पाकिस्तानचे हल्ले आणि मोदी पर्रीकर

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
20 Sep 2016 - 5:33 pm

नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले. त्यापूर्वी संरक्षण मंत्री असलेल्या अरुण जेटली यांनीही संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणून स्वावलंबनाची सुरुवात केलेलीच होती. (त्या पूर्वीच्या लोकांनी याकडे साफ दुर्लक्ष केलेले होते) अजित डोवाल हेही अत्यंत अनुभवी आहेत. १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता. त्यामुळे हे हल्ले नैराश्यापोटी होत आहेत हे उघड आहे. तो देश अंतर्गत अडचणीतही आहेच. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आवश्यक होते. आपल्यावरचा राग भारताकडे वळवण्यात ते यशस्वी झालेत. पण हे काहीही लक्षात न घेता काही लोकांनी मोदी पर्रीकर यांनाच संरक्षण विषयात सोशल मेडियावर सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मेडियावर सल्ले देणे आणि देशाचा कारभार पाहणे यात फरक आहे.

एखादा एखादा हल्ला होणारच. पण नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर, अजित डोवाल हे जबरदस्त त्रिकूट आहे. ते निदान पाकिस्तानच्या बाबतीत नवा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाहीत. ही खात्री प्रत्येक भारतीयाने बाळगायला हवी आणि उथळपणे मोदी पर्रीकर यांना सल्ले देणे थांबवावे.

आम्ही निवडू ती वेळ आम्ही निवडू ते ठिकाण हे मनोहर पर्रीकर यांनी फार पूर्वीच सांगितलेले. त्याचा अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.

धोरणमत

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

20 Sep 2016 - 6:03 pm | आजानुकर्ण

ओके गोटा. लक्षात घेतले आहे.

(सूज्ञ) आजानुकर्ण

फेदरवेट साहेब's picture

20 Sep 2016 - 6:08 pm | फेदरवेट साहेब

एखादा एखादा हल्ला होणारच.

अतिशय बेजबाबदार, दुर्दैवी, अन राजकीय चुकांना पाठीशी घालणारे विधान. पूर्ण लेख फक्त प्रचारकी तर आहेच, हे वाक्य अक्षरशः दुर्दैवी आहे. ज्या रीतीने हा हल्ला 'एखादा' म्हणून भलामण केली जाते आहे ते हीन आहे. लिहिणारा बसून कळफलक बडवत बसतो अन १८ लोक जीवनाशी जातात. काय बोलणार राव, हा लेख(?) म्हणजे अश्लाघ्य प्रकार आहे.

संपादक मंडळ कृपया लक्ष द्यावे वेळीच ही एक नम्र विनंती.

(उद्विग्न)

ढेल्या

पुंबा's picture

20 Sep 2016 - 6:17 pm | पुंबा

++१००

आजानुकर्ण's picture

20 Sep 2016 - 6:34 pm | आजानुकर्ण

त्यांची आधीच्या लेखातली 'चमत्कारी' विचारसरणी लक्षात घेता तुम्हाला याचं आश्चर्य वाटावं याचंच आश्चर्य वाटतंय. इतिहास बघा की एकदा!

अशोक पतिल's picture

20 Sep 2016 - 11:05 pm | अशोक पतिल

बडे बडे शहरो मे छोटी छोटी घटनाये होती रहती हे .
आठवले का ?

पुंबा's picture

20 Sep 2016 - 6:16 pm | पुंबा

१. लोकांनी सल्ले देणे थांबवावे. का? या देशाचे नागरीक या नात्याने मिळालेला तो अधिकार नाही का?
२. एखादा एखादा हल्ला होणारच. धन्य आहात. भक्ती ओसंडून वाहते आहे.

काय राव, कशाला कायपण खरडताय

साहना's picture

20 Sep 2016 - 6:56 pm | साहना

समरी :

मोदी म्हणजे साक्षांत विष्णूचा अवतार आणि पर्रीकर म्हणजे सर्वज्ञानी ब्रहस्पती इन हाऊस. संघाच्या मुशीतून घडलेल्या ह्या दोन पुण्यपावन विभूती भारत सरकारला मिळाव्या हे आमच्या सारख्या किड्या मुंग्या लोकांचे भाग्य होय.

मोदी आणि पर्रीकर ह्यांचा मेंदू चाणक्याच्या हि दोन पावले पुढे चालतो. आमच्या सारख्या सामान्य जणांना त्यांचे हायपर-चाणक्यन डावपेच समजणे शक्य नाही म्हणून आम्ही गप्प बसावे.

वैदिक शक्ती वापरून मोदी एक दिवस पाकिस्तानवर हलकेच ब्रम्हास्त्र सोडतील किंवा मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला तसे आपण सगळे हिंदू आहोत हे पाकिस्तानी मुस्लिमाना समजून ते अखंड भारतांत परत येतील.

