✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रोमिओगिरी..

श
शितल यांनी
Wed, 02/11/2009 - 18:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13463 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

=)) =)) =))

अविनाशकुलकर्णी
Wed, 02/11/2009 - 18:57 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) खुप मजेदार..छान..आवडले
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Wed, 02/11/2009 - 18:56 नवीन
मस्त लिहले आहेस. मोक्याच्या वेळी विषय !!
  • Log in or register to post comments

हेच

विसोबा खेचर
गुरुवार, 02/12/2009 - 14:17 नवीन
हेच बोल्तो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

हहपुवा

संदीप चित्रे
Wed, 02/11/2009 - 18:57 नवीन
किस्से मस्त आहेत. >> अग हा काय तुला जिवंतपणीच श्रध्दांजली वाहत आहे वाटत" हहपुवा :)
  • Log in or register to post comments

मस्त...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/11/2009 - 19:00 नवीन
मस्त... आमच्या वेळी हे सगळे डे वगैरे नुकतेच सुरू झाले होते. व्हॅलेंटाइन डे इतकं माहित नव्हतं. पण रोझ डे, साडी डे वगैरे जोरात असायचे. जसं आठवेल तसं सांगतो. अवांतरः आमच्यात फक्त लग्नातच घास घालतात (भरवतात). ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

ज्युलियटगिरी...

ज्ञ
Wed, 02/11/2009 - 19:01 नवीन
पोरांनी केली की ती रोमिओगिरी. आणि पोरींनी केली तर काय तिला ज्युलियटगिरी, लैलागिरी असे काही म्हणायचे का??? ;) :/
  • Log in or register to post comments

शॉल्लेट ...!

छोटा डॉन
Wed, 02/11/2009 - 19:02 नवीन
१४ फेब. च्या मुहुर्तावर ज्याम भारी लेख आला आहे. मस्त गं शितल, धमाल लेख आहे. वाचुन हसुन हसुन पडायची वेळ आली होती ... स्वानुभव असा काही नसल्याने इतरांचे "किस्से " वाचण्यास उत्सुक. अवांतर : "पोरींचा खेळ होतो, पोरांचा गेम होतो " असे आमचा एक नेहमीच नकाराधिकार वापरला गेलेला मित्र म्हणायचा ;) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

मुली देखील अपेक्षा करतात की त्याने त्याच दिवशी विचाराव....

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/11/2009 - 19:04 नवीन
तसा सिग्नल हवा,पण मुला॑नी काही केल की लगेच लागले खडे फोडायला(काथ्याकुट करायला) मी ज्या माता/भगीनी बघीतल्यात ज्या त्या दिवशी छान छान कपडे घालुन वाट पहात असतात्,जर विश्वास नसेल तर "नेस वाडिया"ला चक्कर मारा सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

एफ़ सी ला

त्रास
Wed, 02/11/2009 - 20:14 नवीन
एफ़ सी ला रोज बघायला मिळणारा खेळ आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/11/2009 - 19:17 नवीन
अग हा काय तुला जिवंतपणीच श्रध्दांजली वाहत आहे वाटत" हा हा हा :)
  • Log in or register to post comments

+१

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/12/2009 - 11:17 नवीन
=)) =)) सहमत ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुली फार

त्रास
Wed, 02/11/2009 - 19:25 नवीन
मुली फार हुशार असतात. त्यांना पाठीला व कानाच्या बाजुलापण डोळे असतात. आणि महत्वाचे म्हणजे, त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे न बघणाऱ्या क्षुद्र जीवांना ओळखता येते.
  • Log in or register to post comments

धमाल लेख..

