मला आवडलेली ५० पुस्तके

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 9:10 pm

प्रत्येकाने एकदा तरी वाचली पाहिजेत अशी मराठी पुस्तके -

१) मी कसा झालो? प्र. के. अत्रे
२) कर्हेचे पाणी, प्र. के. अत्रे
३) पानिपत, विश्वास पाटील
४) महानायक, विश्वास पाटील
५) झाडाझडती, विश्वास पाटील
६) युगंधर, शिवाजी सावंत
७) छावा, शिवाजी सावंत
८) मृत्युंजय, शिवाजी सावंत
९) स्वामी, रणजित देसाई
१०) श्रीमान योगी, रणजित देसाई
११) पावनखिंड, रणजित देसाई
१२) व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे
१३) बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे
१४) असा मी असामी, पु. ल. देशपांडे
१५) पुर्वरंग, पु. ल. देशपांडे
१६) आहे मनोहर तरी, सुनीता देशपांडे
१७) पडघवली, गो. नी. दांडेकर
१८) पवनाकाठचा धोंडी, गो. नी. दांडेकर
१९) मृण्मयी, गो. नी. दांडेकर
२०) राऊ, ना. सं. इनामदार
२१) मंत्रावेगळा, ना. सं. इनामदार
२२) शहेनशहा, ना. सं. इनामदार
२३) बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर
२४) माणदेशी माणसे, व्यंकटेश माडगूळकर
२५) पार्टनर, व. पु. काळे
२६) वपुर्झा, व. पु. काळे
२७) रणांगण, विश्राम बेडेकर
२८) ययाती, वि. स. खांडेकर
२९) श्यामची आई, साने गुरुजी
३०) माझी जन्मठेप, वि. दा. सावरकर
३१) सुदाम्याचे पोहे, श्री. कृ. कोल्हटकर
३२) प्रकाशवाटा, प्रकाश आमटे
३३) झोंबी, डॉ. आनंद यादव
३४) मुसाफिर, अच्युत गोडबोले
३५) कोसला, भालचंद्र नेमाडे
३६) इडली आॅर्किड आणि मी, विठ्ठल कामत
३७) चाकाची खुर्ची, नसीमा हुरजूक
३८) पंचतारांकित, प्रिया तेंडुलकर
३९) रहाट गाडगं, चिं. वि. जोशी
४०) रानवाटा, मारूती चितमपल्ली
४१) राशीचक्र, शरद उपाध्ये
४२) गारंबीचा बापू, श्री. ना. पेंडसे
४३) तुंबाडचे खोत, भाग १, २, श्री. ना. पेंडसे
४४) युगांत, इरावती कर्वे
४५) गोट्या, एन. डी. ताम्हणकर
४६) शाळा, मिलिंद बोकील
४७) एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर
४८) अग्निपंख, अे.पी.जे. अब्दुल कलाम
४९) दुनियादारी, सुहास शिरवळकर
५०) माझा प्रवास, विष्णुभट गोडसे

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

ओश्तोरीज वाचलेय मी. कव्हर बहुधा चंद्रमोहन कुळकर्णीनी केलेलं.
जरा अ‍ॅबसर्ड वाटले. पण ओकेटोके. भन्नाट वगैरे वाटलेले नाही.

अहो मला या माणसाविषयी फार कुतुहल आहे.
हे ४० वर्षे एकाच घरात स्वतःला यांनी स्वतःहुन कोंडुन घेतलेल होत.
यांच्यावरील एक अदभुत कॅलेंडर मी औरंगाबादेत बघितलेल होत. कुठल्याशा कंपनीच रेग्युलर कॅलेंडर आहे मात्र ते पुर्ण केकी मुस यांच्यावर बनवलेल आहे. त्यात या माणसाचे काही अदभुत फोटोग्राफ्स बघितलेले आहेत. त्यांच्या विषयी पुर्ण कॅलेंडर आहे. त्यांचे कोट्स त्यांचे दुर्मिळ फोटोज व त्यांच्याविषयीचा मजकुर आहे.
मला वाटत १९३५ ची एक जागतिक फोटोग्राफी स्पर्धेत त्यांनी पहील पारीतोषिक मिळवलेल होत. त्यानंतर ते मुंबईहुन काहीतरी चाळीसगावला आले आणि जे घरात गेले ते कधी बाहेर पडलेच नाहीत बहुधा.
मार्क्वेझ च्या एका कादंबरीच नाव आहे वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड मला केकी मुस आठवले की हे शीर्षक आठवत.
त्या कॅलेंडर मध्ये एक फोटो आहे एक घोडा तळ्यात पाणी पित असल्याचा एक सायकलच्या चाकातुन आरपार दाखवलेला फोटो अदभुत विलक्षण आहे. केकी मुस सितारही वाजवायचे काय असेल हा माणुस अस्स्ल संत अस्सल प्रतिभावंत
त्यांच चाळीसगाव येथील म्युझियम बघण्याचीही इच्छा आहे.
अनेक धन्यवाद या माहीतीसाठी अनंत सामंतांची ही कादंबरी मिळवुन वाचणारच.
ते कॅलेंडरही मिळवायचय एकदा.

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 10:39 pm | अभ्या..

