संघः कलियुगातील एक चमत्कार

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
12 Sep 2016 - 1:26 pm

संघ आणि त्याचे टिकाकार

साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.

आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.

समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.

इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.

खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.

आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.

शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.

तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.

म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला

समाजमत

प्रतिक्रिया

ट्रेड मार्क's picture

14 Sep 2016 - 1:13 am | ट्रेड मार्क

बाकी काही लोकांचा संघावर इतका राग का आहे तेच कळत नाही. MIM, झकीर नाईकांच्या वा तत्सम संस्थांसारखे ते लोक प्रचार/ भाषणे करत नाहीत. ते ख्रिस्ती मिशनऱ्यांसारखे चमत्कार दाखवून आजार बरे करत नाहीत. ते कोणाला आग्रह करून, भुलवून, अमिष दाखवून, बळाच्या जोरावर संघात सामील करून घेत नाहीत. ते कोणाकडून पैसे मागत नाहीत.

बरं ते शाखेत करतात काय तर त्यांचे कार्यक्रम म्हणजे प्रार्थना, खेळ, बैठका ई असतात. त्यांचे विचार ऐकावे आणि आचरणात आणावे असाही त्यांचा आग्रह नसतो. हे स्वयंसेवक संघटितपणाच्या जोरावर गुंडगिरी करत नाहीत, मुलींची छेड काढत नाहीत. एवढी चेष्टा होते तरी कोणी हाणामारी केल्याची, दंगल केल्याची उदाहरणे नाहीत.

याउपर, देशांतर्गत नैसर्गिक संकटकाळात हे स्वयंसेवक मदतीला धावून जातात. संकटातील लोकांना त्यांची जात, धर्म न विचारता मदत करतात. त्यांना त्याचे कोणी पैसे देत नाहीत... पगार जाऊद्या पण जायचा, यायचा आणि तिथला खर्च पण कोणी देत नाही.

बाकी वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे ते आसपास असतात पण आहेत असं कळत नाही. तरी एखादा खाकी चड्डीवाला दिसला की चेष्टा होतेच. हातात दंड (काठी) बघितली तरी चेष्टा होते. बरं नुसतीच चेष्टा नाही तर लोक रागराग पण करतात.

काय कारण आहे याचे?

गामा पैलवान's picture

14 Sep 2016 - 1:47 am | गामा पैलवान

ट्रेड मार्क,

तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सोपं आहे. जोवर संघाचे लोकं समोरच्याच्या कानफडात भडकावत नाहीत तोपर्यंत त्यांची टिंगल, टवाळी, रागराग, द्वेष, मत्सर सगळं छानपैकी होणारंच. काळ्या दगडावरची रेघ आहे ही.

आ.न.,
-गा.पै.

कानफटात वगैरे मारण्याची फक्त भाषा ह्यांना जमते. वेळ येते तेंव्हा ह्यांची खाकी चड्डी पिवळी होते. "तो मी नव्हेच हो" किंवा "मी सरकारी नोकरी वाला माणूस" अश्या प्रकारचे सोंग पांघरून संघवाले पोबारा करतात. ह्यांची मर्दमुखी फक्त बौद्धिक वर्गांत लहान मुलांच्या पुढे.

बौद्धिकांत "आम्ही बाबरी मशीद पाडली" पण सार्वजनिक रित्या "कुणी पडली ठाऊक नाही आमचा उद्धेश फक्त अहिंसात्मक प्रदर्शन करण्याचा होता. पण ती पडली हि दुःखद घटना आहे." असली भाषा.

चार भिंतींच्या मागे "२००२ गुजरात मध्ये मुसलमानांना आम्ही धडा शिकवला" पब्लिक मध्ये "दंग्यांत आमचा काहीही सहभाग नव्हता आम्ही आपले अल्लाह घराची गाय".

मैदानात "भारत माता कि जय ... " नंतर फोन वर "अमेरिकन सिटीझनशिप मिळाली हो आमच्या सिद्धेशला... "

बौद्धिकांत "मुसलमान लोक एक नंबरचे नालायक असतात" पब्लिक मध्ये "मुसलमान ख्रिस्ती सगळे लोक हिंदूच आहेत."

बौद्धिकांत "इस्लाम हा भयानक धर्म आहे" पब्लिक मध्ये "इस्लाम शांततेची शिकवण देतो"

थोड्क्यात काय तर वैचारिक दिवाळखोरी आणि स्वतः बद्दल असलेली grandiose delusions आणि त्याचा भंग झाला कि लोकांचा कानफटात मारण्याची "फक्त भाषा".

ट्रेड मार्क's picture

14 Sep 2016 - 2:35 am | ट्रेड मार्क

तुम्हाला असं म्हणायचंय की इतर शांती आणि सलोखा पसरवणाऱ्या "अल्पसंख्यांका"प्रमाणे संघिंनी पण काठ्या टाकून शस्त्र हातात घेतली पाहिजेत. जरा कोणी खाकी चड्डीपासून ते हिंदू, हिंदुत्व, भारत याविरुद्ध बोलला की कापून टाकायला पाहिजे. हिंदूंची देवळे सोडून बाकी सगळी प्रार्थनास्थळे नेस्तनाबूत केली पाहिजेत ई ई ना?

पण जर का ते नुसतंच बोलतात तर तुम्हाला एवढा राग का त्यांचा? त्यांच्या असण्यानसण्याने जर काही फरक पडत नाही तर मग करू दे त्यांना काय करायचं ते. तुम्ही द्या सोडून.

फेदरवेट साहेब's picture

14 Sep 2016 - 6:47 am | फेदरवेट साहेब

अच्छा म्हणजे ते पोपटपंची, मखलाशी वगैरे करतात हे आपल्याला मान्य आहे अन त्यातच संघाचं दिव्यत्व वगैरे आहे असं आपण मानता का?

ट्रेड मार्क's picture

14 Sep 2016 - 7:05 pm | ट्रेड मार्क

अच्छा म्हणजे ते पोपटपंची, मखलाशी वगैरे करतात हे आपल्याला मान्य आहे अन त्यातच संघाचं दिव्यत्व वगैरे आहे असं आपण मानता का?

ऑ.. मी कुठे असं म्हणलंय? ते जे बोलतात ते तुम्हाला पोपटपंची, मखलाशी वाटत असेल तर मी करणार? प्रत्येकाची विचार करण्याची/ समजण्याची कुवत वेगवेगळी असते. काहींना रागा, दिग्गु, झाना, ओवेसी यांचे बोलणे प्रचंड आवडते.

मुद्दा हा आहे की जर संघी फक्त बोलतात, मग ते तुम्हाला वाटते तसे पोपटपंची, मखलाशी असो, त्याने तुम्हाला काय फरक पडतो?

फेदरवेट साहेब's picture

14 Sep 2016 - 6:45 am | फेदरवेट साहेब


मैदानात "भारत माता कि जय ... " नंतर फोन वर "अमेरिकन सिटीझनशिप मिळाली हो आमच्या सिद्धेशला... "

आयशपथ काय निरीक्षण आहे हे, एक नंबर, खल्लास _/\_

संघाचे चांगले काम एकतर तुम्ही पाहिलेच नाही किंवा तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे असे दिसतेय. मी संघ अगदी जवळून पाहिलेय. मला स्वतःला संघ तेव्हढा पटत नसला तरी आज भारतात असलेल्या समस्यांपैकी काही समस्यांवर संघ काम करत आहे यात वाद नाही.
त्यामुळे तुम्हाला संघ लहान वाटत असेल तर तुम्ही एकातर फारच मोठे आहात किंवा फारच छोटे आहात.

सुखीमाणूस's picture

14 Sep 2016 - 8:06 pm | सुखीमाणूस

सन्घाविरूद्ध किती जळजळ
काही वाइट नाही परदेशी जाणे•
उच्चवर्णियानी जरूर जावे सुखात रहावे
हिन्दू धर्म वाढवावा
इथे पैसा पाठवावा

श्रीगुरुजी's picture

14 Sep 2016 - 1:30 pm | श्रीगुरुजी

कानफटात वगैरे मारण्याची फक्त भाषा ह्यांना जमते. वेळ येते तेंव्हा ह्यांची खाकी चड्डी पिवळी होते. ...

संघ विरोधकांना कधीही संघाशी वैचारिक पातळीवर मुकाबला करता आला नाही. संघाची विचारसरणी व तत्वज्ञान त्यांना कधीही वैचारिक युक्तीवाद करून खोडता आले नाही. संघाचे विचार चुकीचे आहेत हे कधीही त्यांना व योग्य विचार कोणता हे त्यांना कधीही वैचारिक पातळीवर करता आलेले नाही.

