गाभा:
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय
शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव
1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे
2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू
3) चुकून request accept केली
4) सकाळपासून 50 call आले
5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ?
6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू
7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका
आणि सर्वात भयानक
8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
प्रतिक्रिया
7 Jul 2016 - 6:59 pm | नूतन सावंत
मग साखरपुडा झाला की नाही शेवटी?
7 Jul 2016 - 7:24 pm | सूड
अहो छातीवरचे केस दाखवलेत तर एक सॅलरी स्लिप दाखवायला काय जड होती?
7 Jul 2016 - 7:38 pm | वाल्मिक
सॅलरी स्लिप झाली
कंपनीत फोने पण केला
तिकडचे एक राजकारणी मध्यस्त ,जे आमचे नातेवाईक आहेत
मातोश्री शाळेत HM
पण
होकार dilywar का म्हणून चेक करावे ?
7 Jul 2016 - 7:47 pm | स्रुजा
मुलीच्या आणि तुमच्या ही आयुष्याचा प्रश्न आहे. का चेक करु नये?
7 Jul 2016 - 7:58 pm | टवाळ कार्टा
हा नक्की पडदा आहे की नाही ते बघणार्यातला वाटतोय :)
7 Jul 2016 - 7:59 pm | वाल्मिक
साखरपुड्या आधी पाहिजे ते चेक करा
होकार दिल्यावर संशय घेणे पटते ?
7 Jul 2016 - 8:28 pm | आदूबाळ
साखरपुडा हे अॅग्रीमेंट नव्हे. ते अॅग्रीमेंट टु अॅग्री आहे.
असं बघा, विसारपावती झाल्यावरसुद्धा व्यवहार थांबवता येतोच ना?
13 Jul 2016 - 5:24 pm | वाल्मिक
हो पण इकडे सामाजिक बदनामी होते
7 Jul 2016 - 8:31 pm | स्रुजा
चौकशी करणे म्हणजे संशय घेणे नाही. आणि लपवण्यासारखं काही नसेल तर तुम्ही का ऑफेंड होताय?
टक्या चा पडद्या वाला प्रतिसाद कळला नाही बाबा.
7 Jul 2016 - 8:32 pm | टवाळ कार्टा
आयाया...इतका पण क्रिप्टिक नाहीये
7 Jul 2016 - 8:36 pm | वाल्मिक
त्यान्ना मी कंपनी चेक करून दिली पण मग नकार दिला होता
साखरपुड्याआधीच सगळे चेक करणे पाहिजे असे माझे मत आहे ,
7 Jul 2016 - 8:39 pm | मुक्त विहारि
ओके.
7 Jul 2016 - 8:54 pm | धनंजय माने
@सृजाक्का,
टक्या येडा झालाय. (जीभेला काही हाड टक्या)
राजस्थानातली पर्दा पद्धत आठवली असेल त्याला.
7 Jul 2016 - 8:59 pm | टवाळ कार्टा
तुम्हाला समजेल याचि खात्रीच होती
7 Jul 2016 - 9:03 pm | धनंजय माने
हम तुमसे उम्र और अनुभव, दोनोंसे बड़े है वत्स!
7 Jul 2016 - 9:07 pm | वाल्मिक
आणि छाती वरचे केस?
7 Jul 2016 - 9:10 pm | धनंजय माने
त्याबद्दल शष्प माहिती नाही. आम्ही सरळ आहोत!
(तू है कौन यार????)
7 Jul 2016 - 9:12 pm | सूड
पण ते शष्पाबद्दल कुठे बोललेत? =))
7 Jul 2016 - 9:13 pm | टवाळ कार्टा
ठ्ठो =))
7 Jul 2016 - 9:15 pm | वाल्मिक
पुष्पा आय हेट टियर्स
7 Jul 2016 - 9:16 pm | धनंजय माने
सर्वांगीण विचार व्हावा असा प्रयत्न. ;)
7 Jul 2016 - 9:17 pm | वाल्मिक
केसांचा ?
7 Jul 2016 - 9:22 pm | अभ्या..
च्यायला सुडक्या कसा घाव घालील सांगता येत नाही.
बेक्कार, अतिबेकार, महाबेक्कार पंच.
पडू पडू हसलो
7 Jul 2016 - 9:24 pm | वाल्मिक
कोण ?
7 Jul 2016 - 9:29 pm | धनंजय माने
शष्प कुणीतरी 'उचलेल' याची खात्री होती म्हणूनच टाकलेला;)
7 Jul 2016 - 7:50 pm | सही रे सई
छातीवरचे केस दाखवलेत
बापरे आजकाल असं पण करावं लागत?
