इन्स्टिस्ट्युशनालायझेशन (institutionalization)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
22 Jul 2016 - 4:43 am

भारतरत्न सचिन.... या धाग्यावर संदीप डांगे याच्या http://www.misalpav.com/comment/860347#comment-860347 या प्रतिसादावर चाललेल्या पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यावा म्हणुन इन्स्टिस्ट्युशनालायझेशनवर (institutionalization) काही लिहिले. ते जरा लांबत गेले. त्या धाग्यावर फार अवांतर होऊ नये यासाठी ते दोन पैश्याचे नाणे इथे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले आहे.

==========================================================

इन्स्टिस्ट्युशनालायझेशन (institutionalization)

पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या संदर्भात इन्स्टिस्ट्युशनालायझेशन ही अत्युच्च पायरी (स्टेज) समजली जाते. ही पायरी गाठलेल्या व्यक्ती / संस्थेशी संबंधीत असलेल्या सर्वच (माणसे, विचार, सेवा, उत्पादन, इ) गोष्टींच्या उच्च प्रतीवर व विश्वासूपणावर लोकांचा डोळे मिटून विश्वास बसतो... व स्वीकार करण्याचा निर्णय करण्यापूर्वी त्याबाबतीत सखोल माहिती घेऊन विचार करण्याची गरज वाटेनाशी होते.

दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, इन्स्टिस्ट्युशनालायझेशन झालेल्या व्यक्ती/संस्थेशी संबांधित सेवा/उत्पादन स्वीकार करण्याचा निर्णय घेताना, लोकांच्या मनात त्या "व्यक्ती/संस्थेच्या तयार झालेच्या प्रतिमेलाच केवळ" महत्व असते... ती व्यक्ती/संस्था कोणती सेवा/उत्पादन देते/बनवते/विकते/प्रायोजित करते या संबंधीचा विचार दुय्यम किंवा बिनमहत्वाचा होतो.

उदा १ : शैक्षणिक क्षेत्रांतल्या आयआयटी, एमआयटी, ऑक्सफर्ड, केंब्रिज सारख्या संस्था :

"वरच्यापैकी एखाद्या संस्थेत प्रवेश मिळतोय, तो घ्यावा का?" असे विचारले तर; कोणत्याही आयआयटी कँपसवर एकदाही पायही ठेवला नाही, तिथे नेमके कोणकोणते विषय शिकविले जातात हे माहित नाही, कोणकोणते प्राध्यापक तेथे शिकवितात हे माहित नाही, असा माणुसही विचारणार्‍याला "हे काय विचारणं झाल?" असे म्हणून वेड्यात काढतो.

उदा २ : उद्योगजगत :

एक काळ तरी असा होता (अजूनही असू शकेल, पण मला अद्ययावत माहिती नाही) टाटा समूहात नोकरी करणे ही अभिमानाची आणि वंशपरंपरागत चालणारी गोष्ट होती.

संगणकिय क्षेत्राच्या सुरुवातीच्या कालात इन्फोसिसमध्ये नोकरी मिळणे "अल्टिमेट" होते, ती कोणत्या प्रकारची नोकरी आहे हे दुय्यम होते.

टाटा समूहाच्या उत्पादनांवर डोळे मिटून विश्वास ठेवला जात असे (बहुतेक आजही बर्‍याच अंशी असावा), आणि त्यात विद्युत उत्पादन, वाहने, मीठ, एअर कंडिशनर... असे विभिन्न प्रकार सामील होतात (टाटा समूहात शंभराच्या आसपास कंपन्या आहेत)... ठप्पा (ब्रँडवरचे नाव) महत्वाचा.

"बॉस, चारचाकी म्हणजे मर्सिडिस, बीएमडब्ल्यु, फेरारी, लंबॉर्घिनी." असे म्हणणार्‍यांपैकी किती जणांनी त्या चालवलेल्या असतात, किंवा त्यांना हात तरी लावलेला असतो, किंवा किमान जालावरून तरी त्यांची स्पेसिफिकेशन्स ताडून पाहिली असतात ?

उगाच नाही, "मर्सिडिस ही गाडी नाही, तर मनाची अवस्था आहे (Mercedes is not a car, but a state of mind !)" अशी ती कंपनी अभिमानाने स्वतःची जाहिरात करत असते !

आयफोनच्या प्रेमात असलेल्या किती ग्राहकांनी स्वतःच्या आयफोनची स्पेसिफिकेशन्स / युजर एक्सपेरियन्स बाजारातल्या इतर असंख्य ब्रँडपैकी एकदोन महत्वाच्या फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सशी / युजर एक्सपेरियन्सशी ताडून पाहिलेली असतात ? किंबहुना, तसे करायचे म्ह्टले तर किती जणांना ते खरेच नीट करता येईल इतपत त्या टेक्नॉलोजीचे ज्ञान असते ?

बर्‍याचदा, कोणत्याही ब्रँडच्या नूडल्स "मॅगी"च असतात, टूथपेस्ट "कोलगेट"च असते, इ, इ, इ.
(हे शेवटचे उदाहरण, "ग्राहकांच्या अज्ञानामुळे कधी कधी इन्स्टिस्ट्युशनालायझेशन हे मूळ कंपनीलाच कसे घातक ठरू शकते" यासाठी दिले जाते ! ... म्हणजे मानसिक प्रतिमा मूळ कंपनीची, पण खप दुसर्‍याच्याच कंपनीचा :) )

उदा ३ : मिडिया, क्रिकेट, इत्यादींमधील सर्वसामान्य लोकांसमोर सतत प्रसिद्धिच्या झोतात राहणार्‍या व्यक्ती :

टॉलिवूड सुपरस्टार रजनिकांत याने मोबाईल, टेलिव्हिजन यांचीच नव्हे तर मातीची जाहिरात केली तरी ती मोठ्या भक्तीभावाने आणि चढ्या भावाने विकत घेऊन रोज कपाळाला लावणारे लोक कोटींच्या संख्येने मिळतील.

पश्चिम भारतात इतकी व्यक्तीपूजा दुर्मिळ असली तरी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ, शेतीतला पाण्याचा पंप, एखादे राज्य (ब्रँड अँबॅसॅडर या नात्याने), पोलिओची लस, इतक्या विविध आणि त्याच्या व्यवसायाशी व एकमेकाशीही असंबंधित असलेल्या गोष्टींची जाहिरात परिणामकारकपणे करू शकतो.

जाहिरातीत सर्वप्रथम दिसलेला क्रिकेटचा लिटिल् मास्टर सुनिल गावसकर रवी शास्त्री, व्हिवियन रिचर्डस् आणि अॅलन बोर्डर हे "विमल" ब्रँडच्या कापडाची जाहिरात करत असत. क्रिकेटचा आणि कापडाचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही हे अडाण्यातल्या अडाण्यालाही माहीत असते... पण त्या जाहिराती त्यांचे काम करून गेल्याच, नाही का ?

याला व्यक्तीपूजा म्हणा की बिनडोकपणा, पण हे वास्तव आहे तोपर्यंत त्या व्यक्तींच्या/संस्थांच्या इन्स्टिस्ट्युशनालायझेशनचा फायदा उठवला जाणारच ! ...till they keep the point of sell ticking !

ग्राहकाचा दीर्घकालीन सर्वोत्तम पर्याय होण्यासाठी प्रथम ग्राहकाच्या मनात भरणे महत्वाचे... आणि ही प्रक्रिया टेक्निकल नाही, तार्किकही नाही, तर मानसशास्त्रिय आहे...

इन्स्टिस्ट्युशनालायझेशची पायरी गाठली गेली की, ग्राहक नकळत सेवा/उत्पादनापेक्षा त्या मागच्या (इन्स्टिस्ट्युशनालायझेशन झालेल्या) व्यक्ती/संस्थेच्या मानसिक प्रतिमेकडे पाहून निर्णय घेऊ लागतो.

असे मानसिक संबंध एकदा प्रस्थापित झाले आणि ते बराच काळ टिकले की मग, काही कारणाने त्या प्रतिमेला धक्का पोहोचला तरी तो धक्का खूप सबळ असल्याशिवाय (काही ग्राहकांच्या बाबतीत तो धक्का सबळ असला तरी) मानसिक प्रतिमेचे त्वरीत/मोठे/दीर्घकालीन नुकसान होत नाही.

धोरणअर्थव्यवहारविचार

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 5:23 am | संदीप डांगे

अतिशय योग्य लिहिलेत डॉक्टरसाहेब!
शंभर टक्के प्रत्येक शब्दाशी सहमत.