यांना फक्त संघाचा द्वेष करता आला. त्यामुळेच संघावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे एवढेच त्यांना जमते.

संघाची टीका वैचारिक पातळीवर कशी करणार ? माकडाशी का कधी संस्कृत मध्ये वाद घातला जाऊ शकतो ? संघाचे वैचारिक पातळीवर अस्तित्वच नाही मुळी.

९० वर्षे, लाखो स्वयंसेवक पण "हिंदुत्व" म्हणजे काय हो म्हटले कि "ख्रिस्ती मुसलमान सगळेच हिंदू आहेत" असली वैचारिक दिवाळखोरी.

श्रीगुरुजी's picture

14 Sep 2016 - 8:25 pm | श्रीगुरुजी

याच कारणासाठी तुमच्याशी कोणी संस्कृतमध्ये वाद घालत नाही.

९० वर्षे, लाखो स्वयंसेवक पण "हिंदुत्व" म्हणजे काय हो म्हटले कि "ख्रिस्ती मुसलमान सगळेच हिंदू आहेत" असली वैचारिक दिवाळखोरी.

बादवे, आधीच्या एका प्रतिसादात संघाची हिंदुत्ववादाची व्याख्या दिलेली आहे. ती वाचली नसेलच. न वाचतात तारे तोडणे हे तुमचे व्यवच्छेदक लक्षण गोवा सरकारच्या परिपत्रकावरून लक्षात आले आहे.

नर्मदेतला गोटा's picture

14 Sep 2016 - 3:16 pm | नर्मदेतला गोटा

"भारत माता कि जय ... " नंतर फोन वर "अमेरिकन सिटीझनशिप मिळाली हो आमच्या सिद्धेशला...

भारताच्या जयजयकार करणार्‍यांना अमेरीका का देते सिटीझनशिप. हा विचार करा की.

श्रीगुरुजी's picture

14 Sep 2016 - 3:18 pm | श्रीगुरुजी

अनेक नामवंत गांधीवादी, समाजवादी, निधर्मी, पुरोगामी नेत्यांची पुढील पिढी देखील परदेशात स्थायिक झाली आहे.

साहना's picture

14 Sep 2016 - 7:43 pm | साहना

आणि अस्वले आपली विष्ठा जंगलांत टाकतात. पुरोगामी, निधर्मी लोक काय करत घेऊन आम्ही काय करणार ? इथला वाद आणि त्यांचा संबंध का ?

श्रीगुरुजी's picture

14 Sep 2016 - 8:23 pm | श्रीगुरुजी

मग तुम्ही इथे कशाला येताय? तुमची जागा जंगलात.

चंपाबाई's picture

14 Sep 2016 - 6:26 pm | चंपाबाई

टांझानिया की जय म्हटले तरी अम्रिका सिटिजनशिप देते

सुबोध खरे's picture

14 Sep 2016 - 8:49 pm | सुबोध खरे

हो
अमेरिकेत बरीच प्राणिसंग्रहालये आहेत. तिथे कायमचा वास्तव्याचा परवाना मिळतो.

अतिशय खोल विचार केला आणि साक्षात्कार झाला.

भारतीय लोक म्हणजे जगातील सर्वांत थोर संस्कृतीतील लोक. संघाने भारतीय लोकांचे चारित्र्य घडवले आहे. संस्कृत सर्व भाषांची जननी असल्याने भारतीयांना इंग्रजी स्पॅनिश वगैरेवर जन्मापासून प्रभुत्व मिळविता आले आहे. भारतीय शिक्षण पद्धतिचा पाया व्यासानी घातला अश्या पद्धतीतून अतिशय उच्च कोटीचे विद्यार्थी निर्माण होतात. गणिताचे तर बोलू नका, वेदिक गणितामुळे भारतीय तर चालते फिरते सुपर काम्पुटर बनले आहेत.

म्हणून तर भारत माता कि जय बोलणाऱ्या लोकांना अमेरिका पायघड्या घालून बोलावते. बाकी नासा मधील ९९% लोक भारतीय आहेत, अमेरिकेतील ६५% डॉक्टर भारतीय आहेत वाला फॉरवर्ड तर तुम्ही वाचलाच असेल.

म्हणून तर अमेरिकेच्या नागरिकत्व प्रतिज्ञेत भारत मातेचा उल्लेख नाही

I hereby declare, on oath, that I absolutely and entirely renounce and abjure all allegiance and fidelity to any foreign prince, potentate, state, or sovereignty, of whom or which I have heretofore been a subject or citizen;

फेदरवेट साहेब's picture

15 Sep 2016 - 7:37 am | फेदरवेट साहेब

बरोबर आहे. तिकडे जाऊनही भारताचा जयजयकार करा अन इकडे छठपूजा करतात म्हणून बिहारी धरून ठोका........ वरतुन जेवण झाले की मांडीला पाने पुसत हिंदू तेतुका मेळवावाच्या गफ्फा मिपावर हाणा.

पुष्कर जोशी's picture

14 Sep 2016 - 5:05 pm | पुष्कर जोशी

कधिही संघाचा अनुभव न घेतल्याचा पुरावा .. पुस्तकी ज्ञान ..

तेजस आठवले's picture

14 Sep 2016 - 10:48 pm | तेजस आठवले

अहो असे खूप लोक असतात, कि ज्यांच्या बोलण्यात आणि कृतीत अंतर असते. तुम्हाला संघी लोकांचा एवढा राग असेल तर ते काहीही बोलले तरी तुम्हाला काय फरक पडतो?
बरं काही कारणाने त्यांची चड्डी पिवळी होत असे तर तुम्हाला काय फरक पडतोय, त्यांची ते धुवून घेतील किंवा तसेच राहतील.
जोपर्यंत संघातले लोक सार्वजनिक ठिकाणी जाहीरपणे अधिकृत मतप्रदर्शन करत नाहीत तो पर्यंत ते त्यांच्या सभेत (बौद्धिक) काहीही बोलले(तुमच्या म्हणण्या प्रमाणे) तरी काय फरक पडतो?

थोड्क्यात काय तर वैचारिक दिवाळखोरी आणि स्वतः बद्दल असलेली grandiose delusions आणि त्याचा भंग झाला कि लोकांचा कानफटात मारण्याची "फक्त भाषा".

हे तुमच्या बाबतीत पण म्हणता येऊ शकतेच की!

आपल्या जन्मभूमीबद्दल आदर बाळगणे आणि दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेणे ह्याचा काय संबंध ते सांगू शकाल का ?
अमेरिकेचे नागरिक जर भारताबद्दल प्रेम व्यक्त करत असतील(जोपर्यंत त्या देशाच्या सार्वभौमत्वाचा अनादर होत नाही आणि कुठल्याही प्रकारे ते अमेरिकाविरोधी वर्तन करत नसतील), तर तो काही द्रोह होऊ शकत नाही. कोणीही कायदेशीररित्या दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? अमेरिका आणि भारत काही एकमेकांचे शत्रू नाहीत आणि औपचारिकरीत्या शत्रू म्हणावे असे दोघात काही झालेलेही नाही.(जर आपण पाकिस्तानचे उदाहरण घेतले तर जरी आपण औपचारिकरीत्या पाकिस्तान ला शत्रू जाहीर केले नसले तरी त्याच्या वर्तणूकीमुळे तो आपला शत्रूच आहे. विषयांतराबद्दल क्षमस्व.)

बाकी तुम्हाला संघ आणि त्याच्या आडून काही विशिष्ट गोष्टींवर टीका करायची असेल तर त्यासाठी वेगळ्या साईट्स आहेत.तिथे सुद्धा खुशाल तुमची मते मांडा.

बाकी वैयक्तिक काही नाही. आपण लोकशाही देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला सर्वाना आपले मत मांडण्याचा हक्क आहे.
तुमच्या दृष्टीने संघ काही देशविरोधी करत असेल तर तसे पुराव्यासहित स्पष्ट करा(न्यायालयात सिद्ध झालेले- नुसते आरोप नव्हे.)

बाकी, सकाळचा वर्ग संपल्यावर काही संघी लोक तुमच्या कडे येऊन चहा पोहे मागत नव्हते ना? काही लोकांना ह्याचा राग येतो हो!

