संघः कलियुगातील एक चमत्कार

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
12 Sep 2016 - 1:26 pm

संघ आणि त्याचे टिकाकार

साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.

आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.

समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.

इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.

खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.

आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.

शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.

तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.

म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला

समाजमत

प्रतिक्रिया

राही's picture

15 Sep 2016 - 11:14 pm | राही

कोणीही बोलू शकतो, पाठिंबा देऊ शकतो, विरोधही करू शकतो.
बोलण्याचा आणि न बोलण्याचा अधिकार प्रतिसादकर्त्याकडेच राहाणार. तुम्ही कितीही 'बोला, बोला' म्हणून म्हटले तरी न बोलण्याचा अधिकार आणि तुम्ही आग्रह नाही केला तरी बोलण्याचा अधिकार. दोन्ही.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

संघ मला आजूबाजूच्या परिसरात कुठे सक्रिय दिसत नाही हे तर खरेच पण तेवढाच issue नाहीये. तो अप्रत्यक्षपणे समाजाच्या अधोगतीस कारणीभूत ठरतो आहे हा अधिक मोठा सल आहे

अधोगतीस? तो कसा काय? जरा स्पष्ट करून सांगा की संघामुळे समाजाची अधोगती कशी झाली ते.

माझ्या मनात. सन 1993 पासून आपल्या शहरांत (निदान मुंबईत तरी नक्कीच) तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले आणि मोठ्या प्रमाणात उत्सवांना सुरुवात झाली. गणपती तर आधीपासूनच गोंगाटमय होते. त्यात दुर्गापूजा, माघी गणपती, शिवरात्री, अशांची भर पडली. उदा. ह्या वर्षी प्रथमच आमच्या भागात माघी गणपतीला गणपती बसवला गेला आणि त्यासाठी स्टेशनकडे जाण्यासाठी जेमतेम दोन फूट सोडून बाकी सर्व जागेत स्टेज उभारले गेले. मग मंडप, लाऊड स्पीकर्स, प्रचंड आवाज, ट्रॅफिक जॅम हे सगळे आलेच. ह्यास आळा घातला गेला नाही तर हे प्रकरण हाताबाहेर जाईल. आळा कोण घालणार म्हणा? चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे श्रद्धेचे बाजारीकरण होतेय, हिंदू धर्मापासून लोक दूर जाण्याचा धोका आहे, हिंदू धर्माबद्दल आणि हिंदूंबद्दल एक नेगेटिव्ह इमेज निर्माण होते आहे, परिणामी, ज्या हिंदू धर्माबद्दल संघ इतका भरभरून बोलतो त्या हिंदू धर्माचेच नुकसान होणार आहे, ह्याचे भान जर संघाच्या मान्यवरांना नसेल तर पुढे काही बोलण्याजोगे नाही. आणि जर असेल तर ते इतके हतबल आहेत का हे गैरप्रकार रोखण्यास? तसे असेल तर माझा मुद्दा आपोआप सिद्ध होतो.

हे सर्व उत्सव संघाने सुरू केलेले नाहीत. संघ फक्त २ उत्सव सार्वजनिक रूपात साजरे करतो. ते म्हणजे गुढीपाडवा व दसरा. या दोन दिवशी संघ स्वयंसेवक संचलन करून हा उत्सव साजरा करतात.

गणेशोत्सव हा संघ जन्मायच्या किमान ४० वर्षे आधी सुरू झाला. वाढत्या लोकसंख्येनुसार हा उत्सव साजरा करणार्‍यांची संख्याही वाढली. मुंबई, पुणे इ. शहरातून जशीजशी परप्रांतियांची संख्या वाढली त्यानुसार त्या त्या लोकांनी दुर्गापूजा, छटपूजा इ. आपले स्थानिक सण सुरू केले. हे सण सुद्धा संघाने सुरू केलेले नाहीत. दहीहंडी, गणेशोत्सव, दुर्गापूजा इ. सणांना बाजारी स्वरूप स्थानिक पुढार्‍यांमुळे आले आहे. संघाचा यात दोष नाही. मोठमोठे मंडप, स्पीकर्सच्या काळ्या भिंती, वर्गणीची दादागिरी, रस्ते अडविणे इ. साठी संघाला कसे जबाबदार धरता येईल?

पण असो. संघ काही फालतू माणसांनी केलेल्या शंकांना उत्तर देणार नाही. दिलेच तर ते 'संघ विचारांची पुस्तके वाचा नाहीतर शाखेवर जा' असे काहीतरी असेल. त्यामुळे माझ्या शंका अनुत्तरीतच राहणार!

साखरेची गोडी समजून घ्यायची असेल तर साखर खायला हवी. तद्वत संघ समजायचा असेल तर संघ अनुभवणे हेच करावे लागेल. नाहीतर सार्वजनिक सणांच्या बाजारीकरणाला सुद्धा संघाला जबाबदार धरण्याची चूक केली जाईल.

मुक्त's picture

14 Sep 2016 - 11:59 pm | मुक्त

संघम शरणम गच्छामी.

अनुप ढेरे's picture

15 Sep 2016 - 12:00 am | अनुप ढेरे

आजानुकर्णांचे सर्व प्रतिसाद पूर्ण पटले. बाकी भाद्रपद चालू आहे वगैरे कॉमेंटा टाकणार्‍यांनी असभ्य भाषेची तक्रार करावी हे मात्र रोचक आहे.

मुक्त's picture

15 Sep 2016 - 12:08 am | मुक्त

अजून थोडे थांबा. एखाद्याला मनोरुग्ण असल्याचे सांगतील.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 12:05 am | बोका-ए-आझम

त्याला कोणीच काही करु शकत नाही. बाकी भाद्रपद चालू आहे ही वस्तुस्थिती आहे.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 12:11 am | संदीप डांगे

बोकशेठ, भाद्रपदाचा धागाविषयाशी, चालू चर्चेशी असलेला संबंध संदर्भ स्पष्ट कराल काय? समजला नाही म्हणून विचारतोय!

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Sep 2016 - 12:31 am | खालीमुंडी पाताळधुंडी

मिपावर इतके संघविरोधक आहेत हे पाहून अस्वस्थ वाटतय त्यांना.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 12:44 am | बोका-ए-आझम

आज तिथी भाद्रपद शुद्ध त्रयोदशी आहे. दिनांक १५ सप्टेंबर २०१६. मी ती प्रतिक्रिया टाकली तेव्हा १४ सप्टेंबर तारीख होती. मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. आता लोकांना गैरसमज करुन घ्यायचा असेल तर मी काय करु शकतो? बरं, धाग्यावर असलेले सगळे प्रतिसाद धाग्याशी संबंधित असावेत असा नियम असल्यास दाखवावा.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 8:11 am | श्रीगुरुजी

फक्त 'भाद्रपद'हा प्रतिसाद असभ्य असून धाग्याशी संबंधित नाही. बाकी 'चड्डी पिवळी', 'अस्वलाची विष्ठा', 'माकड' इ. भारदस्त प्रतिसाद धाग्याशीच संबंधित आहेत.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 8:26 am | संदीप डांगे

ते काय म्हणता तुम्ही नेहमी... हां..

'उगी उगी'

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 9:29 am | श्रीगुरुजी

एकंदरीत सभ्य/असभ्य प्रतिसादांचं selective वर्गीकरण पुन्हा एकदा दिसून आलं. हे अर्थात अपेक्षितच होतं.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 9:31 am | संदीप डांगे

अहो, ह्या धाग्यावर हेच झालं म्हणून तर प्रतिसाद दिला , बाकी कै नै... तुमचं चालू देत.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 9:44 am | श्रीगुरुजी

भाद्रपद प्रतिसाद असभ्य व विषयाशी असंबधित वाटला. पण पिवळी चड्डी, माकड, अस्वलाची विष्ठा इ. प्रतिसादांवर सोयिस्कर मौन! चालू द्या.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 11:10 am | संदीप डांगे

काहीही??

पिवळी चड्डी, अस्वल, माकड इत्यादी थेट संघी लोकांना उद्देशून आहे, तर पिसाळलेत इत्यादी थेट मिपाकरांना उद्देशून दिसतात,

संघी लोकांना थेट अपशब्द वापरल्याची जबाबदारी त्या आयडीने घेतली आहेच, तुम्ही आणि बोकशेठ यांनी मात्र इथे चर्चा करणाऱ्या काही मिपाकरांना उद्देशून अभद्र भाषा वापरत आहात व त्याची जबाबदारी टाळत आहात असे दिसले.

वर भाद्रपद चे स्पष्टीकरण विचारले कारण बोकशेठ यांच्या मते ते अभद्र नाही, त्यामुळे त्यांच्यासाठीही हेच शब्द कुणी वापरले त्यांची हरकत नसावी.

संघसमर्थक, मोदीसमर्थक, भाजपासमर्थक ह्यांना अपशब्द वापरले गेले तर तडक येऊन 'अरेरे, चू चू, वाईट झालं, दर्जा घसरला, मिपाकर म्हणून शरम वाटली' इत्यादी प्रतिसाद देणारे काही सदस्य, उलट झाले की गपचिप, सोयीस्कर मौन पाळतात हे हि तुमच्या लक्षात आले असेल.

चंपाबाईने कुणाही मिपाकराला अभद्र शब्द वापरल्याचे दिसले नाही पण त्यांच्याविरुद्ध जे शब्द वापरले गेले त्याबद्दल कोणालाही आक्षेप असल्याचे दिसले नाही, उलट काही लोक तर मजेने आनंद घेताना दिसतात.

बाकी चर्चेत मला काही रस नाही, मिपाकरांना ते कोणत्या बाजूने आहेत हे बघून सन्मान दिला जातो का हा प्रश्न पडला म्हणून आलो.

अप्पा जोगळेकर's picture

15 Sep 2016 - 3:02 pm | अप्पा जोगळेकर

साहेब, कोणाच्या अध्यामध्यात नसणार्‍या 'चित्रगुप्त' काकांना खवट म्हातारा म्हणणारे तुम्हीच ना ?
तुम्ही त्याची जबाबदारी घेतली आहे का ?

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 3:13 pm | श्रीगुरुजी

पिवळी चड्डी, अस्वल, माकड इत्यादी थेट संघी लोकांना उद्देशून आहे, तर पिसाळलेत इत्यादी थेट मिपाकरांना उद्देशून दिसतात,

पिसाळलेत हा शब्द तमाम मिपाकरांना उद्देशून आहे हा गैरसमज का करून घेतलात? ज्या लोकांना वैचारिक प्रतिवाद करता येत नाही, संघ काय चुकीचे करतो हे सांगताच येत नाही व निव्वळ संघद्वेषातून पिवळी चड्डी, अस्वल, माकड असे शब्द वापरून अर्वाच्य व असभ्य प्रतिसाद देतात, केवळ त्यांच्यासाठी हा प्रतिसाद होता कारण संघाविषयी कोणी काही बरं बोललं की अशांचं डोकं फिरून ते पिसाळल्यासारखे घाण प्रतिसाद द्यायला लागतात. इतर मिपाकरांबद्दल हे लिहिलेले नाही.