8 Jul 2016 - 11:29 am | वाल्मिक
हो ना
7 Jul 2016 - 7:10 pm | अनुप ढेरे
हेच बोल्तो.
अमुक एका कंपनीत कामाला आहे. इतका इतका पगार आहे अशा थापा मारून लग्न जुळवलेली एक केस माहिती आहे.
7 Jul 2016 - 7:14 pm | वाल्मिक
अहो पण साखरपुड्या आधी बघायचे की नंतर बघायचे ?
7 Jul 2016 - 8:00 pm | मुक्त विहारि
काय बघायचे?
7 Jul 2016 - 8:47 pm | सुबोध खरे
साखरपुड्या नंतर तुम्हाला कुणी सांगितले असते की मुलीचे लफडे होते तर तुम्ही तपासून पाहिले असते की नाही?
7 Jul 2016 - 8:59 pm | वाल्मिक
तेच झाले
8 Jul 2016 - 2:18 pm | कानडा
केस
7 Jul 2016 - 4:44 pm | भोळा भाबडा
तीन आयडी विथ वन बायडी
7 Jul 2016 - 5:14 pm | विनायक प्रभू
फक्त छाती वरचे सांगितले
7 Jul 2016 - 5:16 pm | वाल्मिक
पाठीवर ?
7 Jul 2016 - 5:17 pm | विनायक प्रभू
लेट इमॅजिनेशन फ्लाय
7 Jul 2016 - 5:20 pm | मोहनराव
त्यांची अडकलीये ना पावसात!!
http://www.misalpav.com/node/36590
7 Jul 2016 - 5:20 pm | वाल्मिक
इट्स ओक ,बिन देर ,दॅन that
7 Jul 2016 - 5:43 pm | भीमराव
मापाचे?
मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!
7 Jul 2016 - 5:52 pm | भीमराव
मापाचे?
मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!
7 Jul 2016 - 6:26 pm | ए ए वाघमारे
आमचा वर्हाडी अनुभव (थोडा जाहिरातीसारखा वाटला तरीही):
१. आजचा सगळ्यात मोठा क्रायटेरिआ म्हणजे पुण्यात नोकरी आणि घर. त्यापुढे सात खून माफ. मुलीने आयुष्यभर रिसोड-बाळापूर-इ.इ. सोडून कधी अमरावती,अकोला, नागपूरही पाहिले नसते पण मुलगा मात्र पुण्याचा हवा किंवा मग एकदम फॉरेन.अधेमधे काही नाहीच.
२. यात अजून एक फाईन क्रायटेरीआ म्हणजे मुलगा तर पुण्यात स्थायिक हवा पण आई-वडील गावी राहणारे असावेत.
३. सरकारी नोकरी? ई..ई..ई..सरकारी नोकरीला प्राधान्य हा प्रकार आता इतिहासजमा झाला आहे.आता कॉर्पोरेट जॉब,पॅकेज,बोनस (८.३३%नव्हे बर का!), कॅब,सोडेक्सो का कुठले तरी कुपन्स इ.इ. परवलीचे शब्द आहेत.या जुलै महिन्यात किती डीए वाढतो यावर लक्ष ठेवून असणारे आमच्यासारखे लोक अत्यंत मागास प्रजातीत मोडतात.
४. काही कोकणस्थांकडून आलेला अनुभव (कृ.वैयक्तिक घेऊ नये): आधी लिहायचं पोटजात चालेल.मग म्हणायचं:नाही बाई,आई म्हणते तुमच्याकडे फारच सोवळंओवळं,सतत कुळाचार असतो,सगळा वेळ त्यातच जाईल.मी म्हणालो:बाई,मी स्वत: फक्त वर्षातून हाडपक्षानंतर एकदाच जानवं बदलणारा माणूस.पण नाही.असो.
५. काही मुलींना तर लग्न "कशासाठी?" करतात हेही माहीत नसतं.एकीला मी विचारलं: लोक "ज्यासाठी" लग्न करतात त्याबद्दल तुझं काय मत आहे तर "अं..करायचं म्हणून करायचं" असं निराशाजनक उत्तर. आणि वर "नेमकं" काय करायचं तेही माहीत नाही असंही तिने सांगून टाकलं.तर इथूनही काहींची सुरूवात असते.
