नोटबंदी जाहीर झाली व ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती. तर.. घरी आम्ही चार लोक आहोत.
१. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट
२. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट
३. औषधे - कार्ड पेमेंट
४. नेट बील - कार्ड पेमेंट
५. फोन बील - कार्ड पेमेंट
६. लाईट बील - कार्ड पेमेंट
७. सिलेण्डर - कार्ड पेमेंट
८. टिव्ही रिचार्ज - कार्ड पेमेंट
९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट
* यातील कित्येक लोकांना कार्ड मशीन घेण्यास मी गेल्या दोन वर्षापासून सांगत होतो व सकारण, उदाहरण देऊन पटवून दिले होते. त्यांनी ती घेतली होती.
आम्ही हॉटेल व इतर जागी जात नाही, पण तेथे पण आता सरास कार्ड पेमेंट घेतात.
प्रश्न होता रोजच्या खर्चाचा, म्हणजे भाजी, फळे इत्यादी.
नियमित असलेली २-३ दुकाने निवडली त्यांना माझे काम व माझे पैसे कसे रोख नसतात हे समजवले व त्यांना नेट बॅन्कीग शिकवले, त्यांच्या खात्यात त्यांच्यासमोर पैसे मोबाईलद्वारे (IMPS payment) कसे येतात व तुम्हाला लगेच कसे मिळतात हे शिकवले. अगदी पान टपरीवाल्याला देखील व त्यांनी ते मान्य देखील केले कारण नवीन पध्दतीने खात्यात पैसे जमा झाल्याचा मोबाईल मासेज लगेच येतो व त्यांना कळते की ह्या व्यक्तीने पैसे दिले. दुसर्याला पैसे कसे द्यावे हे शिकवले, आपले पैसे, आपला पासर्वड आपला OTP कसा जपावा व का हे समजवले.
हे झाले आमचे रामायण!
पण गल्लीमध्ये अनेक असे होते की त्यांना हे समजणे अवघड होते.
१. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो. त्यांना त्याचा फायदा आता पण झाला या १० दिवसामध्ये व इतर काही गोष्टीमध्ये देखील.
२. गॅस बुकिंग देखील करत होतो.
पण आता रक्क्म जमा करताना अडचण येत होती, कारण माझा व्यवसाय, माझे उत्त्पन व मी भरत असलेली रक्क्म यात ताळमेळ करणे अवघड गेले असते. ९ तारखे पासून मी किमान माझ्या जवळपास असलेल्या व ऑनलाईन व्यवहार करत नसलेल्या अनेकांना नेट बॅकिंग व कार्ड वापरण्याचे फायदे शिकवले, काही शिकले काही धडपडत आहेत, पण शिकत आहेत.
माझ्या माहितीमध्ये असलेला एकही व्यक्ती एक ही दिवस एटीमच्या बाहेर उभा राहिला नाही गेल्या दहा दिवसात, मला वाटते हे माझे यश असावे.
माझ्या हाती एवढे होते, तर एवढीच समाजसेवा करु शकलो. पुढील काही दिवस ही असेच निघून जातील. काही तासापुर्वीच एके ठिकाणी वाचले होते, तिरुपतीला १ मिनिटच्या दर्शनासाठी २४ तासाची किम्वा कधी कधी त्यापेक्शा मोठी रांग असते....!
माझ्याकडे अजून ही ३४० रु आहेत. दिनांक १९-११-१६
प्रतिक्रिया
6 Dec 2016 - 2:54 am | पिलीयन रायडर
मी एच.डी.एफ.सी मधुन नेट बॅंकिंग वापरते. वीजबील, दुसर्या खात्यात पैसे टाकणे, इतर ऑनलाईन पेमेंट्स असे बरेच. फ्री आहे. पेट्रोल सुद्धा कार्ड्ने भरते. सरचार्ज पडतो आणि २-३ दिवसात परत रिफंड होतो.
कॅश नसती तर मी किराणा तसाही महिन्याच्या पेमेंटने आणते. तिथे भाजीही मिळते. पण बिग बास्केट आणि तत्सम अॅपचा माझा अनुभव उत्तम आहे. दुध सुद्धा किराणाच्या दुकानातुनच येते.
मॉल्स मध्ये प्रश्न नाही, पण ९०% दुकानात मी कार्ड पेमेंट करते. फार क्वचित २% चार्ज पडला.
