगवायला फार-फार मजा येते

लिखाळ's picture

11 Feb 2009 - 8:21 pm | लिखाळ

>>अग हा काय तुला जिवंतपणीच श्रध्दांजली वाहत आहे वाटत"<<
हा हा हा .. मस्त :)

प्राजूचे 'कडे कडेने बोलते' सुद्धा भारी :)

-- लिखाळ.

बाळु's picture

11 Feb 2009 - 8:23 pm | बाळु

खुप मजेदार..छान..

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Feb 2009 - 8:33 pm | ब्रिटिश टिंग्या

लै भारी!

महेंद्र's picture

11 Feb 2009 - 8:39 pm | महेंद्र

ही कविता माझ्या बायकोने केली होती.. मुंबै विद्यापिठाच्या वार्षीकांकात आली होती. बघा आवडते का...

व्हेलंटाईन दीस
म्या अन धुरपदान
ठरिवला प्रितीचा दीस
त्ये काय म्हंत्यात राव
त्याला व्हेलंटाईन दीस
करायचा साजरा थाटात
दोगं बी राजारानी झोकात
म्या बी रेड्डी झालतो
मनलं आता पिरती दावतो
काजळ पावडर अन लाली
सजुन धजुन ध्रुपदा आली
गेलो पयले होटेल मंदी
देल्ली ओर्डर चिनी मंदी
नुडल अन फ़्राईड राईस
बसलो सायबावानी ऐसपैस
जमलं नाही काट्या चमच्यानं
वरपलं सगळं हाताहाताने
खाल्ल्यावर मात्र पोट लागलं ढ्वळाया
वाटलं ह्यापक्षी मायच्या
बेस लागतात शेवाया
टक्सीनं गेलो राव
डिस्कोमंदी नाचाया
चकमकात बघुन हरकलो
टकामका लागलो बघाया
काय त्ये हातवारं?
निसती अंगांगी झोंबी रे
मंग म्या अन धुर्पदानं
देल्ली सुरुवात करुन
छन खळ खळ छन
फुगदि अन झिम्म्यानं
आमाले बघुन सार्यास्नी
य़ेगळॆ वाटले काही तरी
पाहुन्शान म्हने ,
नवी फ्याशन खरी
मंग सायबा धुमशान झाली
सार्याइनच आमची कोपी केली
धुर्पदाची मात्र कळी खुल्ली
व्हेलंटाईन खुश नाहिवाली

मंग दुसया दिवशी
गेलो आपल्या वावरात
कुनी नाही पाहुन
राव शिरलो राव खोप्ट्यात
ढोलकीच्या तालावर
नाचलो तुफ़ान ईरभर
चारली एकमेकास्नी
कांदा, चटनी अन भाकर
म्या मनलं धुर्पदीले
ठरविले होते खुप काही
रानातल्या वेलंटाईनची मजा
शयरात नाही
सुपर्णा कुळकर्णी

प्राजु's picture

11 Feb 2009 - 8:56 pm | प्राजु

मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

11 Feb 2009 - 9:02 pm | रेवती

असेच म्हणते.
रेवती

विनायक पाचलग's picture

11 Feb 2009 - 9:02 pm | विनायक पाचलग

तसेव आम्ही लहान आण इआमच्याकडे हे प्रकार नाहीत
पण आता एवढे वाचल्यावर एकदा फीरले पाहिजेच आर्चिस मधुन आणि पियु मधुन
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Feb 2009 - 9:09 pm | ब्रिटिश टिंग्या

कालिजात जातो ना रे?
मग कसला लहान?

हात्तीच्या!

विनायक पाचलग's picture

11 Feb 2009 - 9:15 pm | विनायक पाचलग

अहो भावु अभी तो सिर्फ शुरवात हुवी हे अहो एवढा वेळ नसतो हो आणि हो अजुन खुप वर्शे आहेत की पडलेली
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Feb 2009 - 9:20 pm | ब्रिटिश टिंग्या

>>हो अजुन खुप वर्शे आहेत की पडलेली

अरेरे! जाउ देत!
तु ते केमेस्ट्रीचं जर्नल घे लिहायला!

