विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
11 Sep 2016 - 11:04 am

सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता. वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव. बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही. शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे गेली नाही. दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही. त्यांना हि चांगले माहित आहे, एकदा जर ग्रामीण जनता आपल्या पायांवर उभी राहिली तर त्यांच्या समाज विभाजक राजनीतीचा अंत होईल. याच कारणांमुळे विदर्भातले शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात.

आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य.

योगायोगच म्हणा, १० सेप्टेम्बर विश्व आत्महत्या प्रतिबंधक दिवस (World Suicide Prevention Day) म्हणून जगात साजरा केल्या जातो. याच दिवशी मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्कचा शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार आहे. पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार आहे. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. विदर्भात ५०% हून जास्त जंगल आहे, जडी-बुटी वर आधारित फूडपार्क, हजारोंच्या संख्येने वनवासी लोकांना अतिरिक्त रोजगार मिळवून देणार आहे. या शिवाय लाखों शेतकर्यांचे आयुष्य हि बदलणार आहे. पुढ्या सहा महिन्यातच या फूड पार्कच्या काही युनिट सुरु करण्याचा पतंजलीचा निश्चय आहे. दोन वर्षांच्या पूर्ण झाल्यावर नागपूर येथील फूडपार्क जगातील सर्वात मोठा फूडपार्क ठरेल.

साहजिकच आहे, एकदा एक मोठा उद्योग आला, कि विदर्भात अन्य उद्योग पाठोपाठ येतीलच. भविष्यात विदर्भातील लोकांना रोजगार साठी परप्रांतात जावे लागणार नाही. शेतकर्यांचे उत्पन्न वाढल्यावर, त्यांची करी शक्ती वाढेल आणि इतर उद्योगांचा हि विकास होईलच. निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले आहे.

जीवनमानप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

12 Sep 2016 - 12:57 pm | डँबिस००७

खरे साहेब
डालडा वर तुमचे विचार लिहीले नाहीत ! का त्या वेळी कंपनीने लोकांची दिशाभुल केलेली नव्हती ? चाळीस एक
वर्ष लोक हे तुप खात होते, अजुनही खातात ! डालडा अजुनही बाजारात उपलब्ध आहे.

पगला गजोधर's picture

12 Sep 2016 - 1:38 pm | पगला गजोधर

अवांतर: माझा खूप चांगला मित्र व मी अमेरिकेत, बराच काळ ऑफिस तर्फे क्लायंट साईट वर होतो, माझा मित्र सुसंस्कृत सुशिक्षित (असे बरेच सु )शुद्ध शाकाहारी समाजाचा, त्यामुळे खाण्याच्या बऱ्याच गोष्टीवर निर्भन्ध, त्यात तो ल्याकटोज इनटॉलेरांट, त्यामुळे तुपातील शिरा , चीज वैगरे गोष्टी पासूनसुद्धा दूर, बरं मी त्याला माझ्या परीने वेग वेगळे व्हेज पदार्थ (माझ्या टिफिन) मधले शेअर करायचो, पण बिचार्याचे खाण्याचे लैच हाल व्हायचे, असो पुढच्या लॉट मधे पुण्याहून एक जण येणार होता, त्याला मी फोनावलं, म्हटलं येताना डालडा सामानात लपवून घेऊन ये, इथं वॉल मार्ट मध्ये मला काय डालडा सापडत नाही. जेव्हा डालडा आला, तेव्हा कुठे तुपातले पदार्थ बिचारा खाऊ शकला, अश्या रीतीने डालडामाहात्म्याची ही साठा कहाणी, पाचा उत्तरी सुफलपूर्णम

सुबोध खरे's picture

12 Sep 2016 - 2:32 pm | सुबोध खरे

डालडा खाऊच नये असे प्रतिसाद मी अगोदर दिलेले आहेत
परत ते द्यायचा टंकाळा आहे. कुणी खोदून काढले तर बरे होईल.
बाकी डॅम्बीस ००७ आणि संजय उवाच यांचे प्रतिसाद त्यांनी गाय मारली म्हणून मी वासरू मारतो अशा तर्हेचे समर्थन असणारे आहेत. त्यामुळे यापुढे मी त्याचा प्रतिवाद करीत नाही.

डँबिस००७'s picture

12 Sep 2016 - 1:03 pm | डँबिस००७

कोलगेट ने २० वर्षांपुर्वी असा प्रचार चालवलेला होता की मिठ व कोळसा या सारख्या पदार्थामुळे दातांच्या एनॅमेलवर ओरखडे जातात व दातांची हानी होते. २० वर्षांनंतर तीच कोलगेट आता टुथपेस्ट मध्ये मिठ, कोळसा, निम सारखे पदार्थ घालुन लोकांची दिशाभुल करत असते.

हे सर्व देशाच्या हितासाठी आहे अस वाटत !!

कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी हि तुमच्या आरोग्यासाठी काम करीत असेल हे गृहितकच मुळी चूक आहे.
हे म्हणजे ब्रिटिश लोक भारतात आले ते भारताचा उद्धार करण्यासाठी असे म्हणण्यासारखे आहे.
ते फक्त आपल्या नफ्यासाठी येथे आहेत.
कोलगेट किंवा इतर बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या जाहिराती करतात त्या अतिरंजित पासून निखालस खोट्या पर्यंत असतात. म्हणून बाबा रामदेवांनी खोट्या जाहिराती करणे बरोबर आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का ?