तेव्हा तुम्ही म्हणताय ते शक्य आहे. रोज होणारे व्यवहार कॅशलेस होऊ शकतात. पण अचानाक काही बारिक सारिक खरेदी रस्त्यावर केली तर कसे ते माहित नाही.
जे देश आधीच कॅशलेस आहेत, ते डेटा सिक्युरिटी कधी हॅण्डल करतात?
6 Dec 2016 - 10:37 pm | पिजा
तुमचं अकाउंट प्रिव्हिलेज बँकिंग वगैरे मध्ये मोडतं का? कारण मला NEFT ला चार्जेस पडतात.
http://www.hdfcbank.com/personal/making-payments/fund-transfer/emonies-n...
7 Dec 2016 - 11:23 am | मराठी कथालेखक
SBI मध्ये NEFT ला चार्जेस पडतात
6 Dec 2016 - 1:04 pm | विशुमित
दोन आखोदेखी उदाहरणं, कृपया लगेच देश द्रोही ठरवू नका.
एक:
पर्वा आत्याला सावडून (तिसरा) पंढरपूर वरून पुण्याला एस टी ने येत होतो. कंडक्टर कडे स्वॅप मशीन नव्हते (महामंडळाकडे स्वॅप मशीन नाहीच आहे). रोख पैसे देऊन तिकीट काढले. त्याच्या मागील सीटवर तोंडावर रुमाल टाकून हुश्श करून बसलो.
गाडी चालू झाली, नातेपुतेला एक तरुण गाडीत चढला. कंडक्टरने तिकिटाचे पैसे मागितले तर म्हणाला रु.४० कमी आहेत, डेबिट कार्ड आहे, स्वॅप करा. साहजिकच कंडक्टर ने स्वॅप मशीन नाही म्हणून हात वर केले त्याला पुढच्या स्टोपवर उतरायला सांगितले. याने तो तरुण इतका बिथरला की त्याने मोदीजींना आयामायावरून २-४ शिव्या हासडल्या. हे पाहून एक मोदी समर्थक प्रवासी खवळून उठला आणि नोट बंदी, काळा पैसा, मागील ६० वर्षातील त्रास इतर ज्ञानामृत पाजू लागला. याने तो दुष्काळी गडी अजूनच खवळला. मोदी समर्थकाच्या बायकोने आपल्या नवऱ्याला हाताला धरून खाली बसवले आणि म्हणाली बास झाला तुमचं "मोदींपुराण".
मला नाही राहवलं, कंडक्टरला १० च्या ४ नोटा दिल्या(मेहवण्याची पुण्याई) आणि तिकीट द्याला सांगितले.
तरुण माझ्या जवळ येऊन बसला.
तरुणाने त्याच्या आई ने त्याला दिलेली १ पपई मला देऊ केली.
मनात आले अजूनही खऱ्याची दुनिया आहे.
दोन:
काल गावातील बडोदा बँकेत पत्नीचे नवीन पास बुक अपडेट करायला गेलो होतो. बँकेत अगोदरच भल्यामोठ्या ४ ओळी होत्या. मला बाहेरील पास बुक प्रिंटिंग मशीन मधून प्रिंट काढायला सांगितले. तांत्रिक कारणामुळे प्रिंट नाही निघाली. मी पुन्हा बँक कर्मचाऱ्याकडे गेलो, ते म्हणाले प्रिंट सारख्या शुल्लक कारणासाठी सारखे सारखे येऊ नका, पैश्यासाठी गर्दी दिसत नाही का? गर्दी पाहून मी पण मान खाली घालून निघालो.
जाता जाता गर्दीतल्या एकाला विचारले किती पैसे मिळातातय खात्यातून? त्याचे उत्तर १ हजार.
बँक कर्मचारी तिकडून-PDC वाले तर रु. ५०० च देतायतय.
आमच्या मेहवण्याची पुण्याई पुन्हा आठवली.
6 Dec 2016 - 1:09 pm | संजय क्षीरसागर
हे आवडलं !
7 Dec 2016 - 11:40 am | धनावडे
अजूण एवढे कमी पैसे मिळतात काहीही मला काल २०००० हजार मिळाले गर्दी असून तेही वाई सारख्या छोट्या शहरात.
7 Dec 2016 - 2:13 pm | विशुमित
साहेब आमचे शहर नाही हो, गाव आहे....
आजू बाजूच्या ६-७ गावं मिळून बडोदा आणि PDC अशा फक्त २ च बँका आहेत.
