दिल्ली ते दिल्ली ! भाग - ३

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
27 Jan 2009 - 12:20 pm

आम्ही लगेच ( ?) निघालो व काही तासातच ठाण्याला पोहचलो.
मागील भाग 
ठाण्याला पोहचल्यावर मला पहिल्यांदा कळाले की वंदना हे नाव बस स्थानकाचं देखील असू शकते....  लवकरच  रिक्षा पकडुन आम्ही मार्गस्थ झालो.. लुईसवाडी.  भव्य अश्या अपार्टमेंट जवळ पोहचु पर्यंत प्रभु आम्हाला मोबो वर  मार्गदर्शन करतच होते... लिफ्ट द्वारे ४थ्या मजल्यावर पोहचलो, दरवाजा उघडा ठेऊन एक वयाने आजोबा सारखे व्यक्ती बसलेले दिसले व आम्हाला बघताच ताडकन उठून आले व आत या म्हणत... आत घेतले !  काही क्षणामध्ये ओळख-पाळख झाली निलकांतने माझी ओळख करुन दिली व क्षणार्धात प्रभुने कट्टा चालू केला.प्रभु " सर्वसाक्षी, विजुभाऊ, टार्या व रामदास येतीलच आता." मी " ह्म्म."  प्रभु " तु मिपावर का दिसत नाहीस ?"  मी " हम्म नाही, असंच थोडंस मतभेद" प्रभु " का ?"  मी "२६/११ च्या वेळी तात्याशी भांडलो, लेखन अप्रसिध्द करण्याच्या मुद्द्यावर. मतभेद बाकी काही नाही"   त्यानंतर शब्दशः दहा मिनिटामध्ये किस पाडणे ह्या वाक्यप्रचाराचा पुर्ण अर्थ मला समजला ;)  माझे एक वाक्य प्रभुची दहा उत्तरे ! " तुझ्या बाबाचं काय जातं ? " इति प्रभु.  पंधरा मिनिटे निलकांत व मी एकत बसलो.."मी चुकलो... मला माफ करा... मी पुन्हा असं नाही करणार...." असे बोंबलावे असा आत्माचा आवाज मला येऊ लागला होता... तोच फोन वाजला व प्रभु फोनशी चिटकले.. त्यामुळे जरा माझा आत्मा व मी दोघे पण चिंतन करु शकलो.  हात पाय धुन घेतले व मस्त पैकी एक ग्लास रिचवला पाण्याचा.... तेव्हा कुठे समाधान वाटले...  दरवाजाला लागूनच लिफ्ट होती... त्यातून चित्रविचित्र आवाज आले..  तोच प्रभु म्हणाले " आले.. साक्षी व रामदास आले.. त्यांचा फोन होता..."  तोच दोन महापुरुषांचे आगमन झाले, राम राम - नमस्कार , साक्षी साहेबांनी आपले नेहमीचे हत्यार  (कॅमेरा) काढून समोरील... टेबलावर ठेवले.. व बाजूला पडलेली प्रवासाची माझी बॅग पाहून प्रभुनां विचारले " कुठे प्रवासाला ? " प्रभुने माझ्या कडे उंगलीदर्शन करुन सांगितले " ही त्याची.. राज जैन"  मी " सर्वसाक्षी साहेब, मी तुमचा मनोगत पासूनचा चाहता... तुमचं लेखन आवडतं बरं मला खुप."  आपला नेहमीचा मस्का ट्राय !हसून " अच्छा... तुमच्या प्रतिक्रिया असतात.. "  आपल्या मस्काची वाट लागलेली पाहून मी तीच गोळी परत रामदास बुवा कडे पण फिरवली.. ते पण आपले स्मित हास्य करुन गप्प... मी मोठ्या प्रमाणे विचार करुन तोंड बंद ठेवले व त्यांच्या गप्पा मध्ये रस घेऊ लागलो....  