लोकशाहीचा अभंग

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
14 Aug 2013 - 1:57 pm

लोकशाहीचा अभंग
आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥

कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥

मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥

वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥

सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
रस्ता भटकते । लोकशाही ॥

चार पिढ्या सत्ता । एका कुटुंबाला ॥
म्हणू कशी हिला । लोकशाही? ॥

जनता 'अभय' । निर्भयाने व्हावी ।
ताळ्यावर यावी । लोकशाही ॥

                            - गंगाधर मुटे
------------------------------------------------
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
------------------------------------------------

अभय-काव्यकवितावाङ्मयशेतीअभंग

प्रतिक्रिया

लोकशाहीचा अभंग खुप आवडला

पैसा's picture

14 Aug 2013 - 11:48 pm | पैसा

लोकशाहीचा विजय असो!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Aug 2013 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा

मुटे काका...नेहमीप्रमाणे झक्कास..!

निरन्जन वहालेकर's picture

16 Aug 2013 - 4:46 pm | निरन्जन वहालेकर

अतिशय सार्थ. लोकशाहीचा अभंग आवडला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2013 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकशाहीचा अभंग आवडला.

-दिलीप बिरुटे

अनिल तापकीर's picture

16 Aug 2013 - 6:06 pm | अनिल तापकीर

मुटे, साहेब अप्रतिम आहे अभंग

मदनबाण's picture

30 Sep 2013 - 10:59 am | मदनबाण

मस्त...

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 1:29 pm | गंगाधर मुटे

सर्वांना मनपूर्वक धन्यवाद

नाखु's picture

19 Jul 2016 - 3:54 pm | नाखु

धन्य्वाद

धागा २०१३ चा आपण प्रतिसाद प्रपंच पाहिला १९.७.२०१६ ला !!!

पुन्हा धन्य्वाद

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 4:26 pm | गंगाधर मुटे

२०१३ मधील मिसळपाववरिल आय डी आणि २०१६ चे आय डी यात काय साम्य आणि तफावत आहे हे शोधायला आलो होतो.

मला उत्तर मिळाले.

आकाशातील ग्रहतार्‍यांचा मनुष्याच्या स्वभावावर प्रभाव पडतो असे म्हणतात. केंद्रातील सत्ताबदलाचाही तसाच काही प्रभाव असतो का?, हे आता शोधायचं बाकी आहे.

चांदणे संदीप's picture

19 Jul 2016 - 5:07 pm | चांदणे संदीप

हे बघा....

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

लोकशाहीला, पगारी लोकांची म्हणजेच आमच्यासारख्याची "ताई" करून टाकलेत, वर पुढारी आणि माफियांच्या शेजारी बसवलेत!! मी पगारी आहे म्हणून पगारदारांच्याबद्दलच बोलणार! सांगा, यात सरसकटीकरण नाही का?

तुमची काव्याची जण उत्तम आहे, तुमचे काव्य उत्तम आहे. काव्याला समाजाच्या भल्याकरिता वापरणे हे जे तुम्ही करता ते दुर्मिळ आहे यात शंका नाहीच! मला तुमचे काव्य आवडतेही. एकमार्गी, एकाला चालो रे प्रकारचं आहे त्याचंही विशेष कौतुक पण इथे तुम्ही बर्याचदा(बघा; मी सर्वच वगैरे म्हणत नाही आहे) शेतकरेतर जणांना बोल लावता! का बरे?

हे मी वैयक्तिक त्राग्यातूनही लिहीत नाही असा समजा कारण इथे मिपावर वारंवार आल्यावर तुमचे काव्य एका बाजूला आणि काही नेहमीचे प्रतिसादकर्ते दुसर्या बाजूला असेच चित्र दिसत राहते. बरं तटस्थही राहून पाहिले. आता तुम्हाला सांगूनही पाहिले तर तुम्ही मला, माझे गाव "चंद्रावर" वगैरे आहे का? असा टोमणासदृश प्रश्न विचारता!

किंवा तुमची एक कविता मला दाखवा ज्यात तुम्ही शेतकरी सोडून आमच्यासारख्या सर्वसामान्यांची बाजू मांडलीत! इथे मिपावरच इतरांनी लिहिलेल्या कविता सापडू शकतात. असो, आता थांबतो. तुम्ही खूप सिनियर आहात, उणेअधिक बोलून गेलो असें तर माफ करा! __/\__

Sandy

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 5:50 pm | गंगाधर मुटे

एकदा कविता लिहून लोकार्पण केली की कविता लोकांची होते. तिचा काव्यात्मक आनंद कसा घ्यायचा याचाही सर्वस्वी अधिकार रसिकांचा असतो. कवितेचा अर्थ कसा लावायचा, तीची काव्यात्मकता कशी तपासायची हाही अधिकार वाचकांचा असतो.