प्राजु
Wed, 02/11/2009 - 19:58 नवीन
मजा आली.. एक किस्सा.. आमच्या कॉलेजच्या कँटीनमध्ये एकदा आम्ही कटवडा खात होतो.. एक हिरो आला आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या मैत्रीणीला त्याने "तुझ्याशी थोडं बोलायचं आहे " असं सांगितलं. ती म्हणाली, "मला बोलायचं नाहीये..." तो "प्लिज प्लिज" असं म्हणत तीला फोर्स करू लागला. ती वैतागली आणि माझ्याकडे बघू लागली. मी म्हणाले त्याला, "अहो, तिला नाही बोलायचं तर का तुम्ही फोर्स करता आहात?" तो मला म्हणाला, " हे बघा, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका.." मी उठले आणि टेबलाच्या दुसर्‍या बाजूला जाऊन उभी राहिले.. आणि पुन्हा म्हणाले.. " बरं मी कडेला कडेला बोलते...तुम्ही तिला फोर्स करू नका.." कँटिन मध्ये असलेल्या सर्वांचे लक्ष जवळ जवळ आमच्याकडेच होते. त्यामुळे एक जोरदार हशा पिकला आणि तो बिचारा इकडे तिकडे बघत ओशाळत निघून गेला. :) दुसरा एक किस्सा.. व्हॅलेंटाईन डे दिवशी, सगळी मुले टाय मध्ये होती. माझ्या एका मैत्रीणीवर लाईन मारणारा मुलगा .. तो ही नटून थटून आला होता. आमही फिजिक्स च्या लॅब च्या बाहेर उभे होते. तो लॅब मधून आला... आणि अगदी लाडात येऊन माझ्या मैत्रीणीला म्हणाला.." ए.... ए... मी कसा दिसतोय सांग की गं..." तीने दुर्लक्ष केलं.. तो पुन्हा.."ए... सांग की.. सांग की.." ती चिडली.. "ओ.. जावा तुम्ही इथून.." असं काहीसं बोलली. पण तो जातीचा रोडरोमीओ होता..."असं काय करतीस सांग.. की.. " असं म्हणू लागला. ती खूप चिडली. आणि माझ्याकडे बघून म्हणाली..,"प्राजक्ता, बेडूक बघितला आहेस का कधी?... तो घाणीत ओरडत असतो तो...?" मी सुद्धा साळसूद्पणे "नाही.." म्हणाले. ती म्हणाली, " हा बघ.. आज टाय घालून इथे आलाय.." लॅब बाहेर बरिच गर्दी होती. सगळे जण जोरदार हसायला लागले आणि तो बेडूक निघून गेला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खल्लास ...!

छोटा डॉन
Wed, 02/11/2009 - 20:02 नवीन
अफाट किस्सा आहेत बै, मस्त मज्जा आली ...! >>मी उठले आणि टेबलाच्या दुसर्‍या बाजूला जाऊन उभी राहिले.. आणि पुन्हा म्हणाले.. >>" बरं मी कडेला कडेला बोलते...तुम्ही तिला फोर्स करू नका.." =)) =)) =)) आई आई ग्ग्गं ऽऽऽऽ काय ज्याम पोपट केलास त्याचा, खत्तरनाक ...! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हसुन वेडे व्हायची वेळ आली..

शितल
Wed, 02/11/2009 - 20:15 नवीन
=)) =)) प्राजु, खतरनाक किस्से आहेत तु सांगितलेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बापरे! ही

रेवती
Wed, 02/11/2009 - 20:07 नवीन
बापरे! ही असली धाडसी कामं करणारी मुलं बघीतली की हे पुर्वजन्मीचे शिवाजीमहाराजांचे मावळे असावेत असे वाटते. फक्त जरा लढाईचं काम नाहीये या जन्मी! प्राजु, तू म्हणजे अगदी वाटच लावलीस.... बेडकाची!;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

प्राजु....थो

जयवी
Wed, 02/11/2009 - 23:03 नवीन
प्राजु....थोर आहेस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

टाय घातलेला बेडूक ....