तोच कोणी तरी म्हणाले " तुम्हीच का राज जैन ? वाटत नाही तुमच्या कडे पाहून"  मी त्यां सर्वांची नजर चुकवून राहीलेली गेम पुर्ण करत होतो मोबो मध्ये... मी कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहीले... समोर रामदास-प्रभु-साक्षी-विजुभाऊ-निलकांत  कोणी प्रश्न विचारला ते काही कळाले नाही तरी पण हसून सगळ्याच्या कडे पाहीले व म्हणालो " हो मीच आहे.... पण हा प्रश्न का बरे ? " तोच प्रभुंचा फोन वाजला... मी वाचलो ... !   प्रभु म्हणाले "अरे लेका ल म्हणजे ... लंडनचा  ;) " एवढेच आम्ही एकले व मी व रामदास ह्याचा हास्य कार्यक्रम चालू झाला..." टारझनचा होता... फिरतो आहे आपल्या जेन बरोबर लेकाचा इलिफंटा वर... तीन वाजताच सांगितले होते की टायमात ये म्हणून आला तर ठीक... मी आता फोनच नाय करत."- प्रभु.
आत किचन मध्ये... काकु काही तरी तळत होत्या.. व त्याचा मंद असा सुवास बाहेर बैठकी मध्ये दरवळत होता... व पोटाले उंदिर जागे होऊन उड्या मारुन लागलेच होते तो पर्यंत पुन्हा लिफ्ट वाजली.... व तात्या आले... ! ती भरभक्कम काया मी प्रथमच पाहत होतो.... फोटो मध्ये खुपच बारिक दिसतात बॉ तात्या... ;)   माझ्या बलदंड व राक्षसी देहा समोर तात्यांचा देह म्हणजे काय ? मी उंदीर ते हत्ती !  त्यांना पण नमस्कार चमत्कार करुन झाले.. ते पण आपल्या जागे वर बसले ... पण मी जाणार आहे मी जाणार आहे लवकर.. क्लाइंट कडे जाणे आहे.. पैसाचा मामला असे काही तरी बडबडत बसले... ! प्रभु म्हणाले " बस रे. जाशील. हे सर्वसाक्षी पण परोल वर आले आहेत... "  सर्वसाक्षी " हो कुटूंब गेलं आहे हळदी कुंकु करायला.. तो पर्यंत पेरोलच आहे... बाकी आठ ला मी पण जाणार.."
रामदासबुवा तर खुप मितभाषी आहेत बॉ... आमच्या बडबड्या ग्रुप मध्ये.. निलकांत-विजुभाउ व हे गप्पचुप ! त्यांचा लेख आला होता चित्रलेखा मध्ये... व तो चित्रलेखा माझ्या बॅग मध्येच होता त्याचा आधार घेऊन मी त्यांचे अभिनंदन केले व लेख छान असल्याची माहीती... ! त्यावर ते पुन्हा हसून गप्प !   तोच किचन मधून बिस्किट आंबाडे घेऊन आले ... मला तर तो उडीद वड्याचा लहान भाऊ असावे असेच वाटत होते पण गोळे मस्त होते... हिरव्या मिर्चांची चटणी व बिस्किट आंबाडे जबरा.... ! एक.. दोन..तीन... असे अगणित पोटात सरकवल्यावर पोटाराम शांत झाला माझा.. !   काकुंची व आपल्या मुलाची अभिषेक ची ओळख करुन दिली प्रभुंनी.... आम्ही नमस्कार केला...  तात्याने दंडवत घातला... आम्हाला आपल्यात असले संस्कार का नष्ट झाले ह्याचा विचार करण्यास एक संधी मिळाली... मी पुढे होऊन नमस्कार घालावा हा विचार करत होतोच.. पण काकु किचन मध्ये.. काय तर सुर-सुर वाजले म्हणून आत गेल्या... व माझा संस्कार दाखवा कार्यक्रम तेथेच बंद पडला..