माझ्या (हिंदू) धर्माचा ठेका घेतला आहे अश्या प्रकारे संघ वागतो आणि हिंदू धर्माला अनेक प्रकारे नुकसान पोचवतो हे सोडल्यास मला संघीय लोक काय करतात ह्याचा फरक पडला नाही. आपले संघ पूर्ण मिपा वर नाही टाकले असते तर मी लिहायला गेले नसते.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 3:01 pm | श्रीगुरुजी

आणि हिंदू धर्माला अनेक प्रकारे नुकसान पोचवतो

नुकसान? ते कसे काय? काही उदाहरणे देता का?

झेन's picture

15 Sep 2016 - 6:09 pm | झेन

"खाकी चड्डी पिवळी होते"

राग संघावर का चड्डीवर

अनन्त अवधुत's picture

14 Sep 2016 - 3:40 am | अनन्त अवधुत

हा 200 वा प्रतिसाद. बाकी चालू द्या...

श्रीनिवास टिळक's picture

14 Sep 2016 - 5:37 am | श्रीनिवास टिळक

२०१५ मध्ये भारतीय इतिहास संकलन समितीने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संस्था) १८ खंडांमध्ये १८ पुराणांवर आधारित भारताचा इतिहास प्रसिद्ध करण्याचा संकल्प सोडला आहे. २०२५ मध्ये संघाची शताब्दी आहे त्या सोहळ्यात हे खंड प्रकाशित होणार आहेत.

सतीश कुडतरकर's picture

14 Sep 2016 - 11:12 am | सतीश कुडतरकर

:-))

पुराणांवर आधारलेला इतिहास? बाप रे!पुरातत्वशास्त्र, न्युमिस्मॅटीक्स, कार्बन डेटींग वगैरे काही नाही?

एक मिनीट, ते जे काय खंड म्हणत आहेत ते प्रकाशीत होवूदेत मग टीका टिप्पणी सुरू करूया. संकल्पावस्थेतल्या गोष्टीबद्दल आत्ता मत व्यक्त करणे योग्य नाही.

युवराज मतीमंद आहेत म्हणजे त्यांचे सुपुत्र त्यांच्या पुढची पातळी गाठतील असे काही नसते हो.

शाम भागवत's picture

14 Sep 2016 - 2:40 pm | शाम भागवत

युवराजांच लग्न झाले?
:))

चंपाबाई's picture

14 Sep 2016 - 3:09 pm | चंपाबाई

कुणीतरी कौल की खापर नावाची स्त्री त्यांच्यासोबत रहायची ना ?

चंपाबाई's picture

14 Sep 2016 - 3:12 pm | चंपाबाई

पंतप्रधान असताना तीन बायकांसमोर लोटांगणं घालुन गुढगे झिजलेत युवराजांचे... आता कस्चं लग्न करताय त्यांचं !?

आजानुकर्ण's picture

14 Sep 2016 - 11:06 pm | आजानुकर्ण

स्वतः लग्न न करता इतरांच्या बायकांनी बालकोत्पादन करावे हा एक बहुमूल्य सल्ला या विचारधारेतून कायम दिला जातो.

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 8:00 am | चंपाबाई

या संघ भाजप्यांचे दोन पंतप्रधान ... एक ब्रह्मचारी, दुसरा बायको सोडून पळालेला... आणि यांना दुसर्‍यांची लग्ने, तिसर्‍यांची पोरे यांच्या नस्त्या उचापत्या हव्या असतात.

सुबोध खरे's picture

15 Sep 2016 - 10:06 am | सुबोध खरे

असे प्रतिसाद हे केवळ द्वेष दाखवतात असे वाटते.
पोप साहेबानी ने लग्न केलेले नाही म्हणून त्यांनी संसारी लोकांना उपदेश करू नये असे तर नाही.
या न्यायाने तर पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये.
किंवा चंपाबाईनी तर मुल्ला ओमर आणि ओसामा बिन लादेन यांचे चरणतीर्थ घ्यायला पाहिजे.
मुल्ला ओमर ने ओसामाच्या मुलीशी लग्न केले आणि ओसामा ने मुलाच्या मुलीशी लग्न केले.
दोघे एकमेकांचे जावई आणि सासरे एकाच वेळेस. माशा अल्लाह.

शाम भागवत's picture

15 Sep 2016 - 10:33 am | शाम भागवत

हे मला माहित नव्हते. चंपाबाईमुळे कळले.
;))

चंपाबाई's picture

15 Sep 2016 - 11:28 am | चंपाबाई

उपदेश करणं वेगळं आणि उपहास करणं वेगळं.

राहूल गांधींच्या अविवाहितपणावर उपहासाची चिखलफेक करणारे लोक , बाजपेयींचे ब्रह्मचर्य व मोदींचे रामदासीपण काढलं की चवताळून धावून येतात.

सुबोध खरे's picture

15 Sep 2016 - 11:54 am | सुबोध खरे

मिरच्या झोंबल्या का?
राहूल गांधींच्या अविवाहितपणावर उपहासाची चिखलफेक करणारे लोक
कुणी केली अशी अविवाहितपणावर चिखलफेक जरा सांगता का?
हां
त्यांच्या अफाट "बुद्धिमत्ते"बद्दल लोकांनि त्यांची वाहवा केली आहे पण ती वेगळी गोष्ट आहे.

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 2:55 pm | श्रीगुरुजी

लक्ष देऊ नका हो डॉक्टरसाहेब. ज्याची बायको नवर्‍याच्या विकृत स्वभावामुळे त्याला सोडून निघून गेली आहे तोच इथे येऊन दुसर्‍यांच्या संसाराच्या उठाठेवी करीत आहे.

हे कार्बन डेटिंग वगैरे थोतांड आहे तुमच्या आमच्या सारख्या काँग्रेस कम्युनिस्ट वगैरे मंडळींचं. अगदी नासा सुद्धा पुराणाचा आधार घेऊन मंगळावर यान पाठवत आणि तुम्ही इथे पुराणा ची टवाळी करता आहात ?

स्टीव्ह ला आयफोन काढण्याची युक्ती निमकरोली बाबानी दिली ते ऐकून झुकेरबर्ग ने तात्काळ बाबाकडे धाव घेतली आणि बाबानी त्याला फेसबुक काढण्याचा आशीर्वाद दिला पुढे काय जहाँ तो आहे इतिहास आणि वर्तमान. आपल्या इथले फ्लिपकार्ट वगैरे मस्ती दाखवून निम करोली बाबा कडे जात नाहीत आणि तिथे विदेशी लोक त्यांचा फायदा घेतात.

मागे पुरुषसुक्त वापरून पाण्यापासून पेट्रोल करणाऱ्या थोर वैज्ञानिकाला संघाने कवेत घेतले होते. त्याचा रिसर्च विदेशी शक्तींनी पूर्ण व्हायला दिला नाही. पण ह्या वेळी पुराणिक इतिहास संघ नक्कीच लिहून टाकेल. प्रोजेक्ट कधी सुरु होईल आणि कधी संपेल ह्या साठी कार्बन डेटिंग ची गरज लागेल बहुतेक पण एकदा का दीड दोनशे वर्षांत प्रकल्प पूर्ण जाहला कि भारत साक्षांत विश्व्गुरु होईल.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

14 Sep 2016 - 5:45 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

समाजाला बनशाली बनवण्याऐवजी देवभोळं बनवण्याचं काम संघ करत आहे.कारण "राम मंदिर झालच पाहिजे" हे मोहन भावतांचे विधान ताजेच आहे.

शिवाय एका विद्यार्थ्याने भागवतांना विचारले कि राम मंदिर झाल्यावर गरीबाच्या भाकरीचा प्रश्न सुटणार आहे का? तर भागवतांच उत्तर असं होतं कि "राम मंदिर न झाल्याने तरी कुठे गरीबाच्या भाकरीचा प्रश्न सुटणार आहे"? हे उत्तर म्हणजे उद्धटपणाचा कळस आहे.

मंदिरही नको आणि मशीदही नको,तिथे एखादं लोकोपयोगी काम व्हावं.पण कोण ऐकेल तर ना?

राम मंदिराचा काढला की भाकरीचा प्रश्न विचारायचा, शेतीविषयक सुधारणा सांगायला लागले की देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न काढायचा, सुरक्षेसंबंधी बोलायला लागले की दुष्काळावर विचारायचं...

मुद्द्याला धरून चर्चा, प्रश्न का विचारले जात नाहीत? या प्रसंगात प्रश्न विचारणारा तरी शाळकरी मुलगा होता, पण तथाकथित बुद्धिवादी आणि पत्रकार पण या विकाराचे बळी आहेत.