वाहीदा
गुरुवार, 02/12/2009 - 14:13 नवीन
चित्र डोळ्यासमोर तराळते आहे... काय कल्पना आहे...st xavier college of mumbai आणी बेड्काचे अफाट नाते आहे ते आठवले .... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

काय काय

शंकरराव
गुरुवार, 02/12/2009 - 19:12 नवीन
काय काय वाचावे .. एकूण रोमिओगिरी मस्त लिहीले आहे व प्रतिसाद अप्रतिम आहेत. जिथे मनाला खटकले ते असे ..... तेरे हुस्नका जल्वा कयामत ना बने डर है वो 'टाय' मकरुह का फंदा ना बने अलहिदा अजूबा थी उसकी किस्मत जहा मेंढक्कोंने भी जताई निस्बत.. अब क्या रहेगा उसका जवाब.. बता ऍ मेरे ईल् हाम उसके ईकरार को नाचीज करेंगे सलाम या फिर गाली गलोछ सलावात को भी सलाम गालिबराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

तू तर

रेवती
Wed, 02/11/2009 - 20:01 नवीन
तू तर भारीच आहेस बाई शितल! १४ फेब्रू.चे चांगले निमित्त शोधले आहेस. छोटा लेख वाचून करमणूक झाली. रेवती
  • Log in or register to post comments

मैत्रिणीं

त्रास
Wed, 02/11/2009 - 20:02 नवीन
मैत्रिणींचे किस्से रंगवायला फार-फार मजा येते
  • Log in or register to post comments

>>अग हा काय

लिखाळ
Wed, 02/11/2009 - 20:21 नवीन
>>अग हा काय तुला जिवंतपणीच श्रध्दांजली वाहत आहे वाटत"<< हा हा हा .. मस्त :) प्राजूचे 'कडे कडेने बोलते' सुद्धा भारी :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

खुप

बाळु
Wed, 02/11/2009 - 20:23 नवीन
खुप मजेदार..छान..
  • Log in or register to post comments

हा हा हा!

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/11/2009 - 20:33 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

ही कविता

महेंद्र
Wed, 02/11/2009 - 20:39 नवीन
ही कविता माझ्या बायकोने केली होती.. मुंबै विद्यापिठाच्या वार्षीकांकात आली होती. बघा आवडते का... व्हेलंटाईन दीस म्या अन धुरपदान ठरिवला प्रितीचा दीस त्ये काय म्हंत्यात राव त्याला व्हेलंटाईन दीस करायचा साजरा थाटात दोगं बी राजारानी झोकात म्या बी रेड्डी झालतो मनलं आता पिरती दावतो काजळ पावडर अन लाली सजुन धजुन ध्रुपदा आली गेलो पयले होटेल मंदी देल्ली ओर्डर चिनी मंदी नुडल अन फ़्राईड राईस बसलो सायबावानी ऐसपैस जमलं नाही काट्या चमच्यानं वरपलं सगळं हाताहाताने खाल्ल्यावर मात्र पोट लागलं ढ्वळाया वाटलं ह्यापक्षी मायच्या बेस लागतात शेवाया टक्सीनं गेलो राव डिस्कोमंदी नाचाया चकमकात बघुन हरकलो टकामका लागलो बघाया काय त्ये हातवारं? निसती अंगांगी झोंबी रे मंग म्या अन धुर्पदानं देल्ली सुरुवात करुन छन खळ खळ छन फुगदि अन झिम्म्यानं आमाले बघुन सार्यास्नी य़ेगळॆ वाटले काही तरी पाहुन्शान म्हने , नवी फ्याशन खरी मंग सायबा धुमशान झाली सार्याइनच आमची कोपी केली धुर्पदाची मात्र कळी खुल्ली व्हेलंटाईन खुश नाहिवाली मंग दुसया दिवशी गेलो आपल्या वावरात कुनी नाही पाहुन राव शिरलो राव खोप्ट्यात ढोलकीच्या तालावर नाचलो तुफ़ान ईरभर चारली एकमेकास्नी कांदा, चटनी अन भाकर म्या मनलं धुर्पदीले ठरविले होते खुप काही रानातल्या वेलंटाईनची मजा शयरात नाही सुपर्णा कुळकर्णी
  • Log in or register to post comments

मजेदार आहे कविता.