संघी लोकांना थेट अपशब्द वापरल्याची जबाबदारी त्या आयडीने घेतली आहेच, तुम्ही आणि बोकशेठ यांनी मात्र इथे चर्चा करणाऱ्या काही मिपाकरांना उद्देशून अभद्र भाषा वापरत आहात व त्याची जबाबदारी टाळत आहात असे दिसले.

वर स्पष्टीकरण दिले आहे.

वर भाद्रपद चे स्पष्टीकरण विचारले कारण बोकशेठ यांच्या मते ते अभद्र नाही, त्यामुळे त्यांच्यासाठीही हेच शब्द कुणी वापरले त्यांची हरकत नसावी.

ते बोकाशेठ ठरवतील.

संघसमर्थक, मोदीसमर्थक, भाजपासमर्थक ह्यांना अपशब्द वापरले गेले तर तडक येऊन 'अरेरे, चू चू, वाईट झालं, दर्जा घसरला, मिपाकर म्हणून शरम वाटली' इत्यादी प्रतिसाद देणारे काही सदस्य, उलट झाले की गपचिप, सोयीस्कर मौन पाळतात हे हि तुमच्या लक्षात आले असेल.

पिवळी चड्डी, अस्वल, माकड इ. शब्द असणारे अत्यंत असभ्य व अर्वाच्य प्रतिसाद तुम्हाला खटकले नाहीत, त्यामुळे तुम्ही सोयिस्कर मौन पाळलेत. विशेषतः आपण शिक्षणक्षेत्रात आहोत असा दावा करणार्‍या व्यक्तीकडून इतकी खालची पातळी गाठली जावी हे जास्त खेदकारक आहे. परंतु भाद्रपद शब्द मात्र तुम्हाला खटकला. हेच मी दाखवून दिले होते.

चंपाबाईने कुणाही मिपाकराला अभद्र शब्द वापरल्याचे दिसले नाही पण त्यांच्याविरुद्ध जे शब्द वापरले गेले त्याबद्दल कोणालाही आक्षेप असल्याचे दिसले नाही, उलट काही लोक तर मजेने आनंद घेताना दिसतात.

अत्यंत असभ्य व घाण प्रतिसाद दिल्यामुळे या आयडीचे आजतगायत किमान २५-३० आयडी डीलिट झाले आहेत. या धाग्यावर सुद्धा या आयडीचे सर्व प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचा म्हणजे त्यातील अभद्रपणा लक्षात येईल.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 3:42 pm | श्रीगुरुजी

हा प्रतिसाद संदीपरावांसाठी आहे.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 5:32 pm | संदीप डांगे

गुरुजी,

'कारण संघाविषयी कोणी काही बरं बोललं की अशांचं डोकं फिरून ते पिसाळल्यासारखे घाण प्रतिसाद द्यायला लागतात. इतर मिपाकरांबद्दल हे लिहिलेले नाही'
>>>

संबंधित सदस्य असभ्य भाषेत बोलला म्हणून तुम्हीही तशीच भाषा वापरली व ते योग्यच आहे असे आपले समर्थन आहे का?

तुम्ही म्हणता इतर मिपाकरांसाठी नाही म्हणजेच बाजू बघून सदस्यांचा आदर-अनादर केला तर चालतो असे आपले मत दिसते, मीही तेच म्हटले.

माझा मुद्दा फक्त एका मिपासदस्याने दुसऱ्या मिपाकाराबद्दल बोलतांना कसे सभ्यपणे बोलावे ह्याचे येताजाता जे ज्ञानामृत दिले जाते त्याबद्दल आहे. साहना ह्यांनी कोणत्या मिपासदस्यबद्दल उपरोक्त उद्गार काढले आहेत का?

आता केजरीवाल म्हटले की तुम्हालाही बरेच काही होते तेव्हा असे शब्द थेट तुमच्याबद्दल वापरले तर योग्य असेल काय? कि भाजप/संघाला शिव्या दिल्या कि पिसाळलेले, गरळ ओकणारे पण केजरीवालला/काँग्रेसला शिव्या दिल्या कि ते पवित्र सुसंस्कृत विचार असे दोन दृष्टिकोन असावेत?

बाकी, कुणाचा अभद्रपणा हा अभद्रपणा ठरतो हे त्याची कोणती बाजू आहे त्यावर अवलंबून आहे असेच वाटत आहे.

मला तर दोन्ही बाजूंचे अपशब्द तितकेच आक्षेपार्ह वाटत आहेत, पण माझा मुद्दा वेगळा होता त्याचा संघाशी नाही तर मिपाशी व इथल्या चर्चेच्या दर्जाशी संबंध आहे.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 8:48 pm | श्रीगुरुजी

माझा मुद्दा फक्त एका मिपासदस्याने दुसऱ्या मिपाकाराबद्दल बोलतांना कसे सभ्यपणे बोलावे ह्याचे येताजाता जे ज्ञानामृत दिले जाते त्याबद्दल आहे. साहना ह्यांनी कोणत्या मिपासदस्यबद्दल उपरोक्त उद्गार काढले आहेत का?

म्हणजे फक्त मिपासदस्यांबद्दल अयोग्य उद्गार काढले तर ते निषेधार्ह. पण मिपासदस्याने इतर कोणाबद्दलही म्हणजे एखाद्या संघटनेबद्दल, त्या संघटनेच्या सदस्यांबद्दल, पंतप्रधानांबद्दल असभ्य उद्गार काढले तर मात्र ते तुमच्या दृष्टीने अयोग्य नाही.

मला तर दोन्ही बाजूंचे अपशब्द तितकेच आक्षेपार्ह वाटत आहेत, पण माझा मुद्दा वेगळा होता त्याचा संघाशी नाही तर मिपाशी व इथल्या चर्चेच्या दर्जाशी संबंध आहे.

तुम्ही फक्त भाद्रपद या शब्दाबद्दलच निषेध नोंदविला. त्यापूर्वी अनेक प्रतिसादातून जी असभ्य भाषा वापरली गेली त्याबद्दल अजूनही तुमचे मौन आहे.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 9:42 pm | संदीप डांगे

मिपासदस्याने इतर कोणाबद्दलही म्हणजे एखाद्या संघटनेबद्दल, त्या संघटनेच्या सदस्यांबद्दल, पंतप्रधानांबद्दल असभ्य उद्गार काढले तर मात्र ते तुमच्या दृष्टीने अयोग्य नाही.

ठिक आहे, म्हणजे ते तुमच्या दृष्टीने अयोग्य आहे. बरोबर? मग मिपासदस्याने केजरिवाल ह्या व्यक्तिलाच एक शिवी आहे असे म्हणणे हे योग्य नाही असेच तुमच्या ह्या आताच्या वरच्या मतावरुन दिसते. पण ते तुम्ही पाळले का? (मला केजरिवाल किंवा आपबद्दल फार प्रेम आहे म्हणून तेच उदाहरण देतोय असे समजू नये, केजरीवालचे उदाहरण तुमच्याच भूमिकेचे पांगळेपण दाखवण्यासाठी आहे, जे तुम्हीच निर्माण करुन ठेवलेले आहे)

तुम्ही फक्त भाद्रपद या शब्दाबद्दलच निषेध नोंदविला.

वरच्या माझ्या कोणत्या प्रतिसादातुन भाद्रपद या शब्दाबद्दल मी 'निषेध नोंदवला' आहे ते आपल्याला दिसले ते मलाही दाखवा. बोकाशेठना भाद्रपद चा फक्त संदर्भ विचारला आहे, बाकी निषेध म्हणाल तर त्या वरच्या वाक्यात सर्वच पातळी सोडून असलेल्या प्रतिसादांचा आहे, त्यात संघसमर्थक वा विरोधक असे कोणतेही वर्गिकरण मी करत नाही. तुम्हाला तुमच्या सोयीने गोष्टी मांडायच्या असतील तर तो तुमचा विषय. माझी काहीच हरकत नाही. असो.

> पिवळी चड्डी, अस्वल, माकड इ. शब्द असणारे अत्यंत असभ्य व अर्वाच्य प्रतिसाद तुम्हाला खटकले नाहीत

अलंकारिक भाषेला आपण असभ्य म्हणू शकत नाही. माकड किंवा अस्वले इत्यादी शब्दप्रयोग metaphorical दृष्टीने केले होते आणि अतिशय प्रचलित इंग्रजी वकक्प्रचारांचे ते अनुवाद आहेत. ह्या उलट कानफटात वाजवणे, तुमची कीव येत आदी आदी पर्सनल हल्ले असून फार खालच्या पातळीचे आहेत.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 4:27 pm | बोका-ए-आझम

भाद्रपद महिना चालू आहे आत्ता हे म्हणणं चुकीचं आहे का?
त्याचा कोणीही काहीही अर्थ काढेल. तो अश्लीलही असेल. ज्यांच्या डोक्यात अश्लीलता आहे त्यांना काहीही अश्लील वाटू शकतं. तुम्ही त्यातले असाल असं वाटलं नव्हतं. हे पाहून सखेद आश्चर्य वाटलेलं आहे. असो. गैरसमज करुन घेण्याचा हक्क प्रत्येकाला आहे.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 4:59 pm | संदीप डांगे

ओह! भाद्रपद चा संदर्भहीन उल्लेख बघता प्रचलित अर्थानुसार जो असतो तोच घेतला जाईल ह्याबद्दल तुम्हाला शंका आली नाही ह्याचं मला आत्ता खरंच आश्चर्य वाटत आहे..

असो, आम्ही पापी मनाचे आहोत हे तुम्ही 'वाटून' घेतलं त्याबद्दल तक्रार नाही.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 5:25 pm | बोका-ए-आझम

मी तुम्ही गैरसमज करुन घेतला असं म्हटलंय.असो.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 5:37 pm | संदीप डांगे

ज्यांच्या डोक्यात अश्लीलता आहे त्यांना काहीही अश्लील वाटू शकतं. तुम्ही त्यातले असाल असं वाटलं नव्हतं. हे पाहून सखेद आश्चर्य वाटलेलं आहे

^^^

हे आपलेच शब्द आहेत, तेव्हा "आमच्या डोक्यात अश्लीलता आहे हे आपण 'वाटून' घेतलं ह्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही" असा बदल करून घेतो,

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 6:59 pm | बोका-ए-आझम

ज्यांच्या डोक्यात अश्लीलता आहे असं म्हटलंय आणि पापी # अश्लीलता.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 9:15 pm | संदीप डांगे

ठिक आहे बोकाशेठ, जान्देव!

