संघ आणि त्याचे टिकाकार
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.
आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.
समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.
इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.
शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.
तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.
म्हणून काम करणार्याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
प्रतिक्रिया
13 Sep 2016 - 3:45 am | नावातकायआहे
आणि १०० ! पु प्र शु
13 Sep 2016 - 7:34 am | फेदरवेट साहेब
एकंदरीत संघ हे एक वेगळं रसायन आहेच. संघाचे नाव खराब करण्यात काही अघोषित (अन अंतःकरणापासून जातीयवादी) भाट लोक पुढे असतात, दुर्दैवाने खुद्द संघातही असली माणसे कमी नाहीत ह्याचे एक कार्यकर्ता म्हणून वैषम्य वाटते
13 Sep 2016 - 10:01 am | साहना
परीट मेला त्या दिवशी त्याची खरी ऐपत कळते कारण इतर दिवशी तो लोकांचे छान छान कपडे घालून फिरत असतो. मंदिराच्या खुल्या मैदानावर कुणीही "इस देश मी राहेन होगा ... " घोषणा देतो पण ज्यादिवशी सरकार एखादा हिंदू विरोधी कायदा करते तेंव्हा ह्यांचा दंड उत्तिष्ठ असतो कि नाही हे पाहणे सूचक ठरेल.
संघाचे अनेक चांगले गुण आहेत. पण हे लोक आर्थिक अफरातफर करत नाहीत म्हणणे खोटे ठरेल. अफ़रातफ़रीच्या गोष्टी ते उघड बोलवून दाखवत नाहीत. कोर्टात सिद्ध होईल असे पुरावे नसल्याने मी माझे प्रथम दर्शनी अनुभव देणार नाही.
शिक्षण क्षेत्रांत असे काय बरे दिवे लावले आहेत संघाने ? ह्यांच्या नाकाखाली काँग्रेस सरकारने RTE, ९३वि घटनादुरुस्ती इत्यादी हिंदू विरोधी गोष्टी पास केल्या. ह्यांची एकल विद्यालये ह्या खाली सध्या बेकायदेशीर ठरतील.
मनोहर पर्रीकर ह्या खंद्या स्वयंसेवकाने गोव्यात कसला कायदा केला बरे ? तर म्हणे ख्रिस्ती शाळांना १००% सरकारी अनुदान आणि हिंदू शाळांना शून्य. काल हेडगेवार शाळेंत शाखा घेतली म्हणून कारवाईचा हुकूम दुसऱ्या स्वयंसेवकाने (पार्सेकर) दिला आहे. अखंड भारताच्या घोषणा देता देता गोव्यांत संघाचीच फाळणी झाली आहे.
जेंव्हा संकट नसते तेंव्हा "भारत माता कि जय" म्हणायचे आणि रमजान मध्ये इफ्तार पार्टी द्यायची असले बोटचेपे धोरण आहे ह्यांचे. कुणी confront केले कि काय ह्याचे शेपूट उपविष होऊन हे लोक आपल्या बिळांत जाऊन लपतात.
९० वर्षे झाली तरी नाव घेण्यासारखे एक तरी पुस्तक ह्यांच्या बौद्धिका मधून आले आहे काय ? "आमच्या भारद्वाज ऋषींनी आधीच विमानाचा शोध लावला होता" आणि "शेण लावल्याने कॅन्सर बरा होतो" असली थोतांड ५ वर्षांच्या पोरांना सांगणे हि ह्यांची बौद्धिक कुवत.
राम स्वरूप, सीता रॅम गोयल, अरुण शॉरी ह्यांची १० पुस्तके एका बाजूला आणि ९० वर्षांचे संपूर्ण संघ साहित्य दुसऱ्या बाजूला.
गोव्यांत संघ वाले Inquisition म्हणून ओरडतात पण एक तरी पुस्तक ह्यांनी त्या विषयावर अभ्यास करून लिहिले आहे का ? त्या विषयावरचे पुस्तक प्रियोळकर ह्या स्वतंत्र विचारवंताने लिहिले आहे. ते तरी पुन्हा प्रकाशित करावे असा घोषा मी लावला होता पण ह्यांची हिम्मत नाही.
संघाचे सोंग म्हणजे "वृद्ध नरी पतिवृता" ह्या प्रकारचे आहे. चार मुंडकी आहेत म्हणून सांगताना आहे पण त्यांत आणि झोंबी मध्ये फरक काही नाही म्हणून तीच भर कम्युनिस्त ह्यांना भारी पडतात.
13 Sep 2016 - 10:24 am | महासंग्राम
बंगाल मध्ये चालणार्या कम्युनिस्टांच्या अत्याचारांबद्दल आपले काय म्हणणे आहे हें सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
13 Sep 2016 - 10:46 am | साहना
अत्याचार हे साम्यवादाचे व्यवच्छेदक कि काय म्हणतात ते लक्षण आहे. बंगाल असो वर केरळ सापाचा धर्म विष उत्पन्न करणे आहे.
13 Sep 2016 - 10:29 am | श्रीगुरुजी
अभ्यास वाढवा एवढेच सांगू शकतो. संघाबद्दल असलेल्या गैरसमजुतींबद्दल पूर्वी अनेकदा चर्चा झालेली आहे. पुन्हा तेचतेच सांगण्याचा कंटाळा आलाय.
13 Sep 2016 - 10:50 am | साहना
आपल्या बहुमूल्य सल्ल्या साठी अतिशय धन्यवाद. संघाचा आणि संघाच्या कार्याचा व्यवस्थित अभ्यास होईल ह्या साठी ५ पुस्तके तुम्ही सुचवू शकता काय ?
RTE ह्या विषयावर संघाची काय भूमिका आहे आणि ती त्यांनी कोठे मांडली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, आपण मार्गदर्शन केले तर आपली आभारी राहीन.
13 Sep 2016 - 11:13 am | विशुमित
साहना जी,
संघांच्या आऊट डेटेड साहित्य/ पुस्तकांबद्दल प्रचंड सहमत...
13 Sep 2016 - 9:08 pm | आनन्दा
गुरूजी एकदा एक स्वतंत्र लेख लिहाच.. आम्हाला पण रेफरन्सला उपयोग होईल.. फक्त खालील गोष्टी टाळाव्यात.
१. संघभक्तीपर लिखाण. संघाची बाजू मांडा, पण आंधळी भक्ती नको.
२. संघाच्या कार्याचा लेखाखोजा देखील मांडा अशी विनंती.
13 Sep 2016 - 10:36 am | अनुप ढेरे
मस्त प्रतिसाद! आवडला.
13 Sep 2016 - 7:48 pm | प्रीत-मोहर
माझे वरचे प्रतिसाद आणि तुम्हीच दिलेल सर्क्युलर पुन्हा वाचून समजून घ्या. गुरुजींनी वर ट्रान्सलेट केलयं ते वाचल तरी चालतय:)
13 Sep 2016 - 8:31 pm | श्रीगुरुजी
+ १
गोवा सरकारच्या त्या परिपत्रकात अत्यंत सोप्या शब्दात ६ मुद्दे लिहिले आहेत. सर्व मुद्द्यांचा अर्थ अगदी सोपा आहे व त्यात कोणतीही संदिग्धता नाही. कोकणी/मराठी शाळांचे अनुदान सुरुच राहील, नवीन शाळांना प्रोत्साहन देऊन अनुदान दिले जाईल व ज्या अनुदानित शाळा जून २०११ पूर्वी कोकणी/मराठी माध्यमाच्या होत्या व त्यानंतर ज्यांनी इंग्लिश माध्यम स्वीकारले आहे अशा शाळांना सुद्धा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अनुदान कायम राहील हे मुद्दे अत्यंत सोप्या शब्दात लिहिले आहेत. ख्रिस्ती शाळा, हिंदू शाळा असे त्या परिपत्रकात शब्दच नाहीत. कोणत्याही शाळांचे अनुदान काढून घेतलेले नाही.
परंतु त्या परिपत्रकात काय लिहिलंय ते अजिबात न वाचता किंवा वाचले असल्यास अजिबात अर्थ न समजता खालच्या पातळीवर जाऊन, पर्रीकरांनी हिंदू शाळांचे अनुदान काढून घेतले व ख्रिस्ती शाळांना १००% अनुदान दिले असे धडघडीत खोटे आरोप पर्रीकरांवर आणि पर्यायाने संघावर करून व त्यांच्यावर टीकेचा भडीमार करून ते मोकळे झाले.
13 Sep 2016 - 8:43 pm | श्रीगुरुजी
नरसिंहरावांच्या काळात एक नवीन कायदा करण्याचा प्रयत्न सुरू होता. जे पक्ष धर्मावर अन्याय वगैरे प्रचारसभेत बोलतात त्या पक्षांची मान्यता रद्द करून त्यांना निवडणुक लढण्यास बंदी घालावी असा कायदा करण्यासाठी अर्जुनसिंग जोरदार प्रयत्न करीत होते. या कायद्याचे निमित्त करून भाजप व शिवसेनेवर बंदी घालावी असा त्यांचा हेतू होता. परंतु भाजपने या विधेयकाला जोरदार विरोध केल्यामुळे हा प्रयत्न बारगळला.
युपीएने आपल्या दुसर्या इनिंगमध्ये Communal Violence Bill या नावाने नवीन कायदा आणण्याचा जोरदार प्रयत्न अगदी ऑक्टोबर २०१३ पर्यंत केला होता. देशातील जातीय दंगलींसाठी त्या भागातील बहुसंख्य असणार्या धर्माला (म्हणजे हिंदूंना) जबाबदार धरण्यात यावे अशा तर्हेची तरतूद त्या विधेयकात होती. भाजपने या विधेयकाला सुद्धा जोरदार विरोध केल्यामुळे तो बारगळला.
