संघः कलियुगातील एक चमत्कार

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
12 Sep 2016 - 1:26 pm

संघ आणि त्याचे टिकाकार

साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.

आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.

समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.

इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.

खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.

आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.

शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.

तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.

म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला

समाजमत

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 8:51 pm | श्रीगुरुजी

लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप सरकार, यावेळी, (मागील नॉन भाजप सरकारांनी दुर्लक्षित केलेले ) प्रथम सरसंघचालक डॉ हेडगेवार यांचे भारतातील
स्वातंत्र चळवळीतील योगदान लक्षात घेऊन, त्यांना भारत-रत्न पुरस्कार साठी विचार करतील काय ?
किती सुयोग्य परिस्थिती पहा, एक स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान, व डॉ कार्य ज्या महाराष्ट्रात झाले, त्याचे मुखमंत्री पण स्वयंसेवक...

होईल का विचार भारतरत्नासाठी ?

याबद्दल माहिती नाही. परंतु डॉ. हेडगेवार हे भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र आहेत याविषयी अजिबात शंका नाही.

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 10:16 pm | पगला गजोधर

याबद्दल माहिती नाही. परंतु डॉ. हेडगेवार हे भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र आहेत याविषयी अजिबात शंका नाही.

तुमच्या मनांत शंका नाही हे आम्ही जाणतो.

परंतु (अवांतरा बाबत क्षमस्व)
जसे, शिवाजी राजे हे आपले महाराज / मायबाप आहेत, याबाबत स्वराज्याच्या
रयतेच्या मनात अजिबात शंका नव्हती, तरीही राजांनी राज्याभिषेकाची
फॉर्मॅलिटी केली (कारण जाहीर पणे पूर्ण जगाला फॉर्मली दखल घ्यायला लावणे, हा सुद्धा पोलिटिकल मास्टरस्ट्रोक होता)

असाच पोलिटिकल मास्टरस्ट्रोक संघाने आपल्या राजकीय विंग कडून मारून घ्यावा.

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 11:10 pm | चंपाबाई

भारतरत्न हा पुरस्कार जे लोक १९४७ नंतर काही काळ तरी हयात होते व ज्यानी अतुलनीय कार्य केले त्यानाच मिळते. हेगडेवार १९४० ला गेले.

अशी अट आवश्यक आहे. नाहीतर भ्हूतकाळातील टीळक , तानाजी , अकबर अशी करत यादी सम्राट अशोक , वसिष्ठमुनी , प्रभू रामचंद्र , प्रल्हाद , दधिचीमुनी .... अशी उणे अनंताकडे निघून जाईल.

प्रभू रामचंद्रांना पुरस्कार भेटेल कि नाही हे कठीण आहे कारण ते विष्णूचा अवतार होते ना ? विष्णूंना १० वेळां तोच पुरस्कार देणे मुश्किल आहे.

इरसाल's picture

15 Sep 2016 - 4:57 pm | इरसाल

अभिनंदन !!!

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Sep 2016 - 5:01 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

400+ प्रतिसादांबद्दल नर्मदेतील गोटा यांचे गोदावरीतील गोटा देवून अभिनंदन!

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Sep 2016 - 5:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

लोकं किती फ्रॅक्चर्ड मेंटलिटीचे असतात हे ह्या धाग्यावर उत्तम समजते, वाखु साठवतोय, किमान ह्यापुढे असल्या वांझ धाग्यांवर चर्चा करायची इच्छा झाल्यास शांत बसायची शिकवण देणारा धागा म्हणून तरी वाखु साठवायलाच हवी.

असल्या विषयांवर कितीही डोंबल आपटलं तरी आउटपुट काहीच नसते अंधसमर्थक आपल्याच तर्कांत असलेल्या फटी पाहायला तयार नसतात अन पुरोगामी म्हणवणारे लोक्स संघाने पिढीजात घबाड लुटून नेल्यागत संघावर तुटून पडत असतात , दोघांचे ब्रेनवॉशिंग पक्के असते काय हशील असल्या "चर्चेत", काही दिवस अगोदर माझाच तोल ढळतोय का काय असली परिस्थिती आली होती, सुदैवाने मोदक अन अतिवास ताईंसारख्या माझ्या काही मित्रांनी मला सावरले, तदनंतर बराच विचार केला अन असल्या चर्चात काहीच हशील नाही ह्या उत्तराशी पोचलो, असो. चालू देत धुळवड! :(

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 5:45 pm | संदीप डांगे

अशा धाग्यांचे मनोरंजन मूल्य उत्कृष्ट आहे असे म्हणावे तर आपली चॉईस लय खालच्या पातळीची आहे असे वाटेल... तर ते हि म्हणवत नाही.