त्यात PDC मध्ये सर्व ऊस सभासदांचे खाती आहेत.
आणि वाई शहराला मी चांगले ओळखतो. नुसते चौका चौकात कट्टे करून बसलेल्या पोरांच्या घोळक्यांचे शहर
बाकी तुमचा विश्वास फक्त पेटीएम करणाऱ्यांवरच आहे म्हंटल्यावर आमच्या सारख्यांवर तुम्ही कसे विश्वास ठेवणार म्हणा..!!
जाऊ द्या
7 Dec 2016 - 3:53 pm | धनावडे
साहेब पेटिऐम मीही वापरत नाही आणि वापरणार पण नाही कॅशलेशच्या चर्चेत मी पडत ही नाही पण अजून १००० च मिळतात अस फेकू तरी नका.
7 Dec 2016 - 4:37 pm | विशुमित
तुम्हाला रु.२०००० मिळाले यावर मी अविश्वास दाखवला का?
तुम्ही मला, माझ्या गावाला, माझ्या गावातील बँकेला न ओळखता, मला फेकू कसे काय म्हणू शकता?
का फक्त नोट बंदीला विरोध दर्शिवला म्हणून? (माझा विरोध किंवा समर्थन नाहीच आहे नोट बंदीला, फक्त यामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि त्याचा आऊटपुट काय असेल याबद्दल अजून ही साशंक आहे)
साताऱ्यामध्ये आजच माझ्या मित्राला ऍक्सिस बँकेतून एकरकमी रु. १९,००० मिळाले, त्या पण २०००, १००, २०, आणि १० च्या नोटा.
सगळी कडे सारखी च परिस्थिती नाहीय, कृपया एवढे ध्यानात घ्या.
7 Dec 2016 - 4:49 pm | विशुमित
आणि हो बँकेतून किती पैसे मिळतात हा माझा मुद्दा नव्हताच, पासबुकचे प्रिंट काढणे याला नोटबंदी पुढे शुल्लक ठरवले म्हणून माझा रोष होता.
मला माझ्या पत्नीचे पासपोर्ट काढण्यासाठी लागणारे रहिवासी दाखला म्ह्णून बँकेचे पासबुक सादर करायचे होते पण ती प्रिंट न मिळाल्यामुळे तूर्तास ते लांबणीवर पडले.
असो नोटबंदी समोर माझा हा प्रश्न तसा शुल्लकच आहे.
7 Dec 2016 - 5:13 pm | धनावडे
करा की विरोध माझ काय जातय माझ्याकडे नोटाच नाहीत त्यामुळे बंदी घातली काय आणि नाही काय सारखच. आणि तुम्ही वाईला टवळाच गाव म्हणू शकता ते चालत..
7 Dec 2016 - 5:26 pm | विशुमित
वाई गावाला बोल्याबद्दल एवढं वाईट वाटून घेऊ नका हो....
आमच्या बारामतीला आणि बारामतीकरांना लोक (तुम्ही नाही बरका) उठसूट सारखे टोमणे आणि दगड मारत असतात, आम्हाला पण वाईट वाटतं पण काय करणार सहन करतोच ना आम्ही...
तसे वाई मला खूप आवडते, त्यातल्या त्यात कृष्णामाईच्या वेळेस तर खूपच...
कृपया गैरसमज नसावा...
7 Dec 2016 - 3:59 pm | धनावडे
६-७ गावात एक शाखा आमच्याकडे तर २०-२५ गावात एक पण नाय 20,कि मी लांबच पहिली बँक.
6 Dec 2016 - 8:48 pm | अभिजित - १
प्लास्टिक मनी वापरताय...सावधान! Maharashtra Times | Updated: Dec 3, 2016, 11:52 PM ईस्ट
एकीकडे ऑनलाइन व्यवहारांना चालना मिळावी म्हणून प्रोत्साहन दिले जाते. मात्र सायबर गुन्हे रोखण्यासाठी मात्र यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक झालेली आहे त्याचा गेलेला पैसा परत मिळण्याची शक्यता कायदा असूनही धुसर झालेली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/cold-wave/ravivar-mata/take-preca...
जे प्लॅटिक मनी बाबत खरे आहे , तेच कॅशलेस बाबत पण खरे आहे. विचार करा ..
