संघ आणि त्याचे टिकाकार
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.
आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.
समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.
इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.
शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.
तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.
म्हणून काम करणार्याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
प्रतिक्रिया
12 Sep 2016 - 3:22 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रश्र्न.
12 Sep 2016 - 3:07 pm | विशुमित
https://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Swayamsevak_संघ
तुमचं मत जाणून घेयला आवडेल.
12 Sep 2016 - 3:12 pm | श्रीगुरुजी
लिंक चुकीची आहे.
12 Sep 2016 - 3:30 pm | विशुमित
https://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Swayamsevak_Sangh
12 Sep 2016 - 11:21 pm | श्रीगुरुजी
विकीपिडीयातील माहिती मिठाची चिमूट घेऊनच वाचावी लागते. बर्याचदा माहिती चुकीची, अर्धवट किंवा पक्षपाती असते. वरील लिंकमध्ये काही ढोबळ चुका आहेत.
उदा. It drew initial inspiration from European right-wing groups during World War II.
संघ ही स्थापनेपासूनच हिंदुत्ववादी विचारांची संघटना होती. संघस्थापनेनंतर तब्बल १४ वर्षानंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे दुसर्या महायुद्धाच्या कालखंडात संघाला युरोपमधील उजव्या विचारांच्या संघटनांकडून स्फूर्ती मिळाली हे चुकीचे विधान आहे.
The RSS was banned once during British rule and then thrice by the post-independence Indian government — first in 1948 when a former RSS member assassinated Mahatma Gandhi; then during the emergency (1975–77); and for a third time after the demolition of Babri Masjid in 1992.
हे पण चुकीचे विधान आहे.
12 Sep 2016 - 10:59 pm | पगला गजोधर
प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. त्या दिवशी हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला करून तिरंगा फाडुन टाकत सेनापती बापट आणि गजानन कानिटकरांना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "हेडगेवार आणि सावरकर यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिमद्वेष, कोंग्रेस द्वेष आणि तिरंग्याचा द्वेष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाला ते मानीत नाहीत."
12 Sep 2016 - 11:06 pm | अभ्या..
१९३८ साली तिरंगा हा भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून घोषित होता का? कींवा अशोकचक्राच्या ऐवजी चरखा असणारा काँग्रेसचा ध्वज म्हणून माहीत होता? का स्वतंत्रता सेनान्यांचा ध्वज म्हनून माहीत होता? त्याचा सध्या आहे तसा प्रोटॉकॉल वगैरे त्यावेळी नसावे काही.
12 Sep 2016 - 11:09 pm | पगला गजोधर
२२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेल्या निवेदनात सावरकर म्हणाले, "हिंदू जगत उद्घोषित करणारा कुंडलिनी-कृपाणांकित ओम आणि स्वस्तिकासहितच्या भगव्या ध्वजाखेरीज अन्य कोणता राष्ट्रध्वज असू शकतो? हिंदू महासभेच्या सर्व शाखांवर हाच ध्वज फडकला पाहिजे...तिरंगी झेंडा खादी भांडारांवरच काय तो शोभेल!"
12 Sep 2016 - 11:14 pm | अभ्या..
मग त्यांचे हे पक्षांचे पक्षांचे भांडण झाले ध्वज कोणता असावा याबद्दल. कॉग्रेसने पुढे आणलेल्या तिरंग्याला त्यानी केला असेल त्यावेळी विरोध. हा राष्ट्रध्वजाला थोडीच विरोध झाला. (कारण त्यावेळी राष्ट्रध्वज म्हणून नसणारच)
12 Sep 2016 - 11:16 pm | पगला गजोधर
https://books.google.co.in/books?id=rNxGvlOoUvsC&pg=PA50&lpg=PA50&dq=हिंदू+महासभा+17+एप्रिल+1941&source=bl&ots=sZePpJGBNj&sig=-14Q0nbq9HZLTX19jgp5Th55sv8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjIju2wsIrPAhWDKJQKHfbDB_kQ6AEIIzAD#v=onepage&q=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%2017%20%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%201941&f=false
13 Sep 2016 - 3:16 pm | मृत्युन्जय
तीन तीनदा एकच चुकीचा मुद्दा रेटुन नक्की काय मिळवणार आहात? अभ्याने पुर्वीच लिहिले आहे की जेव्हा तिरंगा हा भारताचा झेंडा नव्हताच तेव्हा त्याला विरोध करणे हे देशाच्या झेंड्याला विरोध करणे होउच शकत नाही. भारताचा झेंडा कसा असावा याबद्दल खान्ग्रेस आणी संघ यांच्यामध्ये दुमत होते आणि खान्ग्रेस ने आपला मुद्दा रेटुन तिरंगा मान्य करायला लावला किंवा तशी परिस्थिती निर्माण केली असे फारतर म्हणता येइल
13 Sep 2016 - 4:35 pm | चंपाबाई
मग असेच असेल तर संघाच्या लोकानी तिरंगा वापरणार्याना मारहाण का केली ?