संघ इफ्तार पार्ट्या देण्यासारख्या फालतू गोष्टी करीत नाही. आजवर असे संघाने कधीच केलेले नाही. मोदींनी सुद्धा आजतगायत गुजरातमध्ये किंवा दिल्लीमध्ये सुद्धा एकसुद्धा इफ्तार पार्टी आयोजित केलेली नाही.
एकंदरीत या सदस्याचा वरील प्रतिसाद व या धाग्यावरील इतर प्रतिसाद शून्य अभ्यास व संघाविषयीचा ओतप्रोत द्वेष दर्शवितात.
13 Sep 2016 - 10:18 am | अनुप ढेरे
RTE बद्दल दुटप्पीपणा आहेच संघाचा आणि भाजपाचा. आता सत्तेत असूनदेखील या महत्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा देखील करावीशी वाटत नाही. RTEआधीच्या घटनांबद्दल हा लेख वाचा.
http://swarajyamag.com/economy/how-congress-enshrined-sectarianism-in-in...
13 Sep 2016 - 10:48 am | साहना
मी ह्याच विषयावर मिपा वर दोन लेख लिहिले आहेत. अभिप्राय जरूर कळवा वेळ असेल तर.
13 Sep 2016 - 12:49 pm | गामा पैलवान
साहना,
तुमचे इथले प्रश्न वाचले. मी स्वत: संघाचा स्वयंसेवक नाही. तरीही प्रश्नांची उत्तरं देतो. कारण प्रश्न हिंदुत्वाशी संबंधित आहेत.
१.
>> व्याख्या हिंदुत्वाची विचारली होती हिंदू शब्दाची नाही.
हे शब्दांचा कीस पाडणे आहे.
२.
>> "हिंदुत्व म्हणजे काय हो असे १० वर्षांच्या मुलाने विचारले तर एका स्वयंसेवकांचे उत्तर काय असेल ?
>> हि व्याख्या संघाच्या कुठल्या साहित्यात दिलेली आहे ? "
संघाच्या कुठल्या पुस्तकात काय आहे ते माहित नाही. पण मला हाच प्रश्न कोणी दहा वर्षाच्या मुलाने केला तर मी सांगतो की एक सत्य आणि अनेक रूपं हे हिंदू धर्माचं सार आहे. एको सत्य विप्रा: बहुधा वदन्ति.
३.
>> मुस्लिम/ख्रिस्ती लोकांची पुण्यभू हिंदुस्थान नाही ती काबा/जेरुसलेम इत्यादी आहे. सावरकरांच्या व्याख्ये
>> प्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिम हिंदू नाहीत. आपल्या व्याख्येप्रमाणे ते हिंदू असू शकतात.
ख्रिस्ती वा मुस्लिमांस हिंदू मानायला काय अडचण आहे? ज्याप्रमाणे काबा, जेरुसालेम वगैरे पवित्र स्थानं आहेत त्याचप्रमाणे भारतभूदेखील पवित्र माना की. प्रश्न मिटला.
किंबहुना दोन भूम्या पवित्र मानणारी एक जात भारतात इतरांसोबत गुण्यागोविन्द्याने नांदत आली आहेत. कोकणातले शनवारतेली म्हणजे बेणे इस्रायली लोकं जेरुसलेमप्रमाणे भारतालाही पवित्र मानतात. कारण की ज्याप्रमाणे अब्राहमला जेरुसलेम मध्ये देवाचं दर्शन झालं, अगदी तस्संच दर्शन खंडाळा (रायगड जिल्हा) येथे काही शनवारतेल्यांना झालं होतं. त्यांच्या मते भारत जेरुसालेम इतकाच पवित्र आहे. अब्राहम व शनवारतेली वगळता इतर कोण्याही यहुद्यांस देवदर्शन झालं नाही. जर शनवारतेल्यांना भारत आपला वाटतो तर ख्रिस्ती आणि मुस्लिमांना का वाटू नये?
४.
>> जर राष्ट्रपेमी ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहे तर मग उगाच धर्मांतराला का बरे विरोध कार्याचा ?
>> धर्मांतर केले म्हणून राष्ट्रप्रेम का कमी होते ?
भारताचे जे भाग धर्मांतरित झाले ते भारताहून तुटले. म्हणून धर्मांतर वाईट.
५.
>> आमची मुले जी परदेशांत जन्माला अली आहेत स्थायिक आहेत जी भारतात कधीही अली नाही अश्याना संघ
>> अ-हिंदू मानतो काय ?
माहीत नाही. पण मानत नसावा.
६.
>> ज्या ख्रिस्ती/मुस्लिम धर्मानी आमच्या हिंदू धर्माची थट्टा केली, आमच्या मूर्तीना फोडून टाकले, आमच्या हिंदू
>> स्त्रिया वर अत्याचार केले, शेकडो लोकांचे शिरकाण केले त्यांना सुद्धा आम्ही हिंदू मानायचे काय कारण त्याचे
>> भारतावर प्रेम आहे ?
भारतावर प्रेम करणारे लोकं मूर्त्या फोडणे, हिंदूंवर अत्याचार करणे, इत्यादी कामे करत नाहीत.
७.
>> मूर्तिपूजा, निसर्गपूजा ह्यांना सर्वांत मोठे पाप मानणाऱ्या ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माला "हिंदू" मानणे हि
>> वैचारिक दिवाळखोरी आणि आमच्या धर्म परंपरासाठी बलिदान केलेल्या आमच्या पूर्वजांचा घोर अपमान नाही
>> आहे काय ?
ही वैचारिक दिवाळखोरी नाही. हे ख्रिस्ती आणि मुस्लीम पूर्वीचे हिंदूच होते. त्यामुळे त्यांची मूल्यव्यवस्था उर्वरित हिंडूंहून वेगळी नाही. याअर्थी त्यांना हिंदू म्हंटले आहे. मात्र बेणे इस्रायली लोकांनी ज्याप्रमाणे उर्वरित हिंदूंचा द्वेष करीत नाहीत त्याप्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिमांनी वागावं. बस इतकंच.
८.
>> थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो.
माझा तरी आजिबात गोंधळ उडाला नाही.
९.
>> "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही.
माझ्यासारखा थोर विद्वानास विचारायचे प्रश्न कोण्या चड्डीधारी स्वयंसेवकास विचारणे हे आपणांस अल्पबुद्धीचे लक्षण वाटंत नाही का?
१०.
>> हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करताना ह्यांची भंबेरी उडते.
राष्ट्र आणि दहशतवाद या शब्दांच्या व्याख्या करतांना युनोची भंबेरी उडते.
११.
>> हिंदू शब्दाची व्याख्या उसनवारी वरून घेतली कुणाकडून तर सावरकर ह्यांच्या कडून.
मग उसनवारीवर काय नाहीये ते जरा सांगणार का? ३९५ कलमं असलेली भारताची राज्यघटनाही उसनवारीवर घेतलेली म्हणायची का?
१२.
>> ती सुद्धा समजली अर्धवट.
ही संघाची समस्या नव्हे.
१३.
>> गणवेश आणि एकूण संघटन पद्धती घेतली युरोपिअन लोकां कडून.
काय झालं मग? चांगले ते घ्यावे. अवघे मिळमिळीत टाकावे. हे रामदासस्वामींनी सांगितलंय.
१४.
>> आपल्याच इतिहास संस्कुर्तीचा नाही अभ्यास आणि चालले आपले धर्म रक्षण करण्यासाठी.
हे मात्र बरोबर बोललात. संघाच्या जबाबदार लोकांत देखील भारताच्या दैदिप्यमान इतिहासाबद्दल औदासिन्य दिसून येतं.
आ.न.,
-गा.पै.
13 Sep 2016 - 2:50 pm | विशुमित
फेसबुक वर तर सनातन आणि संघ समर्थकांचा कलगीतुरा वाजत आहे.... काय भानगड आहे ?
13 Sep 2016 - 2:52 pm | विशुमित
हिंदूंनी नेमका कोणता झेंडा घ्यायचा हाती????
13 Sep 2016 - 2:57 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
"न सुधरण्याचा झेंडा"
.
.
काही लोक तर फाॅरेन ला जाऊन पण सुधरत नाहीत
13 Sep 2016 - 4:38 pm | साहना
> हे ख्रिस्ती आणि मुस्लीम पूर्वीचे हिंदूच होते. त्यामुळे त्यांची मूल्यव्यवस्था उर्वरित हिंडूंहून वेगळी नाही.
हे विधान मूर्खपणाचे आहे. इस्लाम, ख्रिस्ती धर्म आणि हिंदू धर्म हे पूर्णपणे विरोधी आहेत. "आपला तो एकाच देव आणि मूर्तिपूजक म्हणजे heathens" असली भावना असणाऱ्या भोंदू धर्माला हिंदू म्हणणे म्हणजे अष्टमीला बीफ कबाबचा नेवैद्य दाखवणे आहे. त्या शिवाय धर्मांतर झाले कि देशाची फाळणी होते पण ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहेत हे जरा डोक्यात नाही गेले.
at this rate उद्या कुणी "जय श्री कृष्ण" म्हणजे "थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी" असे सांगितले तरी आश्चर्य वाटणार नाही.
13 Sep 2016 - 5:54 pm | शाम भागवत
अस ऐकल आहे की अरबस्तानात जर एखादा भारतीय मुस्लीम गेला तर त्याला हिंदू मुस्लिम म्हणतात.
हाहाहा
कित्ती तो वेडेपणा अरब लोकांचा
ह.घ्या.