रामजन्म भूमीवर मंदिराचं असायला पाहिजे. भाकरीचा प्रश्न सोडवायला हज सबसिडी बंद करावी, चर्च ची जमीन ताब्यांत घ्यावी , हिंदू लोकांची श्रीमंत देवस्थाने तर सरकारने भाकरी प्रश्नासाठी आधीच घेतली आहेत.

श्रीगुरुजी's picture

14 Sep 2016 - 8:22 pm | श्रीगुरुजी

शिवाय एका विद्यार्थ्याने भागवतांना विचारले कि राम मंदिर झाल्यावर गरीबाच्या भाकरीचा प्रश्न सुटणार आहे का? तर भागवतांच उत्तर असं होतं कि "राम मंदिर न झाल्याने तरी कुठे गरीबाच्या भाकरीचा प्रश्न सुटणार आहे"? हे उत्तर म्हणजे उद्धटपणाचा कळस आहे.

यात काय उद्धटपणा आहे? योग्य व समर्पक उत्तर आहे. मागे एकदा "सकाळ" मध्ये बाबा आढावांनी एक लिहिला होता. त्यात त्यांनी असे लिहिले होते की "शनिवारवाडा महोत्सव भरवून किंवा विश्रामबागवाड्या कारंजी थुईथुई नाचवून पुण्याचे प्रश्न सुटणार आहेत का?". मुद्दाम फक्त शनिवारवाडा व विश्रामबागवाडा या स्थानांचाच उल्लेख करण्यामागचा हेतू लपला नव्हता. त्यावर एकाने विचारले की "मग फुल्यांच्या वाड्याचे स्मारक करून किंवा पुणे विद्यापीठाचे नाव बदलून तरी हे प्रश्न सुटणार का?". या अडचणीच्या प्रश्नावर अर्थातच त्यांनी सोयिस्कर मौन पाळले.

मंदिरही नको आणि मशीदही नको,तिथे एखादं लोकोपयोगी काम व्हावं.पण कोण ऐकेल तर ना?

श्रीरामजन्मभूमीच्या स्थानावर श्रीरामांचे मंदीर होणे हे लोकोपयोगी कामच आहे.

याचा अर्थ संघ चांगलाच असला पाहिजे. उसके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा हे माणसांप्रमाणेच संस्थांनाही लागू होतंच. बाकी संघाला विरोध करणारे आयडी कोण आहेत ते बघितलं आणि मग त्यांच्या विरोधाला महत्त्व देण्याची गरज नाही हे ओघान आलंच.रच्याकने संघही आपल्या विरोधकांची अशीच दखल न घेता आपलं काम करत होता, आहे आणि राहील. ज्यांना जमतं ते करतात, नाही जमत ते टीकाकार बनतात. माझी इथल्या सर्व संघ टीकाकारांना सहानुभूती आहे. आजारी माणसांना सहानुभूती दाखवावी हे जगातले सगळे धर्म सांगतात.

लष्कर ए तय्यबा किंवा इसिस वर सुद्धा टीका होते म्हणून ते काय चांगले आहेत ?

माजघरातून डोक्यावर पदर ओढून कराकरा अर्थशून्यटोमणे मारणाऱ्या कजाग आत्याबाई प्रमाणे वागून काय फायदा ?

शाम भागवत's picture

14 Sep 2016 - 7:38 pm | शाम भागवत

बोकासाहेब माझे निरिक्षण थोडे वेगळे आहे.
संघ त्याच्या पध्दतीने काम करत आलाय व करत राहाणार आहे. ते काम बरोबर का चूक हा इथे मुद्दाच नाहिये. जसजशी संघाबद्दलची माहिती लोकांपुढे येत जाईल त्याप्रमाणे लोक त्यांचे मत बनविणारच आहेत.

मिडिआ संघावर टिका करत होता व बाकीच्यांच्या हातात ते वाचणे किंवा ऐकणे येवढेच होते. वाचकांची पत्रे एवढाच मार्ग सर्वसामान्यांना उपलब्ध होता. पण काय प्रसिध्द करायचे हे मिडियाच्या हातात होते.

सोशल मिडियात मात्र दुसरी बाजू मांडायची सोय झाली व त्यामुळेच सगळी उलथापालथ झाली आहे. माध्यमांनी मतप्रदर्शन करायचे व बाकीच्यांनी त्यानुसार मत बनवायची ही पध्दत हळूहळू लयास जाते आहे.

याच बरोबर सर्वयामान्यांचा आंतरजालाचा वाढता वापर व गुगल सारखी सुविधा याचाही मोठा वाटा आहे.

बरेच जण जे संघाबद्दल अनभिज्ञ होते व ज्यांनी स्वत:हून कधिही संघ जाणून घ्यायचा प्रयत्न केला नसता ते निव्वळ संघावर होणारे आरोप व त्याला दिली जाणारी उत्तरे यामुळे संघ समजून घ्यायला लागले आहेत.

वाक्यरचनेतून व्यक्त होणारा राग द्वेष तसेच आकस्त्राळेपणा बरोबर उलटा परिणाम करायला लागलेला आहे.

यामुळे संघ पूर्वीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचायला लागला आहे. त्यामुळे इथे संघावर जेवढे आरोप होतील त्या प्रमाणात संघाला त्याच्या न कळत व्यक्त होण्याचे मार्ग मिळणार आहेत. ही सोय पूर्वी संघाला नव्हती. मात्र संघ विरोधकांना मात्र होती.

राही's picture

15 Sep 2016 - 7:04 am | राही

बाकी संघाला विरोध करणारे आयडी कोण आहेत ते बघितलं आणि मग त्यांच्या विरोधाला महत्त्व देण्याची गरज नाही हे ओघान आलंच.
हेच वाक्य इथल्या नेहमीच्या काही थोड्या संघसमर्थकांनाही लागू पडू शकेल. टीकेची अजिबात दखल न घेता सपशेल दुर्लक्ष्य करून काम सुरू ठेवणे हा काही फारसा धीरोदात्तपणा नाही. ज्यांना जमत नाही ते टीकाकार बनतात हेही फारसे खरे नाही. कदाचित ते विधायक असा आणखी वेगळा मार्ग अनुसरत असू शकतील किंवा त्यांना तसा मार्ग पसंत असू शकेल. आपल्याच मार्गाने सर्व प्रश्न सुटणार आणि सुटावेत ही वृत्ती वेळोवेळी 'हम करे सो कायदा'गिरीकडे झुकलेली दिसून आली आहे.
आणखी एक स्थानिक म्हणजे मिपावरचे निरीक्षण म्हणजे काही शेलके संघसमर्थक चिडीला येऊन स्वमतविरोधकांना अपमानकारक विशेषणे बहाल करताना दिसतात. स्वमतविरोधाला 'गरळ ओकणे' म्हणणे म्हणजे त्या विरोधकाला 'साप' समजणे असा होतो हे मी सांगायला नको. इतके चिरडीला का यावे लागावे? की थंडपणे विचार करणे म्हणजे षंढपणा?

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 7:08 am | संदीप डांगे

=)) =))

कुत्रे झालं, कोल्हे झालं, मतिमंद झालं, हे आता सापाचे नवीनच कळले.

आय होप, जेपी साहेबांचं ह्या सगळ्यावर नीट लक्ष आहे, ;)

जेपी's picture

15 Sep 2016 - 7:46 am | जेपी

डांगे साहेब,
धाग्यावर काय होणार याचा अंदाज आधीच आलता,
त्यामुळे पहिल्याच प्रतिसादात आमी' हे राम ' म्हटल आहे.

फेदरवेट साहेब's picture

15 Sep 2016 - 7:45 am | फेदरवेट साहेब

विरोधक त्या चंपाबाईचे पण आहेत भरपूर मिपावर............

टाळ्याखाऊ स्वीपिंग स्टेटमेंट्स करून उपयोग नाही

श्रीगुरुजी's picture

14 Sep 2016 - 8:45 pm | श्रीगुरुजी

संपादक मंडळ,

या धाग्यावरील काही प्रतिसादात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अतिशय असभ्य व शिवराळ भाषा वापरली जात आहे. बहुसंख्य प्रतिसाद सभ्य व विषयाला धरून असताना काही प्रतिसाद मात्र अतिशय वाईट आहेत. आपले लक्ष असेलच.

