बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ११ - अंगकोर वट

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
18 Jul 2016 - 9:35 am

1
ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग २ : मंडले भाग ३ : बगान भाग ४ : रंगून भाग ५ : लोकजीवन
थाईलँड भाग ६ : बँकॉक व परिसर भाग ७ : सुखोथाई भाग ८ : उत्तरसीमा
लाओस भाग ९ : सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर
अंगकोर या दिपवून टाकणाऱ्या मंदिरांच्या नगरीची या भागात चित्रयात्रा.

यशोधरापूर व हरिहरालय नावे येथील जुळी शहरे एके काळी अत्यंत सुखवस्तू व संपन्न नगरे होती. पुढे आयुत्थया साम्राज्याशी आलेले वैर व प्राकृतिक आपदा यांमुळे चौदाव्या शतकात जी उतरती कळा ती आजतागायत. संपन्नतेच्या कळसाध्यायात इथे वास्तुशास्त्र, स्थापत्यकला व शिल्पकलेची महाकाव्ये रचली गेली. यातील बरीच मंदिरे पूर्वी रंगकाम व सुवर्णजडित होती पण काळाच्या ओघात बरेच काही हरपले. परंतु कालातीत अशी शिळाशिल्पे मात्र आजही तत्कालीन संपन्न समाजाची प्रतिमा उभी करतात.

प्रमुख मंदिरांचा प्रदेश हा जागतिक वारसा म्हणून संरक्षित विभाग घोषित करण्यात आला आहे. या संरक्षित क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी तिकीट असून तीन पर्याय आहेत. एक दिवसासाठी २०$, तीन दिवसासाठी ४०$ व आठवड्याच्या पास साठी ६०$ पडतात. एक दिवसाच्या तिकिटांव्यतिरिक्त बाकीच्यांसाठी फोटो सुद्धा प्रिंट केला जातो. एकंदर तिकीट कार्यालय अतिशय अद्ययावत आहे.

वेळेचे गणित या ठिकाणी फार महत्वाचे, कारण अनेक मंदिरे व बहुतांश अतिशय भव्य किंवा दूर, त्यामुळे कोणती मंदिरे पाहायची व मंदिरांमध्ये नेमके काय पाहायचे याचा अभ्यास वेळ वाचवायचा असेल तर फार आवश्यक. मी बराचसा अभ्यास http://www.theangkorguide.com या १९४४ सालच्या एक पुस्तकाच्या ऑनलाईन आवृत्तीवरून केला. अर्थात हे 'नो गाईड पॉलिसी' असल्यामुळे, तसे नसल्यास उत्तम गाईड शोधण्यापुरता अभ्यासही पुरेसा. माझ्या अनुभवावरून कोणास उपयोगी येणार असेल तर काही ढोबळ आराखडेही येथे देत आहे.

स्थापत्य-शिल्पकलेत सामान्य रुची :
अर्धा दिवस : केवळ अंगकोरवट
एक दिवस : सूर्योदयापासून अंगकोर वट, नंतर बायॉन व दिवसाच्या शेवटी बान्तेय स्रे.
दोन दिवस : पहिल्या दिवशी खालील नकाशातील लाल खुणा असलेली ठिकाणे. दुसऱ्या दिवशी पिवळ्या खुणा असलेली ठिकाणे.
तीन दिवस : वरील प्रमाणे दोन दिवस, तिसऱ्या दिवशी विशेष सूर्योदय सूर्यास्त पॉईंट तसेच हवाई/बलून सफर.

स्थापत्य-शिल्पकलेत विशेष रुची :
अर्धा दिवस : त्यापेक्षा न जाणे बरे.
एक दिवस : सूर्योदयापासून अंगकोर वट व दिवसाच्या शेवटी बान्तेय स्रे.
दोन दिवस : पहिल्या दिवशी अंगकोर वट व बायॉन. दुसऱ्या दिवशी बान्तेय स्रे व बान्तेय सामरे, जमल्यास बॅकोन्ग.
तीन दिवस : पहिल्या दिवशी अंगकोर वट व नॉम बाखेन्ग. दुसऱ्या दिवशी बायॉन, बाफून, हस्तिसौध व यमसौध (Terraces). तिसऱ्या दिवशी बान्तेय स्रे व बान्तेय सामरे, जमल्यास बॅकोन्ग.
चार दिवस : पहिले दोन दिवस वरीलप्रमाणे, दिवस ३ ता प्रोम, थोम्मनॉन, बान्तेय क्ते, चौथा दिवस वरील शेवटच्या दिवसाप्रमाणे.
पाच दिवस : वरील प्रमाणे चार दिवस व एक दिवस प्रे को व बॅकोन्ग आणि इतर रुलस गटातील मंदिरे
सहा दिवस : वरीलप्रमाणे पाच दिवस व शेवटच्या दिवशी हवाई व बलून चित्रण, यात
सहा दिवसाहून अधिक : आपल्याकडे वेळेची बरीच उपलब्धता आहे त्यामुळे बरेच आरामात आपल्याला सर्व पाहता येईल.
असो, शब्दांना विराम, पुढे चित्रे... बगान च्या भागाप्रमाणेच सावकाश, वेळ देऊन, आवड असल्यास प्रॉपर्टीज मधून लिंक घेऊन मोठ्या रूपात पाहावी.
*कलात्मक समतोलासाठी काही चित्रे कोलाज मध्ये पुनर्योजित आहेत.