नितिन थत्ते's picture

12 Sep 2016 - 8:54 pm | नितिन थत्ते

दुरुस्ती....
मी ती जाहिरात पाहिलेली आहे. त्यात 'खुरतरे और दानेदार' मंजन असा शब्दप्रयोग असे. आणि बारीक सफेद कोलगेट टूथ पावडरची भलामण असे. त्यात कोळशाने किंवा मिठाने नुकसान होते असे म्हटलेले नसे. खुरतरे वर भर होता.

त्याचे उत्तर म्हणून विकोची जाहिरात 'केवळ चवीला चांगले असणे पुरेसे आहे का?" अशा प्रकारच्या टॅगलाइनची होती.
मूळची जाहिरात जालावर सापडली नाही. पणा ही सापडली
https://www.youtube.com/watch?v=rKi3zLiCyYk

बाळ सप्रे's picture

13 Sep 2016 - 5:51 pm | बाळ सप्रे

अगदी हेच म्हणणार होतो..
आक्षेप मीठावर नसून दातावर खरखरीत पदार्थ घासण्यावर होता.. त्या जाहिरातीत एक खरखरीत पावडर टेबलावर घासून टेबलावर ओरखडा आलेला दाखवत.. एनॅमल नाजूक असल्याने असेच ओरखडे दातावर येउ शकतात असे जाहिरातीत म्हटले होते.

दुसऱ्यावर शिंतोडे उडवून आपले उत्पादन विकण्याची हि वृत्ती पतंजलीने सोडून द्यावी आणि स्वतःच्या उत्पादनांच्या दर्जावर बाजारपेठ मिळवावी. अन्यथा दूरगामी परिणाम चांगले होणार नाहीत.

हे फक्त पतंजली नावाच्या कंपनीलाच लागु का ?

संदीप डांगे's picture

12 Sep 2016 - 1:14 pm | संदीप डांगे

इतर कोणत्या कंपन्याचे प्रतिनिधी मिसळपाव वर असे दावे करत असते तरी नक्कीच विरोध केला असता

मृत्युन्जय's picture

12 Sep 2016 - 1:56 pm | मृत्युन्जय

आपणा गल्लत करत आहात असे वाटते. पटाईत पतंजलीचे प्रशंसक असु शकतील पण म्हणुन ते प्रतिनिधी होत नाहित. हे म्हणजे मिपावर भाजपा समर्थनार्थ बोलणारे सगळे लोक भाजपाचे प्रतिनिधी आहेत असे म्हणण्यासारखे होइल.

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 7:32 pm | संदीप डांगे

मी पटाईतांना प्रतिनिधी म्हटलेले नाही,
इथे मिपावर कोणीही खाजगी कंपनीची भलामण करत काहीच्याकाही दावे हाणत असेल तर विरोध नको का करायला?

विवेकपटाईत's picture

13 Sep 2016 - 6:05 pm | विवेकपटाईत

डांगे साहेब मी काही पतंजलीचा प्रतिनिधी नाही. बाकी जे सत्य आहे, डोळ्यांसमोर आहे. पहिल्यांदाच कुणी विदर्भातील शेतकर्यांचा विचार केला आहे, दुर्भाग्य हा व्यक्ती मराठी नाही. पुढच्या २ वर्षांत हजारोंच्या संख्येने विदर्भच्या लोकांना मिळालेला रोजगार तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी पहालच. त्या नंतर जर तुम्ही मला पतंजलीचे प्रतिनिधी म्हणाल तर मला तर आपला गौरव झाला असे वाटेल. दिल्ली माझी कर्मभूमी असली तरी माझे पूर्वज विदर्भातच राहत होते, माझा जन्म हि तिथे झालेला आहे.

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 7:38 pm | संदीप डांगे

अशी अनेक सत्ये तुमच्या डोळ्यासमोर असतील, पंतप्रधान कार्यालयात काम करता आपण. तीही येऊ द्या समोर. वाचायला आवडेल.

जेव्हा विदर्भातल्या लोकांना रोजगार मिळेल तेव्हा बघू, आतापासून 'घोषणांच्या' आरत्या ओवाळायला मी तरी 'भक्त' नाही.

सुबोध खरे's picture

12 Sep 2016 - 2:22 pm | सुबोध खरे

हे फक्त पतंजली नावाच्या कंपनीलाच लागु का ?
साहेब,
पहिली गोष्ट मी इतर कंपन्याची भलामण केली आहे असे तुम्हाला कुठे दिसले? बहुराष्ट्रीय कंपन्या चोर नाहीत असे मी केंव्हा म्हणालो? किंवा बाबा रामदेव जे करीत आहे ते चूक आहे असे मी केंव्हा म्हणालो हे आपल्याला दाखवता येईल काय?
उद्या बाबा रामदेवांचे जीन्स आली कि मी ती नक्की वापरेन. आंतरराष्ट्रीय कंपन्याना तिप्पट किंमत देण्यापेक्षा मी भारतीय कंपनीची जीन्स वापरणे नक्की पसंत करेन.
म्हणूनच मी असे म्हणेन कि बाबा रामदेव यांनी असे चुकीचे दावे करण्यापेक्षा आमचे उत्पादन कोणत्याही उच्च दर्जाच्या उत्पादनाइतके किंवा जास्त चांगले आहे असे म्हणाले पाहिजे. भारतीय माणूस किमतीबाबत नक्कीच जास्त जागरूक आहे. त्याच किंवा कमी किमतीत जर त्याला चांगले उत्पादन मिळाले तर तो नक्कीच स्वीकारतो.
बाबा रामदेवांचे उत्पादने स्वस्त असण्याचे मूळ कारण काय तर जाहिरात आणि विपणन यासाठी उत्पादनाची ४० % किंमत ते वाचवतात.
याचसाठी जर बाबा रामदेव यांनी प्रामाणिकपणाचा आधार घेतला तर ते जास्त चांगले एवढेच माझे म्हणणे आहे.

