मी बी ढेकर देईन म्हणतो : हवाबाणी तडका

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
25 Jul 2016 - 1:00 pm

कधी चवीची, कधी अगदीच पांचट,
लाल तर्रीची मिसळ कधीतरी ओर्पीन म्हणतो
मी बी ढेकर देईन म्हणतो...!!

मिसळीवर तवंगतर्री
भेटली काय, न भेटली काय
मिपाकार्याला रवंथ करायची
उपजत सवयच हाय
जिलबीतून पाकरस
सुटला काय, न सुटला काय
मिपाकार्याला तोबरे भरायाची
सवयच हाय
शेवटच्या तुकड्यापर्यंत
मी बी दाबून खाईन म्हणतो...!!

चयापचयाची काळजी
सोडून देईन म्हणतो
मी बी हाटेलामधीच
चूळ भरीन म्हणतो...!!

अपचनाचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या हावऱ्या मिपाकर्‍याले
उपास-तापास लंघनाची अक्कलच नाय

त्रिफळाचे चूर्ण हॉलमधीच घेईन म्हणतो
सगळीकडून ढेकर देईन म्हणतो...!!

टोपाच्या रिकम्या
खडखडाटशी प्रतारणा करून
वळसेवाली जिलबी पडता येते
मिसळीशी इमान राखणारा
हॉटेलबाहेर जाते
मिसळपावचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
जिलबी पाडून झाली की
खुशाल सोडून द्यावे
रेचक म्हणूनी लिंबू
पिळावा तरच येते ढेकर ....!!
एकमुखाने बोला भाऊ!
खवैय्येगिरी की जय....!!!

(इथे मिपाकर म्हणून उल्लेखलेले व्यक्तिमत्व म्हणजे अस्मादिक, उगा गैरसमज करून घेऊ नये)

धोरणवावरप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2016 - 1:26 pm | टवाळ कार्टा

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2016 - 1:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर.. मिसळीचं आणि पोटाचं.
=)) (मरतय मी हसुन हसुन)

-दिलीप बिरुटे

कविता१९७८'s picture

27 Jul 2016 - 8:49 am | कविता१९७८

.

कविता१९७८'s picture

27 Jul 2016 - 8:50 am | कविता१९७८

हलके घ्या :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jul 2016 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही हलकेच घेतो हो, फक्त आपणही हलकेच घ्यायला आणि मिपा इंजॉय करायला शिका एवढीच आपल्या त्या देवाकड़े मागणी आहे. कसंय आम्ही खोड़ी करू आणि मग तुम्ही तक्रार कराल असं नाय ना चालणार.... कळलं का विस्कटून सांगू... :)

असो, ह्याव अ गुड्डे....!

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

27 Jul 2016 - 1:51 pm | गंगाधर मुटे

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर.....!

पगला गजोधर's picture

1 Dec 2016 - 8:51 am | पगला गजोधर

अरे मिपा सुखसारकवटी, देतंय कोण ?

हवाबंदसम्राट

नाखु's picture

25 Jul 2016 - 1:52 pm | नाखु

आ$$$ब्ब ...

नाखु

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2016 - 1:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

आज काय खर नाही.
पेटलेत एक एक जण.
हे व्हर्जन पण आवडले
पैजारबुवा,

गंगाधर मुटे's picture

25 Jul 2016 - 7:57 pm | गंगाधर मुटे

लगे रहो गजदर भाई. h

बहुधा हे सहावे विडंबन. c

माझ्या मागे आता संख्या मोजायचंच काम उरलंय. b

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2016 - 8:01 pm | अत्रुप्त आत्मा

=))

बाबा योगिराज's picture

26 Jul 2016 - 12:06 am | बाबा योगिराज

आवड्यास

कविता१९७८'s picture

27 Jul 2016 - 8:33 am | कविता१९७८

भारीये हवाबाण तडका गजोधरजी,

धौती योग चुर्णाच्या जाहीरातीची आठवण झाली.

मळमळतोय मी , कळवळतोय मी,
तळमळतोय मी, गरगरतोय मी,
छळतय मला पोट
मग घ्या ना धौती योग

पोटात दंगा घालाल तर पंगा होईलच की

सतिश गावडे's picture

27 Jul 2016 - 8:36 am | सतिश गावडे

मस्त जमलंय. तुम्ही एकदा मामाची मिसळ खाऊन बघा.

नाखु's picture

27 Jul 2016 - 8:40 am | नाखु

काय बघायचं तेही सांगून टाका साग्रसंगीत.

सतिश गावडे's picture

27 Jul 2016 - 8:50 am | सतिश गावडे

मिसळ खायच्या आधी मिसळीचे पातेलं पहा (असे आमचे एक भडजी मित्र म्हणतात). आणि नंतर हही हही हही (हे ही आमचे भडजी मित्रच म्हणतात)

पगला गजोधर's picture

27 Jul 2016 - 9:09 am | पगला गजोधर

ल्ल्युल्लुल्ल्ल्ल्लु

लेख व प्रतिसादांवरुन पुर्वी ऐकलेला चाचा चौधरी आणी साबुचा किस्सा आठवला . चाचा चौधरी आणी साबु यांच्याकडे एक माणुस येतो आणी चाचा चौधरीला अपमानास्पद बोलतो . चिडलेला साबु त्या माणसाला पोटामध्ये एक जोरदार गुद्दा मारतो की तो माणुस उडुन दुरवर डोंगरापलिकडे पडतो . थोड्या वेळाने तोच माणुस हसतमुखाने येउन चाचा चौधरी आणी साबुला १०० रुपये देउन आभार मानतो आणी खुलासा करतो की "त्याला बरेच दिवस जो त्रास होता तो आज साबुच्या बुक्कीमुळे मोकळा झाला ."

पगला गजोधर's picture

27 Jul 2016 - 2:23 pm | पगला गजोधर

sabu