वाचक आणि रसिक आपापल्या पात्रतेप्रमाणे, योग्यतेप्रमाने, कुवतीप्रमाणे अर्थ काढतात. तोही वाचकांचा अधिकार आहे.

कवीला जे म्हणायचे तो ते व्यकत करतो. प्रत्येक कवीची अभिव्यक्ती प्रत्येक वाचकाच्या पचनी पडेल किंवा झेपेल असे कधीही नसते.

कवीतेचा अर्थ सांगत बसायचे असेल तर कवीने कविता कशाला लिहावी? लेखच का लिहू नये?

शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा असा की, ज्याला पद्यातून कळत नसेल त्याला गद्यातून कळेल याचीही शास्वती नाही. कारण विषय गद्य किंवा पद्याचा नसून विचारसरणीचा असतो. कविला त्याचे विचार व्यक्त करायचे असते, वाचकांना हवे ते लिहिणारा बाजारू कवी असू शकतो, अभिजात नव्हे.

जगद्गुरू तुकोबारायांनी प्राण गमावला पण विचारांशी तडजोड केली नाही.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 8:55 pm | सुबोध खरे

कवीतेचा अर्थ सांगत बसायचे असेल तर कवीने कविता कशाला लिहावी
रोमलीन सोमलीन इकडची क्वाक क्वाक
रोमलिन सोमलीन तिकड्ची क्वाक क्वाक
बदकाच्या सांगण्याची इतकीच ही चोच
कविता संपली
कवितेचं नाव --चल सोडा प्यायला जाऊया

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:10 pm | गंगाधर मुटे

ज्यांना कवितेतला क सुद्धा समजत नाही त्यांनी या क्षेत्रात लुडबूड का करावी?

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2016 - 9:18 pm | टवाळ कार्टा

बदकाच्या चोचीवरुन मला मी नुकतीच केलेली कवीता आठवली

बदका बदका नाच रे
घरात पिल्ले पाच रे
चपट तुझी चोच रे
राराला जाउन टोच रे

=))

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:22 pm | गंगाधर मुटे

कविता खरंच चांगली आहे. थोडी सुधारणा केल्यास छान बालगीत अथवा बडबडगीत होऊ शक्ते.
तुम्ही या धाग्यावरच्या वातावरणातला प्रतिसाद आहे म्हणून गंभीरतेने घेणार नाहीत पण हा विषय तुम्ही चांगल्या तर्‍हेने हाताळून न्याय देऊ शकता असे वाटते.

(मी गंमत किंवा चेष्टा करत नाहीये.)

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2016 - 9:24 pm | टवाळ कार्टा

अप्रिशिएट केल्याबद्दल धन्यवाद :)

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2016 - 9:24 pm | टवाळ कार्टा

मी(पण) गंमत किंवा चेष्टा करत नाहीये.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 9:28 pm | सुबोध खरे

एकदा ज्ञान कोशकार श्री व्यं केतकर सकाळी सकाळीनाश्ता करत असताना त्यांच्या कडे एक कवी आला आणि म्हणाला मी तुम्हाला माझ्या कविता वाचून दाखवतो ते हसत हो म्हणाले.
काही कविता वाचल्यावर कवीने विचारले कशा वाटल्या
केतकर म्हणाले 'अत्यंत भिकार "
यावर कवी रागाने म्हणाला तुम्ही फक्त ज्ञानकोश लिहावेत तुम्हाला कवितेतील काय कळणार
डॉ केतकर हसत म्हणाले, "असे म्हणू नका" आणि तेथे असलेले एक उकडलेले अंडे हातात घेऊन ते म्हणाले "असं पहा हे अंडं काही मी घातलेलं नाही पण हे किती रुचकर लागतं हे मी कोंबडीपेक्षा जास्त चांगलं सांगू शकतं नाही का ?"
कवी महाशय आपलं कवितेचं बाड उचलून तेथून गायब झाले.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:36 pm | गंगाधर मुटे

श्री व्यं केतकर 'अत्यंत भिकार " म्हणाले ते योग्य होते. त्यांनी कवितेबद्दल स्वतःचे मत मांडले. त्याला आत्मबल पाहीजे.