विशुमित's picture

12 Sep 2016 - 2:32 pm | विशुमित

+11111 सहमत

विवेकपटाईत's picture

13 Sep 2016 - 6:12 pm | विवेकपटाईत

पतंजलीच्या सर्व कंपन्या आपला नफा कुणालाही वाटत नाही. शिवाय हजारो शोधकर्ता विनामूल्य आपली सेवा देतात. त्यात बरेच निवृत्त शोधकर्ता आहेत. (JNUचे सुद्धा आहेत). एकदा एका मोठ्या कंपनीच्या अधिकारीला यावर मी प्रश्न विचारला होता. (त्याने स्पष्ट म्हंटले जी वस्तू पतंजली १०० रुपयांना देते ते आम्हाला १५० च्या खाली देणे शक्य नाही. कारण गुंतवणूक, त्यावर मालकाचा नफा, भारी पगार, विज्ञापनचा खर्च. लागत वाढली म्हणून कर हि जास्त. शिवाय विक्रेत्याला कमिशन हि जास्त द्यावे लागते. तुलना होऊ शकत नाही.

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 7:50 pm | संदीप डांगे

पतंजलीच्या सर्व कंपन्या आपला नफा कुणालाही वाटत नाही.

हे तुम्ही नक्की कोणत्या भूमिकेतून मांडत आहात ते माहित नाही. पण नुकत्याच आलेल्या बातमीनुसार पतंजलीचे बाळकॄष्ण हे २५ हजार कोटींचे धनी झालेत असे वाचले. पतंजलीच्या सर्व कंपन्या नफा कुणालाही वाटत नाहीत हे खरेच म्हणायचे मग..?

दहा वर्षात एवढे श्रीमंत कुणी भारतीय होत असेल तर मला नक्कीच अभिमान आहे, पण तो एक वेगळा विषय आहे. तुम्ही ज्या पद्धतीने इथे पतंजली ही एक सेवाभावी संस्था, नानफानातोटा तत्त्वावर चालवली जाणारी संस्था, एक लोकोपयोगी चळवळ अशी जी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात तो अजिबात पटलेला नाही.

पतंजलीला इतर डाबर, युनिलिवर, विको सारखी कंपनी असल्यासारखीच वागणूक द्यायला हवी. तीने धंदा करावा, पण ही 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' छाप प्रचार नै पटत.

जी वस्तू पतंजली १०० रुपयांना देते ते आम्हाला १५० च्या खाली देणे शक्य नाही. कारण गुंतवणूक, त्यावर मालकाचा नफा, भारी पगार, विज्ञापनचा खर्च. लागत वाढली म्हणून कर हि जास्त. शिवाय विक्रेत्याला कमिशन हि जास्त द्यावे लागते.

अ‍ॅम्वे किंवा अशाच प्रोडक्ट्सच्या चेनमार्केटींगच्या मिटींगमधे ही अशीच भाषा वापरली जाते असा अनुभव आहे.

सॉल्व्हेंट एकस्ट्रक्शन करुन तेल बीयातील ९८ % तेल काढुन घेतल्यावर ते तेल स्वस्त असायला पाहीजे, पण कच्चे घानीका तेल जर अश्या तेला पेक्षा स्वस्त असेल तर मध्ये तेच चालणार !!

महासंग्राम's picture

12 Sep 2016 - 1:51 pm | महासंग्राम

लेखातल्या काही गोष्टी चुकतायेत काका... आशा आहे आपण गैरसमज न करून घेता योग्य खुलासा कराल.

शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे गेली नाही

विदर्भात उसाचं पीक फार कमी प्रमाणावर घेतलं जातं. त्यापेक्षा कापूस, सोयाबीन, ज्वारी चे अधिक पिक घेतात. तेव्हा आपलं वरच वाक्य इथे गैर लागू होतं.


दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही.

:>> इथे शेतकरी आत्महत्या आणि दलित असल्याचा संबंध कसा काय.. माझ्या माहिती प्रमाणे आत्महत्या सगळ्याच जाती धर्मातल्या शेतकऱयांनी केल्या आहेत, आणि त्या मागचे मुख्य कारण कर्जबाजरीपणा आणि नापिकी हे आहेत.


आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा

.मला तरी इथे त्यांचा व्यापाराचा स्वच्छ हेतू दिसतो.


हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला

या योगिनां विदर्भातली स्थिती आताच कशी काय दिसली. आपण वर म्हंटल्याप्रमाणे

गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश.

होता तेव्हा मागचे काही दशकं का हि स्थिती दिसली नाही ????