पुन्हा चर्चेची गाडी मी मिपावर नसल्याच्या मुद्द्यावर.....  रामदास " तुम्ही मिपावर दिसत नाही आजकाल " प्रभु " येडझवा आहे.." साक्षी " हो तुम्ही दिसत नाही"  तात्या " सोडून गेला आहे... "  मी  एकाद्या निर्लज गुन्हेगारासारखा हसत " नाही हो... येतो आहे.. येणार आहे... " म्हणत ... म्हणालो " तात्या, क्लास झाला आहे.. परवा दिल्ली पोहच्लो की लॉग इन होतो.. " ... विजुभाउ पण हसत म्हणाले " ह्म्म.. पाहू"   तात्या पण " पाहू"  असे म्हणुन पण तात्या मी निघतो, असे सांगून पार झाले !
पुन्हा फोन प्रभुचा.. " आला... येईल आता लगेच टार्या... त्याला घेऊन येतो मी... बसा.." अहो आम्ही पण येतो " साक्षी साहेब पण चला मी पण येतो असे म्हणून.. मागे मागे... त्याच्या मागे रामदास बुवा... त्यासर्वांच्या मागे निलकांत.... आता मोकळ्या हॉल मध्ये मी बसून काय करु.... व काही तरी पोटात गेल्यावर धुराडे काढणे जरुरि म्हणून मी पण त्याच्या मागे मागे... प्रभु सर ह्या वयात देखील  ;)  सर सर चार मजले उतरून खाली गेले... पाय-यांनी... ! मला स्वतःची लाज वाटू नये म्हणून मी-विजुभाउ-निलकांत... सर्वजण देखील त्याच्या पाठी मागे पाय-या उतरुन खाली गेलो... !
जवळच असलेल्या टपरी वरुन प्रत्येकांने आपापले सामान घेतले व चर्चा पुन्हा रंगू लागली... दोन एक धुराडे सोडून होऊ पर्यंत साक्षी साहेबांनी सुभाषचंद्र बोस ह्याच्या बद्दल तसेच काही अनाम क्रातिंवाराबद्द्ल उत्तम माहीती सांगितली !  पाच मिनिटात दर्शन देणारा टारझन साडे पंचवीस मिनिटे झाली तरी लापता होता..  पुन्हा गाडी माझ्या विषयावर आली... व माझा व्यवसाय पोटापाण्याचे हाल ह्यावर एक अत्यंत महत्वपुर्ण तथा गहन चर्चा झाली.. मुद्दे एकदम राष्ट्रीय स्थराचे म्हणजेच दिल्ली कडील होते म्हणून त्यावर आधी काही लिहीत नाही गुप्ततेचा भंग होतो... मध्येच रामदास बुवांनी शेयर मार्केट कधी वर जाइल असा प्रश्न करुन मला यार्कर टाकला... पण मी पाच्-सात वर्ष झाली मराठी महाजाल विश्वावर वावरत आहे त्यामुळे असले यार्कर अपेक्षीत होते पण रामदास बुवाच माझी मागून विकेट घेतील ही मनात जरा ही कुशंका नव्हती... पण विकेट पडलीच होती.. काय तरि सांगायचे म्हणून.. मागच्या आठवड्यात.. तासभर बसून तयार केलेल्या मार्केट रिपोर्ट मधीले एक पेटेंट वाक्य टाकले... होईल वर होइल.. पण सत्यम मुळे गोंधळ वाढला आहे... पाहू काय होतं ते" असे थातुर्-मातुर उचारून मी माझी लंगोटी संभाळली !  तोच पुन्हा मोबो वाजला प्रभुचा व तो आला.. घेऊन येतो असे म्हणन टांगा टाकत  (उंची मुळे चालत गेले हे वाक्य येथे चांगले दिसत नाही) गेले त्यावेळी मी पाहीले अरे हे तर बरमुड्यावर गेले... पॅन्ट घालायला विसरले की हा देखील समुउपदेशातील एक उपदेश.. लाजू नका. ! पण माझ्या मनातील प्रश्न मी तीथेच गिळला व पुन्हा चर्चेत सहभागी झालो... तो पर्यंत निलकांत व साक्षी ह्यांची गाडी लई पुढे गेली होती व मुद्दे काहीच कळत नव्हते... हे पाहून मी पुन्हा एक धुराडा सोडला व निचिंत पणे उभा राहीलो...