तुमच्याकडे आत्मबलाची वानवा असल्याने कवितेबद्दल तुम्ही काहीच लिहू शकला नाहीत. कवितेशी असंबद्ध लिहिण्यापुढे तुम्हाला काय येते?

उगीच तुलना!

कुठे ते केळकर आणि कुठे हे खरे!

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 9:54 pm | सुबोध खरे

ते केतकर आहेत ज्ञान कोशकारान्चे नावही माहीत आसू नये?
हा हन्त

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:59 pm | गंगाधर मुटे

क्षमस्व.

कुठे ते केतकर आणि कुठे हे सुबोध खरे...!

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 10:01 pm | सुबोध खरे

तेच म्हणतो मी
आम्ही एकारान्त कोकणस्थ आहोत.
जाज्वल्य का काय म्हणतात तसे.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:08 pm | गंगाधर मुटे

मग तुमच्या नात्यात कविता लागत असते का?

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 10:10 pm | सुबोध खरे

हो ना माझ्या चुलत बहिणीची आतेनणंदच आहे कविता.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:25 pm | गंगाधर मुटे

अरेरे. मग तुमचा तर कवितेशी दुरान्वयानेही संबंध दिसत नाही.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 10:34 pm | सुबोध खरे

अजीब बात है! हमारे इतने समझाने के बाद भी!

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 11:39 pm | गंगाधर मुटे

तुमच्या समजावण्याने ६ महिण्याचं तान्हूलही रडणं थांबवण्याची शक्यता नाही.

समजवणे म्हणजे पोरखेळ नव्हे. महाकठीण काम आहे ते. त्यासाठी पात्रता आणि कर्तुत्वाचा अधिकारही पाहिजे.

बोलघेवड्यांची जगाच्या कोणत्याच कोपर्‍यात काहीच किमंत नसते.

एका ज्येष्ठ मिपाकराची अशी टोचाटोची?

सध्याच्या गुरु राहू चांडाळ योगाचे परिणाम आहेत हे !

कलियुग हो....घोर पाप...हन्त हन्त !

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:01 pm | गंगाधर मुटे

माझी चिंता नको. तुम्ही त्यांचंच बघा.

मी असहाय्य वगैरे काही नाही. सक्षम आणि निरोगी आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Jul 2016 - 10:19 pm | माम्लेदारचा पन्खा

चांडाळ योगाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करा. शुक्र बुध शनीचा प्रभाव वाढेल इकडे लक्ष देणे गरजेचे. सध्या हेच करावे. पुढचा मार्ग मोकळा होईल.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 10:22 pm | सुबोध खरे

बद्धकोष्ठ आहे काय?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:24 pm | गंगाधर मुटे

पत्ता कधी देणार?

तेवढं सोडून अवांतर लिहिण्यात फारच उत्साह आहे तुम्हाला.

पत्ता ध्या. तुमचा दुवा घ्यायला येतो.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Jul 2016 - 10:30 pm | माम्लेदारचा पन्खा

અમદાવાદ માથી આવી જા....

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:33 pm | गंगाधर मुटे

एवढे पळपुटेच होते तर दुवा देण्याच्या वगैरे वल्गना कशाला केल्या?

मी इतर लोकांना हा सल्ला दिला होता..... पण तुमची इच्छा असेल तर मीही देईन हो दुवा....
तुम्ही माझ्यासारख्या य:कश्चित माणसाकडून दुवा मागणे हेही नसे थोडके !

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 11:00 pm | गंगाधर मुटे

पळू नका. देईन आणि देणे यातली तफावत कळतेय ना तुम्हाला?
चला द्या पत्ता आणि दुआ.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Jul 2016 - 11:28 pm | माम्लेदारचा पन्खा

दुआ कुबूल करो मालिक़ !

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 11:35 pm | गंगाधर मुटे

लांबून दुवा द्यायची किंवा दुवा पोस्टाने पाठवण्याची भारतीय/मराठी/हिंदवी संस्कृती नाही.

पत्ता द्या. घरी येतो. नतमस्तक होतो. मग दुवा द्या.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Jul 2016 - 11:38 pm | माम्लेदारचा पन्खा

नतमस्तक मीच झालोय आज...तुसी तो छा गए सर....
आज जहाँ देखो मिपापर एक ही नाम है...गंगाधरशेठ मुटे....
जय हो....

