Cashless

निओ१'s picture
निओ१ in जनातलं, मनातलं
19 Nov 2016 - 1:32 am

नोटबंदी जाहीर झाली व ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती. तर.. घरी आम्ही चार लोक आहोत.

१. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट
२. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट
३. औषधे - कार्ड पेमेंट
४. नेट बील - कार्ड पेमेंट
५. फोन बील - कार्ड पेमेंट
६. लाईट बील - कार्ड पेमेंट
७. सिलेण्डर - कार्ड पेमेंट
८. टिव्ही रिचार्ज - कार्ड पेमेंट
९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट

* यातील कित्येक लोकांना कार्ड मशीन घेण्यास मी गेल्या दोन वर्षापासून सांगत होतो व सकारण, उदाहरण देऊन पटवून दिले होते. त्यांनी ती घेतली होती.

आम्ही हॉटेल व इतर जागी जात नाही, पण तेथे पण आता सरास कार्ड पेमेंट घेतात.
प्रश्न होता रोजच्या खर्चाचा, म्हणजे भाजी, फळे इत्यादी.

नियमित असलेली २-३ दुकाने निवडली त्यांना माझे काम व माझे पैसे कसे रोख नसतात हे समजवले व त्यांना नेट बॅन्कीग शिकवले, त्यांच्या खात्यात त्यांच्यासमोर पैसे मोबाईलद्वारे (IMPS payment) कसे येतात व तुम्हाला लगेच कसे मिळतात हे शिकवले. अगदी पान टपरीवाल्याला देखील व त्यांनी ते मान्य देखील केले कारण नवीन पध्दतीने खात्यात पैसे जमा झाल्याचा मोबाईल मासेज लगेच येतो व त्यांना कळते की ह्या व्यक्तीने पैसे दिले. दुसर्‍याला पैसे कसे द्यावे हे शिकवले, आपले पैसे, आपला पासर्वड आपला OTP कसा जपावा व का हे समजवले.

हे झाले आमचे रामायण!

पण गल्लीमध्ये अनेक असे होते की त्यांना हे समजणे अवघड होते.

१. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो. त्यांना त्याचा फायदा आता पण झाला या १० दिवसामध्ये व इतर काही गोष्टीमध्ये देखील.
२. गॅस बुकिंग देखील करत होतो.

पण आता रक्क्म जमा करताना अडचण येत होती, कारण माझा व्यवसाय, माझे उत्त्पन व मी भरत असलेली रक्क्म यात ताळमेळ करणे अवघड गेले असते. ९ तारखे पासून मी किमान माझ्या जवळपास असलेल्या व ऑनलाईन व्यवहार करत नसलेल्या अनेकांना नेट बॅकिंग व कार्ड वापरण्याचे फायदे शिकवले, काही शिकले काही धडपडत आहेत, पण शिकत आहेत.
माझ्या माहितीमध्ये असलेला एकही व्यक्ती एक ही दिवस एटीमच्या बाहेर उभा राहिला नाही गेल्या दहा दिवसात, मला वाटते हे माझे यश असावे.

माझ्या हाती एवढे होते, तर एवढीच समाजसेवा करु शकलो. पुढील काही दिवस ही असेच निघून जातील. काही तासापुर्वीच एके ठिकाणी वाचले होते, तिरुपतीला १ मिनिटच्या दर्शनासाठी २४ तासाची किम्वा कधी कधी त्यापेक्शा मोठी रांग असते....!

माझ्याकडे अजून ही ३४० रु आहेत. दिनांक १९-११-१६

समाजविचार

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

19 Nov 2016 - 1:43 am | संदीप डांगे

चांगले काम केलेत! धन्यवाद!

विवेकपटाईत's picture

19 Nov 2016 - 9:16 am | विवेकपटाईत

मला काहीच फरक पडला नहीं. फ़क्त पिटीएम् फोन मध्ये टाकले. आमचा बनिया कार्ड आधीच घेत होतो. (त्याचे म्हांने थोडाफार कर सरकारला दिला तर काही जास्त नुकसान होत नाही. आजकाल त्याची विक्री वाढलेली आहे. आजूबाजूचे दुकानदार हि बहुतेक लवकरच कार्ड घेणे सुरु करतील. या वर्षी नक्कीच कर देणार्यांची संख्या वाढेल.

यशोधरा's picture

19 Nov 2016 - 9:36 am | यशोधरा

छान काम केलेत.

एस's picture

19 Nov 2016 - 10:01 am | एस

गुड जॉब.

चांगले काम केलेत. इकडे काय कोणी न विचारता त्याला सांगायला गेलो की त्यांना संशय असतो यामध्ये याचा काहितरी डाव असणार.सावध राहावे लागते.

निनाद's picture

19 Nov 2016 - 11:25 am | निनाद

छान केले आहे काम! आवडले. प्राप्त परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा त्यावर मार्ग शोधणे जास्त चांगले. तेच तुम्ही केल्याने लिखाणात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी वाटली.

व्यवसाय करणार्‍यांना साधारणपणे पैसे 'येतात' हे लक्षात आले की पैसे येण्याचा अजुन एक मार्ग उघडायला ते नेहमीच तयार असले पाहिजेत.

उत्तम व्यावसायिकाने तर पैसे येण्याचे जितके जास्त मार्ग उघडता येतील तेव्हढे उघडले पाहिजेत.

छान केले आहे काम! आवडले. प्राप्त परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा त्यावर मार्ग शोधणे जास्त चांगले. तेच तुम्ही केल्याने लिखाणात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी वाटली.

+१११११११

मोदक's picture

19 Nov 2016 - 11:53 am | मोदक

हे भारी काम केलेत.

पैसा's picture

19 Nov 2016 - 12:55 pm | पैसा

प्रचंड कौतुक आहे! शक्य तेवढ्या लोकांना नेट साक्षर आणि अर्थसाक्षर केले पाहिजे. निनादच्या धाग्यावर मी आयएमपीएस बद्दल (नेट बँकिंग मोबाईल अ‍ॅपवरून) लिहिले होते. http://www.misalpav.com/comment/899677#comment-899677
लोकाना समजावण्यासाठी याचा काही उपयोग झाला तर बघा.