जयवी's picture

11 Feb 2009 - 11:05 pm | जयवी

क्या बात है :)

अवलिया's picture

11 Feb 2009 - 9:35 pm | अवलिया

मस्त :)

तुम्हाला काही गंमती जमती माहित असतील तर आम्हाला ही सांगा.
नको. पिडाकाका मला परत रागवतील... :(

--अवलिया

शितल's picture

11 Feb 2009 - 9:39 pm | शितल

>>नको. पिडाकाका मला परत रागवतील...
=))

धनंजय's picture

11 Feb 2009 - 9:44 pm | धनंजय

शितल, प्राजु - भारी! मुली काय द्वाड असतात...

रोमियोगिरीत मजा असते पण. मुलींनो, नेहमीच पचका करू नका आमच्या बिचार्‍या भावंडांचा. एकेकाला थोडी लिफ्ट देऊन अलगद खाली सोडा.

(तिरमिरीत कॅडबर्‍या टाकू नका, हा सल्ला लक्ष देऊन ऐका!)

जेन's picture

11 Feb 2009 - 9:43 pm | जेन

खूपच चेष्ठा केली तुम्ही सर्व मुलींनी.....त्या बस टोपवाल्या रोमियोसाठी फारच वाईट वाट्ते.....
बाकी आणखीन गोष्ट असेल तर लिहीत जा.......

बेसनलाडू's picture

11 Feb 2009 - 11:06 pm | बेसनलाडू

शितलताई आणि प्राजुताईंनी सांगितलेल्या काही किश्शांमध्ये मुलांच्या असमंजसतेबरोबरच मुलींचाही तितकाच असमंजसपणा (मला तरी) दिसला (असमंजसपणा हा फारच सौम्य शब्द वाटावा; काही ठिकाणी याच शब्दाचे समानार्थी शब्द वापरले जातात - जसे माज, ऍटिट्यूड - विशेषतः मुलींच्या बाबतीत :) ) प्रेमाचा स्वीकार ही मोठी गोष्ट पण नाकारलेल्या प्रेमाचा स्वीकार ही (ज्याचे/जिचे प्रेम नाकारले गेले आहे त्याच्या/तिच्या साठी) त्याहूनही मोठी गोष्ट, असे मला वाटते. त्यामुळे एखाद्याचे प्रेम नाकारायचे असल्यास एखादीने ते अधिक समंजसपणे, पद्धतशीरपणे नाकारावे असे वाटते. अजाणत्या वयात प्रेम इ. संकल्पना मुलांना (आणि मुलींना) पूर्ण उमजतीलच असे नाही; पण भावनिक गुंतवणूक कमीअधिक प्रमाणात नक्कीच असावी. ती फारच असेल आणि वर सांगितलेल्या एक-दोन किश्शांमध्ये सांगितलेल्या पद्धतीने नाकारली गेली तर होणारी मानसिक इजा आणि त्याची परिणती, यांची कल्पनाच न केलेली बरी! असो.
(डोळस)बेसनलाडू

भडकमकर मास्तर's picture

12 Feb 2009 - 12:00 am | भडकमकर मास्तर

त्यामुळे एखाद्याचे प्रेम नाकारायचे असल्यास एखादीने ते अधिक समंजसपणे, पद्धतशीरपणे नाकारावे असे वाटते.
सहमत...
चॉकलेट फेकणे, फुले फेकणे , चारचौघांत हसणे वगैरे प्रकार टाळून स्पष्ट नकार देणे आवश्यक...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बेसनलाडू's picture

