ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग २ : मंडले भाग ३ बगान भाग ४ : रंगून भाग ५ : लोकजीवन
थाईलँड भाग ६ बँकॉक व परिसर भाग ७ सुखोथाई भाग ८ उत्तरसीमा
लाओस भाग ९ सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग ११ : अंगकोर वट
तसे या देशावर विस्तृत लेखन झालेले असल्याने पुनर्लेखन टाळून २ भागात लेखन विभागत आहे. या भागात प्रवासाचा आराखडा व राजधानी आणि ग्रामीण भागातील भटकंती. अंकोर व इतर मंदिरांविषयी पुढील भागात.
अगदी सुरुवातीच्या आराखड्यात कंबोडिया यादीतच नव्हते. 'केवळ ब्रह्मदेश' हा आराखडा हळूहळू चार देशात विस्तारात गेला. वेळ, पैसा व पाहावयास मिळणारी आवडीची ठिकाणे या तीन गोष्टींचा कमी-जास्त करत जो सुवर्णबिंदू सापडला त्याचे फलित म्हणजे हा प्रवास. बँकॉकहून सीम रीप असा विमान प्रवास हजारच्या आसपास अगदी स्वस्तात होतो. त्यामुळे अंकोर मध्येच तळ ठोकून तिथून बाकीचा राजधानी नॉम पेन्ह व ग्रामीण भागाची रात्रीचा बस प्रवास करून सफर केली. अंकोर मध्ये असंख्य व भव्य मंदिरे आहेत, त्यामुळे काही काळाने आपण तेच तेच पाहतो आहोत असे वाटू नये म्हणून राजधानी व ग्रामीण भागही सफर एकूण कंबोडिया प्रवासाच्या मधोमध ठेवली ज्याने विषयांतर किंवा ब्रेक मिळतो.ठरविलेले सर्व पाहून परती परत बँकॉक मधेच. ब्रह्मदेशाप्रमाणे भारतातून थेट कंबोडिया प्रवास तुलनेत महाग पडतो, पेक्षा थाईलँड-कंबोडिया एकत्र केल्यास फायदेशीर ठरते.
थोडेसे कंबुज/ख्मेर लोकांविषयी. शक्यतो नकारात्मक गोष्टी लिहायच्या मी टाळतो, पण दोन्ही मोठ्या पर्यटन शहरात एक गोष्ट इथे फार खटकली ती म्हणजे लोकांचा हपापलेला स्वभाव. लाखोंनी पर्यटक खरेतर येथे येत असतात पण तरीही मिळेल त्याला फसविण्याची वृत्ती, भयंकर महाग चढे भाव, अंमली पदार्थांचा व मसाज सेंटर चा काळा व्यवसाय हे सर्व गल्लोगल्ली अनुभव. पाश्चात्यांचा तर न पाहवणारा धुमाकूळ येथे चालू असतो. अर्थात याला कोणीच काही करू शकत नाही म्हणा. एकंदरच ज्याची त्याची 'मजेची', 'पर्यटनाची' तसेच 'व्यापार नीतीची' व्याख्या वेगळी... असो...
भटकंतीमध्ये या भागात राजधानी नॉम पेन्ह ची चित्रयात्रा, तसेच मेकाँग नदीत एक बेटावर वसलेल्या छोट्या रेशीम विणकरांच्या खेड्यालाही भेट.
संदर्भासाठी नकाशा
गेल्या भागात पाहिलेली डोंगराळ प्रदेशातली मेकाँग अजून २ हजार किलोमीटरचा पल्ला पार करत इथे मैदानी प्रदेशात अशी विस्तीर्ण होते
मेकाँगचे विस्तृत पात्र
नॉम पेन्ह शहराची 'स्कायलाईन'
राजभवनाजवळील एक रस्ता
राज्याभिषेकमंडप
राजभवन
राजभवन
रजत पॅगोडा व गणेशद्वार
राजभवन
पारंपरिक स्थापत्यशैलीतील संग्रहालयाची इमारत
संग्रहालयाची इमारत
संग्रहालयातील गणेशमूर्ती
भातशेती
कंबुज घर, खालच्या जागेत हातमाग, पाळीव प्राणी इत्यादी, वर राहते घर व विशेष म्हणजे घराच्या बाहेर असलेले देवघर
घर बेताचे असले तरी देवघर मात्र सुंदर असते
अंकोर जवळील एक खेड्यातील दृश्य
शांत तळे व मासेमारीच्या लहान होड्या
पुढील भागात अंकोरवट दर्शन, तत्पूर्वी एक झलक
नॉम पेन्ह च्या राजवाड्यातील ही अंकोरवटची प्रमाणबद्ध प्रतिकृती
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान
प्रतिक्रिया
17 Jul 2016 - 11:12 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो. थोडीफार माहिती असती तर अजून छान झाले असते.
नॉम पेन्ह च्या राजवाड्यातील ही प्रमाणबद्ध प्रतिकृती
या ऐवजी "अंगकोर वटची ही प्रमाणबद्ध प्रतिकृती" असे म्हणायचे असेल असे वाटते.
17 Jul 2016 - 11:22 am | समर्पक
नॉम पेन्ह च्या राजवाड्यात ती ठेवलेली असल्याने चित्रावरच्या वाक्याला जोडून तसे लिहिले, पण सुधारणा करतो
17 Jul 2016 - 5:58 pm | संत घोडेकर
+१
17 Jul 2016 - 11:59 am | एस
सुंदर!
17 Jul 2016 - 9:32 pm | बोका-ए-आझम
तुमच्या या प्रवासातला हा एक देश मी पाहिलेला आहे (तसा थायलंडही, पण कामानिमित्त गेलो असल्यामुळे फिरण्यावर मर्यादा होत्या). हा लेख वाचून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला.
१९९८ च्या उत्तरार्धात कामानिमित्त कंबोडियामध्ये जायची संधी मिळाली होती. अंगकोर वट हा तर अफाट प्रकार आहे पण राजधानी नाॅम पेन्ह हीसुद्धा छान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनाआसलेली चाफ्याची झाडं आठवतात. त्यामुळे शहरात एक मंद सुगंध यायचा.
पाॅल पाॅटच्या ख्मेर रुज राजवटीत देशाची वाट लागली. त्या काळात शिक्षण आणि एकंदरीत आधुनिक जगाशी जोडणाऱ्या सगळ्या गोष्टी बंदच असल्यामुळे कंबोडियामध्ये गुन्हेगारी ही इतर आग्नेय आशियाई देशांपेक्षा थोडी जास्त असावी. आम्हालाही एकटं-दुकटं जाऊ नका आणि रात्री शक्यतो हाॅटेलमध्येच थांबा असं सांगितलं होतं.
तुमच्या लेखावरून परिस्थिती अजून बिघडल्यासारखं वाटलं आणि वाईट वाटलं. सर्वसामान्य कंबोडियन माणूस हा कष्टाळू आणि साधा आहे. त्यांना बघून कोकणातील लोकांची आठवण आल्याशिवाय राहात नाही.
फोटो as usual अप्रतिम!
17 Jul 2016 - 10:49 pm | पद्मावति
हा भागही खूप सुंदर!
...वाह, काय मस्तं!! हे ठीकाण पाहणे हे माझं स्वप्न आहे....
3 Sep 2016 - 10:13 am | पैसा
मस्त!