थोडक्यांत : मोदी महाराज कि जय

संदीप डांगे's picture

20 Sep 2016 - 7:00 pm | संदीप डांगे

दिल्से शम्त! =))

रॉजरमूर's picture

21 Sep 2016 - 3:46 pm | रॉजरमूर

वाल्याचा वाल्मिकी .......?

मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला

बापरे .... तेच का हे जे सध्या रोज एक नवीन अस्त्र आणून मिपा वर आदळवतायत .

ईश्वरसर्वसाक्षी's picture

20 Sep 2016 - 7:39 pm | ईश्वरसर्वसाक्षी

साहना मँडम पार्टी मे चेंज क्या !

मजाक कर रहे हो क्या ? आम्ही कुठे ह्यांच्या बौद्धिक वर्गांत होतो ?

नर्मदेतला गोटा's picture

20 Sep 2016 - 8:46 pm | नर्मदेतला गोटा

एखादा हल्ला

एका दिवसात सगळं संपेल ही अपेक्षा आहे का

आपल्याला जे कळतं ते या लोकांना मोदी डोवाल पर्रीकर या त्रिकुटाला

कळत नसेल ते गप्प बसून असतील हे तर अशक्य आहे

राज्यमंत्री सुद्धा वी के सिंग आहे माजी लष्कर प्रमुख

नर्मदेतला गोटा's picture

29 Sep 2016 - 3:06 pm | नर्मदेतला गोटा

हे आम्ही आधी म्हटले होते. त्यावेळी अनेकांनी आम्हास गंभीरपणे घेतले नाही.

आतिवास's picture

20 Sep 2016 - 9:46 pm | आतिवास

लिहिलं आहे.
वेळ, काळ, प्रसंग तरी पाहणार की नाही?
थोडं तरी तारतम्यय राखा अशी हात जोडून विनंती.
धन्य ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

आतिवास's picture

20 Sep 2016 - 9:52 pm | आतिवास

तारतम्य

नर्मदेतला गोटा's picture

20 Sep 2016 - 10:20 pm | नर्मदेतला गोटा

अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय. उद्या हे सल्ले देणारे लोकच तक्रार करतील मोदी युद्धखोर आहेत म्हणून. निष्पाप पाकिस्तान्यांचे जीव जात आहेत.

अमु१२३'s picture

21 Sep 2016 - 8:54 am | अमु१२३

निष्पाप पाकिस्तान्यांचे जीव जात आहेत.

संदीप डांगे's picture

21 Sep 2016 - 9:00 am | संदीप डांगे

गोटा साहेब, जेव्हा नमो ममोला असे सल्ले देत होते, तेव्हा कुठे गेला होता राधासुता, तुझा धर्म?

सुबोध खरे's picture

29 Sep 2016 - 10:26 pm | सुबोध खरे

डांगे साहेब आता आपले काय म्हणणे आहे.

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 11:27 pm | संदीप डांगे

माझे काय म्हणणे आहे ते इतर धाग्यांवर आधीच मांडलेले आहे. आता तुम्ही विचारतच आहात तर नर्मदेचा गोटा ह्यांनी मांडलेल्या खालील विधानांवर प्रश्न विचारायला हवा, जो मी आधीच विचारला होता.

"अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय."

सुबोध खरे's picture

30 Sep 2016 - 9:54 am | सुबोध खरे

"नमो" नि "ममो" ना नुसते सल्ले दिले नाहीत तर जे करायचे ते करून दाखविले आहे. "तेंव्हा राधासुता तुझा धर्म कुठे गेला होता" हे आपले विचारणे अप्रस्तुत आहे यात शंका नाही.

संदीप डांगे's picture

30 Sep 2016 - 10:31 am | संदीप डांगे

आता?? हल्ले झाल्यावर विचारला नाही हो तो प्रश्न, आधीच विचारला होता व तो हि वर उल्लेखित वाक्याच्या अनुषणगाने ज्यात नमोची वकिली करण्याचा प्रयत्न होता,

नर्मदेतला गोटा's picture

30 Sep 2016 - 12:03 pm | नर्मदेतला गोटा

पूर्वीचे राज्यकर्ते आणि आत्ताचे यामधे काही फरक असेल की नाही

या लोकांचे इरादेच वेगळे आहेत. पूर्वी संरक्षण खाते हे भ्रष्टाचाराने लडबडलेले असायचे. कोण मंत्री होते नावे पहा. तुलनेने पर्रीकर वी के सिंग डोवाल मोदी ही टिम अधिक ठाम आहे.

ही टिम छिद्रान्वेषी भारतीयांना ते निमित्त देणार नाही. सध्याची विदेश निती ही सुद्धा पूर्ण पणे वेगळी आहे.