अजूनही बाकी प्रश्न आहेतच ते पुन्हा कधीतरी, तूर्तास एवढ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याच्या प्रतीक्षेत एक विदर्भातील रहिवासी.

महासंग्राम's picture

14 Sep 2016 - 11:09 am | महासंग्राम

धागाकर्ता लेखक उत्तर द्यायच्या मुडात दिसत नै.... काय कारण असेल बरे बहुदा त्यांना थेट अन खोचक प्रश्न विचारलेले आवडत नसावंत बावा ????

मागचे काही दशकं का हि स्थिती दिसली नाही ?

तेंव्हा योगी लहान होते

महासंग्राम's picture

14 Sep 2016 - 12:38 pm | महासंग्राम

हाहाहा सही पकडे है भैया आपने

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2016 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, रामदेव बाबा आणि त्यांच्या उत्पादनावर एक स्वतंत्र धागा काढा

-दिलीप बिरुटे

फेदरवेट साहेब's picture

12 Sep 2016 - 1:59 pm | फेदरवेट साहेब

त्यापेक्षा, त्यो विदर्भच येगळा काढूनश्यानी टाका, कटकटच संपेल!

ढेल्या

अभ्या..'s picture

14 Sep 2016 - 11:56 am | अभ्या..

हा. आणि बाबांना सीएम करा. चैला मोठे लोक सुधरण्यासाठी गावे दत्तक घेतेत. आपण ह्यांना आख्खं राज्य देऊन टाकू. ते अनुशेष बिनुषेष सगळेच लफडे खतम. आरोग्यपूर्ण राज्य्/संपन्न राज्य म्हणून पैला नंबर येतय की नै बघा.

पगला गजोधर's picture

14 Sep 2016 - 12:02 pm | पगला गजोधर

प्रत्येकाच्या अकाउंटमधे १५-१५ लाख रुपये, वरखर्चाला बाबा देतीलच .....

सुबोध खरे's picture

14 Sep 2016 - 1:57 pm | सुबोध खरे

प्रत्येक कोपऱ्यात सी सी टी व्ही आ णि सर्वांना फुकट वीज आणि पाणी.
हा का ना का

ते कोपर्‍याच्या सीसी टीव्हीजे फूटेजचे एक चॅनेल तयार करा. टीआरपीला मरण नाही.

पगला गजोधर's picture

14 Sep 2016 - 4:29 pm | पगला गजोधर

कॉमेडी नाईट विथ कपिल पेक्षा जास्त टी आर पी

सुबोध खरे's picture

14 Sep 2016 - 4:37 pm | सुबोध खरे

मा मो अॉन
आमच्या अरविंद पेक्षा जास्त टी आर पी? कसं शक्य आहे?
मा मो अॉफ

प्रत्येक प्रॉडक्ट वर स्वतंत्र धागा, होऊन जाऊ द्यात.

ज्योति अळवणी's picture

12 Sep 2016 - 4:07 pm | ज्योति अळवणी

बातमी वाचून बरे वाटले. खरी की खोटी माहित नाही. पण असाही विचार होऊ शकतो....

डँबिस००७'s picture

12 Sep 2016 - 5:25 pm | डँबिस००७

मुळ मुद्दा आहे, विदर्भातील फुड पार्क बातमी बद्दल !!

त्याबद्दल रामदेव बाबांच अभिनंदन करायला माझ्या मते हरकत नसावी ! कारण एका बिझनेस मन ला हा बिझनेस कोठे ही उभा करता येऊ शकला असता !

दुसरा मुद्दा कच्चे घानी का तेल !! जर सॉल्व्हेंट एक्श्ट्रॉशन शिवाय तेल उत्पादन आणि वितरण मार्केटमधल्या ईतर तेलापेक्षा कमी किमतीत करत असतील तर ते लोकांच्या पसंतीस पडतीलच !

दाताच्या निगेसाठी कोलगेट सारख्या अनेक कंपन्यांनी सेंसेटीव्ह टुथपेस्टला पर्यायच नाही अस लोकाम्च्या मनात जाहीरातीच्या माध्यमातुन खोलवर बिंबवलेल आहे. मी ही असाच एक सेंसेटीव्ह दातांमुळे बेजार होतो. आता दंत कांती नावाची पतंजलीची पेस्ट वापरतोय. सेंसेटीव्हीटी पार गेली कधी हे मलाच कळल नाही,

बाजारात उपलब्ध असलेल्या १०० % पेस्ट मध्ये प्रेसेपिटेटेड लाईम (चुना))हा बेस म्हणुन वापरला जातो. टुथपेस्टच्या जवळ जवळ ९०% भाग ह्या चुन्याचा असतो. त्या चुन्याच रुप औषधाच कॅरीयर अस असत. इतकी महाग टुथपेस्ट आपण विकत घेतो पण हातात ९०% चुनाच असतो.

पतंजलीबद्दल हा लेख वाचनीय आहे. रामदेवबाबांचे क्लेम किती गांभिर्याने घ्यावेत असा प्रश्न पडतो.

http://www.livemint.com/Companies/hLEBBx17cFY5rPjTjmIP9O/The-Patanjali-s...

At the factory, pasteurized unsalted butter produced by the Karnataka Co-operative Milk Products Federation Ltd was being mixed with local cow milk to produce ghee.

