स्क्रिन शॉट भाग - ६

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
18 Jul 2016 - 8:48 pm

आतापर्यंत.....

विशाल "अभिषाच्या पोस्टवर आम्ही या विषयी सगळे सविस्तर लिहिले असून आतापर्यंत तू निर्दोष आहेस हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे."

हे ऐकून अमितला अतिशय आनंद झाला आपण आता काय बोलावे हे त्याला समजेना.

विशाल " आम्हाला सकाळ पर्यंत वेळ दे या प्रकारामागे कोण आहे? हे उद्या आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे."

पुढे सुरु......

सकाळचे १० वाजले होते सर्वजण एकत्र आले होते आणि आपापला नाष्टा संपवून आपण काय बोलतोय याची उत्सुकतेने वाट पाहू लागले आहेत हे पाहुन सुधीरने बोलण्यास सुरुवात केली.....

सुधीर - मित्रांनो सर्वांनाच नक्की काय घडले?हे ऐकण्याची उत्सुकता असून कोणी केले आहे हे सुध्दा माहीत करुन घ्यायचे आहे. बरोबर आहे ना?

सुधीरचे बोलणे ऐकुन सर्वांनी मान हलवून होकार दिला.

सुधीर- मित्र-मैत्रिणींनो कोणतीही गोष्ट हि अचानक होत नसते जसे कि फेसबुक वा इतर सोशल नेटवर्क साईट्स ह्या का निर्माण झाल्या याचा विचार करा पाहू .... तर नाही इंटरनेटचा शोध लागण्यापूर्वी पासून सोशल नेटवर्क म्हणजेच सार्वजनिक सण,उत्सव यात्रा -जत्रा असायच्या नव्हे होत्या असे म्हणावे लागेल.
त्याच बरोबर वाडा,चाळ यांचे गच्ची, सार्वजनिक नळ अगदी सार्वजनिक शौचालय यांची रांगेत सुध्दा कामगार वर्गाच्या गप्पा होत असत नविन माहितीची देवाण व्हायची. चौक,नाका, कट्टा तरुण मुलांचा हक्काचा ठिय्या असायचा.

एवढेच नव्हे कबड्डी,खो-खो,विटी-दांडू पतंग असे कितीतरी खेळ हे जय-पराजय स्वीकारायला शिकवायचे सांघिक खेळ सहकार्य,सामंजस्य शिकवायचे.

जस जसे आधुनिकीकरण होत गेले ह्या गोष्टी कालबाह्य झाल्या.नविन संस्कृती निर्माण होऊ लागली गाव,वाडा,चाळ,कुटुंब पध्दत जाऊन हम दो हमारे दो ह्या नवविचाराने नवे जग निर्माण झाले.

विशाल - हो,आणि त्यानंतर आधुनिक शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांनी असा वेग घेतला कि आता आपल्यातील बहुतेक जण या गोष्टी फक्त सिरिअल आणि कथा कहाण्यांमधुन पहात वाचत आहेत.

सुधीर- हे सर्व सांगायचे कारण म्हणजे फेसबुक नव्हते तेंव्हा सुध्दा समूह करणे,आनंद,दुःख शेअर करणे,वाद विवाद हे होते.
शिक्षण,नोकरी,व्यवसाय या साठी एकमेकांपासून दूर गेलेलो आपण फेसबुकवर गृप,पेज बनवून परत एकत्र येऊ लागलो आहोत.पण एकत्र कुटुंब,एकत्र खेळणे भांडणे,हसणे-रुसणे आपण कधीच विसरून गेलो आहोत. या छोट्या मोठ्या गोष्टींचे जग हे सिमित झाले आहे.

विशाल- या पूर्ण जगातल्या कोणत्याही मोठ्या शहरापासून अगदी छोट्या वाडी वस्तीवर जरी गेलो तरी दोन पैकी एक गोष्ट जरी आपल्याकडे असेल तर आपल्याला काही त्रास होत नाही.बहुतेक गोष्टी आपण करू शकतो.

सगळे एकदम - कोणत्या गोष्टी?

विशाल - त्या दोन गोष्टी म्हणजे बावनकशी ( अस्सल सोने ) आणि खरा मित्र. विचार करा तुम्ही जगातल्या कोणत्याही कानाकोपर्यात सोने दिलेत तर तुम्हाला बहुतेक गोष्टी मिळू शकतात.
तसेच तुम्ही कफल्लक जरी झालात तरी तुमचा खरा मित्र तुम्हाला कधीही अंतर देत नाही.
पण ह्या दोनही गोष्टींना खुप जपावे लागते कायम वापराने सोन्याची झीज होते आणि तसेच कायम मित्रांचा वापर केला तर मैत्री कमी होते म्हणजे पर्यायाने आपली किंमत कमी होते.
आणि ह्यांना संभाळण्याच्या काळजीने आपले मनस्वास्थ बिगडु शकते.

सुधीर - तर आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया.
फेसबुकवर जेंव्हा आपली मैत्री होते तेंव्हा एकमेकांच्या पोस्ट लाईक करणे त्यावर कमेंट्स करणे हे होतच असते.नव्हे आपल्या मित्रांनी लाईक तर करावेच पण कमेंट्स सुध्दा कराव्यात यासाठी सर्रास टॅग केले जाते. आता विषय समजण्यासारखा पटन्यासारखा असेल तर आपण कमेंट्स करतो सुध्दा परंतु न पटणाऱ्या, वादग्रस्त,कोणाच्यातरी भावना दुखावणाऱ्या पोस्ट असतील तर आपण त्या टाळत असतो.
आपला मित्र स्वतःच्या वॉलवर तर वादग्रस्त लिखाण करतच असतो पण त्यापुढे जाऊन तो गृपवर,आपल्या मित्रांचे पोस्टवर सुध्दा वाद घालू लागतो. प्रथम आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.तरीही समोरचा मात्र माझेच खरे तुम्ही चुकत आहात या आरोपांनी आपल्यावर तूटुन पडतो. आता त्याला काहीजण सपोर्ट करू लागतात.

विशाल - मग नेमके होते काय? आपण एकतर आपला गृप करुन त्याच्या बरोबर वाद वाढवतो किंवा शांत बसन्याचा पर्याय निवडतो.
आता आपण जरी शांत बसलो तरी त्यांचे वाद वाढवणे सुरूच असते.गृपवरील वातावरण बिघडलेले असते.आपणही डिस्टर्ब झालेलो असतो.आपली चिडचिड वाढून आपण काहीतरी चुकीचे करून बसतो.

क्रमश:

कथाभाषाkathaaआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

18 Jul 2016 - 8:59 pm | विजुभाऊ

बरं मग?

पीशिम्पी's picture

18 Jul 2016 - 9:36 pm | पीशिम्पी

:)
आज उपदेशाचा दिवस आहे