सुबोध खरे's picture

19 Nov 2016 - 1:08 pm | सुबोध खरे

माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांकडून मी चेक घेतो, payTM हि आहे, एका रूग्णाने chillr म्हणून aap वरून पैसे दिले. माझे स्वतःचे HDFC बँकेचे PAYZAPP म्हणून अँप आहेच. यातील काहीच करण्याची तयारी नसणाऱ्या रुग्णांना मी रोख रक्कम घेऊन या म्हणून सांगतो. जुन्या नोटा खपवायचा प्रयत्न करणारे लोक रोज येतात. स्पष्ट शब्दात "नकार" माझी स्वागत सहायिकाच देते. माझे रिपोर्ट मी लगेच देतो हे माहित नसलेल्या काही लोकांकडे पैसे नसतात पण ते नंतर चेक आणून देतात आणि रिपोर्ट घेऊन जातात.
रोज चेक भरायला बँकेत जावे लागते जी माझ्या घरापासून २०० मीटर वर आहे. १६ तारखेला एकदा जाऊन माझ्या जुन्या आणि नव्या नोटा भरून आलो. एक तास रांगेत बसलो होतो मासिक आणि व्हाट्स अँप घेऊन. अन्यथा काही त्रास नाही. महानगर गॅस, वीज, पाणी, एम टी एन एल, मोबाईल इ सर्व बिले जालावरच्या भरत असल्याने रांगेत उभे राहणे कधीच बंद केले आहे.
एकदा "त्रास होतो" म्हटलं कि मनाला त्रास होतो आणि "नाही होत" म्हटलं मानसिक शांतता असते.

निनाद's picture

19 Nov 2016 - 4:51 pm | निनाद

तुमच्याकडे कार्ड स्वाईप मशिन का घेतले नाही? कार्डाने पैसे देणे घेणे सोपे होईल. शिवाय कार्ड आहे म्हंटल्यावर पैसे नाहीत चेक घ्या वगैरे सबबी आपोआपच कमी होऊ शकतील.

निनाद's picture

19 Nov 2016 - 4:53 pm | निनाद

प्रश्न फार आगाऊ किंवा वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व!. उत्तर दिले नाही तरी चालेल.

सुबोध खरे's picture

19 Nov 2016 - 7:32 pm | सुबोध खरे

कार्ड स्वाईप मशिन घेण्यासाठी एच डी एफ सी बँकेत गेलो होतो
परंतु त्यांनी त्याला ८ दिवस लागतील असे सांगितले परत तुम्हाला करंट अकाउंट उघडायला लागेल असे सांगितले. माझा लष्करात असल्यापासूनचे पगाराचे खाते आहे. शिवाय एन के जी एस बी बँकेत करंट अकाउंट आहे. ते सोडून अजून एक खाते उघडायचे आणि त्याची उस्तवार करायची आली. . शिवाय २. २५ % टक्के कमिशन लागेल सांगितले आहे. मशीनचे ४५० रुपये महिना अधिक.
पूर्वी बरेच ग्राहक २. २५ टक्के देण्यास तयार होत नसत.(१००० रुपयावर २५ रुपये देण्यापेक्षा ते माझ्या दवाखान्याच्या इमारतीतच ए टी एम आहे तेथून रोख रक्कम काढणे पसंत करत हे आमच्या खालीच असलेला सौंदर्य प्रसाधनांचा घाऊक विक्रेत्याने सांगितले). मर्सिडीझ घेतली तरी ऍव्हरेज किती देते विचारणे हि भारतीय मनोवृत्ती आहे. सरकारने हे २- २.२५% कमिशन रद्द केले तर कार्डाची स्वीकृती बरीच वाढेल असे तो म्हणाला.
त्यातून बँकेतील कर्मचार्याना "घरचं झालं थोडं आणि व्याह्यांनी धाडलं घोडं" अशी परिस्थिती झाली आहे.
मशीन स्वाईप करण्याबद्दल प्रात्यक्षिक देण्यासाठी माणूस येईल त्याला अधिक वेळ लागेल. माझ्या दोन्ही स्वागत सहायिकाना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे आणि मी चेक घेतो किंवा रोख घेतो तेंव्हाही पावती देतोच.
माझे फारसे काही अजून तरी अडलेले नाही. बहुसंख्य रुग्ण "माझ्याकडेच" येणारे असतात. एखादा त्यातल्या त्यात स्वस्त कुठे असा बाजारहाट करणारा असतो असा रुग्ण गेला तरी मी फार चिंता करीत नाही.
स्वस्तात सेवा मिळेल हे माझे ब्रीद नाहीच. उत्तम सेवा मिळेल हेच ब्रीद आहे. त्यामुळे मी थोडे दिवस थांबायचं ठरवलं आहे.

निनाद's picture

21 Nov 2016 - 10:30 am | निनाद

ग्रेट!
उत्तम सेवा मिळेल हेच ब्रीद आहे. वा! अजुन काय हवे? ग्रेट!!

अप्पा जोगळेकर's picture

28 Nov 2016 - 12:02 pm | अप्पा जोगळेकर

सरकारने हे २- २.२५% कमिशन रद्द केले तर कार्डाची स्वीकृती बरीच वाढेल असे तो म्हणाला.
हे २ टक्के सरकारला मिळत नाहीत. अ‍ॅक्वयरर बँक (म्हणजे ज्यांचे मशीन आहे ती कंपनी), व्हिसा (नेटवर्क कंपनी) आणि बँक हे सगळे त्यांच्या त्यांच्या कमिशनचे पैसे कापून घेतात. हे पैसे मर्चंट (म्हणजे व्यापारी - या केसमधे तुम्ही स्वतः मर्चंट आहात) यानेच भरणे अपेक्षित आहे.
अर्थात व्यापारी ते अप्रत्यक्षपणे ( म्हणजे ओव्हर ऑल किमत किंवा फीमधे वाढ करुन) वसूल करु शकतात. आणि त्यात काही गैर नाही.
व्हिसा/मास्टरकार्ड, अक्वायरर कंपनी यांनी सुद्धा कमिशन घेणे गैर नाही. नाहीतर त्यांचा धंदाच बंद होईल.

अप्पा जोगळेकर's picture

28 Nov 2016 - 12:13 pm | अप्पा जोगळेकर

फक्त ४५० रुपये महिन्याचे कसे काय लावले ते कळत नाही. कमिशन पण त्यांनाच मिळणार आणि मशीनचे भाडे सुद्धा तेच घेणार हा उफराटा प्रकार आहे. फारतर मशिनचे दीपॉझिट घेणे ठीक आहे.

संदीप डांगे's picture

19 Nov 2016 - 1:14 pm | संदीप डांगे

आयकर विभागाची काम करायची काय पद्धत असते? म्हणजे निनावी तक्रार वगैरे करता येते काय? कारवाई च्या वेळेस मांडवली होत नसते ना?