14 Sep 2016 - 9:43 pm | विकास
संघाचे वर्तमान प्रसारप्रचार प्रमुख श्री. मनमोहन वैद्य यांची गेल्याच आठवड्यात (हिंदूस्थान टाईम्स चे एक उद्योग-अर्थव्यवस्था आदीवरील जालीय पत्र) लाईव्ह मिंट मधे मुलाखत आली होती. ती मुलाखत मुळातूनच वाचण्यासारखी आहे. पण येथे तिरंग्या संदर्भातील त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे चिकटवत आहे.
It is often said that the RSS has reservations about the Indian flag. Is that true?
The Indian flag as it was adopted by our Constitution must be respected by all. There have been people from the Sangh who have given up their lives to protect the flag so there is no question of us not accepting the flag. We are not interested in changing it.
Was there no objection to the flag when it was adopted?
The tricolour flag emerged in political scenario in 1921. It was Gandhiji’s idea to have a flag representing all major communities. Hence a tricolour flag with red (not saffron) at the bottom, green in middle and white at the top representing Hindus, Muslims and Christians.
Then itself, lot of people objected, calling it a communal flag. The very idea of identifying each community separately and trying to forge unity among them was termed as communal thinking. They demanded to have a non-communal, national flag.
This demand was so strong that All India Congress Working Committee appointed a seven member committee (popularly known as flag committee) to look into the matter. After hearing both the sides, the flag committee came to a unanimous conclusion.
The flag committee report published in 931 says, “It was decided that our flag should be artistic, distinct and non-communal. It was decided unanimously that it should be of one single colour. And if there is a colour that is more distinct that another, one that is more acceptable to the Indians as a whole and one that is associated with this ancient country by long tradition it is the saffron kesari colour.”
The flag committee recommended a rectangular saffron-colour flag with a blue charkha on top corner. The communalization of the colour saffron has happened post-Independence—particularly post the insertion of the word secular in the Constitution, when the definition of what is communal and what is secular began to get distorted.
12 Sep 2016 - 2:59 pm | मोहनराव
खुप प्रतिसादांचे पोटेंशियल असलेला धागा...
12 Sep 2016 - 3:04 pm | श्रीगुरुजी
दुरूस्ती. संघाच्या कार्यकर्त्यांनी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेल्या दादरा, नगर, हवेली या भागांच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे इ. १२५ स्वयंसेवकांनी १९५३ मध्ये दादरा, नगर, हवेली इ. भागांवर सशस्त्र हल्ला करून हा भाग मुक्त केला होता. त्याव्यतिरिक्त संघाने १९३८ मध्ये हैद्राबादच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. हे आंदोलन संघानेच सुरु केले होते. वैयक्तिक पातळीवर अनेक संघ स्वयंसेवक स्वातंत्र्यलढ्यात होते.
12 Sep 2016 - 3:16 pm | चंपाबाई
हायला , कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही... अन या गोवा दाद्र्याचं संघवाल्याना भारीच कौतुक असतं !
12 Sep 2016 - 3:19 pm | अनिरुद्ध प्रभू
ह ह पु वा झाली माझी...
बाई अभ्यास वाढवा हो...!!!
12 Sep 2016 - 3:24 pm | श्रीगुरुजी
आता पुढचा जावईशोध म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात सोनिया, राहुल, प्रियांका, रॉबर्ट इ. स्वातंत्र्यसैनिकांनी कठोर कारावास भोगला होता व त्यांच्या प्रयत्नांमुळेच आख्खा भारत स्वतंत्र झाला.
12 Sep 2016 - 3:26 pm | अनिरुद्ध प्रभू
वाह!! गुरुजी.......
पोट दुखु लागलं आता...
12 Sep 2016 - 3:29 pm | चंपाबाई
हो ना ! १९४२ साली फितुरी करुन इंग्रजांची मदत केलेल्या एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते.
त्यापेक्षा हे ऐकायला मिळाले तर नक्कीच चालेल
12 Sep 2016 - 3:37 pm | मुक्त विहारि
....एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते."
तुम्ही हे असे मनोरंजक प्रतिसाद देता, म्हणून आजकाल आम्हाला तुमचे कौतूक वाटते....
12 Sep 2016 - 3:37 pm | चिनार
त्यापेक्षा,
ही बातमी जास्त मनोरंजक आणि सत्याच्या जवळपास जाणारी असेल नाही का चंपाताई ??
12 Sep 2016 - 3:21 pm | चिनार
असं कसं म्हंता चंपाताई..त्यांचेच त पांग फेडून राह्यलो 60-70 वर्ष झाले..
पण स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विलीन करावी असे गांधीजींचे म्हणणे होते असं वाचलंय..त्याच काय झालं ते कळलं नाही..
बाकी काँग्रेस विलीन (= बरबाद) करावी हे युवराजांनी मनावर घेतलंय असं दिसतंय..पोकेमॉन गो दिला का त्यांना डाऊनलोड करून ??
12 Sep 2016 - 3:28 pm | अनिरुद्ध प्रभू
फर्मास बर का चिनार भाउ....
12 Sep 2016 - 3:34 pm | मुक्त विहारि
इतके मनोरंजक प्रतिसाद द्यायला, तुम्हाला कसं, कसं, सुचतं हो...