क्षमस्व's picture

15 Sep 2016 - 7:04 pm | क्षमस्व

संडांस चालू।।
संदीप डांगे सर चालू असा याचा फुल फॉर्म असून कोणीही विकृत विचार करू नये।।

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 7:16 pm | संदीप डांगे

नक्कीच! ज्याच्या त्याच्या प्रतिसादावरून त्याची त्याची पातळी कळते, हे आधीच म्हटले आहे, त्व तुम्हालाही लागू आहेच!

रच्याकने, संपादक मंडळ लक्ष देण्यास समर्थ आहेतच! ;)

आयडी क्षमस्व आहे म्हणून काहीही बोलायचे का

गामा पैलवान's picture

15 Sep 2016 - 1:17 am | गामा पैलवान

साहना,

१.

समजा १० हजार गरीब हिंदूंनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला आपल्या राहणसाहनीत काहीही फरक केला नाही तर "ख्रिस्ती लोक हिंदू आहेत" ह्या नियमाखाली संघाला ते चालेल काय ?

तुम्ही पराभूतवादी जन्महिंदू आहात म्हणून तुम्हाला अशा उफराट्या कल्पना सुचतात. मोठ्या आवेशात विचारात होतात ना की हिंदुत्वाची व्याख्या काय म्हणून? ती व्याख्या कशासाठी करायची असते याचा थांगपत्ता तरी आहे का तुम्हाला!

तुमचंच उदाहरण उलटवून देतो. समजा १० हजार गरीब ख्रिस्ती हिंदू धर्मात परततांना आपल्या राहणसाहनीत काहीही फरक केला नाही तर "ख्रिस्ती लोक हिंदू आहेत" ह्या नियमाखालीच त्यांची घरवापसी करावी लागेल. कळलं आता हिंदुत्वाची व्याख्या कशाशी खातात ते?

२.

सदर फरक तुम्हाला ठाऊक नाही ह्यात आपला गोंधळ दिसून येतो.

त्याची तुम्ही चिंता करू नये. भारतातला ख्रिस्ती माणूस रोमकडे नजर न लावता येशुभक्त हिंदू बनला पाहिजे. त्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या थोडीफार (= रोमकडे नजर न लावता) बदलायला लागली तरी चालेल.

आ.न.,
-गा.पै.

> तुमचंच उदाहरण उलटवून देतो. समजा १० हजार गरीब ख्रिस्ती हिंदू धर्मात परततांना आपल्या राहणसाहनीत काहीही फरक केला नाही तर "ख्रिस्ती लोक हिंदू आहेत" ह्या नियमाखालीच त्यांची घरवापसी करावी लागेल. कळलं आता हिंदुत्वाची व्याख्या कशाशी खातात ते?

घरवापसी ? पण ते हिंदूच आहेत तर घरवापसी आणि कसली ? वापस कशामध्ये ?

> येशुभक्त हिंदू बनला पाहिजे

येशूभक्त हिंदू असू शकत नाही. ख्रिस्ती असण्यासाठी एकेश्वरवादि असणे आवश्यक आहे. एकेश्वरवाद आणि हिंदू धर्म kompetibal नाही.

उगाच माझ्या हिंदू धर्माचे हे विकृतीकरण करू नका.

गामा पैलवान's picture

15 Sep 2016 - 5:41 pm | गामा पैलवान

१.

घरवापसी ? पण ते हिंदूच आहेत तर घरवापसी आणि कसली ? वापस कशामध्ये ?

वेड पांघरून पेडगावांस जाताय? घरवापसी केल्याने पोप आणि मुल्लांचे कळप घटतील. जिथे हे कळप फोफावले ते भाग भारतापासून तुटले हे माहितीये ना?

२.

येशूभक्त हिंदू असू शकत नाही. ख्रिस्ती असण्यासाठी एकेश्वरवादि असणे आवश्यक आहे. एकेश्वरवाद आणि हिंदू धर्म kompetibal नाही.

येशुभक्त हिंदू आहेत. पंडिता रमाबाई यांची मुलगी मनोरमा स्वत:स येशुभक्त आणि हिंदू दोन्ही मानंत असे. फार काय वसईचे सामवेदी ख्रिश्चन सर्रास दत्ताची भक्ती करतात. हिंदूंप्रमाणे उपासही करतात. अशांना पोपचा मार्ग फोल आहे हे पटवून देणे म्हणजे घरवापसी. येशू आणि पोप मधला फरक तुम्हाला माहित नाही का?

३.

उगाच माझ्या हिंदू धर्माचे हे विकृतीकरण करू नका.

हिंदू धर्म काळाप्रमाणे बदलत आला आहे. म्हणूनच तो टिकून आहे. पूर्वी हिंदू धर्मात घरवापसी नव्हती. पण सिंध प्रांतात मुस्लिमांचा जोर वाढल्यानंतर देवलस्मृती लिहिली गेली. तीत घरवापसीची कृती दिली आहे. असेच धोरण आजही राबवावे लागेल. तुम्हाला ते हिंदू धर्माचं विकृतीकरण वाटलं तर दोष तुमच्या मेकॉलेछाप शिक्षणाचा आहे. संघाचा नाही.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

15 Sep 2016 - 5:42 pm | गामा पैलवान

प्रतिसाद इथे आहे :
http://www.misalpav.com/comment/880467#comment-880467

-गा.पै.

आनन्दा's picture

15 Sep 2016 - 10:00 pm | आनन्दा

एकेश्वरवाद आणि हिंदू धर्म काँपॅटिबल नाही? कृपया या विषयावर स्पष्टीकरणासाठी एक वेगळा धागा काढावा ही विनंती.

नर्मदेतला गोटा's picture

15 Sep 2016 - 9:39 am | नर्मदेतला गोटा

संघ आज फोफावत असताना त्याला पोटदुखे विरोधक निर्माण होणं साहजिक आहे

पण

आपण विरोध का करतो हे मात्र नेमकेपणाने सांगता येऊ नये हीच खरी गोची आहे

स्वयंसेवकांचं आणि त्यांच्या संस्थांचं कुठे चुकलं हे सांगता येऊ नये म्हणूनच तर हा चमत्कार आहे

स्वयंसेवकांचं आणि त्यांच्या संस्थांचं कुठे चुकलं हे सांगता येऊ नये म्हणूनच तर हा चमत्कार आहे

चला, झालं ना सिध्द? ओके.
आज या टिकानी मी आलेल्या श्रोत्यांचे, भांडणार्‍या श्रोत्यांचे, वक्त्यांचे, प्रवक्त्यांचे अन त्यांच्या युक्त्याप्रयुक्त्यांचे आभार मानतो. या टिकानी त्यांचा हार आनि पुच्छगुच्छ देऊन सत्कार करण्यात येईल. रांगेने यावे.
तोपर्यंत चला रे उचला सतरंज्या, काढा स्पीकर अन मांडव. लै झालेय भाडे.

नर्मदेतला गोटा's picture

15 Sep 2016 - 3:09 pm | नर्मदेतला गोटा

मोघम नका बोलू.

शक्य असेल तर अभ्यास करा आणि मांडा

चला रे उचला सतरंज्या

जुनं झालं ना ते

मोघम बिघम नाही गोट्याराव,
अभ्यास वगैरे होतच राहतो. मला राहून राहून एक प्रश्न पडतो "सेवा दलासारख्या संघटनेतून घडलेले कडवे कार्यकर्ते हीच कुठल्याही संघटनेची, आन्दोलनाची ताकद असते" हि विचारसरणी असणार्‍या माणसाची "संघ: कलियुगातील चमत्कार" अशी वाटचाल कशी झाली?
एकूणच सानेगुरुजी अन सेवादलाविषयीचे आपले ममत्व ५ वर्षात कसे लोपले? अर्थात त्यांच्याविषयी ममत्व दाखवायला ते जागेवर पाहिजेत हा मुद्दा नाहीच. पण बाटग्याची बांग ह्या न्यायाने तुम्ही मला संघाच्या अधिक अभ्यासाची सूचना न करता, शांतपणे संघाच्याच पध्दतीने काम केलेत तर अधिक बरे होईल.
धन्यवाद

नर्मदेतला गोटा's picture

15 Sep 2016 - 5:03 pm | नर्मदेतला गोटा

प्रश्न तुम्हीच विचारताय सिद्ध तुम्हीच करताय आणि उत्तरेही तुमची तुम्हालाच मिळत आहेत
चांगली गोष्ट आहे.

प्रश्न तुम्हीच विचारताय सिद्ध तुम्हीच करताय आणि उत्तरेही तुमची तुम्हालाच मिळत आहेत
चांगली गोष्ट आहे.

ह्याला मोघमपणा म्हणतात.
मला काहीच सिध्द करायचे नाहीये. फक्त जाणून घ्यायचेय की अशी कशी झाली वाटचाल? ते तर तुम्हीच सांगणार ना.

अप्पा जोगळेकर's picture

15 Sep 2016 - 11:27 am | अप्पा जोगळेकर

काही फायनल निर्णाय झाला का ?

अमितदादा's picture

15 Sep 2016 - 11:41 am | अमितदादा

आतापर्यंतची चर्चा आणि प्रतिसाद वाचले , बहुतेक प्रतिसादातून एक दिसून आले कि लोकांना एकतर संघ चांगला वाटतो किंवा वाईट वाटतो. संघाची चांगली आणि वाईट बाजू मांडणारे प्रतिसाद काही वाचले नाहीत . यावरून मिपावर एकतर टोकाचे संघ समर्थक किंवा टोकाचे संघ विरोधक आहेत . हिंदू धर्मातील चुकीचा चालीरीतींना विरोध झालाच पाहिजे असं माझं ठाम मत आहे पण बाहेर च्या जगात काही लोक फक्त हिंदू धर्माबाबतीत सत्यवादी बनतात आणि इतर धर्माबाबत मूग गिळून गॅप बसतात यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो . माझ्या मतानुसार संघाची काही काम चांगली आहेत तर काही वाईट आहेत म्हणून संघाचं विश्लेषण करताना दोन्ही गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत .

माझ्या मतानुसार संघाचे दोन चेहरे आहेत. एक म्हणजे सामाजिक चेहरा ज्यात संघाची समाजउपयोगी कामे येतात उदारणार्थ आदिवासी कल्याण , ईशान्य भारतात सामाजिक काम , शाळा आणि इतर सामाजिक संस्थांची बांधणी , विविध भागातील आणि जातीतील हिंदूंचे एकीकरण इत्यादी यांचा समावेश होतो . थोडक्यात काय तर संघाचा सामाजिक चेहरा उजळलेला दिसतो . मात्र संघाचा दुसरा चेहरा आहे जो राजकीय आहे जो काळवंडलेला आहे , ज्यात राम मंदिराचे राजकारण, हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचे इतर संघटनेमार्फत समर्थन , मुस्लिम आणि ख्रिस्ती द्वेष , दलिताबाबतीत संशयी भूमिका, गो रक्षा यांचा समावेश होतो . संघ, राजकीय चेहरा तलवार म्हणून वापरतो तर सामाजिक चेहरा धाल मानून वापरतो . म्हणजे वार राजकीय चेहऱ्याने करायचा मात्र हल्ला झाल्यास सामाजिक चेहरा पुढं करायचा. असो सांगायचं एव्हडच आहे कि संघाचं विश्लेषन त्याच्या दोन्ही बाजू विचारात घेऊन व्हावे . असो भरपूर मुद्दे चर्चिले गेल्याने काही नवीन मुद्दे नसतील राहिले आता, अशी अपेक्षा करतो.

अवांतर: लोकसत्ताने मदर तेरेसा वरती लिहलेला अग्रलेख मागे घेऊन माफी मागितली होती काय बर कारण असावं व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्राच्या ह्या भूमिकेमागे ? (अर्थात माझा मदर तेरेसांना कोणताही विरोध नाही )

सुबोध खरे's picture

15 Sep 2016 - 11:58 am | सुबोध खरे

काही नवीन मुद्दे नसतील राहिले आता,
अहो असं कसं
५०० आकडा पार व्हायचाय ना
एवढ्यात जन गण मन कसं वाजवताय?

रविकिरण फडके's picture

15 Sep 2016 - 1:26 pm | रविकिरण फडके

माझा विरोध आहे कारण
1) केवळ लोकांना ख्रिस्ती करायचे म्हणून समाजसेवा हा गर्हणीय उद्योग झाला.
2) कोलकात्याची व भारताची तिने बदनामी केली - किंवा ती कारणीभूत झाली त्यासाठी.
3) तिला संत वगैरे घोषित करण्याची व पर्यायाने एक ख्रिस्ती पूजास्थान भारतात तयार करण्याची पोपला संधी मिळाली.
4) तिला नोबेल मिळाले त्यामुळे काही वावदूक लोकांचे फावले. तिच्याहून खूप जास्त लायक माणसे होती नोबेलसाठी.
तिच्याबद्दल इंटरनेटवर बरेच काही उपलब्ध आहे. राजीव मल्होत्रा ह्याचे ब्रेकिंग इंडिया हे पुस्तक पाश्चिमात्य संस्थांच्या आणि सरकारांच्या कारवायांवर चांगला प्रकाश टाकते. थेरेसाचा उदो उदो हा त्या षड्यंत्राचाच एक भाग आहे.

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 1:34 pm | चंपाबाई

बर्र्र्र्र ..

लेप्रसी आता गेला.

आता टीबी व एड्सचा धुमाकूळ सुरु आहे.. तुम्हीही टीबी एड्सचे आश्रम काढून समाजसेवा व धर्मप्रसार असे दोन्ही करून दाखवा.

२०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवून काम करा. सोबत संघ, विहिंप, शंकराचार्य पीठ इ इ सामील करुन घ्या. तुम्हालाही नक्की मिळेल. शुभेच्छा.

जगात रोग व रोगी दोन्हींची कमतरता नाही.. मदरला शिव्याशाप देण्यापेक्षा एखादा रोग तुम्हीही धरा व तुम्हीही माऊली मुक्ताई होऊन दाखवा. कुणी अडवले आहे का?

इरसाल's picture

15 Sep 2016 - 2:35 pm | इरसाल

तुम्ही आहात ना एड्स्च्या प्रांतात तुम्ही व्हा मदर तेरेसा, सुट्पण करेल तुम्हाला. बाई-माणसाला जास्त सहानुभुती मिळते.
फक्त चेहर्यावर जरा कोमल भाव असु द्या. आणी साडी कोणती काळी का बिनाकाठा पदराची ??????

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 2:40 pm | चंपाबाई

आम्ही आहोतच हो .... पण संघ, विहिंप ज॑र कुठे एड्स टीबी आश्रम जवळपास काढेल तर त्याना आम्ही ऑनररी म्हणून सेवा जरुर देऊ.

आमच्या हस्पिटलाच्या एरियात एक लेप्रेअसी मिशन होते.. लेप्रसी कमी झाल्यावर ते मिशनरी लोकानी एड्स टीबीत कन्वर्ट केले. आमचे बरेच पेशंट कधीकधी किरकोळ आजाराना तिथे अ‍ॅडमिट होतात.

अमितदादा's picture

15 Sep 2016 - 3:50 pm | अमितदादा

मदर तेरेसा यांचा संधर्भ देण्यामागे हे कारण होत कि एरवी लोकसत्ताचे अग्रलेख हिंदू धर्म, चालीरीती आणि संस्था यावर तीव्र ताशेरे ओढते. काही मुद्दे पटतात काही मुद्दे पटत नाहीत परंतु व्यक्तिस्वातंत्र आणि माध्यमस्वतंत्र याचा विचार करता वृत्तपत्रांना असे बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत . ज्यांना मुद्दे पटत नाहीत ते वाचक नंतर पत्रे पाठवून आपआपली मते नोंदवत असत . परंतु मदर तेरेसा यांचावर लिहलेला लेख मागे घेऊन माफी मागितली जाते हे आश्चर्य वाटत . त्या अग्रलेखात भाषा आणि मुद्दे मलाही खटकले होते, तसेच बऱ्याच वाचकांनी पत्रे लिहून मुद्दे खोडून काढले होते त्यामुळे हा विषय इथेच थांबाय हवा होता. परंतु माफी मागण्याचा सौज्यन्य फक्त ख्रिस्ती धर्मासाठीच का , त्यावेळी कुठं गेलेलं व्यक्तिस्वातंत्र आणि माध्यमस्वतंत्र ? असो ह्या विषयावर आणखी चर्चा नको नाहीतर धाग्याचा विषय भरकटवल्याचा आरोप व्हायचा .

दुसरी गोष्ट, चंपाबाई तुम्ही हिंदू धर्माविषयी तसेच संघाविषयी मांडलेली काही मते नक्कीच पटतात . परंतु तुम्ही असे विचार इस्लाम विषय मांडलेली पाहण्यात आलेलं नाही. तसेच तुमची सगळी मते विचारात घेता असे दिसून येते कि तुमचा हिंदू धर्मातील वाईट चालीरीतींना विरोध नाही तर हिंदू धर्मालाच विरोध आहे. आज इस्लाम दहशतवादाने जगापुढं गंभीर समस्या निर्माण केली, इस्लाम धर्मियातील इतर वंशीय लोकांवर अन्याय होतो , महिलांचं दमण होत , इस्लाम धर्मातले काही विचार अत्यंत खोडसाळ, मूर्ख आणि कालबाह्य आहेत . यावरती येऊद्या कि मत आपलं . तसेच ह्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देताना परत एकदा हिंदू धर्मातील वाईट गोष्टी सांगू नका , कारण त्यावरती भरपूर धागे प्रतिसाद मिपावर सापडतील. तसेच ह्या धाग्यावर आपलं म्हणणं नाही मांडलं तरी चालेल नवीन धागा घेऊन या, आणि फक्त वाईट गोष्टीच नाही तर इस्लाम धर्मियांमधील चांगल्या गोष्टी विषयी हि सांगा , म्हणजे आमचे काही गैरसमज असतील तर ते दूर होतील.

धाग्याचा विषय थोडा भरकटला तर क्षमस्व , पण ह्या आयडी च्या बोलण्यातून हिंदू धर्मातील चुकीच्या गोष्टी जाऊन चांगल्या गोष्टी याव्यात असा हेतू नसून फक्त टीका करणे आणि स्वतःच्या धर्मातील चुकीच्या गोष्टींचं हि समर्थन करणे हा असतो.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 5:26 pm | बोका-ए-आझम

लेप्रसी आता गेला.

म्हणजे? देवीप्रमाणे समूळ उच्चाटन?

कुष्टरोगी दाखवा, कैतरी इनाम मिळवा अशा जुन्या सर्कारी जाहीराती लहानपणी वाचल्याचे स्मरते. म्हणजे बहुतेक उच्चाटन झाले असावे.

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 6:28 pm | चंपाबाई

अजुन आहे. पण प्रमाण अगदी अगदी कमी आहे.

जेन्युईन प्रश्न आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे असं झालं असेल तर. काही लिंक वगैरे असेल तर खरंच द्या.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 10:46 pm | बोका-ए-आझम

यावर काही लिहा की. ही फारच चांगली गोष्ट आहे.

रविकिरण फडके's picture

15 Sep 2016 - 2:24 pm | रविकिरण फडके

"लोकसत्ताने मदर तेरेसा वरती लिहलेला अग्रलेख मागे घेऊन माफी मागितली होती काय बर कारण असावं व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्राच्या ह्या भूमिकेमागे ?"
मला समजलेले कारण असे कि एक्सप्रेस ग्रुपचा अगदी सर्वात वरचा बॉस कॅथॉलिक ख्रिस्ती आहे त्याने संपादकाला व्यक्तिगत माफीसकट तो लेख मागे घे नाहीतर परिणामांना समोर जा (म्हणजे डिसमिस!) असा ultimatum दिला. खरे खोटे देव जाणे.
हे खरे असेल तर पहा ख्रिस्ती लोक किती जागरूक असतात ते त्यांच्या धर्माच्या प्रतिमेबद्दल!

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 2:28 pm | चंपाबाई

मग त्या संपादकाने तो लेख मागे का घेतला ? जर त्याच्याकडे पुरावा होता, तर त्याने बॉसला घाबरायचे कारण नव्हतं.

किंवा कदाचित लेख मागे घेतला कारण तो लेख खोडसाळपणा होता असेच मानावे लागेल, नै का?

बाकी, लोकसत्तातील लेख, लोकसत्ताचे केतकर म्ह्णजे सुमार केतकर इ इ बोलणारा हिंदुत्वीय ग्रूप या एका लेखाबाबत मात्र लोकसत्तेशी प्रेम दाखवतो, हाही एक योगायोगच नै का ?