इतका धागा झाल्यावर नक्कीच किमान काही नविन तपशील एखाद दोन तरी गवसतातच.
ते इतके कमी असले तरी
कधी कधी वर्थ टु चेक असतात.
म्हणजे अगदी मोठ्या उपशानंतर फारच कमी असले तरी नेहमीच्या विषयाकडे नविन दॄष्टीने बघण्यास भाग पाडतात.
अर्थात अगोदरच फार खोलात गेलेलो असु तर मग नविन मिळण्याची शक्यता मंदावते हे खरे.
मला तरी काही अगदी नविन बाबी माहीत झाल्या संघाविषयीच्या या धाग्यातुन
ज्या अगोदर माहीत नव्हत्या.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 7:13 pm | संदीप डांगे

नक्कीच! तुमच्या मताला सहर्ष अनुमोदन देण्यात आनंद वाटत आहे!

साहना's picture

15 Sep 2016 - 9:16 pm | साहना

संघ ह्या विषयावरील आमची वैयक्तीक मते काहीही असली आणि कितीही टोकाची असली तरी आणि एकमेकांची आम्ही कितीही थट्टा मस्करी आणि कदाचित मैत्रीपूर्ण अपमान जरी केले तरी मिपाकर म्हणून मी सर्वांचाच आदर करते हे इथे लिहू इच्छिते. इथे होणारे वाद निरर्थक आहेत, भाषा शिवराळ आहे आणखी खूप काही बोलले गेले आहे पण सुलतान सारखा रद्दड चित्रपट पैसे देऊन ३ तास पाहण्यापेक्षा दिवसातील २० मिनिटे मी कधीही असल्या चर्चेत खर्च करेन. आणखी काही निष्पन्न झाले नाही तरी Sarcasm, टोमणे, सध्या कुठला महिना चालू आहे इत्यादी विषयांवर बुद्धी खर्च होते आणि त्यातून आपला फायदाच आहे. ४chan, ९gag सारख्या ठिकाणी वाद घालण्याची मला सवय आहे आणि त्या तुलनेत इथली तथाकथीत असभ्य भाषा म्हणजे ४ वर्षीय बालकांचे बोबडे बोल आहेत असे वाटते.

संघाच्या चांगल्या गोष्टी नाहीत असेही नाही. लहानपणापासून कधीही दलित किंवा तथाकथित खालच्या जातीच्या लोकां बरोबर विशेष संबंध काडीचाही आला नव्हता. किंवा दुर्गम भागातील लोकांचे आयुष्य वगैरे कसे असते ह्याची काहीही माहिती नव्हती. संघाच्या प्रचारकांशी ओळख झाली आणि अश्या लोकां बरोबर ओळख आणि त्यांच्या समस्यांची जाणीव सुद्धा झाली. छत्तीसगड मधील आदिवासी मुलगा असो व ईशान्य भारत मधील विद्यार्थी ह्यांचे आमच्या घरी येणे जाणे झाले आणि त्यांच्या शिक्षणात वगैरे मदत करण्याचे भाग्य लाभले. त्यांना मदत करणे हि पुढील पायरी होती.

"संघटन" ह्या विषयावर संघाचे काम अद्वितीय आहे आणि कदाचित फक्त आर्मी त्या बाबतीत त्यांना मात देऊ शकते. संघ दलित विरोधी आहे असे काही जण म्हणतात पण माझ्या लिमिटेड अनुभवांत अगदी उलटे लक्षांत आले. सर्व जात धर्माचे लोक सर्व भेदभाव विसरून अश्या प्रकारे एक येताना चुकून दिसतात. त्या दृष्टिकोनातून संघ अतिशय reformative आहे ह्यांत शंका नाही. भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम का असेना पण काँग्रेस ला पर्याय निर्माण करण्यात संघाचे योगदान आहे. भाजपाला पुन्हा ट्रेक वर आणून हिंदू हिट जपण्याचे काम सर्वच हिंदू मतदार करू शकतात.