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 11:40 pm | गंगाधर मुटे

मी चमचे पाळत नाही.

चमचे कुठे आले मध्येच..आज भातुकली नका खेळू....कबड्डी खेळा...!

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:07 pm | गंगाधर मुटे

संकेतस्थळ मालक आणि संपादक मंडळ

केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून पाहतोय मिपावरच १५-२० आयड्यांचं टोळकं माझ्या धाग्यावर तुटून पडत असते. हे १५-२० आयड्यांचं टोळकं म्हणजे अख्खी मिसळपाव आहे किंवा हे मिसळपावचे अधिकृत प्रतिनिधी आहे असे मी मानत नाही. तुम्ही काय मानताय हे मला माहीत नाही.

स्वत:ची ओळख लपवणार्‍यांना काहीच धरबंद नसतो. ते काहीही बोलू शकतात, लिहू शकतात. पण त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. मात्र यावेळेस मी सर्वांना जशास तसे उत्तर देणार आहे, यांची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही.

तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की, यापूर्वी सारखी एकतर्फ़ी कारवाई करून केवळ माझे उपप्रतिसाद उडवू नयेत.

वाचकांना सर्व वाचू द्या. ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीने काय ठरवायचे ते ठरवतील.

आपला एक सदस्य
गंगाधर मुटे

खटपट्या's picture

19 Jul 2016 - 11:05 pm | खटपट्या

नोटेड

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2016 - 11:32 pm | टवाळ कार्टा

संपादकांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 11:36 pm | गंगाधर मुटे

आयड्यांना स्वतःचे अस्तित्व झाकून ठेऊन व्यक्त व्हायची मिपाने सदस्यांना मुभा दिली आहे. त्याचा गैरफायदा सदस्याची एक झुंड घेत आहे.

या झुंडीतील सर्वांचे खरे रूप उघड केले तर असे मोकाट सुटून काहीही बोलण्याची, लिहिण्याची यांची तयारी आहे का? एवढे मला आता तपासायचेच आहे.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 11:54 pm | सुबोध खरे

मुटे साहेब
असंख्य लोक मिपा वर टोपण नावाने वावरत असतात. त्या मागे त्यांची एक विशिष्ट अशी विचारसरणी असते. आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न ही आहे. उदा इस्पीकचा एक्का, पैसा ताई, मुवि, गवि इ. म्हणून ते पळपुटे आहेत किंवा पदराआड दडून काही करतात असे म्हणणे चूक ठरेल.
बाकी आज प्रतिसाद दिला ते लोक --
उगाच झुंड बनवून तुमच्या धाग्यावर धुरळा उडवण्याइतके यातील कोणी रिकामे नाही. काही लोकांना मी कट्ट्यावर भेटलो आहे आणि हे लोक आपापल्या क्षेत्रात मान्यवर आहेत. इतर कित्येक लोकांना काळा की गोरा हेही पाहिलेले नाही.त्यांनी आपले खरे नाव आणि पत्ता तुम्हाला दिला तर तुम्ही काय क्रांती करणार आहात?
त्यांनी एक विशिष्ट कारणासाठी नाव घेतलेले असते केवळ तुम्ही आरडा ओरडा केलात म्हणून त्यांनी आपले का=हरे बाव उघड करावे ही तुमची अपेक्षा चूक आहे. उगाच झुंड करून म्हणून तुम्ही आरडा ओरडा चालवला आहे त्यात काही तथ्य नाही. आपलीच एक ( ही नव्हे) कविता आपणच ३ वर्षांनी वर काढून ती आर पी मिळवायचा तुमचा प्रयत्न कशासाठी हे कळले नाही. मीच काय तो बरोबर आणि इतरांना अक्कल नाही असे नसते.
बाकी आक्रस्ताळेपणा करण्याने तुम्हीच बरोबर हेही सिद्ध होत नाही खरं तर निष्पन्न काहीही होत नाही

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 12:08 am | गंगाधर मुटे

अच्छा! आधी निरर्थक, अर्थहीन, असंबद्ध व कवितेशी निगडीत नसलेले ५० प्रतिसाद दिल्यानंतर आता असा सौम्य प्रतिसाद लिहिता होय? एवढी प्रगल्भता तुमच्यात आता आली आहे, मग काही मिनिटापूर्वी कुठे गेली होती तुमची प्रगल्भता?