:-)
13 Sep 2016 - 6:41 pm | गामा पैलवान
साहना,
भारतातले ख्रिस्ती आणि मुस्लिम पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत या विधानात मूर्खपणा कसला? उद्या हिंदूंच्या भावना तुडवणं बंद केलं तर ख्रिस्ती/मुस्लिम आणि हिंदूंमध्ये फरक तो काय उरला?
आ.न.,
-गा.पै.
14 Sep 2016 - 10:25 pm | साहना
समजा १० हजार गरीब हिंदूंनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला आपल्या राहणसाहनीत काहीही फरक केला नाही तर "ख्रिस्ती लोक हिंदू आहेत" ह्या नियमाखाली संघाला ते चालेल काय ?
----
सदर फरक तुम्हाला ठाऊक नाही ह्यात आपला गोंधळ दिसून येतो. कळावी वेंकट ह्या स्वतंत्र हिंदू अभ्यासकांचे हे पुस्तक जरूर वाचावे किमान त्याचा रिव्यू तरी वाचावा
https://pothi.com/pothi/book/kalavai-venkat-what-every-hindu-should-know...
रेव्हिएव: http://koenraadelst.blogspot.com/2014/05/a-hindu-argues-circles-around.html
मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्म समजण्यासाठी त्याचे धर्म ग्रंथ खोलांत वाचणे आणि प्रत्यक्षांत त्या धर्माचे पालन कसे केले जाते हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू म्हणजे अनेकेश्वरवादि, मूर्तीपूजक, निसर्गपूजक धर्म आहे. ह्या सर्व गोष्टींना एकेश्वरवादी धर्म "जनावरापेक्षाही खाली" मानतात. कुराण बायबलची शिकवणच तशी आहे. उदा मुस्लिम ख्रिस्ती असण्यासाठी शिवलिंगपूजा, गणेशपूजेविषयी घृणा असणे अत्यावश्यक आहे. आपण एक तर मुस्लिम असू शकता नाही तर गणेशपूजक. कारण खुनाला अल्लाह माफ करतो, मूर्तीपूजेला नाही. ख्रिस्ती देव Jealus God आहे. बलात्काराला माफी करेल पण दुसऱ्या देवाच्या पूजेला नाही.
हिंदू धर्म आणि ख्रिस्ती/मुस्लिम धर्म ह्यांच्यात काहीही सामान्य नसून फक्त विरोध आहे. हे धर्म Exclusive आहेत. बौद्ध, जैन किंवा शीख हिंदू असू शकतात, अमेरिकेतील नेटिव्ह अमेरिकन लोक सुद्धा कदाचित हिंदू धर्माच्या छत्री खाली राहू शकतात पण ख्रिस्ती, मुस्लिम , जु, पारसी ह्यांना त्या छत्रीत (त्यांचा धर्म सोडल्या शिवाय) प्रवेश नाही.
आपल्याही धर्माचा अभ्यास नाही , दुसऱ्यांच्या धर्माचाही खोल अभ्यास नाही आणि त्यावर "ख्रिस्ती हिंदू सगळे सेम" असले विचार. हे विचार मूर्खपणाचेच आहेत असे नाही तर अतिशय घटक सुद्धा आहेत.
---
एका मित्राने सांगितलेली सत्य घटना. दिवाळीच्या दिवशी एक मुस्लिम फकीर घरी बक्षीस मागणीसाठी हजार झाला. परंपरे प्रमाणे आम्ही त्याला गूळ आणि पाणी दिले. त्याने पैसे दान म्हणून मागितले. आई पैसे द्यायला तयार झाली इतक्यांत आजीने. मुस्लिम फकिराने आम्ही पैसे देऊ शकत नाही असे सांगितले. "सभी एकही अल्लाह के बंदे है बीबीजी, आपला भगवान भी हमारे लिये अल्लाह है" म्हणून आपला हेका सोडला नाही. आजी एकदम खमकी होती. "ठीक आहे, ये है आमची तुळस, इस्को हम भगवान मानके हम पाया पडता है तुम अल्लाह मानके तुम्हारा नमस्कार करो और पैसे दान में लेके जाओ". ह्या तिच्या वाचनावर फकिराला राग आला आणि "हम बूट कि इबादत नाही करता" असे बोलून तो चालत झाला.
14 Sep 2016 - 10:49 pm | चंपाबाई
मुस्लिम ख्रिस्ती असण्यासाठी शिवलिंगपूजा, गणेशपूजेविषयी घृणा असणे अत्यावश्यक आहे.
संदर्भ मिळेल का ?
15 Sep 2016 - 9:58 am | सुबोध खरे
अफझलखानाच्या पदव्या पहा
दीनदार, बुतशिकन, कुफ्रशिकन
15 Sep 2016 - 10:00 am | सुबोध खरे
आणि "तुमच्या" बामियान येथील बुद्धाच्या प्राचीन मूर्ती फोडणारे कोण संघवाले होते का?
कि सर्वात शुद्ध आणि पवित्र म्हणवणारे महंमदाच्या वाटेने चालणारे (सुन्नी) तालिबान होते?
13 Sep 2016 - 1:51 pm | अनिरुद्ध.वैद्य
हे माझे संघाबाबतचे मत आहे.
;)
13 Sep 2016 - 3:06 pm | श्रीगुरुजी
संघाबद्दल एकंदरीत काही जणांचे जुने पूर्वग्रह उफाळून वर आलेले आहेत. संघ या विषयावर यापूर्वी असंख्य वेळा चर्चा झालेली आहे. पुन्हापुन्हा तेचतेच उगाळायचा कंटाळा आला आहे. संघविरोधकांना संघाला विरोध करताना वैचारिक किंवा तात्विक पातळीवरून चर्चा करता येत नाही व त्यामुळे संघावर टीका करताना ते एकदम खालची पातळी गाठतात हे काही प्रतिसादांवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
ज्याप्रमाणे हजार पानांचा प्रबंध वाचण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली तर लगेच साखरेची गोडी कळते, तद्वत संघ म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ग्रंथ वाचण्यापेक्षा काही काळ संघात काढला तर संघ लगेच समजेल. निव्वळ पुस्तके वाचून संघ म्हणजे काय याविषयी मत बनविण्यापेक्षा प्रत्यक्ष संघात काही काळ व्यतीत केल्यास संघ जास्त चांगल्या तर्हेने समजेल. तरीसुद्धा जिज्ञासूंसाठी खालील पुस्तके सुचवित आहे. ही पुस्तके वाचून नंतर काही काळ संघात व्यतीत केल्यास संघाविषयीच्या सर्व शंकांची उत्तरे मिळतील.
Secrets of RSS - Demystifying the Sangh (लेखक - डॉ. जयप्रकाश नारायण, रतन शारदा, डॉ. अशोक मोडक)
Know the RSS: Based on Rashtriya Swayamsevak Sangh Documents (लेखक - शमसुल इस्लाम)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: काल, आज आणि उद्या (लेखक - गंगाधर इंदूरकर)
_________________________________________________________
संघाबद्दल फारशी माहिती नसलेली एक वेगळ्या प्रकारची माहिती खाली देत आहे.
संघ म्हणजे निव्वळ शाखा, कवायती किंवा संचलन नव्हे. संघ टीकेकडे दुर्लक्ष करून, अनेकदा टीकाकारांना अनुल्लेखाने मारून, टीकेने निरूत्साही न होता, अनेक क्षेत्रात गाजावाजा न करता संरक्षण, शिक्षण, आंतरराष्ट्रीय संबंध, अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्र धोरण इ. वेगवेगळ्या विषयांवर विचार व संशोधन करण्यासाठी संघाने अनेक संस्था स्थापन केल्या आहेत.
१) विवेकानंद आंतरराष्ट्रीय संस्था (http://www.vifindia.org/) - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, अर्थतज्ज्ञ विवेक देब्रॉय, नीति आयोगाचे सदस्य व्ही के सारस्वत, नृपेंद्र मिश्रा इ. नामवंत या संस्थेचे सदस्य आहे. भारतातील सामाजिक, सुरक्षा व आर्थिक आव्हानांवर ही संस्था काम करीत आहे.
२) इंडिया फाऊंडेशन (http://netleondev.com/indiafoundation/) - India Foundation is an independent research centre focussed on the issues, challenges and opportunities of the Indian polity. The Foundation believes in understanding contemporary India and its global context through a civilizational lens of a society on the forward move.
Based on the principles of independence, objectivity and academic rigour, the Foundation aims at increasing awareness and advocating its views on issues of both national and international importance. It seeks to articulate Indian nationalistic perspective on issues.
India Foundation’s vision is to be a premier think tank that can help understand the Indian civilizational influence on our contemporary society.
३) Forum for Integrated National Security - भारताची राष्ट्रीय सुरक्षा, त्या दृष्टीने शेजारी देशांशी असलेले संबंध, आण्विक धोरण इ. विषयांवर ही संस्था अभ्यास व संशोधन करते. Established in 2004, FINS describes itself as an 'apolitical think tank' that believes 'a secured nationhood can provide peace and prosperity to citizens', 'keeping national security at its core'.
४) India Policy Foundation - Established in 2008, IPF describes itself as a not-for-profit think-tank engaged in "high quality research, influential thought leadership, educated debates and policy recommendations to issues of national importance for India".
It also "aims to strengthen democracy and egalitarianism", with "utmost adherence to national interest".
५) Forum for Strategic and Security Studies - Set up in 2010, FSSS claims to be an "independent, non-profit making, non-political institution" that provides "a platform for research, analysis, option formulation and evaluation of national security policies of, and security relationships between, states, particularly those in South Asia and the Asia Pacific region".
The institute's areas of "special research" include Nuclear Proliferation Review - Ripple Effect on Global Nuclear Strategies and Arms Control, Missile Defence, South Asian Security Environment, Global War on Terrorism, India's Security Matrix, Conundrum in Afghanistan, Indo-Bangladesh Relations and Climate Change and Environmental Security.