तुमच्या सारख्या व्यासंगी, विद्वान, हजरजबाबी आणि बरेच काही गूण असलेल्या व्यक्तींच्या समावेशामुळे मिपा नक्कीच पहिल्या क्रमांकावर येणार बघा.
12 Sep 2016 - 3:40 pm | चंपाबाई
तुमच्या अंगी असलेली गुणग्राहकता पाहून गहिवरुन आले.
12 Sep 2016 - 3:43 pm | मुक्त विहारि
इतक्या वेळा आय.डी. उडून पण आपली कोडगेपणाची चिकाटी अद्द्याप टिक्कुन आहे...
हा पण आपला एक विशेष गूण आहेच.
12 Sep 2016 - 11:24 pm | श्रीगुरुजी
इतका लोचटपणा स्वभावात असण्यासाठी अंगी कमालीचा कोडगेपणा असावा लागतो.
14 Sep 2016 - 10:48 am | llपुण्याचे पेशवेll
वाचा -
:)
14 Sep 2016 - 7:06 pm | सुखीमाणूस
हा हा हा
12 Sep 2016 - 6:46 pm | फेदरवेट साहेब
ह्याच पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा प्रचार करून सोनिया गांधींस निवडून आणा म्हणून केलेला प्रचार विसरलात का गुरुजी ??
तात्पर्य, माझा संघ मोठ्या नावांचा मोताद नाहीये, नावांनी संघ स्वतःला चिकटवून घ्यावा, संघाला कोणाच्या नावाची गरज नाही
(कट्टर कार्यकर्ता)
ढेल्या.
12 Sep 2016 - 11:26 pm | श्रीगुरुजी
पुरंदर्यांनी कॉंग्रेसचा प्रचार केला आणि तोही सोनिया गांधींसाठी!
ऐकावे ते नवलच!
13 Sep 2016 - 7:27 am | फेदरवेट साहेब
पुरंदरे संघाचेही प्रचारक आणि काँग्रेसचेही . भोरला झालेल्या सोनियांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत तिला आधुनिक भारताच्या जिजाऊ म्हणत तलवार नजर करून मुजरा केला होता आणि लोकांना अनंतराव थोपटेनाच मत द्या म्हणून साकडं घातलं होतं.
वाटल्यास आपल्या चालत्याबोलत्या राजकीय ज्ञानकोश उर्फ गॅरी ट्रुमन उर्फ क्लिंटन ह्यांच्याकडून फॅक्ट व्हेरिफाय करवून घेऊ शकता आपण
13 Sep 2016 - 7:48 am | चंपाबाई
सोनिया - जिजाउ
मग शिवाजी कोण ?
13 Sep 2016 - 8:36 am | श्रीगुरुजी
>>> पुरंदरे संघाचेही प्रचारक आणि काँग्रेसचेही . भोरला झालेल्या सोनियांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत तिला आधुनिक भारताच्या जिजाऊ म्हणत तलवार नजर करून मुजरा केला होता आणि लोकांना
याचे काही संदर्भ आहेत का?
13 Sep 2016 - 8:41 am | फेदरवेट साहेब
जुनी कात्रणे धुंडाळायला लागतील, बघतो काही सापडते काय ते.
12 Sep 2016 - 3:17 pm | श्रीगुरुजी
हसून हसून पोट दुखायला लागलं. अजून असेच विनोद येऊ द्यात.
13 Sep 2016 - 10:01 am | विवेकपटाईत
दुसर्या विश्वयुद्धाचा काळात १5 -२० लक्ष भारतीय लोक ब्रिटीश सैन्यात दाखील झाले. अनेक गोळा बारूद चे कारखाने भारतात लागले. त्यातले अर्ध्याहून अधिक सैन्याला युद्धा नंतर निवृत्त करावे लागणार होते. अश्या परिस्थितीत विश्वयुद्धानंतर देशाला स्वतंत्रता देण्या शिवाय काही गत्यंतर नव्हते. कांग्रेस मुळे ब्रिटिशांना देशाचे दोन तुकडे करता आले एवढेच. सन १९४५ नंतर देशाला स्वतंत्रता देण्याची कार्रवाई ब्रिटिशांनी सुरु नसती केली तर नक्कीच सेन्याने त्यांना हाकलून लावले असते. एखादा जनरल गादीवर बसला असता.
12 Sep 2016 - 3:40 pm | मुक्त विहारि
५०
12 Sep 2016 - 5:44 pm | रविकिरण फडके
(एक शंका: हा लेख 'चर्चा'त का नाही?)