12 Feb 2009 - 12:19 am | बेसनलाडू

चॉकलेट फेकणे, फुले फेकणे , चारचौघांत हसणे वगैरे प्रकार टाळून स्पष्ट नकार देणे आवश्यक...
अगदी सहमत. आणि असे अपमानास्पद प्रकार टाळण्याबरोबरच 'तुला भावासारखे मानले' (मग आजवर कधी राखी मात्र कशी बांधली नाही?), 'तुला माझ्यापेक्षा चांगल्या हजार मुली मिळतील' (ते माहीतच आहे गं, पण 'तू' नाही ना!? इतर हजार चांगल्या हव्या असत्या तर 'तुझ्या'मागे कशाला वेळ वाया घालवला असता? ;) ) इ. कृत्रिम मलमपट्टी सुद्धा टाळल्यास उत्तम. 'सम् हाव् मला तू माझा जोडीदार म्हणून आवडत/पटत नाहीस / विचार करता येत नाही आणि त्यामुळे 'प्रेम' (किंवा जे काही असेल ते) मूर्त स्वरूपात साकार होणे शक्य नाही' हे कटू वास्तव जसेच्या तसे विदाउट् एनी शुगर कोटिंग समजावता आल्यास आणि दुसर्‍या बाजूस ते (लवकरात लवकर आणि सकारात्मक दृष्टीने) स्वीकारता आल्यास उत्तम.
(वास्तववादी)बेसनलाडू
ऑगस्ट महिन्यात अशाच एका प्रकरणात अपमानास्पदरित्या सपशेल आपटल्यानंतर सहा महिन्यांतच फेब्रुवारीमध्ये गेट् च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यम् टेक् केलेल्या आमच्या एका अतिशय जिवलग मित्राची आठवण येते.
अशी उदाहरणे स्पृहणीय आणि विरळीच!
(स्मरणशील)बेसनलाडू

नाटक्या's picture

12 Feb 2009 - 2:28 am | नाटक्या

ऑगस्ट महिन्यात अशाच एका प्रकरणात अपमानास्पदरित्या सपशेल आपटल्यानंतर सहा महिन्यांतच फेब्रुवारीमध्ये गेट् च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यम् टेक् केलेल्या आमच्या एका अतिशय जिवलग मित्राची आठवण येते.

माझ्या एका मित्राच्या बाबतीतही हे घडले आहे. त्याने एका जवळच रहाणार्‍या मुलीला प्रपोज केले, तेव्हा तिने त्याला नाही म्ह्टले. नुसते नाही म्हटले असते तर काही प्रॉब्लेम नव्हता पण तिने त्याला त्याच्या लायकी बद्द्ल सुनावले. कारण तो चाळीत रहायचा आणि ही पलिकडच्या ब्लॉक सिस्टिम मध्ये. नंतर त्याने अमेरिकेत येवुन स्कॉलरशीपवर एम.एस. केले आणि नंतर अमेरिकेत नोकरी मिळवून दोन वर्षानी भारतात सुटीवर आल्या नंतर त्याच मुलीने त्याला प्रपोज केले. तेव्हा ह्या पठ्ठ्याने तिला चक्क "चल पुढे निघ" असे सांगीतले. मला नंतर सांगत होता कि जेव्हा चाळीत रहात होतो तेव्हा बघायला पण तयार नव्हती आता अमेरिकेत रहातो आहे म्हटल्यावर आली लाळ गाळत.

तेव्हा आज आपण जसे कोणाबरोबर वागतो तसेच कोणीतरी तुमच्या बरोबर वागू शकते ह्याचे भान ठेवले तर असे प्रकार होत नाहीत.

- नाटक्या

मराठी_माणूस's picture

12 Feb 2009 - 6:37 am | मराठी_माणूस

आली लाळ गाळत

हेच शब्द वापरले असतील तर कीतीही अर्थाने यश संपादन केले असले तरी काही अर्थ नाही.

नाटक्या's picture

12 Feb 2009 - 9:50 pm | नाटक्या

हे तो माझ्याशी बोलताना म्हणाला. आपल्या बालपणीच्या (आमच्या भाषेत GD) मित्रांबरोबर खाजगीत बोलताना मला नाही वाटत कोणी आपल्या यशाची मस्ती डोक्यात ठेवावी. आणि जर कोणी ती ठेवत असेल तर तुम्ही म्हणता तसा अर्थ उरत नाही.