६) Public Policy Research Centre - Established in 2011 and fully launched in October 2013, PPRC addresses "the emerging challenges of 21st century".
७) Centre for Policy Studies - The centre was established in 1990. It claims to be "an institute for research and study aimed at comprehending and cherishing the essential civilisational genius of India, and to help formulate a polity that would allow the Indian genius to flourish and assert itself in the present day world".
13 Sep 2016 - 4:56 pm | साहना
ह्या सर्व संघटनांच्या प्रयत्नाने भारतात कुठलाही पॉलिसी बदल घडून आला काय ? पुढील २० वर्षांत एखाद्या क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्याचीटाकत त्यांच्यात आहे काय आणि त्या दृष्टीने काही पावले उचलली गेली आहेत का कि निव्वळ संघ प्रमाणे उभा विटेवरी अशी परिस्थतीती आहे ?
VIF ला मी RTE वर आपली भूमिका स्पष्ट करा म्हणून इमेल पाठवले अजून तरी त्यांना वेळ मिळाला असेल असे वाटत नाही.
त्यांच्या ह्या लेखांत मायनॉरिटी ह्या शब्दाचा उल्लेख सुद्धा नाही
http://www.vifindia.org/article/2012/may/16/the-right-to-education
आणि ९० वर्षांत हीच का ती उपलब्धी ?
कुणीही वाचत नाही आणि काहीही इम्पॅक्ट नाही अश्या प्रकारचे लेख लिहिणाऱ्या ३-४ संस्था ? सोनिया गांधी पासून धडा घ्या. १० वर्षांत NAC बनवून त्यांनी ४ वेळा घटना दुरुस्ती केली किमान ३ मोठे कायदे पास केले ज्याची फळे आम्हाला भोगावी लागतील. आणि पुढील १० वर्षांत काय कायदे पस करायचे ह्याचा आराखडा सुद्धा आधीच तयार. संघाच्या कॅम्प मध्ये काय खिचडी शिजत आहे ?
13 Sep 2016 - 4:57 pm | साहना
मी हे उपरोधाने विचार नाही आहे मनापासून प्रश्न आहे. आपणाला जर माहिती असेल तर जरूर सांगा कि राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर ह्या विचार टांकीनी काही बदल घडवून आणला काय ?
13 Sep 2016 - 5:16 pm | मोदक
तुमचे मनापासून विचारलेले प्रश्न आक्रस्ताळेपणे मांडून तुम्हाला हवी तशी उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहात का..?
खरोखरी उत्तरे हवी असतील तर दोन्ही बाजूंचा नीट अभ्यास करा आणि मग सभ्यतेने प्रकट व्हा.
बाकी तुम्ही डुआयडी पिलावळीतले असाल तर वरची सुचवणूक तुम्हाला लागू नाही असे समजून गरळ ओकणे सुरू ठेवा.
13 Sep 2016 - 6:28 pm | श्रीगुरुजी
कशाला पाहिजे तो उल्लेख? तसं पाहिलं तर त्या लेखात हिंदू, ख्रिश्चन इ. शब्दांचे सुद्धा उल्लेख नाहीत.
अनुदानाच्या मुद्द्यावर पर्रीकर सरकारने २०१२ मधील निवेदन तुम्हाला समजलेच नाही. तरीसुद्धा तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' अशा अर्थाचे पूर्णपणे असत्य असलेले दावे रेटून केलेत. या धाग्यावर प्रतिसाद देताना अनेक प्रतिसादात तुम्ही खालची पातळी गाठलीत. एकंदरीत तुम्ही त्या ईमेलमध्ये काय चुकीचे प्रश्न विचारले असेल व त्यासाठी कशी भाषा वापरली असेल याचा अंदाज येतोय. त्यामुळेच त्यांनी ईमेलला उत्तर दिले नसावे.
14 Sep 2016 - 1:43 am | साहना
आर्यभट्टानी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध आधीच लावला होता पण कुणी विचारले नाही म्हणून सांगितले नाही अश्या प्रकारच्या अर्ग्युमेण्ट निरर्थक आहेत.
RTE कायदा युनिफॉर्म नाही हा त्यातील घोळ कोणीही समजू शकतो. हे ज्या विचारवंतांच्या लक्षांत येत नाही ते आणि कसले विचारवंत ? आणि फायदा काय असल्या विचारटंकीचा ज्यांना मूलभूत प्रश्न सुद्धा समाजत नाहीत ? ह्या उलट स्वतंत्र हिंदू आक्टिविस्ट जसे राजीव मल्होत्रा ह्यांना हे मुद्दे तात्काळ समजतात. अगदी विदेशी विचारवंत जसे कोएनरोड एलस्ट वगैरे लोकांना सुद्धा ह्या कायद्यातील हिंदू विरोधी त्रुटी तात्काळ समजल्या पण आपले सांग वाले मात्र कम्युनिस्ट छाप लिखाणाचं करतात. कायदा, शिक्षण, अर्थव्यवस्था ह्या विषयावर संघ आणि कम्युनिस्ट ह्यांच्यात विशेष फरक नाही.
> तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले'
मी काय लिहिते ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही काय समजलात ह्याची जबाबदारी माझ्या कडे नाही.
पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता. काही दिवसांत त्याचे रूपांतरण कायद्यांत सुद्धा होईल. परिपत्रक आणि त्यासंबंधित कॅबिनेट नोट दोन्ही गोआ सरकारच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत आणि तिथे जे लिहिले आहे ते स्पष्ट आहे.
तुम्हाला अज्ञानात लोळून सुख उपभोगायचे असेल तर मी काय करू शकते ?
14 Sep 2016 - 8:22 am | प्रीत-मोहर
होईल ...अच्छा म्हणजे झालं नाही हे मान्य करता तर.पण तुम्ही तर म्हणला होता ८ शाळांच अनुदान काढल होत, त्या कोणत्या शाळा हे सांगाल का? नाही आता डायरेक्ट सांगते मी गोवा बोर्ड मधे कार्यरत आहे. त्यामुळे ग्रांट काढली ना तर मला समजतं अहो.
हां १-२ शाळा मुलं नसल्यामुळे बंद पडायच्या मार्गावर आहेत (का हे मी सांगू शकत नाही)
पर्रीकरांनी माध्यम प्रश्न नीट हाताळला नाहीये हे मान्यच आहे. पण म्हणून नाही ते त्यांच्या माथी मारु नका.
मराठी/ कोकणी शाळा कोणत्याही संस्थेच्या असल्या तर अनुदान मिळेल. इंग्रजी माध्यमातून फक्त जुन २०११ पूर्वी अनुदानित शाळांच अनुदान काढणार नाही आहेत.
आता डायोसेशन सोसायटीच्या काही शाळांना मान्यता मिळाली (माझ्या माहितीप्रमाणे त्या प्राथमिक शाळा नाहियेत).जर माध्यमिक शाळा असतील तर प्रश्नच नाही. पण प्राथमिक असतील तर या शाळांचे माध्यम कोणते ते पहावे लागेल. जर इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा असतील तर अनुदान मिळू नये त्यांना.
टीप. या शाळांसोबत अनेक बिगर ख्रिश्चन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना मान्यता मिळाल्याचे मला ठाउक आहे. त्यातल्या काही शाळा माझ्या भागातच सुरु झाल्या आहेत.
14 Sep 2016 - 8:25 am | प्रीत-मोहर
आणि अश्या प्रकारे ग्रांट काढली असेल तर ते रस्त्यावर उतरले असते की हो. आता तर भाभासुमं पण आहे सपोर्ट ला. अस काही घडल्याच माझ्या ऎकण्यात आणि वाचण्यात नाहीये.
14 Sep 2016 - 1:26 pm | श्रीगुरुजी
तुमच्या पूर्वीच्या प्रतिसादात गोवा सरकारच्या परिपत्रकासंबंधी तुम्हीच खालील लिंक दिलेली आहे.
या परिपत्रकातील सर्व मुद्दे पाहू या.
१) At the primary level, the teaching in primary schools shall be in the mother tounge of the child i.e. Konkani/Marathi, as the case may be and subject to exception provided herein after, only Konkani/Marathi primary schools shall be entitled to receive grants.
2) Government will give permission immediately to new primary schools oting to impact primary education in Konkani/Marathi. For such schools, one time initila special grant of Rs. 12.00 Lakhs and Rs. 1.00 Lakh per annum for next 05 years shall be given so as to imrpove and set up the necessary infrastructure as well as build up resources in the school.
3) State government proposes to amend suitably the Goa School Education Rules to voercome the distance criteria, in respect of permitting additional schools in Konkani/Marathi within 01 KM, provided the existing school has strength of less than 40 students.
4) All grent-in-aid primary schools, including the new ones will be eligible for full grant to primary schools including Maintenance Grant Salary Grant for non teaching staff as also addional teacher with B.Ed. qualifications for improving the quality of English/Konkani/Marathi teaching at the primary level, on a case to case basis.
5) The State Policy is to encourage Primary Education in the mother tongue of the Children i.e. with Konkani and Marathi being the regional languages of the State and in this regard, the State Government shall initiate all steps to increase the number of schools in the regional languages namely Konkani/Marathi and give financial assistance as well as full grants over and as above free salary grants to all such Konkni/Marathi schools proposed to be started in the State.
6) However, having regard to the fact that
7) The aforesaid schools will be entitled to continuw receiving grants provided the fulfill the follwoing"
a) Such schools were Konkani/Marathi schools until 10th June 2011. These schools have started English classes at the primary stage during the last academic year wholly or partly.
b) That none of such schools had given an undertaking to the Directorate of Education stating that they would not claim grant in aid from the state Government to establish or run such English Primary schools.