बाकी, संघ हा एक चमत्कार खरा! कारण तो मला तरी तो आसपास कुठेच दिसत नाही. तो आहे हे मान्य. कारण संघाचा स्वयंसेवक असलेला एक लांबचा काका होता माझ्या लहानपणी. शिवाय संघ-प्रमुखांचे विचार वगैरे वाचनात येतात (त्यांच्यावर टीका होते तेव्हा) त्याही अर्थी संघ असावा. पण मला वाटते तो दूर कोठे तरी असतो - मिझोराम, नागालँड, असा, किंवा भूतकाळात गोवा मुक्तिसंग्रामात, नाहीतर कुठे भूकंप वगैरे झाला तर. पण मी जिथे जिथे राहिलो आहे तिथे तिथे काही समस्या निर्माण झाली आणि संघ पुढे आला असे मी अनुभवलेले नाही. स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत. ते फक्त मोठ्या समस्याच हाती घेतात. किंवा असे आहे का की ते पडद्यामागून सूत्रे हलवितात पण श्रेय घेत नाहीत म्हणून मला दिसत नाहीत? नाहीतर कदाचित माझा अनुभवच तोकडा असेल.
12 Sep 2016 - 6:06 pm | अंतरा आनंद
एक नंबर विचारणा.
आमच्याकडेही त्यांची उपस्थिती मैदानावर काठ्या घेऊन हजेरी लावण्यापुरतीच आणि लहानांची बौध्दिके घेण्यापुरतीच दिसते. सामान्य माणसाला कुठले प्रॉब्लेम नसावेत असं त्यांचा समज असावा किंवा "नमामि वत्सले" म्हटल्याबरोबर सगळे प्र्~ओब्लेम छू होतात असं काहीतरी असावं.
13 Sep 2016 - 9:00 pm | आनन्दा
माझ्या घरात आणि आसपास संघ आहे, आणि मी तो बर्याच वेळेस अनुभवतो. एकदा तळासरीच्या वनवासी कल्याण केंद्राला भेट देऊन या. हे माझ्या माहितीतेल उदाहरण, बाकी माहीत नसलेली अनेक उदाहरणे असतील.
12 Sep 2016 - 6:14 pm | विशुमित
काठ्या घेऊन गुंडाना काय मारणार आहेत ते ?
स्त्रियांची छेडछाड रोखण्यासाठी स्त्रियांना च उपदेश देत असतात ना तोकडे कपडे घालू नका, घराबाहेर पडू नका, स्त्री मर्यादा सांभाळा वगैरे वगैरे..
मोठ्या समस्येसाठी गेले 60-70 वर्ष घाशीत आहेत कोठे फरक पडला ?
12 Sep 2016 - 7:46 pm | चंपाबाई
अशा प्रसंगात पलायन करता यावे म्हणुनच तर ते फुलप्यान्टीऐवजी चड्ड्या घालतात , असे मी कुणाकडुन तरी ऐकले.
12 Sep 2016 - 8:35 pm | जेपी
चंपाबाई,
उद्या बकरा कुर्बान करणार आहात का ?
नाय मंजे एक वाटा आमाला पण द्या..
14 Sep 2016 - 2:16 pm | बोका-ए-आझम
याचा कृपया विदा द्यावा.
12 Sep 2016 - 11:33 pm | श्रीगुरुजी
कोणतीही व्यक्ती वा संघटना काही ठराविक क्षेत्रातच काम करताना दिसते. समाजाच्या सर्व क्षेत्रात तितक्याच तीव्रतेने काम करणे शक्य नसते. बाबा आमटे, प्रकाश आमटे यांनी कुष्ठरोग सेवा, आदिवासींची सेवा या क्षेत्रात काम केले आहे. अण्णा हजारे गावसुधारणा, भ्रष्टाचार विरोध इ. क्षेत्रात काम करतात. नानाजी देशमुख यांनी वनवासी क्षेत्रात काम केले. तसेच संघ हिंदू संघटन, नैसर्गिक आपत्ती व युद्धासारख्या प्रसंगी मदतकार्य, जातीयता निर्मूलन, शिक्षण इ. क्षेत्रात काम करतो. अण्णा हजारे किंवा बाबा आमटे या लोकांचा दहशतवात विरोधी कार्यात हातभाग किती किंवा कलाक्षेत्रासाठी यांनी काय केले किंवा महागाईविरोधात त्यांनी काय केले हे प्रश्न जसे चुकीचे ठरतील तसेच संघ बाकीच्या आपले मुख्य कार्यक्षेत्र सोडून इतर क्षेत्रात का नाही हा प्रश्न देखील योग्य ठरणार नाही.
12 Sep 2016 - 9:01 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
"कलियुग" ही संकल्पना थोतांड आहे,
"चमत्कार" या शब्दावर माझा आक्षेप आहे.
आणि सतत संघाचे धागे मिपावर येण्यालाही माझा एक मिपाकर म्हणून आक्षेप आहे.
'
'
धन्यवाद
12 Sep 2016 - 9:11 pm | फेदरवेट साहेब
माझा ह्यांच्या मिपावर असण्यालाच आक्षेप आहे!
(सरासरी साक्षेपी) ढेल्या
14 Sep 2016 - 7:17 pm | सुखीमाणूस
आता कोठे गेले विचारस्वातंत्र्य?
इतकी असहिष्णुता
निषेध
12 Sep 2016 - 10:09 pm | श्रीनिवास टिळक
'संघे शक्ति कलौ युगे,' असं एक वचन आहे. त्याला अनुसरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. सांप्रत, संघाच्या विविध सेवाभावी संस्थांना जे यश आणि पाठिंबा मिळत आहे त्याच्या मागे हीच शक्ती (चमत्कार नाही)असावी.