मराठमोळा's picture

22 Jul 2016 - 5:47 am | मराठमोळा

तांत्रिक बाबी चांगल्या मांडल्या आहेत. सद्ध्या मोठ्या कंपन्यांमधे हा महत्वाचा संशोधनाचा मुद्दा आहे. बी टु सी मार्केटींग मधे जरा जास्तच. Buyer's psychology गुगलून पहा. असंख्य माहितीपूर्ण लेख सापडतील.

उत्तम लेख. ज्या प्रतिसादावरुन हा लेख आला तो ही वाचुन आले. संदीप भौं चा उत्कृष्ट प्रतिसाद !

पिलीयन रायडर's picture

22 Jul 2016 - 7:46 pm | पिलीयन रायडर

अगदी अगदी!

डांगेअण्णांनी ह्या विषयावर खरं तर सविस्तर लिहायला हवं. कधी कधी मुड येतो तेव्हा मस्त लिहुन जातात ते. जर मेगाबायटी चर्चांनीच त्यांचा मुड लागणार असेल तर त्याचीसुद्धा व्यवस्था करुयात!

म्हात्रे काका, नेहमीप्रमाणेच मुद्देसुद लेख!

बेकार तरुण's picture

22 Jul 2016 - 8:02 am | बेकार तरुण

मस्त लेख
उदा २ चे काही प्रकार आपण सर्रास वापरतो, ते म्हणजे -
बर्‍याच वेळा आपण दुकानात जाउन "कॅडबरी" मागतो,
आणी बर्‍याच वेळा कागदपत्रांची "झेरोक्स" काढतो !!!

रामदेवबाबा व त्यांचे नेपाळी सहकारी ही जोडगळी या ब्रॅन्ड चे उत्तम उदाहरण वाटतात. ग्राहकांना आपण घेत असलेल्या प्रॉडक्टपेक्षा ते विकत असलेल्या रामदेवबाबा वर अधिक विश्वास आहे. इथे काय दर्जा पेक्षा कोण विकतो हे महत्वाचे झालेले आहे. म्हणजे असे की रामदेवबाबाचा साबण आहे तर माझी कांती उजळणारच असा विश्वास ग्राहकाच्या मनावर अधिक प्रभाव करतोय. प्रोड्युसर चा प्रभाव प्रॉडक्ट च्या चिकित्सेला अनुत्सुक बनवतो. शिवाय अजुन एक खोलातली बाब आहे. आयुर्वेद हे मुळ "आपलं, मुळं जुनं खर " ही सर्वसामान्य भारतीयांची नैसर्गिक कलाने जाणारी श्रद्धा त्याला विविध कंपन्यांनी "हर्बल" हा शब्द वारंवार मारा करुन विविध उत्पादने विकुन हा हर्बल शब्द अजुन मेंदुवर यशस्वीपणे ठसवलेला आहे. दुसरीकडे स्वदेशी हा ही शब्द एक विविध संघटना राजकीय कारणे खादी इ. मार्गांनी जनसामान्यात एक विशिष्ट प्रतिष्ठा पावलेला आहे. दोघातही एक फ़रक आहेच स्वदेशी अगदी प्रत्येकाला मोठ्या प्रमाणावर अपील होत नाही विशेषत: तरुणांना मात्र हर्बल च गारुड हे फ़ारच खोलवर झालेल आहे अगदी तरुणांनाही हिरवा रंग हर्बल प्रभावी करतोच. त्यामागे अजुन एक हे "सुरक्षीत" हर्बल= सिक्युरीटी किंवा हर्बल= झिरो साइड इफ़ेक्ट हे ही ब‍र्‍यापैकी ठसलेल आहे. शिवाय भारताची मोठी लोकसंख्या" योगा" या शब्दाची मोठी फ़ॅन आहेच. जॅपनीज चायनीज संस्कृतीतील व्यक्ती जसा कुंग फ़ु कराटे ताइची ला सकारात्मक उत्कट नैसर्गिक प्रतिसाद देईल तसा भारतीय मानस अनेको कारणांनी योगा ला सकारात्मक प्रतिसाद देणार. भारताची लोकसंख्या बहुतांश ग्रामीण आहे रामदेवबाबा चे ग्राम्य असणे, त्याची कितीही गुंतागुंतीचा विषय असेल तर त्याला सोपा करुन (सोडण्याची) मांडण्याची ग्रामीण शैली ही लोकप्रियता वाढवते. ( श्रीश्री हा ब्रॅन्ड तुलनेसाठी बघावा पुर्णपणे अपोझिट आहे शहरी सिटीस्लिकर, मॉर्डन, स्ट्रेस ला उतारा नाव पण इंग्रजी आर्ट ऑफ़ लिव्हींग फ़ुल्ल शहरी अपील ) तर समराइज केल तर इतके पॉप्युलर एलीमेंटस घटक एकत्रित आलेले आहेत. एक एक सेपरेट आहे
आयुर्वेद-योगा-हर्बल-ग्राम्य-स्वदेशी चेहरा-शिवाय साधु संन्यासी ( एक सुप्त भावना याला काय स्वार्थ असणार हा काही स्वार्थी कंपनी सारखा व्यापारी नव्हे )
अस सगळ मिळुन या सर्व घटकांचा एकत्रित इफ़ेक्ट होऊन रामदेवबाबा-नेपाळी जोडगळी स्वत:च सुपर ब्रॅन्ड आहेत. रामदेब बाबा एका इंटरव्ह्यु मध्ये स्वत: म्हणाले मला जाहीरातींसाठी मॉडेल्स्ची गरज नाही फ़ारशी जे येतात ते स्वखुशीने येतात पैसे घेत नाही. बाबा स्वत:च अनेक उत्पादनांची जाहीरात करतांना दिसतात. तरी गंमत म्हणजे एक दोन ठीकाणी एक मॉडेल दिसली होती प्रोफ़ेशनल वाटली. (असाच स्वत:च ब्रॆन्ड असणारा आणि एक एम डी एच चा म्हातारा बाबा ) दुसर रामदेवबाने एक वॉरीयर सारखा स्टॅन्ड घेतलेला आहे डेव्हीड आणि गोलिएथ सारख्यातला मी एक छोटा ग्राम्य पण मी या बलाढ्य मल्टीनॅशनल ला टक्कर देणार तुम्हास वाचवावयास आलेल्या मसीहा सारखा. याच सुप्त कौतुक वाटतच बघा देखो देखो एक अकेला इतने बडे बडे कमीने मल्टीनॅशनल्स को टक्कर दे रहा है बाबा.
त्यात बाबा कॉप्या मारतो हे खपुन जात
भारतीय बाबा प्रॉड्क्ट्स हे सर्वस्वी त्या त्या बाबा ब्रॅन्ड वर विकले जातात. त्यातही एका बाबाचे चेले दुसरा बाबाचे प्रॉडक्ट घेत नाहीत. इतर रेग्युलर कंपनीचे प्रॉड्क्ट घेतांना जो मेंदु चा जो क्रिटीकल एक्जामिनीशेन चा भाग सक्रीय असतो तो बोथट होतो. अजुन महत्वाच म्हणजे हे प्रॉडक्ट जीवन मरणा इतके महत्वाचे बहुतेकदा नसल्याने फ़रक पडत नाही. म्हणजे साबण लावुन कांती उन्नीस बीस उजळली नाही , किंवा बिस्कीट थोडा आवडला नाही फ़रक पडत नाही. म्हणजे चेक न केल्याने तसेही फ़ार जीवन मरणाचा प्रश्न उदभवत नाही.
एक जोकही आहे
गुरु- तो जीने के लिए शांती से जिने के लीए आखिर क्या चाहीये तुम्हे गाडी..?........पॉज बंगला...?.......पॉज बॅक बॅलन्स...?.......... पॉज
चेला- नही गुरुजी मुझे सिर्फ़........आश्रम... विदेशी शिष्यगण और अपनी एक प्रॉडक्ट रेंज चाहीए.
विजय मल्ल्या असाच स्वत: एक ब्रॅन्ड होता त्याने एका मुलाखतीत म्हटलेल होत की भारतात दारुची जाहीरात करायला जी बंधने आहेत. ( हा लय गमतीदार प्रकार आहे राव आडुन आडुन जाहीरात करतांना जाहीरातकारांच्या प्रतिभेला उधाण येत नुसत ) त्याला उपाय म्हणून मी स्वत:च माझ्या उत्पादनांचा जाहीरातदार आहे माझी लाइफ़ स्टाइल माझ जगण हेच माझे प्रॉडक्टची जाहीरात.
हॉस्पीटलचे ही ब्रॅन्ड झालेले आहेत. गेला बाजार ब्रीच कॅन्डी किंवा सध्याचा कोकिलाबेन अंबानी, अपोलो, फॉर्टीस याविषयी आपण प्रकाश टाकावा. ज्या किमतीत इथे सेवा मिळतात ज्या दर्जाच्या त्याच दर्जाच्या सेवा इतरत्रही मिळत असतील ना कमी किमतीत पण नाव नसल्याने फरक पडत असेल का ? म्हणजे ब्रॅन्ड नसल्याने खासगी डॉक्टर एकेकटा उत्कॄष्ठ जरी असला तरी त्याएवजी ब्रॅन्डेड हॉस्पीटल ला पसंती अस काहीस होत असेल का ? म्हणजे मला माहीत नाही काहीच प्रश्न विचारतोय फक