सात आठ जणांना 'फस्ट ह्यांड' अनुभव द्यायची फार इच्छा आहे! ;)

हो करता येते, व करावी देखील. देशाची फसवणूक म्हणजे पुर्ण १२५ कोटी लोकांची फसवणूक असे मी मानतो. जे सरळ मार्गाने जात नाही आहेत त्यांना सरळ मार्गावर घेऊन येणे हे तर पुण्य झाले ना?

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2016 - 9:29 am | टवाळ कार्टा

त्या सात / आठ जणांत मिपाकर (किंवा ट्रकवाले) किती?
=))

जीवना's picture

19 Nov 2016 - 5:33 pm | जीवना

फारच छान उपक्रम

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Nov 2016 - 6:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

उत्तम काम केलतं!!! :)

टीपीके's picture

20 Nov 2016 - 12:35 am | टीपीके

सध्या आमचेही हेच प्रयत्न चालू आहेत पण तुमच्या इतके यश नाही मिळाले. पण लवकरच मिळेल अशी अशा आहे

निओ१'s picture

20 Nov 2016 - 12:54 am | निओ१

समजवणे अवघड आहे खरे, पण प्रयत्न चालू ठेवा यश हे धेय्य नसावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2016 - 12:43 am | डॉ सुहास म्हात्रे

अतिशय स्पृहणिय काम केले आहे तुम्ही !!

कठीण काळात इतरांकडे बोटे न दाखवता उलट दुसर्‍यांना मदत करण्यात तुम्ही दाखवलेली सकारात्मकता खूपच भावली.

माझे मराठी (ऑनलाईन) जरा वाईट आहे, पण मी ऑनलाईन कसे पैसे देवाण-घेवाण करावेत या बद्दल लिहतो आहे. निनाद यांनी पण लिहलेला लेख वाचला. त्यातून प्रेरणा मिळाली आहे.

निओ१, प्रश्न पैसे घेणार्रच मशीन लावायला तयार नाहीत. मुळात ब्यान्क व्यवहारच दाखवायला तयार नाहीत. क्याशच द्या म्हणतात.

माझ्या माहितीनूसार Bank रोख रक्क्म घेणे जास्त खर्चिक आहे, कारण रकमेची हताळणी आहे. उलट कॅशलेस मध्ये त्यांना फायदा आहे म्हणूण तर अनेक जागी तुम्हाला कॅशलेससाठी सुट मिळत असते.

कॅशलेस व्हायला बॅकांना प्रॉब्लेम नाही तर लहान धंदेवाले, दुकानदार, हॉटेलवाले यांच्याशी आपला रोजचा संबंध येतो ते लोक आपली सगळी ट्रॅन्झॅक्शन्स बँकेत येऊ द्यायला तयार नाहीत असे ते म्हणत आहेत. (कारण अर्थातच त्याना त्यांचे खरे उत्पन्न उघड व्हायला नको आहे.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2016 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

देश बदल रहा है । :)

पुरावा येथे पहा.

अनुप ढेरे's picture

5 Dec 2016 - 3:37 pm | अनुप ढेरे

कॅशलेस होणं सोपं नाही. ब्यांका त्या POSच भाडं घेतात. (हजार रु महिना बहुधा), वर इंटरनेटचा खर्च, २% चार्ज. छोट्या दुकानदारांना हे तोट्याचं आहे. यापुढे ग्रिवंस रिड्रेसल ढिसाळ आहे. एखादं ट्रांझॅक्षन अडकलं/ अर्धवट झालं तर दाद मिळेलच याची हमी नाही.

वेल्लाभट's picture

28 Nov 2016 - 11:31 am | वेल्लाभट

भारी कौतुक आहे तुमचं! सहीच. कौतुकास्पद कार्य.

पैसा's picture

3 Dec 2016 - 2:53 pm | पैसा

आमच्याकडे भांडी घासायला बाई येते ती नेपाळी आहे. पण तिच्याकडे आधार कार्ड आहे. (नेपाळी लोकांबाबत नागरिकत्वाचे काय नियम आहेत माहीत नाही. कारण गुरखे सर्रास सगळ्या भारतभर दिसतात.) तिचा बँक अकाउंट उघडून देण्यासाठी फॉर्म वगैरे आणला आहे. आता जन धन मधे खाते उघडून देईन. तिच्या घरात फक्त मुलाचा बॅंक अकाउंट आहे म्हणे.

पुष्कर जोशी's picture

3 Dec 2016 - 3:13 pm | पुष्कर जोशी

त्या अमेरीकन विसा / मास्टर कार्ड च्या बोडख्यावर इतके पैसे नका वाहू .तर जमेल तिथे नेट बॅंकीग / IMPS / UPI वापरा .. !

निनाद's picture

5 Dec 2016 - 2:54 am | निनाद

अगदी खरे!
रुपे वापरा किंवा नेट बॅंकीग / IMPS / UPI वापरा!

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2016 - 12:48 pm | संजय क्षीरसागर

(१) ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती.
प्रश्न होता रोजच्या खर्चाचा, म्हणजे भाजी, फळे इत्यादी.
आम्ही हॉटेल व इतर जागी जात नाही
माझ्याकडे अजून ही ३४० रु आहेत. दिनांक १९-११-१६

म्हणजे दहा दिवस घरच्यांनी काही खाल्लंच नाही ?

(२) १. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट २. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट......९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट

यातल्या एकाही व्यावहारात कार्ड चार्जेस लागत नाहीत ? का कार्ड चार्जेस हा प्रकारच तुम्हाला माहिती नाही ?

(३) १. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो.

NEFT तुमच्याकडे फ्री आहे ? का NEFT ला बँक चार्जेस पडतात याची तुम्हाला कल्पनाच नाही?

२. गॅस बुकिंग देखील करत होतो

गॅस बुकींगला, ऑन लाईन पेमंट चार्जेस न लावणारी ही कंपनी कोणती आहे ?

(४) माझ्या माहितीमध्ये असलेला एकही व्यक्ती एक ही दिवस एटीमच्या बाहेर उभा राहिला नाही गेल्या दहा दिवसात, मला वाटते हे माझे यश असावे.

याचा अर्थ, दहा दिवस तुमच्या ओळखीत कुणी एक रुपया सुद्धा रोखीत दिला नाही ? कुठल्या भ्रमात आणि काय लिहीता आहात ?

तुमच्या जनजागृतीबद्दल बाकीच्यांनी कौतुक केले आहेच! पण डोळे उघडे ठेवून व्यावहार केलेत आणि लिहीलेत तर बरे.

पैसा's picture

5 Dec 2016 - 1:26 pm | पैसा

(२) १. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट २. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट......९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट

यातल्या एकाही व्यावहारात कार्ड चार्जेस लागत नाहीत ? का कार्ड चार्जेस हा प्रकारच तुम्हाला माहिती नाही ?