लांडगा वाचलीय मी. भारीय.
बाकी मी पुस्तके डोक्यात ठेवतो. संग्रहात एकही नाही. ठेवणारही नाही आयुष्यात कधी.

हरिभाऊ मोटे यांनी संपादन केलेलं आहे. मराठी लेखकांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे आहेत. वाचताना एक वेगळाच काळ डोळ्यांसमोर उभा राहतो.

खरय तुम्ही म्हणता ते एका वेगळ्या काळात आपण जातो.
बोकोबा या सायटी बघितल्यात का तुम्ही अप्रतिम सुंदर सायटी आहेत इंग्रजी साहीत्यावरील इंग्रजी पुस्तकांवरील
आणि विशेष म्हणजे ब्रेनपिकींग वर लहान मुलांच्या अनेक सुंदर पुस्तकांची छानच ओळख आहे.
https://www.brainpickings.org
http://www.theparisreview.org

बोका-ए-आझम's picture

2 Sep 2016 - 12:11 pm | बोका-ए-आझम

धन्यवाद मारवाजी!

नीलमोहर's picture

31 Aug 2016 - 3:36 pm | नीलमोहर

आपले वाचन किती कमी आहे ते कळतेय,

सप्तरंगी's picture

31 Aug 2016 - 4:54 pm | सप्तरंगी

खूप सगळे धागे दिसतात मिपा वर पण कुणी पुस्तक परीक्षण सुरु करेल तर छान वाटेल. बुक क्लब सारखे, पुस्तक वाचले असल्यास बाकीचे लोक पण त्याबद्दलचे मत मांडू शकतील. चांगली चर्चा होऊ शकेल. अजून एक, मराठी पुस्तके pdf / e-book स्वरूपात कुठे कुठे उपलब्ध आहेत याच्या हि लिंक्स मिळाल्या तर उत्तम !

मृत्युन्जय's picture

31 Aug 2016 - 6:59 pm | मृत्युन्जय

तेवढ्यात जाहिरात करुन घेतो:

http://misalpav.com/node/25607 - गुडबाय मि. चिप्स
http://misalpav.com/node/16149 - शाळा

माझ्या लिस्ट मधल्या २ पुस्तकांचे (मी लिहिलेले ;) ) परीक्षण

त्या दिवशी मी

कट्टा करीन! अट्टल मिपाकर कुठलीही गोष्ट कट्टा करुन साजरा करतो असे आमचे तात्याराव अभ्यंकर ठाणेवाले म्हणायचे. ती परंपरा चालू ठेवावीच लागेल!

चाणक्य's picture

2 Sep 2016 - 9:41 am | चाणक्य

बुकगंगावर मिळतात की हो.

:( नाही download करता आलं काही.

चाणक्य's picture

3 Sep 2016 - 3:19 am | चाणक्य

त्यांचं अॅप्लीकेशन (रीडर) डाऊनलोड केलंत का? त्या रीडरवरच वाचता येतात. पुस्तक सेव्हही त्या रीडरमधेच होते, वेगळे नाही.डेस्कटाॅप आणि टॅब (अँड्राॅईड आणि ios) अशी वेगवेगळी रीडर आहेत.

बोका-ए-आझम's picture

3 Sep 2016 - 12:36 pm | बोका-ए-आझम

चेक करतो.

माणदेशी's picture

6 Sep 2016 - 9:36 pm | माणदेशी

मराठी इ-बुक्स साठी Daily Hunt हे अँड्राँईड अँप अतिशय उपयुक्त आहे. इथे व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, वपु, वि.स.खांडेकर यांसारख्या दिग्गज लेखकांची आणि इतर बरीचशी पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि इ-बुक्सची साईजही केबी मध्ये आहे. बर्याचदा इ-बुक्स भरपूर सवलतीत मिळतात. मला रणजित देसाईंंचं 'श्रीमान योगी' इबुक रुपात केवळ ५९ रूपये मध्ये मिळालं.(हार्ड काँपी किमंत ५९0 ₹)
मला कट्ट्याला बोलवायला विसरु नका.☺

मृत्युन्जय's picture

31 Aug 2016 - 6:52 pm | मृत्युन्जय

फक्त नावे लिहितो:

१. हिमालयाचा कुशीत मी
२. गुडबाय मि. चिप्स
३. तिसरा ध्रुव
४. मृत्युंजय
५. स्वामी
६. राऊ
७. शाळा
८. हॅरी पॉटर - ७ ही भाग
९. सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक मराठी कथा - १० खंड
१०. युगांत
११. रारंग ढांग
१२. इस्त्रायलची मोसाद
१३. अर्थात
१४. प्रकाशवाटा
१५. ब्लडलाइन
१६ डूम्स डे कॉन्स्पिरसी
१७. समिधा
१८. आहे मनोहर तरी
१९. खंडाळ्याच्या घाटासाठी
२०. पानिपत
२१. टाटायन
२२. हा तेल नावाचा इतिहास आहे
२३. एका तेलियाने
२४. व्यक्ती आणि वल्ली
'२५. अपुर्वाई
२६. पुर्वरंग
२७. हसवणूक
२८ जावे त्यांच्या देशा
२९ पार्टनर
३०. आपण सारे अर्जुन
३१. ओमेर्ता
३२. द दाविन्ची कोड
३३. एंजल्स अँड डेमोन्स
३४. ययाती
३५. पंचतारांकित
३६. दुर्योधन
३७. पर्व
३८. रुट्स
३९. टाइमलाइन
४०. गुलाम
४१. वाघ सिंह माझे सखे सोबती
४२. काउंट ऑफ मॉण्टे क्रिस्टो
४३. स्मृतिचित्रे
४४. सत्तर दिवस
४५. बाराला दहा कमी
४६. नाझी भस्मासूराचा उदयास्त
४७. नो कम बॅक्स
४८. युगंधर
४९. राधेय
५०. पावनखिंड
५१. देवळातला वाघ
५२. कुमाउचे नरभक्षक
५३. मिरासदारी
५४. भोकरवाडीच्या गोष्टी
५५. धिंड
५६. माझा प्रवास
५७. फाळणीचे दिवस
५८. देव? छे. परग्रहावरील अंतरावीळ
५९. बर्म्युडा ट्रँगल
६०. शेरलॉक होम्स