सतिश गावडे's picture

22 Jul 2016 - 9:00 am | सतिश गावडे

लेख आणि हा प्रतिसाद दोन्ही आवडले. अतिशय रोचक माहीती.

मुक्त विहारि's picture

22 Jul 2016 - 10:01 am | मुक्त विहारि

+ १

"हॉस्पीटलचे ही ब्रॅन्ड झालेले आहेत. गेला बाजार ब्रीच कॅन्डी किंवा सध्याचा कोकिलाबेन अंबानी, अपोलो, फॉर्टीस याविषयी आपण प्रकाश टाकावा. ज्या किमतीत इथे सेवा मिळतात ज्या दर्जाच्या त्याच दर्जाच्या सेवा इतरत्रही मिळत असतील ना कमी किमतीत पण नाव नसल्याने फरक पडत असेल का ? म्हणजे ब्रॅन्ड नसल्याने खासगी डॉक्टर एकेकटा उत्कॄष्ठ जरी असला तरी त्याएवजी ब्रॅन्डेड हॉस्पीटल ला पसंती अस काहीस होत असेल का ?"

वैयक्तिक अनुभवावर आधारित माहिती देत आहे.

माझ्या सासूबाईंचे मोतीबिंदूचे ऑपरेशन डोंबोलीला आणि सासर्‍यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन चिपळूणला सामान्य रुग्णालयात झाले. खर्च १०,०००/- कारण एकच त्यांचा मेडीक्लेम न्हवता.

माझ्या सौ.आईचे मोतीबिंदूचे ऑपरेशन पुण्याला झाले.खर्च ६०,०००-७०,०००/-.कारण एकच. तिचा मेडीक्लेम होता.त्या ऑपरेशनचा परतावा म्हणून ५०,०००/- मिळाले. म्हणजे पदरचे १०-२०,०००/- द्यायला लागलेच.म्हणजे इथुन-तिथून खर्च जवळपास सारखाच.

तिन्ही ठिकाणी प्री-ऑपरेशन चेक अप, ऑपरेशनचा कालावधी आणि आफ्टर ऑपरेशन चेक अप, ९०% सारखाच होता.

तिघांनाही ऑपरेशन करून फायदा झाला.

तिघांचीही ऑपरेशन ३ वेगवेगळ्या ठिकाणी झाली.पण आमच्या परिचितांना आमच्या सौ.आईचे ऑपरेशन आम्ही पुण्याला करणार, ह्यात समाधान वाटले.कारण जितका खर्च अधिक तितकी सोय आणि रिझल्ट उत्तम, ही सामाजिक मानसिकता.

ताजा कलम.

माझे खेड-चिपळूणला स्थाईक होण्यामागे, वृद्धापकाळी लागणारी मेडीकल ट्रीटमेंट, हे पण एक कारण आहेच.

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आणि रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात, उत्तम मेडीकल ट्रीट्मेंट मिळते आणि ती पण फार कमी पैशांत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2016 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुवि साहेब, तुमचे म्हणणे सोळा आणे खरे आहे.

मात्र, चिपळूण आणि पुण्यात जागेसाठी होणारा, कर्मचार्‍यांच्या वेतनांसाठी होणारा व रुग्णालयातल्या इतर सोई देण्यासाठी होणारा खर्च यामुळे काही फरक पडणारच आणि त्याचा भार रुग्णाच्या बिलावर पडणारच, ही वास्तविकता आहे. त्याचबरोबर अजून एक वास्तविकता आहे ती अशी...

इन्स्टिस्ट्युशनालायझेशन किंवा सर्वसामान्य मराठीत नाव होणे/असणे याचा व्यवसाय/व्यापारात होणारा महत्वाचा परिणाम्/उपयोग/फायदा असा की, त्या व्यक्ती/संस्थेला आपल्या सेवेची/उत्पादनाची किंमतीत वाढ करता येते (प्रिमियम आकारता येतो) आणि तो जनता कधी आनंदाने कधी कुरबुरत का होईना पण देते.

याची उत्तम उदाहरणे म्हणजे खाजगी शाळा-कॉलेजची मोठी फी, ब्रँडेड लक्झरी वस्तूंची त्यांच्या उत्पादनमुल्यांशी संबंध नसलेली भरमसाठ किंमत, नावाजलेल्या व्यावसायिकांची (वकील, सीए, डॉक्टर, इ.) मोठी फी, इ.

ब़जरबट्टू's picture

22 Jul 2016 - 10:34 am | ब़जरबट्टू

उत्तम प्रतिसाद,
सध्या बाबाजी धूम मध्ये आहेत. पतांजली नुसते काप्या करता सुटलंय. पतांजलीचा खादी शर्ट कैचा येतोय याची वाट बघतोय.. :)

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 10:20 pm | संदीप डांगे

मारवा'जी, प्रतिसाद आवडला. विशेषतः रामदेवबाबा, श्रीश्रींबद्दलचे विश्लेषण अचूक, पैकिच्या पैकी मार्क्स!

बाबा फॉलोअर्स-कम-बायर्स
हे बाबा फॉलोअर्स-कम-बायर्स म्हणजे झोंबीपणाचा उत्कॄष्ट नमुना. ब्रेनवॉशिंग म्हणजे काय हे ह्यांच्याकडे बघून कळावे. बाबा लोक जे काय सांगतील ते डोळे झाकून विश्वास ठेवणार, त्याचा हिरिरीने प्रचारही करणार पण तेच एखाद्या डॉक्टरकडे गेले की हजार शंका विचारणार, त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणार, पैशात चिंधीगीरी करणार, वरुन ह्यॅ, त्याला काय कळतं असं तिसर्‍याला सांगून मोकळे.

सेलिब्रिटी विथ बाबालोक्स
बाकी, जे सेलिब्रिटी येतात ते काही फुकट येत नसतात, देअर इज नो फ्रीलंचेस इन दिस वर्ल्ड हे सूत्र सर्वाकालिक सत्य आहे. कोणाचा कोणाला फायदा झाला हे चाणाक्षपणे पाहिले की समजून येतं. रामदेवबाबासोबत बसून योगा करुन शिल्पा शेट्टीला फायदा होणार नसतो, पातंजलीलाच होतो. शिल्पा शेट्टीचे अटॅचमेंट ही एक अघोषित ब्रॅण्ड एन्डॉर्समेंट आहे. रामदेवबाबा धार्मिक विचारांच्या निम्नमध्यमवर्गीय जनतेला प्रभावित करु शकले, पण तेवढे शहरी कॉस्मोपॉलिटन अपवर्ड मूविंग मध्यमवर्गाला नव्हते. ह्या वर्गातून जेवढी खरेदी होते तेवढी इतर कोणत्याच वर्गातून होत नाही. ह्या मध्यमवर्गाला कनेक्ट करता येईल अशी एखादी सेलिब्रिटी हवीच होती. शिल्पा शेट्टीची प्रतिमा अल्ट्रामॉडर्न तरी घरेलु भारतीय संस्कार जपणारी (नीट लग्न करुन सेटल झाली), भारतीयपणात विश्वास ठेवणारी अशी आहे. त्यात ती योगा-बिगाच्या सिड्या काढते. लग्न झालेल्या, तीशी-पस्तिशीतल्या (फायनांशियली स्टेबल, अपवर्ड मूविंग) सुशिक्षित कॉस्मोपॉलिटन गृहिणींसाठी ती रोल मॉडेल आहे. तीला किंवा इतर तत्सम सेलिब्रेटीजना बाबांच्या व्यासपिठावर, आसपास बघणे 'सोची समझी चाल' असते.

