लग्नाचा बाजार

वाल्मिक's picture
वाल्मिक in काथ्याकूट
6 Jul 2016 - 3:50 pm
गाभा: 

इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय

शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव
1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे
2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू
3) चुकून request accept केली
4) सकाळपासून 50 call आले
5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ?
6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू
7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका

आणि सर्वात भयानक

8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

6 Jul 2016 - 3:55 pm | टवाळ कार्टा

इथे मिपाकरणींना सांगा शोधायला...झटक्यात शोधतील

सस्नेह's picture

6 Jul 2016 - 10:45 pm | सस्नेह

कुठल्या काळात अडकलायेस ?
मिपा'करणी' नव्हे मिपा बायका. लिही बघू दहा वेळा !

टवाळ कार्टा's picture

6 Jul 2016 - 10:50 pm | टवाळ कार्टा

अर्रे हो...आय माय स्वारी बर्का...मिपाबायकाच

तुम्हाला कोनता अनुभव सर्वात त्रासदायक वाटला? म्हणजे प्रॉब्लेम कशात वाटला?

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 10:45 pm | वाल्मिक

अजून शोध चालू असल्याने खरा त्रास सुरू व्हायचंय

राजाभाउ's picture

6 Jul 2016 - 3:56 pm | राजाभाउ

बाकीचं ठिक आहे कदचीत. पण

8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे

हे अवघड आहे.

अभ्या..'s picture

6 Jul 2016 - 4:03 pm | अभ्या..

काय अवघड आहे?
नसले तर डॉ. बत्रा हायेच कि, उगवायला

राजाभाउ's picture

6 Jul 2016 - 5:44 pm | राजाभाउ

:) :)

वाल्मिक's picture

9 Jul 2016 - 12:02 am | वाल्मिक

:)

महासंग्राम's picture

7 Jul 2016 - 9:29 am | महासंग्राम

शनिवार पेठेत लावून मिळतात, ओंकारेश्वर मंदिरापासून खाली जा

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 10:12 am | वाल्मिक

शोधले
नाही मिळले

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 4:04 pm | महासंग्राम

ओमकारेश्वर पोलीस चौकी कडून कसब्या कडे जाताना उजव्या हाताला आहे ते दुकान. आमदार बापट यांच्या घरासमोर.

शादी डॉट कॉम वगैरे सारख्या ई-मार्केटप्लेस मॉडेल राबवणार्‍या सायटींचे फायदे पाहिजेत; मग बाजार झाला म्हणून तक्रार कशाला करायची? (माझ्या एका भूतपूर्व बॉसचं कन्सल्टिंगसंदर्भातलं एक अश्लील सुवचन आठवलं. पण ते इथे अस्थानी ठरेल म्हणून देत नाही.)

दादा, बाजार आहे हे स्वतःशी मान्य करा आणि पुढे चला. उगा मनस्ताप करून घेऊन काय साध्य होणार आहे?

5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग ...

टेन्शन घेऊ नका. प्रत्येक सॉफ्टवेअरला अल्गोरिदम असतोच. त्या गाठी डिझाईन फेजच्या स्वर्गात बांधलेल्या असतात. ;)

इरसाल's picture

6 Jul 2016 - 4:17 pm | इरसाल

८ नंबरच काय गोड-बोंगाल आहे ?

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 4:50 pm | वाल्मिक

होते सातारा साईड चे पात्र
मॅडम ना नृत्यनागां व्हायचे होते ,पण मग घर सांभाळणार नाही म्हणून नाद सोडला

अभ्या..'s picture

6 Jul 2016 - 5:14 pm | अभ्या..

नृत्यनागां

आयोव. नागीन डॅन्स. धुरळाच की.
का ते नागा आदिवासी डॅन्स. शिंगाचा टोप घालून चटै गुंडाळून बाल्या टाइप?

पण नृत्यनागां होण्याचा आणि ८ नं. चा काय संबंध?

असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. हाऊ टु ची पुस्तके बिस्तके वाचून, आपल्याकडे केस असतील तर इचार करायचा नाही. नसतील तर छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे अन गप्प झोपायचे.

च्यायला अभ्या भाउ भारीय हे !!

छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे

बेक्कार हसतोय

कोणत्या तरी चित्रपट अशोक सराफ च्या छातीवर नायिका हात फिरवताना बघतील होत

आदूबाळ's picture

6 Jul 2016 - 8:23 pm | आदूबाळ

जंगल बुक?

बोका-ए-आझम's picture

6 Jul 2016 - 9:02 pm | बोका-ए-आझम

हसाकर बोकेकी जान लोगे क्या? =))

बोका-ए-आझम's picture

6 Jul 2016 - 8:40 pm | बोका-ए-आझम

असं तेल आहे? बाकी वटवाघळाच्या तेलाबद्दल ऐकलं होतं काहीतरी. हे तेच तर नाही ना?

हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज झैराती असतात पेपरात. गुडघ्यापर्यंत केस सोडलेल्या बायकांचे फोटो आणि नाव पत्ते असतात.
मेडिकल मधे चालते ओटीसीला फुल्ल.

अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे.
मला क्लिनिकला महाभृंगराज आणि सेसा आठवुन आठवुन हसायला येत होतं =))))

स्मिता_१३'s picture

7 Jul 2016 - 10:33 am | स्मिता_१३

हसुन हसुन मेले. आॅफिसमध्ये लोक बघताहैत हिला काय वेड लागलं का म्हणून :)

पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ क्रिम असतय तस वेगळ तेल का नको, का पुरषांनी बायकांच डोक्याचं तेल वापरायच

संदीप डांगे's picture

7 Jul 2016 - 1:27 pm | संदीप डांगे

मक्काय तर... उगा छातीचे केस गुडग्यापतूर आले तर काय घ्या?

आनन्दिता's picture

7 Jul 2016 - 1:38 pm | आनन्दिता

=))

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 1:40 pm | वाल्मिक

अश्लील अश्लील अश्लील

तुषार काळभोर's picture

7 Jul 2016 - 3:03 pm | तुषार काळभोर

लई बेक्कार!!

छातीचे केस गुडघ्यापर्यंत ... =)))

बोका-ए-आझम's picture

7 Jul 2016 - 7:47 pm | बोका-ए-आझम

वारल्या गेले आहे! =)))

चतुरंग's picture

7 Jul 2016 - 8:19 pm | चतुरंग

खंप्लीट मार्केटयार्ड उठवणारा प्रतिसाद! =)) =))

(महाबुंगराजप्रेमी)रंगा

बॅटमॅन's picture

9 Jul 2016 - 12:14 am | बॅटमॅन

प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =))

तेवढं ते स्मायली पुनरेकवार इनेबल करायचं बघा की ओ.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jul 2016 - 6:57 pm | अत्रुप्त आत्मा

@प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =)) ››› +++ १११. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

वाल्मिक's picture

12 Jul 2016 - 12:37 am | वाल्मिक

207

सूड's picture

7 Jul 2016 - 2:40 pm | सूड

आणि छातीवरचे केस गुडघ्यापर्यंत वाढले तर दोघांना केशभूषा स्पर्धा खेळता येईल !! =))

अप्पा जोगळेकर's picture

7 Jul 2016 - 11:36 am | अप्पा जोगळेकर

अनुभव घेऊन पाहा असे उत्तर द्यायचे की झाले.

इरसाल's picture

9 Jul 2016 - 2:28 pm | इरसाल

नृत्यनागां म्हणजे स्ट्र्रीप्टीज नव्हे नां ?

नृत्य करता करता नागा होणे ?????

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 5:49 pm | धनंजय माने

वाल्मिक.
नृत्यांगना असं लिहा बरं १०० वेळा.

बाकी चालु द्या!

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 6:40 pm | वाल्मिक

शांत शब कथा ?

आपला ते शांत शब्द katha

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 6:51 pm | धनंजय माने

म्हणजे काय ओ?

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 10:54 pm | वाल्मिक

शत शब्द कथा

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 11:23 pm | वाल्मिक

मोजी का नाही

अजया's picture

6 Jul 2016 - 6:12 pm | अजया

असं खरंच लिहिलेलं असतं का?
=)))

कविता१९७८'s picture

6 Jul 2016 - 8:25 pm | कविता१९७८

अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे.