The aloe vera unit is a processing and packaging unit, which was using pulp supplied by Dhandev Resorts and Health Care Pvt. Ltd (a Jaisalmer-based company owned by Roop Ram, an Indian National Congress leader). Patanjali claims that it has its own aloe vera plantations for making aloe vera juice.

And contrary to Ramdev’s claims, Patanjali outsources manufacturing of some products like other packaged consumer products companies do. For instance, biscuits are made by Delhi-based Sona Biscuits (that also sells biscuits under Sobisco brand) and juices by a bunch of companies, including GK Dairy and Milk Products Pvt. Ltd (this company also sells products under the Gopalji brand).

Patanjali’s juice products, which Ramdev claims to be natural, contains added sugar, water and required preservatives. Haridwar-based Aakash Yog Health Products Ltd manufactures noodles for Patanjali. Aakash used to make noodles for HUL’s Knorr brand, till recently.

ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रॉड्क्ट्सना ते श्या घालतायत त्यांच्याच सप्लायरकडून तीच प्रॉड्क्ट्स हे घेतायत.

स्वधर्म's picture

12 Sep 2016 - 6:21 pm | स्वधर्म

जाहिरात माणसाला काय काय खोटं बोलायला लावेल, सांगता येत नाही, मग ते योगी असोत नाहीतर भोगी! रच्याकने, जर बाबा या ‘खोडसाळ, अपप्रचार करणार्या’ लेखाविरूध्द न्यायालयात गेले असतील, तर ठीक.

नितिन थत्ते's picture

12 Sep 2016 - 9:07 pm | नितिन थत्ते

तुम्ही पाकिस्तानात जा पाहू !!!

विवेकपटाईत's picture

13 Sep 2016 - 6:39 pm | विवेकपटाईत

पतंजली रोज १००० टन ओलाविरा वापरते. वरील कंपनी हरीश धनदेव यांची आहे. त्यांची १२५ एकरात एलोविराची शेती आहे. हरीश बताते हैं कि उन्होंने पिछले चार महीने के दौरान हरिद्वार स्थित पतंजलि की फैक्ट्रियों को 125-150 टन एलोवेरा सप्लाई किया है. अर्थातच २५-३० टन महिना.http://www.ichowk.in/society/harish-dhandev-from-jaisalmer-quit-his-gove...

असे अनेक शेतकरी आणि शेतकरी समूह पतंजलीला एलोविरा पुरवितात. एलोविराचा वापर औषधी, ज्यूस, साबण, शेम्पू इत्यादीत होतो. पतंजली जवळ स्वत:ची शेती नाही. त्या मुळे हि बातमी बिनबुडाची आहे.

भारतीय कंपन्यांना एका छता खाली आणणे हे पतंजलीचे लक्ष्य आहे. कर्नाटकच नाही, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातून इथल्या cooperative गायीचे बटर पतंजली विकत घेते. (हे स्वत: बाबा रामदेवांच्या मुखातून ऐकलेले आहे, उत्तर भारतात शुद्धतेची खात्री देता येत नाही म्हणून इथून विकत घेत नाही) यात कुठलीही लुकाछिपी नाही. ४-५ वर्षांपूर्वी गायीचे घी म्हणून घी कुणीही विकत नव्हते. आता गायीचे घी , गायीच्या घी नावाने म्हशीच्या घी पेक्षा महागात विकल्या जाते.

या शिवाय पतंजलीच्या प्रत्येक उत्पादनावर ते कुणी उत्पादित केले आहे, हे लिहिले असते.

आपल्याला माहित नसेल, पण कधी चुकून आस्था चानेल पाहत असाल तर गेल्या महिन्यातच विभिन्न विद्यालयांचे कृषी विज्ञानिक देश्यातील कृषी शेतकर्यांचा परिसंवाद दाखविला होता. देशात कुठल्या भागात कुठल्या जडी-बुटी शेतकऱ्यांना फायदा होईल हा विषय होता.

राही's picture

15 Sep 2016 - 7:30 am | राही

अ‍ॅलूवेरा मोठ्या प्रमाणात वापरणे यात काय मोठे? एक तर कोरफड ही वनस्पती शेकडो वर्षांपासून घराघरांमध्ये वापरली जाते. कुमारी आसव तर तीन पिढ्यांपूर्वी प्रत्येक मुलीला शिशु अवस्थेत दिले जात असे. पुन्हा त्यातल्या 'ई' जीवनसत्त्वाविषयीच्या माहितीचा बर्‍याच बहुराष्ट्रीय आणि देशी कंपन्यांनी उपयोग करून घेऊन शांपू, क्रीम, त्वचाप्रसाधने बनवली आहेत. त्यासाठी (कदाचित विदर्भातले नसतील पण) अनेक शेतकरी त्यांना कच्चा माल पुरवीत आले आहेत. आता एकाच ठिकाणी कोरफडीची शेती होत आहे हा वेगळेपणा. पण कोणतीही चाणाक्ष कंपनी एकाच ठिकाणच्या रिसोर्सेसवर अवलंबून राहाण्याचा धोका पत्करणार नाही. शिवाय कोरफड ही भरड जमिनीत कमी पाण्यात वाढू शकणारी वनस्पती आहे. तर विदर्भवासीयांनी आपली सुपीक काळी कसदार जमीन या पिकासाठी वाया का घालवावी? आणि शेतकर्‍यांचे एकाच खरेदीदारावरचे अवलंबित्व स्पष्ट झाले की कालांतराने त्यांची छुपी पिळवणूक सुरू होते हे सर्वज्ञात आहे. काही वर्षांपूर्वी सफेद मुसळी हे पीक घेण्याची मोठी लाट आली होती. त्यात अनेक शेतकरी पोळले आहेत. आणि प्रसाधने, शांपू यात अलीकडे लोकांचा कल नवनवीनतेकडे असतो. पिढ्यान् पिढ्या एकच 'जवाकुसुम' किंवा 'अफ्घान स्नो' वापरण्याचे दिवस कधीच संपले.