12 Sep 2016 - 10:25 pm | चंपाबाई
सोंगे शक्ती कलीयुगे ... अशीही एखादी म्हण असावी... सोंग काढणे हीही एक शक्तीशाली कला कलियुगात विकसित झाली आहे.
12 Sep 2016 - 11:35 pm | श्रीगुरुजी
पुरूष असताना बाईचा आयडी असल्याचे सोंग घेणे किंवा अनेकवेळा हाकलून लावलेले असताना सुद्धा लोचटपणे पुन्हा पुन्हा इथे घोटाळणे ही कोडगेपणाची शक्तिशाली कला तुमच्यात चांगलीच विकसित झाली आहे.
13 Sep 2016 - 12:05 am | रुस्तम
लोकांना काय मिळत असं स्त्री पुरुषाचं दुहेरी आयुष्य जगून? काही मानसिक किंवा शारीरिक उणीव?
13 Sep 2016 - 11:15 am | अनुप ढेरे
तुमचं खरं नाव रुस्तम आहे काय? किंवा वरील सन्माननीय सदस्याचं नाव गुरुजी आहे काय?
13 Sep 2016 - 6:01 pm | रुस्तम
ओ ढेरे तुमचा तर डु आयडी नाही ना तो?
13 Sep 2016 - 11:37 am | साहना
ज्येष्ठ नागरिक असताना शेंबड्या पोराप्रमाणे ढगळ चड्डी घालून हवेत दंड फिरवीत काल्पनिक म्लेंच्छाची डोकी फोडणाऱ्या बाबत आपले काय मत आहे ? उत्तिष्ठ, उपविष करताना "चप्पल प्रमुख" सारख्या उच्च पदावर जबाबदारीचे सोंग आणणाऱ्या बाबत आपले काय मत आहे बरे ?
13 Sep 2016 - 6:19 pm | शाम भागवत
अस काही वाचल की संघ अधिकाधिक बळकट होतोय, तसेच २०१९ साली मोदी परत निवडून येणार असे वाटायला लागते.
:))
२०१४ साली संघ व मोदी विरोध असाच उफाळून आला होता व भाषा तर याहूनही खतरनाक होती.
तुम्ही छुपे मोदी समर्थक तर नाही ना?
;-)
13 Sep 2016 - 6:53 pm | फेदरवेट साहेब
साहेब ,
उघडा डोळे बघा नीट (किमान) गुजरतेतल्या बातम्या, अत्युच्च पातळीला पोचले की भल्याभल्या संस्कृतींचा ऱ्हास होतो. हे बीजेपी काँग्रेस आप वगैरे यःकिश्चित राजकीय पक्ष आहेत.
(केवळ नियतीस इमानदार असलेला कुत्रा)
ढेल्या
13 Sep 2016 - 7:08 pm | शाम भागवत
:)
तस काही नाही हो. राग व द्वेष यांची मात्रा जरा जास्त वाटली म्हणून अॅडव्हर्स सिलेक्शनचा उपयोग केला.
14 Sep 2016 - 7:36 pm | सुखीमाणूस
निरलसपणे कार्य करतात
12 Sep 2016 - 11:58 pm | पगला गजोधर
हिंदू धर्म उद्धारार्थ प्रकातलेल्या ह्या संघटनेला इफ्तार पार्टी का आयोजित करावी लागली बरे ??
रेफ- 2 जुलै 2016, दिल्ली
13 Sep 2016 - 12:09 am | श्रीगुरुजी
http://www.hindustantimes.com/india-news/rss-rebukes-reports-of-conducti...
13 Sep 2016 - 7:39 am | पगला गजोधर
मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ यांच्यात काहीच सबंध नाही का ? आता टेक्निकल गोष्ट उभ्या करून , जसे की इफ्तार मुरामं ने आयोजित केलाय, संघाने नव्हे; धूळफेक होऊ लागलीय.
13 Sep 2016 - 10:09 am | साहना
आप समज्या नहीं भाई जान
जे काही चांगले आहे ते संघ, आक्षेप घेण्यासारखे आहे ते सगळे आऊट सोर्ज्ड आहे हो. रस्त्यात मारामारी करणारे, तोडफोड बजरंग दल. अपघात स्थळी मदत घेऊन पोचणारे संघ. भ्रष्टचार करून पैसे खाणारे भाजपवाले. रक्तदान करणारे संघ वाले. इफ्तार करणारे मुस्लिम मंच, दसऱ्याच्या दिवशी घोष वाजवणारे संघ. कम्युनिस्टां प्रमाणे बुरसटलेली आर्थिक नीती असणारा तो मजदूर संघ, गुरुपौर्णिमेला ध्वजवंदन करणारा फक्त संघ.
थोडक्यांत काय तर संघ म्हणजे आलीस इन ओन्डरलॅंड आहे. काहींनी काम ना करता, कुठल्याही विषावर ठोस भूमिका ना घेता गुळमुळीत धोरण ठेवले कि कुणीही नवे ठेवू शकत नाही आणि जबाबदार झटकून टाकता येते.
