अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..
तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.
जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.
आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!
किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!
अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!
धन्यवाद!
प्रतिक्रिया
6 Oct 2016 - 2:40 am | स्रुजा
वा वा वा वा... बहुगुणी काका, स्नेहाताई ह्यांनी नजिकच्या काळात फार छान अनुभव दिलेत. अभिनंदन. घे आणि तुला भांडुन व्हिसा नाही तरी अॅडमिशन पदरात पाडण्याची संधी मिळाली. आता हौस फिटली म्हण आणि बोअरिंग बना दो जी अब इस के बात अमेरिका को असं सांग देवाला ;)
6 Oct 2016 - 3:04 am | पिलीयन रायडर
खरंच बाई!! बोरिंग बना दो बाबाजी अब अमेरिका को!!
6 Oct 2016 - 3:05 am | रुपी
वा वा वा वा... बहुगुणी काका, स्नेहाताई ह्यांनी नजिकच्या काळात फार छान अनुभव दिलेत. >> सहमत आहे :)
6 Oct 2016 - 2:53 am | अभिजीत अवलिया
हाबिनंदन. एक सहज शंका.
इथे शाळेत प्रवेश घ्यायला मुलांना इंग्रजी यावे लागते का अगोदरपासून? जर लागत असेल आणी पुढे मागे मला कधी जास्त काळासाठी अमेरिकेत राहावे लागले तर समस्या येईल का? कारण माझा मुलगा मराठी माध्यमात शिकतो.
6 Oct 2016 - 3:00 am | रेवती
मुलाचं वय काय आहे?
6 Oct 2016 - 3:02 am | पिलीयन रायडर
इंग्रजी आलेलं बरं असतं. माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकला होता एक वर्ष, म्हणुन त्याला थोडं कळायचं. पण बोलता येत नव्हतं. इथे येऊन ३ महिने इथल्या लोकांशी बोलुन आणि पेपा पिग सारखे कार्टुन्स पाहुन पाहुन तो उत्तम इंग्रजी बोलायला शिकला. आता शाळेत काही त्रास नाही. पण नशिबाने त्याच्या शिक्षिका भारतीय आहेत!
पण अजुन एक महत्वाचं.. माझा मुलगा ४ वर्षाचा आहे म्हणुन त्याला गरज पडली नाही. पण ५व्या वर्षापासुन पुढे अॅडमिशनच्या वेळेला मुलाला इंग्रजी येत नसेल तर खास एक प्रोग्राम आहे - मल्टिलिग्वल का काहितरी.. आत्ता लिंक सापड्त नाहीये. ते बहुदा मदत करतात अशा मुलांना. त्यांच्याकडुनच अॅडमिशन होते ह्या मुलांची. इथे इंग्रजी येत नसलेल्या मुलांची फार काळजी घेतली जाते. तेव्हा तुम्ही काळजी करु नका. शाळा ती करेलच!
6 Oct 2016 - 3:12 am | अभिजीत अवलिया
माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या मुलाचे वय पण ४ आहे. घरी थोडेफार इंग्रजी शिकवून ठेवले पाहिजे म्हणजे.
6 Oct 2016 - 3:28 am | रेवती
मग काळजी करू नका. मुले अगदी पटापट शिकतात. जरुरीचे शब्द, आपल्या गरजा एवढे शिकवून ठेवल्यास सोपे होईल.
6 Oct 2016 - 11:38 pm | टिवटिव
पेपा पिग, थॉमस, चक असे कार्टुन दाखवा १ २ महिने मुलं आपोआप शिकतात...
7 Oct 2016 - 1:47 am | ट्रेड मार्क
भारतातल्यासारखा इथल्या शाळांमध्ये इंटरव्ह्यू नसतो. ते फक्त मुलाला एकदा बोलतं करायचा प्रयत्न करतात. फक्त थोडंफार इंग्लिश कळेल एवढं बघा. पण नाही आलं तरी काही फरक पडत नाही. माझी मुलगी ४ वर्षांची असतानाच अमेरिकेत आली. इंग्लिश येत नव्हतंच त्यात ती प्रचंड लाजाळू होती. आई आणि बाबा सोडून दुसऱ्या कोणाशी बोलणे तर दूरच पण बघायचीसुद्धा नाही. पण तिला शाळेत काहीच त्रास नाही झाला ना ऍडमिशनला ना नंतर कधी. आता म्हणजे ही तीच मुलगी आहे हे खरं वाटणार नाही एवढी बदलली आहे. टिवटिव म्हणल्याप्रमाणे इथले कार्टून्स (Curious George, Cat in the hat हे पण चांगले आहेत) दाखवा आपोआप इंग्लिश सुधारेल.