आमच्याकडे तरी को ऑप स्टोअर किंवा तत्सम मोठ्या स्टोअरमधे स्वतंत्र कार्ड पेमेंट चार्जेस लागत नाहीत. एमारपी मार्जिनमधे अ‍ॅडजस्ट करत असावेत. रोजचे मासे वगळता इतर कोणतीही वस्तू डेबिट क्रेडिट कार्डाने घेता येते.

(३) १. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो.

NEFT तुमच्याकडे फ्री आहे ? का NEFT ला बँक चार्जेस पडतात याची तुम्हाला कल्पनाच नाही?

आमच्या सिंडिकेट बँकेत सेव्हिंग अकाउंटमधून एनईएफटी फुकट आहे. तसेही लाईट बिल एनईएफटीने नव्हे तर डेबिट्/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग असलेल्या अकाउंटमधून होते. क्रेडिट कार्डाला एका ठराविक रकमेपर्यंत चार्ज नसतो. डेबिट कार्ड्/इंटरनेट बँकिंगला कोणताही चार्ज नसतो.

२. गॅस बुकिंग देखील करत होतो

गॅस बुकींगला, ऑन लाईन पेमंट चार्जेस न लावणारी ही कंपनी कोणती आहे ?

भारत गॅसच्या पोर्टलवर ऑनलाईन पेमेंट करून सिलेंडर प्रीपेड मागवता येतो. स्वतंत्र चार्जेस नाहीत.

इतर गोष्टींना आपला पास. पण दुकानदार वगैरे लोक इतकेही अडाणी नसतात. कालच आमच्या दूधवाल्या दुकानदाराला विचारले की जेव्हा सुटे पैसे नसतील तर आयएमपीएस ने पैसे ट्रान्सफर केले तर चालेल का. तो हो म्हाणाला.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 1:35 pm | मराठी कथालेखक

भारत गॅसच्या पोर्टलवर ऑनलाईन पेमेंट करून सिलेंडर प्रीपेड मागवता येतो. स्वतंत्र चार्जेस नाहीत.

भारत गॅसला ऑनलाईन पेमेंट करताना चार्जेस लागतात.
अर्थात कार्डवर मिळणार्‍या रिवॉर्ड पॉईंट मुळे बरोबरी होते , त्यामुळे तोटा होत नाही (निदान माझ्या कार्डवर तरी) शिवाय डिलिवरी करणारा जास्त मला (म्हणजे माझ्यावतीने जे सिलिंडर स्वीकारतात त्यांना) जास्त पैसे मागू शकत नाही हा फायदा.

पैसा's picture

5 Dec 2016 - 2:25 pm | पैसा

आत्ताच डेबिट कार्डाने प्रीपेड सिलेंडरचे पैसे भरले. एक पैसा पण जास्त गेला नाही.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 2:48 pm | मराठी कथालेखक

ऑनलाईन ?
मग सध्या हे चार्जेस काढून घेतले असतील.

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2016 - 3:05 pm | संजय क्षीरसागर

7.The transaction charges for opting online payment would be borne by you over and above the cost of the refill (Currently it is Rs 7/- per transaction).

8.In case the refill could not be delivered at the residence of the consumer due to various reasons or booking cancelled by the consumer, the amount paid would be refunded/adjusted against next booking after deducting the online payment transaction charges.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 3:09 pm | मराठी कथालेखक

:)

पैसा's picture

5 Dec 2016 - 3:55 pm | पैसा

क्रेडिट कार्डला ५ ₹ ४१ पैसे transaction चार्जेस आहेत आणि डेबिट कार्डला nil.

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2016 - 2:15 pm | संजय क्षीरसागर

आमच्याकडे तरी को ऑप स्टोअर किंवा तत्सम मोठ्या स्टोअरमधे स्वतंत्र कार्ड पेमेंट चार्जेस लागत नाहीत. एमारपी मार्जिनमधे अ‍ॅडजस्ट करत असावेत.

हे सर्वज्ञात आहे.

रोजचे मासे वगळता....

तोच तर प्रश्न आहे. त्यांचे ३४० रुपये १० दिवस तसेच राहीलेत !

आमच्या सिंडिकेट बँकेत सेव्हिंग अकाउंटमधून एनईएफटी फुकट आहे.

लकी आहात.

तसेही लाईट बिल एनईएफटीने नव्हे तर डेबिट्/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग असलेल्या अकाउंटमधून होते.

त्यांनी गल्लीच्या बिलांचं `ऑनलाईन' पेमंट केलं आहे, याकडे लक्ष वेधतो.

क्रेडिट कार्डाला एका ठराविक रकमेपर्यंत चार्ज नसतो. डेबिट कार्ड्/इंटरनेट बँकिंगला कोणताही चार्ज नसतो.

तपासून पाहा. BOI प्रत्येक NEFT ला चार्जेस लावते. टिडीएस रिटर्नच्या प्रत्येक ५४ रुपयांसाठी NEFT ला २.८५ चार्जेस लागतात. कार्ड चार्जेसवर जोगळेकरांनी स्वतंत्र धागा काढला आहे. तुम्ही वाचला असेलच.

भारत गॅसच्या पोर्टलवर ऑनलाईन पेमेंट करून सिलेंडर प्रीपेड मागवता येतो. स्वतंत्र चार्जेस नाहीत.

पुन्हा तुमचं नशीब ! HP Gas On-line बुकींगला ६ रुपये चार्ज आहे.

इतर गोष्टींना आपला पास

माझं नशीब !

पण दुकानदार वगैरे लोक इतकेही अडाणी नसतात. कालच आमच्या दूधवाल्या दुकानदाराला विचारले की जेव्हा सुटे पैसे नसतील तर आयएमपीएस ने पैसे ट्रान्सफर केले तर चालेल का. तो हो म्हाणाला.

माझा दुधवाला चेक घेतो. बहुतेक दुकानदारांनी कार्ड पेमंटला चार्जेस लागतील असे बोर्ड लावलेले दिसतात.

पैसा's picture

5 Dec 2016 - 2:36 pm | पैसा

तोच तर प्रश्न आहे. त्यांचे ३४० रुपये १० दिवस तसेच राहीलेत !

अहो ते जैन आहेत ना! त्याना मासे बिसे काय लागत नाय!

त्यांनी गल्लीच्या बिलांचं `ऑनलाईन' पेमंट केलं आहे, याकडे लक्ष वेधतो.