प्राजु
Wed, 02/11/2009 - 20:56 नवीन
मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र

असेच

रेवती
Wed, 02/11/2009 - 21:02 नवीन
असेच म्हणते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

आता

विनायक पाचलग
Wed, 02/11/2009 - 21:02 नवीन
तसेव आम्ही लहान आण इआमच्याकडे हे प्रकार नाहीत पण आता एवढे वाचल्यावर एकदा फीरले पाहिजेच आर्चिस मधुन आणि पियु मधुन विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

आयला

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/11/2009 - 21:09 नवीन
कालिजात जातो ना रे? मग कसला लहान? हात्तीच्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

आयला

विनायक पाचलग
Wed, 02/11/2009 - 21:15 नवीन
अहो भावु अभी तो सिर्फ शुरवात हुवी हे अहो एवढा वेळ नसतो हो आणि हो अजुन खुप वर्शे आहेत की पडलेली विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

ह्म्म्म्म्!

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/11/2009 - 21:20 नवीन
>>हो अजुन खुप वर्शे आहेत की पडलेली अरेरे! जाउ देत! तु ते केमेस्ट्रीचं जर्नल घे लिहायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

क्या बात

जयवी
Wed, 02/11/2009 - 23:05 नवीन
क्या बात है :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र

मस्त

अवलिया
Wed, 02/11/2009 - 21:35 नवीन
मस्त :) तुम्हाला काही गंमती जमती माहित असतील तर आम्हाला ही सांगा. नको. पिडाकाका मला परत रागवतील... :( --अवलिया
  • Log in or register to post comments

असेच

शितल
Wed, 02/11/2009 - 21:39 नवीन
>>नको. पिडाकाका मला परत रागवतील... =))
  • Log in or register to post comments

भारी किस्से

धनंजय
Wed, 02/11/2009 - 21:44 नवीन
शितल, प्राजु - भारी! मुली काय द्वाड असतात... रोमियोगिरीत मजा असते पण. मुलींनो, नेहमीच पचका करू नका आमच्या बिचार्‍या भावंडांचा. एकेकाला थोडी लिफ्ट देऊन अलगद खाली सोडा. (तिरमिरीत कॅडबर्‍या टाकू नका, हा सल्ला लक्ष देऊन ऐका!)
  • Log in or register to post comments

लै भारी........

जेन
Wed, 02/11/2009 - 21:43 नवीन
खूपच चेष्ठा केली तुम्ही सर्व मुलींनी.....त्या बस टोपवाल्या रोमियोसाठी फारच वाईट वाट्ते..... बाकी आणखीन गोष्ट असेल तर लिहीत जा.......
  • Log in or register to post comments

माय टू सेन्ट्स

बेसनलाडू
Wed, 02/11/2009 - 23:06 नवीन
शितलताई आणि प्राजुताईंनी सांगितलेल्या काही किश्शांमध्ये मुलांच्या असमंजसतेबरोबरच मुलींचाही तितकाच असमंजसपणा (मला तरी) दिसला (असमंजसपणा हा फारच सौम्य शब्द वाटावा; काही ठिकाणी याच शब्दाचे समानार्थी शब्द वापरले जातात - जसे माज, ऍटिट्यूड - विशेषतः मुलींच्या बाबतीत :) ) प्रेमाचा स्वीकार ही मोठी गोष्ट पण नाकारलेल्या प्रेमाचा स्वीकार ही (ज्याचे/जिचे प्रेम नाकारले गेले आहे त्याच्या/तिच्या साठी) त्याहूनही मोठी गोष्ट, असे मला वाटते. त्यामुळे एखाद्याचे प्रेम नाकारायचे असल्यास एखादीने ते अधिक समंजसपणे, पद्धतशीरपणे नाकारावे असे वाटते. अजाणत्या वयात प्रेम इ. संकल्पना मुलांना (आणि मुलींना) पूर्ण उमजतीलच असे नाही; पण भावनिक गुंतवणूक कमीअधिक प्रमाणात नक्कीच असावी. ती फारच असेल आणि वर सांगितलेल्या एक-दोन किश्शांमध्ये सांगितलेल्या पद्धतीने नाकारली गेली तर होणारी मानसिक इजा आणि त्याची परिणती, यांची कल्पनाच न केलेली बरी! असो. (डोळस)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