भारतातून जरी थोडी मोठी मुलं इथे आली तरी काही त्रास नसतो. इथे फक्त इंग्लिश किती येतंय हे समजून घेण्यासाठी एक परीक्षा घेतात. त्याच्या रिझल्ट प्रमाणे ते ठरवतात त्यांना कसं ट्रेन करायचं ते. ESL (English as secondary language) म्हणून एक वेगळा वर्ग असतो. हा फक्त १ तासाचा वेगळा वर्ग घेतात (शाळेच्या वेळेतच) ज्यात शिक्षक एशियन असतात. भारतीय मुलं साधारणतः १ वर्षात पूर्ण तयार होतात. परंतु बाकी एशियन देशातली किंवा ME मधली मुलं इंग्लिशच्या बाबतीत फारच मागासलेली असतात. ते जास्तीत जास्त ३ वर्षे ESL मध्ये जाऊ शकतात.
त्यामुळे चिंता नसावी. अधिक माहिती हवी असेल तर मला व्यनी करा, मला जेवढं माहित आहे ते सगळं सांगीन.
6 Oct 2016 - 3:03 am | रेवती
अभिनंदन! इंटरेस्टींग ष्टोरी.
बहुगुणींचेही आभार.
6 Oct 2016 - 3:44 am | खटपट्या
पिरा यांचे अभिनंदन. अवलिया साहेब, भारतात जेवढं इंग्रजीचं स्तोम माजवलं गेलंय तेवढं काही घाबरायची गरज नाही.
6 Oct 2016 - 11:26 pm | अभिजीत अवलिया
भारतात जेवढं इंग्रजीचं स्तोम माजवलं गेलंय तेवढं काही घाबरायची गरज नाही.
--- मला पण असंच वाटतं. बऱ्याच नातेवाईकांनी 'इंग्रजी माध्यमातच घाला' अशा ढुश्या देऊन पण मी मुलाला मराठी शाळेत घातले. ऑफिस मधील बरेच सहकारी अधून मधून मराठी माध्यमात घातले म्हणून चोचा मारत असतातच. मी मुलाचे आयुष्य बरबाद करत आहे असे बोलून दाखवतात. मी शक्यतो कुणाला वाईट वाटू नये म्हणून प्रत्युत्तर करत नाही पण आता कुणी मराठी माध्यमात घातले म्हणून चोच मारली की एक सर्जिकल स्ट्राईक करणार आहे अशा माणसांवर.
7 Oct 2016 - 12:15 am | स्रुजा
करत जा प्रत्युत्तर. हे असलं काही तरी नाक खुपसुन त्यांनी स्वतःला वाईट वाटुन घेण्याची सोय आधीच करुन ठेवली आहे. त्यामुळे तुम्ही बिन्धास बोला.
आणि तसंही हल्ली मराठी शाळेत पण पहिलीपासून च ए बी सी डी पण शिकवतात ना? ६ व्या ऐवजी १० व्या वर्षी शिकली मुलं ईंग्रजी बोलायला तर काय आभाळ कोसळणार आहे?
7 Oct 2016 - 12:56 am | ट्रेड मार्क
तुमचं काम झालं ते एकदम छान झालं. डॉ. शर्मांशी संपर्क न झाल्याने मला पण चुटपुट लागून राहिली होती. जियो मिपा, मिपाकर बहुगुणी काका आणि डॉक्टर सुद्धा.
शाळेत मराठीत भांडला नसाल आशा करतो (ह घ्या). मला अजूनही इंग्लिशमध्ये भांडताना कॉन्फिडन्स येत नाही आणि मजा तर अजिबात येत नाही.
7 Oct 2016 - 2:35 am | पिलीयन रायडर
मजा नाही आली. पण सात्विक संताप झाली की आपोआप इंग्रजीतुन भांडण आतुन बाहेर पडलं!
अधुन मधुन मी इंग्रजी वाक्यात "नाही पण.." ... "हो हो".. "चालेल की" वगैरे शब्द अगदी व्यवस्थित वापरते!!
7 Oct 2016 - 2:54 am | नुमविय
सध्या वास्तव्य प्रिन्स्टन मध्ये आहे... कुणी मिपाकर आहेत का आजूबाजूला... तसाच शाळे संबंधी माहिती हवी आहे...
7 Oct 2016 - 4:19 am | टिवटिव
सिअॅटल मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?
9 Nov 2016 - 2:04 am | pallavis
Mi aahe Seattle madhe. Kahi madat/prashna asalyas vyani karaa...
7 Oct 2016 - 11:00 am | रायनची आई
पिरा, छान अनुभव शेअर केलास अॅडमिशनचा..आणि इंग्रजी बोलण्याचे भारतात असलेले स्तोम बघून अमेरिकेत खरच सुखद परिस्थिती आहे म्हणायच..आपल्याकडे किती बागुलबुवा केला जातो.
