बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात
चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात
झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात
ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात
पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात
मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात
नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!
प्रतिक्रिया
3 Nov 2016 - 10:51 pm | एस
कविता आवडली. साठोत्तरी मराठी कवितेतील महत्त्वाच्या बदलांचा सांगोपांग आढावा घेता आपल्या नजरेस येते ती छंदोबद्धतेपासून मराठी कवितेने घेतलेली फारकत. कवितेतील शब्दबंबाळ जडशीळपणा जाऊन रोजच्या व्यवहारातील सरळसोपे शब्द कवितेत सररास आढळू लागले. यामुळे मराठी कविता अधिक आशयगर्भ झाली की नाही हा संशोधनाचा मुद्दा ठरावा. पण एक निःसंशय मान्य करायला हरकत नसावी की, होत असलेले बदल मराठी कवितेला सामान्यजनांच्या अधिक जवळ घेऊन जाऊ लागले. मराठी कवितेचा साचा, आणि आशय, हे वरवरचे बदल अधिक दृश्यमान असले तरी मूळ फरक हा कवितेच्या विषयपटलाच्या वैविध्याच्या विस्तारण्यात घडून येत होता. आता-आतापर्यंत अस्पर्श्य असे समाजस्तरांचे हुंकार मराठी कवितेच्या क्षितिजांवर धडका देऊ लागले. सत्तरच्या दशकांतल्या राजकीय घडामोडींची त्यात भर पडली. नवीन आदर्श, नव्या संकल्पना या सर्वांत भर टाकतच होत्या. पुढे नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठी कवितेची सैरभैर मनःस्थिती तितक्याच हळुवार ताकदीनं रेखाटली गेली. एकविसाव्या शतकात सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमांचा प्रभाव, जोडीला आलेली आर्थिक सुबत्ता आणि खुणावू लागलेली जागतिक क्षितिजे मराठी कवितेला नवीन आयाम देत आहे.
वरील कवितेत या सर्व साहित्यप्रवासाचं प्रतिबिंब फार ठळकपणे उमटलेलं दिसून येतं.
धन्यवाद! पुलेशु.
3 Nov 2016 - 11:08 pm | संदीप डांगे
इतक्या सुंदर भावस्पर्शी कवितेचं इतकं ***/*/** परीक्षण!
भाग्यश्रीताई, खूप सुंदर कविता, अजून लिहा, मला वाचायला आवडते. अगदी अजय मनातले शब्द कोणीतरी कागदावर, अक्च्युअली स्क्रीनवर उमटवत आहे की काय असे वाटते, मी रोज तुमच्या कवितेची वाट पाहतो,
*** स्टारच्या ठिकानि कोणते शब्द वापरायचे त्याबद्दल गोंधळ आहे, कोणतेही असंसादिय शब्द अपेक्षित नाहीत ***
3 Nov 2016 - 11:11 pm | पैसा
कवितेत व्यक्त झालेला व्यामिश्र जाणिवांचा प्रगल्भ आविष्कार तुमच्या लेखणीतून किंचितसा अभिव्यक्त झाला आहे. समीक्षकी प्रथेनुसार या रसग्रहणास ठीऽक आहे अशी आमच्या लेखणीस देणे शक्य तेवढी उत्तम श्रेणी देत आहे.
पुरशु
-कोणतरी भावे
3 Nov 2016 - 11:12 pm | चांदणे संदीप
आख्ख्यॅ होल प्रतिसादाशी बाडीस!
Sandy
3 Nov 2016 - 11:14 pm | स्रुजा
अतिशय भाव- विभोर कविता ! मनसे पासुन (कधी मानसे आपला रंग बदलतात) ते मिपा वरच्या उडालेल्या धाग्यांपर्यंत ( वाचा नकळत धागे तुटून जातात...!) खुप मोठा अवकाश कवितेने लीलया साकार केला आहे . वाह वाह !!
किती आशयगर्भ कविता आहे ! आपलेच भाव खातात हे तर त्रिकालाबाधित सत्य सहजी मांडलं आहे. ही कविता मिपाच्या रत्नांमध्ये आलीये .. जे कोणी ओळखणार नाहीते हिचं मुल्यं त्यांनी खंजिर खुपसलाय असं समजावं.
3 Nov 2016 - 11:54 pm | कपिलमुनी
लौकर पाडा
4 Nov 2016 - 12:23 am | संदीप डांगे
धिस प्रतिसाद रिंग्स अ बेल....!
4 Nov 2016 - 2:03 pm | कवि मानव
:)))
4 Nov 2016 - 8:59 am | नाखु
साधक बाधक वेचक रेचक वाचक मित्र मंडळाची आग्रही विनंती मान्य केल्याबद्दल एस भाऊंचे अभिनंदन आणि जाहीर आभार.
कार्यकर्ता अखिल मिपा साधक बाधक वेचक रेचक वाचक मित्र मंडळ
4 Nov 2016 - 2:51 pm | Bhagyashri sati...
धन्यवाद :)
7 Nov 2016 - 12:48 pm | मराठी कथालेखक
छान लिहिलं आहेस.
7 Nov 2016 - 1:29 pm | कपिलमुनी
टंकताना जरा जपून टंकावा , प्रतिसादही अर्थ बदलतात !
ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी आयडी रंग बदलतात
7 Nov 2016 - 2:20 pm | मोदक
हे दिग्विजय सिंगने राहुल गांधीला किंवा मोदींनी अमित शहाला सांगितले तर काही फरक पडेल का? ;)
7 Nov 2016 - 3:14 pm | नाखु
मिपाकरांना (लेखन मात्र)
मिपाकरांना (वाचनमात्र)
मिपाकरांना (प्रतिसादमात्र)
मिपाकरांना (धुळवड वाचून गलितगात्र)
आपल्याला अपेक्षीत परिणामांसाठी वरील चौघांना मिपाचे सदस्यत्व देऊन किमान १०० धागे वाचण्यास द्यावेत्,त्या नंतर बघू काय शिल्लक राहील ते.
शिलकीतला वाचकांचीच पत्रेवाला वाचक नाखु
7 Nov 2016 - 5:17 pm | कपिलमुनी
नामस्मरण झाले !
7 Nov 2016 - 3:53 pm | पी. के.
जे न देखे रवी...तर आपण कशाला बघायचं म्हणून या विभागाकडे न बघणारा म्या आज चुकून तुमची कविता वाचली आणि वाचताच राहिलो. एका दमात तुमच्या सर्व कविता वाचून काढल्या.
वा वा वा.. क्या बात... क्या बात... क्या बात... कसं सुचत हे ताई तुम्हाला?
जिते राहो... लिहिते राहो...
7 Nov 2016 - 3:59 pm | Bhagyashri sati...
धन्यवाद :)
9 Nov 2016 - 7:52 pm | ज्योति अळवणी
अप्रतिम मर्म. खूप आवडली