त्यामुळे

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/12/2009 - 00:00 नवीन
त्यामुळे एखाद्याचे प्रेम नाकारायचे असल्यास एखादीने ते अधिक समंजसपणे, पद्धतशीरपणे नाकारावे असे वाटते. सहमत... चॉकलेट फेकणे, फुले फेकणे , चारचौघांत हसणे वगैरे प्रकार टाळून स्पष्ट नकार देणे आवश्यक... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

सहमत

बेसनलाडू
गुरुवार, 02/12/2009 - 00:19 नवीन
चॉकलेट फेकणे, फुले फेकणे , चारचौघांत हसणे वगैरे प्रकार टाळून स्पष्ट नकार देणे आवश्यक... अगदी सहमत. आणि असे अपमानास्पद प्रकार टाळण्याबरोबरच 'तुला भावासारखे मानले' (मग आजवर कधी राखी मात्र कशी बांधली नाही?), 'तुला माझ्यापेक्षा चांगल्या हजार मुली मिळतील' (ते माहीतच आहे गं, पण 'तू' नाही ना!? इतर हजार चांगल्या हव्या असत्या तर 'तुझ्या'मागे कशाला वेळ वाया घालवला असता? ;) ) इ. कृत्रिम मलमपट्टी सुद्धा टाळल्यास उत्तम. 'सम् हाव् मला तू माझा जोडीदार म्हणून आवडत/पटत नाहीस / विचार करता येत नाही आणि त्यामुळे 'प्रेम' (किंवा जे काही असेल ते) मूर्त स्वरूपात साकार होणे शक्य नाही' हे कटू वास्तव जसेच्या तसे विदाउट् एनी शुगर कोटिंग समजावता आल्यास आणि दुसर्‍या बाजूस ते (लवकरात लवकर आणि सकारात्मक दृष्टीने) स्वीकारता आल्यास उत्तम. (वास्तववादी)बेसनलाडू ऑगस्ट महिन्यात अशाच एका प्रकरणात अपमानास्पदरित्या सपशेल आपटल्यानंतर सहा महिन्यांतच फेब्रुवारीमध्ये गेट् च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यम् टेक् केलेल्या आमच्या एका अतिशय जिवलग मित्राची आठवण येते. अशी उदाहरणे स्पृहणीय आणि विरळीच! (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

ऑगस्ट

नाटक्या
गुरुवार, 02/12/2009 - 02:28 नवीन
ऑगस्ट महिन्यात अशाच एका प्रकरणात अपमानास्पदरित्या सपशेल आपटल्यानंतर सहा महिन्यांतच फेब्रुवारीमध्ये गेट् च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यम् टेक् केलेल्या आमच्या एका अतिशय जिवलग मित्राची आठवण येते. माझ्या एका मित्राच्या बाबतीतही हे घडले आहे. त्याने एका जवळच रहाणार्‍या मुलीला प्रपोज केले, तेव्हा तिने त्याला नाही म्ह्टले. नुसते नाही म्हटले असते तर काही प्रॉब्लेम नव्हता पण तिने त्याला त्याच्या लायकी बद्द्ल सुनावले. कारण तो चाळीत रहायचा आणि ही पलिकडच्या ब्लॉक सिस्टिम मध्ये. नंतर त्याने अमेरिकेत येवुन स्कॉलरशीपवर एम.एस. केले आणि नंतर अमेरिकेत नोकरी मिळवून दोन वर्षानी भारतात सुटीवर आल्या नंतर त्याच मुलीने त्याला प्रपोज केले. तेव्हा ह्या पठ्ठ्याने तिला चक्क "चल पुढे निघ" असे सांगीतले. मला नंतर सांगत होता कि जेव्हा चाळीत रहात होतो तेव्हा बघायला पण तयार नव्हती आता अमेरिकेत रहातो आहे म्हटल्यावर आली लाळ गाळत. तेव्हा आज आपण जसे कोणाबरोबर वागतो तसेच कोणीतरी तुमच्या बरोबर वागू शकते ह्याचे भान ठेवले तर असे प्रकार होत नाहीत. - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

आली लाळ

मराठी_माणूस
गुरुवार, 02/12/2009 - 06:37 नवीन
आली लाळ गाळत हेच शब्द वापरले असतील तर कीतीही अर्थाने यश संपादन केले असले तरी काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

हे तो..