दारु दारु
तसेच माल्ल्याच्या लाइफस्टाईल प्रदर्शनाचा किंगफिशरला नक्की किती फायदा झाला त्याबद्दल माहित नाही. पण भारतीय चित्रपटांमधून हल्ली गेल्या पाच-सहा वर्षात प्रोडक्ट-प्लेसमेंट, आईडिया-प्लेसमेंट चे जे प्रकार घडू लागले त्याने निश्चितच दारुच्या विक्रीस (व टॅबू कमी होण्यास) हातभार लावला आहे. गेल्या काही वर्षातली गाणी, पार्टीसॉण्ग्स बघितले तर हे वीकेंड लाइफस्टाईलचे थेट तर अल्कोहोल ड्रिंकिंग चे छुपे जाहिराततंत्र आहे असे लक्षात येईल. त्यात मध्यंतरी '२५ वर्षाखालील मुलांनी दारु पिऊ नये' ह्या कायद्याविरूद्ध इमरान खान ह्या कवळ्या पोराने (आमिरखानचा भाचा) सोशल अवेरनेसच्या नावाखाली कॉलेजीयन पोरांना दारु पिण्यास उकसवण्याचा प्रकार केला होता. तसे पाहिले तर हा कायदा फार जुना आहे, कोणाला माहितही नाही, पोरं सर्रास पितातच, तरी जे काही शामळू आहेत उरलेले, त्यांना उकसवण्याचा प्रकार होता.

डॉक्टर की हॉस्पिटल

गेल्याकाही वर्षात नवसंपन्न उच्चमध्यमवर्गाला पैसे टाकून सेवा विकत घेता येते हा काहीतरी भलता शोध लागलाय. त्यात 'सरकारी इस्पितळे म्हणजे टॉर्चररुम्स' अशी लहानपणापासून, आज्यापणज्यांपासून बिंबवलेली गोष्ट. त्यामुळे आजारी पडलं, दवाखान्यात भरती करायला लागलं तर अगदी सर्व काळजी नीट घेतल्या जाईल अशा हॉस्पिटलांची गरज होतीच. शस्त्रक्रियापूर्व-शस्त्रक्रियेपश्चातच्या आरामात, रिकवरीमधे कोणताही किंतु-परंतु राहू नये म्हणून दामदुप्पट पैसा मोजायची तयारी असल्यावर अशी महागडी हॉस्पिटल्स निघणारच. वरिलपैकी कोणत्याही हॉस्पिटलचा लौकीक नक्की काय आहे? आजारी लोकांचे बरे होण्याचे प्रमाण? तिथे रुजू असणार्‍या डॉक्टरांची ख्याती? उत्तम उपचार मिळण्याची हमखास खात्री? ह्यापैकी काहीही नाही. ते फक्त लग्जरी हॉस्पिटल्स आहेत. बरेच डॉक्टरांची ख्याती 'अहो, ते फोर्टीसमधेही विजिट करतात' (म्हणजे ते चांगलेच असले पाहिजेत) अशीही ऐकलीये. शस्त्रक्रिया काय जशा सरकारी मध्ये होतात तशाच इथेही होतातच. पण जसे डॉक्टरसाहेबांनी म्हटले तसेच केम्ब्रिज, आयआयटीला जे ग्लॅमर आहे तेच ह्या हॉस्पिटलांना लागू होते.

चू.भू,दे,घे.

लेख आणि मारवांचा प्रतिसाद आवडलेच.डांगेंचा प्रतिसादही वाचून आले.आवडला.

चौकटराजा's picture

22 Jul 2016 - 9:41 am | चौकटराजा

आता बजाज अटो चे उदाहरण घ्या व ओ पी नय्यर यांचेही घ्या. एकात मी नोकरी केली आहे व दुसर्‍याचा मी चाहता आहे.
बजाज ची गाडी म्हणजे प्रश्नच नाही असे आपण म्हणत होतो. त्यास दोन कारणे होती. त्यांच्या पेक्षा चांगला पर्याय उपलब्ध नव्हता व त्यांची उत्पादने देखणी नसली तरी टिकाउ होती, मेंटेनस ला सोपी. त्याच बजाजची सफायर स्पिरिट, सनी एस एक्स एन्ड्युरो ही उत्पादने सपशेल पडली. तेंव्हा ग्राहक शेवटी उत्पादनालाच महत्व देतो फार काळ मार्केटिंग ची फसवणूक, स्कीम ई चालत नाही.

आता ओ पी नय्यर हे गुणी , जादुई संगीत देणारे संगीतकार. त्यांच्या चाहत्यांवर ते २००७ साली गेले तरी आजही गारूड आहे. पण जिथे त्यांच्या संगीताची भट्टी जमली नाही ते संगीत त्यांच्याच चाहत्यानी पुरते फेकून दिलेले आहे. उदा त्यांचा
बसंत हा चित्रपट॑ वा त्यांचा कैदी हा॑ चित्रपट( यातले कुछ तो ऐसी बात हे अप्रतिम गीत मात्र आजही ऐकले जाते ).
.
एक माणूस॑ मला भेटला होता. त्याचे साजुक तुपाचे उत्पादन होते व ते चितळे यांच्या ब्रॅन्ड खाली विकले जात असे. पण त्या तुपाची गुणवत्ता ही " चितळे" या नावाला साजेशी आहे तो पर्यंतच ते चालेल. नाहीतर सोनी या कंपनीने उघडपणे द्युप्लिकेट सोनी कॅसेट एकेकाळी काढावयास परवानगी दिल्याचे स्मरते पण त्याची गुणवत्ता सोनी सारखीच असेल अशी अट सोनीने टाकली होती म्हणे. प्रत्येक तंत्राचा एक जमाना असतो. २१ व्या शतकात जाहिरात क्षेत्रापेक्षा ग्राहक मुख प्रशंसा हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. ऑनलाईन खरेदीत मालाचे ग्राहकांकडून मुल्यांकन करण्यास सुरूवातही झाली आहे.

सर्वात शेवटी मोदी हा ब्रॅन्ड दुसरा पर्याय नसेल तरच पुन्हा नाईलाजास्तव येईल एरवी हा" ब्रॅन्ड" न्यायव्यवस्था, निवडणूक सुधारणा, भ्रष्टाचार नियंत्रण , महागाई नियंत्रण यात फेल होत चालला आहे यावर एकमत व्हावे. गोबेल्स डू नॉट प्रिव्हेल फॉर एव्हर.

मी-सौरभ's picture

22 Jul 2016 - 10:38 am | मी-सौरभ

सर्वात शेवटी मोदी हा ब्रॅन्ड दुसरा पर्याय नसेल तरच पुन्हा नाईलाजास्तव येईल एरवी हा" ब्रॅन्ड" न्यायव्यवस्था, निवडणूक सुधारणा, भ्रष्टाचार नियंत्रण , महागाई नियंत्रण यात फेल होत चालला आहे यावर एकमत व्हावे. गोबेल्स डू नॉट प्रिव्हेल फॉर एव्हर.

अब आयेंगे प्रतिसाद पे प्रतिसाद

हेमन्त वाघे's picture

22 Jul 2016 - 1:12 pm | हेमन्त वाघे

सोनी या कंपनीने उघडपणे द्युप्लिकेट सोनी कॅसेट एकेकाळी काढावयास परवानगी दिल्याचे स्मरते पण त्याची गुणवत्ता सोनी सारखीच असेल अशी अट सोनीने टाकली होती म्हणे.

हे केव्हा झालेले ? काही पुरावा ?
मला ही तुम्हाला कोणीतरी मारलेली थाप वाटते .. सोनी बरोबर मे कधी काळी काम केले आहे आणि ब्रॅण्ड वळून साठी ही कंपनी वेडी आहे !

चौकटराजा's picture

22 Jul 2016 - 1:28 pm | चौकटराजा

अर्थात मी ऐकलेली गोष्ट आहे १९७७ चे सुमाराची. तेंव्हा आज पुरावा देणे शक्य नाही. पण जिला ही परवानगी देण्यात आली होती ते कंपनी सिंगापूर की हॉंगकॉग बेस्ड होती असे आठवते.