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 10:45 pm | प्रचेतस

हा हजारी मनसबदार आहे हं. धाड घालायला हवी ह्याच्याकडे :)

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 10:55 pm | महासंग्राम

अगदी अगदी लेट्स धाड

मृत्युन्जय's picture

2 Sep 2016 - 1:02 pm | मृत्युन्जय

या लिस्ट मध्ये वसंत वसंत लिमये यांची लॉक ग्रिफिन ही जबरदस्त कादंबरी राहिलीच.

सामान्य वाचक's picture

4 Sep 2016 - 8:08 pm | सामान्य वाचक

पण एकंदरीत नाही आवडली
विंग्रजी कादंबऱ्याची नक्कल करायचा प्रयत्न वाटला

करुणाष्टक - व्यंकटेश माडगूळकर

अजून बाहेर काढलेली नाही. ;)

असंका's picture

1 Sep 2016 - 1:17 am | असंका

गोट्या, एन. डी. ताम्हणकर

ना. धों. ताम्हणकर ना हो साहेब?

नाखु's picture

1 Sep 2016 - 12:11 pm | नाखु

१३. झुलवा - उत्तम बंडू रूपे

बहुधा तुपे असावे..

वाखु साठवली आहे,

पुण्यात नॅशनल बुक ट्रस्टची अधीकृत शाखा आहे काय? कन्येसाठी अनुवादीत पुस्तके घ्यायची आहेत.

बोका-ए-आझम's picture

2 Sep 2016 - 9:42 am | बोका-ए-आझम

Autocorrect मुळे झालं असावं.

टागोर, ताराशंकर बंद्योपाध्याय, विभूतिभूषण बंद्योपाध्याय, यशपाल, मुल्कराज आनंद, अमृता प्रीतम, दोस्तोव्हस्की,
टॉल्स्टॉय, डिकन्स, चेखोव, मार्क ट्वेन, अनेक....

पथिक's picture

1 Sep 2016 - 12:28 pm | पथिक

शरत्चन्द्र पण...

रघुनाथ.केरकर's picture

1 Sep 2016 - 1:36 pm | रघुनाथ.केरकर

यातील बर्‍यांच याद्यामधली काही पुस्तकं वाचली आहेत. माझं एक स्वप्न आहे की आपल्या रहात्या घरी स्वताचा एक बूक शेल्फ असावा, वेळ मीळाला की निवांत आराम खुर्चीवर बसुन एक एक पुस्तक चाळावं.

जे समाधान हार्ड कॉपी वाचताना मीळतं ते सॉफ्ट कॉपीत मीळत नाही.

कुणाकडे जुनी बालभारती ची पुस्तके आहेत का? साधारण ८० - ९० च्या दशकातली.
पुन्हा वाचायची आहेत. असल्यास जरुर कळवा.

जगप्रवासी's picture

1 Sep 2016 - 2:25 pm | जगप्रवासी

स्वतःच मोठं पुस्तकाचं कपाट आणि बाजूला एक आराम खुर्ची पुस्तकं वाचण्यासाठी.

या लेखातील बरीच पुस्तके आहेत माझ्याकडे.

थोडी माझ्याकडची लिस्ट-
१. यक्षाची देणगी - जयंत नारळीकर
२. राजा रवी वर्मा वर्मा - रणजित देसाई
३. नाथ हा माझा - कांचन घाणेकर
४. वॉल्ट डिस्ने - यशवंत रांजणकर
५. हाती ज्यांच्या शून्य होते - अरुणा शेवते
६. नॉट विदाऊट माय डॉटर - महमुदी बेटी
७. हसरे दुःख - भा. द. खेर
८. दास डोंगरी राहतो - गो नी दांडेकर
९. गाडगेबाबा - गो नी दांडेकर
या लेखातील बरीच पुस्तके आहेत माझ्याकडे. थोडी माझ्याकडची लिस्ट
१. यक्षाची देणगी - जयंत नारळीकर
२. राजा रवी वर्मा वर्मा - रणजित देसाई
३. नाथ हा माझा - कांचन घाणेकर
४. वॉल्ट डिस्ने - यशवंत रांजणकर
५. हाती ज्यांच्या शून्य होते - अरुणा शेवते
६. नॉट विदाऊट माय डॉटर - महमुदी बेटी
७. हसरे दुःख - भा. द. खेर
८. दास डोंगरी राहतो - गो नी दांडेकर
९. गाडगेबाबा - गो नी दांडेकर
१०. सर्व सु शि पुस्तके
११. सर्व रत्नाकर मतकरी पुस्तके

हेमंत लाटकर's picture

1 Sep 2016 - 3:40 pm | हेमंत लाटकर

@ रघुनाथ केरकर

बालभारतीची जुनी पुस्तके www.esahity.com वर डाउनलोड करता येतील ebook स्वरूपातील.