मी गल्लीचे नाही, पण एकूण चार बिले दरमहा ऑनलाईन भरते. २ गोव्यातली आणि दोन महाराष्ट्रातली. कधीच एक्स्ट्रा पैसे लागले नाहीत.

तपासून पाहा. BOI प्रत्येक NEFT ला चार्जेस लावते. टिडीएस रिटर्नच्या प्रत्येक ५४ रुपयांसाठी NEFT ला २.८५ चार्जेस

टीडीएस रिटर्न बद्दल काय माहीत नाही बुवा, आमच्या बँकेत एक लाख पर्यंत एनईएफटीला णो चार्जेस. पण मी काय म्हन्ते, लाईट बिलासाठी एनईएफटी करावी लागतच नाही ना!

तुम्ही सगळ्यांनी सिंडिकेट बँकेत खाती ट्रान्सफर करा बघू असं म्हटलं असतं, पण ती झैरात होईल म्हणून नकोच ते!

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2016 - 2:44 pm | संजय क्षीरसागर

आता खुद्द लेखक काय म्हणतात ते बघू.

तुम्ही स्वतःला सीए म्हणवता यावर माझा आता विश्वास राहिला नाही... =))

रॉजरमूर's picture

5 Dec 2016 - 6:37 pm | रॉजरमूर

तुम्ही BOI चं नेट बँकिंग वापरता काय ?
गेल्या ८ दिवसापासून BOI च्या साईटवर लॉगिन केल्यावर संगणकावर ह्या Application security error   संदेशाचा पडदा झळकतोय त्यामुळे अजिबात ट्रँजॅक्शन करता येत नाहीये . त्यात उल्लेख केलेल्या पाचही गोष्टी मी करत नाहीये त्या आधी व्यवस्थित सुरु होते नेटबँकिंग. डोक्याला ताप झालाय , त्यामुळे १ दिवसाआड बँकेत चकरा मारायला लागतायत.
सगळे ब्राउजर वापरले पण उपयोग नाही.
बँकवाले पण व्यवस्थित माहिती देत नाहीत.

नसून अडचण असून खोळंबा .

इतर कुणा ग्राहकाला हा असा मेसेज येतोय का ते बघितलंत का? का ही समस्या आपल्यापुरती मर्यादित आहे?

रॉजरमूर's picture

7 Dec 2016 - 10:59 am | रॉजरमूर

इतर कुणा ग्राहकाला हा असा मेसेज येतोय का ते बघितलंत का? का ही समस्या आपल्यापुरती मर्यादित आहे?

माझ्यापुरतीच मर्यादित असावी . एवढे दिवस गैरसोय कोण सहन करील ?

इतर कुठल्या मशीनवरुन लॉग इन करुन बघितलंत का? किंवा समजा ३जी वापरुन बघितलंत का?

रॉजरमूर's picture

7 Dec 2016 - 11:51 am | रॉजरमूर

मोबाईलवरून होतंय लॉगिन पण पीसी वरून नाही सॉफ्टवेअर issue असावा .

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2016 - 6:49 pm | संजय क्षीरसागर

व्य नि करा तुम्हाला राइट पर्सनचा नंबर देतो

रॉजरमूर's picture

7 Dec 2016 - 11:01 am | रॉजरमूर

व्य नि करा तुम्हाला राइट पर्सनचा नंबर देतो

केलाय व्यनि .......
धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

7 Dec 2016 - 11:08 am | संजय क्षीरसागर

.

तुम्ही स्वतः सीए आहात असे तुमच्या प्रोफाईल मध्ये लिहले आहे, ते पाहूनच विचारतो आहे.

>म्हणजे दहा दिवस घरच्यांनी काही खाल्लंच नाही ?

आम्ही जेवण करतो ते पण अन्न असलेले, पैसे, रोख रक्क्म खात नाही.

>यातल्या एकाही व्यावहारात कार्ड चार्जेस लागत नाहीत ? का कार्ड चार्जेस हा प्रकारच तुम्हाला माहिती नाही ?
>NEFT तुमच्याकडे फ्री आहे ? का NEFT ला बँक चार्जेस पडतात याची तुम्हाला कल्पनाच नाही?

तुम्ही खरच सीए आहात?

>गॅस बुकींगला, ऑन लाईन पेमंट चार्जेस न लावणारी ही कंपनी कोणती आहे ?

माहिती नसेल तर कसे करता हे विचारा तुम्हाला ही सांगेन.

>याचा अर्थ, दहा दिवस तुमच्या ओळखीत कुणी एक रुपया सुद्धा रोखीत दिला नाही ?

भ्रमात तुम्ही आहात. की रोख रक्कमे शिवाय व्यवहार होऊच शकत नाही आहे असे समजत आहे. किंवा तुमचे वय खूप जास्त झाले आहे, थोडी मदत हवी असेल तर स्प्श्ट लिहा. मी नक्की मदत करेन.

आम्ही जेवण करतो ते पण अन्न असलेले, पैसे, रोख रक्क्म खात नाही.

बँकांच्या रांगेत उभे राहिलेले लोक, काढलेली रक्कम खातात का? दहा दिवसात भाजीपला वगैरेवर एकही रुपया रोखीनं खर्च न करायला संथारा धरली होती का?

यातल्या एकाही व्यावहारात कार्ड चार्जेस लागत नाहीत ? का कार्ड चार्जेस हा प्रकारच तुम्हाला माहिती नाही ?
NEFT तुमच्याकडे फ्री आहे ? का NEFT ला बँक चार्जेस पडतात याची तुम्हाला कल्पनाच नाही?

याचं तुमच्याकडे उत्तर नाही.

>गॅस बुकींगला, ऑन लाईन पेमंट चार्जेस न लावणारी ही कंपनी कोणती आहे ?
माहिती नसेल तर कसे करता हे विचारा तुम्हाला ही सांगेन.

तेच विचारतोयं. लक्षात नाही आलं का?

याचा अर्थ, दहा दिवस तुमच्या ओळखीत कुणी एक रुपया सुद्धा रोखीत दिला नाही ?

याचं ही उत्तर तुमच्याकडे नाही.

भ्रमात तुम्ही आहात. की रोख रक्कमे शिवाय व्यवहार होऊच शकत नाही आहे असे समजत आहे. किंवा तुमचे वय खूप जास्त झाले आहे, थोडी मदत हवी असेल तर स्प्श्ट लिहा. मी नक्की मदत करेन.

तुमच्या प्रतिसादावरुन तुमची विचारशक्ती लयाला गेलेली दिसतेय.

असंच विचित्र आणि असंबद्ध लिहीणारा एक आयडी पूर्वी इथे होता. अशीच चमत्कारिक टोपण नांव घेऊन तो इथे वावरत असे. कंप्लीट हुकलेली केस होती. तोच प्रकट झाला असावा. यावर घालवायला माझ्याकडे वेळ नाही.