असं सगळ्याच कंपन्या करतात. मॅकडाॅनल्ड्स संपूर्ण जगात फ्रँचाईज पद्धतीनेच आपली restaurants चालवतात. LEE JEANS नी भारतात अरविंद मिल्सला license दिलेलं आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2016 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

अश्या लायसेंस घेऊन ठरविक प्रतीचे उत्पादन करून ते मूळ कंपनीला पुरवणार्‍या कंपन्यांना "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणतात. ही एक उत्पादन खर्च वाचविणारी जगभर वापरली जाणारी प्रणाली आहे. यात तयार होणारे उत्पन्न "ड्युप्लिकेट" नसते तर "ओरिजिनल"च असते व ते मूळ कंपनी स्वतःच्या नावानेच विकते :)

मूळ कंपनी व OEM कंपनीतल्या कर्मचार्यांचे पगार व इतर भत्ते यातला फरक पाहिला तरी; त्याच प्रतीचे तेवढेच उत्पादन करण्यासाठी मूळ कंपनीला बराच जास्त खर्च येतो हे सहज ध्यानात येईल.

त्यात (अ) लहान आकाराच्या कंपन्यांना करावे लागत नाहीत पण मोठ्या कंपन्यांत आवश्यक असतात असे इतर खर्च व (आ) मूळ कंपनीचा लँड-प्लँट-मशिनरीचा वाचलेला खर्च धरला तर या प्रणालीचा फायदेशीरपणा अजूनच वाढतो.

भारतात असे खूप OEM आहेत जे अनेक युरोपियन आणि अमेरिकन ब्रँड्ससाठी काम करत आहेत.

ब़जरबट्टू's picture

22 Jul 2016 - 2:09 pm | ब़जरबट्टू

अश्या लायसेंस घेऊन ठरविक प्रतीचे उत्पादन करून ते मूळ कंपनीला पुरवणार्‍या कंपन्यांना "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणतात. माझ्या मते ते Tier 1, Tier 2.
"ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणजे मारुती, व्हिडिओकॉन, टाटा, व याला ओरिजनल पुरवणारे Bosch , Magneti , हे सर्व Tier 1 , 2

चांगला वेगळा लेख आणलात यात सर्वजण मत मांडतीलच.
त्या धाग्यावर " स्टार व्हॅल्यु नाही" या वरून चर्चा सुरू झाली.मला जे सचीनबद्दल म्हणायचं होतं तो अर्थ 'स्टारव्हॅल्यू'तून बरोबर निघाला नाही.मग टका याने "कैच्या कै काका--" लिहिले.उगाच लेखी टीका करण्यात अथ नव्र्हता.असो.हा लेख वेगळा विषय हाताळतोय.

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 10:15 pm | संदीप डांगे

काका, टकाच्या त्या प्रतिसादाचे वैट वाटून नका घेऊ, तुमच्या प्रतिसादामुळेच एवढ्या चांगल्या विषयाला वाचा फुटली आहे.

कंजूस's picture

22 Jul 2016 - 10:44 pm | कंजूस

लेखी टीका टक्यावर अथवा त्याच्या प्रतिसादावर नव्हे तर सचीनच्या वागण्या बोलण्यावर करण्यातून काहीच निष्पन्न होणार नाही आणि थांबलो.

ब़जरबट्टू's picture

22 Jul 2016 - 10:30 am | ब़जरबट्टू

लेख आवडलाच.
दुर्दैवाने स्वदेशी ही मानसिकता भारतामध्ये कमी आहे. जपान सारख्या देशात 'स्वदेशी' ची ब्रॅण्ड व्हॅल्यु बाकी सर्व गुणवत्तेच्या वर आहे. हा विश्वास अथवा अशी मानसिकता भारतात नाही. विदेशी, अमेरिका असल्यावर डोळे झाकून ते मस्तच असे मानून विकत घ्यायची मानसिकता आहे. त्यामुळे "मेड इन " हा सुध्दा एक ब्रॅण्डव्हॅल्युच.
दुसरी एकदा डोक्यात ब्रॅण्ड व्हॅल्यु घट्ट बसली, की ती धुता धुता जात नाही. म्हणूनच आता मारुतीच्या टिनपाट गाड्या भाव खाऊन जातात, व टाटाच्या कितीही सुधारित आवृत्या आल्यात तरी मार खातात, अर्थात खरा विचारी हा भाग बघतोच, पण शेवटी लोग क्या कहेंगे ही भीती त्यालाही आहेच.

हेमन्त वाघे's picture

22 Jul 2016 - 1:18 pm | हेमन्त वाघे

आता मारुतीच्या टिनपाट गाड्या भाव खाऊन जातात, व टाटाच्या कितीही सुधारित आवृत्या आल्यात तरी मार खातात,

मारुतीच्या टिनपाट गाड्या कोणत्या ? त्या आपल्याला का टिनपाट वाटतात ? त्यातुलनेने टाटा ने कै महान गाड्या काढल्या?

आपण टाटा ची गाडी घ्याल गेला आहेत का? शास्प सेल होत असताना पण सेल्समन चा नकारार्थी बाणा आणि विकण्याचा कंटाळा अवर्णनीय असतो
आणि
तेच मारुती किंवा ह्युंडई मध्ये सर्वाधिक खप असतानाही individual attention खतरनाक असते

टाटा चे विक्रीपासच्यात सेवा आजही सुधारली नाही ,आणि त्यात अनेक वाहनांची सामान्य गुणवत्ता - मग काय सांगावे ??

ब़जरबट्टू's picture

22 Jul 2016 - 1:43 pm | ब़जरबट्टू

तुम्ही टाटा च्या गाड्या बद्दल बोलले, हे कोणत्या सालातले ? का शेवटी ऐकीव माहितीवरूनच बोलताय. ? म्हणजेच ठरलेली मानसिकता.. तुमच्या डोक्यातच जरा टाटांची प्रतिमा तशी बनली असेल, तर नाईलाज आहे, अर्थात त्यांची तेव्हाची सेवा तशीच होती. पण मागील 3-5 वर्षात परिस्थिती बदलली आहे. 5 व्या नंबर पर्यंत फेकल्या गेल्यावर ब-याच सुधारणा झालेल्या आहे. मुख्यतः JLR मुळे इंजिनियरिंग मध्ये बरीच सुधारणा आहे. झेस्ट आणि टियागो मला तरी स्पेसिफिकेशन वर ब-याच Value फॉर Money वाटल्या.
मारुती टिनपाट गाडयांचा बनवतोय. त्यांच्या गाड्यांचे शीट-मेटल जाडी मिनिमम लेव्हल ला आहेत. आताच बनलेली बॅलेनो फक्त 800 किलो.. कसे जमले असेल ? शेवटी क्वॅलिटीशी प्रताडना होते हो. .. या क्षेत्रात असल्यामुळे काय होत असते ते महित आहे. वर वर सगळे चमकदार असते.. साधा लो स्पीड इम्पॅक्ट सहन नाही करू शकता मारुतीची गाडी.

सहमत! मारूती/ह्युंदाई/होंडा म्हणजे लै भारी हा गैरसमज दूर होणं अतिशय आवश्यक आहे. बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत नवीन टाटा कार्स वरील कार्सपेक्षा नक्कीच चांगल्या आहेत. हाच लेखाचा मुद्दा आहे..

लेख उत्तम!

हेमन्त वाघे's picture

22 Jul 2016 - 6:15 pm | हेमन्त वाघे

गाड्या बऱ्याच चांगल्या असू शकतात

पण सेवा?
माझा विक्री चा अनुभव तर गेल्या वर्षीचा आहे - बायकोबरोबर इकडं तर बघू या म्हणून गेलो होतो - अतिशय उदास लोक
त्याआधी 3 वर्षांपूर्वी नॅनो बघायला गेलो होतो - त्यावेळी तर अजून वाईट अनुभव - डिसइंटरेस्टेड सेल्समन ! ( हे वाशी - नेरुळ ला झाले ) नंतर मी बजेट वाढवून फुल्ली लोडेड ह्युंदाई Eon घेतली - गाडी 4-6 तासात भरलेल्या सर्विस सेन्टर मध्ये परत मिळते !
अजून ऐक होंडा Amaze आहे , तिचा अनुभव अजूनच चांगला आहे .

टीम-BHP वर नेहमीच टाटा च्या गाडीचये वाईट अनुभव येत असतात .. आणि हो विक्री ही तशीच आहे .