संपादक मंडळ फक्त ठराविक लोकांना बॅन करणं हेच काम करतं, आणि संघविरोधक त्या यादीत येत नाहीत हे तुम्हाला अजून कळलेलं नाही?
- (Privileged to be banned by मिपा संपादक मंडळ) बोका - ए -आझम

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Sep 2016 - 12:25 am | खालीमुंडी पाताळधुंडी

म्हणजे संघविरोधकांना बॅन करावे अशी तुमची इच्छा आहे का?
तुम्ही पातळी सोडलेले किती प्रतिसाद असतील मिपावर एकंदरीत?

ते ठरवतात ती पातळी. त्यांना विचारा. मला विचाराल तर मी शून्य असंच सांगणार.

म्हणजे संघविरोधकांना बॅन करावे अशी तुमची इच्छा आहे का?

याला विपर्यास म्हणतात. मला विचाराल तर कुणालाच बॅन करू नये. करमणूक काय मग? सगळेच जण एका बाजूने बोलत असतील तर किती boring होईल ते!

राही's picture

15 Sep 2016 - 7:06 am | राही

आपला या धाग्यावरचा 'भाद्रपद' प्रतिसाद आवडला नव्हता.

आणि ते व्यक्त करायचाही. आणि त्यातून स्वतःला वाटेल तो अर्थ काढण्याचाही.

आजानुकर्ण's picture

14 Sep 2016 - 9:39 pm | आजानुकर्ण

साहना यांचे प्रतिसाद आवडले. संघ हा एक मोठा चमत्कार आहे याच्याशी मात्र सहमत. भगवा झेंडा हा राष्ट्रध्वज व्हावा आणि एकाच धर्मीयांचे हे राष्ट्र असावे आदि मुक्ताफळे प्रसवणाऱ्या संघचालकांची विचारसरणी मानणारी ही संघटना स्वतःला अव्वल दर्जाची राष्ट्रप्रेमीही म्हणवून घेते आणि बाकीच्यांना 'पाकिस्तान'ला (अखंड भारताचाच भाग ना हो तो?) जायला सांगते हे ह्या चमत्काराचे प्रात्यक्षिक.

बाकी भाद्रपद आलाय, जंगलात जा, वगैरे शिवराळ व असभ्य प्रतिसाद आले आहेत या गुरुजींच्या मताशी सहमती.

भाद्रपदच महिना चालू आहे सध्या. बाकी काय सभ्य आणि काय असभ्य हे तुम्ही मिपावर ठरवता काय आजकाल?

विकास's picture

14 Sep 2016 - 10:49 pm | विकास

बाकी काय सभ्य आणि काय असभ्य हे तुम्ही मिपावर ठरवता काय आजकाल?

चमत्कार वगैरे म्हणणे मला पटत नाही. शिवाय चमत्कार असता तर नमस्कार करणारे झाले असते... पण वरील एका प्रतिसादात आल्याप्रमाणे शक्ती नक्कीच आहे. त्या शक्तीला बघून चमत्कारीक बोलणारे आणि तर्क लढवणारे मात्र असतात ह्यावर माझा विश्वास आहे... :)

बोका-ए-आझम's picture

14 Sep 2016 - 10:56 pm | बोका-ए-आझम

समस्त संघविरोधकांना एक आवाहन करु इच्छितो - नवे मुद्दे आणा राव. ८-८ वर्षे लोक मिपावर असतात पण तेच तेच मुद्दे आणतात. एवढ्या वर्षांत संघ बदलला पण यांचे विरोधाचे मुद्दे काही बदलले नाहीत. संघ विरोधी पक्ष असताना जे मुद्दे तेच संघ सत्तेत असतानाही. काय हे?

आजानुकर्ण's picture

14 Sep 2016 - 10:58 pm | आजानुकर्ण

संघ बदलला

हाफ चड्डी सोडून* फुल प्यांट आणण्याचे वगळता काही बदलल्याचे दिसले नाही.

* हाफ चड्डी सोडण्यात काही असभ्य नाही हो संमं आणि गुरुजी.

काय नक्की बदलले आहे संघ मध्ये ? भाजप निर्माण केला आहे आणि त्यामुळे सततची फळे चाखायला मिळत आहेत हा एक बदल सोडला तर आणखीन काही विशेष दाखवण्यासारखे नाही. बहुतेक मुद्द्यावर माघार घेतलेली दिसत आहे.

आजानुकर्ण's picture

14 Sep 2016 - 10:56 pm | आजानुकर्ण

बाकी काय सभ्य आणि काय असभ्य हे तुम्ही मिपावर ठरवता काय आजकाल?

नाही हो मी ते ठरवत नाही. संपादक मंडळ आणि गुरुजी ठरवतात असं दिसतंय. तुम्ही फुकटात लोकांचंं रोगनिदान करता आणि बरे व्हा वगैरे शुभेच्छा देता असं वाटतंय. भाद्रपदानिमित्त काही विशेष? :)

बोका-ए-आझम's picture

14 Sep 2016 - 11:00 pm | बोका-ए-आझम

नवे मुद्दे आणा. ९ वर्षे मिपावर काढूनही संघविरोधाचे तेच तेच मुद्दे आणत असाल तर त्यावरून काय ते कळतंच. बरे व्हा, मोठे व्हा आणि अभ्यास वाढवा. म्हणजे नीट वाद घालता येतील.

आजानुकर्ण's picture

14 Sep 2016 - 11:03 pm | आजानुकर्ण

अहो गेल्या ५० वर्षात संघाने मुसलमान, ख्रिश्चन, दलित, कम्युनिस्टविरोधाचे तेच ते मुद्दे उगाळून गुळगुळीत केलेले चालले का तुम्हाला? नवे कुठले मुद्दे आणलेत ते दाखवा मग त्यासंदर्भात चर्चा करता येईल. अजून हिंदुत्त्व म्हणजे काय आणि राममंदिर कधी बांधणार यावरच गाडं अडलंय.

बोका-ए-आझम's picture

14 Sep 2016 - 11:23 pm | बोका-ए-आझम

अहो गेल्या ५० वर्षात संघाने मुसलमान, ख्रिश्चन, दलित, कम्युनिस्टविरोधाचे तेच ते मुद्दे उगाळून गुळगुळीत केलेले चालले का तुम्हाला?

कम्युनिस्ट सोडले तर इतर कुणाचाही संघाने विरोध केलेला नाही. संघ दलितविरोधी आहे हा संघाच्या विरोधकांनी केलेला अपप्रचार आहे. देशात झालेल्या कुठल्याही दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात संघ किंवा संघ स्वयंसेवक सहभागी असल्यास दाखवून द्यावे. तसंच संघ मुस्लिम आणि ख्रिश्चनविरोधी असल्याचं वक्तव्य आहे. संघ अल्पसंख्यांकांचा अनुनय करण्याच्या विरोधात आहे. म्हणजे तो त्या धर्मांच्या विरोधात आहे असं म्हणणं हे संघविरोधकांना convenient आहे म्हणूनच तसं म्हटलं जातं. पण वस्तुस्थिती वेगळी आहे आणि हे संघविरोधकांनाही माहित आहे. म्हणून तर संघाचा विषय काढल्यावर ते एवढे आक्रमक होतात, कारण आपल्याजवळचे मुद्दे संपलेत आणि नवे मुद्दे नाहीयेत ही आपली केविलवाणी अवस्था त्यांना मान्य करवत नाहीये. त्यामुळेच संघ ५० वर्षांत तेच तेच मुद्दे उगाळतोय वगैरे पलायनवादी भूमिका घेतली जाते. असो. जसं मी आधी म्हटलं तसंच - संघविरोधकांचा राग येत नाही, कीव येते. दया येते. आपण ज्याला प्राणपणाने विरोध केला तो आपल्या विरोधामुळेच मोठा झाला हे समजणं किती भयावह आहे याचा सगळे संघविरोधक अनुभव घेत आहेतच पण ते मान्य करण्याऐवजी denial mode मध्ये राहणं जर त्यांना मान्य असेल तर असो बापडे.

आजानुकर्ण's picture

14 Sep 2016 - 11:47 pm | आजानुकर्ण

संघाचा खोटारडेपणा उघड करणे यात केविलवाणेपणा कुठला आलाय. मला तर त्यात विशेष मजा येते ब्वॉ. बाकी संघ ख्रिश्चन-मुस्लिम विरोधक नाही हे वाचून खरंच आनंद झाला. निदान ईशान्य भारतातील धर्मांतराविरोधात, किंवा घरवापसीसारखी, किंवा हिंदूंनी लोकसंख्या वाढवावी असे सल्ले देण्याची कामं करण्याऐवजी जरा आजूबाजूला काहीतरी करण्यासाठी संघ स्वयंसेवक दिसतील हा एक भाबडा आशावाद आहे.