जर काहीही करुन नकारच द्यायचा असेल तर हे कारण चांगलं आहे. समोरच्याला जेव्हा सरळ नाही म्हणणं अवघड वाटत असतं तेव्हा अशा कारणांचा उपयोग होतो. स्वानुभव आहे. मी टेलिव्हिजन क्षेत्रात असताना एका मुलीने या क्षेत्रात फार व्यसनाधीनता आहे असं सांगून नकार दिला होता - मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसताना.

कविता१९७८'s picture

6 Jul 2016 - 8:42 pm | कविता१९७८

व्यसनाचे कारण दिले असेल हे एक वेळ मानुही शकतो पण अशी अट?????

बोका-ए-आझम's picture

6 Jul 2016 - 8:45 pm | बोका-ए-आझम

पूर्वी मुलीचे केस लांब नाहीत म्हणून नकार द्यायचे. आता poetic justice प्रमाणे मुलींनी बाजू पलटवलेली आहे.

वाल्मिक's picture

9 Jul 2016 - 12:18 am | वाल्मिक

छातीवरचे ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jul 2016 - 3:09 pm | राजेंद्र मेहेंदळे

ठो ठो ठो हसलो!

वाल्मिक's picture

16 Jul 2016 - 9:28 pm | वाल्मिक

धन्यवाद

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 9:25 pm | वाल्मिक

ते नकार द्याचे कारण नव्हते
( छातीवर केस असलेला )

वाल्मिक

रेवती's picture

6 Jul 2016 - 9:04 pm | रेवती

नाही गं.
आपल्याकडे पूर्वी डॉट कॉम वाल्या साईटींचा प्रकार येण्याआधी जसे ओळखीतून स्ठळे पाहणे, अपेक्षा विचारणे होत असे त्याप्राकारातला किस्सा आहे. नातेवाईक भेटले होते. त्या बाईंची तक्रार होती की त्यांची मुलगी आलेल्या बर्‍याच स्ठळांना नकार देते, तूच बघ ना विचारून तिच्या मनात नक्की काय आहे वगैरे बोलून झाल्यावर आईने तिला अपेक्षा विचारल्या. त्यात क्र. ८ ऐकून ती गप्पच बसली व मला तेथून घेऊन तडक घरी आली. माझ्या टीनएज मनावर याचा कितपत परिणाम झालाय वगैरे विचारांनी ती धास्तावली होती. आत्ता मलाही लईच हसू आलं, त्यातही अभ्याचे प्रतिसाद वाचायचे म्हणजे आजूबाजूचे लोक आपल्याला वेडं समजायला लागतात इतकं हसू येतं.

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 9:26 pm | वाल्मिक

ती मुलगी मुंबई ची होती ? मूळ सातारा ?

रेवती's picture

6 Jul 2016 - 11:14 pm | रेवती

इंदोर.

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 10:40 am | वाल्मिक

मला वाटलं एकाच नमुना आहे छातीवर केस पाहिजे असणारा ;(

मृत्युन्जय's picture

7 Jul 2016 - 11:25 am | मृत्युन्जय

पण मी काय म्हणतो छातीवर केस आहेत की नाही हे त्या कन्येला लग्न होइस्तोवर कळणार कसे? आणि मग चेक करुनच घेणार असेल तर मुलाने उलटी अट घातल्यास काय करणार?

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 11:27 am | वाल्मिक

त्यासाठी लग्नाची काय गरज ?

आनन्दा's picture

7 Jul 2016 - 1:50 pm | आनन्दा

ठ्ठो!

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Jul 2016 - 7:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

पत्रिकाच बित्रिकाच बघायची असेल तर मग आपापल्या समाजाच्या वधु वर सुचक मंडळात नाव घाला की.

जसे क्षत्रिय समाज, सारस्वत,मराठा ,ब्राम्हण वगैरे. बेस्ट मॅच तिकडेच मिळेल. उगीच चव्हाट्यावर जाहिरात केली की असेच होणार. कारण डॉट कॉम असेल तरी पाठीमागची विचारसरणी बदलत नाही.

आणि छातीवर केस बिस अशा अपेक्षा असतील तर भयानक आहे. उद्या फ्लिपकार्टवर नवरे शोधावे लागतील आपल्या आवडीचे/मापाचे.