प्रभु ज्या वेगाने गेले होते त्याच वेगाने एकटेच परत आले.. टार्याला विसरलेली काय ? असा बाळबोध प्रश्न माझ्या मनात आला पण येवढ्या वयस्कर  ;)  मानसाला कसे विचारावे म्हणून गप्प बसलो... तोच मागून एक रिक्षा दिसली व दोनचार टन वजन भरले असावे ह्या प्रकारे हळू हळू.. पुढे येत होती... मी विचार करतच होतो... की वाहतूकीच्या साधनातून लोक आपले वजनी सामानाची का ने-आण करतात, मुंबई मध्ये काही कायदा आहे का नाही.. हा प्रश्न मी निलकांतला विचारावे म्हणून सारावलो होतो तोच.. त्याच रिक्षातून... एक सुकुमार... नवयुवक आपले एक ट्नी धुड सांभाळत बाहेर पडला... व रिक्षावाल्याला पैसे देऊन आमच्या कडे पाहून हसू लागला..  व प्रभु सरांच्या कडे आला...  ह्याला कुठे तरी पाहीला आहे हा विचार डोक्यात घण घालू लागला व सर्वाच्या खरडवह्या डोळ्यासमोरुन काढल्यावर टारझन म्हणजे हाच नमुना ह्यावर शिक्कामोर्तब केला.
" अरे हेच काय राज जैन, वाटत नाय यार..."  असा चार-पाच वेळा माझा उलेख त्याने केला व ह्याला उचलून चवथ्यामाळावरुन सरळ ग्राऊडला टाकावे ह्यासाठी माझे हात सळसळू लागले पण मी ६० किलो तो ६०० किलो कुठ पेलवणार ह्या व्यवसायीक हिशोबाने मी तो विचार रद्द करुन त्याच्या विनोदाला दाद दिली.   :D  थोड्या वेळाने टार्याची पण पोट पुजा झाली ( त्याच्या गळ्यातच चिकटले असेल... पोटापर्यंत पोहचलेच नसेल पण .. राहु दे)  पुन्हा एकदा अभिषेक ची ओळख परेड झाली व गाडी त्याच्या शिक्षणावर पोहचली... !  अभिषेक कडे पाहून व त्याचे शिक्षण पाहून आनंद झाला... त्याने कुठला तरी उच्च कोर्स लावला आहे व त्या कोर्स साठी फक्त १०० सिट साठी काही शे अर्ज होते त्या पण  हा पहिल्या पाच मध्येच निवडला गेला असे काहीतरी मला कळाले ( आम्ही दहावी पास... ते पण.. कसे दे देवालाच माहीत.. त्यामुळे त्याची डीटेल देऊ शकत नाही) 
वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही.. एक निलकांत सोडला तर बाकी सगळे मला नवीन होते व त्यांना मी नवीन पण जसे काही वर्षापासूनचे जुने सवंगडी बोलावेत वागावेत असे सगळे वागले... खुप आनंद झाला.... ! कधी मधी साक्षी साहेबांनी एकदोन फोटो क्लिकले ... ! व रामदास-साक्षी-प्रभु-विजुभाउ एका गुप्त मिटींग ला जाण्यासाठी व निलकांत-टार्या पुणे ला जाण्यासाठी व मी दिल्ली ला जाण्यासाठी बाहेर पडलो... !
प्रभु, निलकांत, विजुभाउ, साक्षी साहेब, तात्या व रामदास बुवा ह्या सर्वांनाच भेटून आनंद झाला ! असेच आपण नेहमी भेट राहू हा आशावाद घेऊन मी.. मिपावर पुन्हा लिहते झाल्यावर काय काय फाडायचे व काय काय शिवायचे ह्याचे प्लान करत आपल्या ट्रेन कडे रवाना झालो !
 
