ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग २ : मंडले भाग ३ : बगान भाग ४ : रंगून भाग ५ : लोकजीवन
थाईलँड भाग ६ : बँकॉक व परिसर भाग ८ : उत्तर सीमा
लाओस भाग ९ : सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर भाग ११ : अंगकोर वट
सुखोथाई हे ऐतिहासिक शहर देशाच्या मध्य भागात आहे. जाण्या येण्याचे उत्तम साधन म्हणजे रेल्वे. बँकॉक-फित्सानुलोक साधारण ५ तासात रात्रीच्या प्रवासात सहज कापले जाते. शक्यतो असे थोडे लांबचे प्रवास रात्रीचे बरे असतात, विशेषतः एकल प्रवासात, यामुळे राहायची वेगळी सोय करावी लागत नाही व अंतरही कापले जाते आणि गोष्टी 'बघायच्या' वेळात मोठी बचत होते! फित्सानुलोक, मूळ नाव 'विष्णूलोक' हे मध्य भागातले मोठे शहर, तिथून सुखोथाई तासाभारावर.
माझ्या प्रवासात हा साधारण मध्यावरचा पडाव होता. ब्रह्मदेश बघून झाल्यावर शेवटी शेवटी रंगून मध्ये सर्दी ताप अशा किरकोळ आजारपणाने पकडले. पावसाळ्याचे दिवस तसे संपत आले होते, तरी मध्य सयाम मध्ये अजूनही जोर ओसरला नव्हता. त्यामुळे इथे तशी प्रतिकूल हवा होती, पण सुदैवाने राहायची सोय अतिशय उत्तम झाली व शरीरास आवश्यक असलेला आराम मिळाला. जिथे राहिलो त्यांनीच दुसऱ्या दिवशी भटकायला सायकल दिली, त्यामुळे मोठेच काम झाले. कारण जुने महानगर बऱ्याच मोठ्या भूभागावर पसरलेले आहे, व नगरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीचा एकंदर बोऱ्याच आहे, त्यामुळे सायकल सर्वात उत्तम साधन. सार्वजनिक बस म्हणजे आपल्याकडे महापालिकेच्या कचऱ्याच्या घंटागाड्या असतात तसे ट्रॅक्टरवजा वाहन व त्यात लाकडी बाकडी टाकलेली.
सुखोथाई आता तीन वेगळ्या पुरातत्वखंडात विभागले आहे. पूर्वी हा सर्व एकच पार्क होता व प्रवेशशुल्कही एकच होते आता त्याचेही तीन झाले. मध्य भाग सर्वात महत्वाचा, उत्तरेकडेही काही चांगली संरक्षित मंदिरे आहेत, दक्षिणेकडे जंगल अद्याप कायम असून अभ्यासू संशोधक मंडळींसाठी अधिक आकर्षक बाकीच्यांनी वगळला तरी चालण्यासारखं. याव्यतिरिक्त संरक्षित समूहाच्या बाहेर पश्चिमेकडे डोंगराळ भाग असून तेथेही काही भग्न वास्तू आहेत.
येथील सांस्कृतिक इतिहास व वर्तमान हिंदू-बौद्ध संमिश्र आहे. पुरातन मंदिरात शैव व वैष्णव मंदिरे कलिंग-नागर व अङ्ग्कोर शैलीतील आहेत. बौद्ध स्तुपांची रचना पारंपारिक लंका-ब्राह्मी शैली व काही ठिकाणी चौकोनी थाई-लाओ शैलीत आहे. लाल जांभ्या दगडात जुने बांधकाम आहे हळूहळू पुढे विटांचा वापर वाढलेला दिसतो. चुन्याचे लिंपण व रंगकाम काही ठिकाणी शिल्लक आहे. हा भाग सुद्धा ब्राह्मी आक्रमणात बराच उद्ध्वस्त झाला.