गोगोल's picture

12 Feb 2009 - 4:59 am | गोगोल

काय हो प्रेमात नापास होणे आणि गेट मध्ये घावघवित यश मिळवणे या दोघांचा काय संबंध?
हे म्हणजे सफरचंद आणि संत्र्यांची तुलना करणे झाले. प्रेमाची परीक्षा वेगळी आणि आयुष्याची परीक्षा वेगळी.
माझ्यामते हे उदाहरण सांगताना तुम्ही खालील पैकी एक गोष्ट अध्यारूत धरली आहे

1. मुलीनी जो नकार दिला त्याचे कारण म्हणजे मुलगा मठ्ठ होता.
2. यम टेक (तुमचा शब्द) झालेल्या सर्वाना लठ्ठ (?) पगाराच्या नोकर्‍या मिळतात आणि त्या मुलीनी पैशासाठी त्या पोराला नकार दिला.

कायच्च्या काय

बेसनलाडू's picture

12 Feb 2009 - 5:03 am | बेसनलाडू

प्रेमाच्या परीक्षेत नापास होऊन आयुष्याच्या परीक्षेत न होणे हे स्पृहणीयच! अन्यता दोन्हीकडे नापास होणार्‍यांची उदाहरणे वाचण्या-पाहण्यात येतच असतात. तुम्हाला वाटो अगर न वाटो!
आणि मुख्य म्हणजे तुम्ही सांगितल्यापैकी कोणतीही गोष्ट अध्याहृत धरलेली नाही :P
(स्पष्ट)बेसनलाडू

शितल's picture

12 Feb 2009 - 1:35 am | शितल

>>त्यामुळे एखाद्याचे प्रेम नाकारायचे असल्यास एखादीने ते अधिक समंजसपणे, पद्धतशीरपणे नाकारावे असे वाटते.
बरोबर आहे पण ही समज त्या वयात नसते, कदाचित त्याच्या घरचे संस्कार, घरची आर्थिक परिस्थिती ह्यावरून माज किंवा मिजास किंवा समंजसपणे वागणे हे ठरत असावे असे माझे वैयक्तीक मत आहे.

मदनबाण's picture

12 Feb 2009 - 7:23 am | मदनबाण

सहमत...
मुलांनी सेफ्टी ऑप्शन निवडावा :--

:D
मदनबाण.....

देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

भडकमकर मास्तर's picture

11 Feb 2009 - 11:57 pm | भडकमकर मास्तर

किस्से गमतीदार आहेत...
( जे मुलगे यातून गेले आहेत त्यांना ते तितकेसे गंमतीदार नक्कीच वाटणार नाहीत...) :) असो...
... वरती बेसनलाडू म्हणतात त्याप्रमाणे नकाराचा प्रकार इतरांसाठी इतका विनोदी होणं , आपण हास्यास्पद बनणं भयंकरच...
पण मुलामुलींत संवादाचा पुष्कळ अभाव असताना हे असलेच प्रकार होणार असं वाटतं...( शाळा कादंबरीत ज्याप्रमाणे सुर्‍या डायरेक्ट जाऊन केवडाला " ए लाईन देती का तू?" असं विचारतो.... मग ती बिथरून दोघांची तक्रार करते वगैरे..)... हे वरच्या किश्शामधले सुर्‍याचेच भाईबंद सगळे...प्रॉब्लेम म्हणजे संवादाचा अभाव... मग मुलींनी त्यांना उत्तर असंच जालीम द्यायचं, हा पायंडा...

या धाग्याच्या जवळपास जाणारा एक डॉन्याचा धागा होता ( तसल्या नजरा ..)... त्याची आठवण झाली...त्यात फार उद्बोधक चर्चा होती या विषयावरती...

एका मित्राची मजा ..त्याला कोणतीही मुलगी आवडायची त्याला चॊईसच नाही असे आम्ही म्हणायचो,
त्याला एक मुलगी आवडते त्यात त्याला चॉईस नाही, हा निष्कर्ष का? :? :? :? हे वाक्य थोडे गोंधळात टाकणारे...
काही शक्यता..
१.तो खूप महान / हँडसम / डॅशिंग / हुशार होताहोता तरीही त्याला कोणत्याही वगैरे वगैरे मुली आवडत असत...
२. तो फाल्तु / साधा होता तरी त्या मित्राला हायक्लास /सुंदर किंवा इतरांना आवडणार्‍या वगैरे वगैरे मुली आवडत नसत...