हिंदू समाजापुढे फार मोठ्या समस्या आहेत. ह्यांतील बहुतेक समस्याचे निर्मूलन करणे संघाच्या आवाक्या बाहेरचे आहे आणि सामान्य हिंदूने बाह्य सरसावून/पदर खेचुन/जीन्स थोडी लूज करून जबाबदारी घेणे आवश्यक आहे. ह्यांतील बहुतेक समस्या संघाच्या रडार वर सुद्धा नाहीत. ह्या उलट पुराण कालीन इतिहास, गाय रक्षण, आणि अनेक निरर्थक आणि शून्य महत्वाच्या गोष्टीवर संघ आपली शक्ती वाया घालवत आहे. असल्या विषयांनी हिंदू समाजाची दिशाभूल होते प्रायोरिटी बदलतात आणि जिथे आपण लढायला पाहिजे होते तिथे शरणागती पत्करली जाते. त्या शिवाय संघ वटवृक्षा प्रमाणे आहे आणि त्याच्या सावलीतून इतर झाडांना वाढणे मुश्किल आहे.

संघाच्या कामाचा नेट impact positive तेंव्हाच असेल जेंव्हा हिंदू समाज म्हणून आमच्या हितरक्षणासाठी अनेक संस्था आणि संघटना विविध स्तरावर काम करतील.

सुदैवाने सु स्वामि, राजीव मल्होत्रा, वामसी झालुरी, कोएनराड एलस्ट, अरुण शौरी, शाश्वती सरकार, रविणार इत्यादी अनेक विभूती हे काम छान पणे करत आहेत आणि सोशल मीडिया वगैरे द्वारे त्यांना जास्त शक्ती सुद्धा मिळत आहे. ह्या प्रकारच्या लोकांना एकत्रित करून संघाला पर्याय निर्माण करणे आणि केवळ intellectual पातळीवर काम करणारे लोक निर्माण करणे फार महत्वाचे आहे आणि त्या दृष्टीने माझे काम सुरु आहे.

अनुप ढेरे's picture

15 Sep 2016 - 10:28 pm | अनुप ढेरे

उजव्या बाजूला संघापेक्षा चांगला कोणीतरी ऑप्शन हवा आहे. राईट, लिबरल. जे गौ माता, गो मुत्र, वैदिक विमाने, GM विरोध असल्या प्रकारात पडणार नाही. RTE सारख्या धोकादायक कायद्यांविरुद्ध प्लॅट्फॉर्म देईल. तो ऑप्शन सनातन सारखे लोक नकोत फक्त.

सनातनचा विषय न काढलेलाच बरा. पण हिंदू विरुद्ध अन्याय होतो आहे आणि संघ/भाजप बोटचेपे धोरण अवलंबत आहेत ह्या मुले सनातन किंवा रामसेने सारखया संघटना टोकाची भूमिका घेत आहेत. राजकीय स्तरावर हिंदू हित न्याय्यपणे साधले गेले नाही तरी रामसेने किंवा सनातन सारख्या संस्था जास्त ह्यांत शंका नाही.

आम्ही कॅलिफोर्निया मध्ये ग्लोबल धर्म फौंडेशन चालवतो (अध्यात्म आणि शिक्षण क्षेत्र) . राजीव मल्होत्रा ह्यांनी भारतांत इन्फिनिटी फौंडेशन (संशोधन आणि प्रकाशन) सुरु केले आहे. संदीप ह्यांचे इंडियाफक्टस (मीडिया), प्रसन्ना ह्यांचे स्वराज्य (मीडिया) क्षेत्रांत फार चांगले काम सुरु आहे. ह्यांना आपण मदत करू शकता. मी स्वतः Bookstruck.in द्वारे भारतीय साहित्य गरीब लोकां पर्यंत पोचवायचे काम करीत आहे.

माझ्या मते संघ सारखी वेगळी प्रचंड संघटना हिंदू साठी गरजेची नाही एका छोट्या मुद्द्याला पकडून शेकडो लोकल संस्था असल्या तरी चालतील. अश्या संस्था गरजेप्रमाणे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ न्यायाने चालू शकतात. गोव्यांत भाभासुम हे कार्य करते त्याच प्रकारचे कार्य लोकल संघटना संघ पेक्षा जास्त चांगल्या करू शकतात. संघात राहून वेलिंगकर साराख्यान सुद्धा ते काम करायला शक्य झाले नाही.