एखाद्या कवितेवर अधाशासारखे तुटून पडताना तुम्हाला व तुमच्या झुंडीला बरेच दिवसापासून पाहात आहे. तेव्हा कुठे गेली होती तुमची ही सौम्य भाषा?

एखाद्याची कुचेष्टा करणार, त्याला हीन लेखण्याचा प्रयत्न करणार, त्याची झुंडीने मिळून मुस्कटदाबी करणार, करता येईल तेवढी त्या कवितेवर हुल्लडबाजी करून तो धागा घाणेरडा करून ठेवणारे तुम्ही आणि तुमची झुंडच आहे ना?

त्या झुंडीत आपापल्या क्षेत्रात मान्यवर असलेले असतीलही. पण त्यांची लक्षणे गुंड आणि मवाल्यांसारखी नसावीत ना? हे काय मी सांगू तुम्हाला?

वेद, पुराण, गीता यांनी आपल्याला हीच शिकवण दिली आहे का?

माझ्या धाग्यावर येऊन कुणी हुल्लड करत असेल तर त्याचा मला नैतिक अधिकार आहेच पण कायदेशीर अधिकारही मिळून जाईल.

मी संपूर्ण मिपाकरांना त्यांचे पत्ते मागीतले नाही. फक्त झुंडखोरांचे स्वरूप उघड व्हावे, असे म्हटले आहे.

तूर्त एवढेच.

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 12:29 am | गंगाधर मुटे

आक्रस्ताळेपणा करण्याने तुम्हीच बरोबर हेही सिद्ध होत नाही

मला तुमच्या झुंडीसमोर काहीही सिद्ध करायचे नाही आहे. तशी आवश्यकताही नाही. तुम्हप्रमाणपत्र दिले तरी साहित्यजगात त्याला कवडीची किंमत नाही.

मला फक्त इतकेच शोधायचे आहे की,

आकाशातील ग्रहतार्‍यांचा मनुष्याच्या स्वभावावर प्रभाव पडतो असे म्हणतात. केंद्रातील सत्ताबदलाचाही तसाच काही प्रभाव मिपा आयड्यांवर पडला आहे का? उत्तर शोधत आहे. उत्तर मिळाले की जाहीर करेन.

तुमच्या उत्तराला केराची टोपली दाखवली जाण्याची शक्यता दाट आहे. कारण तुम्ही पुरावा न देता फक्त विधाने करता.आपल्या दुसऱ्या कवितेमध्ये कमीत कमी दोन डझन लोकांनी आपले विधान का करत आहेत हे विचारले त्यावर तुमची फक्त उद्धट उत्तरे आली यात बापूसाहेब इ लोक आहेत जे महाराष्ट्रातही नाहीत त्याना पण तुम्ही कंपू आणि झुंड मध्ये सामील करून मोकळे झालात.
साहित्य जगात मला जायचे कारणच नाही मग कुणाला प्रमाणपत्र का आणि कशासाठी देऊ.
लोकांनी मला चांगले म्हणावे म्हणून मला स्वतः प्रतिसाद देऊन धागे वर काढायची गरज नाही.

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 12:44 am | गंगाधर मुटे

तुमच्या उत्तराला केराची टोपली दाखवली जाण्याची शक्यता दाट आहे.

मी स्वतः उत्तर शोधत आहे. असे म्हटले आहे. नीट वाचावे.

झुंड ही झुंड असते. त्यात कोण आहे याला काहीही महत्व नसते. झुंडीत शिरून झुंड प्रवृत्तीने हात धुवून घेणारे झुंडीचे सदस्य असतातच.

बापूसाहेब कोण ते मला माहीत नाही. मी त्यांना तुम्ही झुंडीत आहात असेही म्हटले नाही. ज्यांना म्हणालो, त्यांना स्पष्टपणे म्हणालो आहे. उगीच तुमच्या झुंडीत इतरांना गोवू नका. तुमचा किल्ला आता तुम्हीच लढवा.