मग त्या बिचार्‍याने काय करावे?
तुमच्या किंवा तुमच्या ग्रुपच्या इतर मुलींमागे गुलाब घेऊन त्याने येऊ नये , ही तुमची अपेक्षा रास्त... पण त्याने समजा आपली पात्रता ओळखून दुसर्‍या कोण्या कोणत्याही मुलीच्या मागे गेले तरी तो चर्चेचा किंवा थट्टेचा विषय का ठरावा ?
....
म्हणजे एखाद्याला तथाकथित चांगल्या मुली आवडल्या तरी त्याची थट्टा आणि तथाकथित कोणत्याही मुली आवडल्या तरी थट्टा
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

12 Feb 2009 - 1:25 am | शितल

>>त्याला एक मुलगी आवडते त्यात त्याला चॉईस नाही, हा निष्कर्ष का? :? हे वाक्य थोडे गोंधळात टाकणारे...

तो मुलगा तसा स्वभावानेही चांगला, दिसायला ही ठिक ठाक मेन म्हणजे चेहर्‍यावरून भलताच सज्जन वाटे, आणि हा सर्व मुलींकडे पाहुन हसे, त्याच्या उत्तरा देखल कोणी हसली हा दुसर्‍या दिवशी पासुन तिच्याभोवती गुठमळलाच समजायचा, आणि आमच्या ग्रुप मध्ये असल्याने तो आम्हाला सर्व सांगत ही होता हा त्याच्या अजुन एक सज्जन पणा. त्याला दर ८/१५ दिवसांनी कोणी ना कोणी आवडे त्यामुळे आम्ही त्याच्या अशा स्वभावामुळे त्याला तुला चॉईस नाही म्हणजे स्पेसिफिक एक मुलगी आवडली असे त्याचे नव्हते. :)

ऍडीजोशी's picture

12 Feb 2009 - 12:02 am | ऍडीजोशी (not verified)

कॉलेजात असताना आमच्या कडे जेमतेम विड्या घेण्या इतके पैसे असायचे त्यामुळे असले प्रकार कधीच केले नाहीत. करावेसेही वाटले नाहीत. कारण कॉलेजची ४-५ वर्ष काप काप कापल्यावर ती मुलगी एकाद्या आपल्याहून मोठ्या वेल-सेटल्ड मुलासोबत निघून जाणार ह्याची गँरंटी असायची. कशाला उगाच पैसा आणि वेळ वाया घालवा??????

पण इतका समंजसपणा नसलेले बरेच प्रेमवीर कॉलेजात होते. ठरवून एखादीला रोज-क्वीन करणं वगरे महा महागडे आचरट प्रकार करायचे आणि दुसर्‍या दिवशी कट्ट्यावर 'एक दम दे ना' म्हणायचे.


ऍडी जोशी
आमास्नी प्रपोज करायचं भ्या न्हाय, हो म्हनली तर शॉपींगचं बिल कुठून भरनार ह्याची चिंता हाय.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Feb 2009 - 12:12 am | बिपिन कार्यकर्ते

आमास्नी प्रपोज करायचं भ्या न्हाय, हो म्हनली तर शॉपींगचं बिल कुठून भरनार ह्याची चिंता हाय.

आत्ता पर्यंत वाचलेल्या सिग्नेचर विडंबनांपैकी बेष्ट...........

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

12 Feb 2009 - 6:48 pm | संदीप चित्रे

मस्त सिग्नेचर आहे रे ऍडी :)

वजीर's picture

12 Feb 2009 - 2:30 am | वजीर

हा हा हा.. हो चे दोन अर्थ होतात

घाटावरचे भट's picture

12 Feb 2009 - 12:09 am | घाटावरचे भट

मायला, आमचे मित्र/भाऊ पब्लिक डायरेक्ट फ्रंटफूट डिफेन्सवर. बाकी या बाबतीत आम्ही ऍडीजोश्यांच्या लायनीतले...