पाउस तसा येउन जाऊन होता तरीही साधारण चार तास सर्व भाग बघण्यासाठी लागले. पुढे सी सत् चनालाई (श्री सज्जनालय) हे छोटेसे नदीकाठचे रम्य ठिकाण साधारण तासाभारावर बसने जाण्यासारखे आहे. दिवसभरात दोन्ही ठिकाणे बघून संध्याकाळी फित्सानुलोक येथे परत व रात्री रेल्वेने दक्षिणेकडे बँकॉक किंवा उत्तरेकडे च्यंग माई / च्यंग राई कडे जाता येते. फित्सानुलोक ला परत आल्यावर एका बौद्ध मंदिरात एका बौद्ध भिक्षूंनी उपचारांसाठी मार्गदर्शन केले. प्रथमतः भाषेपलीकडे त्यांनी माझ्या प्रकृतीची गरज ओळखली व नंतर अल्प संभाषणातून आवश्यक ती मदत केली. संभाषणाची भाषा संस्कृत! बरेच बौद्ध धर्मग्रंथ संस्कृत भाषेत आहेत त्यामुळे वरिष्ठ भिक्षुंना भाषा अवगत आहे. पुनश्च लेखमालाशीर्षक अधोरेखित…! असो, पुढे चित्रांतून अधिक माहिती…
संदर्भासाठी नकाशा
प्रथम दर्शन
वट सा-सी
सुवर्णांकित बुद्ध
संरक्षक खंदक आता सौंदर्यवर्धक भूमिकेत आहेत
वट सा-सी
वट सी-चुम
वट सी-चुम
वट सी-चुम बुद्ध
वट सी-चुम बुद्ध : प्रसिद्ध मूर्तींना सुवर्णपत्राने लेपित करण्याची प्रथा इथे भाविकांमध्ये आहे. या बुद्धमूर्तीच्याही दुरुस्तीनंतर हळूहळू मुलामा चढत आहे.
एक भग्न मंदिर
एक भग्न मंदिर
संरक्षित हिरवाई
वट सोरासाक
वट सोरासाक
जांभ्या दगडातले प्राचीन भग्न हिंदू मंदिर
गच्च भरलेलं आभाळ, एक सहजदृश्य
विखुरलेले अवशेष, थाई-लाओ शैलीतले चौकोनी स्तूप
मुख्य भागाचे एक दृश्य
वट सी सवाई : वैष्णव मंदिर
वट सी सवाई
वट सी सवाई : वैष्णव मंदिर, द्विभार्या विष्णू दाक्षिणात्य प्रभाव दर्शवितो
वट सी सवाई : फारशी कलाकुसर शिल्लक नाही, पण काही कोपऱ्यात अजून पहावयास मिळते. नाग, अप्सरा व गरुड
वट सी सवाई
पुरातत्व खात्याने उत्कृष्ठ देखभाल ठेवली आहे. एक रस्ता
वट महाथाट: प्रमुख बौद्ध मंदिर समूह
भग्न विहारातील बुद्धमूर्ती
वट महाथाट परिसर
प्रशांत बुद्ध
वट महाथाट परिसर
महाकाय पुरातन वृक्षांमुळे एक वेगळीच गंभीरता वातावरणात भरून असते
पॅनॉरामिक, निरोप घेताना…
पुढील भागात उत्तर सीमेवरची भटकंती
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान
प्रतिक्रिया
13 Jun 2016 - 8:24 pm | टवाळ कार्टा
मस्तय
13 Jun 2016 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं चालली आहे सफर.
भारताच्या दक्षिणपूर्वेला व्हिएतनामपर्यंत प्राचिन भारतिय संस्कृतीचे इतके अवशेष विखूरलेले आहेत की काय पाहू आणि काय नको असे होऊन जाते. तेथिल स्थानिक सरकार व समाज यांना त्यांच्या त्या भूतकालाचा आपल्या भारतियांपेक्षा जास्त "निधर्मी" अभिमान आहे असेच दिसते.
पुभाप्र.
13 Jun 2016 - 11:39 pm | उल्का
सुरेख फोटो आहेत सगळेच.
13 Jun 2016 - 11:55 pm | एस
हे सर्व अवशेष इतक्या सुंदर रीतीने जतन करून ठेवलेले पाहून आनंद झाला. आपल्या देशातली अवस्था किंवा दुरवस्था आठवून वाईटही वाटले.
सुंदर लेखमाला सुरू आहे. फोटो विशेष आवडले.
14 Jun 2016 - 12:02 am | पद्मावति
सुंदर लेखमाला!!
14 Jun 2016 - 12:53 pm | अजया
पुभाप्र.
फोटो अगदी देखणे.बोलका कॅमेरा!
18 Jun 2016 - 9:09 am | सुधीर कांदळकर
प्रकाशचित्रे फारच आवडली. धन्यवाद
18 Jul 2016 - 5:38 pm | ज्ञ
वट ह्या शब्दाचा अर्थ काय आहे?