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Sep 2016 - 6:01 pm | श्री गावसेना प्रमुख

मग त्या संपादकाने तो लेख मागे का घेतला ? जर त्याच्याकडे पुरावा होता, तर त्याने बॉसला घाबरायचे कारण नव्हतं. चम्पाबै ते वर्तमानपत्र म्हणजे काही सरकारी कचेरी नव्हे बॉस ला न घाबरायला,खाजगी आहे तिथे तुम्हीही असा वेडपट पणा केला तर तुम्हाला दुसरा आय डी सुद्धा मिळणार नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Sep 2016 - 6:01 pm | श्री गावसेना प्रमुख

मग त्या संपादकाने तो लेख मागे का घेतला ? जर त्याच्याकडे पुरावा होता, तर त्याने बॉसला घाबरायचे कारण नव्हतं. चम्पाबै ते वर्तमानपत्र म्हणजे काही सरकारी कचेरी नव्हे बॉस ला न घाबरायला,खाजगी आहे तिथे तुम्हीही असा वेडपट पणा केला तर तुम्हाला दुसरा आय डी सुद्धा मिळणार नाही.

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 6:34 pm | चंपाबाई

त्याच्या बॉसने फोन केला म्हणून त्याने लेख मागे घेतला, याला पुरावा काय आहे म्हणे? फोन टॅप ? की बॉसने लेखी मेमो दिला होता म्हणे? आणि नंतर त्या बॉसने इथल्या सन्माननीय सदस्याना स्वप्नात दॄष्टांत दिला का की मी त्याला धमकी दिली म्हणून त्याने लेख मागे घेतला?

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 3:20 pm | श्रीगुरुजी

माझ्या मतानुसार संघाची काही काम चांगली आहेत तर काही वाईट आहेत म्हणून संघाचं विश्लेषण करताना दोन्ही गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत .

संघाची कोणती कामे वाईट आहेत ते सांगता का जरा? इथल्या संघविरोधकांना संघ नक्की का वाईट आहे, संघाच्या विचारसरणीत काय चुकीचे आहे याविषयी एकही मुद्दा सांगता आला नाही. त्यामुळेच संघ कार्यकर्त्यांची चड्डी पिवळी होते, संघ माकड आहे, संघ आपत्ती निवारण कार्यात सहभागी होतो त्यात विशेष ते काय अशी पातळी गाठली गेली. तुम्हाला संघाच्या ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्या सांगा.

मात्र संघाचा दुसरा चेहरा आहे जो राजकीय आहे जो काळवंडलेला आहे , ज्यात राम मंदिराचे राजकारण, हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचे इतर संघटनेमार्फत समर्थन , मुस्लिम आणि ख्रिस्ती द्वेष , दलिताबाबतीत संशयी भूमिका, गो रक्षा यांचा समावेश होतो . संघ, राजकीय चेहरा तलवार म्हणून वापरतो तर सामाजिक चेहरा धाल मानून वापरतो . म्हणजे वार राजकीय चेहऱ्याने करायचा मात्र हल्ला झाल्यास सामाजिक चेहरा पुढं करायचा. असो सांगायचं एव्हडच आहे कि संघाचं विश्लेषन त्याच्या दोन्ही बाजू विचारात घेऊन व्हावे . असो भरपूर मुद्दे चर्चिले गेल्याने काही नवीन मुद्दे नसतील राहिले आता, अशी अपेक्षा करतो.

ज्यात राम मंदिराचे राजकारण - या प्रश्नाबाबत सुरवातीपासूनच म्हणजे संघ त्यात नव्हता तेव्हापासूनच राजकारण सुरू आहे. सर्वच पक्ष व संघटनांनी त्यात राजकारण आहे. संघाने सुरवातीपासूनच मंदीर व्हावे अशीच भूमिका घेतलेली असून त्यात कोणताही बदल केलेला नाही.

हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचे इतर संघटनेमार्फत समर्थन - कोणत्या परंपरा? उदाहरणे देता येतील का?

मुस्लिम आणि ख्रिस्ती द्वेष - उदाहरणार्थ? बादवे, मुस्लिमांचा जगभर द्वेष केला जातो याची कल्पना असेलच आणि याला कारणीभूत तेच आहेत.

दलिताबाबतीत संशयी भूमिका - म्हणजे काय? उदाहरणे द्या.

गो रक्षा - या मुद्द्यामुळे चेहरा काळवंडला कसा जाईल?

रविकिरण फडके's picture

15 Sep 2016 - 1:12 pm | रविकिरण फडके

१) "१९९३ पासून मुंबईत तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले या आपल्या विधानाला काही पुरावा?" हे मत फक्त माझ्या अनुभवांवर आधारलेले आहे. मी राहतो तो परिसर व घर ते ऑफिस ह्या आठ कि. मी. मार्गावर १९९३ पूर्वी दुर्गापूजेचा एकही मांडव नसायचा, आता सात असतात. त्यातील काहींचा पसारा प्रतिवर्षी वाढतोच आहे. गणपती एकाचे चार झाले. दहीहंडी एक असायची तीही छोटेखानी, आता ४-५ झाल्या. आणि ह्या सर्वांचे उपद्रवमूल्यही (दोन दिवस आधी रस्त्यावर उभे केलेले स्टेज आणि बॅनर्स, प्रत्यक्ष दहीहंडी फोडायला येणाऱ्या गोविंदा पथकांच्या वेळेस रस्ते पूर्णपणे बंद करणे, आणि प्रचंड आवाज, इ.) वाढले. खेरीज, माघी गणपती, महाशिवरात्री, इ. आहेतच. हे माझे निरीक्षण आहे. माझे एक नातेवाईकमुंबईत पश्चिम उपनगरात राहातात त्यांच्याकडे इमारतीला हादरे बसावेत एवढा मोठा आवाज असतो ह्या दिवाळीसुद्धा सर्व सणांना.
२) हिंदू असल्याचा मला आनंद वाटतो. (अभिमान/ गर्व नाही; मी हिंदू आहे ह्यात माझे कर्तृत्व काही नाही.) ह्या धर्माने जे वैचारिक स्वातंत्र्य मला दिले आहे ते इसाई किंवा इस्लाम देत नाही. मग भले ती अनेक विचारांची खिचडी असेल पण म्हणूनच तीत प्रत्येकाला स्थान आहे. (बौद्ध, जैन, शीख धर्मांबद्दल मला काही माहिती नाही पण ते fanatic नक्कीच नाहीत.)
३) मी संघविरोधक नाही. संघाने केलेले हिंदुजागरणाचे काम स्पृहणीयच आहे. परंतु,
४) संघ स्थापन झाला तेव्हाची आणि आताची परिस्थिती भिन्न आहे; आता हिंदुजागरणाची गरज उरलेली नाही. असल्या गोंगाटी, क्लेशकारक आणि राजकारण्यांच्या व दादा लोकांच्या (दोहोत फरक आहे का?) हातात गेलेल्या सार्वजनिक सणांनी प्रबोधन तर दूरच राहिले, उलट हिंदू अधिक मागे जाईल. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, तिने सामाजिक जागा किती व्यापायची ह्याचा विचार झाला नाही तर आपली अधोगती ठरलेली आहे. ज्या गोष्टी घातक आहेत त्यांना विरोध करण्यासाठी संघ जर पुढे येणार नसेल, मग त्याची कारणे कोणतीही असोत, तर त्याचे दुष्परिणाम समाजाला आणि हिंदू धर्मालाही भोगावे लागतील. 'हिंदूंच्या हितासाठी कटिबद्ध' असलेल्या संघाला मग त्यातला त्यांचा वाटा नाकारता येणार नाही. (आज सहसा कुणी हिंदू इस्लाम 'कुबुल' करीत नाही पण ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या दुर्लक्षणीय नाही. मला अशी धर्मांतरित माणसे माहिती आहेत. आणि ह्या धर्मांतरासाठी एक आमीष म्हणा, कारण म्हणा, काय सांगतात माहित आहे का? म्हणतात, तुमच्या हिंदूंमध्ये पाहा सगळा गोंधळ असतो, किती बेशिस्त, किती अनागोंदी तुमच्या समारंभात आणि देवस्थानात! तेच आमचे चर्च पाहा; किती शांत, व्यवस्थित, नीटनेटके! ह्यात आर्थिक आमिषे असतात ती वेगळीच पण हे आर्ग्युमेण्टही लोकांना भुलवते ह्याचा मी साक्षी आहे.) हे संघाला मान्य नसेल किंवा त्यांचे काही म्हणणेच नसेल तर विषय संपला माझ्या दृष्टीने. मान्य असेल तर ते काय करतात हे जाणून घ्यायला मला आवडेल.
बाकी, संघ चमत्काराच्या ह्या धाग्याने मला मनातील प्रश्न उपस्थित करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभारच आहेत.
बस्स, एवढेच.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 3:40 pm | श्रीगुरुजी

१) "१९९३ पासून मुंबईत तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले या आपल्या विधानाला काही पुरावा?" हे मत फक्त माझ्या अनुभवांवर आधारलेले आहे. मी राहतो तो परिसर व घर ते ऑफिस ह्या आठ कि. मी. मार्गावर १९९३ पूर्वी दुर्गापूजेचा एकही मांडव नसायचा, आता सात असतात. त्यातील काहींचा पसारा प्रतिवर्षी वाढतोच आहे. गणपती एकाचे चार झाले. दहीहंडी एक असायची तीही छोटेखानी, आता ४-५ झाल्या. आणि ह्या सर्वांचे उपद्रवमूल्यही (दोन दिवस आधी रस्त्यावर उभे केलेले स्टेज आणि बॅनर्स, प्रत्यक्ष दहीहंडी फोडायला येणाऱ्या गोविंदा पथकांच्या वेळेस रस्ते पूर्णपणे बंद करणे, आणि प्रचंड आवाज, इ.) वाढले. खेरीज, माघी गणपती, महाशिवरात्री, इ. आहेतच. हे माझे निरीक्षण आहे. माझे एक नातेवाईकमुंबईत पश्चिम उपनगरात राहातात त्यांच्याकडे इमारतीला हादरे बसावेत एवढा मोठा आवाज असतो ह्या दिवाळीसुद्धा सर्व सणांना.

या सर्वांना संघ जबाबदार आहे का?

४) संघ स्थापन झाला तेव्हाची आणि आताची परिस्थिती भिन्न आहे; आता हिंदुजागरणाची गरज उरलेली नाही.

हिंदुजागरणाची अजूनही गरज आहे. भारतात अजूनही पाकिस्तान, दहशतवादी इ. विषयी ते केवळ मुस्लिम धर्माचे असल्याने सहानुभूती असणारे निधर्मांध आहेत. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, त्यांना सरकारी नोकर्‍या कमी मिळतात इ. गोष्टींवर उपाय म्हणजे त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवाव्यात असा अजूनही प्रचार होतो. आपल्या अवस्थेसाठी मुस्लिम स्वतःच जबाबदार आहेत हे उघड सांगण्याची हिंमत यांच्यात नाही. बुरखा, तलाक इ. अन्यायकारक गोष्टींचे समर्थन करणारे व या गोष्टींना विरोध करणार्‍यांवर हिंदुत्ववादी म्हणून टीका करणारे अजूनही मोठ्या संख्येने आहेत. म्हणूनच हिंदुजागरणाची गरज आजही आहे.