विशुमित's picture

30 Sep 2016 - 5:33 pm | विशुमित

आताची विदेश नीती कशी वेगळी आहे ते समजू शकेल का ?

खटपट्या's picture

1 Oct 2016 - 1:08 am | खटपट्या

मी काही विदेशनीतीचा तज्ञ वगैरे नाही पण पूर्वी जे दीसायचे ते सांगतो.
- देशातील अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेउन सर्व खांग्रेस सरकारे इस्रायलशी फटकून वागली. यासर अराफत यांच्याशी मैत्री. पॅलेस्टाइनला उघड पाठींबा
- पाकीस्तानच्या बाबतीत नेहमीच सर्व खांग्रेस सरकारांनी बोटचेपी भुमिका घेतली.
- चीनला भारताची भीती वाटेल अशी कोणतीही चाल अ‍ॅक्शन घेतली नाही. तीबेटला पाठींबा देउन आपण कुरघोडी करु शकलो असतो. आता खूपच उशीर झाला आहे. लोकांना तीबेट हा देश होता हेही माहीत नसेल.
- पाकव्यात्प काश्मीर आणि अक्साइ चीन ही दोन्ही भीजत घोंगडी तशी ठेवली
अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता.

विकास's picture

1 Oct 2016 - 5:44 am | विकास

+१ अर्थात सहमतच पण माझ्या मते किंचीत दुरूस्ती...

अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता.

भारतीय लष्करावर जनतेचा विश्वास आहे. पण लष्कराचे हात आधीच्या सरकारांनी बांधले होते हे यातील दुर्दैव होते... हे केवळ काँग्रेस आणि बिगर भाजपा राज्यातच झाले नाही तर वाजपेयी सरकारच्या वेळेस पण झाले. कदाचीत त्यावेळेस त्यांची आघाडीमुळे असहाय्यता असेल असे म्हणता येईलही कारण एकूण त्या सरकारचे अल्पसंख्यांकांशी संबंधीत राजकारण नव्हते. तरी देखिल हे खटकण्यासारखे होतेच. आत्ता नशिब भाजपाला पूर्ण बहुमत आहे आणि कितीही कावकाव केली तरी या संदर्भात शिवसेनेने त्यांना साथच दिली असती.

मला कधी काळी वाचले त्यावरून जे आठवते त्याप्रमाणे (आणि चुकीचे असले तर अवश्य दुरुस्ती करावीत): ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेस देखील सैनिकांच्या पहील्या तुकडीस (अक्षरशः का कसे ते माहीत नाही पण) शस्त्र खाली ठेवून सुवर्णमंदीराच्या आवारात आत लपून बसलेल्या अतिरेक्यांना शरण येण्यासाठी विनंती करायला लावली होती. अर्थात त्याचा काय परीणाम झाला हे सांगायची गरज नाही. पण तसे घडले कारण भारतीय लष्कर हे राजकीय नेतृत्वाच्या आदेशानुसारच चालते म्हणून आणि तो सगळ्यात मोठा आणि स्वागतार्ह भाग आहे.

थॉर माणूस's picture

20 Sep 2016 - 10:53 pm | थॉर माणूस

शाखेतल्या पोरांना द्यायचे बौद्धिक चुकून इकडे प्रकाशित केलेत काय?

नर्मदेतला गोटा's picture

20 Sep 2016 - 11:36 pm | नर्मदेतला गोटा

शाखेतल्या पोरांना

अटलबिहारींसारखे प्रधानमंत्री आणि अडवाणींसारखे केंद्रीय मंत्री शाखेवरच घडले ना
शाखेला कमी लेखण्याचे काय कारण

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Sep 2016 - 11:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख थुकाड आहे ह्यात शंका नाही. कोणत्या शाखेत देतात म्हणे हे बौद्धिक? नै म्हणजे जवळ जवळ ७-८ वर्षं शाखेत जाउन पण आमच्या शाखेत असं काही बौद्धिक दिलं नव्हतं बॉ!!! आता वेळेअभावी जाता येत नाही नाहितर सद्ध्या शिकवतात का काय पहाता आलं असतं.

असं करा जरा पित्तनाशक काढ्याच्या चार वाट्या घ्या बरं म्हणजे कोरड्या ओकार्‍या थांबतील.

फेदरवेट साहेब's picture

21 Sep 2016 - 12:28 pm | फेदरवेट साहेब

पित्तनाशक काढ्याची गरज दोन्ही पक्षांना समसमान आहे.

असो. घेणार कुठलाच पक्ष नाहीये तो काढा

श्रीगुरुजी's picture

21 Sep 2016 - 12:01 am | श्रीगुरुजी

कायअप्पावर अशाच अर्थाच्या अनेक फालतू पोस्ट्स फिरताहेत. त्या बघून डोकं फिरलंय.