A.N.Bapat's picture

15 Sep 2016 - 11:08 am | A.N.Bapat

" या शिवाय पतंजलीच्या प्रत्येक उत्पादनावर ते कुणी उत्पादित केले आहे, हे लिहिले असते."

हे तुम्ही बोल्ड करून काहीतरी विशेष आहे असे का दर्शवताय ? कायदा आहे भारतात तसा . सगळ्यांनाच लिहायला लागतं हे , अगदी माणिकचंद गुटखा वाल्याला सुध्दा

अभिजीत अवलिया's picture

12 Sep 2016 - 9:13 pm | अभिजीत अवलिया

रामदेव बाबांशी काहीही वाकडे नाही. त्यांनी त्यांचा धंधा नक्कीच करावा. पण उगाच जनतेच्या भल्यासाठी करतोय असली भाषा वापरू नये. स्पर्धा करा आणी मार्केट मध्ये तग धरा.

इरसाल's picture

12 Sep 2016 - 9:35 pm | इरसाल

धंदा म्हटला की स्वतःचे/धंद्याचे मार्केटिंग करणे आलेच.
अहो इतकेच काय वर्षभर काम करुनही अपराय्जल साठी स्वतःचे व्यवस्थित मार्केटिंग नाही केले तर प्रमोशन आणी इंक्रीमेंट खण्ण्ण्ण्ण्ण अस वाजत नाही.

काजुकतली's picture

13 Sep 2016 - 2:12 pm | काजुकतली

भारतीय कंपनी भरभराट करतेय, तेही अल्पावधीत हे पाहून किती जळफळाट होतोय लोकांचा......☺☺☺☺☺☺

हिंदुस्तान लिव्हर कंपनीने बनवलेला साबण डिटरजंट वैगेरे सारखा माल मोठ्या प्रमाणात भारताबाहेर मध्यपुर्वेत निर्यात होत असे. दुबई, ओमान, सौदीच्या मार्केट मध्ये असा माल मेड ईन ईंडीया च्या लेबल सकट बघायला मिळायचा ! साधारणपणे १० - १२ वर्षांपुर्वीपर्यंत हे चाललेल होत. त्यानंतर मध्य पुर्वेतील देशामध्ये (खास करुन सौदी मध्ये) युनि लिव्हरने स्वतःच्या फॅक्टर्या बांधल्या व तिथुन माल निर्यात करायला सुरुवात केली. त्यामुळे व्यवसायाचे समिकरण नेहमी बदलत असते हे मान्य करायला लागेल.

जर रामदेव बाबाच्या निमित्याने का होईना जर विदर्भातील शेतकर्याला पर्यायी काम, रोजगार, धंदा मिळत असेल तर
सर्वांनी त्याच स्वागत करायला हव. जर रामदेव बाबाची उत्पादने मार्केट मध्ये नाही चालली तर त्याचा तोटा हा रामदेव बाबाच्या कंपनीला होईल पण शेतकर्याना त्याचा काही तोटा नाही.

जर रामदेव बाबाच्या निमित्याने का होईना जर विदर्भातील शेतकर्याला पर्यायी काम, रोजगार, धंदा मिळत असेल तर
सर्वांनी त्याच स्वागत करायला हव. ज

सहमत

धर्मराजमुटके's picture

13 Sep 2016 - 9:43 pm | धर्मराजमुटके

पतंजलीचे बाकी काही माहित नाही पण याअगोदर डाबर रेड, मिसवॉक, विको, बबूल इ. देशी टुथपेस्ट वापरुन बघीतल्या आहेत. आता सध्या पतंजलीची दंतकांती वापरतो आहे आणि उल्लेख केलेया टुथपेस्टपेक्षा नक्कीच चांगले रिजल्ट आहेत. डाबर रेड ला मी दुसरा क्रमांक देईन. कोलगेट किंवा पेप्सोडेंट मी फक्त बाहेर गावी गेल्यावर वापरतो कारण त्यांच्या ५-१० रुपयाच्या छोट्या आकाराच्या ट्यूब्स उपलब्ध असतात व बरोबर बाळगायला बर्‍या पडतात.
त्यांचे काही साबण देखील स्वस्त किंमतीत आणि चांगल्या दर्जाचे आहेत. वापरुन पाहिले आहेत.
बाकी रामदेव बाबांचे प्रॉडक्ट आहे म्हणूनच घ्यायचे किंवा घ्यायचेच नाही, रामदेव बाबांचे प्रॉडक्ट आहे म्हणून उत्तमच असणार किंवा फालतूच असणार असा विचार मी तरी करीत नाही.
असेही मध्यमवर्गीय संस्कार म्हणा किंवा लायकी नाही म्हणा पण मी एस्टॅब्लिश्ड ब्रॅंडींगचा भोक्ता नाहिये. उलट नवीन उत्पादने वापरुन बघायला आवडते. संडासात ओतायच्या फिनाईलमधे देखील ब्रॅंड बघणार्‍या लोकांकडे मी कुतुहुलयुक्त आश्चर्याने पाहतो. मल्टीनॅशनल असो की देसी कंपनी, सगळेजण शेवटी व्यवसाय करायला बसलेत. प्रत्येकजण आपले उत्पादन श्रेष्ठ आहे असे सांगतो. सगळ्यांचे दावे तपासत बसायचे तर घरात लॅब खोलावी लागेल. फक्त खाण्याच्या पदार्थांचा दर्जाबाबत आग्रही आहे.