13 Sep 2016 - 3:48 pm | श्रीगुरुजी
नाही.
13 Sep 2016 - 3:59 pm | अनुप ढेरे
http://muslimrashtriyamanch.org/
हे चेकवा.
http://muslimrashtriyamanch.org/
13 Sep 2016 - 4:06 pm | श्रीगुरुजी
संघ आणि मुस्लिम राष्ट्रीय विचार मंच यांच्यात काय संबंध दिसतो या लेखातून? एका कार्यक्रमात संघाचे नेते व काही मुस्लिम नेते एकत्र आले व नंतर त्या मुस्लिम नेत्यांनी हिंदू व मुस्लिम यांच्यातील दरी मिटविण्यासाठी या मंचाची स्थापना केली. संपला संबंध.
विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी संघ इ. संघटनांची पितृसंस्था संघ आहे. या संस्था संघाच्या अखत्यारीत येतात. मुस्लिम विचार मंच, बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता दल, हिंदू मुन्नेन मुन्नानी, श्रीरामसेने इ. संघटना स्वतंत्र आहेत. संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही व त्या संघाने सुरू केलेल्या वा चालविलेल्या नाहीत.
13 Sep 2016 - 5:48 pm | पगला गजोधर
नॉन-स्टेट-ऍक्टर संघटना
जसे की पाकिस्तानात, जमात-उल-दावा हिच्याशी पाकिस्तान सरकार, सैन्यदल, आय एस आय, पाकिस्तान पीपल्स पार्टी इत्यादींचा संबंध नाही ....
13 Sep 2016 - 6:20 pm | श्रीगुरुजी
!
13 Sep 2016 - 11:05 pm | पगला गजोधर
14 Sep 2016 - 11:51 am | पगला गजोधर
सात्यकी सावरकर यांनी संघाची बदनामी केली म्हणून, संघ किंवा अनुयायांपैकी, त्यांच्यावर दावा करणार काय ?
आणि जे काही लेखन त्यांच्याकडे आहे, ते त्यांनी सार्वजनिक करून, पूर्ण चित्र लोकांपुढे यावे, म्हणून त्यांच्यावर कोर्टातून आदेश घेऊन येणार का ?
13 Sep 2016 - 9:04 pm | आनन्दा
खरे आहे.. या संघटनांपैकी बर्याच संघटना पूर्वाश्रमींच्या संघ स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या दिसतात. श्रीराम सेना माहीत नाही, पण बजरंग दल वगैरे परिवाराशी नाते सांगतात यात संदेह नसावा. किंबहुना सध्या जो घोळ चालू आहे ते मराठी भाषा आंदोलन पण यातच येते.
14 Sep 2016 - 2:33 pm | श्रीगुरुजी
संघाशी संबंधित संस्थांचे २-३ प्रकार आहेत.
१) संघाने स्वतः सुरू केलेल्या उपसंस्था (यात विहिंप, अभाविप, भामंसं, वनवासी संघ, राष्ट्र सेविका समिती इ. चा समावेश होतो). या संस्था संघाने स्वतःहून सुरू केलेल्या असून संघाचे यांच्यावर नियंत्रण आहे.
२) संघ स्वयंसेवकांनी स्वतःहून सुरू केलेल्या संस्था (यात ज्ञानप्रबोधिनी ही शिक्षण संस्था, जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक, बजरंग दल इ. चा समावेश होतो). या संस्था जरी संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केल्या असल्या तरी संघाशी यांचा तसा संबंध नाही व संघाचे यांच्यावर नियंत्रण नसते.
३) संघापासून स्फूर्ती घेऊन सुरू झालेल्या संस्था (उदा. मुस्लिम राष्ट्रीय मंच). अशा संस्थांवरही संघाचे नियंत्रण नसते व अशा संस्थांशी संघाचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष असा कोणताच संबंध नसतो
४) यात अजून एक प्रकार आहे. तो म्हणजे संघाच्या हिंदुत्व, राष्ट्रवाद इ. काही तत्वांशी काहीशी जवळीक असणार्या संस्था. यात पतितपावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, वंदेमातरम संघटना, हिंदू मुन्नेन मुन्नानी, शिवसेना, सनातन संस्था, हिंदू जागृती मंच, श्रीराम सेने इ. चा समावेश होतो. संघाचा या संस्थांशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष असा कोणता संबंध नाही. संघाचे या संस्थांवर कोणतेही नियंत्रण नाही किंवा संघ यांना मार्गदर्शनही करीत नाही. परंतु अशा संस्थांनी जर काही दुष्कृत्ये केली तर लगेच संघ परिवारातील संस्थांनी दुष्कृत्ये केली असा कांगावा केला जातो.
14 Sep 2016 - 4:21 pm | पगला गजोधर
'असे कांगावा करणारे' यांनी संघाची बदनामी केली म्हणून, संघ किंवा अनुयायांपैकी, त्यांच्यावर दावा करणार काय ?