प्रान्जल केलकर's picture

21 Sep 2016 - 9:55 am | प्रान्जल केलकर

आचरट लेख आणि त्या वरची आचरट प्रतिसाद. मस्त चालू आहे. तसाही व्ही. के. सिंघ नि सांगितलंच आहे कि कोणाला पाकिस्तानवर कसा हल्ला करायचा याची काही माहिती असेल तर जरूर कळवा जरूर समजावा तसं का नाही करत तुम्ही सगळे लोक?
१८ जवान शाहिद झालेत. तुम्ही अजून मोदी आणि पर्रीकर याच्याच भोवती घोटाळणार का (आता मी पण भक्त) पाकिस्तान नि हल्ला केला कि लगेच आपण हल्ला करू शकतो का?
लेख लिहिणार महान आणि त्याला प्रतिसाद देणारी जनता पण महान. आपण सामान्य जनता आहोत हेच तुम्ही विसरताय का ???
सीताराम येचुरी सारखा कट्टर कम्युनिस्ट नेता म्हणतोय या हल्ल्याबाबत जी काय कारवाई सर्कार करेल त्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहू. हि एकात्मता त्यांना कळली आणि तुम्हाला काळात नाही हेच दुःख आहे.

नर्मदेतला गोटा's picture

21 Sep 2016 - 12:11 pm | नर्मदेतला गोटा

तुम्ही तेच लिहीताय तर इतरांना आचरट का म्हणताय

आनन्दा's picture

21 Sep 2016 - 11:38 am | आनन्दा

साष्टांग दंडवत.

नर्मदेतला गोटा's picture

21 Sep 2016 - 12:12 pm | नर्मदेतला गोटा

ब्रह्मदेशात हल्ला केला तेव्हा याच लोकांनी उलट टिका केली होती

संदीप ताम्हनकर's picture

21 Sep 2016 - 12:44 pm | संदीप ताम्हनकर

म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची.
तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.

पोलीस पण मार खाऊ लागले आजकाल

श्रीगुरुजी's picture

21 Sep 2016 - 2:53 pm | श्रीगुरुजी

म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची.
तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.

त्याचं काय आहे ताम्हनकर साहेब, तुम्ही देत असलेल्या कराच्या पैशातून सैनिकांचं घर चालतं; त्यांचा गणवेष, पगार, बूटमोजे, शस्त्रे इ. तुम्ही दिलेल्या करांच्या पैशातून येतात. तुमच्या जीवावर तर सैन्य उभं केलंय. तुमचा कर थोडासा कमी पडतोय. त्यामुळे शस्त्रे, बंदुका, गोळ्या वगैरे कमी पडताहेत. उद्यापासून थोडा जास्त कर देत जा. म्हणजे परत अशी वेळ येणार नाही.

किंवा मग असं असेल की सैनिकांना हल्लेखारांना मारलं तर तुमच्यासारखे निधर्मी, प्रागतिक, मानवतावादी आणि पुरोगामी विचारवंत, सैन्याने मानवधिकारांचं उल्लंघन केलं म्हणून गावभर बोंब ठोकतील. त्या भितीने सैन्याने हल्लेखोरांना प्रतिकार केला नसावा.

संदीप ताम्हनकर's picture

21 Sep 2016 - 8:46 pm | संदीप ताम्हनकर

बिगरी गुरुजींनी वैयक्तिक घेतलंय जुन्या पोस्टमधून ते असो. पण 'सैनिक संरक्षण बल' व्हायला पाहिजे अशी चर्चा आहे यावर काय? किंवा सैन्याचे मनोधैर्य वाढवायला एखादे 'बौद्धिक' तरी नक्कीच घेतले पाहिजे. मग "सैन्याने भीतीने प्रतिकार केला नसावा" अशी वेळ येणार नाही.

साहना's picture

21 Sep 2016 - 9:58 pm | साहना

रामरक्षा शिकवावी

नर्मदेतला गोटा's picture

22 Sep 2016 - 3:32 pm | नर्मदेतला गोटा

?

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Sep 2016 - 2:45 pm | श्री गावसेना प्रमुख

असे विधान करणार्या आय डी नां सरहद्दी वर पाठवल पाहीजे त्याने काय व्हायच कि लष्कराची हानी होणार नाही.

सरकारला सगळ्यात जास्त धोका अशा मंद भक्तांकडून आहे. असल्या फालतू पोस्ट टाकून उगाच सरकार वरचा रोष वाढवत आहेत.

> १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता

हि १५ ऑगस्ट ची भाषणे फक्त भाषणे असतात ह्यांना आम्ही भारतीयच काडीची किंमत देत नाही जग काय डोंबल किंमत देईल ? भारतीय प्रधानमंत्रीची भाषणे ऐकून एकटे पाडले असते तर मग आणखीन काय हवे ?