पिलीयन रायडर's picture

1 Sep 2016 - 9:08 pm | पिलीयन रायडर

इंग्लिश पुस्तकांच्या याद्या काढा! इथे फार लायब्रर्‍या आहेत.. पण कोणतं पुस्तक घ्यावं हे समजत नाही.

मला फार वर्णनं असणारी रटाळ पुस्तकं आवडत नाहीत. क्लासिक असली तरीही.. वेगवान कथा आवडते. काय सुचवाल?

सामान्य वाचक's picture

2 Sep 2016 - 1:06 pm | सामान्य वाचक

Dan ब्राउन
Arther हॅले
Irving Wallace
वाच

फिकशन्स

मस्त वेगवान असतात

फ्योदोर डोस्टोव्हस्कीचं द ब्रदर्स कारामाझाॅव्ह आणि क्राईम अँड पनिशमेंट. डोस्टोव्हस्की हा पात्रनिर्मिती आणि त्यांच्या मानसिक स्थितीतून घडणाऱ्या आणि त्या पात्रांचं आयुष्य उलटसुलट फिरवणा-या घटना यांचा बादशहा आहे. विनोदात वुडहाऊस, रहस्यात पो, का‌ॅनन डाॅईल आणि आगाथा ख्रिस्ती; थ्रिलर्समध्ये फोर्साईथ, काॅनेली आणि ग्रिशॅम - हे सगळे आहेत पण कादंबरीमध्ये एकमेवाद्वितीय म्हणजे डोस्टोव्हस्की.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Sep 2016 - 10:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझी यादी.
(इंग्रजीमधे अनुवादित किंवा मुळ इंग्रजी)
०१. माईन कान्फ.
०२. मास्टर ऑफ द गेम.
०३. शेरलॉक होम्स (सगळी. भाषांतरीत आणि मुळ दोन्ही. मुळ भाषेचा टेचं अनुवादात जाणवत नाहित.)
०४. गॉडफादर.
०५. कॉन-टिकी अक्रॉस द पॅसिफिक बाय राफ्ट.
०६. द अल्केमिस्ट.
०७. द पेट सिमिटरी.
०८. द ग्रीन माईल.
०९. गोल्डन र्‍हांदेवु (चायला rendezvous शब्दाचा अचुक उच्चार लै प्रयत्न करुनही जमत नै राव).
१०. मिडलमार्च
११. थ्री मेन इन अ बोट (द.मा.मिरासदारांनी ह्याचं लघुभाषांतर केलेलं पुस्तकही आहे.)
१२. द ब्रॅम स्टोकर्स ड्रॅक्युला.
१३. बॅग ऑफ बोन्स (एका अत्यंत हलकट संभावित मिपाकराने १५ दिवसात परत करतो असं सांगुन दिड-दोन वर्षापुर्वी घेतलयं हे. परत करा साहेब.)
१४. द हॉबिट
१५. लॉर्ड ऑफ द रिंग्ज
१६. ब्राईट फॉल्स (लहानपणी वाचलेलं आवडलेलं शोधतोय सद्ध्या),
१७. सान अँड्रिआस (अ‍ॅलिस्टर मॅक्लिन)
१८. रेझ द टायटॅनिक.
१९. द विचर सिरिज

बाकी वेळ मिळेल तशी टंकिन.

हेमंत लाटकर's picture

2 Sep 2016 - 8:44 am | हेमंत लाटकर

कॅप्टन यादीतील अनुवादित पुस्तके कोणती आहेत

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2016 - 7:06 am | कैलासवासी सोन्याबापु

1. वॉल्ट डिस्नी - द अल्टिमेट फँटसी (यशवंत रांजणकर)
2. आकाशाशी जडले नाते - डॉ जयंत नारळीकर
3. यक्षांची देणगी - डॉ जयंत नारळीकर
4. वामन परत न आला - डॉ नारळीकर
5. शॉर्ट स्टोरीज - गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
6. रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता- जिम कॉर्बेट

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2016 - 11:45 am | बोका-ए-आझम

मधली अंतर्गत सुरक्षा तज्ञ मेजर राम सामंत ही भूमिका करणार का? ;)

(संस्क्रुती बाह्या) धागा प्रतिसाद शताब्दीनिमित्त लाटकरसाहेबंचा पुण्यात अक्षरधारा,अत्रे सभागृह्,मजेस्टीक बुक गॅलरी याठिकाणांचे नेमके पत्ते,आत्मुदांनी पुण्यात सापड(व)लेल्या खादाडीच्या अनवट २५ जांगाची माहीती (नकाशासह) व पुणेरी श्रीफळ देऊन करण्यात येत आहे.
स्वागताध्यक्ष :आदूबाळ (पुण्यात असल्यास)
प्रमुख पाहुणे : वपाडाव (उबलब्ध असल्यास)
हस्ते: दस्तुर्खुद्द आत्मुदा. (कारेक्रमाची वेळ यांच्या सोईने ठरेल ती दोन यजमानांच्या कार्याच्या मधली विश्रांतीवेळ असू शक्ते.