मुक्तसुनीत's picture

12 Feb 2009 - 4:52 am | मुक्तसुनीत

शीतल यांनी सुरू केलेला धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून खूप मजा आली.

अस्मादिकांबद्दल यासंदर्भात बोलायचे तर : लग्नाची गेली काही वर्षे आणि लग्नाआधीची "धागा जुळण्यापासूनची" वर्षे म्हणजे , फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात "बजेट" कडे विशेष लक्ष द्यावे लागण्याचा काळ :-)

बाकी बहुतांशी प्रेमभाव व्यक्त करणारी मुले आणि आणि बहुतांशी या "प्रपोझल" च्या लक्ष्य बनलेल्या मुली (आणि या मुलींपैकी बहुतांशी मुलींनी दिलेला नकार ) या संदर्भात या दोन्ही पक्षांचे म्हणणे पटण्यासारखे आहे. मला वाटते यात "सटल्टी" (मराठी शब्द ??) चा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. रस्त्यावरच्या कुणीही कुणालाही प्रेमाबद्दल विचारणे हे सगळ्यात त्रासदायक. मात्र काहीसा परिचय असताना , एरवीची भीडभाड बाजूला ठेवून जर का कुणी मुलगा मुलीला विचारत असेल तर त्याचा अपमान न होऊ देता नकार देणे मुलीला शक्य आहे. अर्थात , यात वर्तमानपत्रात वाचलेल्या रिन्कू पाटील सारख्या बातम्यांमुळे , मुली घाबरल्या असतील तर तेही नैसर्गिक आहेच. शेवटी काय , की "बात की नजाकत को समझना चाहिये" हेच उभयपक्षीयांच्या बाबत खरे.

सहज's picture

12 Feb 2009 - 6:35 am | सहज

शीतल यांनी सुरू केलेला धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून खूप मजा आली.

मैत्र's picture

12 Feb 2009 - 8:47 am | मैत्र

किस्से मजेशीर आहेत. फक्त एकच खरं... जो आवडत नाही तो सो कॉल्ड रोमिओगिरी करतो. जो आवडतो त्याने कसं सही प्रपोज केलं याच्या कहाण्या पुढच्या पिढीपर्यंत वाचल्या जातात.
ज्याची लगट आवडत नाही तो व्हिलन आणि अनेक प्रकारे मागे लागणारा, अडवणारा, गाणी गाणारा तो हिरो...
सिनेमाबाहेर रोजच्या जगण्यात एवढी सुष्ट दुष्टता नसते. साधारण मुलं एका प्रकारची असतात (अपवाद नाहीत असं नाही)
मग जो आवडतो तो चांगला. तो रोमिओगिरी करत नाही. त्याने नाक्यावर/कोपर्‍यावर उभं राहिलं तर ती आपल्याला एकमेकांना पाहण्याची संधी.
रोझ डे ला अनेक रोझेस जिला मिळतात ती ज्या ऐटीत येऊन रोझ क्वीन वगैरे बक्षीस घेते तो विलक्षण मजेशीर प्रकार आहे. म्हणजे एखादीला शंभर गुलाब मिळाले तर ते लै भारी आणि ती त्यासाठी ते सगळे घेतेही!!

अवांतरः हे डेज अनेक वर्ष चालू आहेत. त्यात बरे वाईटही प्रकार चालतात. घेतलंच पाहिजे यासाठी / पैजेसाठी त्रास दिला जातो. त्याला रोमिओगिरी म्हणता येईल. अनोळखी मुलगा सुंदर मुलगी पाहून दुसर्‍याच कॉलेजला जाउन तिला त्रास देतो याला रोमिओगिरी म्हणता येइल. कट्ट्यावर बसून "काय माल आहे" स्वरुपाच्या कॉमेंट्स उघडपणे किंवा प्रत्यक्ष जाऊन दिल्या जातात त्याला रोमिओगिरी म्हणता येइल. वरचे सगळे किस्से हे बिचार्‍या काय करावं / कसं प्रेम व्यक्त करावं/आणि तिला आवडेल की नाही हे न समजता ओळख वाढवून अंदाज न घेता सिनेमाप्रमाणे मी फूल दिलं की ती हो म्हणेल अशा बालिश पणे वागलेल्या बुद्दू मुलांचे आहेत...