संदर्भासाठी नकाशा
पहाटेचे प्रथम दर्शन
अरुणोदय
उजळलेल्या दिशा व मुख्य मंदिर
मंदिरासभोवतीचा खंदक
पूर्व विजयद्वार
विजयद्वार
मंदिरातील अधिष्ठित देवता श्री विष्णू. मुख्य गर्भगृहात सर्व बुद्ध व बुद्धसदृश विष्णुमूर्ती मूर्ती असून ही विष्णुमूर्ती वेगळ्या दालनात स्थापित आहे.
अप्सरा दालन
आपल्याकडील नायिकांप्रमाणे येथील मंदिरात अप्सरांच्या सुंदर मूर्तींची योजना आहे. प्रत्येकीचा साज शृंगार, वेशभूषा, केशभूषा, आभूषणे इत्यादी फार बारकाईने रेखलेली असून तत्कालीन वैभवाची साक्ष देते.










अन्य मंदिरे
बायॉन बौद्ध मंदिर
बायॉन च्या शिखरावरील प्रसिद्ध बुद्धमुद्रा
बॅकोन्ग मंदिर
यक्ष यक्षिणी
एक बुद्ध मूर्ती, बायॉन
बांते स्रे व प्रेह को मंदिरातील पुरुषमूर्ती
बांते स्रे, अप्रतिम कलाकुसर, छद्मद्वार
बांते स्रे, इंद्र
बांते स्रे, महालक्ष्मी
बांते स्रे, अप्सरा
निरोप घेताना...
एक अविस्मरणीय दर्शन

अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया

प्रतिक्रिया

अजया's picture

18 Jul 2016 - 11:09 am | अजया

अप्रतिम फोटो _/\_
अप्सरेच्या पायाशी कोरलेले हंस शिल्पातून बाहेर पडून कधीही उडतील!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2016 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो ! हा भाग फारच थोडक्यात आटपला !? आमच्या कंबोडियाच्या भेटीच्या आठवणी जाग्या झाल्या !

शिर्षकावरून 'अंगकोर वट' या एकाच मंदीराचे फोटो असावेत असा निर्देश होतो आहे. पण, लेखातले फोटो 'अंगकोर' या ख्मेर साम्राज्याच्या उत्कर्षकालातील राजधानीच्या ठिकाणी असलेल्या अनेक मंदिरांपैकी काहींचे आहेत.

प्रचेतस's picture

18 Jul 2016 - 3:54 pm | प्रचेतस

अफाट सुंदर आहे हे सर्व.

प्रत्येक मंदिराला एकेक भाग द्यायला हवा होता.

बोका-ए-आझम's picture

18 Jul 2016 - 7:11 pm | बोका-ए-आझम

त्यांनी संपूर्ण complex मधले फोटो दिलेत. हा संपूर्ण complex म्हणजे मिठाईचं दुकान आहे. दोन दिवस पूर्ण पाहिजेत. फोटो अफलातून आलेत.

कंजूस's picture

18 Jul 2016 - 12:53 pm | कंजूस

सुंदर!

अतिशय देखणी छायाचित्रे.

अतिशय देखणी छायाचित्रे.

विवेकपटाईत's picture

18 Jul 2016 - 7:38 pm | विवेकपटाईत

चित्रे अतिशय सुन्दर अणि बोलके.

पद्मावति's picture

18 Jul 2016 - 8:25 pm | पद्मावति

अप्रतिम!!!! माझ्या स्वप्नातलं सुट्टीचं ठीकाण आहे हे.