"ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
प्रतिक्रिया
3 Feb 2009 - 12:51 am | पिवळा डांबिस
कविता आवाडली...
आमचा व्हर्शन लवकरच देतोंव!!!
:)
निवेदनः
आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा:)
3 Feb 2009 - 1:00 am | यशोधरा
शीतल, छान लिवलसय हां! :)
3 Feb 2009 - 12:58 am | आनंदयात्री
“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
खरे आहे !!
3 Feb 2009 - 1:02 am | llपुण्याचे पेशवेll
वाह शितल. छान कविता केली आहेस. आवडली.
(दारू म्हणजे काय ते
स्वतः प्यायल्या शिवाय समजत नाही
)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
3 Feb 2009 - 7:40 am | छोटा डॉन
मस्तच आहे कविता, एकदम साधी सरळ आणि सोपी आहे.
( विडंबन करायला तर लै लै लै सोपी आहे, ;) )
बाकी पेशव्यांशी "१००% सहमत" ...
- बेंगलोरचा पेशवा
छोटा डॉन
3 Feb 2009 - 10:10 am | दशानन
जबरदस्त !
कोल्हापुरच्या पाण्यात कवितेचा गुण :?
म्हणजे मी पण कविता लिहू शकतोच की :D
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
3 Feb 2009 - 10:16 am | मनस्वी
> मस्तच आहे कविता, एकदम साधी सरळ आणि सोपी आहे.
असेच म्हणते.
कविता छान आहे.
3 Feb 2009 - 1:03 am | संदीप चित्रे
लिहिलीस शितल ?
>> "प्रेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही
या ओळी विशेष आवडल्या.
पुलेशु
3 Feb 2009 - 1:04 am | बेसनलाडू
पण गद्यभाव जरा आणखी कमी झाला असता तर 'कविता' म्हणून खुमारी वाढली असती, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
(सूचक)बेसनलाडू
3 Feb 2009 - 1:18 am | चतुरंग
मला वाटतं तुझी पहिलीच कविता असावी, निदान मिपावरची तरी! अभिनंदन!
(विचार मनात भरुन वाहिले की कवितेचं रुप घेतात का?)
चतुरंग
3 Feb 2009 - 2:10 am | शाल्मली
मस्त!
कविता आवडली.
--शाल्मली.
3 Feb 2009 - 2:19 am | अनामिक
शितल तै... तुझे लेख/कविता (पहिलीच का असेना) अगदि साध्या सोप्या भाषेत असतात... त्यामूळे लगेच आवडतात!
अनामिक
3 Feb 2009 - 3:09 am | पक्या
कविता तितकीशी आवडली नाही. फारच गद्य वाटतीये...सुविचार वाचल्यासारखे वाटतात...जसे 'मुले म्हणजे देवाघरची फुले'.
3 Feb 2009 - 7:35 am | सहज
असहमत
"कविता" म्हणजे काय ते
विडंबन झाल्याशिवाय समजत नाही.
:-)
3 Feb 2009 - 8:37 am | सुनील
एक सोडून तीन-तीन विडंबने झालीत, महाराजा!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Feb 2009 - 7:44 am | पक्या
ह्म्म्म्...मान्य. त्यामुळेच 'म्हणजे ' वरची पिडा आणि इतरांची विडंबने वाचून मजा आली.
3 Feb 2009 - 7:50 am | धनंजय
तेव्हा कळे!
- अनुभव घेतल्याशिवाय ते ज्ञान कळत नाही...
3 Feb 2009 - 9:43 am | नरेश_
बाय द वे, हा ''हार्ल्या'' कोण ?
3 Feb 2009 - 10:21 am | विनायक प्रभू
म्हणजे ४ ची वाट बघत आहे.
सर्व म्हणजे झ....का.......स
3 Feb 2009 - 10:48 am | झेल्या
आवडली..
"प्रेम" म्हणजे काय ते
पडल्याशिवाय (प्रेमात किंवा तोंडावर) समजत नाही :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
3 Feb 2009 - 8:08 pm | शितल
मनापासुन सर्वाचे धन्यवाद :)
आता "म्हणजे" वर इतकी विडंबन झालीत की माझी कविती कोठे गेली तेच मी शोधत होते. ;)
बाकी म्हणजे वरची सर्वच विडंबन एकदम मस्त झाली, विडंबनांनी हसुन हसुन हैराण झाले. :)
3 Feb 2009 - 8:28 pm | प्राजु
कवितेचा शेवट खूप आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Feb 2009 - 8:14 pm | रेवती
उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
आत्ताच वाचली कविता. अगदी मनातून सहजपणे उतरून मिपावर (कागदावर म्हणायचे आहे) आलीये.
त्यावरची विडंबने वाचली नाहीत. सवडीने वाचीन.
रेवती
4 Feb 2009 - 8:49 pm | उमेश__
पान्चट पणा म्हणजे काय??
हा लेख वाचल्या शिवाय समजत नाही.
4 Feb 2009 - 11:41 pm | विसोबा खेचर
सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
लाख रुपये की बात!
शितल, जियो..!
तात्या.
9 Apr 2009 - 5:17 pm | मयुरयेलपले
भारि लिहिलय... होति कुठ???
आपला मयुर
22 Sep 2009 - 12:57 pm | मयुरयेलपले
व्वा काय छान लिहिल आहेस...
आपला मयुर