असल्या गोंगाटी, क्लेशकारक आणि राजकारण्यांच्या व दादा लोकांच्या (दोहोत फरक आहे का?) हातात गेलेल्या सार्वजनिक सणांनी प्रबोधन तर दूरच राहिले, उलट हिंदू अधिक मागे जाईल. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, तिने सामाजिक जागा किती व्यापायची ह्याचा विचार झाला नाही तर आपली अधोगती ठरलेली आहे. ज्या गोष्टी घातक आहेत त्यांना विरोध करण्यासाठी संघ जर पुढे येणार नसेल, मग त्याची कारणे कोणतीही असोत, तर त्याचे दुष्परिणाम समाजाला आणि हिंदू धर्मालाही भोगावे लागतील. 'हिंदूंच्या हितासाठी कटिबद्ध' असलेल्या संघाला मग त्यातला त्यांचा वाटा नाकारता येणार नाही. (आज सहसा कुणी हिंदू इस्लाम 'कुबुल' करीत नाही पण ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या दुर्लक्षणीय नाही. मला अशी धर्मांतरित माणसे माहिती आहेत. आणि ह्या धर्मांतरासाठी एक आमीष म्हणा, कारण म्हणा, काय सांगतात माहित आहे का? म्हणतात, तुमच्या हिंदूंमध्ये पाहा सगळा गोंधळ असतो, किती बेशिस्त, किती अनागोंदी तुमच्या समारंभात आणि देवस्थानात! तेच आमचे चर्च पाहा; किती शांत, व्यवस्थित, नीटनेटके! ह्यात आर्थिक आमिषे असतात ती वेगळीच पण हे आर्ग्युमेण्टही लोकांना भुलवते ह्याचा मी साक्षी आहे.) हे संघाला मान्य नसेल किंवा त्यांचे काही म्हणणेच नसेल तर विषय संपला माझ्या दृष्टीने. मान्य असेल तर ते काय करतात हे जाणून घ्यायला मला आवडेल.

यासाठी संघ कसा काय जबाबदार?

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 3:40 pm | श्रीगुरुजी

१) "१९९३ पासून मुंबईत तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले या आपल्या विधानाला काही पुरावा?" हे मत फक्त माझ्या अनुभवांवर आधारलेले आहे. मी राहतो तो परिसर व घर ते ऑफिस ह्या आठ कि. मी. मार्गावर १९९३ पूर्वी दुर्गापूजेचा एकही मांडव नसायचा, आता सात असतात. त्यातील काहींचा पसारा प्रतिवर्षी वाढतोच आहे. गणपती एकाचे चार झाले. दहीहंडी एक असायची तीही छोटेखानी, आता ४-५ झाल्या. आणि ह्या सर्वांचे उपद्रवमूल्यही (दोन दिवस आधी रस्त्यावर उभे केलेले स्टेज आणि बॅनर्स, प्रत्यक्ष दहीहंडी फोडायला येणाऱ्या गोविंदा पथकांच्या वेळेस रस्ते पूर्णपणे बंद करणे, आणि प्रचंड आवाज, इ.) वाढले. खेरीज, माघी गणपती, महाशिवरात्री, इ. आहेतच. हे माझे निरीक्षण आहे. माझे एक नातेवाईकमुंबईत पश्चिम उपनगरात राहातात त्यांच्याकडे इमारतीला हादरे बसावेत एवढा मोठा आवाज असतो ह्या दिवाळीसुद्धा सर्व सणांना.

या सर्वांना संघ जबाबदार आहे का?

४) संघ स्थापन झाला तेव्हाची आणि आताची परिस्थिती भिन्न आहे; आता हिंदुजागरणाची गरज उरलेली नाही.

हिंदुजागरणाची अजूनही गरज आहे. भारतात अजूनही पाकिस्तान, दहशतवादी इ. विषयी ते केवळ मुस्लिम धर्माचे असल्याने सहानुभूती असणारे निधर्मांध आहेत. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, त्यांना सरकारी नोकर्‍या कमी मिळतात इ. गोष्टींवर उपाय म्हणजे त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवाव्यात असा अजूनही प्रचार होतो. आपल्या अवस्थेसाठी मुस्लिम स्वतःच जबाबदार आहेत हे उघड सांगण्याची हिंमत यांच्यात नाही. बुरखा, तलाक इ. अन्यायकारक गोष्टींचे समर्थन करणारे व या गोष्टींना विरोध करणार्‍यांवर हिंदुत्ववादी म्हणून टीका करणारे अजूनही मोठ्या संख्येने आहेत. म्हणूनच हिंदुजागरणाची गरज आजही आहे.

असल्या गोंगाटी, क्लेशकारक आणि राजकारण्यांच्या व दादा लोकांच्या (दोहोत फरक आहे का?) हातात गेलेल्या सार्वजनिक सणांनी प्रबोधन तर दूरच राहिले, उलट हिंदू अधिक मागे जाईल. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, तिने सामाजिक जागा किती व्यापायची ह्याचा विचार झाला नाही तर आपली अधोगती ठरलेली आहे. ज्या गोष्टी घातक आहेत त्यांना विरोध करण्यासाठी संघ जर पुढे येणार नसेल, मग त्याची कारणे कोणतीही असोत, तर त्याचे दुष्परिणाम समाजाला आणि हिंदू धर्मालाही भोगावे लागतील. 'हिंदूंच्या हितासाठी कटिबद्ध' असलेल्या संघाला मग त्यातला त्यांचा वाटा नाकारता येणार नाही. (आज सहसा कुणी हिंदू इस्लाम 'कुबुल' करीत नाही पण ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या दुर्लक्षणीय नाही. मला अशी धर्मांतरित माणसे माहिती आहेत. आणि ह्या धर्मांतरासाठी एक आमीष म्हणा, कारण म्हणा, काय सांगतात माहित आहे का? म्हणतात, तुमच्या हिंदूंमध्ये पाहा सगळा गोंधळ असतो, किती बेशिस्त, किती अनागोंदी तुमच्या समारंभात आणि देवस्थानात! तेच आमचे चर्च पाहा; किती शांत, व्यवस्थित, नीटनेटके! ह्यात आर्थिक आमिषे असतात ती वेगळीच पण हे आर्ग्युमेण्टही लोकांना भुलवते ह्याचा मी साक्षी आहे.) हे संघाला मान्य नसेल किंवा त्यांचे काही म्हणणेच नसेल तर विषय संपला माझ्या दृष्टीने. मान्य असेल तर ते काय करतात हे जाणून घ्यायला मला आवडेल.

यासाठी संघ कसा काय जबाबदार?

सतीश कुडतरकर's picture

15 Sep 2016 - 1:38 pm | सतीश कुडतरकर

आजानुकर्णांचे सर्व प्रतिसाद पूर्ण पटले.

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 2:17 pm | पगला गजोधर

संघ अभ्यासकांसमोर माझी शंका

संयुक्त महाराष्ट्र / वेगळा विदर्भ, या वरती संघाची वा संघगणांची भूमिका काय ?

संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संघाची वा संघगणांची भूमिका काय होती ? व सध्याच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना बाबत संघाची वा संघगणांची भूमिका काय आहे ?

(संघगणांची = संघाचे जेष्ठ कार्यकर्ते / विचारवंत / थिंकटॅंक मेम्बर लोकांची )

या चर्चेत मत देण्याइतका अभ्यास नाही.
एक जाणुन घेण्याची प्रामाणिक इच्छा आहे.
ईशान्य राज्यात संघाने काय काम केलेले आहे ? त्याचे स्वरुप काय आहे ?
व लोकप्रभा या साप्ताहीकात एका कार्यकर्त्यांच सदर येत असे त्यांचे नाव व थोडी माहीती कृपया द्यावी ही विनंती.
ईशान्य भारतीयांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी एक फार चांगल काम संघ स्वयंसेवकाने केलेल आहे इतकच माहीत आहे.
फार दिवसांपुर्वी वाचलेल असल्याने आता आठवत नाही म्हणून विचारतोय तो संदर्भ कृपया द्यावा.

आणि हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबादचे आणि चिखली अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक व देवगिरी बँक या दोन संघानेच चालवलेल्या संस्था आहेत का ? असल्यात त्या फार उत्तम रीतीने शिस्तीने चालवल्या जातात असे प्राथमिक मत आहे.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 4:11 pm | श्रीगुरुजी

जवळपास ४०० प्रतिसादातून काही गोष्टी पुन्हा एकदा दॄग्गोचर झाल्या.

संघ विरोधकांना कधीही संघाशी वैचारिक पातळीवर मुकाबला करता आला नाही. संघाची विचारसरणी व तत्वज्ञान त्यांना कधीही वैचारिक युक्तीवाद करून खोडता आले नाही. संघाचे विचार चुकीचे आहेत हे कधीही त्यांना व योग्य विचार कोणता हे त्यांना कधीही वैचारिक पातळीवर करता आलेले नाही. संघाचे कोणते विचार चुकीचे आहेत हेही सांगता आलेले नाही. संघावर निव्वळ बेलगाम आरोप करताना आरोपांना पुष्टी देणारा एकही पुरावा देता आला नाही किंवा जे आरोप केले ते सिद्ध करणारे एकही उदाहरण देता आले नाही.

हे सर्व जमत नसल्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन चड्डी, विष्ठा इ. शब्द वापरून प्रतिसाद दिले गेले. संघाच्या आपत्तीनिवारण मदतकार्याचा उल्लेख केल्यावर ते कार्य नाकारता येत नसल्याने 'मग त्यात काय विशेष केले' अशी हेटाळणी केली गेली.

जो कोणी वैचारिक प्रतिवाद भूमिका मांडत असतात त्याविरोधात वैचारिक पातळीवरून विरोध करणे शक्य नसल्याने अभद्र भाषेचा वापर करणे म्हणजे त्या वैचारिक भूमिकेचा आम्ही किंचितही प्रतिवाद करू शकत नाही इतकी ती भूमिका तर्कशुद्ध आणि सशक्त आहे याची ती अप्रत्यक्ष कबुलीच असते.

यांना फक्त संघाचा द्वेष करता आला. त्यामुळेच संघावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे एवढेच त्यांना जमते.

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 4:30 pm | पगला गजोधर

संघ अभ्यासकांसमोर माझी शंका

संयुक्त महाराष्ट्र / वेगळा विदर्भ, या वरती संघाची वा संघगणांची भूमिका काय ?

संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संघाची वा संघगणांची भूमिका काय होती ? व सध्याच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना बाबत संघाची वा संघगणांची भूमिका काय आहे ?