बहुतेक वेळा संघटनेची व्याप्ती आणि संघटनेचा focus ह्यांत ट्रेडऑफ असतात. ह्यामुळे संघटना जितकी मोठी तितक्या तडजोडी जास्त.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 9:25 pm | श्रीगुरुजी

या धाग्यावर संघावर केले गेलेले बिनबुडाचे आरोप (आरोप करणार्‍यांनी अजूनपर्यंत आरोपांच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा दिलेला नाही.) -

- संघ अगोदर राष्ट्रीय ध्वज आणि भारतीय संविधान मानत नव्हता.
- खोटे बोलणे हे संघाचे व्यवच्छेदक लक्षण आहेच.
- १९४२ साली फितुरी करुन इंग्रजांची मदत केलेल्या एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते.
- बाबासाहेब पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा प्रचार करून सोनिया गांधींस निवडून आणा म्हणून प्रचार केला
- संघाने इफ्तार पार्टी आयोजित केली.
- संघ म्हणजे आलीस इन ओन्डरलॅंड आहे. काहींनी काम ना करता, कुठल्याही विषावर ठोस भूमिका ना घेता गुळमुळीत धोरण ठेवले कि कुणीही नवे ठेवू शकत नाही आणि जबाबदार झटकून टाकता येते.
- थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही.

हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करताना ह्यांची भंबेरी उडते. हिंदू शब्दाची व्याख्या उसनवारी वरून घेतली कुणाकडून तर सावरकर ह्यांच्या कडून. ती सुद्धा समजली अर्धवट. गणवेश आणि एकूण संघटन पद्धती घेतली युरोपिअन लोकां कडून. आपल्याच इतिहास संस्कुर्तीचा नाही अभ्यास आणि चालले आपले धर्म रक्षण करण्यासाठी.
- संघ कम्युनिस्ट मंडळींचे आर्थिक व्यवस्थेचे विचार वाचून ते आपल्या नावाने ऑरगॅनिझर आणि पांचजन्य मध्ये छापून आणतो
- संघ खाजगीत आरक्षण व दलिताना नावे ठेवतो व संघात आंबेडकर जयंती साजरी केल्याचा गांजावाजा करतो
- जेंव्हा संकट नसते तेंव्हा "भारत माता कि जय" म्हणायचे आणि रमजान मध्ये इफ्तार पार्टी द्यायची असले बोटचेपे धोरण आहे ह्यांचे. कुणी confront केले कि काय ह्याचे शेपूट उपविष होऊन हे लोक आपल्या बिळांत जाऊन लपतात.
- संघाचे सोंग म्हणजे "वृद्ध नरी पतिवृता" ह्या प्रकारचे आहे. चार मुंडकी आहेत म्हणून सांगताना आहे पण त्यांत आणि झोंबी मध्ये फरक काही नाही म्हणून तीच भर कम्युनिस्त ह्यांना भारी पडतात.
- मंदिराच्या खुल्या मैदानावर कुणीही "इस देश मी राहेन होगा ... " घोषणा देतो पण ज्यादिवशी सरकार एखादा हिंदू विरोधी कायदा करते तेंव्हा ह्यांचा दंड उत्तिष्ठ असतो कि नाही हे पाहणे सूचक ठरेल.
- हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात
- कानफटात वगैरे मारण्याची फक्त भाषा ह्यांना जमते. वेळ येते तेंव्हा ह्यांची खाकी चड्डी पिवळी होते.
- संघाचे वैचारिक पातळीवर अस्तित्वच नाही मुळी.
- माझ्या (हिंदू) धर्माचा ठेका घेतला आहे अश्या प्रकारे संघ वागतो आणि हिंदू धर्माला अनेक प्रकारे नुकसान पोचवतो
- मागे पुरुषसुक्त वापरून पाण्यापासून पेट्रोल करणाऱ्या थोर वैज्ञानिकाला संघाने कवेत घेतले होते.
- दलितांवर केलेल्या अत्याचाराचे कुठलेही पुरावे दिले तरी त्यात संघाचा काही सहभाग नाही असे म्हणण्याची सोय अर्थातच उपलब्ध आहे.
- संघ मला आजूबाजूच्या परिसरात कुठे सक्रिय दिसत नाही हे तर खरेच पण तेवढाच issue नाहीये. तो अप्रत्यक्षपणे समाजाच्या अधोगतीस कारणीभूत ठरतो आहे
- दुर्गापूजा, माघी गणपती, शिवरात्री, मंडप, लाऊड स्पीकर्स, प्रचंड आवाज, ट्रॅफिक जॅम वगैरेंमध्ये अनेकदा संघिष्ठ आणि त्यांच्या समविचारी संघटनाच अग्रेसर असतात.
- मात्र संघाचा दुसरा चेहरा आहे जो राजकीय आहे जो काळवंडलेला आहे , ज्यात राम मंदिराचे राजकारण, हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरांचे इतर संघटनेमार्फत समर्थन , मुस्लिम आणि ख्रिस्ती द्वेष , दलिताबाबतीत संशयी भूमिका, गो रक्षा यांचा समावेश होतो .