भीमराव's picture

7 Jul 2016 - 4:49 pm | भीमराव

मापाचे?
मापाचे म्हन्जे नेमके कशे? जरा ये बी ईस्कुटुन सांगो की!

वाल्मिक's picture

11 Sep 2016 - 6:12 pm | वाल्मिक

नेमके कोणते माप ?

सुबोध खरे's picture

6 Jul 2016 - 8:19 pm | सुबोध खरे

मुलाच्या छातीवर केस पाहिजे
डोक्यावर नसतील तर चालतील काय?

हेमन्त वाघे's picture

6 Jul 2016 - 8:52 pm | हेमन्त वाघे

असे मला कोणीच का विचारले नाही ?? का ??

मग मुलांनी केस असतील तर उघडे फोटो टाकायचे का ?? विचारानेच मळमळायला लागले !

http://i1016.photobucket.com/albums/af281/rakeshjhun/14e88d80.jpg

मी त्यावेळेची सरळ छाती वरचे केस दाखवले होते

दुसर्‍याची अपेक्षा काहीही मूर्खासारखी असेल. आपण त्याला किती बळी पडायचं? मुलींना जसे चालून दाखव, पाय दाखव वगैरे म्हणतात व ते अपमानास्पद वाटते तसेच पुरुषांसाठीही ही गोष्ट अपमानास्पद आहेच! तुम्ही ही अपेक्षा कशाला पूर्ण करता? नंतर तक्रार करायची नाही मग!

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 12:50 am | वाल्मिक

मला त्या अपॆक्षेत मूर्ख पण नाही वाटलं ,आणि त्या मुलीवर तेव्हा प्रेम असल्याने अपेक्षा पूर्ण केली होती

रेवती's picture

7 Jul 2016 - 12:54 am | रेवती

ईऽऽऽ
मग आत्ताच भयानक अपेक्षा म्हणून का उल्लेख करताय.

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 12:57 am | वाल्मिक

भयानक ? मान्य

मूर्खपणा ? अमान्य

केस छातीवर पाहिजे ह्याचा अर्थ मुलातले पुरुषत्व बघायची कसोटी होऊ शकते हा तांत्रिक दृष्टिकोन ,पण कसोटी आगाऊ पानाची आहे

मुलीला चालायला बोलायला जुन्या काळी लावत होते कारण मुलगी पांगळी ,मूक आहे हे बघायला

रेवती's picture

7 Jul 2016 - 12:59 am | रेवती

????
बासच!

तुम्ही विनाकारण चिडत आहेत असे वाटत्ये

छे छे, चिडत नाहीये. हसायचे तरी किती एका दिवसात? बाकी तुमचे चालू द्या!

स्रुजा's picture

7 Jul 2016 - 2:46 am | स्रुजा

ह्या ह्या ह्या.. इकडे कुठे गल्ली चुकलीस रेवाक्का?

रेवती's picture

7 Jul 2016 - 2:59 am | रेवती

चूक झाली. ;)

स्मिता_१३'s picture

7 Jul 2016 - 10:37 am | स्मिता_१३

:)

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 10:39 am | वाल्मिक

:(

हा धागा त्या प्रकारचा आहे. महालोल धागा! ब्रम्ह्यांची लूना, ताम्हिणी घाटातला वाघ आणि सप्तर्षी बाईंच्या मांजरानंतर आता हे अजरामर होणार!

पद्मावति's picture

6 Jul 2016 - 9:36 pm | पद्मावति

मुलींच्या बाबतीत नकार द्यायलाही फनी कारणं देतात हं. चष्मा आहे ( भलेही मुलगी लेन्सेस असेल), गोरी हवी हे क्लास्सीक. आमची मुलगी सामान्य रंगाची आहे सांगितल्यावर सावळी,गहूवर्ण, गोरी का लख्ख गोरी असे चार पर्याय माझ्या वडिलांना दिले गेले होते. त्यामधून एक निवडा म्हणाले...
पण हे माझ्या लग्नाच्या वेळेस नव्वद च्या दशकात. आता काय परिस्थीति आहे हे माहीत नाही..

मनिमौ's picture

6 Jul 2016 - 10:08 pm | मनिमौ

हहपुवा सेसा आणी महाभृंगराज

छाती उघडी टाकूनच मुलगी बघायला जायला पाहीजे.