या परिपत्रकातील सर्व ७ मुद्द्यांमधून खालील गोष्टी अगदी स्पष्ट दिसत आहेत.
- कोकणी/मराठी माध्यम असलेल्या शाळांना अनुदान सुरूच राहील.
- नवीन कोकणी/मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यास सरकार प्रोत्साहन देऊन सरकार अशा शाळांना अनुदान देईल.
- जून २०११ पूर्वी ज्या शाळा कोकणी/मराठी माध्यमाच्या होत्या व त्यानंतर ज्यांनी इंग्लिश माध्यम सुरू केले आहे, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अशा शाळांचे देखील अनुदान सुरू राहील.
तुमचे आधीचे दोन दावे - 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' व 'पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता.' - हे धडधडीत खोटे आहेत हे या परिपत्रकातील मुद्द्यांवरून स्पष्ट आहे.
एवढे असूनसुद्धा तुम्ही आपल्या मूळच्या पूर्वग्रहदूषित व असत्य दाव्यांना चिकटून आहात व त्याचे समर्थन करीत आहात.
14 Sep 2016 - 8:30 pm | साहना
> minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education
ह्यांत मायनॉरिटी हा शब्द आपल्याला दिसत नाही का ?
"मायनॉरिटी/certain" ह्या शब्दाचा अर्थ कॅबिनेट च्या concept नोट मध्ये अधिक स्पष्ट पणे (फक्त मायनॉरिटी) दिला गेला आहे.
पूर्वग्रहाचा प्रश्नच येत नाही. पूर्वी पासून आमचे पर्रीकर आणि गोवा भाजपशी घनिष्ट संबंध आहेत. आज सुद्धा फार चांगले संबंध आहेत. अकॅडेमिक क्षेत्रांत कार्य असल्याने कायदा काय आहे, कश्या साठी केला गेला आहे आणि त्याचा वापर कसा केला जाईल हे ह्याचा माझ्या परिवाराला first hand अनुभव आहे.
पर्रीकरांना व्हिलन ठरविण्याचा माझा उद्धेश नाही उलट पर्रीकर सारखा विद्वान माणूस सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू हिताचा बळी देऊ शकतो आणि त्यासाठी तुमच्या आमच्या सारख्यांच्या डोळ्यांत तेल घालून सरकारी कारभारावर लक्ष ठेवले पाहिजे असे माझे म्हणणे आहे.
पर्रीकर ह्यांनी फक्त ख्रिस्ती शाळांचे अनुदान चालू ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो वरील मुद्यातून अगदी स्पष्ट आहे. सुमारे १३० ख्रिस्ती शाळांनी १० जून आधी माध्यम बदलले होते. एकूणच कायदा निर्माणात डायसोजेन सोसायटी ह्यांचा फार जवळचा सहभाग असल्याने त्यांनी व्यवस्थतीत गंगेत हात धुवून घेतले आहेत. १० जून आधी माध्यम बदलेल्या हिंदूचालीत शाळांची संख्या फार कमी आहे आणि त्यांना अनुदान प्राप्त होणार नाही. खरेतर सुमारे १२ खाजगी शाळांनी इंग्रजी पासून मराठी/कोंकणी माध्यम बदलले आहे.
Certain हा एक अतिशय vague शब्द परिपत्रकांत वापरला गेला आहे. Certain ह्याचा अर्थ बिगर-अल्पसंख्यांक असा होत नाही. कायदा जेंव्हा पास होईल तेंव्हा कदाचित ह्या शब्दाचा नेमका अर्थ स्पष्ट केला जाईल पण मुद्दाम हुन हा ओपन एंडेड शब्द वापरला गेला आहे. कायद्यात certain ह्या शब्दाचा अर्थ MOI concept नोट मधील डेफिनिशन ने ठरवलं जाईल असे सर्वच (गोव्यांतील) कायदे पंडितात एकमत आहे.
पान ८ वर A मध्ये तीन वर्गवारी दिल्या गेल्या आहेत. त्यातील i आणि ii म्हणजे मायनॉरिटी/certain आणि iii म्हणजे इतर (ज्यांत हिंदू इंग्रजी शाळा ज्यांनी माध्यम १० जून आधी बदलले होते) [ http://www.education.goa.gov.in/cir13/State%20Govt%20decision%20on%20MOI... ]
कायद्याची भाषा वेगळी असते. कायद्याचा भाषेंत "only minority" असा शब्द प्रयोग करण्याची गरज नाही कारण "मायनॉरिटी" ह्याचा अर्थ "only minority" असाच होतो.
14 Sep 2016 - 8:41 pm | श्रीगुरुजी
दिसतोय ना. पण याचा अर्थ तुमच्या आधीच्या दाव्यानुसार 'मराठी शाळांचे अनुदान बंद करून १००% अनुदान ख्रिस्ती शाळांना दिले' असा होतो का?
हा मुद्दा पुन्हा एकदा वाचा व त्यातील ठळक वाक्ये वाचा.
minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education, and have thereafter simultaneously shifted to English and started English Primary classes shall, vontinue to receive grants so as to give continuity to these schools and especially having regard to the fact the fact that the students in these schools should not suffer.
तुमचे एकंदरीत इंग्लिश भाषेचे अज्ञान, मनात भरलेला पराकोटीचा पूर्वग्रह व द्वेष आणि इथल्या बहुसंख्य प्रतिसादातून दिसणारी अत्यंत खालच्या पातळीची, असभ्य व शिवराळ भाषा यावरून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आहात यावर विश्वास ठेवणे अत्यंत अवघड आहे.
पर्रीकरांनी हिंदू हिताचा बळी दिलेला नाही. हा निष्कर्ष अत्यंत चुकीचा आहे.
पहिले ५-६ मुद्दे अजूनही समजलेले दिसत नाहीत. कोकणी/मराठी शाळांचे अनुदान सुरूच राहील, नवीन कोकणी/मराठी शाळांना प्रोत्साहन देऊन त्यांना अनुदान देण्यात येईल असे अगदी स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात लिहिले आहे. तरीसुद्धा पर्रीकर यांनी फक्त ख्रिस्ती शाळांचे अनुदान सुरू ठेवले हा अत्यंत चुकीचा निष्कर्ष अजूनही कायम आहे.
असे परिपत्रकात कोठे लिहिले आहे?
14 Sep 2016 - 9:17 pm | साहना
हम्म, आता मला आपला गोंधळ समजला.
मराठी/कोंकणी शाळा हे dont care टर्म आहे. म्हणजे ह्या शाळा संबंधित काहीही विशेष पोलिसी बदल पर्रीकरांनी किंवा आणखी कोणीही केलेला नाही. संपूर्ण वाद फक्त इंग्रजी प्राथमिक शाळांचाच आहे.
थोडक्यांत सांगायचे झाले तर हि क्रमवारी आहे.
०. गोव्यांत कुठल्याही इंग्रजी प्राथमिक शाळेला अनुदान मिळत नव्हते.
१. काँग्रेस सरकारने सर्व प्राथमिक इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले.
२. सुमारे १३० आणि १०-२० हिंदू खाजगी शाळांनी माध्यम बदलून अनुदानाचा फायदा घेतला.
३. पर्रीकर सरकारनी इंग्रजी प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान ह्या पुढे मिळणार नाही असे जाहीर केले.
४. जुन १० पूर्वी ज्या अल्पसंख्यांक इंग्रजी शाळांना अनुदान मिळत होते त्यांना ते तसेच चालू राहील हे घोषित केले. ह्याचाच अर्थ ज्या १०-२० हिंदू इंग्रजी प्राथमिक शाळा होत्या त्यांना ते अनुदान मिळणे बंद झाले आहे.
थोडक्यांत काय तर आज गोव्यांत सुमारे १३० ख्रिस्ती इंग्रजी माध्यमाच्या शाळा सरकारी अनुदानावर चालतात तर सरकारी अनुदानावर चालणाऱ्या हिंदू इंग्रजी शाळांची संख्या शून्य आहे. इंग्रजी प्राथमिक शिक्षण ह्या high growth मार्केट वर सरकारने चर्च ला मोनोपॉली प्रदान केली आहे.
15 Sep 2016 - 7:29 am | प्रीत-मोहर
Are you sure about this?
कारण मला जितकी इंग्रजी समजते त्यात सर्टन मधे बिगर मायनोरिटी शाळा येतात.
कोई नही. हातच्या काकणाला आरसा कशाला?DE माझ्या ऒफिसशेजारीच आहे. बघतेच विचारून.
13 Sep 2016 - 8:35 pm | राजेश घासकडवी
चमत्कार हा शब्द फारच उदारपणे वापरला आहे असं म्हणता येईल. संघाने जे काही चांगलं काम केलेलं आहे तसं काम करणाऱ्या संस्था, संघटना जगभर गेल्या हजारो वर्षांत कित्येक झाल्या. हिंदू धर्मात जी वर्णव्यवस्था आहे त्याप्रमाणे जर कलियुगात झालेल्या चमत्कारांचं वर्गीकरण करायचं झालं तर संघ हा त्यामनाने क्षुद्र चमत्कार आहे. वरच्या जातीतले चमत्कार काही नोंदवतो.
१. आधुनिक वैद्यक किंवा मॉ़डर्न मेडिसिन - पेनिसिलिनने कोट्यवधी जीव वाचवले. पोलियो, देवी, वगैरेंवरच्या लशींमुळे अब्जावधी आयुष्यं सुखी झाली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जितके लोक युद्धाने मारले तितकेच फ्लूच्या साथीने मेले. आता हे सगळं इतिहासात गेलं आहे. हा खरा उच्च जातीचा चमत्कार.
२. लोकशाही - जगभर लोकशाहीचं वारं फिरतं आहे. शंभरेक वर्षांपूर्वी जवळपास आख्खं जग कुठल्या ना कुठल्या राजवटीखाली होतं. आता लोकं काय म्हणतात हे गंभीरपणे घेणाऱ्या राज्यव्यवस्थांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. अमर्त्य सेन यांनी म्हटलेलं होतं त्याप्रमाणे दुष्काळ आणि त्यातून होणारे मृत्यू हे लोकशाही व्यवस्थेत होत नाहीत - आणि त्याची प्रचिती दिसून येते आहे. हाही उच्च प्रतीचा चमत्कार आहे. त्याआधी गेल्या हजारो वर्षांत दुष्काळात लोकं मरणं हे जवळपास नैसर्गिक होतं.
३. शिक्षणाचा प्रसार - हजारो वर्षं अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेली सामान्य जनता आता ज्ञान घेऊ शकते आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार बनलेला आहे. जगातल्या साक्षरांचं प्रमाण दोनपाच टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांच्या आसपास येतं आहे. याला म्हणतात चमत्कार. कारण तो अब्जावधी जीवनांवर सकारात्मक परिणाम करून जातो.
४. इंटरनेट/मोबाइल क्रांती - प्रत्यक्ष ज्ञान अगदी चुटकीसरशी हाताशी आलेलं आहे. त्याचबरोबर घडलेल्या मोबाईल क्रांतीमुळे जगाशी असलेला जोडलेपणा वाढलेला आहे. हा खरा चमत्कार आहे.
५. भारतीय घटना - नुसतं हिंदूंबाबतच बोलायचं तर हिंदू समाजातल्या ८० टक्के समाजाला दलित, महार, सोनार, चांभार वगैरे जातींच्या बंधनांतून बाहेर काढण्याचं काम भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. त्या चमत्काराच्या मानाने संघाचा 'चमत्कार' हा क्षुद्रच आहे.
तेव्हा चमत्कार नक्की कशाला म्हणायचं हे जरा तुलनेेनेच ठरवावं असं माझं मत आहे.
13 Sep 2016 - 8:47 pm | चंपाबाई
जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही.
दंडवत !
13 Sep 2016 - 8:50 pm | श्रीगुरुजी
लोचट प्रतिसाद!
13 Sep 2016 - 11:18 pm | चंपाबाई
मिरच्या झोंबल्या का ?
डॉ. आंबेडकरांचे कर्तूत्व जगभर गाजल्यावर संघाने आंबेडकर जयंतीचा गांजावाजा सुरु केला ना ? एकेकाळी बुद्धाला त्या धर्मातून या धर्मात ओढुन झालं .... आता बाबासाहेबाना 'त्या' संघातून 'या ' संघात ओढण्याची धडपड !
13 Sep 2016 - 11:26 pm | श्रीगुरुजी
लोचट प्रतिसाद!
14 Sep 2016 - 12:34 am | नर्मदेतला गोटा
नेमका कुणाचा
14 Sep 2016 - 11:07 am | पैसा
घटनेचे प्रारूप तयार केले ते सात सदस्यांच्या समितीने. समितीचे सदस्य होते अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तल व डी.पी. खेतान. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद होते असाही उल्लेख दिसतो. सदस्यांची नावे गांधीजींनी सत्यनारायण सिन्हा यांच्यातर्फे सुचवली होती आणि बी एन राव यानी घटनेचा पहिला कच्चा मसूदा तयार केला होता अशीही माहिती मिळते. मग "ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली" या चालीत घटना डॉ. आंबेडकरांनी लिहिली असे का म्हटले जाते? डॉ आंबेडकरांचे कार्य वादातीत आहे पण घटना तयार करण्याचे श्रेय बर्याच जणांचे मिळून आहे ना?
14 Sep 2016 - 12:12 pm | सुबोध खरे
घटना तयार करण्याचे श्रेय बर्याच जणांचे मिळून आहे ना?
असे लिहिणे म्हणजे प्रतिगामी आणि मनुवादी आहे. आम्ही पैसा ताईंचा निषेध करतो.
14 Sep 2016 - 12:15 pm | पैसा
मी पण तुम्हाला सहमत! फुरोगामी म्हणालात नाही तोपर्यंत काहीही चालेल! =))
14 Sep 2016 - 1:38 pm | चंपाबाई
ते रामाने लंकेवर विजय मिळवला , या चालीत वाचावे. टीमवर्क असले तरी टीम त्यातल्या कुणाच्या तरी नावे ओळखली जाते , तसे.
किंवा शास्त्रीय संगीताच्या भाषेत , एका थाटात भरपूर राग असतात . त्यापैकी एकाचे नाव थाटाला देतात , तसे.
14 Sep 2016 - 2:20 pm | अप्पा जोगळेकर
टीमवर्क असले तरी टीम त्यातल्या कुणाच्या तरी नावे ओळखली जाते , तसे.
ओके. तर मग यापुढे कोणत्याही डु आयडीने उचापती केल्या तर त्या 'चंपाबाई' या आयडीच्या नावे ओळखल्या जाव्यात का ?
14 Sep 2016 - 2:24 pm | श्रीगुरुजी
लोचट प्रतिसाद!
14 Sep 2016 - 4:41 pm | चंपाबाई
मूल आई व बाप दोघांचे असते... पण पूर्ण नाव म्हटले की बाबांचे नाव लागते , तसे.
बाबा !
हे तरी पटले का ?
14 Sep 2016 - 8:01 pm | तेजस आठवले
माई मोड सुरु
हो ग चंपूडी, अगं अगदी तुझा जन्म झाला तेव्हा आमचे हे आणि मी किती वेळ ठरवत होतो कि तुझे नाव काय बरे ठेवावे....
पण नाव काय ठेवायचे.. मुलीचे का मुलाचे.... तुझा तर काही अंदाजच लागत नव्हता.... पुन्हा पुन्हा पहिले तरी !!
तसे आमचे हे जरा धांदरट होतेच म्हणा पण त्यांचे शब्द मात्र खरे ठरले हो, म्हणाले, नाव काहीही ठेवा, हे बालक नेहमी नाव बदलून जगात आग लावायचे धंदे करणार हे मात्र नक्की.
मी काही फारसे लक्ष तेव्हा देऊ शकले नाही तेव्हा, मला माझ्याच दहाव्या डुआयडी चे डोहाळे लागले होते ...इश्श्य!!!
माई मोड समाप्त
हलके घेणे : सर्व वर्जिनल आयडी ....
अजिबात हलके घेऊ नये :डुआयडी....
विशेष नोंद : मी कोणाचा ही डुआयडी नाही. मी गेली 6 वर्षे वाचनमात्र होतो आणि आत्ताच सदस्यत्व घेतले आहे. सबब माझ्या इकडील सदस्यत्व कार्यकालावरून कोणतेही तर्क व आरोप करू नयेत ही विनंती!
14 Sep 2016 - 8:24 pm | चंपाबाई
नाव आत्या ठेवते .
म्हणजे तू माझी आत्या !
आत या !
14 Sep 2016 - 8:32 pm | अभ्या..
बाकी चंपेशा तुमची विचारसरणी काय का असेना, हजरजबाबी पणाला मात्र तोड नै. अशे कै लिहिता की हसलाच पैजे वाचणारा.
14 Sep 2016 - 8:33 pm | सुबोध खरे
आणि तुम्ही बाहेर जा
14 Sep 2016 - 8:39 pm | तेजस आठवले
हो,
माई तुझी आत्या आणि माईंचे हे तुझे आत्तोबा
14 Sep 2016 - 8:49 pm | बोका-ए-आझम
आता मुलाच्या वडिलांचं आणि आईचं अशी दोघांचीही नावं लागतात. मुंबई विद्यापीठातल्या गुणपत्रकावर असं नाव गेली १५ वर्षे लिहिलं जातंय. बाकी विद्यापीठांमध्येही असंच असावं. जन्म प्रमाणपत्रावरही दोघांची नावं असतात.
14 Sep 2016 - 3:03 pm | नर्मदेतला गोटा
अनेक बॅका आज दादा बाबा यांच्या नावाने ओळखल्या जातात. करोडोंच्या गैरव्यवहारात त्या अडकतात. हे आपल्यासमोर आहे. पण संघ स्वयंसेवकांच्या बँका कोणा एका व्यक्तिच्या नावाने ओळखल्या जात नाहीत. दुसरी गोष्ट खातेदारांचा पैसा लाटण्याच्या उद्देशाने त्या चालवल्या जात नाहीत. या स्वार्थी जगातले हे वेगळेपण आहे.
जातीपातींनी बरबटलेला हा आपला विचार. याचे मूळ नक्कीच माजवादात असणार.
चमत्कार शब्द वापरताना तो का हे सविस्तर लिहीले आहे. तेवढे न वाचता चमत्कार शब्दावर इतकं लिहित बसलात.
शब्दछळ करण्याचा माजवाद्यांचा आवडता छंद असतो. तो जोपासत रहा.
14 Sep 2016 - 3:22 pm | राजेश घासकडवी
नाही हो, हिंदुत्वावाद्यांना त्यांची भाषा समजेल म्हणून मी ती रूपकं वापरली. जात वगैरे शब्दांऐवजी प्रत दर्जा असे शब्द वापरले तरी माझ्या प्रतिसादात शष्पही फरक पडत नाही.
बाकी संघाला जर तुम्ही चमत्कार म्हणत असाल तर आधुनिक वैद्यकाला 'अतिमहासुपरड्युपर चमत्कार' वगैरे काहीतरी म्हणावं लागेल.
माझी तक्रार संघाच्या कार्याबद्दल नसून भोंगळ लेखनाबद्दल होती. जर लेखात अतिरेकी आणि पोकळ विधानं आली नसती तर लेख जास्त परिणामकारक झाला असता. हा फीडबॅक आहे, घ्यायचा तर घ्या, नाहीतर द्या सोडून.
14 Sep 2016 - 3:48 pm | मोदक
शष्प फरक पडत नव्हता तर प्रत दर्जा वगैरे शब्द असणारी भाषा वापरायला कोणी आडकाठी केली नव्हती ना..?
का तुम्ही सर्वमान्य भाषेबद्दल निवडक लोकांना सोयीस्कर सल्ले देता..?
14 Sep 2016 - 4:14 pm | राजेश घासकडवी
आडकाठी? छे छे, वर म्हटल्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात म्हणून मुद्दामून ते शब्दप्रयोग केले होते.
हो, पण निवडक नाही, सर्वच लोकांना देतो. असे सल्ले नको असतील तर मिपावर लेखन टाकू नये, किंवा लेखात खाली "कृपया टीका करू नये, माझ्या भावना दुखावतात" असं ठळक शब्दांत लिहावं.
14 Sep 2016 - 4:21 pm | मोदक
हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं
हे पण वरवरचा अभ्यास करून बनवलेले मत की आणखी काही..?
सर्वच लोकांना देतो.
अरे व्वा.. सुधारणा आहे, अच्छे दिन आले मिपाकरांचे.
14 Sep 2016 - 7:51 pm | राजेश घासकडवी
अहो काय चालवलंय हे? मी फक्त लेखकाला त्याच्या लेखनशैलीबद्दल सूचना केल्या. त्यांनी त्या घेतल्या असाव्यात, किंवा फाट्यावर मारल्या असाव्यात. विषय संपला. माझ्या लेखनशैलीबद्दल प्रश्न उभा केला तर मी त्याचं कारण सांगितलं. सोडून द्या ना...
14 Sep 2016 - 8:01 pm | मोदक
हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात
हे तुमचे अभ्यासपूर्ण मत आहे की अभ्यास, अनुभव आणि आकलन नसतानाही केलेले बेजबाबदार विधान..?
14 Sep 2016 - 8:31 pm | श्रीगुरुजी
अनुभव, पुरावे, अभ्यास इ. गोष्टी त्यांना विचारायच्या नसतात.
उदा. हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात किंवा सध्याची राजवट ही फॅसिस्ट राजवट आहे, ही त्यांची मते पुरावेबिरावे, अनुभव, अभ्यास वगैरे नसले तरी ठाम आहेत.
14 Sep 2016 - 8:37 pm | सुबोध खरे
http://www.firstpost.com/politics/modi-govt-is-not-fascist-prakash-karat...
सध्याची राजवट फॅसिस्ट नाही असा निर्वाळा खुद्द "करात साहेबानी" दिला.कम्युनिस्टांकडून असे प्रमाणपत्र मिळणें म्हणजे शेळींनी वाघाला अहिंसक असल्याचे प्रमाणपत्र देण्यासारखे आहे. तेंव्हा गुरुजी तुम्ही आपले मत ताबडतोब मागे घ्या.
14 Sep 2016 - 8:43 pm | अभ्या..
उपमा जरा गंडेश काय डॉक?
लांडग्याने सर्टिफिकट बकरीला देणे वगैरे चालली असती.
14 Sep 2016 - 8:48 pm | सुबोध खरे
बकरी (बोकड) अहिंसकच असतात. त्यांना सर्टिफिकेटची काय गरज?
14 Sep 2016 - 8:52 pm | अभ्या..
नै ते शिंगे बिंगे उगारणे सुध्दा बसायचे एखाद्या हिंसेच्या कलमात.
15 Sep 2016 - 11:01 am | विशुमित
राजेश सर,
अति उत्कृष्ट प्रतिसाद...!!
श्रीगुरुजी यांनी सांगितलेल्या ज्या काही 6-7 संस्था आणि त्यांचे कार्य, एक वेळ मान्य करू पण या कार्य मधून drastically (कृपया मराठी शब्द सुचवा) समाजजीवनामध्ये काहीच बदल दिसत नाही. दिसतात ते फक्त एवढेच मुद्दे-
1) राम मंदिर
2) गो रक्षा
3) लव्ह झिहाद
4) विदेशी द्वेष
5) स्वदेशीचा घोष
7) अन्य धर्मीयांशी तुलना
8) प्रसंगानुरूप बदलणारे आदर्श व्यक्ती
9) पुरातन वैदिक पद्धतीचा गाजावाजा
10) आयुर्वेद आणि हर्बल-जैविक तेच उत्तम
11) आपत्ती निवारण
12) हिंदुत्ववाद
दिलेली सूची प्रतिकात्मिक आहेत, पण एवढेच मुद्दे का प्रकर्षाने पुढे येतात.
संघ इथे थोडा कमी पडतो असं नाही वाटत का ?
15 Sep 2016 - 2:53 pm | श्रीगुरुजी
श्रीराम मंदीर निव्वळ संघाचा नव्हे तर इतर अनेकांचा खूप जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.
गोरक्षा किंवा गोवंशहत्याबंदीचा कायदा काही राज्यातून खूप पूर्वीपासून आहे. काही राज्यातून काँग्रेस सत्तेवर असतानाचा हा कायदा आलेला आहे.
लव्ह जिहादच्या हा संघाचा एकमेव किंवा फक्त संघाचा मुद्दा नाही. अनेकांनी त्यावर लिहिले आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून होणारे धर्मांतर व धर्मांतरातून नंतर पुढे येणारी वेगळेपणाची भावना व नंतर कालांतराने तिथे जन्माला येणारा फुटिरतावाद हे निव्वळ भारतासाठी धोकादायक नसून जगात जिथे जिथे मुस्लिमांची संख्या वाढली तिथे तिथे हा धोका निर्माण होत आहे.
विदेशी द्वेष म्हणजे नक्की काय?
स्वदेशीचा घोष म्हणजे नक्की काय?
उदाहरणार्थ?
बदलणारे म्हणजे काल जे आदरणीय होते ते आज तिरस्करणीय आहेत व काल जे तिरस्करणीय होते ते आज आदरणीय आहेत असा अर्थ होतो का? दोन्ही प्रकारची काही उदाहरणे देता येतील का?
उदाहरणार्थ?
असे संघ कधी म्हणाला?
हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये संघ कार्यकर्त्यांनी स्वतःहून मदतकार्यात सह्भाग घेतला आहे. संघाची ओळख जर आपती निवारण कार्यात सहभागी होणारी संस्थ असा होत असेल तर ती अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
संघ मुळातच हिंदूंसाठी स्थापन झालेला आहे. जसं कॉग्रेसची ओळख फक्त भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद, देशद्रोहीपणा, अतिरेक्यांचे समर्थन इ. वरून होते तसेच संघाची ओळख हिंदुत्ववादावरून होत असेल तर ती अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
13 Sep 2016 - 8:37 pm | राजेश घासकडवी
चमत्कार हा शब्द फारच उदारपणे वापरला आहे असं म्हणता येईल. संघाने जे काही चांगलं काम केलेलं आहे तसं काम करणाऱ्या संस्था, संघटना जगभर गेल्या हजारो वर्षांत कित्येक झाल्या. हिंदू धर्मात जी वर्णव्यवस्था आहे त्याप्रमाणे जर कलियुगात झालेल्या चमत्कारांचं वर्गीकरण करायचं झालं तर संघ हा त्यामनाने क्षुद्र चमत्कार आहे. वरच्या जातीतले चमत्कार काही नोंदवतो.
१. आधुनिक वैद्यक किंवा मॉ़डर्न मेडिसिन - पेनिसिलिनने कोट्यवधी जीव वाचवले. पोलियो, देवी, वगैरेंवरच्या लशींमुळे अब्जावधी आयुष्यं सुखी झाली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जितके लोक युद्धाने मारले तितकेच फ्लूच्या साथीने मेले. आता हे सगळं इतिहासात गेलं आहे. हा खरा उच्च जातीचा चमत्कार.
२. लोकशाही - जगभर लोकशाहीचं वारं फिरतं आहे. शंभरेक वर्षांपूर्वी जवळपास आख्खं जग कुठल्या ना कुठल्या राजवटीखाली होतं. आता लोकं काय म्हणतात हे गंभीरपणे घेणाऱ्या राज्यव्यवस्थांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. अमर्त्य सेन यांनी म्हटलेलं होतं त्याप्रमाणे दुष्काळ आणि त्यातून होणारे मृत्यू हे लोकशाही व्यवस्थेत होत नाहीत - आणि त्याची प्रचिती दिसून येते आहे. हाही उच्च प्रतीचा चमत्कार आहे. त्याआधी गेल्या हजारो वर्षांत दुष्काळात लोकं मरणं हे जवळपास नैसर्गिक होतं.
३. शिक्षणाचा प्रसार - हजारो वर्षं अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेली सामान्य जनता आता ज्ञान घेऊ शकते आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार बनलेला आहे. जगातल्या साक्षरांचं प्रमाण दोनपाच टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांच्या आसपास येतं आहे. याला म्हणतात चमत्कार. कारण तो अब्जावधी जीवनांवर सकारात्मक परिणाम करून जातो.
४. इंटरनेट/मोबाइल क्रांती - प्रत्यक्ष ज्ञान अगदी चुटकीसरशी हाताशी आलेलं आहे. त्याचबरोबर घडलेल्या मोबाईल क्रांतीमुळे जगाशी असलेला जोडलेपणा वाढलेला आहे. हा खरा चमत्कार आहे.