अखिल मिपा धागा सत्कार समिती व नियमित मिपा वाचक संघ
सर(क)चिटणीस नाखु

अत्रुप्त आत्मा's picture

2 Sep 2016 - 10:39 am | अत्रुप्त आत्मा

=))

जेपी's picture

2 Sep 2016 - 11:29 am | जेपी

आवडलेली पुस्तके -
१) वंशवृक्ष - एस.एल भैरप्पा.
२)पारखा - एस.एल भैरप्पा.
३)आवरण -एस.एल भैरप्पा.
४)पर्व -एस.एल भैरप्पा.
५)तंतु - एस.एल भैरप्पा.
६) माझ नाव भैरप्पा -एस.एल भैरप्पा.
७)अंताजीची बखर,बखर अंतकाळची,सांप्रती - नंदा खरे.
१०)युद्ध जिवांचे, हा तेल नावाचा इतिहास, अधर्म युद्ध - गिरीश कुबेर
१३)नातिचरामी -मेघना पेठे
१४) पार्टनर -वपु काळे
१५) तांडव- महाबळेश्वर सैल
१६) वाचणार्‍याची रोजनिशी - सतिश काळसेकर
१७)अबकडई....- संपादित पुस्तक
१८) सात सक्क त्रेचाळीस , प्रतिस्पर्धी,-- किरण नगरकर
२०)ब्रेडविनर,, शोजीया,परवाना -ले. डेबोरा एलीस..अनु.- अपर्णा वेलणकर
२३)आम्ही भगिरथाचे पुत्र - गोनीदा.
२४)हत्या- श्री.ना. पेंडसे
२५)प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
२६) नेगल भाग १ आणी २ -अरुण मनोहर
२८) चार आदर्श खलीफा - शेषेराव मोरे
२९)शोध - मुरलीधर खैरनार
३०) वनवास्,शारदा संगीत - प्रकाश नारायण संत
३२)द्रोहपर्व -अजेय झणेकर
३३) जोहड -सुरेखा शाह
३४) काबुल ब्युटी स्कुल -डेबोरा रॉड्रीग्ज
३५ ) ब्लडब्रदर्स - एम जे अकबर
३६) मेळ घाटावरील मोहोर
३७)संभाजी - विश्वास पाटील..
३८) भटाच्या वाड्यातील भुतावळ -भारा भागवत
३९)अ‍ॅट एनी कॉस्ट - अभिराम भडकमकर
४०) हंगर जेम्स - सुझान कॉलीन्स

.क्रमश..

बोका-ए-आझम's picture

2 Sep 2016 - 12:17 pm | बोका-ए-आझम

या गेल्या पाच वर्षांतल्या जबरदस्त कादंबऱ्या आहेत. शोध अस्सल मराठी थ्रिलर आणि तांडव जबरदस्त ऐतिहासिक कादंबरी.

मृत्युन्जय's picture

2 Sep 2016 - 1:08 pm | मृत्युन्जय

वसंत वसंत लिमयांची लॉ़ ग्रिफिन ही देखील अलीकडच्या काळातली एक सुंदर कादंबरी.

सामान्य वाचक's picture

4 Sep 2016 - 8:15 pm | सामान्य वाचक

फारशी आवडली नाही
विंग्रजी कादंबऱ्याची नक्कल वाटली

सामान्य वाचक's picture

4 Sep 2016 - 8:13 pm | सामान्य वाचक

कित्येक दिवस पुस्तक चा आकार आणि उगीचच, हे आवडणार नाही, अशी शंका, यामुळे हातात घेतले नव्हते

काल आणले आणि आत्ता 400 पाने वाचून झाली आहेत
रात्रीपर्यंत संपवेन

खरच खूप वेगवान आणि बांधीव प्लॉट आहे
तुमचे आभार एक चांगले पुस्तक वाचायला प्रवृत्त केल्याबद्दल

दा विन्ची's picture

2 Sep 2016 - 11:39 am | दा विन्ची

हा सुंदर धागा पुनरुज्जीवित केल्याबद्दल धन्यवाद. मी सुद्धा यातील बरीच पुस्तके वाचलेली आहेत. सध्या माझ्याकडे सिडने शेल्डन, जॉन ग्रिशॅम, डॅन ब्राऊनची इंग्रजी पुस्तके pdf रूपात व अवघ्या १ ते २ mb साईझ मध्ये उपलब्ध आहेत. हवी असल्यास कायप्पा किंवा ईमेल वर पाठवू शकेन. एखाद्या शास्त्रीय अथवा इंजिनियरिंग मधील एखादे पुस्तक कुणाला हवे असल्यास मदत करू शकतो.
बाय द वे मी जॉन ग्रिशमच्या शैलीचा दिवाना आहे.