(संघगणांची = संघाचे जेष्ठ कार्यकर्ते / विचारवंत / थिंकटॅंक मेम्बर लोकांची )

श्री गुरुजी
आपण संघाचे आग्रही समर्थक दिसता. म्हणून आपल्याला दोन बाबतीत स्पष्टीकरण विचारतो. मला प्रांमाणिकपणे दोन बाबतीत स्पष्टीकरण कृपया द्य्वावे.
समता ऐवजी समरसता अशी भुमिका संघ जेव्हा घेतो तेव्हा
संघ हा प्रामाणिकपणे सामाजिक समता न मानता
विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचासरणी हे
दुसर्‍या
विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचारसरणी पेक्षा
कमी किंवा जास्त
उच्च किंवा नीच्च
असे मानतो वा प्रतिपादतो असे म्हटल्यास ते चुक आहे का ?
नसल्यास समरसता हा समतेचा पर्याय होउ शकतो का ?
समरसता एक स्वतंत्र सुंदर मुल्य असु शकते पण समते ला पर्याय म्हणून जेव्हा त्याचे प्रतिपादन आग्रहाने केले जाते
तेव्हा ते मुळ समता या समरसतेहुन कैकपट अधिक महत्वाच्या मुलभुत मानवी मुल्याला तुडवण्याचे काम करते
असे आपणास वाटत नाही का ?
संघाची या विषयी नेमकी काय भुमिका आहे ?
एक राजाराम एक रॉजर एक रहेमान हे समान पातळीवर संघ बघतो की एक कोणी श्रेष्ठ आहे व इतरांशी समरस होण्याचे औदार्य केवळ दाखवले इतपतच त्याचे नैतिक कर्तव्य आहे. हे जे केले हेच फार मोठे काम झाले समरसतेचे असे संघ मानतो.
यात स्पष्टपणे हिंदु हा मुसलमान वा ख्रिश्चन वा शिख पेक्षा बेसीक ह्युमन डिग्नीटीच्या आणि राइट्स स्केल वर संघ समान मानतो की खाली किंवा वर
व समान बेसीक ह्युमन डिग्नीटीच्या आणि राइट्स आधारे जर मानतो तर त्याला "समान" का मानत नाही
केवळ "समरसता" या रीप्लेसमेंट वर का समाधान मानतो.
मग संघ अल्पसंतुष्ट आहे असे समजावे का ?

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 9:28 pm | श्रीगुरुजी

समता ऐवजी समरसता अशी भुमिका संघ जेव्हा घेतो तेव्हा
संघ हा प्रामाणिकपणे सामाजिक समता न मानता
विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचासरणी हे
दुसर्‍या
विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचारसरणी पेक्षा
कमी किंवा जास्त
उच्च किंवा नीच्च
असे मानतो वा प्रतिपादतो असे म्हटल्यास ते चुक आहे का ?

होय. हे प्रतिपादन चूक आहे. संघ विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचासरणी हे दुसर्‍या विशीष्ट वर्ग/वर्ण/व्यक्ती/विचारसरणी पेक्षा
कमी किंवा जास्त उच्च किंवा नीच्च आहे असे मानत नाही.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 4:32 pm | बोका-ए-आझम

ज्यांना संघाच्या चुका सांगायच्या आहेत त्यांनी त्या जरुर सांगाव्यात. पण कुत्सितपणे शेरेबाजी करुन हेटाळणी करणे आणि टीका करणे यात फरक आहे असं जर त्यांना वाटत नसेल आणि संघाचे समर्थन करणारे अशा हेटाळणीला उत्तर देणार नाहीत असं जर त्यांना वाटत असेल तर ते चूक आहे. अजूनही संघाने दलितविरोधी असल्याचा एकही पुरावा सादर केला गेलेला नाही, पण संघ दलितविरोधी असल्याचा आरोप मात्र केला गेलेला आहे. यावरून काय ते कळतंच.

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 4:40 pm | पगला गजोधर

पुणे: नथुराम गोडसे हा शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता, असा दावा गोडसेच्या नातवाने केला आहे. सात्यकी सावरकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.
नथुराम गोडसेला संघामधून कधीही काढण्यात आलं नाही, किंवा त्याने कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नाही, असं सात्यकी यांनी म्हटलं आहे. संघाशी एकनिष्ठा दाखवणाऱ्या नथुराम आणि गोपाळ गोडसे या दोघांचं काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही जपून ठेवल्याचं सात्यकी यांनी म्हटलं आहे. मात्र, नथुराम स्वयंसेवक नसल्याचा दावा सातत्यानं संघाकडून केला जातो हे अतिशय क्लेशदायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
1932 मध्ये सांगलीत नथुरामने संघामध्ये प्रवेश केला आणि शेवटपर्यंत बौद्धिक कार्यवाहची जबाबदारी सांभाळली, असा दावा सात्यकी यांनी केला. गांधी हत्येचं समर्थन न केल्याचं आपण समजू शकतो, मात्र सत्यापासून पाठ फिरवली जाऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी संघावर टीकाही केली आहे.

सात्यकी सावरकर यांनी संघाची आरोप करुन बदनामी केली ? का हा एक पुरावा मानावा, आमच्या सर्ख्या सामान्य माणसान्नी ? जरा समजाउन सान्गा. (क्रु त्रागा न करुन घेता, वैयक्तिक न घेता समजवा प्लिज)

फाशी देण्यात आलं. मृत्यूपूर्वी दिलेल्या statement मध्ये संघ स्वयंसेवक असल्याचा उल्लेख त्याने केलेला नाही. निदान तसा पुरावा कुठेही नाहीये. गोडसे संघाचा स्वयंसेवक असेल/नसेल पण तो अखिल भारतीय हिंदू महासभेचा सदस्य होता. महासभेने चालू केलेल्या अग्रणी या दैनिकाचा तो संपादक होता. नंतर या दैनिकाचं नाव हिंदू राष्ट्र असं ठेवण्यात आलं. अनेक जणांना संघ, जो १९२५ मध्ये स्थापन झाला, तो १९०७ मध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभेचा भाग वाटतो. पण यालाही काही पुरावा नाही. हिंदू महासभेचे एक नेते डाॅ.बाळकृष्ण मुंजे यांनी संघाचे संस्थापक डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. पण संघ आणि महासभा यांचा संबंध दोघांचीही हिंदुत्ववादी विचारसरणी सोडली तर असल्याचा पुरावा नाही. गांधीजींची हत्या झाल्यावर झालेल्या खटल्यात हिंदू महासभेचे तत्कालीन अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरुन अटकही केली होती आणि गोडसे आणि नारायण आपटे यांच्याबरोबर आरोपीही बनवण्यात आलं होतं. पण सरकारने त्यांना निर्दोष सोडलं. एक प्रकारे हिंदू महासभा या राजकीय पक्षाचा गांधीजींच्या हत्येशी काहीही संबंध नसल्याची आणि गोडसेने ही हत्या स्वतःच्या वैयक्तिक क्षमतेने केली याची ही कबुली होती. त्याचवेळी संघावरही बंदी घालण्यात आली होती, पण संघाच्या एकाही नेत्याला अटक वगैरे झालेली नव्हती.

सात्यकी सावरकर यांच्याकडे नथुराम आणि गोपाळ गोडसे संघ स्वयंसेवक असल्याचा पुरावा असल्यास इतकी वर्षे हा पुरावा कुठे होता हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जर गोडसे संघाचा कार्यवाह होता (हे महत्वाचे पद आहे) तर त्याची आणि त्याने घेतलेल्या निर्णयांची नोंद असायला हवी होती. संघावर बंदी असताना नागपूरच्या संघकार्यालयावर पोलिस पहारा होता आणि तिथल्या कागदपत्रांची तपासणी चालू होती. गोडसे जर संघात होता आणि कार्यवाह पदापर्यंत पोचला होता तर त्याचा काहीतरी पुरावा इथे असायला हवा होता. मला वाटतं सात्यकी सावरकरांनी हा जो पुरावा आहे तो आता मांडावाच. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागून जाईल.

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 4:42 pm | पगला गजोधर

विधर्भाशी तुमची नाळ जेडली आहे असे समजुन
तुमच्याकडुन उत्तर आपेक्शु का ?

संघ अभ्यासकांसमोर माझी शंका

संयुक्त महाराष्ट्र / वेगळा विदर्भ, या वरती संघाची वा संघगणांची भूमिका काय ?

संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संघाची वा संघगणांची भूमिका काय होती ? व सध्याच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना बाबत संघाची वा संघगणांची भूमिका काय आहे ?

(संघगणांची = संघाचे जेष्ठ कार्यकर्ते / विचारवंत / थिंकटॅंक मेम्बर लोकांची )

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Sep 2016 - 5:13 pm | अनिरुद्ध.वैद्य

मोठे मोठे विषय असतील तर भाष्य वगैरे करतो. असल्या छोट्या छोट्या विष्यांवर संघाने भाष्य केलेलं आठवत नै.

मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर

महाराष्ट्राची दोन नाही, तर चार राज्ये व्हावीत, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केली असून त्यावरून नवं वादळ उठण्याची शक्यता आहे. वैद्य यांनी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ही मागणी केली. स्वतंत्र विदर्भ राज्याचं अनेकदा समर्थन करणारे श्रीहरी अणे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र राज्य व्हावं, असं विधान करून गोत्यात आले. यावरून सरकारची कोंडी झाल्याने अणे यांना राजीनामा द्यावा लागला. हा वाद अद्यापि निवळलेला नसतानाच वैद्य यांनी या निमित्ताने आरएसएसचा अजेंडा पुढे करून मोठ्या वादाला तोंड फोडले आहे. महाराष्ट्राची दोन नव्हेत, चार राज्ये करायला हवीत. संघाच्या परिभाषेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा-खान्देशचा समावेश असलेला देवगिरी, अशी चार राज्ये आहेत. आंदोलनातून या राज्यांची निर्मिती न होता सरकारने त्यासाठी नवीन राज्य पुनर्रचना आयोग नेमावा आणि त्या आयोगाने ही राज्यं वेगळी करावीत, असे मत मा. गो. वैद्य यांनी मांडलं. अणे यांच्या राजीनाम्याचं मात्र त्यांनी समर्थन केलं.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 5:48 pm | बोका-ए-आझम

या गोष्टीला पंतप्रधान नेहरू आणि गृहमंत्री सरदार पटेल यांचा विरोध होता. संघाने यावर नेहरू आणि पटेल यांची बाजू घेतली होती. पण पोट्टी श्रीरामुलू यांच्या उपोषण आणि आत्मसमर्पणामुळे तत्कालीन मद्रास इलाख्यातून तेलुगूभाषिक आंध्र प्रदेश निर्माण करण्यात आला आणि भाषावार प्रांतरचना अनिवार्य झाली. यासाठी नेमलेल्या आयोगाने मुंबई ही राजधानी असलेलं गुजरात आणि महाराष्ट्र यांचं द्विभाषिक राज्य आणि हैदराबाद संस्थानाचा मराठीभाषिक भाग (आजचा मराठवाडा) आणि बेरार प्रांताचा मराठीभाषिक भाग (आजचा विदर्भ) यांचं मराठीभाषिक राज्य ही शिफारस केली होती. ती अर्थातच मान्य झाली नाही आणि कालांतराने संयुक्त महाराष्ट्राची आणि गुजरातची निर्मिती झाली. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी बनवण्याचा आणि तिथे विधानसभेचं हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय बहुतेक वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना घेतला गेला.