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 12:47 am | सुबोध खरे

उत्तर मिळाले की जाहीर करेन.
हे तुम्हीच लिहिले आहे ना? का ते आपणहून आले आपल्या प्रतिसादात

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 12:20 am | सुबोध खरे

कायद्याची भाषा न कराल तर ठीक आहे.
बाकी वेद पुराण गीता इ काही मी वाचलेली नाही. प्रगल्भता म्हणाल तर ती आताही आलेली नसेल.
हा झुंडखोरीचा बेफाट आरोप तुम्ही करता आहेत याला काही पुरावा आहे का?
"ज्याला कवितेतील "क" सुद्धा समजत नाही" हा आरोप तुम्ही केलात तो कशावरून?
तीन वर्षांनी आपला धागा वर काढण्यासाठी आणि टी आर पी मिळवण्यासाठी तुम्ही केलेली केविलवाणी धडपड सारे काही सांगून जाते.
वितंडवाद कितीही वेळ मला घालता येईल. न्यायालयात साडेतीन वर्षे मी ते केलेले आहे तेंव्हा तुमच्याशी वाद घालायला मला काही शष्प फरक पडणार नाही. आणि मी काही पॉलिटिकली करेक्ट असावा असा माणूस नाही. जे चूक त्याला चूक म्हणण्याची माझी हिम्मत आहे.
कितीही झाला तरी माझंच खरं हे म्हणणे सोडून द्या.

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 12:37 am | गंगाधर मुटे

कायद्याची भाषा न कराल तर ठीक आहे.

माझ्या धाग्यावर येऊन कुणी हुल्लड करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचा मला नैतिक अधिकार आहेच पण कायदेशीर अधिकारही मिळून जाईल. यात काय गैर आहे?

हा झुंडखोरीचा बेफाट आरोप तुम्ही करता आहेत याला काही पुरावा आहे का?

माझ्या काही कवितांच्या धाग्यावर येऊन असंबद्ध प्रतिसाद नोंदवणारे जर "समान व्यक्ती/आयड्या" असतील तर त्या आयड्यांना एकत्र मिळवले की आपोआपच झुंड तयार होते. वेगळ्या पुराव्याची गरज भासत नाही.

कितीही झाला तरी माझंच खरं हे म्हणणे सोडून द्या.

हा सर्वस्वी माझा खजगी प्रश्न आहे. कुनाला गुरु मानायचे, कुनाचे ऐकायचे हा सुद्धा माझा खाजगी प्रश्न आहे. उलट न मागता सल्ला देणे, हाच फाजिलपणा आहे.

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 12:46 am | सुबोध खरे

कायदेशीर अधिकार कसा मिळेल हे जरा सविस्तर सांगता काय? हे खाजगी संस्थळ आहे हे लक्षात घेऊन.
वेगळा पुरावा देता येत नाही म्हणून तुम्ही वेगळा पुरावा द्यायचा प्रश्न येत नाही असे म्हणता
मला कवितेतील "क" समजत नाही हा आरोप तुम्ही कशावरून केला हेही सांगत नाही.असे बेफाट आरोप करायला श्री केजरीवालांकडून शिकला काय?
तुम्हाला सल्ला द्यायची मला गरज वाटत नाही. तास मला अधिकारही नाही बेफाट आरोप करून पुरावा न देता आपले तेच रेटून बोलण्यासाठी मी तुम्हाला सांगितले त्याला तुम्ही सल्ला समजला हा तुमचा गैर समज आहे. आपण सर्वज्ञानी आहात तेंव्हा तुम्हाला सल्ला देणारा मी कोण?
पण वरच्या दोन प्रश्नांची उत्तरे देता आली तर पहा.

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 1:16 am | गंगाधर मुटे

कायदेशीर अधिकार कसा मिळेल हे जरा सविस्तर सांगता काय? हे खाजगी संस्थळ आहे हे लक्षात घेऊन.

मला काहीही कायदेशीर वगैरे करायचे नाही आहे. उगीच घाबरू नका. मी झुंडीच्या विरोधात बोललो. संस्थळाच्या विरोधात बोललो नाही.

या संस्थळाविषयी माझी काहीही तक्रार नाही. या मिसळपावशी माझं भावनिक नातं जुळलेलं आहे. माझी कविता फुलवण्यात आणि मला कवी व लेखक बनवण्यात मायबोली आणि मिसळपाव या दोनच संस्थळाचा पूर्ण वाटा आहे.

माझे स्वतःचे संकेतस्थळ, फेसबूक, ब्लॉग, ऑर्कूट, व्टीटर, व्हाटसप नंतर आलेत.

पण मिसळपावला मी आईचा दर्जा देत असलो तरी तुमच्यासारख्या झुंडींना कवडीची किंमत देत नाही, हे तितकेच खरे आहे.

तुमच्यासारख्यांच्या निरर्थक प्रश्नांना मी उत्तरे दिलीच पाहिजे असेही मला वाटत नाही.