6 Dec 2016 - 10:20 pm | अमर विश्वास
मी गेली दहा वर्षे ऑनलाईन व्यवहार करतोय
तसेच डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड सर्रास वापरतो
थोडीशी काळजी घेतली तर आपल्याला फसवणुकीची शक्यता कमी असते
खिशात कॅश असतानाही पाकीट मारले जाऊ शकतेच ना? तसेच ऑनलाईनचे ही
हल्ली two factor authentication मुळे ऑनलाईन व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आहे.
प्लासिक मनी (डेबिट / क्रेडिट कार्ड ) वापरताना पुरेशी काळजी घेतली तर फारसा धोका संभवत नाही.
तसेच transaction account आणि saving account वेगळे ठेवले तर एकूण रिस्क कमी करता येते
तेंव्हा योग्य काळजी गया व कॅशलेस व्हा
7 Dec 2016 - 11:48 am | अजया
स्वाइप मशिनचा डेमो नं एक आणि माहिती क्लिनिकसाठी मिळाली.हे IDBI बँकेने दिले आहे. (पुढच्या आठवड्यात HDFC बँकेकडून सवलतीत मशिन्स देण्याची आॅफर आणि डाॅक्टर लोकांना फुकटचे गिळायला, मुख्य म्हणजे प्यायला देऊन नोंदणी करुन घेणे असा एका रिसाॅर्टला प्रोग्रॅमच ठेवलाय!)


IDBIअटी- बिझनेसचे करंट अकाउंट आवश्यक आहे.
बँकेत एफ डी असणे आवश्यक आहे.पाच लाखाचे तरी!
बाकी माहिती खालील फोटोत पहा.
7 Dec 2016 - 12:00 pm | पैसा
gprs rent महाग वाटते आहे. स्वतःचे सिम नाही का वापरता येत?
http://www.mastercard.com/corporate/mpos.html आणि http://www.mswipe.com/mpos-plans.html याचीही चौकशी कर.
7 Dec 2016 - 12:29 pm | अजया
ओके.बघते हे पण.
स्वाइप मशिन कितपत उपयोगी पडेल शंका येतेय. बँका चार्जेस वाढवत यात पैसा कमावणार नक्की.
फक्त रोजचे बँकेत नेऊन भरण्याचे काम कमी होईल.पण बँक अगदीच शेजारी आहे.लागोपाठ चार बँका क्लिनिकच्या लाइनीत आहेत! त्यामुळे सध्याचे चेक आणि कॅश बरे पडतेय.त्यात आमचे उधार पेशंट अनेक.अतिपरिचयात् अवज्ञा! दुसरी मजा म्हणजे जो येतो तो गुलाबी गांधी माझ्याकडे सुटे करायला येतो! आता पंधराशे खाली सुटे देणे बंद करावे लागले आहे!जुन्या नोटेत देऊ का विचारते! मग लोक सुटे काढतात!मी तरी कुठून आणणार रोज शंभरचे जुडगे! एका ओळखीच्या ताईकडे पन्नासचा आहे म्हणे;) गोव्याला जायचा विचार करतेय ;)
त्यामुळे सगळेच पर्याय वापरून बघते.
7 Dec 2016 - 12:37 pm | पैसा
ये गोव्याला! इकडे ५० १०० ५०० काय पायजे ते मिळेल.
गुलाबी गांधी देणार्यांना डॉ खर्यांचं औषध बरंय. १५०० चा चेक देते म्हणून लिहायला सुरुवात कर डायरेक्ट!
7 Dec 2016 - 12:47 pm | संजय क्षीरसागर
बँका चार्जेस वाढवत यात पैसा कमावणार नक्की.
कार्ड स्वाइपींगवर मर्चंटला चार्जेस भरायला लागतात. ते तो कस्टमरला लावणार की नाही ? दाखवा म्हात्रे साहेबांना.
7 Dec 2016 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =))
7 Dec 2016 - 8:29 pm | अभिजित - १
कॅशलेस होण्याकरता सरकार कोणत्याही स्तरावर जात आहे .. आत्ता पर्यन्त OTP म्हणजे मोठी सेफ्टी होती. आता नाही. तुमचा नंबर कोणाच्याही हाती लागला तर २ हजार च्या आतील व्यवहार OTP शिवाय होणार असल्याने कोणीही गैरफायदा घेऊ शकतो.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/otp-does-not-requires-for-onlin...
दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांना ओटीपी आवश्यक नाही
ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी निर्णय
लोकसत्ता ऑनलाइन | December 7, 2016 5:14 PM