शब्दाशब्दाशी लै वेळा सहमत..!!!

सुबोध खरे's picture

14 Sep 2016 - 12:35 am | सुबोध खरे

+100 नेमके मुद्द्यावर बोट ठेवून

संदीप डांगे's picture

14 Sep 2016 - 8:16 am | संदीप डांगे

अतिशय सहमत, ब्रँड पेक्षा दर्जा महत्वाचा आणि तो वापरल्याशिवाय कळत नाही, पण मला एखादी वस्तू आवडली नाही याचे कारण मी कंपनी मालकाचा द्वेष करतो म्हणून असे समजणे विचित्र आहे,

रच्याकने, दंतकांती बद्दल अगदी तुमच्यासारखेच मत आहे, याच प्रकारे आधी मिस्वाक वापरायचो पण त्यांचा दर्जा नंतर खूप खराब झाला...

मला एखादी वस्तू आवडली नाही याचे कारण मी कंपनी मालकाचा द्वेष करतो म्हणून असे समजणे विचित्र आहे,

मिठाई खात खात हलवायाशी भांडण करावे लागते डांगेण्णा..

मृत्युन्जय's picture

14 Sep 2016 - 11:17 am | मृत्युन्जय

उत्कृष्ट प्रतिसाद.

मात्र मला दंतकांती आवडली नाही. एकदा वापरुन बघितली. कशीबशी संपवली आणि परत क्लोज अप / कोलगेट कडे वळलो. मिसवाक तर मला अजिबातच आवडत नाही. विको खुप महाग म्हणुन आणायचो नाही. डाबर रेड कधी वापरावीशी वाटली नाही.

साबणाबाबत म्हणाल तर मला स्वतःला लक्स आवडतच नाही. घरचे कधीमधी आणतात. आणला की वापरतो. कटाक्षाने स्वदेशी वापरावे असे काही मत नाही पण स्वदेशी कंपन्यांचे साबण विदेशी कंपन्यांपेक्षा जास्त चांगले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. मी स्वतः अनुवेद, अफगाण (हा सहज मिळत नाही), फॅब इण्डिया (हे स्वदेशी आहेत की नाही ते माहिती नाही), पार्क अव्हेन्यु आणि सिंथोला ला पसंती द्यायचो. आता पतंजलीचे साबण नक्कीच चांगले आहेत (बरेचसे पण सगळेच नाही). त्यामुळे सध्या ते आणी हिमालयाज चे साबण वापरतो आहे). जिथे उत्तम पर्याय उपलब्ध असेल तिथे स्वदेशी वापरणे नक्कीच चांगले.

सुबोध खरे's picture

14 Sep 2016 - 12:00 pm | सुबोध खरे

+१००
जिथे उत्तम पर्याय उपलब्ध असेल तिथे स्वदेशी वापरणे नक्कीच चांगले.+१०००

मी दंतकांतीचे दोन व्हर्शन वापरले आहेत. एक काहिसं पातळ होतं आणि ते मला पण विशेष आवडलं नव्हतं. अदरवाईज दंतकांती आतापावेतो वापरल्यापैकी सर्वोत्कृष्ट टुथपेस्ट वाटली मला.

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 8:18 pm | संदीप डांगे

जिथे उत्तम पर्याय उपलब्ध असेल तिथे स्वदेशी वापरणे नक्कीच चांगले.

उत्तम विचार आहे मृत्यूंजय साहेब, पण स्वदेशीची नेमकी व्याख्या काय असावी ह्या प्रश्नावर अडलो बघा. आपल्या देशात बनणार्‍या वस्तू कि मल्टीनॅशनल (बाहेरच्या देशात नोंदणीकृत असलेल्या, मूळ बाहेर असलेल्या) कंपनीच्या नसलेल्या वस्तू? बाहेरुन फार कमी माल बनून येतो. स्वदेशी उत्पादनांतही काही कोर, पेटंटेड प्रॉडक्ट्स-टेक्नॉलॉजी बाहेरची असते. मग मालक भारतीय की अभारतीय एवढाच निकष लावायचा का? तसे केले तर आपल्याच काही देशबंधूंच्या पोटावर पाय येईल कदाचित.

मी नाशिकमधे राहतो, इथल्या काही अभियांत्रिकी कंपन्या दिग्गज अशा अभारतीय ब्रॅण्ड्ससाठी उत्पादन करतात, अनेक ठिकाणी कार्ससाठी, बाईकसाठी लागणारे स्क्रू, नटबोल्ट इत्यादी बनवणारे छोटेछोटे उत्पादक आहेत. २०१३-१४ मधे वाहन उद्योगावर आलेल्या अल्पशा मंदीमुळे अनेक महिने इकडचे काही प्लान्ट्स बंद होते, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या.