६. काय ड्रिंक, स्मोक करत नाही ? सोशल? नाही? ऊं... (एकूण निर्व्यसनी लोक निकम्मे असतात ही समजूत)
७. मुलीच्या पॅकेजपेक्षा मुलाचं पॅकेज जास्त हवं (हे लॉजिक मला काही केल्या समजत नाही.)
एक पुणेक्रेझग्रस्त
अअवा
7 Jul 2016 - 6:30 pm | ए ए वाघमारे
आणि दुखर्या नसेवर पाय ठेवल्याबद्दल धागाकाढत्याचे आभार !
जखम कुरवाळण्यातही एक वेगळे सुख असते.असो.
7 Jul 2016 - 7:08 pm | अनुप ढेरे
उत्क्रांतीचा अभ्यास वाढवा!
7 Jul 2016 - 7:16 pm | वाल्मिक
अभिमान चित्रपट बघा
7 Jul 2016 - 7:35 pm | आदूबाळ
मी तर उलटं ऐकलं होतं. ड्रिंक स्मोक केल्याबद्दल नाकारण्याच्या केसेस.
7 Jul 2016 - 7:41 pm | मोदक
देश बदल रहा है जनाब..
10 Jul 2016 - 4:13 am | रेवती
क्र१. बद्दल सहमत.
10 Jul 2016 - 8:38 am | कैलासवासी सोन्याबापु
वाघमारे साहेब, कोण्या डिपार्टमेंटले हाय थुमी मंग?
अवांतर :- (तरी महत्वाचे)
काही पोरी सब्बन नाही तर काही पोरी नीरानाम म्याट रायतेत वाघमारे साहेब, सध्या अकोल्यात लेटेस्ट ट्रेंड पिंपळे गुरव हाय, पिंपळेगुरव मंदी जर थुमचा 2 बेडरूम असला तर मंग तुम्ही लुळे लंगडे भोकने कानानं डुचके कशे बी राहा ज्यमते तुमचे काम, त्यात जर ऑन साईट वाल्या कंपनी मध्ये अससान तर स्वर्ग 2 बोटे उरला, भाऊ इंटरकास्ट करा नाईतर टू स्टेट्स मॅरेज करा हो :D आमचे तसेच आहे मॅरेज, अकोल्यात आपल्या चारबंगला गौरक्षण रोड साईडच्या एका स्थळाचा लैच खास अनुभव आलेला आहे आपल्याला जमन तसा व्यनि करतो
14 Jul 2016 - 1:34 am | संदीप डांगे
आमाले ध्येनात ठुजा...
14 Jul 2016 - 9:05 am | नाखु
काय घोडं मारलय (न व्यनी करायला) फक्त बोलीभाषेत केले तर काही शब्दांचे अर्थासाठी त्रास द्यावा लागेल हे नक्की.
व्यनी माहीती उत्सुक नाखु
7 Jul 2016 - 7:46 pm | सही रे सई
कुठंवर आलं भाऊ?
लावली हजेरी.
वर आमचा आशिर्वाद घ्या... धागा हजारी होऊ दे
7 Jul 2016 - 9:44 pm | सामान्य वाचक
आहे कि काय
दोन्ही आयडी ना सारखेच प्रॉब्लेम आणि अनुभव आलेले आहेत
7 Jul 2016 - 9:48 pm | टवाळ कार्टा
पातेलं...यक्क...इतकी चिंधीगीरी मी नाही करत =))
7 Jul 2016 - 9:56 pm | सामान्य वाचक
निरीक्षण बरोबर आहे कि नाही?
बाकी किती चिंधीगिरी करू शकता हे काय आपनाला म्हायती न्हाय
7 Jul 2016 - 10:39 pm | वाल्मिक
मला मुली हो म्हणतात राव ,एवढा पण द्राक्षे आंबट असलेला कोल्हा नाहीये मे
7 Jul 2016 - 10:57 pm | संदीप डांगे
आणि टक्याला नाही म्हणतात असे कोणी सांगितले तुम्हाला..?
आमच्या टक्याच्या मागण्याच हटके असल्याने मुलगी मिळत नाहीये... नैतर कट्ट्याचा फोटो फोटोशॉप करायची गरज नसती पडली.
7 Jul 2016 - 11:05 pm | अभ्या..
अयायाय
बघ लका टक्या, आता लग्नाचे फोटो फोटोशॉप करायची वेळ आणू नको म्हणजे बरे. ;)
बाकी अशा काय जगावेगळ्या मागण्या आहेत टक्याच्या?