टाटा देशात आता पाचव्या क्रमांकाची गाडी कंपनी आहे - कधी काडी सहाव्या किंवा सातव्या ( होंडा आणि रेनॉ ही अनेकदा पुढे असतात )

 photo Car Sales Figures_zpsqznvzevk.jpg

संदर्भ - http://www.team-bhp.com/forum/indian-car-scene/177998-june-2016-indian-c...

स्मिता.'s picture

22 Jul 2016 - 7:31 pm | स्मिता.

वरची चर्चा वाचून आठवलं 'टाटा नॅनो' ही अशीच हिणवली गेलेली गाडी! अर्थात सुरूवातीचे मॉडेल्स चांगले नव्हतेच अश्याही बातम्या वाचल्या आहेत. शिवाय इतर गाड्यांच्या मानाने कमी किंमत असल्याने ती दारापुढे उभी असल्याने 'स्टेटस' वाढण्यापेक्षा कमी होईल अशीच भावना अनेकांच्या मनात निर्माण झालेली होती. गाड्यांबद्दल ओ का ठो कळत नसल्याने मी सुद्धा थोडाफार तसलाच विचार करायचे.

पण गेल्या वर्षी ३ महिने बंगलोरला असतांना ऑफिसांच्या भल्यामोठ्या पार्किंगमध्ये तसेच सदनिकेच्या पार्किंगमध्ये अनेक 'टाटा नॅनो' उभ्या दिसायच्या. या गाड्या आकाराने लहान असल्या तरी बर्‍यापैकी चकाचक दिसत. ते बघून त्यांची 'लो स्टेटस' ही प्रतिमा हळूहळू धुसर होत होती. काही लोकांशी याबाबत चर्चा केल्यावर सगळ्यांचं थोडक्यात एकच मत होतं की टाटाने नॅनोच्या नव्या मॉडेल्समधे बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. शिवाय बंगलोरसारख्या शहरात कायम ट्रॅफिकचा प्रश्न असतो. अश्यावेळी लहान गाडी सोयिस्कर वाटते आणि जवळपासच्या प्रवासालाही चालून जाते. महागड्या दुचाकीच्या किमती बघता त्याला आणखी थोडे पैसे जोडून सरळ चारचाकीच घेता येते हा व्यवहारीक विचारही आहेच. त्यामुळे बर्‍याच मध्यमर्गीय लोकांनी तिची निवड केली आहे.

या अशा धाग्यावर कॉपी पेस्ट बहाद्दर पुमुंग्रापं का येत नाहीत?

नाखु's picture

22 Jul 2016 - 11:48 am | नाखु

त्यांना उत्तरे/स्पष्टीकरण द्यावे लागणार आणि त्यात अमूल्य वेळ जाणार.

तेव्हढ्या वेळात पाच-दहा खटल्यांचा "निकाल" लागेल की,तीच बाब संघटनेच्या बाबांसही लागू है, पण असे बोललो की आम्हाला असंवेदनशील वगैरे चालू होते म्हणून वाचकांची पत्रे मध्येच थांबावे असे वाटते.

वाचकांचीही पत्रे वाला नाखु

सस्नेह's picture

22 Jul 2016 - 11:08 am | सस्नेह

शब्दाशब्दाशी सहमत !
एकूणच समाजाच्या मानसिकतेवर 'इमेज'चा पगडा जास्त असतो. 'महाजन' जातील त्या पंथात सगळे सामील होत असतात. इतकेच नव्हे तर, त्यापेक्षा वेगळा मार्ग धरणाऱ्याचे हसू होते.
'इन्स्टिस्ट्युशनालायझेशन' चा अनुभव सध्या येतो आहे. नामवंत इन्स्झ्टिट्यूट्स मधल्या शिक्षणाच्या दर्जाची चौकशी कुणी करताना दिसत नाही.
काही वेळा 'नाम बडे और दर्शन खोटे' असाही अनुभव येतो.

मारवा's picture

22 Jul 2016 - 11:51 am | मारवा

एकूणच समाजाच्या मानसिकतेवर 'इमेज'चा पगडा जास्त असतो. 'महाजन' जातील त्या पंथात सगळे सामील होत असतात. इतकेच नव्हे तर, त्यापेक्षा वेगळा मार्ग धरणाऱ्याचे हसू होते.
अतीसहमत एकदा एका व्यक्तीची इमेज काही वर्षांच्या सतत एकांगी मार्‍याने ठसली चांगली / वाईट की त्या विरोधात बोलतांना फारच मोठा विरोधाचा सामना करावा लागतो पुराव्यांची आग्रही मागणी, दिलेल्या पुराव्यांना नाकारण्याची ओढ, अविश्वसनीयता, हेतु वर संशय वगैरे सगळच होत. कॉग्नीटीव्ह डिसोनन्स चा प्रभाव. पण मग सत्य कुठे तरी झाकोळल जात. त्यामुळे दिखावे पे मत जाओ ती एक जाहीरात होती हे लक्षात ठेवाव लागत
मागे एक अ‍ॅड होती " फॉलो युवर इन्स्टींकट्स" ची तसे. आणि एक टॅग लाइन " इम्पॉसीबल इज नथींग " अंडर द सन काहीही शक्य आहे याचे भान बाळगले पाहीजे.

सविस्तर लेख अन तसेच प्रतिसाद अवडले!
छान माहिती...
एक चिल्लर दुरुस्ती.
विमल ची जाहिरात शास्त्री, अजित वाडेकर अन विव्ह रिचर्ड्स करत असल्याचे आठवते. गावसकर त्यांचे प्रतिस्पर्धी दिनेश ( अरविंद मिल्स) यांच्या सुरेख जाहिरातीतून दिसत.

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 11:34 am | अभ्या..

येस. टेक द वर्ल्ड इन योर स्त्राईड अशी जिंगल होती.
आय थिंक गावसकर त्यावेळी निरलोनचे एमप्लॉयी होते.

बेकार तरुण's picture

22 Jul 2016 - 11:47 am | बेकार तरुण

अजित वाडेकर नसावे, बहुतेक अ‍ॅलन बोर्डर होता (नक्की आठवत नाही, पण वाडेकर नक्कीच नव्हते)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2016 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरोबर आहे तुमचे. लिहिण्याच्या ओघात का कुणास ठाऊक "ओन्लि विमल" मध्ये गावस्कर पाहिल्यासारखे आठवले... ती गोष्ट तीन चार दशके जुनी असल्यामुळे क्रिकेटरच्या नावात गडबड झाली खरी :(

बेकार तरुण's picture

22 Jul 2016 - 3:24 pm | बेकार तरुण

थोडसं आवांतर -
पुर्वी गावसकर एल आय सी किंवा तत्सम बचत योजनेची जहिरात करायचा. १०,००० धावांचा विक्रम केल्यानंतर
(मी आज १०,००० धावा केल्या आहेत, पण त्यातली एक एक धाव जोडतच १०,००० ला पोचता आलं असा काहीसा आशय होता)
कोणाला आठवते का ही जहिरात. एकदम अ‍ॅप्ट मॉडेल आणि टायमिंग होतं

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 1:58 pm | बोका-ए-आझम

शास्त्री, रिचर्डस् आणि अॅलन बाॅर्डर विमल suiting and shorting चे brand ambassador होते. एका आख्यायिकेनुसार विमल हे धीरूभाई अंबानींच्या पुतण्याचं नाव होतं. त्याच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांचा व्यवसाय भरभराटीस आला म्हणून धीरूभाईंनीही तेच नाव आपल्या brand साठी वापरलं. त्यांच्या साड्यांच्या जाहिरातीतली copy आवडल्याचं आठवतं - A woman expresses herself in many languages, VIMAL is one of them.

डिश टिव्हीची जाहिरात शारुख करतो म्हणून अथवा इतरांची तमुक कलाकार करतो म्हणून कोणी सर्विस घेत नाही.उलट मी म्हणेन ते पन्नास कोटी इकडे वळवा व सब्सक्रिप्शन स्व स्त करा.

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 12:18 pm | अभ्या..

करू द्या ओ कंकाका, त्याला काढले तर व्हिडिओकोन वाले बारक्या बच्चनला पण काढतील. त्याने काय करावे बिचाऱ्याने. आता तर आयडिया पण नाही. धूमची वाट बघत बसावे का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2016 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

कंजूस साहेब,

भारतात सद्या तरी जाहिरातीत कोण स्टार आहे याचा विक्रीवर लक्षणीय प्रभाव पडतो. नाहीतर त्यांच्या व्यवसायाशी संबंध नसलेल्या उद्योगांच्या जाहिरातींसाठी क्रिकेटस्टार्स किंवा सिनेस्टार्सशी अनेक दशकोटींचे करार झाले नसते.