मला कवितेतील "क" समजत नाही हा आरोप तुम्ही कशावरून केला हेही सांगत नाही.

कवितेच्या धाग्यावर कवितासोडून अवांतर विषयावर कोण बोलू शकतो?

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 1:25 am | सुबोध खरे

. उगीच घाबरू नका.
उगाच स्वतःबद्दल गैरसमज करून घेऊ नका मी भारतीय लष्करा विरुद्ध साडे तीन वर्षे 'सर्वोच्च न्यायालयात" सर्व तर्हेच्या धमक्यांना भीक न घालता लढून जिंकून निवृत्ती वेतन किंवा संतोष फंड न घेता बाहेर पडलो आहे. तुम्हाला मी घाबरेन हा गैरसमज काढून टाका. उगाच स्वतःबद्दल भ्रामक कल्पना बाळगू नका.
तुम किस खेत की मूली हो?
मीच तुम्हाला आव्हान देतो. काय ते कायदेशीर करूनच दाखवा. फुसके फटाके फार झाले. दाखवाच करून. नाही तर शेपूट घालून पळून जा
कवितेच्या धाग्यावर कवितासोडून अवांतर विषयावर कोण बोलू शकतो?
आणि कवितेबद्दल परत असं गोल गोल बोलू नका स्पष्ट पुरावा द्या.
बाप दाखव नाही तर श्राद्ध कर

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 1:52 am | गंगाधर मुटे

तुमचा मी वेतनधारी सेवक नसल्याने अथवा तुम्ही माझे सेनापती नसल्याने तुमचे कोनतेही आदेश पाळण्याचे माझेवर अजिबात बंधन नाही.

मी माझ्या मर्जीचा मालक आहे. काय करायचे काय नाही करायचे हे ठरवण्याचा अधिकारही माझाच आहे.

तुम्हाला काय करायचे ते तुम्ही ठरवा.

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 9:47 am | सुबोध खरे

तुमचा मी वेतनधारी सेवक नसल्याने अथवा तुम्ही माझे सेनापती नसल्याने तुमचे कोनतेही आदेश पाळण्याचे माझेवर अजिबात बंधन नाही.
मुटे साहेब
तो आदेश नाहीये ते आव्हान आहे. झेपत नाही तर कशाला फटाके फोडू म्हणता. उगाच फुसके निघतात आणि अब्रू जाते.
म्हणे कायदेशीर अधिकार

निंजा टर्टल's picture

20 Jul 2016 - 2:03 am | निंजा टर्टल

आज कलकलाट झालेला दिसतोय.
मुटे काका, हे सगळे लोक दुत्त दुत्त आहेत.
कोणाकोणाकडे लक्ष देऊ नका. सगळ्यांना तिकडे फाट्यावर मारा. कविता सादर करा.

निंजा टर्टल's picture

20 Jul 2016 - 2:03 am | निंजा टर्टल

आज कलकलाट झालेला दिसतोय.
मुटे काका, हे सगळे लोक दुत्त दुत्त आहेत.
कोणाकोणाकडे लक्ष देऊ नका. सगळ्यांना तिकडे फाट्यावर मारा. कविता सादर करा.

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 2:12 am | गंगाधर मुटे

कविता सादर करायला संपूर्ण आयुष्य शिल्लक आहे.

आजचा दिवस या झुंडशाहीच्या नावानेच साजरा करायचा ठरवला आहे.

निंजा टर्टल's picture

20 Jul 2016 - 2:17 am | निंजा टर्टल

वृत्ती बेकार आहे ओ लोकांची, सोडून सोडा झालं. बाद कार्टी हायेत.
त्ये येक डाक्टर हाय, त्ये बी बाद हाय.
आनि येकटं उगा सिक्स सिग्मा वगैरे करतंय. त्ये तर लै वंगाळ.
एकटं कायतं शेनेत हाय, येक तकडं आमेरिकेत, येक हिकडं लंडन बुद्रुक ला, येक गाबड़ं आनि कुडं हाय.

मरू दे. झोपू का?

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 2:20 am | गंगाधर मुटे

नाही, झोपू नका.

झोप प्रकृतीस हानीकारक असते हे रशियन तज्ज्ञ डॉ. कुत्रा चावलास्की यांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे.

खटपट्या's picture

20 Jul 2016 - 2:40 am | खटपट्या

काळजी घ्या...