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 11:02 pm | चंपाबाई

गुरुजी ,

त्यातील एक विधान माझे आहे... त्याचे स्पष्टीकरण देत आहे...

१९४२ ...

http://www.frontline.in/static/html/fl1503/15031150.htm

http://scroll.in/article/697147/what-exactly-was-vajpayees-role-in-the-q...

संघवाले असं घडलंच नाही , असे म्हणत होते... पण फ्रंटलाइन्चे इन्वेस्टिगेशन व स्वतः युगपुरुषांचा त्याला दिलेला दुजोरा सत्य सांगतो.

ह्यातील बहुतेक विधाने माझी आहेत.

"ख्रिस्ती म्हणजे हिंदू, भारत देशावर प्रेम असलेला प्रत्यके जण हिंदू पण ख्रिस्ती लोकांची घरवापसी करायला पाहिजे कारण हे ख्रिस्ती म्हणजे हे हिंदू पोपला मानतात आणि ह्या असल्या ख्रिस्ती हिंदूंची लोकसंख्या वाढली कि देशाला धोका उत्पन्न होतो"

अश्या प्रकारच्या दैवी महातर्काचा बिमोड करण्याची बौद्धिक कुवत माझ्या कडे नाही. ख्रिस्ती लोक पण हिंदू पण काही कारणास्तव ह्या हिंदूंचा देशाला धोका आहे हे सगळे समजण्यासाठी मला कदाचित पंचगव्य इत्यादी दैवी शक्तींनी युक्त असलेले दिव्य द्रव्य प्यावे लागेल.

संघवाल्यानी खुशाल "आम्ही विजयी झालो" अश्या घोषणा देत विरुद्ध दिशेने संचलन करावे.

> मागे पुरुषसुक्त वापरून पाण्यापासून पेट्रोल करणाऱ्या थोर वैज्ञानिकाला संघाने कवेत घेतले होते.

सादर दिव्यवचन मी माजी सरसंघचालक पपू सुदर्शनजी ह्यांच्याच मुखातून स्व-कानांनी ऐकले होते आणि त्या दिवसापासून संघाच्या कुठल्याही कार्यक्रमा पासून दोन हात दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

तर्राट जोकर's picture

15 Sep 2016 - 9:28 pm | तर्राट जोकर

मजेदार धागा व चर्चा.

विटेकरसाहेबांनी मला केलेली एक खरड टाकतो, समजदार को इशारा काफी:

मी विचारले: आपण संघात मोठ्या पदावर काम करता असे समजते. पण इथल्या चर्चांमधे भाग घेत नाही. असे का?

विटेकर
Wed, 30/03/2016 - 12:18
.........पण इथल्या चर्चांमधे भाग घेत नाही. असे का?

इथल्या चर्चाना फारसा अर्थ असतो असे मला वाटत नाही , कोणाला करायचे काहीच नाही , नुसत्याच वंझोट्या चर्चा ! यापेक्षा अधिक आनंददायी करण्यासारखे पुष्कळ आहे, असे माझे अनुभवांती मत बनले आहे. तसा वेळ सत्कारणी लागतो , इथेच मिपावर अन्य वाचणेबल पुष्कळ आहे / असते, त्यातच वाचन मात्र राहातो , वाट्ल्यास प्रतिसाद देतो ही , पण फार हिरीरीने काही लिहू गेल्यास त्यातून मनोभेद होत राहतो , साध्य काहीच नाही !
आणि तसे ही माझी व्यक्तिगत धारणा ही आता बदलण्याच्या पार पल्याड गेली आहे. Its like sacred cow. विनोदनासाठी काय करावे याबाबत ही माझी धारणा पक्की आहे, I do not enjoy it anymore.

संघ विचारांच्याबाबतीत काही वैचारिक प्रतिवाद करावा असेही काही आता राहिले नाही, कृतीने ते अधिक व्यवस्थित मांडले जाते , माणसे प्रेमाने जिंकता येतात, आपल्या कामाने जिंकता येतात. ज्यांना केवळ शाब्दिक बुडबुडे करायचे आहेत , त्यांच्यासाठी आपण वृथा का शिणावे ?

संघाच्या बाबतीत मी आता विटेकर सरांच्या विचारानुसार वागायचं ठरवलं आहे. इथे तावातावाने भांडणारे संघसमर्थक विटेकर सरांच्या विचारानुरुप कधी वागतील ते त्यांचे ते ठरवू देत, आपण का वृथा शिणावे?

मुक्त's picture

15 Sep 2016 - 9:33 pm | मुक्त

छत्रपतींना ज्यांनी अवतारी पुरूष जाहीर केले ती संघटना म्हणजे एक चमत्कार च आहे.
संघाचे खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे वेगळे.

मुक्त's picture

16 Sep 2016 - 1:57 am | मुक्त

हिन्दूत्वासाठी मरायला मावळे व चरायला कावळे. त्याचे नाव हिन्दूत्व.

गामा पैलवान's picture

16 Sep 2016 - 3:13 am | गामा पैलवान

साहना,

१.

अश्या प्रकारच्या दैवी महातर्काचा बिमोड करण्याची बौद्धिक कुवत माझ्या कडे नाही.

अगदी बरोबर बोललात. मात्र यात तुमचा दोष नाही. मेकॉलेछाप शिक्षणापासून सुटायचा मार्ग खडतर आहे.

२.

सादर दिव्यवचन मी माजी सरसंघचालक पपू सुदर्शनजी ह्यांच्याच मुखातून स्व-कानांनी ऐकले होते

मेकॉलेछाप शिक्षणाच्या पगड्यापासून मुक्त होण्याची गरज सुदर्शन यांनाही आहे/होती.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

16 Sep 2016 - 3:16 am | गामा पैलवान

साहना,

विषय निघालाच आहे तर विचारतो, सनातन संस्थेचा इतका दुस्वास का? की तिचा विषयही नको काढायला? कारण जाणून घ्यायचं कुतूहल आहे म्हणून विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

वेगळा विषय आहे ! पपू आठवले साहेब (हल्ली काय विशेषणे वापरतात ठाऊक नाही) ह्यांची ओळख फार फार वर्षांपूर्वी मी लहान होते तेंव्हा एका बिल्डिंगच्या सचिवांनी (त्यांच्या मागे) करून दिली होती त्यांनी काय विशेषणे लावली होती हे मी इथे लिहू शकत नाही. मी त्या विषयावर बोलणे म्हणजे शेणात दगड फेकणे होईल. सनातनची माझी टीका फार वेगळ्या पातळीवरची आहे.

सचु कुळकर्णी's picture

16 Sep 2016 - 3:38 am | सचु कुळकर्णी

साहित्य गरीब लोकां पर्यंत पोचवायचे काम करीत आहे.
What a contrast statement

साहना's picture

16 Sep 2016 - 3:57 am | साहना

का ?

सचु कुळकर्णी's picture

16 Sep 2016 - 4:12 am | सचु कुळकर्णी

You said साहित्य गरीब लोकां पर्यंत पोचवायचे काम करीत आहे
It's a contrast statement. because a hungry stomach makes short prayer.

म्हणजे गरीब लोकांना पुस्तके देऊ नये का ? उद्या कोणी गरीब लोकांसाठी शाळा काढीत असेल तर तो मूर्ख आहे का ?

सचु कुळकर्णी's picture

16 Sep 2016 - 4:32 am | सचु कुळकर्णी

Tumhala nahi kalaycha. Tari sudha maze pratisad punha ekada vachun paha.

सचु कुळकर्णी's picture

16 Sep 2016 - 4:29 am | सचु कुळकर्णी

लहानपणापासून कधीही दलित किंवा तथाकथित खालच्या जातीच्या लोकां बरोबर विशेष संबंध काडीचाही आला नव्हता. किंवा दुर्गम भागातील लोकांचे आयुष्य वगैरे कसे असते ह्याची काहीही माहिती नव्हती.
Lol ;). Sahana ji Punyachya aahat ka ? Mag barobar aahe Pune to California. Kharya American lokana suddha America baheril jagach Afaat knowledge asta ;)

साहना's picture

16 Sep 2016 - 5:10 am | साहना

ओके

चंपाबाई's picture

16 Sep 2016 - 8:32 am | चंपाबाई

b

कृपया पट किती असे विचारू नये.