राजाभाउ's picture

2 Sep 2016 - 3:52 pm | राजाभाउ

माझी लिस्ट
१) द पार्टनर - जॉन ग्रिशम
२) द पेलिकन ब्रिफ - जॉन ग्रिशम
३) द क्लायंट - जॉन ग्रिशम
४) द असोसिएट - जॉन ग्रिशम
५) द फर्म - जॉन ग्रिशम
६) द चेंबर - जॉन ग्रिशम
७) रमलखुणा - जी. ए.
८) डोहकाळिमा - जी. ए.
९) निळासावळा - जी. ए.
१०) पिंगळावेळ - जी. ए.
११) काजळमाया - जी. ए.
१२) सांजशकुन - जी. ए.
१३) हिरवे रावे - जी. ए.
१४) रानं , शिवार गाव - जी. ए.
१५) रानातील प्रकाश - जी. ए. (मु. ले. Conrad Richte )
१६) लॉर्ड ऑफ दी फ्लाईज - जी. ए. (मु. ले. William Golding)
१७) सोन्याचे मडके - जी. ए.(मु. ले. James Stephens)
१८) कोसला - नेमाडे
१९) बिढार - नेमाडे
२०) झूल - नेमाडे
२१) देखणी - नेमाडे
२२) टीकास्वयंवर - नेमाडे
२३) सोलेदाद - विलास सारंग
२४) शिबा राणीच्या शोधात - दिलीप चित्रे
२५) रात्र काळी घागर काळी - चिं . त्र्य खानोलकर
२६) कोंडुरा - चिं . त्र्य खानोलकर
२७) गणुराय आणि चानी - चिं . त्र्य खानोलकर
२८) सोन्याचा पिंपळ - श्रीनिवास विनायक कुलकर्णी
२९) माणसे अरभाट आणि चिल्लर - जी. ए
३०) बोर्न आयडेंटिटी - लुडलुम
३२) बोर्न सुप्रीमसि - लुडलुम
३३) बोर्न अल्टिमेटम - लुडलुम
३४) शेरलोक्स होम्स
३५) रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता - जिम कॉर्बेट
३६) कुमाऊंचे नरभक्षक - जिम कॉर्बेट
३७) इंदिरा - पुपुल जयकर
३८) वंशवृ़क्ष - उमा कुलकर्णी (मु. ले. एस एल भैरप्पा )
३९) पर्व - उमा कुलकर्णी (मु. ले. एस एल भैरप्पा )
४०) आवरण - उमा कुलकर्णी (मु. ले. एस एल भैरप्पा )
४१) काठ - उमा कुलकर्णी (मु. ले. एस एल भैरप्पा )
४२) धागे आडवे उभे - अनिल अवचट
४३) द डे ऑफ जॅकल - फोरसेथ
४४) द ओडिसा फाईल - फोरसेथ
४५) द डॉग्ज ऑफ वॉर - फोरसेथ
४६) द फिस्ट ऑफ गॉड - फोरसेथ
४७) अ फाईन बॅलन्स - रोहिन्तोन मिस्त्री
४८) सच लॉंग जर्नी - रोहिन्तोन मिस्त्री
४९) फॅमिली मॅटर - रोहिन्तोन मिस्त्री
५०) मॅटर ऑफ टाइम - शशी कुलकर्णी
५१) संपूर्ण पु.ल.
५२) भयकथा, गूढकथा - नारायण धारप, रत्नाकर मतकरी

'तराळ-अंतराळ' हे शंकरराव खरातांचं आत्मचरित्र.
'तिसरी क्रांती' हे अरूण साधूंचं पुस्तक.
'धागे अरब जगाचे' हे विशाखा पाटील यांचं पुस्तक.
'भय इथले' हे आतिवास याचं पुस्तक.
'माझे विद्यापीठ' हा नारायण सुर्वे यांचा काव्यसंग्रह.
'फकिरा' ही अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी.

वरील याद्यांमध्ये नसलेली ही काही पुस्तके माझी आवडती आहेत. अजून आठवतील तशी टाकतो.

जयन्त बा शिम्पि's picture

3 Sep 2016 - 12:24 pm | जयन्त बा शिम्पि

ईसाहित्य डॉट कॉम यावर भेट द्यावी. भरपुर पुस्तके पीडीएफ फॉर्मेट मध्ये विनामुल्य ऊपलब्ध आहेत.

मुक्त विहारि's picture

4 Sep 2016 - 1:00 pm | मुक्त विहारि

डिस्क्लेमर : खालील सगळी पुस्तके माझ्या वैयक्तिक संग्रहातली असल्याने आणि माझी २ पुस्तके ढापल्याचे शल्य अद्यापही माझ्या हृदयात असल्याने, मी कुणालाच पुस्तक घराबाहेर घेवून जायला परवानगी देत नाही.

इथे प्रश्र्न पैशाचा नाही, पण मराठी पुस्तकांच्या फार आवृत्त्या निघत नाहीत."सुदाम्याचे पोहे" हे पुस्तक मी १९८३ ते २००३ पर्यंत शोधत होतो.

तस्मात, कधीही माझ्या घरी या.हवे तितके दिवस माझ्या घरी रहा.मस्त पैकी जेवा आणि पुस्तके वाचा...पण कृपा करून घरी पुस्तक न्यायची परवानगी, मागू नका.