नाटक्या
गुरुवार, 02/12/2009 - 21:50 नवीन
हे तो माझ्याशी बोलताना म्हणाला. आपल्या बालपणीच्या (आमच्या भाषेत GD) मित्रांबरोबर खाजगीत बोलताना मला नाही वाटत कोणी आपल्या यशाची मस्ती डोक्यात ठेवावी. आणि जर कोणी ती ठेवत असेल तर तुम्ही म्हणता तसा अर्थ उरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

डोंबलाचे स्पृहणीय

गोगोल
गुरुवार, 02/12/2009 - 04:59 नवीन
काय हो प्रेमात नापास होणे आणि गेट मध्ये घावघवित यश मिळवणे या दोघांचा काय संबंध? हे म्हणजे सफरचंद आणि संत्र्यांची तुलना करणे झाले. प्रेमाची परीक्षा वेगळी आणि आयुष्याची परीक्षा वेगळी. माझ्यामते हे उदाहरण सांगताना तुम्ही खालील पैकी एक गोष्ट अध्यारूत धरली आहे 1. मुलीनी जो नकार दिला त्याचे कारण म्हणजे मुलगा मठ्ठ होता. 2. यम टेक (तुमचा शब्द) झालेल्या सर्वाना लठ्ठ (?) पगाराच्या नोकर्‍या मिळतात आणि त्या मुलीनी पैशासाठी त्या पोराला नकार दिला. कायच्च्या काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

प्रेम आणि आयुष्य

बेसनलाडू
गुरुवार, 02/12/2009 - 05:03 नवीन
प्रेमाच्या परीक्षेत नापास होऊन आयुष्याच्या परीक्षेत न होणे हे स्पृहणीयच! अन्यता दोन्हीकडे नापास होणार्‍यांची उदाहरणे वाचण्या-पाहण्यात येतच असतात. तुम्हाला वाटो अगर न वाटो! आणि मुख्य म्हणजे तुम्ही सांगितल्यापैकी कोणतीही गोष्ट अध्याहृत धरलेली नाही :P (स्पष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

असेच

शितल
गुरुवार, 02/12/2009 - 01:35 नवीन
>>त्यामुळे एखाद्याचे प्रेम नाकारायचे असल्यास एखादीने ते अधिक समंजसपणे, पद्धतशीरपणे नाकारावे असे वाटते. बरोबर आहे पण ही समज त्या वयात नसते, कदाचित त्याच्या घरचे संस्कार, घरची आर्थिक परिस्थिती ह्यावरून माज किंवा मिजास किंवा समंजसपणे वागणे हे ठरत असावे असे माझे वैयक्तीक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

+१ (माय टू सेन्ट्स)

मदनबाण
गुरुवार, 02/12/2009 - 07:23 नवीन
सहमत... मुलांनी सेफ्टी ऑप्शन निवडावा :-- Image removed. :D मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