मुळात संघाची एकंदर एक्स्टेंडेड संघटना इतकी गुंतागुंतीची आहे की कुठलेही आतबट्ट्याचे प्रकरण घडले की ताबडतोब 'मी नाही त्यातली' म्हणत अंग काढून घेण्यात संघ हुशार आहे. विहिंप, बजरंग दल, पतित पावन संघटना वगैरे उपद्रवी मंडळींनी काही उद्योग करुन ठेवले की त्याला डिसक्रेडिट करण्याची सोयही संघाकडे आहे. त्यामुळे बाबरी मशीद पाडली हे खाजगीत आनंदाने मान्य करणारे संघी, जाहीरपणे 'मशीद पाडल्याने दुःख झाले' असे म्हणू शकतात. तसंच दलितांवर केलेल्या अत्याचाराचे कुठलेही पुरावे दिले तरी त्यात संघाचा काही सहभाग नाही असे म्हणण्याची सोय अर्थातच उपलब्ध आहे.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 12:03 am | बोका-ए-आझम

दलितविरोधाचे वगैरे. बाकी ईशान्य भारतात धर्मांतराविरोधी कार्य संघ करतो हे ऐकून करमणूक झाली. संघाने चालवलेल्या अनेक संस्था ईशान्य भारतात चालू आहेत. तिथली अनेक मुलं महाराष्ट्रात येऊन शिकताहेत. आणि कोणाच्याही धर्माला धक्का वगैरे लागलेला नाही. मुळात तुम्ही ईशान्य भारतात गेला आहात का? तिथे धार्मिक व्यवस्था दर जमातीनुसार बदलते आणि बहुसंख्य जमातींचे स्वतःचे धर्म आहेत. त्यांच्यावर जेव्हा ख्रिश्चन धर्म लादायचे प्रयत्न झाले तेव्हा संघाने त्याविरूद्ध आवाज उठवलेला आहे. यात चुकीचं काय आहे? अर्थात तुमच्यासाठी संघच चुकीचा असल्यामुळे तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. रच्याकने संघाचा खोटारडेपणा कितपत उघडकीला आणलात तुम्ही? आणि त्यामुळे कितपत समाजप्रबोधन वगैरे झालं? स्वतःची संघविरोधी मतं मिपासारख्या संस्थळावर मांडणं म्हणजे खोटारडेपणा उघडकीला आणणं ही नवीन व्याख्या मराठी भाषेला दिल्याबद्दल शतश: धन्यवाद!

फेदरवेट साहेब's picture

15 Sep 2016 - 8:05 am | फेदरवेट साहेब

देशात झालेल्या कुठल्याही दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात संघ किंवा संघ स्वयंसेवक सहभागी असल्यास दाखवून द्यावे.

पुरावे द्या हो

हे पुरावे वगैरे देणे उपयोगाचे नाही, कारण ते तुमच्या अभद्र प्रतिसादांसारखे आहे, तुम्हाला विचारले तर तुम्ही शून्यच सांगाल. तसेच हे पण, पुरावे द्यायचे म्हणले की द हिंदू, फर्स्टपोस्ट वगैरेचे द्यायला नको असतात तुम्हाला, का? तर ती साम्यवादी मुखपत्रे अन संस्थळे आहेत. मग संघाच्या संदिग्ध कारवाया संघच पांचजन्य अन ऑर्गनायझर मध्ये छापेल असेही शक्य नाही.

रच्याकने, भाद्रपद कॉमेंट ही चक्क अश्लील अन द्वयार्थी आहे, कॉमेंट केली आहेत तर त्याची जबाबदारी घ्या जरा (का परत बॅन व्हायची भीती वाटती आहे म्हणून......) , भाद्रपदाचा रेफरन्स कशाकरता दिला होता हे न समजण्याइतके मिपाकर खुळे नाहीत, तुम्ही डोळे मिटून दूध प्यायले तरी......

श्रीगुरुजी's picture

15 Sep 2016 - 2:59 pm | श्रीगुरुजी

हे पुरावे वगैरे देणे उपयोगाचे नाही, कारण ते तुमच्या अभद्र प्रतिसादांसारखे आहे, तुम्हाला विचारले तर तुम्ही शून्यच सांगाल. तसेच हे पण, पुरावे द्यायचे म्हणले की द हिंदू, फर्स्टपोस्ट वगैरेचे द्यायला नको असतात तुम्हाला, का? तर ती साम्यवादी मुखपत्रे अन संस्थळे आहेत. मग संघाच्या संदिग्ध कारवाया संघच पांचजन्य अन ऑर्गनायझर मध्ये छापेल असेही शक्य नाही.

पुरावे असतील तर नक्की द्या. पुरावे नसतील तर खोटे आरोप करू नका. जर हिंदू, फर्स्टपोस्ट इ. मध्ये संघाने दलितांवर केलेल्या अत्याचाराच्या बातम्या छापून आल्या असतील तर भारतातील इतर अनेक वृत्तपत्रातून त्या बातम्या छापल्या गेलेल्या असतील. हिंदू, फर्स्टपोस्ट इ. च्या लिंक्स द्या. लगेच पडताळून पाहता येतील.

बादवे, ते बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या बाबतीतलं कात्रण सापडलं का?

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 3:04 pm | बोका-ए-आझम

सर्वप्रथम - मी बॅन होतो साधारणपणे २२ ते २७ जुलै या काळात. तुमचं सदस्यत्व आहे २ आठवडे. म्हणजे आॅगस्टच्या शेवटी घेतलेलं. अर्थ उघड आहे. तुम्ही कुणाचे तरी डू आयडी आहात. कदाचित तुमचा आधीचा आयडी बॅन झाला असेल किंवा मग तुम्ही एक आयडी असताना दुसरा डू आयडी ट्रोलिंग करायला घेतलाय. That speaks for itself. असो.
आता तुमच्या प्रतिसादांबद्दल -
मला बॅन व्हायची अजिबात भीती वाटत नाही कारण - १. मी चूक केलेली नाही २.मला मिपाव्यतिरिक्त आयुष्य आहे. मिपा अस्तित्वात यायच्या आधीही होतं आणि नंतरही असेल.
भाद्रपद आहे आणि ही वस्तुस्थिती आहे हे मी म्हटलं होतं. नाकारायचा प्रश्नच येत नाही. त्याचा अश्लील आणि द्वयर्थी संदर्भ आहे असं मी म्हणत नाही आणि मला तो माहितही नाही. मी तो शब्द कुठल्या अर्थाने वापरलाय हे तुम्ही आणि इतर लोक म्हणताहेत. तुम्हाला माझ्या मनातलं कसं ठाऊक? आणि अश्लील अर्थच का घेतलात तुम्ही? याचा अर्थ तुमच्या मनात अश्लीलता आहे. मग माझ्यावर बिल फाडू नये.

हे पुरावे वगैरे देणे उपयोगाचे नाही, कारण ते तुमच्या अभद्र प्रतिसादांसारखे आहे, तुम्हाला विचारले तर तुम्ही शून्यच सांगाल.

यापेक्षा सरळ पुरावे नाहीत असं सांगा आणि पांढरा झेंडा फडकवा. किती तो आटापिटा स्वतःला बरोबर सिद्ध करायचा!

पुरावे द्यायचे म्हणले की द हिंदू, फर्स्टपोस्ट वगैरेचे द्यायला नको असतात तुम्हाला, का? तर ती साम्यवादी मुखपत्रे अन संस्थळे आहेत.

हिंदू आणि फर्स्टपोस्ट यांचे पुरावे म्हणजे बिनतोड असं तुमचं म्हणणं असेल तर ते द्या. काहीही हरकत नाही. संघ जर दलितविरोधी कारवाया करत असता तर हिंदू आणि फर्स्टपोस्टच काय, जगातल्या प्रत्येक वृत्तपत्रात ते आलंच असतं. पण पुरावाच नसेल तर - तसाही तो तुम्ही स्वीकारणार नाहीच मग आम्ही तो देणार नाही, पण संघ दलितविरोधी आहे - हे म्हणणं म्हणजे शुद्ध कांगावा आहे. अजूनही म्हणतो - पुरावा आहे का? एखाद्या संघ स्वयंसेवकाला अशा गुन्ह्यासाठी शिक्षा वगैरे झाल्याचा? जरुर पुढे आणा.