आता परत एकदा एखाद्या पुस्तकासाठी वर्षानुवर्षे वाट बघायची माझी मानसीक स्थिती नाही.

===================================

दरवर्षी मी गणपती-दिवाळी आणि इतर सणवार, तसेच इतरांची लग्नकार्ये आणि मुंजी वगैरे ह्या समारंभाना न जाता, ते पैसे पुस्तके विकत घ्यायला वापरतो.

शिवाय मला ४ शर्ट आणि २ पँट्स. ४ वर्षे आरामात पुरतात.त्यामुळे कपड्यांचा पण जास्त खर्च होत नाही.

दरवर्षी साधारण एक १०-१२ हजाराची पुस्तक खरेदी होते.सध्या जवळपास २५००च्या आसपास मासिके (दिवाळी अंक) आणि पुस्तके आहेत.

ह्या वर्षी मात्र पुस्तक खरेदी जास्त केलेली नाही.पुढच्या वर्षी पासून परत सुरु होईल.

=============================================

१. निवडक आवाज (तसे मी १९९२ पासून आवाज, जत्रा, किस्त्रीम, शतायुषी असे २०-२५ दिवाळी अंक विकत घेतो.)

२. निवडक कालनिर्णय

३. मीना प्रभू यांची सर्व प्रवासवर्णने

४. कौटिल्याचे अर्थशास्त्र (मूळ संस्कृत पुस्तक २३०० वर्ष जुने असून, आजच्या काळाला पण ते तितकेच लागू होते.)

उदा.

परवा एका गडा संबधीच्या व्याख्यानाला गेलो होतो.त्यात त्यांनी १३व्या शतकातल्या एका पुस्तकाचा आधार घेवून, गडांचे एकूण प्रकार ८ असे सांगीतले.चाणक्याच्या २३०० वर्ष जूने असलेल्या पुस्तकात ("कौटिल्याचे अर्थशास्त्र") पण तेच ८ प्रकार आहेत.

५. अन्नपुर्णा.

६. स्मृतीचित्रे.

७. अँड द ऑस्कर गोज टू..... (शैलजा देशमूख..मध्यंतरी ह्यांना फोन केला होता.त्या आता चित्रपट ह्याच विषयावरचे अजून एक पुस्तक लिहित आहेत.)

८. गिरिश कुबेर ह्यांची सगळीच पुस्तके...(पण हा तेल नावाचा इतिहास आहे आणि एका तेलीयाने, ही पुस्तके आखाती देशात काम करत असतांना फार उपयोगी पडली.)

९. रुचिरा भाग १ आणि भाग २ (वयाच्या १०व्या वर्षापासून स्वयंपाक करतांना रुचिरा भाग १ उपयोगी पडले.)

१०. भय इथले.... (लेखिका, आपल्याच मिपाकर,अतिवास ताई....अफगणिस्थान ह्या देशा विषयी फार उत्तम माहिती.)

११. केल्याने होत आहे रे , लेखक श्री.अ. दाभोलकर (शेती विषयक तशी बरीच पुस्तके माझ्याकडे आहेत, पण ह्या पुस्तकाचे वैशिष्ट असे की, केवळ १० गुंठ्यात शेती कशी करावी? ह्याचे फार उत्तम मार्गदर्शन ह्या पुस्तकात आहे.)

१२. रिच डॅड, पुअर डॅड ( रॉबर्ट टी. कियोसाकी, अर्थकारणा वरचे उत्तम मार्गदर्शक पुस्तक)

१३. संपूर्ण फास्टर फेणे (अजूनही वाचतो.जुने दिवस आठवतात.)

१४. संपूर्ण ज्यूल व्हर्न (अजूनही वाचतो.जुने दिवस आठवतात.)

१५. संपूर्ण हॅरी पॉटर (मुलांच्या आणि प्रौढांच्या मानस शास्त्रावरचे एक जादूगारीय पुस्तक)

१६. दासबोध (ह्या विषयी माझ्यापेक्षा, आपले एक मिपाकर श्री. विटेकर जास्त उत्तम लिहू शकतील.)

१७. श्री. अवधूतानंद उर्फ श्री. जगन्नाथ कुंटे ह्यांची सगळीच पुस्तके. (नर्मदे हर हर आणि पुन्हा नर्मदे हर हर,मलातरी ही दोन्ही पुस्तके आवडली.)

१८. बोर्डरूम (प्रबंधक म्हणून काम करतांना उपयोगी पडले आणि माझ्या सारख्या मारून मुटकून अभियंत्या पासून शेतीकडे वळवायला, उपयोगी पडले.)

१९. अर्थात (कधी कधी मुड लागला तर वाचतो. पण अद्यापही संपुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे.)

२०. मनात (कधी कधी मुड लागला तर वाचतो. पण अद्यापही संपुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे.)