इथून पुढे तुम्ही काहीही लिहा.

अर्थात, संपूर्ण पोस्टच बोगस आहे हे प्रतिसादातून दाखवून दिल्याबद्दल आभार.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 1:29 pm | मराठी कथालेखक

कालच पिंपरीच्या मोठ्या बाजारात एका मोठ्या दुकानात नविन मोबाईल साठी कव्हर, स्क्रीन गार्ड खरेदी केले.
पण दुकानदार कार्डने वा पेटीएम ने पैसे स्वीकारण्यास तयार नव्हता. कार रस्त्यातच उभी केली असल्याने चार दुकाने फिरण्याचा वेळ नव्ह्ता. तसेही पिंपरी बाजारातील सर्व दुकानदारांची कार्यपद्धती (आणि आडमुठेपणाही) सहसा सारखाच असतो. त्यामुळे नाईलाजाने ३५० रुपये रोख खर्च करावे लागलेत.
आता कुणी म्हणेल की ह्य वस्तू ऑनलाईन का नाही घेतल्या तर
१) मला कव्हर हाताळून बघायचे होते, जे आवाडेल ते घ्यायचे होते. तसेही कव्हर ऑनलाईनपेक्षा निदान ५० रुपयांनी तरी स्वस्त मिळाले आहे असे मला वाटते
२) मोबाईल कालच घेतला होता , स्क्रीनगार्ड लगेच लावायचा होता (म्हणजे वापरायला सुरु करण्या आधी). जिथे मोबाईल घेतला तिथे स्क्रीनगार्ड मिळाला नाही. ऑनलाईन मागवला तरी दोन-तीन दिवसानी येणार, शिवाय मला तो नीट लावता येईल याची खात्री नाही.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 3:08 pm | मराठी कथालेखक

मी एका IT कंपनीत काम करतो (स्थळ हिंजवडी) , इथे कॅन्टीनमध्ये ३ विक्रेते (vendors) आहेत. ते रोख वा सोडेक्सो कुपनांद्वारेच पैसे स्वीकारतात (त्यातही काही बाहेरील सिलबंद पदार्थांकरिता -जसे वेफर्स ई. सोडेक्सो कुपनही स्वीकारत नाहीत). सोडेक्सो कुपनची पुस्तके बाळगण्याची कटकट वाटते म्हणून मी सोडेक्सोचा पर्याय स्वीकारला नव्ह्ता (आता एप्रिलपर्यंत त्यात बदल करता येणार नाही). त्यामुळे केन्टीनमध्ये नाष्टा, किंवा ऑफिसबाहेरील टपरीवर वडापाव, चहा, सिगारेट ई साठी रोख रक्कम द्यावी लागते. दिवसाचा सुमारे ३०-४० रुपये तरी खर्च होतो.

मराठी कथालेखक's picture

6 Dec 2016 - 11:50 am | मराठी कथालेखक

इथे कुणी 'उपाय' सांगितला नाही अजून !!
बाकी कंपनीत अ‍ॅडमिन ग्रुपला मागच्या आठवड्यात मी याबद्दल लिहिले. त्यांनी "पेटीएम साठी विक्रेत्यांसोबत प्रयत्न करु" असे उत्तर दिलेय. पण अजून तरी या विक्रेत्यांनी काही सकारात्मक प्रतिसाद दिलाय असं दिसत नाही !!

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Dec 2016 - 10:05 pm | हतोळकरांचा प्रसाद

आमच्या इथेही सेम प्रॉब्लेम होता. फॅसिलिटी मॅनेजमेंटशी लोकांनी फॉलोअप करून सगळ्या वेंडरकडे स्वाईप मशीन आणि पेटीएम QR कोड लावून घेतले. खूप सोपं झालंय, कॅश लागतच नाही ऑफिसमध्ये, चहालासुद्धा! मी पेटीएमने करतो सहसा, एकूण 5 सेकंद लागतात :)

मराठी कथालेखक's picture

7 Dec 2016 - 1:22 pm | मराठी कथालेखक

सोपं आहे हे मला माहितीये हो.. पण काही विक्रेत्यांना कॅशच हवी असते त्याला काय करणार. याबाबत मला काही शक्यता वाटतात त्या अशा
१) सगळ्यांनीच पेटीएम ने पैसे दिलेत तर विक्रेत्यांकडे इतरांना (मुख्यतः त्यांच्या पुरवठादारांना) द्यायला रोख रक्कम मिळणार नाही अशी भिती वाटत असावी. (काही पुरवठादार पेटीएम ने पैसे स्वीकारत नसतील कदाचित)
२) पेटीएम मध्ये मिळालेले पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करायला पेटीएम कडून १% चार्ज आकारला जातो. नफ्याचे प्रमाण आधीच कमी असेल तर हा १% चा भुर्दंड नको वाटू शकतो.
३) हे विक्रेते कदाचित जमा झालेल्या रोख रकमेतून रोख रकमेचा काळा बाजार करत असण्याची शक्यता आहे. म्हणजे एखाद्याला दहा हजार रुपये रोख तातडीने हवे असल्यास त्याला ते द्यायचे आणि बदल्यात थोड्या अधिक रकमेचा चेक घ्यायचा.

बाकी तांत्रिक अडचणी किंवा कौशल्याचा अभाव हे कारण या विक्रेत्यांच्या बाबतीत वाटत नाही...सगळे स्मार्टफोन वापरणारे आणि बर्‍यापैकी तंत्रकुशल आहेत

संजय क्षीरसागर's picture

7 Dec 2016 - 2:16 pm | संजय क्षीरसागर

दहा हजाराचा धंदा करून एखादा पाचशे मिळवत असेल तर त्याला १०० रुपये जड नाहीत का ? शिवाय इंटरनेट चार्जसचा खर्च ही वाढतो .
सरकार आपली नामुष्की , लोकांना व्यावहार लपवता येणार नाही या सबबीवर दामटतेयं, ते गैर आहे .

मराठी कथालेखक's picture

7 Dec 2016 - 2:45 pm | मराठी कथालेखक

बरोबर आहे. UPI based payment system चा प्रचार आणि प्रसार फारसा झालाच नाही , त्यामुळे पेटीएम कंपनी पैसे कमवत आहे..

लेखक कुठे असतात? कुठली गोष्ट आहे ही? औषधांचं पेमेंट कार्डने?

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2016 - 3:38 pm | संजय क्षीरसागर

पण हा ज्योक भारीये!