आणि जे काही पूर्ण सत्य चित्र लोकांपुढे यावे, म्हणून त्यांच्यावर कोर्टातून आदेश घेऊन येणार का ?
14 Sep 2016 - 10:41 pm | श्रीगुरुजी
स्तत्य सूचना आहे. या सूचनेला मी अनुमोदन देतो. ही सूचना लवकरात लवकर संघाला पाठवा.
13 Sep 2016 - 9:59 am | अनिरुद्ध प्रभू
मुळात संघ आणि संघाचं हिंदुत्व यांवर निदान बेसिक वाचन चालु करावं ही विनंती. एकदा बेस कळाला कि बरेचसे प्रश्न पडणार नाहीत. पहिलं मुळं पक्कं करा.
विनंती..
आ.न.
अनिरुद्ध
13 Sep 2016 - 10:11 am | साहना
हिंदुत्वाची संघ मान्य व्याख्या काय आहे बरे ?
13 Sep 2016 - 10:28 am | अनिरुद्ध प्रभू
हिंदु नक्की कोणाला म्हणावं?
जी व्यक्ती अखंड हिंदुस्तान वा आपला भारत यांवर अत्यंत मनापासून, प्रेम करते मग ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरीही ती हिंदूच....
संघ हे प्रमाण मानतो..
स्वा. सावरकरांची हिंदुत्त्वाची व्याख्या जी संघ मानतो ती अशी आहे. परिपूर्ण, व्यापक, पण निश्चित. ..........."आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका........... पितृभूपुण्यभूश्चैव........... स वै हिंदुरीतिस्मृतः" जो सिंधुनदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या ह्या विशाल खंडप्राय देशाला, आपल्या वाडवडीलांची, पूर्वजांची भूमी मानतो, तसेच पवित्रभूमी मानतो, तो हिंदू.
13 Sep 2016 - 11:05 am | साहना
व्याख्या हिंदुत्वाची विचारली होती हिंदू शब्दाची नाही.
"हिंदुत्व म्हणजे काय हो असे १० वर्षांच्या मुलाने विचारले तर एका स्वयंसेवकांचे उत्तर काय असेल ? हि व्याख्या संघाच्या कुठल्या साहित्यात दिलेली आहे ? "
आपली हिंदू धर्माची व्याख्या सुद्धा गोंधळ उडवणारी आहे.
१. आपण दिलेली व्याख्या आणि सावरकर ह्यांची व्याख्या ह्यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. त्या दोन्ही सामान नाही आहेत.
२. मुस्लिम/ख्रिस्ती लोकांची पुण्यभू हिंदुस्थान नाही ती काबा/जेरुसलेम इत्यादी आहे. सावरकरांच्या व्याख्ये प्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिम हिंदू नाहीत. आपल्या व्याख्येप्रमाणे ते हिंदू असू शकतात.
३. जर राष्ट्रपेमी ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहे तर मग उगाच धर्मांतराला का बरे विरोध कार्याचा ? धर्मांतर केले म्हणून राष्ट्रप्रेम का कमी होते ?
४. आमची मुले जी परदेशांत जन्माला अली आहेत स्थायिक आहेत जी भारतात कधीही अली नाही अश्याना संघ अ-हिंदू मानतो काय ? बाली किंवा कंबोडिया मधील हिंदू संघाच्या मते अ-हिंदू आहेत का ?
५. ज्या ख्रिस्ती/मुस्लिम धर्मानी आमच्या हिंदू धर्माची थट्टा केली, आमच्या मूर्तीना फोडून टाकले, आमच्या हिंदू स्त्रिया वर अत्याचार केले, शेकडो लोकांचे शिरकाण केले त्यांना सुद्धा आम्ही हिंदू मानायचे काय कारण त्याचे भारतावर प्रेम आहे ? तथाकथित संत तेरेसा ह्यांचे भारतावर प्रेम आहे म्हणून त्यांना आम्ही हिंदू मानायचे का ?
मूर्तिपूजा, निसर्गपूजा ह्यांना सर्वांत मोठे पाप मानणाऱ्या ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माला "हिंदू" मानणे हि वैचारिक दिवाळखोरी आणि आमच्या धर्म परंपरासाठी बलिदान केलेल्या आमच्या पूर्वजांचा घोर अपमान नाही आहे काय ?
थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही.
हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करताना ह्यांची भंबेरी उडते. हिंदू शब्दाची व्याख्या उसनवारी वरून घेतली कुणाकडून तर सावरकर ह्यांच्या कडून. ती सुद्धा समजली अर्धवट. गणवेश आणि एकूण संघटन पद्धती घेतली युरोपिअन लोकां कडून. आपल्याच इतिहास संस्कुर्तीचा नाही अभ्यास आणि चालले आपले धर्म रक्षण करण्यासाठी.
13 Sep 2016 - 11:31 am | विशुमित
!!..एकच फाईट वातावरण टाईट..!!
13 Sep 2016 - 2:08 pm | अनिरुद्ध प्रभू
प्रत्येक प्रश्नाच उत्तर मी देउ शकतो पण एवढ सगळं टाईप करायचा कंटाळा आणि तेवढा नसलेला वेळ पाहता आपली भेट घेण्यास उत्सुक आहे...