7 Oct 2016 - 11:24 pm | रुपी
खरं तर इंग्रजी बोलण्याबद्दल मी थोडं वेगळंही ऐकलं आहे. स्वतःचा अनुभव नाही अजून कारण मुलं लहान आहेत, पण नातेवाईकांचाच आहे त्यामुळे १००% खरा आहे हे माहीत आहे. तर त्यांच्या दोन्ही मुलांना शाळेत जायला लागल्यावर जास्त इंग्लिश बोलायला शिकवा असे सांगितले गेले होते. मग अचानक घरी मातृभाषेतून बोलणे बंद करुन पूर्ण इंग्लिश असा मारा सुरु झाला. काही काळाने पोरं फक्त इंग्लिशमधून बोलायला लागली. त्यामुळे आजीआजोबांशी तर संवाद जवळजवळ संपलाच. त्यांचा मोठा मुलगा हायस्कूलमध्ये असताना आम्ही त्याला आग्रह करायचो मराठीत बोलायचा तेव्हा तो म्हणाला मी लहान असताना बोलायचो तेव्हा मला रागावून इंग्लिशमध्ये बोलायला लावायचे, आता मी इंग्लिशमध्ये बोलतो म्हणून तक्रार का?
त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित लहान असतानाच दोन्ही भाषेतून संवाद चालू राहिला तर अशी वेळ येणार नाही. एका मिपाकरांच्याच ७वी- ८वीतल्या मुलाला व्यवस्थित मराठीत बोलताना ऐकून विचारले तेव्हा त्यांनीही असेच सांगितले होते. नक्की सर्वांबरोबरच असे होईल की नाही माहीत नाही. पण आपणही भारतात लहानपणीपासून २-३ भाषा शिकत-बोलत असतो आणि अजूनही बोलू शकतो त्यावरुन हे शक्य आहे असे वाटते.
8 Oct 2016 - 12:59 am | पिलीयन रायडर
हे अगदी खरं आहे. हा प्रकार मी सुद्धा इथे पाहिला. मुलं इंग्रजीच बोलतात. म्हणुन मी पहिल्यापासुनच मराठीत बोलते. आणि काय जे असेल ते एकाच भाषेत. उगाच तुला अॅप्पल हवं का? असं धेडगुजरी नाही. ज्या गोष्टी त्याला कदाचित शाळेत बोलाव्या लागतील (जसं की "मला तुमचं बोलणं समजलं नाही, परत सांगाल का?" टाईप वाक्य) त्या सांगताना पुर्ण इंग्रजी मध्येच काय ते बोलायचं. पण मराठी मात्र सोडायची नाही. मी इथल्या सर्व फॉर्म्स मध्येही "घरात कोणती भाषा बोलता? तुम्हाला (समजा शक्य झालंच शाळेला तर) कोणत्या भाषेत आमची पत्र आलेली आवडतील" वगैरे सर्व प्रश्नांना "मराठी" हेच लिहीलं आहे. इथेही "तुम्ही कुठुन आलात" ह्याचं उत्तर मोघम इंडिया किंवा महाराष्ट्र न देता "पुणे, महाराष्ट्र" असंच देतो. मुलालाही तेच सांगतो. इथे लोक गलेच "पुना" म्हणायला जातात, पण तातडीने तिथेच "नाही.. पुणे" असं सांगतो. इथे येऊन माझा जाज्वल्य अभिमान अजुन वाढिला लागलाय!! =))
आणि पुण्यात बिहारी लोक हेच करायचे तेव्हा मी बोंबा ठोकायचे! =))
8 Oct 2016 - 2:54 am | रुपी
ही मीही शक्य तितके एकाच भाषेतले शब्द वापरते शक्यतो.
पण अॅपल मुळात भारतात आणलंच अमेरिकन माणसाने. आणि "सफरचंद" शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली असावी याचा शोध घेतल्यावर मला तरी काही सापडलं नाही :)
8 Oct 2016 - 1:48 am | सही रे सई
माझी सव्वादोन वर्षाची मुलगी घेऊन अमेरीकेत मी जेव्हा दाखल झाले तेव्हा माझ्या जीवाला घोर लागून राहिला होता की ती इथल्या डे केअर कम प्ले स्कुल मधे कशी काय रूळेल. दिवसाचे ८ तास तिला ठेवावं लागणार होत आणि तिथे एकही मराठी किंवा गेलाबाजार भारतीय माणूस शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून नव्हते. आम्ही पहिल्या दिवशी तिथे गेल्यावर माझी लेक लगेच त्या अनोळखी मुलांबरोबर खेळायला पण लागली. आम्ही आमची काळजी बोलून दाखवली की हिला अजिबात इंग्लिश कळत नाही. त्यावर तिथले व्यवस्थापक व मुख्यशिक्षक दोघांनी आम्हाला काळजी करू नका व सुरवातीला थोड अवघड जाईल पण ती लहान असल्यामुळे लवकर तिथे रुळेल असा विश्वास दिला. पहिले काही दिवस त्यांनी साईन लँग्वेज मधे तिच्याशी बोलण सुरू केलं. पुढच्या महिन्या दिड महिन्यात ती पण हळू हळू इंग्लिश बोलायला शिकली.
आता तर ती फक्त इंग्लिशच नाही तर स्पॅनिश पण सफाईदार बोलते (त्या डे केअर मधे बहुतांश लोक स्पॅनिश पण बोलतात). काही वेळा तिचं अमेरिकन अॅक्सेंट मधलं इंग्लिश मला नाही कळल तर मराठीत भाषांतर करून किंवा खुणांनी सुधा ती सांगते. हे सगळं फक्त गेल्या ८ महिन्यात झालं आहे.