डोक्यावर केस नसले तरी चालतील? पण छातीवर पाहीजे...

अभ्या..'s picture

6 Jul 2016 - 10:55 pm | अभ्या..

ऊपर चांद का मकान,
नीचे बालोंकी दुकान
असे काहीतरी गाणे आठवले मला. ;)
अनिलकपूर नाहीय्ये यात.

मला जुना रणजीत नावाचा व्हीलन आठवला. त्याने एका चित्रपटात लेदर जॅकेट घातले होते ज्यात फक्त छाती उघडी उघडी होती.

वाल्मिक's picture

26 Jul 2016 - 6:13 pm | वाल्मिक

अमिताभ होता

सूड's picture

26 Jul 2016 - 6:35 pm | सूड

नीचे फुलो की दुकान
उपर गोरी का मकान
जब वो चौबारे से देखे
मेरा दिल हो बेईमान

-इति गोविंदा.

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 11:00 pm | वाल्मिक
धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 11:10 pm | धनंजय माने

अत्यंत केसाळ धागा! फार च 'गुंतागुंत' आहे.

बोका-ए-आझम's picture

6 Jul 2016 - 11:22 pm | बोका-ए-आझम

मोजी परत आले!

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 11:24 pm | वाल्मिक

आता पर्यन्त एक डझन लोकांची आठवण मला पाहून आलीये
नशीब कोणी तात्या नाही म्हणाले

धर्मराजमुटके's picture

7 Jul 2016 - 12:04 am | धर्मराजमुटके

कायेक्की एकाची चप्पल दुसर्‍याला वापरता येते मात्र एकाचे अंतर्वस्त्र दुसर्‍याच्या मापाचे असले तरी काही कारणास्तव ते वापरता येत नाही. लग्नाच्या अनुभवांचे अगदी तस्सेच आहे. वरुन अनुभव एकसारखे दिसत असले तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि युनिक असतो. तस्मात पास !
तरीही मार्गदर्शन हवेच असेल तर बाबा वाड्यावर या ! (निळु फुले स्टाईल)

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 12:06 am | टवाळ कार्टा

बाबौ...काय ती उपमा =))

धर्मराजमुटके's picture

7 Jul 2016 - 12:10 am | धर्मराजमुटके

उपमा की अतिशयोक्ती अलंकार ? कुणास ठाऊक ? मराठीच्या मॅडमला जाऊन विचारले पाहिजे परत एकदा !

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Jul 2016 - 12:06 am | माम्लेदारचा पन्खा

लग्नासाठी "आशाळभूत" लोकांनी "केसाळ भूत" कसं व्हावं हाच मूलभूत प्रश्न आहे !

तुम्हीही डोकं लढवून काहीतरी हटके अटी काढा आता....आम्ही मदत करू....

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 12:07 am | वाल्मिक

आपण ही अट नाही टाकू शकत ब्वा

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 12:12 am | टवाळ कार्टा

म्हणजे छातीवर केस असणारी मुलगी हवीये??? बाबौ =))

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 12:14 am | धनंजय माने

या खुदा, उठा ले!

आमची पार्वती पाठवू का?

नावातकायआहे's picture

7 Jul 2016 - 8:34 am | नावातकायआहे

आमची पार्वती? =))

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 10:12 am | वाल्मिक

अशी ही बनवा बनावी बघा

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 1:41 pm | धनंजय माने

ते ज़रा चूक झाली,
आम'चा' पार्वती पाठवू का असं हवं होतं.
- धनंजय माने

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 1:43 pm | वाल्मिक

आमचा नाही
"माझा बायको "

ही पब्लिक प्रॉपर्टी नाहीये हो

अरे अट आहे ती आहे पण ती पुरी होणार की नाही हे कसं कळणार? बघण्याच्या कार्यक्रमात मुलाला काय सलमान खान सारखं शर्ट काढुन नाचायला लावणार की काय?

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 12:14 am | वाल्मिक

माँट्रीमनी वर नेहमी सारखे बघायचे प्रोग्राम होत नसतात
मुले मुली सरळ जाऊन भेटता

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 12:15 am | टवाळ कार्टा

कै सांग्तो

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 12:17 am | वाल्मिक

तू कै बोला ?