भाजपने आणि पर्यायाने संघपरिवाराने छोट्या राज्यांना पाठिंबा दिला आहे. २००० मध्ये भाजपची केंद्रात सत्ता होती आणि मध्यप्रदेशपासून छत्तीसगड, बिहारपासून झारखंड आणि उत्तर प्रदेशापासून उत्तराखंड ही राज्यं कुठलाही हिंसाचार वगैरे न होता विभाजित झाली होती. महाराष्ट्रात सध्या तरी वेगळ्या विदर्भावर भाजपने मौन बाळगलेलं आहे.

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 5:57 pm | पगला गजोधर

भा ज प ची भूमिका नको, संघाची भूमिका माहिती करून घ्यायची होती, तुमच्याकडून.
कारण नंतर कोणी समर्थक असा मुद्दा सांगू शकतो, भा ज प ही संघाची भ्रातृ संघटना आहे, संघाचे स्वतःचे व्हिजन आहे वै वै
त्यामुळे भा ज प च्या भूमिकेशी /वक्तव्याचा संघाशी संबंध जोडून कांगावा होत आहे . वै वै

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 6:56 pm | बोका-ए-आझम

भाजप हा संघपरिवारातला राजकीय पक्ष आहे. त्यामुळे त्याची भूमिका महत्त्वाची आहे, कारण जर राज्य विभाजनाचा निर्णय घ्यायचा झाला तर तो संघ घेणार नाहीये, भाजप घेणार आहे - त्यावेळी सत्तेत असला तर. त्यामुळे भाजपचं नाव घेतलंय. बाकी भ्रातृसंघटना वगैरे राहू दे.

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 7:33 pm | पगला गजोधर

ओके

(क्षमस्व पण) ३७० कलम रद्द करणे / न करणे, सामान नागरी कायदा करणे / न करणे,हे सुद्धा भाजप च्या अखत्यारीत येतंय ना ? पूर्वी गाठजोड सरकार होती भाजपाची, पण आता तर लोकसभेत एकहाती सत्ता आहे,
मग निदान ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव/ सामान नागरी कायदा प्रस्ताव (फक्त प्रस्ताव) तरी भाजपने पेश करावा, असा आग्रह संघ करताना दिसत नाही (जेव्हा नॉन भाजप सरकार लोकसभेत होते, तेव्हा संघ जेव्हडा पुरजोरपणे आग्रह ठेवायचा त्यामानाने... )

चुना(वी) जुमला.

Hindu organisation Akhil Bharatiya Hindu Mahasabha (ABHM) has accused Vishwa Hindu Parishad (VHP) and its associate units of pocketing more than Rs 1,400 crore in cash and “quintals of gold bricks”, which were collected from across the world as donations for construction of Ram temple in Ayodhya.

http://indianexpress.com/article/cities/lucknow/ram-temple-in-ayodhyahin...

चौदा वर्षे वनवास भोगलेल्या देवाच्या नावानं १४०० कोटी गिळंकृत??

व्ही एच पी अँड असोसिएट्स

असोसिएट्स म्हणजे नेमके कोण कोण ?

ही बातमी मोदी सरकारच्या काळातील आहे. काँग्रेसच्या काळात अशी बातमी आली असती तर एव्हाना भगव्या परिवाराने काँग्रेस, गांधी, नेहरु , मनमोहन , आयसिस, ओवेसी, पाकिस्तान, ख्रिस्ती मिशनरीज , पोप ..... कुणाकुणाच्या नावानं शिमगा केला असता ते प्रभू रामालाच ठाऊक !

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 8:58 pm | चंपाबाई

आमचे लोक किती शुद्ध ! एक पैचाही भ्रष्टाचार करत नाहीत बरं का !

मागे कोणीतरी या धाग्यावर संघ दलितविरोधी असल्याचा आरोप केला होता. पुरावा द्या म्हटल्यावर गायब झाले. आरोप करायला काही लागत नाही.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 8:44 pm | श्रीगुरुजी

(क्षमस्व पण) ३७० कलम रद्द करणे / न करणे, सामान नागरी कायदा करणे / न करणे,हे सुद्धा भाजप च्या अखत्यारीत येतंय ना ? पूर्वी गाठजोड सरकार होती भाजपाची, पण आता तर लोकसभेत एकहाती सत्ता आहे,
मग निदान ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव/ सामान नागरी कायदा प्रस्ताव (फक्त प्रस्ताव) तरी भाजपने पेश करावा, असा आग्रह संघ करताना दिसत नाही (जेव्हा नॉन भाजप सरकार लोकसभेत होते, तेव्हा संघ जेव्हडा पुरजोरपणे आग्रह ठेवायचा त्यामानाने... )

घटनादुरूस्तीसाठी दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत असावे लागते. सध्या भाजपकडे लोकसभेत साधे बहुमत आहे तर राज्यसभेत भाजपकडे जेमतेम २०% खासदार आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही घटनादुरूस्ती फक्त भाजपच्या मतांवर मंजूर होणे अशक्य आहे. ३७० वे कलम किंवा समान नागरी कायदा या घटनादुरूस्तीला भाजप व शिवसेना वगळता इतर बहुसंख्य पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत ही विधेयके मंजूर होणार नाहीत.

समान नागरी कायद्याच्या दृष्टीने हळूहळू पावले पडू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक या विषयावर केंद्र सरकारचे मत मागविले आहे. या मतानंतर न्यायालय पुढील पावले टाकेल. जर न्यायालयाने तोंडी तलाक बेकायदेशीर आहे असा निर्णय दिला तर त्याच्याबरोबरीने तलाकपिडीत मुस्लिम महिलांच्या पोटगीच्या अधिकारात सुद्धा सकारात्मक बदल होऊ शकतो. वास्तविक न्यायालयाने या दृष्टीने १९८६ मध्येच शहाबानो खटल्यात योग्य तो निर्णय दिला होता. परंतु तत्कालीन राजीव गांधी सरकारने मुस्लिम धर्मांधांसमोर लोटांगण घालून न्यायालयाचा निर्णय डावलून पोटगीचा नवीन कायदा आणून मुस्लिम महिलांना अंधारात ढकलून दिले होते. यावेळी तसे होणार नाही अशी आशा आहे.

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 10:07 pm | पगला गजोधर

म्हणूनच गुरुजी,

मग निदान ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव/ सामान नागरी कायदा प्रस्ताव (फक्त प्रस्ताव) तरी भाजपने पेश करावा,

असे म्हटले,

फक्त प्रस्ताव तर ठेवावा (त्यासाठी तुम्ही म्हणता तशी दोनीकडे बहुमताची गरज नाही, फक्त प्रस्ताव मांडण्यासाठी)

प्रस्ताव ठेवल्याने (बीजेपी कडून), व त्यांना तसे करण्यास बाध्य केल्यामुळे (संघाकडून),

लोकांपुढे संघाला, आपण आपल्या वचननाम्याला / विचार / व्हिजन शी एकनिष्ठ होतो,
व आपल्यापरीने आपण पूर्ण प्रयत्न केले, असा मेसेज कृती द्वारे देता येईल.

हार जीत ही फलनिष्पत्ती डोळ्यापुढे ठेवून, संघाने सिन्सिअर एफर्ट घेतलेच नाही, ही विरोधकांची
भावी आरोप फैरी, निष्फळ करता येईल की ....

१९८४ ते १९८९ या काळात काँग्रेसला लोकसभेत आणि राज्यसभेत असं दोन्ही ठिकाणी पाशवी बहुमत होतं. शाह बानो खटल्याच्या निमित्ताने तलाकची अनिष्ट प्रथा कायमची मिटवून टाकणे आणि समान नागरी कायद्यासाठी प्रयत्न करणे हे काँग्रेसला सहज शक्य होतं. अरिफ मोहम्मद खान यांनी ते साध्य करत आणलंही होतं पण खुर्शीद आलम खान आणि सय्यद शहाबुद्दीन यांच्यासारख्या पुराणमतवादी नेत्यांना अवास्तव महत्व देऊन काँग्रेसने हे पाशवी बहुमत शाह बानो केसमधील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल करणारा कायदा करायला वापरलं. ही वस्तुस्थिती आहे आणि ती लपवता येणार नाही. त्यानंतर ३० वर्षांनी लोकसभेत बहुमत असलेलं एकेकाळच्या विरोधी पक्षाचं सरकार आहे आणि राज्यसभेत ' नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे ' असं समजणाऱ्या काँग्रेसकडे बहुमत आहे. समान नागरी कायदा हा त्यामुळेच एक न सुटणारा तिढा बनला आहे. पाशवी बहुमत असताना ज्या पक्षाने vote bank politics साठी हा कायदा आणू दिला नाही, ते अात्ता त्याच्याबाबतीत सकारात्मक होतील अशी अपेक्षा करणं मूर्खपणा आहे आणि लोकशाही असल्यामुळे विरोधी पक्षाला डावलून इतका महत्वाचा निर्णय घेणं शक्य आणि बरोबर, दोन्हीही नाही.

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 7:58 pm | पगला गजोधर

लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप सरकार, यावेळी, (मागील नॉन भाजप सरकारांनी दुर्लक्षित केलेले ) प्रथम सरसंघचालक डॉ हेडगेवार यांचे भारतातील
स्वातंत्र चळवळीतील योगदान लक्षात घेऊन, त्यांना भारत-रत्न पुरस्कार साठी विचार करतील काय ?
किती सुयोग्य परिस्थिती पहा, एक स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान, व डॉ कार्य ज्या महाराष्ट्रात झाले, त्याचे मुखमंत्री पण स्वयंसेवक...

होईल का विचार भारतरत्नासाठी ?

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 8:05 pm | चंपाबाई

का त्यांचा अपमान करताय ? वरती कुणीतरी लिहिले आहे ना की मदर टेरेसापेक्षा जास्त लायक नावं नोबेल पुरस्कारासाठी उपलब्ध आहेत म्हणून ....

त्याना डायरेक्ट नोबेल द्यायला हवं...