लहान मुले , नोकर आणि बाबूलोग ह्यांना जनतेच्या पैश्यांची लाल किल्ल्यावर आणायचे आणि ठोकायचे भाषण, द्यायचे गरीब जनतेला आणि गुलामांना फुकटचे सल्ले. फक्त भाक मंडळींनीच असल्या गोष्टीवर टाळ्या पिटाव्या.

नर्मदेतला गोटा's picture

23 Sep 2016 - 11:09 am | नर्मदेतला गोटा

तुम्ही गेला होता काय लाल किल्यावर

मग तुम्हाला कसं माहिती

विशुमित's picture

23 Sep 2016 - 11:23 am | विशुमित

मध्यंतरी चहा प्यायला गेले होते शेजाऱ्यांच्या घरी, काय काय फायदा झाला, जरा इस्कुटून सांगता का ?

संदीप ताम्हनकर's picture

23 Sep 2016 - 1:19 pm | संदीप ताम्हनकर

भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय. आपण कसे घरून अथवा फोनवरूनच कीबोर्ड बडवून लष्कराचे मनोधैर्य वाढवतो यातच अनेक लोकांना मोठेपणा वाटतो. आर्मीच्या टीकाकारांना देशद्रोही आणि अंतर्गत शत्रू ठरवून आपण समाजमाध्यमात कसे चोप देतो ही अशा लोकांची मोठी देशसेवा आणि त्याची फुशारकी असते. प्रत्यक्षात आर्मीच्या गलथानपणाविषयी प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. उरी हल्ल्यासारख्या घटना घडतात तेव्हाच तर असे प्रश्न विचारले जाणारच. आत्तासुद्धा आर्मीचे गुणगानच करत राहायचे हा भाबडेपणा आहे.
प्रत्यक्ष देशाचे संरक्षणमंत्री लष्करात सगळे काही आलबेल नाही, काही गफलती झाल्या आहेत अशी देशासमोर कबुली देत आहेत. अनेक चुका समोर येत आहेत. असे असले तरीही भक्त अतिराष्ट्रवादी त्यांचा आर्मीआरतीचा अजेंडा सोडायला तयार नाहीत. अशा लोकांनी त्यांचा लष्करप्रेमाचा पान्हा थोडा नियंत्रित करावा किंवा सध्या बाटलीत पिळून शीतपेटीत ठेवावा आणि खरंच कौतुकाची वेळ आली तर बाहेर काढावा अशी विनंती.
प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आपल्याविरुद्ध पाकिस्तान असे प्रकार गेली अनेक वर्षे करतोय आणि असेच पुढे करत रहाणार. प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या अशा दहशतवादी, फ़िदायीन, अप्रत्यक्ष युद्धाविरुद्ध भारतीय संरक्षणदलांनी कोणती परिणामकारक रणनीती शोधून काढली आहे आणि दृश्य स्वरूपात वापरली आहे? उत्तर शून्य आहे. कोणत्या पक्षाचं सरकार आहे किंवा होतं हा मुद्दाच नाही. आर्मी तर तीच आहे आणि त्यांच्यापुढील आव्हानेही तीच आहेत.
केशव ब्रेसलेट उपाध्ये किंवा सत्ताधारी पक्षाचे इतर प्रवक्ते ज्या 'म्यामा' (त्यांचाच उच्चार आहे) मधील क्लीनिकल ऍक्शन / हॉट परसूट / स्ट्रॅटेजिक अड्वान्समेंट वगैरेचे जे ढोल बडवतात ते तसे एकमेव उदाहरण आहे, ते सुद्धा ब्रह्मदेशाविरुद्ध आणि त्या देशाच्या संमतीने, त्यांच्या बंडखोरांविरुद्ध.
लष्करातील वरिष्ठ केवळ सामुग्रीखरेदीकेंद्रित काम करतात, सैनिक योग्य नेतृत्व नसल्याने जसा दिवस येतो तसा दिनचर्येनुसार घालवतात असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव कोणालाच नाही कारण कारगिल नंतर एक पिढी गेली आहे. संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे. गडकरी त्यांच्या स्वभावप्रकृतीला अनुसरून संरक्षणविषयक प्रश्नांसंबंधी परिणामकारक पावले टाकतील असे वाटते. पर्रीकर स्वच्छ आहेत, भ्रष्ट नाहीत आणि त्याचा फायदा भारताला भ्रष्ट्राचारमुक्त पायाभूत सुविधा विकासासाठी होईल. सर्वज्ञ नरेंद्र मोदी लवकरच अशी शस्त्रक्रिया करतील अशी अशा आहे.

पैसा's picture

23 Sep 2016 - 1:21 pm | पैसा

संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे.

टाळ्या! =)) त्यापेक्षा तुम्हाला संरक्षणमंत्रीच काय पंतप्रधान का करू नये?

अफझल खानाचे उदात्तीकरण धाग्यानंतर हा धागा मानाचे पान राखून आहे असे नम्र निरिक्षण.

हेमन्त वाघे's picture

1 Oct 2016 - 9:17 am | हेमन्त वाघे

लिंक मिळेल का?

नाखु's picture

1 Oct 2016 - 9:25 am | नाखु

ही घ्याआणि आमची त्यात दोन पैशाची प्रतिसाद फुले आहेत तीही वाचा.

त्या धाग्याने तुमचा आजचा दिवस सत्कारणी लागेल्,जीवनात विनोद का असावा त्या साठी तरी वाचाच.

हेमन्त वाघे's picture

1 Oct 2016 - 5:10 pm | हेमन्त वाघे

रमेश मंत्री यांनी एक याच प्रकारचा विनोदी लेख लिहिला होता .
त्यानं अफझल खान "मावळातील शेती" या विषयावर परिसंवाद करायला महाराजांना भेटला - - आणि पुढचे आटवत नाही ..

आपण उंदीर मारण्याच्या खात्यात आहात काय?

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Sep 2016 - 3:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

अननुभवी पंतप्रधान असल्यामुळेच सगळा घोळ होत चाललाय त्यामुळे त्यांना ह्टवावे अन अनुभवी मंडळींच्या हाती सत्ता द्यावी का? असा प्रश्न विचारायास हवा.

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2016 - 3:15 pm | श्रीगुरुजी

पर्रीकर, मोदी, सैन्यदलाचे प्रमुख इ. सर्वांना घालवून संदीप ताम्हनकर यांना भारताचे पंतप्रधान, भारताचे संरक्षणमंत्री, तीनही सैन्यदलांचे प्रमुख अशा सर्व पदांवर नेमावे असा ठराव मी मांडत आहे.

संदीप ताम्हनकर's picture

23 Sep 2016 - 8:18 pm | संदीप ताम्हनकर

श्री बिगरी गुरुजींनी पर्सनल होऊ नये. प्रत्येकालाच तुमच्यासारख्या हीन आणि दर्जाशून्य प्रतिक्रिया देता येतात. जमल्यास विचारांचा प्रतिवाद प्रतिविचाराने करावा.

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2016 - 11:39 pm | श्रीगुरुजी

बरोबर. तुमच्यासारख्या अत्यंत अभ्यासू व दर्जेदार प्रतिक्रिया फक्त तुम्हालाच देता येतात. इतरांना ते शक्य नाही.

नर्मदेतला गोटा's picture

23 Sep 2016 - 4:26 pm | नर्मदेतला गोटा

आता सांगा भक्त कोण

बोका-ए-आझम's picture

23 Sep 2016 - 5:09 pm | बोका-ए-आझम

केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.

अर्थात. पण पर्रीकर या सगळ्या गोष्टींमुळे संरक्षणमंत्री झाले असं आपलं म्हणणं आहे का? शिवाय तुम्ही काय क्वालिफिकेशन होऊ शकत नाही, ते सांगताय. काय क्वालिफिकेशन हवंय हे सांगतच नाही आहात.

आजानुकर्ण's picture

23 Sep 2016 - 7:09 pm | आजानुकर्ण

मस्त प्रतिसाद.

भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय.

पर्रिकरांविषयी प्रश्न निर्माण करणे हेही एक महद्पाप असल्याचे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.

नितिन थत्ते's picture

23 Sep 2016 - 9:16 pm | नितिन थत्ते

संपादकांचे गाववाले आहेत ते !!

पैसा's picture

23 Sep 2016 - 10:09 pm | पैसा

मिपा संपादकांपैकी कोणी गोव्याचे असल्याचे माहित नाही बा!

नितिन थत्ते's picture

23 Sep 2016 - 10:16 pm | नितिन थत्ते

अर्रर्रर्र

असं झालं का ?

आजानुकर्ण's picture

23 Sep 2016 - 10:29 pm | आजानुकर्ण

:)))

यशोधरा's picture

29 Sep 2016 - 10:21 pm | यशोधरा

केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.

बुफेच्याच काय बसच्याही रांगेत उभ्या राहणार्‍या, जुन्या घरात राहून पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणार्‍या भारतीय अभियंता संरक्षणमंत्र्याने पाकिस्तानला चांगलीच चपराक दिली आहे!

अजया's picture

23 Sep 2016 - 2:18 pm | अजया

=))))

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2016 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

भावनवशतेने केलेली विधाने, सामरिक तत्वे व सद्य परिस्थिती बाजूला ठेवून केलेली विधाने आणि संयमित माहितीपूर्ण विधाने यांच्या गर्दीत आता केवळ विनोदबुद्धीने केलेल्या विधानांचीही भर पडत आहे.

त्यामुळे, धाग्याकडे "गंभीर चर्चा म्हणून पाहिले जात आहे" की त्याहून जास्त उच्च विचारमंथन म्हणजेच "दुपारच्या चहाचा घुटका घेत ओबामा, मोदी, पुतीन यांना जग चालवण्यासंबंधीचे सल्ले देणे चालू आहे"; याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

२०१९ पर्यन्त मुदत आहे. ही वेळ त्या पुर्वी येईल अशी आशा आहे

आजानुकर्ण's picture

23 Sep 2016 - 7:18 pm | आजानुकर्ण

ह. घ्या बरं का.
मोदी

नितिन थत्ते's picture

23 Sep 2016 - 9:15 pm | नितिन थत्ते

आणखी एक....

१७ जवान मेले म्हणून ठीक; एखादी गाय मेली असती ना; तर मग पाकिस्तानची काही खैर नव्हती !!

नर्मदेतला गोटा's picture

24 Sep 2016 - 1:02 am | नर्मदेतला गोटा

:)

विकास's picture

29 Sep 2016 - 10:11 pm | विकास

वरील विधान आणि विडंबनचित्र मला वाटते सर्जिकल स्ट्राईक नंतर असंबद्ध (irrelevant) ठरले आहे असे वाटते. असो. आपल्या अशा प्रकारच्या आनंदावर मोदींनी विरझण लावल्याबद्दल.... जाउंदेत, स्वागतच करतो! ;)

सुबोध खरे's picture

29 Sep 2016 - 10:30 pm | सुबोध खरे

बेताल विधाने करुन काही जणांनी आपले हसे करून घेतले आहे.

आजानुकर्ण's picture

30 Sep 2016 - 1:22 am | आजानुकर्ण

अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. नाहीतर तोपर्यंत 'कडी से कडी निंदाच' चालू होती. सोशल मीडियावर सगळा शिमगा सुरु झाल्यावर आता पाऊल उचलणे क्रमप्राप्तच होते. पण मोदींनी विरजण घातल्यानंतर का होईना पाकिस्तानचे नाक ठेचले जात असेल तर आनंदच आहे.

विकास's picture

30 Sep 2016 - 2:12 am | विकास

अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत.
वरील वाक्यावर आधारीत कल्पना (काल्पनिक) विस्तार करण्याचा मोह टाळता येत नाही, म्हणून करत आहे... :)

पठाणकोट आणि नंतर उरी येथे हल्ला झाल्यावर देखील पंतप्रधान मोदी आपले फारीनच्या ट्रिपा आणि मनकी बाते करत पाकीस्तानला मित्रो म्हणत बसले होते. बाकी आपले सन्माननीय गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्री देखील आलेला दिवस पुढे ढकलत आणि अजित देओल कदाचीत व्हिडीओ गेम खेळून युद्धच खेळत आहोत अशी समजूत करून निवांत बसले होते. सगळ्यांनी विचार केला. काय करायचे आहे आपल्याला? आपला देश शांतताप्रिय आहेच. गेले कित्येक वर्षांची अशा हल्यांनंतर काही न करण्याची सवय देखील सरकार आणि जनतेला आहे. आणि त्यात गैर तरी काय? पाकीस्तानी झाले म्हणून काय झाले? ते देखील आपले बांधवच तर आहेत! त्यामुळे आता नऊ दिवस-रात्र उपास करायचा असला तरी नवरात्र आणि दिवाळीच्या तयारीला लागलेले उत्तम असे या सगळ्यांना वाटत होते. पण तेव्हढ्यात समाजमाध्यम म्हणून एक मोठ्ठी माशी शिंकली!

अशाच ट्वीट करत असताना मोदींच्या लक्षात आले की पब्लीक चिडले आहे. सुषमा स्वराज यांना कोणी पासपोर्ट-विसा साठी विचारण्याऐवजी उरी वरून भारत-पाक संबंधांवरूनच विचारू लागले. तेव्हढ्यात (मराठी येत असल्याने) पर्रीकरांनी मिसळपावचा हा धागा उघडला आणि कय म्हणता महाराजा? जनतेचा रोष पाहून एकदम घाबरूनच गेले की राव! मग शेवटी २९ च्या दुपारी बारा वाजता सर्वजण आपापले डबे घेऊन जेवायला बसले. जेवताना गप्पा मारत असताना लक्षात आले की प्रत्येकजणालाच जनतेचा दट्ट्या दिसत/लागत आहे... म्हणून मग काहीतरी केलेच पाहीजे. म्हणून मग मोदी-पर्रीकरांनी सैन्याला सांगितले की जारे जरा सीमेपलीकडे जाऊन या...

मग सैनिकांनी पण हातातला पत्त्यांचा डाव टाकला आणि गेले सीमेच्या पलीकडे. बाकी जे काही झाले ते आता पाकव्याप्त काश्मिरच्या भुगोलाचा आता एक इतिहास आहे! :)

खरच इतके सोपे होते का?

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2016 - 9:02 am | पिलीयन रायडर

अगदी अगदी!!

ह्यांनी दट्टे लावले की रात्रीतुन बसुन प्लान करुन ही कारवाई केली असल्या खुळ्या कल्पना आहेत की काय लोकांच्या..

टीका करा, पण जे चांगलं केलंय ते मान्य करायचा मोठेपणाही दाखवा की..

साहना's picture

30 Sep 2016 - 2:32 am | साहना

“The condition upon which God hath given liberty to man is eternal vigilance.”

सरकारवर सतत दडपण आणणे स्वातंत्र्य प्रेमी नागरिकांचे मुख्य कर्तव्य आहेत. मोदी-भक्ती हा त्याला पर्याय नाही. मोदींच्या पाकिस्तान विषयक निर्णयाने सर्वच सुजाण नागरिकांना आनंद झाला आहे. अश्याच प्रकारे इतर विषयांवर (शैक्षणिक गळचेपी, मंदिरांच्या संपत्तीवरील सरकारी नियंत्रण, इत्यादी इत्यादी) आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे.

सुबोध खरे's picture

30 Sep 2016 - 10:02 am | सुबोध खरे

आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे.
काय म्हणताय?
आरक्षण रद्द होणार? ऍट्रॉसिटी चा कायदा रद्द होणार?काही कोटींचा/ लाखांचा जमाव एकत्र होतोय म्हणून.
अर्थात रस्त्यावरच्या माणसाला कोण विचारतोय? तो दबाव काहीच नाही.
पण व्हॉट्स अँप ट्विटर आणि फेसबुकवरच्या दबावापुढे हा दबाव म्हणजे किस झाड कि पत्ती. कारण तो सुशिक्षित मानवतावादी सेक्युलर लोकांचा दबाव होता म्हणजे त्याचे वजन कितीतरी जास्त होते. म्हणूनच मोदी साहेबानी लष्कराला सीमापार जायचा हुकूम दिला
हो कि नाही साहना ताई?

साहना's picture

1 Oct 2016 - 7:14 am | साहना

ठीक आहे !

ओम शतानन्द's picture

23 Sep 2016 - 8:23 pm | ओम शतानन्द

११११११११

दिगोचि's picture

24 Sep 2016 - 5:37 am | दिगोचि

रेडिफ डॉट कॉम या सन्केत स्थलावर आलेल भद्रकुमार यान्चा आलेला ब्लॉग सन्तप्त भारतीयानी जरुर वाचावा. त्यात त्यानी अमेरीकेचे याबाबतीत काय म्हणणे आहे हे समजावून सान्गितले आहे. भद्रकुमार हे भारताचे वकील म्हणुन २९ वर्षे कार्यरत होते. पाकिस्तानला नमवण्यासाठि अनेक मार्ग आहेत त्यातली एक म्हणजे सर्व भारतीयानी सक्शम राहून आपापली कामे केली पाहिजेत व नियम पाळून राहिले पाहिजे दुसरा मार्ग म्हणजे भारताने पाकिस्तान्ला दिलेला एमएफएन स्टेटस काढून घेतला पाहिजे. तसेच भारतीय लष्कराने पण आपण काय करत आहोत व केले आहे याचा आढावा घेतला पाहिजे.

नर्मदेतला गोटा's picture

24 Sep 2016 - 11:25 pm | नर्मदेतला गोटा

लिन्क द्या ना

बोका-ए-आझम's picture

24 Sep 2016 - 9:59 am | बोका-ए-आझम

मोदींनी इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना नुसतं सांगितलं जरी - की पाकिस्तानवर हल्ला केल्यावर ATKT माफ होईल, तर आपले विद्यार्थी जाऊन पाकिस्तानला आग लावून येतील. हाकानाका!

पैसा's picture

24 Sep 2016 - 3:45 pm | पैसा

=)) =)) =))

संजय पाटिल's picture

24 Sep 2016 - 4:55 pm | संजय पाटिल

इंजनेरोको क्या समझे तुमे?

काळा पैसेवाल्यांना ऑफर दीली पाहीजे. "दहा टक्के सैन्यासाठी द्या, ९०% पांढरे करुन मिळतील."

रघुनाथ.केरकर's picture

30 Sep 2016 - 12:23 pm | रघुनाथ.केरकर

जबरा प्रतीसाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2016 - 3:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

.

(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात
(आ) काही किलोमीटर आतवर घुसून
(इ) त्याला पत्ता न लागू देता
(ई) त्याचा पत्ता काटून
(उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि
(ऊ) दुसर्‍या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.

अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण...
(अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा
(आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :)

*******************************************

"आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्‍यांचे मी अभिनंदन करतो !

कारण...

अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत.

"हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले.

इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;)

त्याबरोबरच...

आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...
भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)