त्याला पण मुलाच्या छातीवर केसबिस पाहिजेत कि काय?
7 Jul 2016 - 11:11 pm | वाल्मिक
मुलाच्या ?
भागो
9 Jul 2016 - 10:59 pm | धनंजय माने
फोटोशॉप????
तो फोटो शॉप वाटला तुम्हाला? किती बाजू घेताय टक्याची?
अहो झालं काय ते मला विचारा ना! तुम्ही सोनेरी पेयात दंग झालात, इकडे लाडोबा ची आरती करायची म्हणून तिथे आलेला दुसरा मुलींचा ग्रुप होता त्यांना या अनाहितांनी सुपारी दिली. मगकाय, लाडोबाचे दोन्ही हात धरून ओढाओढ नुसती! तेवढ्यात कुणीतरी क्लिक केला तो फोटो. ;)
9 Jul 2016 - 7:52 pm | कविता१९७८
राव??
9 Jul 2016 - 8:43 pm | वाल्मिक
कोणाचे काय तर कोणाचे काय
7 Jul 2016 - 10:49 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
>>8.मुलाच्या छातीवर केस पाहिजेत
अस्वलाशी लगीन करा म्हणावं
9 Jul 2016 - 2:10 pm | कैलासवासी सोन्याबापु
अर्रर्रर्रर्रर्रर्र बेक्कार धुरळा उठलान इथून तर
9 Jul 2016 - 4:23 pm | वाल्मिक
अजून 200 पण नाही झालेत
10 Jul 2016 - 12:16 pm | नमकिन
अनुरूप हवे स्थळ, तर भावकीतंच करा की शोध घेण्यापेक्षा.
अनुरूपता नकारात्मक प्रतिक्रिया झाकण्यास उपयोगी, मराठी अस्मिता सारखे.
शोधले की सापडते वाली नाहीं बरं का!
योग जुळत नाहीं - हे मोघम.
बाकी -बेचा हुआ माल वापिस नहीं लिया जाता - असल्याने नीट तपासून घेणारी सून अभिनंदनीय, कधीही, मधुचंद्रापर्यंत.
10 Jul 2016 - 12:30 pm | वाल्मिक
अहो पण घेण्याआधी तपासायचे की गल्लयावर तपासायचे ?
11 Jul 2016 - 5:15 pm | गामा पैलवान
लोकहो,
>> 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
ही अट वाचून मन प्रसन्न झालं. समाजात सभ्यपणा आजूनही टिकून आहे हे कळून चुकलं आणि जीव भांड्यात पडला. योग्य ठिकाणी थांबल्याबद्दल वधूपक्षाचं अभिनंदन.
आ.न.,
-गा.पै.
11 Jul 2016 - 6:54 pm | वाल्मिक
ते योग्य ठिकाणी नाही थांबले
14 Jul 2016 - 5:38 pm | गामा पैलवान
वाल्मिक,
सगळं उलगडून सांगू म्हणता? अहो, मुलीकडच्यांना पॉर्नस्टार नकोय असं म्हणायचं होतं.
आ.न.,
-गा.पै.
14 Jul 2016 - 5:47 pm | शिद
छातीचे केस व पॉर्नस्टारचा काय संबंध?
आजकाल पुरूष बॉडीबिल्डर, अभिनेता (ए ग्रेड म्हणतोय) किंवा मॉडेल्स देखील अंगावरचे केस सर्रास काढतात.
14 Jul 2016 - 6:50 pm | सूड
कशाला हायपर होताय, ज्याची त्याची समज!!
14 Jul 2016 - 6:04 pm | हेमन्त वाघे
आपण पॉर्न असे बारिकपणे बघता का ?? . पॉर्नस्टार बनण्यासाठी छातीवर केस नसणे ही अट आहे का ?
आपला अभ्यास बघून धान्य झालो
( की आपण अर्ज केला होता ?)
( कृपया हे गमतीने घेणे . जर गंभीर असेल तर बाकिचंग्यांना पण पॉर्नस्टार कसे बनावे याचे मार्गदर्शन करणे )
आपला विनम्र ,
हे
15 Jul 2016 - 12:05 pm | गामा पैलवान
हेमंत वाघे,
अहो, मुलीकडचे लोक अशा नीलफिती बघतात की ज्यांच्यातले स्टार लोकं पार गुळगुळीत झालेले दाखवतात. ;-)
आ.न.,
-गा.पै.
17 Aug 2016 - 1:33 pm | वाल्मिक
काहीही हा गामा