ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग २ : मंडले भाग ३ : बगान भाग ४ : रंगून भाग ५ : लोकजीवन
थाईलँड भाग ६ : बँकॉक व परिसर भाग ७ : सुखोथाई
लाओस भाग ९ : सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर भाग ११ : अंगकोर वट
थाईलँड म्हंटले की शक्यतो बँकॉक व समुद्र असेच समीकरण असते. या भागात उत्तरेकडील बव्हंशी अपरिचित असलेल्या भागाची सफर.
उत्तर सयाम तुलनेत दुर्गम आहे. डोंगराळ भागात अनेक आदिवासी जमाती अजूनही पारंपरिक पद्धतीने जीवन व्यतीत करतात. तशी मोठी शहरे या भागातही आहेत, मेकाँग नदीच्या सुपीक खोऱ्यातील प्रदेश असल्याने सुबत्ताही आहे. इतिहासात वेगवेगळ्या जमातींचे येथे वर्चस्व असल्याने मुख्य सयाम पेक्षा येथील लोकजीवन वेगळे जाणवते. प्राचीन काळी हिंदू राज्ये असलेला हा प्रदेश कालांतराने कधी ब्राह्मी तर कधी लाओ, व अलीकडे थाई सत्तेच्या अंमलाखाली आला. आजही येथे गणेश, ब्रह्मा, लक्ष्मी व इंद्र या प्रमुख देवता आहेत. मूर्तिपूजा व उपचारांची लोकांना आवड आहे.
फित्सानुलोक (विष्णुलोक): सयामचा सद्य राजवंश या स्थानाशी निगडित असल्यानेही याला वेगळे महत्व आहे. या शहरात देशातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध मंदिरांपैकी एक, श्री रत्तन महाथाट हे मंदिर आहे. प्रसन्न अशी बुद्धाची सोन्याची मूर्ती व भिंतीवरील सुवर्णरेखन उल्लेखनीय! ख्मेर शैलीतील शिखर, थाई पद्धतीचा मंडप हे स्थापत्य विशेष. सुखोथाई व सी सत्चनालई ही प्राचीन नगरे येथून जवळ आहेत.
फित्सानुलोक येथील श्री रत्तन महाथाट मंदिर, अयुत्थया-ख्मेर शैलीतील शिखर.
सुवर्ण बुद्ध सुशोभित मंदिर
सुवर्ण बुद्ध
राजाची छोटी सुवर्णालंकृत प्रतिमा, दोन बाजूंना रत्नजडित राजमुकुट व अलंकृत हस्तिदंत
वाटेत एक ठिकाणचे पारावरचे देवालय.
च्यांग राई : उत्तर सीमेवरील एक महत्वाचे शहर. लाओ, ब्राह्मी व थाई संस्कृतीचा मिलाफ या प्रदेशात पाहावयास मिळतो. दूरवर पसरलेली भात शेती व क्षितिजावरच्या डोंगररांगा यामुळे हा प्रदेश अतिशय नयनरम्य आहे. आजूबाजूस असणारी खेडीदेखील स्वयंपूर्ण व समृद्ध आहेत.
श्वेतमंदिर, च्यांग राई - आधुनिक काळातील पारंपरिक स्थापत्यशैलीत बांधलेले हे मंदिर प्रमुख पर्यटक आकर्षण आहे, पण लांबूनच छान दिसते. मला फारसे भावले नाही
ब्लॅक हाऊस किंवा 'बान डॅम' ही एका कलाकाराची कल्पनानगरी आहे. आधुनिक व पारंपरिक पद्धतीच्या मिलाफाने थवान दुशानी नावाच्या येथील प्रसिद्ध कलाकाराने ही वास्तूशिल्पे साकारली आहेत.
ब्लॅक हाऊस
ब्लॅक हाऊस
ब्लॅक हाऊस
ब्लॅक हाऊस
च्यांग सान - मेकाँग च्या किनाऱ्यावर वसलेले लाओस सीमेवरील हे छोटेसे प्राचीन नगर. काही भग्न स्तूप व तटबंदीचे अवशेष आजही पाहावयास मिळतात.
वट पा साक प्राचीन स्तूप
राजाचा पुतळा व मागे ऐरावतारूढ इंद्र, लक्ष्मी, नाग, गरुड, हनुमंत इत्यादी देवतांच्या प्रतिमा.
वाटेतले एक साधेच पण सुंदर पुरातन मंदिर
में साई - हे सयाम चे उत्तरेकडील टोक. ब्रह्मदेशाच्या सीमेवरील हे महत्वाचे व्यापारी केंद्र. आयात-निर्यात उद्योगामुळे बरीच भरभराट झालेली येथे दिसून येते. तसेच सीमावर्ती नगरांचे तस्करी, गुन्हेगारी, घुसखोरी इत्यादी रोगही इथे आहेतच. परंतु निसर्गाचे वरदान असल्याने अतिशय नितांत सुंदर असा हा प्रदेश आहे.
उत्तर सीमेवर एक टेकडीवरील स्तूप
इंद्राचे मंदिर
मंदिराबाहेरील गणेशमूर्ती, मागील टेकड्या ब्रह्मदेशाची हद्द.
मंदिरातील उत्सवातले देव दानव मुखवटे
नदीकाठच्या कुठल्याशा खेडेगावात…
पुढील भागात 'सुवर्ण त्रिकोण' व लाओस भेट
मेकाँग प्रथम दर्शन…
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान
प्रतिक्रिया
13 Jul 2016 - 6:55 pm | अभिजीत अवलिया
सुन्दर ...
13 Jul 2016 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीप्रमाणेच अप्रतिम प्रकाशचित्रांनी भरलेले प्रवासवर्णन ! पुभाप्र.
14 Jul 2016 - 11:54 am | पैसा
या भागाबद्दल आपल्याला फार माहिती नाही हे दर वेळी लक्षात येते आहे! तुम्ही भटकंतीसाठी हा देश निवडला हेच विशेष आहे!
14 Jul 2016 - 12:02 pm | एस
युरोप-अमेरिकासारख्या क्लिशे भटकंतीपेक्षा हे असे प्रदेश जास्त भावतात. छायाचित्रे नेहमीप्रमाणेच सुंदर.
14 Jul 2016 - 2:36 pm | कवितानागेश
खूपच आवडले.