इथल्या डे केअर वाल्यांनी आपली मराठी शिकण्याचा देखील प्रयत्न केला. तिच्या साठी सुरवातीला पाणी, जेवण, झोप, खेळणे व अजून बर्याच गोष्टींसाठी त्यांनी चित्र व्हिडियो अश्या गोष्टी पण तयार केल्या होत्या जेणे करून तिला काय म्हणायचय ते त्यांना आणि त्यांच म्हणण तिला कळेल.
घरात नवनीन मराठी शब्द शिकवण तर चालू आहेच. मी मुद्दाम मराठी बालगीतं, गोष्टी तिला लावून देते जेणे करून आपल्या लहानपणी ज्या गोष्टी आपण शिकलो त्या तिला कळतील आणि मराठीचा तिचा शब्दकोषही समृध्द होईल. तसेच संस्कृत श्लोक, शुभंकरोती, मराठी बाराखडीची ओळख या गोष्टी पण सुरू ठेवल्या आहेत.
मुद्दा काय तर इथले लोक, शाळा तुम्हाला एखादी भाषा येत नाही म्हणून दुर्ल्क्ष न करता उलट खास लक्ष देऊन ते करवून घेतात. त्यामुळे भाषा येत नाही म्हणून फारस अडत नाही. तसचं लहानपणी ५-१० वर्षापर्यंत मुलांना जितक्या जास्त गोष्टी, भाषा कानावर पडतील तेव्हढ्या ते लगेच आत्मसात करू शकतात.
8 Oct 2016 - 3:07 am | पिलीयन रायडर
भारी!!
28 Nov 2016 - 9:48 pm | पिलीयन रायडर
इथे कुणी मला ७-८ दिवसांच्या वेस्ट कोस्टच्या ट्रिप संदर्भात माहिती देईल का? माझ्या डोक्यात सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एन्जिलिसचा युनिव्हर्सल स्टुडिओ करायचे नक्की आहे. आता अजुन काय पाहु ते सांगा. शिवाय रहाण्याचे चीप ऑप्शनही सांगा :)
28 Nov 2016 - 10:10 pm | राघवेंद्र
माझा पण अशी ट्रिप करायचा विचार आहे.प्रतिसादांच्या प्रतीक्षेत ...
29 Nov 2016 - 12:34 am | रुपी
इकडे एक Lassen Tours म्हणून आहे, त्यांची ३ दिवसांची टूर आईबाबांनी घेतली होती, अनुभव चांगला होता. ७-८ दिवसांची टूर आहे, त्याचा अनुभव नाही. पण त्यात मुकामाचे ठिकाण वगैरे सर्व त्यांनी ठरवलेलेच असते. दुसरा पर्याय म्हणजे स्वतः कार रेंट करुन हवे तसे फिरणे आणि सोयीची हॉटेल्स शोधणे. युनिव्हर्सलला जाण्यासाठी सोयीच्या एका हॉटेलचा अनुभव चांगला आहे, माहिती हवी असेल तर व्य.नि.तून कळवते.
29 Nov 2016 - 12:45 am | पिलीयन रायडर
हो नक्कीच. मला कळवच. पण इन जनरल काय काय पहायला आहे हे सांगितलंस तर अनेकांना उपयोगी पडेल.
29 Nov 2016 - 1:09 am | रुपी
हो, व्यनितून हॉटेलची माहिती देऊ शकते.
काय काय पाहायला आहे, थोडी चर्चा मागच्या पानावर आहे, माझी भर म्हणजे युनिव्हर्सल पाहणार असाल तर मुलासाठी डिस्नेलँडही करावं - अर्थात त्याच्या वयासाठी योग्य बर्याच राइड्स असतील तर. इडोने लिहिलंय तसं योसेमिटी चांगलं आहे, पण आत्ता हिवाळ्यात काही वेळा रस्ते बंदही असतात, तोही विचार करुन ठेवावा लागेल. मिस्टरी स्पॉटही शक्यतो बघाच.
29 Nov 2016 - 12:56 am | इडली डोसा
आलं असेल तर मी म्हणेन कि तुमची तुम्ही ट्रीप प्लॅन करा.
कोणत्या सीजन मधे करणार आहे त्यानुसारही काय काय करता येईल ते बदलेल. सॅन फ्रान्सिस्को पासुन ३ तासांच्या ड्राईव्ह्वर योसेमिटी नॅशनल पार्कपण आहे आणि नक्कीच भेट देण्यासारखे आहे.
29 Nov 2016 - 1:12 am | ट्रेड मार्क
पहिली गोष्ट म्हणजे स्वतः गाडी चालवायची तयारी असेल तर सर्व गोष्टी एकदम सोप्या होऊन जातात.
मी NJ मधून विमानाने लास वेगासला गेलो. तेथे विमानतळावरून गाडी घेतली व दुसऱ्या दिवशी गाडीने ग्रँड कॅन्यन करून आलो. मग पुढे २ दिवस वेगास मध्ये फिरून घेतले आणि मग गाडीने ने लॉस अँजेल्सला गेलो. तिथे २ दिवस राहून डिस्ने वर्ल्ड बघितलं आणि परत वेगासला आलो, गाडी परत केली आणि परतीचे विमान पकडले.
राहण्यासाठी डिस्ने/ युनिवर्सल जवळ बरीच हॉटेल्स असतात जी फार महाग नसतात. थोड्या संशोधनावर ४-७ माइल्स वर एखादं हॉटेल मिळेल. फार लांब घेऊ नका कारण LA मध्ये खूप ट्रॅफिक असतं. तरी पण तुम्ही २ पेक्षा जास्त लोक गाडीत असाल तर HOV लेन वापरू शकता.
वेगास पण बघण्यासारखं आहे. कॅसिनोज मध्ये पण, गॅम्बलिंग भाग सोडून, लहान मुलांना घेऊन जाता येतं. पण उर्वरित भागच बघण्यासारखे आहेत. वेगास हे सूर्यास्तानंतर फिरायचं शहर आहे त्यामुळे दिवसभर तुम्ही इतर उद्योग करू शकता. ग्रँड कॅन्यन पण सुंदर आहे.
अजून काही स्पेसिफिक माहिती हवी असेल तर व्यनी करा. जमेल तेवढं सांगीनच :)
माझं मत: युनिवर्सल स्टुडिओमध्ये रोलर कोस्टर राईड्स बऱ्याच आहेत. त्यामुळे वयाचे व उंचीचे बंधन ८०% राइड्स मध्ये आहे. दुसऱ्या शब्दात, लहान मुलांना (५ वर्षाच्या आतील व ४८ इंचापेक्षा कमी उंची असेल तर) बसता येणार नाही अश्या बऱ्याच राईड्स आहेत. जर का तुम्ही हार्ड कोअर रोलर कोस्टर आवडणारे असाल तर युनिवर्सल बेस्ट आहे. त्यापेक्षा डिस्ने वर्ल्डमध्ये लहान मुलांना बसता येईल अश्या बऱ्याच राइड्स आहेत. मी तर म्हणेन की कॉम्बिनेशन आहे की लहान मुलं आणि मोठी माणसं पण एन्जॉय करतील. मी युनिव्हर्सलमध्ये गेलो पण फार तर ३-४ राईड्स मध्ये आम्ही बसू शकलो. त्यामुळे माझी पसंती डिस्नेला असेल.
29 Nov 2016 - 1:32 am | आनंदयात्री
प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार ट्रीपमधली स्थळं निवडली किंवा काढली जातात, त्यामुळे मी जर ईस्टला राहून वेस्ट कोस्टची ट्रिप प्लॅन केली तर कशी करेन असा विचार करून खालचा प्रतिसाद लिहिला आहे.
ट्रिपचा काळ - ५ ते ७ दिवस
विमानाने Los Angeles आणि तिथून पुढे विमानतळावरून घेतलेली भाड्याची गाडी.
१. युनिव्हर्सल स्टुडिओ - १ दिवस
२. डिस्ने लँड (?) - १ किंवा २ दिवस
३. Los Angelesच हंटिंग्टन आणि इतर आवडतील तसे समुद्रकिनारे - १ दिवस
४. किंवा सरळ दोन दिवसाची पॅसिफिक कोस्ट हायवे वर रोड ट्रिप (एका दिवशी रात्री हर्स्ट कॅसल च्या आसपास समुद्रकिनाऱ्यावरच्या हॉटेलात राहावे). खरे तर Monterey ते मोरो Morro Bay या दोन ठिकाणांमधला कोस्टल हायवे अतिशय सुंदर आहे पण सुरुवात जर लॉस एन्जिलिसपासून करायची ठरली तर Monterey पर्यंत पोचणे बऱ्यापैकी वेळ खाणारे होऊ शकते. त्यामुळे ते उपलब्ध वेळ आणि आवडीनिवडीचा प्रार्थमिकतेनुसार ठरवावे लागेल.
५. अचाट गोष्टी पाहायला आवडत असतील तर Los अँजेल्स पासून Sequoia National Park साधारण २०० माइल्स असेल. प्रचंड मोठा Sequoia वृक्ष पाहणे हा खरोखरीच विस्मयकारक अनुभव होता. इथे जातांना जर बेकर्सफील्ड मार्गे गेले तर तिथल्या ऑइल फिल्ड्स मधून रस्ता जातो. क्षितिजापर्यंत शेकडो पम्प सतत ना थांबता सुरु असतात, काहीसे खालच्या फोटोसारखे दिसेल.
29 Nov 2016 - 1:44 am | स्रुजा
+१ हेच सूचवणार होते.
लॉस अँजेलिस हुन कोस्ट हायवे ही रोड ट्रिप हा एक आत्यंतिक महत्त्वाचा भाग आहे माझ्या मते. अप्रतिम सुंदर ड्राईव्ह !! लायसनस तो पर्यंत काढुन घ्याच. एल ए हुन निघुन मलिबु , सॅन डिएगो सारखी ठिकाणं एक दोन दिवसात करता येतात. पूर्ण एसेफो पर्यंत ड्राईव्ह केलं तर त्यासारखी गोष्ट नाही. एसेफो मध्ये कदाचित फार गाडी लागणार नाही पण एल ए (युनिव्हर्सल + डिझ्ने + हॉलिवुड सारख्या क्लिशे जागांमध्ये रस असेल तर ते, आम्हाला नव्हता सो आम्ही ते दिलं सोडुन + बीचेस + लास व्हेगस+ ग्रँड कॅनयन + सॅन डिएगो + कोस्टल हायवे) करताना गाडी ने फार फार सोय होईल आणि तो एक चांगला, स्मरणीय अनुभव असेल. युनिव्हर्सल मध्ये राईड मध्ये अबीर च्या वयाची मुलं होती आणि तो स्टुडिओ हा एक अप्रतिम अनुभव आहे. त्यांची स्टुडिओ टुअर नक्की , नक्की घे कारण त्यात अनेक मजेदार, सुरस गोष्टी बघायला मिळतात. फक्त आत खायला फार काही नीट मिळत नाही त्यामुळे घेऊन जा बरोबर काही तरी.
एसेफो आणि एल ए वेगवेगळे करावे अशा मताची मी आहे. कारण एक आठवडा एल ए + आजुबाजुचं आणि एक आठवडा एसेफो + आजुबाजुचं असा वेळ असेल तर नीट न्याय देता येईल आणि तो द्यावाच.
एसेफो च्या आजुबाजुला सॉफ्टवेअर वाल्यांची पंढरी आहे. गुगल सारखी ऑफिसेस + स्टॅनफर्ड ची टुअर पण नक्की घ्यावी. नॅपा व्हॅली तर आहेच पण तिथे अजुनही जवळपास काही अप्रसिद्ध पण नितांत सुंदर जागा आहेत. एक एक दिवस नक्की घालवावा अशा. त्यामुळे हे दोन्ही एकत्र करायचं असेल तर २ आठवडे + गाडी हे असू द्या .
29 Nov 2016 - 1:45 am | आनंदयात्री
LA मध्ये हॉटेल निवडताना शटल सर्व्हिस असलेली हॉटेलं निवडा. जेणेकरून पार्कात येणे जाणे सुखाचे होईल. विशेषतः दिवसभर चालून पायाचे तुकडे पडलेले असतांना रात्री बसने येणे सोपे वाटते. अनाहेम ऑरेंज कौंटीत बेस्ट वेस्टर्न, रेड लायन किंवा आयरिस इन सारखे बरेच ऑप्शन मिळतील. काही ठिकाणी हॉटेलातले पार्किंगही पेड असते, ते पाहूनच बुकिंग करा.
दिसणे लँड आणि युनिवर्सल हे दोन्हीही पार्क करणार असला तर सिटी पास असणारे तिकीट जास्त सोयीचे पडेल. https://www.getawaytoday.com/ सारख्या बऱ्याच वेबसाईट पूर्ण ट्रिप प्लॅन करून देतील. त्यांच्याकडून हॉटेल आणि तिकिटे दोन्ही घेतली तर बऱयापैकी पैसे वाचतात असा अनुभव आहे.
29 Nov 2016 - 3:06 am | खटपट्या
हायला, आमच्या कर्मभुमीतून गेलात की राव. या मशीनींबरोबर ३.५ वर्षे काढली.
माझे बेकर्सफील्ड...
29 Nov 2016 - 3:14 am | आनंदयात्री
अरे वा. तुमचे अनुभव वाचायला मला (आणि अनेकांना) आवडतील. नक्की लिहा.
29 Nov 2016 - 12:46 am | राघवेंद्र
युनाइटेड ची स्वस्त तिकिटे मिळण्याची ची वेबसाईट. इथे दर मंगळवारी त्या वीकांताची स्वस्त तिकिटे मिळतात https://www.united.com/web/en-US/apps/booking/specials/default.aspx
6 Feb 2017 - 8:25 pm | पिलीयन रायडर
अमेरिकेत कधी कुणी volunteering केले आहे का? मला प्रत्यक्ष जागी जाऊन २-३ तास काम करायला आवडेल. volunteermatch ह्या वेबसाईटवर जाऊन पहात आहे. इथे अमेरिकन रेडक्रॉससाठी काम करायची संधी दिसतेय. पण एकंदरित हे प्रकरण काय असतं, कोणत्या संस्था चांगल्या, काय प्रकारचे काम करावे अथवा करु नये ह्याची माहिती हवी आहे.
9 Feb 2017 - 11:39 am | श्रीरंग_जोशी
फीड माय स्टार्विंग चिल्ड्रन अन सेकन्ड हार्वेस्ट हार्टलँड या संस्थांमध्ये जाऊन अन्नाची पाकिटं बनवण्याच्या कामाचं श्रमदान मी केलं आहे. दोन्ही संस्थांची कार्यपद्धती स्पृहणीय वाटली.
यासारख्या अनेक संस्था अमेरिकाभर पसरल्या आहेत.
6 Feb 2017 - 9:05 pm | पद्मावति
खूप छान अनुभव असतो पिरा. मी एका ओल्ड एज होम मधे, एका शाळेत आणि एका अजुन एका संस्थेत ( बहुतेक रेड क्रॉस) मधे वोलंटियरिंग केलंय काही काळ.
ओल्ड एज होम मधे दिवसातले दोन तीन तास अती वृद्ध लोकांच्या कक्षात मी असायचे. तिथे आजी आजोबा लोकांशी गप्पा मारायचे, त्यांच्या व्यायामाला मदत करायचे. एकदा तर एक गोड आजी मला म्हणाल्या आज माझी नात येतेय मला भेटायला मला नेलपेण्ट लावून देशील का गं? मग त्यांना मला जमेल तसं मी मॅनिक्यूवर करून दिले त्यांना. आजीबाई खुश झाल्या अगदी :)
शाळेत टीचर असिस्टेंट म्हणून काम होतं. मजा यायची प्री के च्या मुलांबरोबर काम करायला. थोडीफार स्पेलिंग मधे हेल्प. त्यांना पुस्तक वाचून दाखविणे, स्नॅक टाइम ला खाऊ वाटणे अशी कामं. दोन्हीकडे मी खूप एन्जॉय केलं.
रेड क्रॉस मधे काम मात्र जरा बोअर वाटलं मला. मला वाटलं की मी समाज उपयोगी किंवा इण्टरेस्टिंग काहीतरी काम करीन पण तिथे काम होतं फक्त डेस्कवर बसून फोन उचलणे :(
बाकी हॉस्पिटल्स मधे पण वोलंटियरिंग ची खूप कामे असतात. माझ्या एक ओळखीच्या आजी खूप वर्षे हॉस्पिटल मधे वोलंटियरिंग करायच्या.
6 Feb 2017 - 11:03 pm | पिलीयन रायडर
रेड क्रॉसचं काम तसंच दिसतंय. मॅनेजमेंट टाईप. मला माहिती नाही की लहान मुलांशी किती पेशन्सने खेळु शकेन कारण एक मुलगा घरी सहनशक्तीचा अंत पहातोय आजकाल!! पण एकंदरित अनुभव चांगला असेल तर मी एखादया ठिकाणी जाऊन बघते.
9 Feb 2017 - 7:27 pm | रेवती
प्रत्येक संस्थेला एकाच प्रकारची मदत लागेल असं नाही. एका शेल्टरला काही लोकांचा ग्रूप येऊन स्वयंपाक करून जात असे. मग भारतीय लोकांचा गट (ज्यात माझा नवरा, मुलगा जात असत. मी एकदाच गेले होते) वाढप्यांची कामे करत. येथील एका देवळात पाणी वाढणे, स्वच्छता अशी कामे असतात. तुमचे किती तास काम झाले याची नोंद ठेवता येते व त्यावर सही शिक्के घेऊन ठेवता येतात. आता माझ्या मुलाला शाळेत हे दाखवावे लागते म्हणून एका शेल्टरमध्ये जाऊन त्यांची शनिवारी येणारी ग्रोसरीची गाठोडी सोडवून जागेवर वस्तू लावणे वगैरे तीन तासात होते. मग त्याच्या गटाने त्याची नोंद ठेवली आहे.
तू रेडक्रॉसमध्ये जाऊन किंवा फोनवर, ईमेलवर कामाच्या स्वरुपाबद्दल जाणून घेण्यासाठी विचारू शकतेस.
28 Feb 2017 - 9:25 pm | पिलीयन रायडर
जर्सी सिटी मध्ये शाळांच्या अॅडमिशन्स चालु होत आहेत. मागच्या वर्षी ही माहिती मिळवायला मला खूपच त्रास झाला. यंदा कुणी इथे असेल तर उपयोग होऊ शकतो म्हणून किमान ह्या एरियाची माहिती देऊन ठेवते. इतर सदस्यांन त्यांच्या भागाची माहिती दिलीत तर अजुनच उत्तम!
जर्सी सिटी मध्ये मुलांसाठी ३र्या वर्षी पासुन शाळा आहेत. शाळांना काहीही फिस नसते. फक्त युनिफॉर्म आणि डबा आपला. जेवणही फ्री च आहे खरं तर. पण इथे काही तरी गोंधळ चाललाय त्याबाबत. मध्येच पैसे घेताएत, मध्येच फ्री म्हणताएत. पण तसंही आपली पोरं रोज चीझ सॅण्डविच सारखं जेवण नाही करु शकत म्हणुन डबा बरा.
वय ३ - Prek-3 - स्वतंत्र डेकेअर मध्ये हे वर्ग चालतात. ह्या खाजगी शाळा असून त्यांना सरकार अनुदान देते.
वय ४ - Prek-४ - हे वर्ग पब्लिक स्कुल मध्ये चालतात. पण मुख्य इमारतीपेक्षा वेगळे वर्ग असतात आणि शिक्षकही वेगळ्या डिपार्ट्मेंटचे असतात.
वय ५ - किंडरगार्डन - हे मुख्य पब्लिक स्कुलचा भाग असतात - charter school मध्येही हे वर्ग असतात.
वय ३ आणि ४ साठी जे डिपार्टमेंट काम करते त्याचे नाव आहे - अर्ली चाईल्डहुड. जर्सी सिटी बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईटवर सर्व माहिती मिळेल.
ही साईट पहा :- http://www.jcboe.org/boe2015/index.php?option=com_content&view=article&i...
http://www.jcboe.org/boe2015/images/pdf/depts/ec/17-18/Registration_Flye... - ही बेसिक माहिती.
शाळा ४ सप्टेंबरच्या सुमारास चालु होतील.
अॅडमिशनसाठी - बर्थ सर्टीफिकेट, रहिवासी पुरावा आणि मुलाचे वॅक्सिनेशनचे रेकॉर्ड लागेल. भारतातून येताना सर्व आणा. इथे आलात की लगेच एक डॉक्टर गाठा. तो अमेरिकन पद्धतीच्या कार्डवर माहिती भरून देईल. मुल भारतात जन्मलेलं असेल तर त्याची टिबी टेस्ट होईल. ती पॉझिटिव्ह आली तर एक्स रे करावा लागेल. तो इथे खूप महाग आहे. हे भारतातूनच करुन घेता येईल. इथे चालेल बहुदा. मला १००% खात्री नाही. पण मी विचारु शकते.
काही माहिती हवी असेल तर - https://www.facebook.com/groups/jcboe/ हा फेसबुक ग्रुप जॉइन करा. लगेच उत्तर मिळतं.
**** हे सर्व जर्सी सिटीला लागु आहे. एडीसन मध्ये ५ व्या वर्षी शाळा सुरु होतात****
28 Feb 2017 - 9:29 pm | पिलीयन रायडर
अॅडमिशनचा पहिला राऊंड मार्चमध्ये होतो. दुसरा जुन पहिल्या आठवड्यात होतो आणि शेवटचा सप्टेंबरमध्ये शाळा सुरु झाल्या की उरलेल्या जागांसाठी होतो.
अगदी सप्टेंबरमध्ये गेलात तरी तुम्हाला अॅडमिशन मिळणार हे १००%. ती जवळच्या होमस्कुल मध्ये मिळाली तर उत्तम. पण नाही मिळाली तरी तुम्ही मुलांना होमस्कुललाच सोडायचे. बस त्यांना जिथे प्रवेश मिळाला तिथे घेऊन जाते. आणि परत आणुन सोडते.
ह्या दरम्यान तुमच्या मुलाला होमस्कुलला जागा देण्याचे प्रयत्न चालुच असतात. आणि शक्यतो काही दिवसात मुल परत होमस्कुलला येईलच हे पाहिले जाते.
2 Aug 2017 - 3:40 am | पिलीयन रायडर
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी -
१. होम डेपोमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी लहान मुलांसाठी फ्री वर्कशॉप असते. रजिस्ट्रेशन इथे करु शकता - http://www.homedepot.com/workshops/#change_store
ह्या महिन्याचे वर्कशॉप येत्या शनिवारी होते आहे.
२. डाऊनटाऊन बोटहाऊस, मॅनहॅटन इथे संपुर्ण समर मध्ये फ्री कयाकिंग करता येऊ शकते. अनेक ठिकाणी ही सोय असु शकते, गुगलुन बघता येईल.
http://www.downtownboathouse.org/free-kayaking/
३. जर्सी सिटी मध्ये नवीन असणार्यांसाठी - अनेक ठिकाणी मुव्ही इन द पार्क चालु आहे. जवळपास रोज एखाद्या बागेत चित्रपट दाखवला जातोय. आठवड्याच्या ठरलेल्या दिवशी (लेबर डे) पर्यंत रात्री ८-८:३० ला पिक्चर दाखवतात. शक्यतो लहान मुलांचे पिक्चर्स असतात.
अशाच काही कार्यक्रमांची माहिती कुणाला असेल तर नक्की सांगा.
23 Aug 2018 - 12:53 am | समर्पक
सप्टेंबर ६-९ दरम्यान हा समारोह शिकागो मध्ये पार पडत आहे. बरेच रथी महारथी या निमित्ताने उसगावात दाखल होत आहेत.
अधिक माहिती : http://www.worldhinducongress.org/
रच्याकने, शिकागो मधे कोणी मिपाकर आहेत का? कोलोरॅडो डेलिगेट म्हणून तीन दिवस माझा मुक्कम तिथे आहे... तसेच, सप्टेंबर २९-३० न्यूयॉर्क भागात प्रवास आहे, तिथलेही कोणी मिपाकर असल्यास भेटायला आवडेल...