त्यांच्यासमोर पैसे मोबाईलद्वारे (IMPS payment) कसे येतात व तुम्हाला लगेच कसे मिळतात हे शिकवले. अगदी पान टपरीवाल्याला देखील व त्यांनी ते मान्य देखील केले

आय एम पी एस फुकट नाही. छोट्या पेमेंटसाठी तर चांगलाच दणका देणारं आहे.

पानवाल्याला आय एम पी एस मधली पुर्ण कॉमेडी मिसली हो सर...!!! पान खाउन झालं तरी पेमेंट प्रोसेस चालुच!!

आणि दहा रुपयाचं पान आणि पाच रुपये अधिक सर्विस टॅक्स असे आय एम पी एस चार्जेस!!!

पैसा's picture

5 Dec 2016 - 4:12 pm | पैसा

आमच्या सिंडिकेट बँकेत imps पण फुकट आहे! =))

ह्म्म..बघतो. आहे माझं अकाउंट. ऑनलाइन साठी रीक्वेस्ट केलेली एक नोवेंबरच्या सुमाराला. पण बहुतेक व्हायचंय अजून चालू- फॉर ओब्व्ह्युअस रीझन्स...

पैसा's picture

5 Dec 2016 - 4:28 pm | पैसा

२४ तासांवर वेळ लागत नाही. आता सगळेच online आहे. गाईडलाईन्स इथे बघा.

लोकेशन महत्त्वाचे आहे, की उगाच ? विचारावे म्हनून विचारावे म्हनून विचारात आहात ?

मी कोल्हापुरात रहातो. भर पेठ वस्तीत. माझ्या घराजवळ कमीत कमी दहा औषध दुकाने आहेत. या दहापैकी कुणीही कार्ड स्वाइप मशीन बाळगत नाही. कोल्हापुर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. इथे ही परीस्थिती आहे. म्हणुन मग तुम्ही जे वर्णन करत आहात तशी परीस्थिती नक्की कुठे आहे हे मला कळत नव्हते. बहुतेक आपण सांगु शकाल असे वाटले म्हणुन विचारले.

जर तुम्हाला उत्तर माहित नसेल तर नका सांगु.

पैसा's picture

6 Dec 2016 - 10:14 am | पैसा

गोव्यात अनेक ठिकाणी मिळतात. शिवाय काही ऑनलाईन साईट्स आहेत तिथे प्रिस्क्रिप्शन अपलोड करून औषधे मागवता येतात.

असंका's picture

7 Dec 2016 - 11:26 am | असंका

त्यांचे माहीत नाही

अहो तै, तुम्हालाच काय, त्यांचं त्यांना पण माहित नाही असं दिसतंय. चोवीस तास होउन गेले तरी सांगेनात बघा.

आनंदी गोपाळ's picture

5 Dec 2016 - 3:33 pm | आनंदी गोपाळ

कशाला जिवाला घोर लावून घेताहात?

इथल्या कार्ड-घासू लोकांना फुटकळ पेमेंटसाठी १०-५-७ रुपये कापून घेतले गेलेत तर काही त्रास होत नाही. बक्कळ पैकं आहेत लोकांकडे. मोठ्या ट्रँजॅक्शनवर काय होइल त्याची यांना अजूनही कल्पना आलेली नाही. खरे साहेब रिसिविंग एण्ड ला आहेत, (कॅशलेस पैसे स्वीकारण्याच्या) पण त्यांनीही कार्ड स्वाईप मशीन अजून घेतलेले नाही. पेटीएमचा बांबू अजून त्यांना लागलेला दिसत नाही. "सेल" वाढेल तसे पेटीएम यांचे पैसे कसे कापेल ते यांच्या लक्षात येईलच.

मुळात, करन्सी तयार करणे व ती चालवणे या बेसिक जबाबदारीतून सरकार पळ काढत आहे व त्याचा भुर्द़ंड दररोज प्रत्येक भारतीयास १ रुपया प्रमाणे जरी आला तरी किमान रुपये सव्वाशे कोटी रोजाचा हा घोटाळा या सरकारने केलेला आहे, हे मान्यच करायला बरेच लोक तयार नाहीत.

असो. या देशाचे रूपांतर अशाच लोकांच्या नंदनवनात होण्यास थोडाच काळावधी बाकी आहे, असे म्हणतो.

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2016 - 3:42 pm | संजय क्षीरसागर

पेटीएमचा बांबू अजून त्यांना लागलेला दिसत नाही. "सेल" वाढेल तसे पेटीएम यांचे पैसे कसे कापेल ते यांच्या लक्षात येईलच.

हे बरोबरे!

प्रसाद गोडबोले's picture

5 Dec 2016 - 5:01 pm | प्रसाद गोडबोले

+१

हे तर आहेच , शिवाय सगळे व्यवहार ऑनलाईन व्हावेत अशी अपेक्षा करताना बँका अगदी धुतल्या तांडळा सारख्या स्वच्छ असतात हे कोठे तरी हायपॉथेसीस आहेच , ह्या सगळ्या कॅशलेस देशभक्तगीरी मध्ये मधल्या मध्ये बँण्का कचकुन प्रॉफिट कमवताहेत त्याकडॅ कोणाचेच लक्श नाही. सेव्हिंग्स चे व्याजदर अगदी ७ % वर आणले पण लोन चे दर काही कमी करायला तयार नाहीत . लोन चे दर कमी करायची चौकशी केली तर रीस्ट्रकरिंग चार्जेस भरा म्हणाले. म्हणजे येन केन प्रकारेण ब्ञंकावाले पैसे छापणारच . ह्यावर्षी ब्यंकांचे अ‍ॅन्न्युअल रीपोर्ट आवरुन अभ्यासावे लागणार , कॉर्पोरेट बोनसेस आणि काँपेन्सेशन मधे दणदणीत वाढ होईल असा अंदाज आहे !

हॅ दिमोनोटायझेशन मुळे बँकांवर सरकारचे आणि सामान्य माणासाचे किती परावलंबित्व येणार आहे याचा कोणी विचार केला आहे की नाही देव जाणे. आता ह्या नंतर ह्या मेजर ब्यँकातील कोणी लेहमनचा भाऊ निघाला नाही म्हणजे मिळवली !

एकुणच हा सगळा कॅशलेस इनिशियेटीव्ह सावळा गोंधळ देशभक्तीची नशा उतरल्याशिवाय लोकांच्या लक्षात येणे कठीणच दिसते.

अवांतर : मी नमोरुग्ण नाही , रादर भक्तच आहे , पण मोदीसरांचा हा निर्णय मात्र ठाम चुकला आहे असे मला वाटते!