२१. द अल्केमिस्ट ("तुझे आहे तूजपाशी"चा इंग्रजी अवतार)

२२. संन्यासी ज्याने आपली फेरारी विकली ("द माँक व्हू सोल्ड हिज फेरारी"चा मराठी अनुवाद.यशस्वी होण्यासाठीची एका वाक्यातली ७ सुत्रे)

२३. मिरासदारांची सगळी पुस्तके (त्यातही भोकरवाडीच्या गोष्टी, मिरासदारी)

२४. चि.वि.जोशी ह्यांची सगळी पुस्तके

२५. सुदाम्याचे पोहे (अतिशयोक्त्ती विनोदाचे अप्रतिम उदाहरण)

२६. सुत्रे चाणक्याची, सुत्रे गव्हर्ननसची

२७ मुसाफिर (एकदा वाचायला उत्तम)

२८ किमयागार (कधी कधी मुड लागला तर वाचतो. पण अद्यापही संपुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे.)

२९. प्रविण दवणे ह्यांचे सावर रे (सगळे भाग)

३० कार्यशैली (लेखक अनिल शिदोरे)

३१. अंजली पेडसे ह्यांचे देहबोली (प्रबंधक म्हणून काम करतांना उपयोगी पडले.)

३२. निवडक अबकडइ

३३. जयंत नारळीकर ह्यांचे चार नगरातील माझे वास्तव्य.

३४. मराठीत अनुवादित असलेले "कुराण" (ह्याची पी.डी.एफ. आहे.)

३५. राजेंद्र बर्वे ह्यांची पुस्तके (तरतरीत दिवसांसाठी हे एक आणि दुसरे प्रसन्न विचारांसाठी)

३६ चौदा मिनिटात स्वैपाक (आखाती देशात, कमीत-कमी वेळांत, स्वतः सैपाक बनवण्यासाठी उपयोगी पडले.)

३७. गांधींनी आणि काँग्रेसने फाळणी का स्वीकारली? हे शेषराव मोरे ह्यांचे पुस्तक (गेली ४ वर्षे हे पुस्तक वाचत आहे.अद्यापही हे संपूर्ण पुस्तक वाचून झालेले नाही.मध्यंतरी शेषराव मोरे ह्यांच्याशी बोलतांना, ह्या गोष्टीचा उल्लेख, त्यांच्या पाशी केला.म्हणालो, एका बैठकीत किंवा सलग हे पुस्तक वाचणे, माझ्या आकलनशक्तीच्या बाहेर आहे.त्या काळातील घटनांचा अर्थ ह्या काळाशी सुसंगत रित्या लावत आणि मागील प्रकरणांचा आढावा घेत वाचायला, माझ्या तरी बुद्धीला फार कष्ट पडतात.)

३८. इडली, आर्किड आणि मी (लेखक विठ्ठल कामत...विठ्ठल कामतांचे "उद्योजक होणारच मी" हे पण पुस्तक मस्त आहे.)

३९ बाराला दहा कमी (सुसाट पुस्तक.....आल्फ्रेड नोबेल ते जे. ओपनहायमर ह्या शास्त्रज्ञांचा आणि संहारक शस्त्रांबाबत (विशेषतः अणू बाँब विषयीची ) उत्तम माहिती.

४०. संस्कृती रंग (वैशाली करमरकर, कुठल्याही देशात स्वतःला विरघळून टाकायचे असेल तर, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. विशेषतः जर्मनी.)

४१. ही तर श्रींची इच्छा (लेखक श्री. श्रीनिवास ठाणेकर.....दुर्दम्य इच्छा आणि अहोरात्र कष्ट कारायची तयारी असेल तर एका सामान्य परिस्थितला मनुष्य पण आपले ध्येय गाठू शकतो,)

४२. ऑस्कर पिस्टोरियस ड्रीमरनर (एखादी अपंग व्यक्ती देखील, दुर्दम्य इच्छा आणि अहोरात्र कष्ट कारायची तयारी असेल तर आपले ध्येय गाठू शकते,)

४३. जोकर इन द पॅक (आय.आय.एम. विषयावरचे पुस्तक)

४४. बॅरिस्टरचे कार्ट, लेखक हिम्मतराव बावस्कर

४५. सुसंवाद सहकार्‍यांशी (लेखक अविनाश भोमे.... आपल्या सहकार्‍यांशी कसे वागावे? ह्यासाठी उपयुक्त)

४६ नवा विजयपथ (लेखक अविनाश धर्माधिकारी, आय.ए.एस.च्या अभ्याक्रमासाची जुजबी तोंड ओळख. तुम्ही जरी ह्या परीक्षेला बसणार नसाल तरी, एकदा तरी नक्की वाचा.)

४७.रॉबिन्सन कृसो.

४८ टॉम सॉयर.

४९ नॉट विदाउट माय डॉटर (लेखिला बेट्टी मेहमुदी....आखाती देखात जेंव्हा पहिल्या नौकरीत फसवल्या गेलो, त्यावेळी हे पुस्तक आधीच वाचल्याचा फायदा झाला.)

आणि

५०. तुम्ही आणि तुमची मुले (लेखक श्री.अविनाश भोमे.....आमच्या घरात कुणाचे बारसे असेल तर मी हे पुस्तक आवर्जून भेट देतो.मी ज्यांना ज्यांना हे पुस्तक भेट दिले किं॑वा सुचवले आहे, त्या प्रत्येकाने व्यक्तीशः मला धन्यावाद दिले आहेत.)

मुक्त विहारि's picture

4 Sep 2016 - 7:25 pm | मुक्त विहारि

पुस्तके सुचवा ना !

http://www.misalpav.com/node/25334