जनता स्टार्सच्या मागे पागल असली तरी योग्य परताव्याची शक्यता असल्याशिवाय खाजगी उद्योग कधीच पैसा खर्च करत नाहीत. ग्राहकाला प्रत्यक्ष डिसकाऊंट देऊन हवा तेवढा फायदा मिळत असता तर कोणताच शहाणा उद्योग स्टार्स घेऊन केलेल्या जाहिरातवर खर्च करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न (? द्रविडी प्राणायाम) करणार नाही.

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 1:49 pm | बोका-ए-आझम

डव्हने हे सिद्ध करुन दाखवलंय की celebrity नसण्याने काहीही फरक पडत नाही. आमचे ग्राहकच आमचे brand ambassador आहेत.
काही products, उदाहरणार्थ washing powder, celebrity ना वापरू शकत नाहीत, कारण परिणाम उलटा होऊ शकतो. एवढी सुंदर अभिनेत्री स्वतः थोडेच कपडे धुवत असेल - हा विचार ग्राहकांच्या मनात येतो. त्यामुळे विश्वासार्हता, जी कुठल्याही brand साठी आवश्यक आहे, तीच राहात नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2016 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

१००% टक्के वेळेला सेलेब्रिटी वापरून केलेली जाहिरात उपयोगी होईलच असे मी कधीच म्हटले नाही. त्याचबरोबर नॉन-सेलेब्रिटी नायक-नायिका घेऊन जाहिराती बनत नाहीत असेही नाही.

मी वर असे म्हटले आहे की, "सेवा/उत्पादनाचा खप वाढवायला, सद्याच्या घडीला भारतात तरी, सेलेब्रिटीचा व्यवसाय आणि त्याने जाहिरात केलेला ब्रँड यांचा अर्थाअर्थी संबंध असलाच पाहिजे" असे व्यवहारात बर्‍याचदा दिसत नाही. हे सर्वसाधारण पुस्तकी विपणन ज्ञानापेक्षा वेगळे आहे. :)

थोडक्यात, "काय करावे" याबद्दल नाही तर "वस्तूस्थिती काय आहे" याबद्दल ती विधाने होती.

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 2:21 pm | बोका-ए-आझम

पण आता थोडा बदल व्हायला लागलेला आहे - डव्हने म्हणजे पर्यायाने युनिलिव्हरसारख्या मोठ्या कंपनीने केलेला आहे. त्यामुळे बाकीच्या कंपन्या अनुकरण करण्याची शक्यता आहे. शेवटी nothing succeeds like success. आणि शिवाय celebrity ना द्यावा लागणारा पैसा हाही मुद्दा आहेच. जर सामान्य लोकांना वापरून तो वाचवता येत असेल, तर कंपन्या ते करतीलच.

राहणार व मिनीमम अ‍ॅडव्हरटाय्झींग वर ही अनेक वर्षे टिकुन राहीलेल्या ब्रॅन्ड च एखाद उदाहरण देता
येइल का बोकोबा.
मिनिमम अ‍ॅड मॅक्झीमम ब्रॅन्ड
मला लय डोक खाजवुन जिन्दा तिलीस्मात च आठवतय सारख नायतर बिटको मंजन.
तुम्ही सांगा एखाद उदाहरण

आदूबाळ's picture

22 Jul 2016 - 8:03 pm | आदूबाळ

गाय छाप

बेकार तरुण's picture

22 Jul 2016 - 8:09 pm | बेकार तरुण

गाय छाप >> लोल
बाटाची पायताणं???
पॉवर वगैरे ब्रँड्स च करतात मार्केटिंग, पण बाटाची फार जहिरात पाहिली तरी नाही (टी.व्ही. वर वगैरे); किमान १०० वर्षे तरि जुना ब्रँड असावा

गाय छाप
बस नाम ही काफी है
काय जबर स्वदेशी ब्रँड आहे हा
जबर ब्रॅन्ड परफेक्ट आन्सर

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 10:15 pm | अभ्या..

येस्स. परफेक्त. आणि मला आठवतेय तसे त्यांनि 1990 नंतर जाहिरात केलीच नसेल. आधी स्टँडवर बोर्ड तरी दिसायचे दामोदर जगन्नाथ मालपाणी नावाने. इतक्या वर्षात ना पांढर्या कागदावर हिरव्या एकाच रंगात छापलेली गाय बदलली ना तिची धार काढणार्या माणसाची चट्टेरी पट्टेरी चड्डी बदलली. पॅकिंगवर 60 टक्के वोर्निंग छापायाच्या नियमातून त्यांनी रॅपर हे सील आहे असे दाखवून पळवाट काढली पण पाकिटाचे मूळ दृश्य बदलू दिले नाही.
ह्या ब्रॅण्डवर आमच्या कुणी एका सहाध्यायाने प्रोजेकट केलेला स्मरतो. माझी पन इच्छा होती. गावचा किसान ब्रँडप्रेम आडवे आले ;)

तुमच्या प्रोजेक्ट विषयी सांगावे

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 11:03 pm | अभ्या..

नवनीत.
मला जास्त लिहायचा कंटाळा आहे. लिहीन मूड असला कि अवश्य.

हेमन्त वाघे's picture

22 Jul 2016 - 8:11 pm | हेमन्त वाघे

ओल्ड मॉंक

सेलेब्रिटीचा व्यवसाय आणि त्याने जाहिरात केलेला ब्रँड यांचा अर्थाअर्थी संबंध असलाच पाहिजे" असे व्यवहारात बर्‍याचदा दिसत नाही.

अंहं, अंहं.
तो हिशोब वेगळा आहे. पांढरे अ‍ॅप्रन घालून कोलगेटची अ‍ॅड करणे, किंवा एखाद्या प्रसिध्द डेंटिस्टने सेन्सोडेंट ची अ‍ॅड करणे ह्यापेक्षा पूर्ण वेगळा विषय.

सेलेब्रिटीमध्ये पण अजून एक खासियत भारताची. लोकल जाहीराती (स्टेटवाइज) तिथेले मॉडेल्स अन बॅक्ग्राउंडस वापरतात. म्हणजे मराठी जाहीराती मुंबईत शूट होतात मराठी कलाकार घेऊन. पण मोठ्या ब्रॅन्डच्या जाहीराती मात्र एकच हिन्दी करुन त्या इतर भाषेत डब व्हायच्या. उदा. शीतपेये, सोप्स अँड डिटर्जंट्स, ऑटोमोबाईल्स. आता मात्र ह्यांच्या पण जाहीराती लोकल स्टार्स घेऊनच होतात. मराठीवर नेहमीप्रमाणेच अन्याव आहेच पण हिंदी थम्सप सलमान असेल तर तेलुगु थम्सपला महेशबाबू आहे. सध्या रामचरण आहे का माहीत नाही. हिरोला इकडे रणबीर कपूर असला कि तिकडे अल्लू अर्जुन असणार. पॅरागॉन चप्पलच्या बॉक्सवर सुध्दा कर्नाटक पॅकिंगवर पुनीतराज, तेलुगुवर महेशबाबू आणी हिंदीवर अजयदेवगण असतो. स्टारव्हॅल्यु अशी पण एरियावाईज चेंज होत असते.

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 2:28 pm | बोका-ए-आझम

की मराठीतल्या कुठल्याही star ला महेशबाबू किंवा अल्लू अर्जुनएवढी star value नाही. एकाच मुंबईत मराठी आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीज आहेत आणि हिंदीचं पारडं भारी आहे. आवडलं नाही तरी ही वस्तुस्थिती आहे. क्रिकेटर्समध्ये बरेच मराठी आहेत - पण त्यांना घेऊन मराठीत जाहिराती झाल्या का? सचिनच्या मराठी जाहिरातींमध्येही त्याचा आवाज चेतन शशितल किंवा प्रसाद फणसे हे dubbing artistes काढतात, त्याचा स्वतःचा आवाज नसतोच. राहुल द्रविड आणि झहीर खान चांगलं मराठी बोलतात, पण त्यांना घेऊन कोणी मराठीत जाहिरात केल्याचं आठवत नाही.

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 2:27 pm | अभ्या..