५. भारतीय घटना - नुसतं हिंदूंबाबतच बोलायचं तर हिंदू समाजातल्या ८० टक्के समाजाला दलित, महार, सोनार, चांभार वगैरे जातींच्या बंधनांतून बाहेर काढण्याचं काम भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. त्या चमत्काराच्या मानाने संघाचा 'चमत्कार' हा क्षुद्रच आहे.
तेव्हा चमत्कार नक्की कशाला म्हणायचं हे जरा तुलनेेनेच ठरवावं असं माझं मत आहे.
14 Sep 2016 - 12:07 am | ट्रेड मार्क
संघाने काहीतरी चांगली कामं केली हे तरी मान्य करताय. फक्त त्या तसं काम करणाऱ्या कित्येक संस्थांपैकी काही विदा दिल्यात तर आमच्या ज्ञानात भर पडेल.
बाकी जी तुलना केलीये ते सफरचंद आणि मोसंबी यांची तुलना करण्यासारखे आहे.
14 Sep 2016 - 4:08 am | राजेश घासकडवी
अहो संघाने चांगली कामं केली आहेतच. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत 'राष्ट्रवाद, देशाभिमान' वगैरे गुण चांगलेच असतात. अन्नात मीठ असावं तसं. त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. मी चमत्कार कशाला म्हणावं याबद्दल बोलत होतो. मी दिलेली उदाहरणं (शेवटचं भारतीय घटनेचं सोडलं तर) जगातल्या अब्जावधी व्यक्तींचं आयुष्य सुधरून गेलेलं आहे. भारतीय घटनेचाही चांगला परिणाम अब्ज लोकांवर झालेला आहे. आधुनिक वैद्यक ठाउक नाही अशी व्यक्ती जगात विरळा. संघ ठाउक आहे अशा जगात किती व्यक्ती आहेत?
सफरचंद आणि मोसंबी नाही, मी कलिंगड आणि चणियामणिया बोरं अशी तुलना करून दाखवत होतो. दोन्ही फळंच आहेत, पण वजनांमध्ये केवढा प्रचंड फरक आहे बघा ना! जर कोणी त्या क्षुद्र बोरांना 'महाप्रचंड फळ' म्हणायला लागलं तर हसायला येणारच.
या लेखात जो चमत्कार शब्द वापरला आहे त्याबद्दलच तक्रार आहे. 'बघा बघा चमत्कार, करा इथे नमस्कार' या म्हणण्यापलिकडे लेखात काहीही नाही. जर संघाने केलेल्या मर्यादित का होईना, पण कामांचा व्यवस्थित आढावा घेतला असता तर निदान काहीतरी नवीन काहीतरी शिकायला मिळालं असतं.
'शिक्षणक्षेत्रही संघाने काबीज केलेलं आहे' यासारखी उथळ विधानं दिसतात. अहो, भारतातली ८०-९० टक्के पोरं सरकारी शाळांमधून शिकतात. उरलेल्या १०-२० टक्क्यातला कुठचातरी अर्धापाव टक्का मिळवल्यावर त्याला 'काबीज करणं' म्हणायचं?
14 Sep 2016 - 6:13 am | A.N.Bapat
हे चमत्कार वगैरे पध्धतीचे लेख हि एका प्रकारे 'सेल्फआरती ' किंवा आरशासमोर उभे राहून आरती असते. माझे वैयक्तिक मत .
14 Sep 2016 - 2:38 pm | llपुण्याचे पेशवेll
५. भारतीय घटना - नुसतं हिंदूंबाबतच बोलायचं तर हिंदू समाजातल्या ८० टक्के समाजाला दलित, महार, सोनार, चांभार वगैरे जातींच्या बंधनांतून बाहेर काढण्याचं काम भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. त्या चमत्काराच्या मानाने संघाचा 'चमत्कार' हा क्षुद्रच आहे.
हे विधान अशा प्रचारकी थाटाचा उत्तम नमुना आहे.
14 Sep 2016 - 7:48 pm | चंपाबाई
पेशव्याना बाबा गटाचा प्रचार कसा आवडेल ? १८१८ चा स्तंभ आठवत असेल.
14 Sep 2016 - 8:27 pm | श्रीगुरुजी
लोचट प्रतिसाद!
14 Sep 2016 - 4:06 pm | दिगोचि
आम्बेडकरानी लेखणिच्या एक फटकार्यात ८० टक्के हिन्दु समाजाला जातीच्या बन्धनातुन बहेर काढलेले मला तरी कोठेहि दिसलेले नाही. म्हणजे त्यान्च्या लेखणीचा फटका फक्त घटनेच्या पानावरच अद्याप आहे. अजून मराठा समाज आरक्शण मागत आहे आणि इतर समाजहि हेच करत आहेत याचा अर्थ असा की देशातला जातिद्वेश दुर्दैवाने अजुन कायम आहे व त्यावर अनेक क्रुश्णकारस्थानी नेते जीवन जगत आहेत.
14 Sep 2016 - 8:41 pm | सुबोध खरे
डॉ. आंबेडकरांच्या तथाकथित अनुयायांनी त्यांचे पुतळे उभे केले आणि त्यांना घटनेच्या पुस्तकात बंदिस्त करून ठेवले आहे. कारण त्यांचे विचार इथल्या सारखे सगळीकडे पिंक टाकण्यासाठीच वापरले. ते विचार अमलात आणले तर यांची दुकाने बंद होतील ना.
डॉ आंबेडकर आता फक्त "जप आणि पूजा करण्यापुरते" उरले आहेत.
14 Sep 2016 - 10:33 pm | चंपाबाई
हो ना ! म्हणुनच तर रा. स्व. संघ बाबासाहेब ( तसेच गांधीजी ) यांचे फोटो पूजतो , पण आचरण मात्र शून्य
15 Sep 2016 - 10:46 am | सुबोध खरे
आणि तुम्ही औरंगजेब, अब्दाली,मुल्ला ओमर, ओसामा बिन लादेन यांची पूजा करता आणि आचरण शून्य
14 Sep 2016 - 10:22 pm | ट्रेड मार्क
तुम्ही सांगितलेले मुद्दे चमत्कार आहेत होय. आम्हाला आपलं वाटायचं विज्ञान म्हणतात ते हेच. आधुनिक वैद्यकशास्त्र, मोबाईल क्रांती चमत्कार म्हणायचे तर. शिक्षणाच्या प्रसारासाठी असंख्य लोकांनी घेतलेले कष्ट कुचकामी असून फक्त चमत्काराने हे साध्य झाले. बाबासाहेबांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांनी भारतीय घटना लिहिली म्हणायचं की.
सगळं चमत्कारिकच आहे म्हणायचं!
15 Sep 2016 - 4:59 am | राजेश घासकडवी
अहो, तुम्ही कशाला मध्ये पडता? मी लेखकाने ज्या अर्थाने 'चमत्कार' हा शब्द वापरला होता त्याच अर्थाने बोलत होतो. संघाची स्थापना दैवी साक्षात्काराने झाली असं लेखकाचंही म्हणणं नाही. काहीतरी प्रभावी, परिणामकारक या अर्थाने त्यांनी तो शब्द वापरला आहे. तुम्ही माझ्या प्रतिसादाला एक निकष आणि त्यांच्या लेखाला वेगळा निकष असं करून स्वतःचं अज्ञान का उघड करता? सोडून द्या.
मी लेखकाला भाषेबद्दल फीडबॅक दिला. त्यांनी तो मान्य करायचा की नाही याबद्दल काहीतरी ठरवलं असणारच. तिथेच विषय संपला. तुम्ही मला बोलण्याऐवजी लेखकालाच का विचारत नाही माझा मुद्दा पटला की नाही ते? मला काही या चर्चेत फार रस नाही. मी पुढच्या कामाकडे वळलेलो आहे. तुम्हीपण काहीतरी सकारात्मक करा. काय म्हणता?
15 Sep 2016 - 8:14 pm | ट्रेड मार्क
लेखक सोडून दुसऱ्या कोणी मध्ये बोलू नये असा नियम आहे का? एकमेकांशी बोलायचं असेल तर व्यनी करून बोला. मी कुठे वेगळा निकष वापरतोय. माझ्या मते लेखकाने चमत्कार हा शब्द या अर्थी वापरलाय की लाखो लोक गेली ९० वर्षे स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांना कोणी पगार देत नाही किंवा अजून कसले "फायदे" नाहीत. तरी इतके लोक संघाबरोबर आहेत आणि अजूनही त्यात वाढ होते आहे.
याचा आधुनिक वैद्यकीशी काय संबंध? किंवा तुम्ही उल्लेखलेल्या इतर गोष्टींशी काय संबंध? जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या अश्या संस्थेबरोबर तुलना केली तर ते योग्य ठरले असते. मी कशाला लेखकाला विचारू तुमचा मुद्दा पटला का नाही ते, पण लेखकाने उत्तर सुद्धा दिलं नाही म्हणजे.... समजायला तुम्ही सुज्ञ आहातच.
बाकी सकारात्मक करण्याच्या सल्ल्याबाबत धन्यवाद. पण असे सल्ले आणि अश्या लेखांवर मतप्रदर्शन करून उगाच वेळ वाया घालवू नका. का तुम्हाला हेच करणं सकारात्मक वाटतंय?
15 Sep 2016 - 10:21 pm | नर्मदेतला गोटा
करेक्ट
15 Sep 2016 - 10:23 am | शाम भागवत
@ट्रेड मार्क,
काय बारीक चिमटा काढलाय. :))
15 Sep 2016 - 11:55 am | विशुमित
राजेश जी,
तुमच्या प्रतिक्रियेची प्रतिउत्तर चुकून तुमच्या प्रतिसादाच्या वरती गेले आहे. कृपया नोंद घ्यावी.