अभारतीय कंपन्या अनेक स्वदेशी उत्पाद्कांकडून वस्तू बनवून फक्त रॅपर आपल्या नावाचे चिटकवतात.

आजच्या ओपन मार्केट पॉलिसीमुळे स्वदेशी-विदेशी असा फारसा भेद राहिला नाही असे वाटते. फक्त नफा कोण नेतो असे बघायचे तर त्याबद्दल अ‍ॅज ए सी. ए. तुम्हीच जास्त नीट सांगू शकाल.

सर्व उत्पादन चायनातच होणार्‍या चायनिज मालाबद्दल तक्रार असेल तर साधं उदाहरण देतो. रस्त्याच्या कडेला चायनिज गॉगल्स, घड्याळी इत्यादी विकणारे बघत असाल, एक चष्मा बल्कमधे वीस रुपयाला मिळतो, तो विक्रेता त्याचे शंभर ते दिडशे घेतो. घड्याळींचेही तसेच. ग्राहक देत असलेल्या किंमतीच्या दहा टक्क्यात माल घरपोच मिळतो. एवढ्यातच शेतीसाठी लागणारे एक यंत्र मी इथल्या बाजारात इथल्या उत्पादकांचे बघितले. साडेपाच हजार रुपये किंमत होती, बल्कमधे घेतले तर साडेतीन पर्यंत मिळणार होते. अलिबाबा डॉट कॉम वरुन ते फक्त सातशे-आठशे रुपयात मिळत होते. म्हणजे चायनिज मालावर रग्गड नफा आपल्याच स्वदेशी लोकांना मिळतोय.

ग्राहकाने शेवटी आपला फायदा बघावा, वस्तू-सेवेचा दर्जा बघावा, कंपनी-उत्पादन स्वदेशी की विदेशी या भानगडीत पडणे गरजेचे नाही असे माझे मत. कोणत्या लिन्क्स कुठे जुळलेल्या असतील ते आपल्यास ठावूक नसते.

तुम्हाला काय वाटतं?

पैसा's picture

14 Sep 2016 - 12:43 pm | पैसा

रामदेवबाबा किंवा कोणीही उद्योजक जर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करत असतील तर ते नक्कीच चांगली बातमी आहे. फूडपार्कसाठीची संपादित केलेली जमीन कोणा शेतकर्‍यांचे शिव्याशाप घेऊन मात्र संपादित करू नये म्हणजे झाले.

महासंग्राम's picture

14 Sep 2016 - 12:53 pm | महासंग्राम

मुळात मिहान मध्ये एवढी उपलब्ध असतांना मिहानच्या बाहेर फूड पार्क उभारण्याचे काहीच प्रयोजन नाहीये.

सिरुसेरि's picture

14 Sep 2016 - 2:45 pm | सिरुसेरि

रफ अ‍ॅन्ड टफ या ब्रॅन्डची स्वदेशी जीन्स पुर्वीच गाजली आहे . "छोटु सोचो समझो अ‍ॅन्ड जस्ट शट अप" नाहितर "रफ अ‍ॅन्ड टफ हो तो रफ अ‍ॅन्ड टफ पेहनो" वाली . अक्की ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडर होता .

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

14 Sep 2016 - 6:19 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती.

कधी??
दंतकथांमध्ये का??

आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य.

छान छान गोष्टीचं पुस्तक वाचतोय असा फील आला.दंतकथांमधून बाहेर पडा कि!

निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले आहे.

येवू तर देत,पार्क होऊ तर द्या,ते व्यवस्थित चालू तर द्या,त्यापासून शेतकर्यांना फायदा तर होऊ द्या!!

विवेकपटाईत's picture

18 Sep 2016 - 6:58 pm | विवेकपटाईत

खालीमुंडी , सरकारी कार्यालयात अधिकार्यांचा PA/PS या पदांवर कार्य केल्यामुळे, फिरकी घेण्याची थोडी सवयच आहे. पुष्कळ प्रतिसाद देणार्याना बाबा रामदेव यांची अलर्जी आहे, म्हणून थोडी फिरकी घेत लिहिले. बाकी या पार्क मुळे विदर्भातल्या लोकांना कसा आणि काय फायदा / तोटा होईल यावर प्रतिसाद कमीच आले. पतंजलीची कार्य पद्धती आणि कार्यकर्ते बघता. सहा महिन्यात एखाद युनिट्स सुरु सुद्धा होई. २ वर्षात २-४ हजार कोटींच्या शेतमाल/ वानौपज प्रोसेसिंग हि सुरु होईल. पतंजली मुळे शेतकरी लखपती नव्हे तर कोट्याधीश हि झालेले आहे.

मार्मिक गोडसे's picture

18 Sep 2016 - 8:04 pm | मार्मिक गोडसे

रामदेवबाबा शेतकर्‍यांकडून फक्त मालच घेणार नाहीत तर शेतकर्‍यांना उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहनही देणार आहेत. खरेदीची व भावाची हमीही देणार आहेत. हे फक्त विदर्भातच नव्हे तर देशभर त्याचा विस्तार करणार आहेत.