डव्हचा युएसपी वेगळा आहे. त्यांना फिल्मी सौन्दर्यापेक्षा जास्त मॉईष्चर प्रमाणाचा अ‍ॅक्चुअल फील कसा वाटतो हे डोमिनेट करायचेय. आणि तेच वेगळेपण इतर साबणापेक्षा कसे आहे ते प्रुव्ह करायचेय. ते वापरणार नाहीतच सेलेब.

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 2:34 pm | बोका-ए-आझम

पण त्यांनी beauty soap म्हणजे चित्रपट अभिनेत्री याला छेद दिला हे तर खरं आहे की नाही? मला तर वाटतं की त्याच्यामागचा एक हेतू Dove ला Lux पासून (जो सरळसरळ स्वतःला फिल्मी सितारोंका सौंदर्य साबुन म्हणवतो) वेगळं दाखवणं किंवा ज्याला branding च्या परिभाषेत differentiation म्हणतात - तोही होता. शेवटी दोन्ही एकाच कंपनीचे आहेत. लक्ससाठी लीला चिटणीस या पहिल्या अभिनेत्री होत्या model म्हणून - १९३८ साली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत जी कुणी नवीन अभिनेत्री येते तिने Lux endorse केलेला आहे. त्यापासून Dove ला वेगळं प्रस्थापित करणं हा युनिलिव्हरचा सामान्य माणसं वापरण्यामागचा हेतू असू शकतो.

नाही पटत.कारण या कंपन्यांचा नफा फार असतो तो शेअर होल्डरांशिवाय वैयक्तिक मिळण्यासाठी डाइरेक्टरांच्या खासगी जैरात कंपन्यांना कंत्राट देऊन डाइवर्ट करतात.आपण ज्या भंकस जाहिराती बघतो त्याचे कारण हेही असते.त्यात कशीही वाइट जाहिरात दिली तरी काम त्यानाच मिळणार असते.

बेकार तरुण's picture

22 Jul 2016 - 3:21 pm | बेकार तरुण

???
एम एन सी बद्दल हे विधान आहे का?
ते लोक प्रॉडक्ट इतकच जहिरातीबाबत सजग असतात अस मला वाटायच. पण इतक्या सहज खाबु गिरी करण्यासाठी जहिरात करतात अस वाटत नाही. कोणी डायरेक्टर असे करताना पकडला गेला किंवा दोषाचा ठिपका असल्याने काढुन टाकण्यात आला आहे का? माझ्या अल्पमतीत तरि आत्ता कोणतेच उदाहरण येत नाहीये डोळ्यासमोर.

आदूबाळ's picture

22 Jul 2016 - 3:50 pm | आदूबाळ

सहमत आहे. एफएमसीजी क्षेत्रातल्या कंपन्या (भारतीय / अभारतीय एमएनसी दोन्ही) जाहिरातींच्या दर्जाबाबत अतिशय सजग असलेल्या पाहिल्या आहेत. डायरेक्टरचा दत्तू आहे म्हणून कोणत्यातरी भलत्याच अ‍ॅड एजन्सीला नेमणं हा खूप मोठा जुगार आहे.

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 4:13 pm | संदीप डांगे

Wrong info Kaka. Pan kahise tathya aahe te dusarya baajune... Kaay te kalwato nantar

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 4:43 pm | बोका-ए-आझम

जाहिराती बनवणे हे चांगलंच खर्चिक आहे. शिवाय सध्याच्या प्रत्येक बाबतीत ROI (Return on Investment) मोजण्याच्या काळात कुठलीही कंपनी अशी डायरेक्टरचे नातेवाईक असल्यामुळे जाहिरात बनवायला देत असेल असं होणं शक्यच नाही. शिवाय आॅडिटर्स आॅडिटमध्ये हे उकरून काढू शकतात. त्यामुळे ते कठीण आहे.

@ कंजूस
डोव्ह चे कॅम्पेन O & M हि फार मोठी जाहिरात संस्था करते .
तसेच डोव्ह च्या कॅम्पेन ला अनेक बक्षिसे हि मिळाली आहेत

http://www.adageindia.in/advertising/effies-2015-hul-retains-client-of-t....सिम्स

http://www.afaqs.com/news/story/45185_DMA-Asia-Echo-2015-India-wins-22-G...गोल्डस

तर O & M हि HUL किंवा HLL च्या कोणत्या डाइरेक्टरांच्या खासगी मालकीची आहे ?? हे नक्कीच जागतिक दर्जाचे सकॅण्डल दिसतेय !

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 9:51 pm | अभ्या..

David Ogilvy जाहिरात क्षेत्राचा बाप समजला जातो. त्याची पुस्तके आम्हाला टेक्स्ट बुक म्हणून असायची. आधी ogilvy होती. मग बेनसन अँड मॅथर मग नुसते ओगीलव्हय मॅथर राह्यले.

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 12:52 pm | संदीप डांगे

Interesting point kaka. Will address this soon..

बरीच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टरसाहेब..!!

पद्मावति's picture

22 Jul 2016 - 6:35 pm | पद्मावति

खूप छान लेख. आवडला.

माम्लेदारचा पन्खा's picture

22 Jul 2016 - 8:22 pm | माम्लेदारचा पन्खा

एकानं केलं म्हणून दुसरा करतो हेही एक मोठं कारण आहे....डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट आहे हा !

सुबोध खरे's picture

22 Jul 2016 - 8:33 pm | सुबोध खरे

फार छान लेख
जाता जाता
(Mercedes is not a car, but a state of mind !)
याचा पुढचा भाग म्हणजे
"JAT" IS NOT A CASTE
IT IS A STATE OF MIND

अगदी थेट संबंध सापडणार नाही हे मान्य करतो.एवढी काळजी ते घेतीलच.मुद्दा इतकाच की काहीतरी पाणी मुरत असणार.केवळ ( उदा० ) अमिताभने भलामण केली म्हणून कोणी गुजरात पाहिला जाईल का?पर्यटकास तिथे जावेसे वाटले तरच जाईल.अथवा अमुक एक ब्रांड अम्बेसेडर आहे म्हणून कोणी तमुक ब्यान्केचे कर्ज घेणार नाही तर त्याचे व्याजदर कमी म्हणून घेईल.परंतू दुसरे एक उदाहरण देतो- दारावर आलेल्या विक्रेत्याकडून काही घेताना काचकुच झाली की तो लगेच " अहो त्या अमुक माणसानेही घेतले" असे सांगून आश्वस्त करतो आणि आपण घेतो.अशावेळी पटतं.

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 9:59 pm | अभ्या..

कंकाका, डोन्ट माईंड पण तुमच्यासारखे ग्राहक थोडे असतात आणि तुमच्यासाठी खास 6 पॉइंटसाईजमध्ये खालच्या बाजूला मॅटर छापायची व्यवस्था असते. तो सर्वसामान्य वाचत नाहीत.
बच्चनला एकदा तुमच्यासंग ट्रेकला न्या. महाराष्ट्राची ऍड फुकट करेल तो. ;)

संध्याकाळी रजनिकान्त बद्दल पाहिले आणि सोलापूर आठवले.

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 10:40 pm | संदीप डांगे

ह्या धाग्यावर इतके प्रतिसाद व छान चर्चा बघून खूप आनंद झाला. ब्रॅण्ड मॅनेजमेंट आणि डेवलपमेंट हा माझा जीवश्च कंठश्च विषय. अनेक प्रतिसादकांच्या अनेक निरिक्षणांकडे, शंकाकुशंकांकडे, समज-गैरसमजांकडे बघता किती लिहू आणि किती नको असे झाले आहे. तुर्तास जमेल तसे लिहितो...

राघवेंद्र's picture

22 Jul 2016 - 11:18 pm | राघवेंद्र

एक्का काका धन्यवाद सुंदर विषयावरील लेखासाठी !!!
डांगे अण्णांच्या सविस्तर प्रतिसाद वाचण्यास उत्सुक !!!

खटपट्या's picture

22 Jul 2016 - 11:23 pm | खटपट्या

एक अतीअवांतर - टूथपेस्टच्या जाहीरातीतला डॉक्टर गळ्यात स्टेथॅस्कोप घालून बोलतो. आणि आपल्याला ते खटकत नाही. मी तरी गळ्यात स्टेथॅस्कोप घातलेला डेंटीस्ट पाहीलेला नाही.
अशा अर्थाचा कायप्पावर एक मेसेज आला होता.

कंजूस's picture

22 Jul 2016 - 11:47 pm | कंजूस

गायगुरांचा डॅाक्तर कसा दाखवतील?