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 12:22 am | धनंजय माने

>>>माँट्रीमनी
मॉन्टेसरी म्हण त्यापेक्षा....

अन म्हणे माझं लगीन करायचं.

तुम्ही एकदा मॅट्रिमोनी वर फेर फटका माराच ,निम्म्या वर प्रोफिले मध्ये शुद्धलेखन नसतंच

टाका ला विचार पाहिजे तर

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 12:34 am | धनंजय माने

असो!

बोका-ए-आझम's picture

7 Jul 2016 - 12:38 am | बोका-ए-आझम

सँपल देऊन डीएनए टेस्ट करणार बहुतेक! ;)

आज लग्नाचा बाजार उठतोय बहूतेक. मिनिटाला प्रतिसाद हाय राव

राजाभाउ's picture

7 Jul 2016 - 11:14 am | राजाभाउ

महालोल धागा.
८ मधल्या ७ अपेक्षांबद्दल कोणी फारसं बोलत नाही क्रं ८ ने मात्र बाजार उठवला. त्या पांढर्या कागदावर काढलेल्या काळ्यां टिंबाच्या गोष्टीची आठवण झाली.

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 11:16 am | वाल्मिक

त्याहून जास्त बाजार मी कोण ह्यावर उठलाय

सुबोध खरे's picture

7 Jul 2016 - 11:27 am | सुबोध खरे

मग एकदा सांगूनच टाका तुम्ही कोण. नंतर म्हणाल "तो मी नव्हेच"

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 11:47 am | वाल्मिक

मी विजू खोटे

परत परत तेच झाड पकडणारा ना?

अरे काय हे... कित्ती हसवालं....... तरी नशिब सर नाहियेत ऑफ्फीसमध्ये, नाहितत माझं काही खरं नव्हतं आज...

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 11:32 am | धनंजय माने

असा प्रकार झाला तर...

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jul 2016 - 3:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

जरा सविस्तर सांगा की

माझ्या पाहण्यात आलेल्या काही मागण्या
१) मुलाचे स्वतःचे घर असावे पण होमलोन नसावे.
२) घरात आजेसासु, सासरे नसावेत कारण काय? तर हे लोक बेडरिडन होतात मग त्यांचे सगळे करावे लागते.
३) छातीवरच काय अंगावर केस नसावेत. असल्यास वॅक्सिंग करुन घ्यावे.
४) दर महिन्याला बाहेर फिरायला जावे. बाहेर म्हणजे शहरातल्या शहरात शॉपिंग, हॉटेलिंग नव्हे तर महाबळेश्वर, गोवा, उटी वगैरे ठिकाणी फिरायला जावे.
५) नवरा मुलगा घरातला मोठा मुलगा नसावा. कारणः सासु-सासर्‍यांनंतर सगळे कुळाचार करावे लागतील.
६) मुलगी सेंट्रल लाईन वर राहणारी असेल तर मुलगा पण सेंट्रलचाच हवा. कारणः माहेरी जाताना जास्त प्रवास करावा लागत नाही.

मुलींना सासू नकोय पण स्वतःचे आई वडील पाहिजे
मुलीच्या वडिलांना मात्र व्याही पाहिजेतच

मी असे पण बघितले की मुलीला शेती मध्ये काम करायचे नाही पण मुलगा शेती वाला पाहिजे

सस्नेह's picture

7 Jul 2016 - 12:02 pm | सस्नेह

बाजारात फेरफटका मारला.
गरगरायला लागले...
अ

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 1:45 pm | धनंजय माने

शतकी धाग्यानिमित्त वाल्मिक यांना एक मुंग्यांचे वारुळ, छातीवर लावायच्या केसांचा विग आणि एक नटराजाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे!

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 1:52 pm | वाल्मिक

एक प्रेयसी फक्त पाहिजे हो

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 1:58 pm | धनंजय माने

ती पण आम्हीच द्यायची का?
ठीक, तीही देऊ. शबरी स्टाइल ने चालेल का?

राजाभाउ's picture

7 Jul 2016 - 2:17 pm | राजाभाउ

शबरी स्टाइल ने !!!

विस मोड ऑन
हा शुद्ध अश्लील पण आहे
विस मोड ऑफ

ह.घ्या.