भाद्रपदाचा रेफरन्स कशाकरता दिला होता हे न समजण्याइतके मिपाकर खुळे नाहीत,

मिपाकर खुळे नाहीच आहेत. पण तुम्हाला सोयीस्कर अर्थ काढून तेच माझ्या मनात होतं हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय? स्वतःचं मन आधी शुद्ध करा. भाद्रपद या शब्दाने जर तुमच्या मनात अश्लील विचार येत असतील तर तो माझा नव्हे, तुमच्या विचारांचा दोष आहे.

अप्पा जोगळेकर's picture

15 Sep 2016 - 3:17 pm | अप्पा जोगळेकर

काय योगायोग पहा ? भाद्रपद वाली कमेंट आणि लगेच भूभू यांचा प्रतिसाद.

रविकिरण फडके's picture

14 Sep 2016 - 11:07 pm | रविकिरण फडके

खरे तर मला पुनश्च ह्या विषयावर लिहायचे नव्हते पण संघ आजूबाजूला कुठेच दिसत नाही असे विधान मी आधीच्या प्रतिसादात केले आणि ते संपूर्ण नव्हते असे वाटल्यावरून हा पुन्हा प्रपंच.
संघ मला आजूबाजूच्या परिसरात कुठे सक्रिय दिसत नाही हे तर खरेच पण तेवढाच issue नाहीये. तो अप्रत्यक्षपणे समाजाच्या अधोगतीस कारणीभूत ठरतो आहे हा अधिक मोठा सल आहे माझ्या मनात. सन 1993 पासून आपल्या शहरांत (निदान मुंबईत तरी नक्कीच) तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले आणि मोठ्या प्रमाणात उत्सवांना सुरुवात झाली. गणपती तर आधीपासूनच गोंगाटमय होते. त्यात दुर्गापूजा, माघी गणपती, शिवरात्री, अशांची भर पडली. उदा. ह्या वर्षी प्रथमच आमच्या भागात माघी गणपतीला गणपती बसवला गेला आणि त्यासाठी स्टेशनकडे जाण्यासाठी जेमतेम दोन फूट सोडून बाकी सर्व जागेत स्टेज उभारले गेले. मग मंडप, लाऊड स्पीकर्स, प्रचंड आवाज, ट्रॅफिक जॅम हे सगळे आलेच. ह्यास आळा घातला गेला नाही तर हे प्रकरण हाताबाहेर जाईल. आळा कोण घालणार म्हणा? चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे श्रद्धेचे बाजारीकरण होतेय, हिंदू धर्मापासून लोक दूर जाण्याचा धोका आहे, हिंदू धर्माबद्दल आणि हिंदूंबद्दल एक नेगेटिव्ह इमेज निर्माण होते आहे, परिणामी, ज्या हिंदू धर्माबद्दल संघ इतका भरभरून बोलतो त्या हिंदू धर्माचेच नुकसान होणार आहे, ह्याचे भान जर संघाच्या मान्यवरांना नसेल तर पुढे काही बोलण्याजोगे नाही. आणि जर असेल तर ते इतके हतबल आहेत का हे गैरप्रकार रोखण्यास? तसे असेल तर माझा मुद्दा आपोआप सिद्ध होतो.
पण असो. संघ काही फालतू माणसांनी केलेल्या शंकांना उत्तर देणार नाही. दिलेच तर ते 'संघ विचारांची पुस्तके वाचा नाहीतर शाखेवर जा' असे काहीतरी असेल. त्यामुळे माझ्या शंका अनुत्तरीतच राहणार!

आजानुकर्ण's picture

14 Sep 2016 - 11:23 pm | आजानुकर्ण

तुमचे सगळे प्रश्न सुयोग्य आहेत. पण संघ आणि त्यांच्या मांदियाळीतील संघटना यांना केवळ बाकीचे काय करतात आणि ते कसं चुकीचं करतात यातच रस आहे. बीफ सेवन, मशीदीवरचे भोंगे, ताबूतांच्या मिरवणुका, धर्मांतर, रस्त्यावरचे नमाज, ख्रिश्चन शाळा, बाकीच्यांची वाढणारी लोकसंख्या आदी मुद्दे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

शिवाय दुर्गापूजा, माघी गणपती, शिवरात्री, मंडप, लाऊड स्पीकर्स, प्रचंड आवाज, ट्रॅफिक जॅम वगैरेंमध्ये अनेकदा संघिष्ठ आणि त्यांच्या समविचारी संघटनाच अग्रेसर असतात. त्यामुळं ते यासंदर्भात काही करतील अशी अपेक्षा फोल आहे.

आनन्दा's picture

14 Sep 2016 - 11:46 pm | आनन्दा

ह्म्म.. खरे तर मला बोलायचे नव्हते, पण एव्हढेच सांगतो, हे संघाचे कार्यक्षेत्र नाही.. सर्वसामान्यपणे पाहू गेल्यास तात्विक पतळीवर संघ बराचसा सावरकरांचा हिंदुत्ववाद स्वीकारतो, जो काही अंशी नास्तिकतावादाकडे झुकतो. त्यामुळेही कदाचित ते याकडे दुर्लक्ष करत असतील.
दुसरे, गुरुजींनी लिहिल्याप्रमाणे इतर काही समविचारी संघटना (संघाशी संबंध नसलेल्या) या क्षेत्रात कार्य करत आहेत.
बाकी संघाचे म्हणून जे काही कर्यक्रम होतात ते अत्यंत शिस्तबद्ध असतात आणि त्यामुळे सामान्य जनतेचा खोळंबा झाल्याचे ऐकिवात नाही.
जर तुम्ही राजकीय पक्षांविषयी बोलत असाल विशेषतः शिवसेना, तर आपला पास.

आजानुकर्ण's picture

14 Sep 2016 - 11:51 pm | आजानुकर्ण

संघ बराचसा सावरकरांचा हिंदुत्ववाद स्वीकारतो, जो काही अंशी नास्तिकतावादाकडे झुकतो.

ही वाक्यरचना बदलून घ्या साहेब. संघ सावरकरांचा सोयीस्कर हिंदुत्त्वाद स्वीकारतो. सावरकरांची द्विराष्ट्रवादाची थेअरी मान्य करायची मात्र गायीला उपयुक्त पशू माना म्हटलं की शेपूट घालायचं ही संघाची तात्त्विक पातळी आहे.

सतिश गावडे's picture

15 Sep 2016 - 12:15 am | सतिश गावडे

सर्वसामान्यपणे पाहू गेल्यास तात्विक पतळीवर संघ बराचसा सावरकरांचा हिंदुत्ववाद स्वीकारतो, जो काही अंशी नास्तिकतावादाकडे झुकतो.

नाही हो. सध्याचा हॉट टॉपिक असलेल्या मुद्यावर सावरकरांचे विचार आणि संघाचे विचार म्हणजे दोन धृव आहेत. इतका मोठा मुद्दा विरोधी असताना संघ आणि सावरकर यांना एकाच विचारांचे म्हणणे म्हणजे मोठी गंमतच आहे.

ट्रेड मार्क's picture

14 Sep 2016 - 11:41 pm | ट्रेड मार्क

म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की संघ हे सगळे सण पुरस्कृत करतो? हिंदू सण अश्या गोंगाटात आणि बाजारूपणे साजरे करावे म्हणून प्रोत्साहन देतो? संघाने बसवलेले किती गणपती तुमच्या भागात किंवा संपूर्ण मुंबईत आहेत? किती स्वयंसेवक तुम्हाला या सणांमध्ये भाग घेताना दिसतात?

१९९३ नंतर धार्मिकतेचे वारे वाहू लागण्याचं कारण तुमच्या मते फक्त बाबरी मशिदीचे पाडणे आहे का? त्यानंतर मुंबईत झालेल्या दंगली आणि बॉम्बस्फोट अजिबात कारणीभूत नसावेत का?

संघ हिंदूंची संघटना आहे मग ते हिंदूंबद्दलच बोलणार ना? ते काही कोणाला सांगत नाहीयेत की असे सण साजरे करा. मुळात संघ या सगळ्यामध्ये नाहीये. हे सणवार आणि असे साजरे करणे हे त्या त्या भागातल्या राजकारण्यांनी व भाईलोकांनी चालू केले आणि मला खात्री आहे की त्यांच्यापैकी कोणी संघात जात नसावे.

बोका-ए-आझम's picture

14 Sep 2016 - 11:51 pm | बोका-ए-आझम

१९९३ पासून मुंबईत तथाकथित धार्मिकतेचे वारे शिरले या आपल्या विधानाला काही पुरावा? बाकी श्रद्धेचं बाजारीकरण हे आत्ता नाही, फार पूर्वीपासून होतंय. मी शाळेत असताना (१९८० च्या दशकात) हे विषय निबंधाला यायचे म्हणजे बघा. स्वतःची ताकद आणि उपद्रवमूल्य दाखवण्यासाठी लोक धार्मिक उत्सवांचा आश्रय घेताहेत हे वाईट नक्कीच आहे पण हे करण्यात बाकीचे राजकीय पक्ष किंवा संघटना पुढे नाहीत असं आहे का? तुम्ही संघावर खुशाल आरोप करा पण जरा वस्तुस्थितीला धरून करा. अस्मितेचं राजकारण या देशात पूर्वीपासून होत आलेलं आहे आणि सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी जबाबदार आहेत. एका संघटनेकडे बोट दाखवून बाकीच्यांविषयी चकार शब्दही न काढणं हे करुन संघविरोधक स्वतःची विश्वासार्हता कमी करुन घेत आहेत, बाकी काही नाही.

आजानुकर्ण's picture

14 Sep 2016 - 11:53 pm | आजानुकर्ण

अहो बाकीच्या संघटना चमत्कार असल्याचे धागे कधी येतात का? लष्कर ए तोयबा एक चमत्कार, किंवा मनसे एक चमत्कार. असे? चमत्काराची भाषा करणाऱ्यांबाबत त्या धाग्यावर त्या संघटनेबाबततच विस्ताराने चर्चा होणार.

त्यांना उत्तर देऊ दे ना. तुम्हाला जे विचारलंय त्यावर बोला की. संघविरोधाने माणूस आंधळा झाला की basic manners पण विसरायला होतात हे माहित नव्हतं!

आजानुकर्ण's picture

15 Sep 2016 - 12:19 am | आजानुकर्ण

बेसिक मॅनर्स असे आहेत की चर्चाप्रस्ताव ओपन फोरमवर टाकल्यावर त्यावर सर्वांचे प्रतिसाद येणार. तुम्हाला वैयक्तिक एकाच व्यक्तीशी संवाद साधायचा असेल तर मालकांनी खरडवही आणि व्यक्तिगत निरोप असे दोन पर्याय दमड्या खर्च करुन उपलब्ध करुन दिले आहेत.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 12:46 am | बोका-ए-आझम

मी काय पर्याय वापरावेत हे मीच ठरवतो. ते सुचवणं हाही basic manners नसण्याचाच भाग आहे.

तुम्ही काय पर्याय वापरावेत हे मी सुचवलं नाही. संवादाचे काय पर्याय उपलब्ध आहेत आणि ते कसे वापरले जातात हे सांगितलंय.
ओपन फोरमवर चर्चा टाकल्यावर तिथं कुणीही प्रतिसाद देऊ शकतं. तिथं तुम्ही प्रश्न फडकेसाहेबांना विचारलाय पण मी प्रतिसाद दिल्यावर मला बेसिक मॅनर्स नाहीत, हे तुम्ही सांगताय. यावरुन तुमच्या बेसिकमध्ये लोचा आहे हे मला सांगायचं होतं. खुला फोरम आहे तिथं कुणीही प्रतिसाद देऊ शकतं. तिथं अमुकतमुक माणसानेच प्रतिसाद द्यावा आणि इतरांनी प्रतिसाद देऊ नये असं सुचवणं हा शुद्ध अडाणीपणा आहे. याउलट केवळ अमुकतमुक माणसानेच आपल्याशी संवाद साधावा अशी अपेक्षा असल्यास त्यासाठी इतर पर्याय मालकांनी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यांना खरडवही (ओपन-वैयक्तिक संवाद) आणि व्यनि (खाजगी वैयक्तिक संवाद) असे म्हटले जाते.
खुली चर्चा, खरडवही आणि व्यनि यांची कार्यपद्धती व उपयोग हे असे आहेत.
आशा आहे तुम्हाला आता समजलं असेल.

बाकी उठसूट दुसऱ्याला बेसिक मॅनर्स नाहीत, वैचारिक कावीळ झाली आहे, भाद्रपदामुळे उत्साह आलाय असं सांगणं हे संघाच्या शाखेत शिकवले जाणारे मॅनर्स आहेत की काय?

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 1:32 am | बोका-ए-आझम

बाकी बेसिकमध्ये लोचा, शुद्ध अडाणीपणा वगैरे वैयक्तिक प्रतिसाद चालतात वाटतं. ज्यांनी तुम्हाला संघविरोध शिकवला (स्वतःची मतं तुम्हाला आहेत असं दिसत नाही) त्यांनी हेच शिकवलेलं दिसतंय. काय करणार? मुद्दे नसले की माणूस वैयक्तिक होतोच. या आजारपणातून आधी बरे व्हा. मग चर्चा करु.
ता.क. - कावीळ असा शब्द मी माझ्या कुठल्याही प्रतिसादात वापरलेला नसताना तुम्हाला तो दिसला. त्यावरून केस अगदीच हाताबाहेर जायच्या मार्गावर आहे हे दिसतंय. काळजी घ्या. काही झालं तर संघ येणार नाहीये उपचार करायला! ;)

आजानुकर्ण's picture

15 Sep 2016 - 1:43 am | आजानुकर्ण

अहो तुम्ही दुसऱ्यांचं रोगनिदान कायम करत असता त्यावरुन तो प्रतिसाद दिला होता.

इथं वाचाः http://misalpav.com/comment/760207#comment-760207

गयी भैंस पानी में!
बोका-ए-आझम - Fri, 23/10/2015 - 12:43

शरीरात असलेल्या काविळीवर उपाय असतो पण अशा वैचारिक काविळीवर काय उपाय असणार आहे?

इतकं परफेक्ट डायग्नॉसिस असल्यामुळे ते लक्षात राहिलं इतकंच. इथंही तुम्ही मुद्दे संपल्यावर लगेच दुसऱ्याचे मॅनर्स, किंवा भाद्रपद महिना काढायच्या भानगडीत आधी पडलात.

मुद्दे नसला की माणूस वैयक्तिक होतो हे सगळ्याच चर्चांमध्ये दिसलं आहे. आता जशास तसे उत्तर देण्याची आमची जन्मजात खोड असल्याने तुमचा अडाणीपणा उघड केला यात वैयक्तिक काही नाही.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 1:53 am | बोका-ए-आझम

मी आधी मांडलेल्या मुद्द्यांवर काहीही प्रतिसाद नाहीये तुमचा. आणि असेल अशी अपेक्षाही नाही. त्यासाठी अभ्यास लागतो. नुसतं ९ वर्षे मिपावर आहात पण शिकला काहीच नाहीत आणि वर परत मला अडाणी म्हणताय. त्याने तुमचं अज्ञान सिद्ध होतंय. मला काहीही फरक पडत नाही, संघाला तर त्याहून पडत नाही. मला एवढं महत्त्व दिल्याबद्दल धन्यवाद! संघ नसतात तर तुमच्यासारख्या लोकांनी काय केलं असतं हा प्रश्न नेहमीच पडतो आणि मग संघाची आवश्यकता समजते. रच्याकने जशास तसे ही तुमची खोड आहे असं तुम्ही म्हटलंय. म्हणजे स्वतःच स्कोअर सेटलिंग करताय हे उघड केलंय. चालू द्या! अजून काही भरकटलेले मुद्दे असतील तर आणा. तेवढीच करमणूक!

विशुमित's picture

15 Sep 2016 - 11:47 am | विशुमित

<<<<संघ नसतात तर तुमच्यासारख्या लोकांनी काय केलं असतं हा प्रश्न नेहमीच पडतो आणि मग संघाची आवश्यकता समजते.>>>>>

संघाच्या विचारांपासून दूर राहिल्यामुळे आमचं खूप बरं चाललंय.
नाहीतर "ठेविले अनंत तैशेची राहावे" हे इतके मनामध्ये घट्ट बनवले होते की "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे" हे लग्न ठरल्यावर लक्ष्यात आले.
(तीळ टीप : वारकरी संप्रदायात संघ प्रणित कीर्तनकारांनी तुकाराम महाराजांचे फक्त एकांगीच विचार अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पसरवले. बाकी वारकरी संप्रदाय बद्दल लिहण्याचा माझा प्रयास आहे, नक्कीच मिपा वर प्रकाशित करेल.)