किस्से

भडकमकर मास्तर
Wed, 02/11/2009 - 23:57 नवीन
किस्से गमतीदार आहेत... ( जे मुलगे यातून गेले आहेत त्यांना ते तितकेसे गंमतीदार नक्कीच वाटणार नाहीत...) :) असो... ... वरती बेसनलाडू म्हणतात त्याप्रमाणे नकाराचा प्रकार इतरांसाठी इतका विनोदी होणं , आपण हास्यास्पद बनणं भयंकरच... पण मुलामुलींत संवादाचा पुष्कळ अभाव असताना हे असलेच प्रकार होणार असं वाटतं...( शाळा कादंबरीत ज्याप्रमाणे सुर्‍या डायरेक्ट जाऊन केवडाला " ए लाईन देती का तू?" असं विचारतो.... मग ती बिथरून दोघांची तक्रार करते वगैरे..)... हे वरच्या किश्शामधले सुर्‍याचेच भाईबंद सगळे...प्रॉब्लेम म्हणजे संवादाचा अभाव... मग मुलींनी त्यांना उत्तर असंच जालीम द्यायचं, हा पायंडा... या धाग्याच्या जवळपास जाणारा एक डॉन्याचा धागा होता ( तसल्या नजरा ..)... त्याची आठवण झाली...त्यात फार उद्बोधक चर्चा होती या विषयावरती... एका मित्राची मजा ..त्याला कोणतीही मुलगी आवडायची त्याला चॊईसच नाही असे आम्ही म्हणायचो, त्याला एक मुलगी आवडते त्यात त्याला चॉईस नाही, हा निष्कर्ष का? :? :? :? हे वाक्य थोडे गोंधळात टाकणारे... काही शक्यता.. १.तो खूप महान / हँडसम / डॅशिंग / हुशार होताहोता तरीही त्याला कोणत्याही वगैरे वगैरे मुली आवडत असत... २. तो फाल्तु / साधा होता तरी त्या मित्राला हायक्लास /सुंदर किंवा इतरांना आवडणार्‍या वगैरे वगैरे मुली आवडत नसत... मग त्या बिचार्‍याने काय करावे? तुमच्या किंवा तुमच्या ग्रुपच्या इतर मुलींमागे गुलाब घेऊन त्याने येऊ नये , ही तुमची अपेक्षा रास्त... पण त्याने समजा आपली पात्रता ओळखून दुसर्‍या कोण्या कोणत्याही मुलीच्या मागे गेले तरी तो चर्चेचा किंवा थट्टेचा विषय का ठरावा ? .... म्हणजे एखाद्याला तथाकथित चांगल्या मुली आवडल्या तरी त्याची थट्टा आणि तथाकथित कोणत्याही मुली आवडल्या तरी थट्टा ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

असेच

शितल
गुरुवार, 02/12/2009 - 01:25 नवीन
>>त्याला एक मुलगी आवडते त्यात त्याला चॉईस नाही, हा निष्कर्ष का? :? हे वाक्य थोडे गोंधळात टाकणारे... तो मुलगा तसा स्वभावानेही चांगला, दिसायला ही ठिक ठाक मेन म्हणजे चेहर्‍यावरून भलताच सज्जन वाटे, आणि हा सर्व मुलींकडे पाहुन हसे, त्याच्या उत्तरा देखल कोणी हसली हा दुसर्‍या दिवशी पासुन तिच्याभोवती गुठमळलाच समजायचा, आणि आमच्या ग्रुप मध्ये असल्याने तो आम्हाला सर्व सांगत ही होता हा त्याच्या अजुन एक सज्जन पणा. त्याला दर ८/१५ दिवसांनी कोणी ना कोणी आवडे त्यामुळे आम्ही त्याच्या अशा स्वभावामुळे त्याला तुला चॉईस नाही म्हणजे स्पेसिफिक एक मुलगी आवडली असे त्याचे नव्हते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/12/2009 - 00:02 नवीन
कॉलेजात असताना आमच्या कडे जेमतेम विड्या घेण्या इतके पैसे असायचे त्यामुळे असले प्रकार कधीच केले नाहीत. करावेसेही वाटले नाहीत. कारण कॉलेजची ४-५ वर्ष काप काप कापल्यावर ती मुलगी एकाद्या आपल्याहून मोठ्या वेल-सेटल्ड मुलासोबत निघून जाणार ह्याची गँरंटी असायची. कशाला उगाच पैसा आणि वेळ वाया घालवा?????? पण इतका समंजसपणा नसलेले बरेच प्रेमवीर कॉलेजात होते. ठरवून एखादीला रोज-क्वीन करणं वगरे महा महागडे आचरट प्रकार करायचे आणि दुसर्‍या दिवशी कट्ट्यावर 'एक दम दे ना' म्हणायचे. ऍडी जोशी आमास्नी प्रपोज करायचं भ्या न्हाय, हो म्हनली तर शॉपींगचं बिल कुठून भरनार ह्याची चिंता हाय.
  • Log in or register to post comments

बेष्ट

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/12/2009 - 00:12 नवीन
आमास्नी प्रपोज करायचं भ्या न्हाय, हो म्हनली तर शॉपींगचं बिल कुठून भरनार ह्याची चिंता हाय. आत्ता पर्यंत वाचलेल्या सिग्नेचर विडंबनांपैकी बेष्ट........... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा