नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले. त्यापूर्वी संरक्षण मंत्री असलेल्या अरुण जेटली यांनीही संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणून स्वावलंबनाची सुरुवात केलेलीच होती. (त्या पूर्वीच्या लोकांनी याकडे साफ दुर्लक्ष केलेले होते) अजित डोवाल हेही अत्यंत अनुभवी आहेत. १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता. त्यामुळे हे हल्ले नैराश्यापोटी होत आहेत हे उघड आहे. तो देश अंतर्गत अडचणीतही आहेच. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आवश्यक होते. आपल्यावरचा राग भारताकडे वळवण्यात ते यशस्वी झालेत. पण हे काहीही लक्षात न घेता काही लोकांनी मोदी पर्रीकर यांनाच संरक्षण विषयात सोशल मेडियावर सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मेडियावर सल्ले देणे आणि देशाचा कारभार पाहणे यात फरक आहे.
एखादा एखादा हल्ला होणारच. पण नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर, अजित डोवाल हे जबरदस्त त्रिकूट आहे. ते निदान पाकिस्तानच्या बाबतीत नवा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाहीत. ही खात्री प्रत्येक भारतीयाने बाळगायला हवी आणि उथळपणे मोदी पर्रीकर यांना सल्ले देणे थांबवावे.
आम्ही निवडू ती वेळ आम्ही निवडू ते ठिकाण हे मनोहर पर्रीकर यांनी फार पूर्वीच सांगितलेले. त्याचा अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.
प्रतिक्रिया
1 Oct 2016 - 7:44 pm | कैलासवासी सोन्याबापु
काका अश्याक्षणी पक्षीय बलाबल तपासून पाहणे हे महामूर्ख भक्त अन घराणेशाहीचे पाईक असलेले मूर्ख दोघेही करतात, अश्या जिंगोइस्टिक भरती ओहोटीच्या चक्रात फसण्याची माझी तरी इच्छा नाही, आता सरकारची भूमिका ह्यावर दोन शब्द बोलतो, सरकारने दाखवलेली हिंमत अतुलनीय जबरदस्त आहे, पण त्यात त्यांचा वैयक्तिक भविष्यकालीन लाभ सुद्धा आहे, अर्थात १००% तो लाभ डोक्यात ठेऊनच निर्णय घेतला गेलाय हे म्हणणे सरकारवर अन पर्यायाने मोदींवर अन्यायकारक असेल, ही लाईन जो कोणी धरतोय तो गुर्जीम्हणतात तसा निधर्मांध वगैरे असण्याची दाट शक्यता आहेच, हा निर्णय घेण्यामागे एक प्रेरणा म्हणजे सरकार ने निवडणूक पूर्व काळात केलेली आश्वासने आहेत, ही आश्वासने म्हणजे अगदी मोगाची लाडकी 15 लाखांची मागणी वगैरेचा समजण्याइतका मी तरी हलका नाही ह्याची ग्वाही देतो(च) शिवाय निवडणूक जाहीरनाम्यात एक बोलुन त्याच दिशेला काहीच न करणे इतपत कोडगे हे सरकार नाहीये, अशी पावती ही कारवाई देते असेही मी मानतो, कदाचित हे ऑपरेशन म्हणजे लोकेच्छेचा मान ठेवायचा एक नवा लोकतांत्रिक मापदंड असू शकतो, सामरिक दृष्ट्या मी कायम एक गोष्ट म्हणतो, वित्त अन उद्योगनिती काँग्रेसी (थोडक्यात राव सिंग परिमाणांनुसार) असावी अन परराष्ट्रनीती ही भाजपाची (अटलजी, लुक ईस्ट, आधी बस नंतर करगिलात दिलेला हाग्यामार) असावी.
आता सरकारने काय केले आहे ते थोडे विश्लेषण करायचा मोह आवरत नाहीये, सरकारी पातळीवरून कुठेच "आमच्या आधीच्या सरकारने बघा अन आम्ही बघा" अश्या प्रकारचा मिश्याना तूप चोळायचा प्रकार झालेला नाहीये, सरकार ने तो केलेला नाहीये, तर लोकशाहीच्या उदात्त तत्वांना अनुसरून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष सगळ्यांना विश्वासात घेऊन ही कारवाई केलेली आहे, ह्या बद्दल सगळ्याच समर्थनार्थ उतरलेल्या राजकीय पक्षाचे माफक अन सत्ताधारी भाजप सरकारचे विशेष अभिनंदन करायला हवे आहे. कोणाला त्यांचा राजकीय अजेंडा जर विरोधी पक्षांचे "माफक" अभिनंदन करू देत नसेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू देत, पण अजेंड्यावर भारत हीच पहिली प्रायॉरिटी ठेवलेली माझ्यासारखी माणसे मात्र, ह्या बाबतीत सगळ्याच निर्णयकर्त्या सत्ताधाऱ्यांचे "विशेष" अन त्यांना सपोर्ट करणाऱ्या विरोधकांचे "माफक" कौतुक नक्की करेल असे क्लोजींग स्टेटमेंट. (केलेल्या कारवाई बद्दल विरोधीपक्ष नेत्या सोनिया गांधी ह्यांनी माननीय पंतप्रधानांचे अभिनंदन करून त्यांना पाठिंबा असल्याचे बोलले आहे असे ऐकून आहोत, कोणी बातमी अटेस्ट करू शकल्यास उपकृत राहीन). थोडक्यात काय ह्या सरकारचा उजळ माथा फोकस करायला आधीच्या सरकारचे भुंडके कपाळ फोकस करायची गरज नाही/नसावी, धिस इज नॉट अ फेर अँड लव्हली ऍड, धिस परटेन्स टू रन या कंट्री, अँड आय एम हॅपी दॅट द गव्हर्नमेंट हॅज डिस्प्लेड अल्टिमेट मॅच्युरिटी इन दॅट रिस्पेक्ट. काँग्रेस ने एक बारकी रेघ ओढली होती, भाजप ने त्या रेघेला धक्काही लावला नाही, पुसलीही नाही, तिच्या लांबीवर सुद्धा टिप्पणी केलेली नाही, तर ही कारवाई करून तिच्या शेजारीच एक ठसठशीत ठळक अशी जास्त लांब रेघ ओढली आहे असे ह्या निमित्ताने नोंदवतो
जय हिंद _____/\_____
बाकी भक्त मंडळीचा च्यु*पा अन विरोधकांची मानसिक झ**व ह्या गटारात उतरायची अजिबात इच्छा नाही असे स्पष्ट करतो आधीच
1 Oct 2016 - 8:18 pm | नर्मदेतला गोटा
आपण खूप लिहीलंत पण त्यात आशय काहीच नव्हता असं म्हणावे लागेल.
आपण एकटे निष्पक्ष हा दंभ कशासाठी
1 Oct 2016 - 8:30 pm | कैलासवासी सोन्याबापु
मी एकटा असा शब्दप्रयोग दाखवून द्या पूर्ण कॉमेंट मध्ये, उगाच जे मी बोललेलो नाही ते माझ्या तोंडी बसवू नका, निष्पक्ष बरेच आहेत/असतात त्यात काही चूक आहे असेही नसते, चष्मे काढा कळेल :)
1 Oct 2016 - 8:37 pm | नर्मदेतला गोटा
हा कसा कसरत विरहीत प्रतिसाद आला. बरं वाटलं
1 Oct 2016 - 8:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
असतं हो एकेकाचं, आम्ही रोजच कसरत करतो, अन मुख्य म्हणजे त्यात काही फार उदात्त आहे असेही आम्ही समजत नाही, फक्त बोलायला काही नसले की लोक कसे वैयक्तिक होऊन जातात, हे मात्र पाहायला जाम मजा येते. असो!
1 Oct 2016 - 9:04 pm | संदीप डांगे
बोलायला बरंच काही आहे हो, पण योग्य जागा कोणी देत नाही आहे इथे मिपावर हा मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे... क्या समझे?? ;)
1 Oct 2016 - 7:07 pm | नर्मदेतला गोटा
पाकी हल्ले पूर्वीही होत होते. मोदींच्या काळात पठाणकोटसारखे हल्लेही झालेच. पण काहीतरी ठाम उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. असे भारतीय लष्कराच्या आत्ताच्या प्रत्युत्तरावरून वाटते.
फक्त आपल्यालाच या देशाची चिंता आहे अशा आविर्भातून मोदी पर्रीकरांना सल्ले देणार्यांना एवढेच सांगणे आहे.
1 Oct 2016 - 7:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
असो, मोदी अन पर्रीकर हे त्राता भाग्यविधाता वगैरे आहेत असे मानणाऱ्या जनतेला सुद्धा सल्ले देऊनही उपयोग बसतो, म्हणून आमचा पास(च), ज्या गोष्टीसाठी मोदींना/पर्रिकरांना जितके कौतुक दिले गेले पाहिजे तितके दिले गेलेच पाहिजे, बाकी मनुष्याचा देव करणे आम्हाला तरी मान्य नाही, देव केलाच तर जनतेने गांधी-नेहरूंस देव करून झालेला गोंधळ विसरला आहे, असेच म्हणावे लागेल मला तरी.
1 Oct 2016 - 8:22 pm | नर्मदेतला गोटा
हो पण नाही म्हणजे हो म्हणजे नाही
म्हणजे अगदी १००% नाही पण म्हणजे थोडे तरी हो
इतकी कसरत का करताय
1 Oct 2016 - 9:01 pm | कैलासवासी सोन्याबापु
कसरत रोजच करायला लागते, तुम्हाला ती महत्वाची वाटत नसल्यास एक दिवस कार्यालयात जाताना गाडीचा तोल सांभाळायची कसरत करणे सोडून बघा! एका बाजूला झुकायचे सुंदर परिणाम दिसतील. बाकी ते दंभ वगैरे ऍड होमिनेम फाट्यावर :)