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2016 - 5:07 pm | संजय क्षीरसागर

.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 5:10 pm | मराठी कथालेखक

सेव्हिंग्स चे व्याजदर अगदी ७ % वर आणले

एफ डि म्हणायचं आहे बहूधा तुम्हाला

प्रसाद गोडबोले's picture

5 Dec 2016 - 5:42 pm | प्रसाद गोडबोले

हो . FD च म्हणायचे होते मला. FD दर जवळपास स्र्वच्या सर्व बँकानी ८ - ८.५० वरुन ७ - ७.२५ वर आणले आहेत .
एव्हन आमच्या फेवरिट पोस्टाचा मिस ने देखील हा अपडेट दिलाय From 1.10.2016, interest rates are as follows:-7.70% per annum payable monthly.

प्रसाद गोडबोले's picture

7 Dec 2016 - 8:14 pm | प्रसाद गोडबोले

हा सगळा कॅशलेस इनिशियेटीव्ह सावळा गोंधळ देशभक्तीची नशा उतरल्याशिवाय लोकांच्या लक्षात येणे कठीणच दिसते.

हे पहा दस्तुरखुद्द आर बी आय काय म्हणत आहे ते !

कर्ज स्वस्त होणार नाही ; उलट महागाई वाढणार - आर. बी. आय.
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/rbi-keeps-...

एकदा का महागाईचा दणका बसला की लोकांना भान येईल अशी आशा आहे , आणि तसे झाले तर हिंदु महासभेने म्हणल्याप्रमाणे नोटा बंदी ही मोदींच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाची सुरुवात ठरेल !

अहो किती तरी भक्त मंडळी हे पण मानत नाहीत. आज तूर डाळ घोटाळा किती महिने चालू आहे, तुम्हाला माहित असेलच. पेपर मध्ये मुंबई ग्राहक पंचायत चे लेख छापून आलेत ४ वेळा. राज्य आणि केन्द्र सरकार कशी टोलवाटोलवी करतेय याच्यावर. मी स्वतः हे काही भक्तांना दाखवले तर ते म्हणतात - जाऊ द्या हो , सरकार कुठे कुठे बघणार ?
पण हाच प्रकार काँग्रेस ने केला कि मग ते मात्र एकदम करप्ट !!
त्या मुळे भक्त काही जागे होणार नाहीत.

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2016 - 5:04 pm | संजय क्षीरसागर

त्यांनी सेलर्स पेटीएम डाऊनलोड केलं आहे म्हणजे आलेले पैसे पेटीएमच्या ताब्यात आहेत.

रॉजरमूर's picture

5 Dec 2016 - 5:57 pm | रॉजरमूर

वाचलं नाहीत का ?

पेटीएमचा बांबू अजून त्यांना लागलेला दिसत नाही. "

बसलाय त्यांना बांबू ५०० रुपयांचा

याची स्टोरी - http://www.misalpav.com/node/28680
बहुतेक सगळे वेल सेटल्ड (!!) लोक "आपल्या " पक्ष करता / "आपल्या" मानस करता कोणताही त्याग करायच्या तयारीत आहे. समजा २०१९ मध्ये दुसरे कोणी आले सत्तेवर , तर ते लोक हा incentive सोडणार नाहीत. त्याचा विचार काहीच नाही करत हे अंधभक्त .
आत्ता सरकार जो कर जमा करते त्याचे काय रिटर्न्स जनतेला मिळत आहेत ? ते आधी सुधारा , मग नवीन कर लावा ..

महेन्द्र ढवाण's picture

5 Dec 2016 - 5:54 pm | महेन्द्र ढवाण

चांगले काम केलेत! धन्यवाद!

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 6:47 pm | मराठी कथालेखक

मी ही paytm वापरतोच, तरी म्हणेन paytm हे योग्य solution नाहीच. paytm ची monopoly होणं घातकच ठरेल.
UPI based ewallet चा प्रचार आणि प्रसार नीट न झाल्याने सध्या paytm ला शरण जाण्यावाचून पर्याय नाही.

अभिजित - १'s picture

5 Dec 2016 - 8:29 pm | अभिजित - १

काँग्रेस ने लोकांना सगळे फुकट खायची सवय लावली आहे हा तुमचा नेहमीचा / अतिशय आवडीचा प्रतिसाद असतो ... भाजप पण आता तेच करत आहे गोवा मध्ये .
http://www.loksatta.com/desh-videsh-news/free-internet-data-talktime-for...
अर्थात तुम्ही कितपत मान्य कराल शंकाच आहे. कारण काँग्रेस ने केले कि चूक पण तेच भाजप ने केले कि बरोबर, असा तुमचा दृष्टिकोन आहे. बाकी पेटीम वरून पण इथे कल्लोळ उठला आहे. वाचला का तुम्ही ? अजून सुपात आहात तुम्ही. म्हणून पेटीम चे समर्थन करत असता ..

आनंदी गोपाळ's picture

5 Dec 2016 - 9:23 pm | आनंदी गोपाळ

लोकं "कॅशलेस" व्हायला लागलीत.

http://m.hindustantimes.com/mumbai-news/rbi-needs-to-consider-issue-of-p...

सहकारी बँकांना नोटाबंदीतून वगळल्याने शिक्षकांचे पगार थकले.

कंपन्यांमधून नोकरकपात सुरू झाली.

लोकंहो, आपापली कार्डे पेटीएमे सांभाळा. बिनाकार्ड/पेटीएम वाले कुणी संतापात ते हिसकावून पळून गेलं तर काय होईल?

*

बाकी टेररिस्ट लोकांची चांगली सोय झाली. डीजिटल व आयटी सॅव्ही भारताच्या सरकारी साईट्स हॅक करणे किती सोपे आहे, हे सर्वज्ञात आहेच. ३५ लाख वगैरे डेबिट कार्डं ऑक्टोबरात हॅकली होती ना?

मज्जाय कार्डं घासणार्‍यांची..

डोके.डी.डी.'s picture

5 Dec 2016 - 10:42 pm | डोके.डी.डी.

मी मागील 3 वर्षांपासून नेटबँकिंग paytm mobikwik वापरतोय नेट बँकिंग सुद्धा boi sbi maharashtra bank icici एवढ्या बँकांची आहे. महाराष्ट्र बँकेत सुद्धा imps neft कितीही वेळा केलं तरी फ्री आहे. Light bill sbi वरून भरतो ऑटो पे आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. बाकी mobikwik हे wallet पैसे ट्रँस्फर फ्री देत आहे सध्या.
माझे बँक ऑफ इंडिया नेट बँकिंग व्यवस्थित चालत आहे