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 2:26 pm | वाल्मिक

हा शुद्ध हलकट पण आहे माने

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jul 2016 - 8:43 am | कैलासवासी सोन्याबापु

इ सब का बकर हो राहैस भाईबा! उधर उ सबरीया स्वर्ग मा बेहोस हो गौवा!!

धनंजय माने's picture

10 Jul 2016 - 9:00 am | धनंजय माने

अब का बताइये ससुरा? वाल्मिक जो कही उ का उसे शोभा देत रही? ई कलजुग का वाल्मिक तो हमै भी कलजुग का सबर! कोनो फरक नाही पडत उ बुडबत का|

मोहनराव's picture

7 Jul 2016 - 1:58 pm | मोहनराव

प्रेयसी पाहिजे का बायको पाहिजे ते नक्की करा.. :)

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 2:09 pm | वाल्मिक

बायको मधेच प्रेयसी असते

स्वप्नज's picture

9 Jul 2016 - 7:43 pm | स्वप्नज

अजून कोणकोण असते ????

वाल्मिक's picture

11 Jul 2016 - 12:18 pm | वाल्मिक

मॆत्रिण

'छातीवर लावायच्या केसांचा विग'

लोळुन लोळ!!

राजाभाउ's picture

7 Jul 2016 - 2:21 pm | राजाभाउ

+११११

अनिरुद्ध प्रभू's picture

7 Jul 2016 - 2:39 pm | अनिरुद्ध प्रभू

पार मेलो.....

हल्ली हे काम तुम्ही घेतले का?

ते नृत्यनागां वाचून खुर्चीतून सांडलो.

त्यामुळेच पावसाळ्यात जास्त बाहेरचे खाणे बरे नाही हो

अनिरुद्ध प्रभू's picture

7 Jul 2016 - 2:40 pm | अनिरुद्ध प्रभू

बाकी केस वाढवायचे उपाय ही उत्तम हो......सल्ल्यांचे दुकान टाकायला हरकत नाही.....

पामर's picture

7 Jul 2016 - 4:12 pm | पामर

एका कोल्हापुरच्या मुलीने तर मला सॅलरी स्लीप अन इन्कम टॅक्स रिटर्न्स मागितले होते कारण तिला माझ्या उत्पन्नाची खात्री करुन घ्यायची होती. :)

मी-सौरभ's picture

7 Jul 2016 - 7:12 pm | मी-सौरभ

तुम्ही दिलीत का?

स्रुजा's picture

7 Jul 2016 - 7:38 pm | स्रुजा

लोकं चक्क खोटं बोलतात मुलाच्या इन्कम बद्दल. खात्री करुन घेणे चुकीचे नाही. खात्री कशी करायची हे टॅक्टफुली ठरवावे ज्याने त्याने.

वाल्मिक's picture

8 Jul 2016 - 12:02 pm | वाल्मिक

मुली कडचे पण बोलतात

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 4:23 pm | वाल्मिक

एवढेच ?
गावाकडची मुलगी
MBA करून नोकरी नाही ,बापाच्या ओळखीचे HR लागली
सॅलरी स्लीप मागते ,कंपनीत फोन करते हा माणूस खरंच कामाला आहे का ,आणि साखरपुडा ठरवते मग परत तिचा रिकामटेकडा भाऊ येऊन कंपनी चेक करतो

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 4:24 pm | टवाळ कार्टा

यात चूक काय?

राजाभाउ's picture

7 Jul 2016 - 4:45 pm | राजाभाउ

बरोबर आहे कि मग.
उलट अशी सगळ बघुन, सवरुन निर्णय घेणारी मुलगी बायको म्हणुन मिळाली तर उत्तम संसार करेल की

साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी बघणार की नंतर ?
त्या वेळी मी सुट्टीवर असतो तर त्यांनी नकार कशावरून दिला नसता?

गंम्बा's picture

7 Jul 2016 - 5:07 pm | गंम्बा

बरोबर आहे कि मग.
उलट अशी सगळ बघुन, सवरुन निर्णय घेणारी मुलगी बायको म्हणुन मिळाली तर उत्तम संसार करेल की

सहमत...

साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी बघणार की नंतर ?
त्या वेळी मी सुट्टीवर असतो तर त्यांनी नकार कशावरून दिला नसता?