बाकी आपल्या कोर्टात चेंडु...आपण ठरवावे...मी आहेच!!
15 Sep 2016 - 5:42 pm | झेन
"थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही"
तुमचा नेमका राग स्वयंसेवकांवर का चड्डिवर का तो तुमचा वैचारिक गोंधळ ?
13 Sep 2016 - 3:58 pm | श्रीगुरुजी
Anyone who is the national of this country, irrespective of being a Shaiva, Shakta, Vaishnava, Sikh, Jain, Muslim, Christian, Parsi, Buddist or Jew by way of his creed or mode of worship, is a Hindu.
http://www.archivesofrss.org/why-hindu-rashtra.aspx
When a Muslim Swayamsevak of RSS was questioned about Sangh's definition of 'Hindu' and 'Hindu Rashtra', he said that a Hindu is a person who has been born and brought up in Hindustan, and 'Hindu' is not a religion, it's a way of life.
The idea of unity in diversity has been path of the Indian culture since ancient times and Indian cultural identity is defined by Hindutva, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat said on Sunday.
http://www.thehindu.com/news/national/hindutva-is-indias-identity-rss-ch...
13 Sep 2016 - 2:49 am | गामा पैलवान
रविकिरण फडके,
अहो, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही संघाची जबाबदारी नाही. ही कामं संघाने केली तर पोलीस काय करणार मग?
आ.न.,
-गा.पै.
13 Sep 2016 - 11:57 am | साहना
हो ना, संघाची प्रमुख जबाबदारी खालील प्रकारे आहे. सदर कामे करायला आणखीन कुणालाही वेळ नसल्याने हि पुण्याची कामे संघ करतो.
"रेप इंडियात होतात भारतात होत नाहीत" अशी थोर वचने निर्माण करणे,
स्वतः अविवाहित असून स्त्री मंडळींना त्यांच्या वस्त्रां बद्दल अनाहूत सल्ले देणे
गो मूत्र आणि गो विष्ठा ह्यांचे विविध उपयोग लोकांना सांगणे
हिंदुस्तानातील सर्व देशप्रेमी लोक (ख्रिस्ती, मुस्लिम सुद्धा) "हिंदू" आहेत असे सांगून अमेरिकन भारतीय हिंदू कडून हिंदू स्वयंसेवक संघाच्या नावाने देणग्या घेणे.
हिंदुस्तानातील सर्व देशप्रेमी ख्रिस्ती सुद्धा (म्हणे) हिंदू असले तरी सुद्धा धर्मांतराच्या नावाने बोंब मारणे.
बौद्धिकामध्ये चाचा नेहरूंना शिव्या देणे आणि मीडिया मध्ये नेहरूंनी संघाची कशी स्तुती केली होती असे कंठ दाटून सांगणे
फोटोशॉप मध्ये स्वदेशी किती चांगली आहे असे ग्राफिक्स करून फेसबुक वर टाकणे
संघ कसा व्यक्तिपूजक नाही हे गुरुजी आणि डॉक्टर ह्यांची उदाहरणे घेऊन त्यांच्या तसबिरी समोर सांगणे
भारद्वाज ऋषी ह्यांचे विमान शास्त्र वाचून विना इंधन चालणारे विमान गुप्त पणे निर्माण करणे. (टेस्ला वाले एलोन मूषक ह्यांनी ह्या प्रकल्पाचा फार मोठा धसका घेतल्याचे ऐकिवात आले)
कम्युनिस्ट मंडळींचे आर्थिक व्यवस्थेचे विचार वाचून ते आपल्या नावाने ऑरगॅनिझर आणि पांचजन्य मध्ये छापून आणणे
RTE , हिंदू देवळे ह्या वरील सरकारी बळजबरी, इत्यादी महत्वाच्या हिंदू विषयावर मूग गिळून गप्प बसणे
सर्व चांगल्या स्वतंत्र हिंदू विचारवंतांना वाळीत टाकणे आणि PN Oak किंवा कल्याणरामन सारख्या भोंदू विचारवंताचे लेखन प्रमोट करणे.
13 Sep 2016 - 6:42 pm | चंपाबाई
१. खाजगीत गांधीजीना शिव्या घालणे व सार्वजनिक ठिकाणी ते संघास प्रातःस्मरणीय आहेत असा जयघोष लावणे.
२. खाजगीत आरक्षण व दलिताना नावे ठेवणे व संघात आंबेडकर जयंती साजरी केल्याचा गांजावाजा करणे.
13 Sep 2016 - 6:43 pm | श्रीगुरुजी
लोचट प्रतिसाद!
14 Sep 2016 - 12:18 am | नर्मदेतला गोटा
या असल्या आक्षेपांवर
तुम्ही वेगळा धागा का काढत नाही
13 Sep 2016 - 6:43 pm | गामा पैलवान
साहना,
कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी संघाची नाही. यावर अचूक बोट ठेवल्याने तुम्हाला राग आलेला दिसतोय. चालायचंच! टालरन्स कमी झालाय खरा भारतातला!
आ.न.,
-गा.पै.