ऋचा's picture

12 Feb 2009 - 11:15 am | ऋचा

मस्त ग शीतल
छान लिहिल आहेस्..एकदम वेळेत....
खुप मजा वाटली प्रतिसाद वाचुन :)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अनिल हटेला's picture

12 Feb 2009 - 3:35 pm | अनिल हटेला

धागा आणी प्रतीसाद वाचुन भरपूर हसलो !!

(ज्युलीयट की तलाश मे)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

नीधप's picture

12 Feb 2009 - 4:25 pm | नीधप

गमतीशीर आहेत किस्से!!
ओळख ना पाळख आणि एकदम समोर येऊन 'मला लव्हशिप देती का?' असं जर कुणी विचारलं तर त्यावर समंजसपणे इत्यादी काही उत्तर द्यायची गरज नाही.
मैत्री असेल, ग्रुपमधलीच व्यक्ती असेल तर ते प्रपोज वेगळे असते. माझ्यामते वरचे किस्से अश्या प्रपोजचे नसून पहिल्या प्रकारचे आहेत..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

शितल's picture

12 Feb 2009 - 6:40 pm | शितल

रोमिओगिरी आवडल्याचे कळविल्या बद्दल मिपाकरांचे आभार :)

आपलाभाउ's picture

12 Feb 2009 - 9:19 pm | आपलाभाउ
भडकमकर मास्तर's picture

12 Feb 2009 - 10:06 pm | भडकमकर मास्तर

>>
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

तू लिहिलेले किस्से आवडले. कालेजात असताना आजूबाजूला एकेक प्रेमवीर काय काय उचापती करायचे ते आठवते. आवडत्या मुलीचे सगळे तास नीट बघून ती कुठल्या लेक्चरला बसते ते बघून लक्ष ठेवणे, ती वर्गातून बाहेर निघाली रे निघाली की तिच्याबरोबर निघणे.
तिला बसस्टॉपपर्यंत सोबत करणे. लॅबमधे शक्यतो तिच्याच बेंचवर, नाहीच जमलं तर निदान शेजारच्या बेंचवर, काम करायला मिळेल हे बघणे.
एक्सपेरिमेंट्पेक्षा तिच्या हालचालींकडे आणि तिच्या मैत्रिणींना ती काय चिठ्या चपाट्यांची देवाणघेवाण करते आहे हे पहाणे.
असे असंख्य उद्योग सुरु असत.
आमच्याकडे मुली येणार म्हणजे "ए, तेवढा ८०८५ प्रोसेसरचा प्रोग्रॅम चेक करुन दे ना! शीऽऽचालतच नाहीये!" (अगं बये, कोडिंग नीट केलंस तर चालेल ना? पण मग मुलांना कोण फिरवणार? असं मनात म्हणत) मग आम्ही उदारपणे तो रिपेर करुन चालवून देणार. की आमची गरज संपली!! :(

पण अगदी परिचयातली मुलं असली तर त्यांचा भीषण अपमान वगैरे करुनच त्यांना तुमच्या मनातल्या भावना कळवायला हव्यात असे नाही. तुला जसे माझ्याबद्दल वाटते आहे तसे मला वाटत नाही असे सांगूनही प्रश्न सुटायला हवा. हां आता जर एखादा मुलगा लोचटपणे पुन्हा पुन्हा येत राहिला तर मात्र बाब अवघड होते हे खरेच आहे! तेव्हा मुळात हे सगळे संवेदनक्षम मनाचे प्रश्न आहेत आणि ते तसेच सोडवावे लागतात.

चतुरंग