हुश्श !!!
 
समाप्त !
 
पण ह्यावेळचा माझा प्रवास माझ्या जन्मभर लक्ष्यात राहील मी एक-दोन नाही तर चांगले ९ मिपा करांना भेटलो... चार जनांशी फोनवर बोललो ! सगळेच फंडू आहेत... सगळे आपापले व्यवसाय-काम- धंदे संभाळत असे एक दुस-यांना भेटत असतात हे पाहू धन्य झालो.. ! याहू ग्रुप वर शेकडोंनी मित्र व जीमेल मध्ये काही हजार आयडी पण कोणाशी भेटावे.. कोणासाठी आपला कामधंदा सोडून जावे एवढी आत्मीयता मला कधीच झाली नाही पण मिपावर ती आत्मियता निर्माण झाली व अनेक वर्षापासून अमराठी मित्राच्या गराड्यात हरवलेला राज जैन... परत आपल्याच मातीच्या... भाषेच्या मित्रांच्या जगात आला... हे पाहून त्या देवाला देखील आनंद झाला असेल... !
 

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

अवलिया's picture

27 Jan 2009 - 12:29 pm | अवलिया

मस्तच कथा रे...

आता बाकीच्या पण पूर्ण कर

अवांतर - जवळच असलेल्या टपरी वरुन प्रत्येकांने आपापले सामान घेतले. वा! सामान लपवायला चांगली जागा आहे.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

शेखर's picture

27 Jan 2009 - 12:30 pm | शेखर

खुपच छान ....

विप्रनी समुपदेशनात काय सांगितले ते नाही लिहले? ;)

शेखर

दशानन's picture

27 Jan 2009 - 12:57 pm | दशानन

रामदास काकांचा लेख लोकप्रभामध्ये कव्हरस्टोरी म्हणून आला होता. चित्रलेखा नाही. - निलकांत !

हेच म्हणत होतो कुठे तरी गडबडलो कसा नाही... :D

परवा रात्री... घेऊन टाक वरची गाणे घेतली व बरोबर... आपली ओल्ड मंक त्यामुळे... लागली समाधी !
त्या समाधी अवस्थेतच लिहले होते त्यामुळे चुका ;)

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

नीलकांत's picture

27 Jan 2009 - 12:48 pm | नीलकांत

सर्वांशी खुप घाईत भेट झाली. विप्र काका त्याच फॉर्म मध्ये होते. एक वेळ तर विजूभाऊंनी त्यांना थांबवून म्हटलं सुध्दा की ,"मला येथे पुन्हा यायचंय !" ;)

त्या दिवशी पुण्यात १ वाजता आगमन झालं.

नीलकांत

सहज's picture

27 Jan 2009 - 12:50 pm | सहज

नक्की काय समुपदेशन केले ते सांगा नाहीतर एकच अर्थ निघतोय राजे, डोके इतके पकावले की बाबा होतो परत मेंबर पण बोलु नका असे म्हणायचे आहे का?

>....दंडवत घातला..
हॉल चांगलाच प्रशस्त दिसतोय प्रभुसरांचा :-)

>गेले त्यावेळी मी पाहीले अरे हे तर बरमुड्यावर गेले...
झालं आता हे काय नवीन क्रिप्टिक सर. टाईम मॅनेजमेंट भारी!!!

>मिपावर ती आत्मियता निर्माण झाली
भावना समजु शकतो.

दशानन's picture

27 Jan 2009 - 12:53 pm | दशानन

=))

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

अवलिया's picture

27 Jan 2009 - 12:50 pm | अवलिया

फोटु?

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

दशानन's picture

27 Jan 2009 - 12:52 pm | दशानन

आमच्या कडे गुप्त गाठीभेटींचे फोटो काढण्याची पध्दत नाही, पण साक्षी महाराजांनी काही खेचले आहेत... पण ते धुतले आहेत की नाही ... हे माहीत नाही.

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

अवलिया's picture

27 Jan 2009 - 12:54 pm | अवलिया

आमच्या कडे गुप्त गाठीभेटींचे फोटो काढण्याची पध्दत नाही

असे का? दिल्ली साईडला राहुन अजुन राजकारण जमत नाही तुम्हाला... फोटो काढत चला. उपयोग होतो

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2009 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार

झक्कास रंगला म्हणा की कट्टा !
बाकी रिक्षा मध्ये बसुन टार्‍या आला हे वर्णन जरा अतिशयोक्ती वाटले ! (कसे शक्य आहे ? कौन कंबख्त रिक्षावाला है जिसे अपने रिक्षा से प्यार नही ?)

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jan 2009 - 1:07 pm | बिपिन कार्यकर्ते

बाकी रिक्षा मध्ये बसुन टार्‍या आला हे वर्णन जरा अतिशयोक्ती वाटले !

हे वाक्य 'रिक्षाला बसवुन टार्‍या आला' असे असणार रे. राजे म्हणतोय ना की अंमळ समाधी अवस्थेत असताना लिहित होता तो म्हणून. ;)

राजे, मस्त आठवणी लिहिल्यास रे भाऊ.

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2009 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार

हान आता ते वाक्य कसे योग्य वाटते.
=)) =))
बिपिनभौंच्या शब्दरचना समजुन घ्यायच्या कौशल्याला आपला सलाम ;)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

27 Jan 2009 - 1:03 pm | घाशीराम कोतवाल १.२

आता फोटु सर्वसाक्षी साहेब टाकणार आहेत काय ?

आमचा नवा प्रयत्न बघा जरा
जाणता राजा

हे जरा जुन आहे

विनायक प्रभू's picture

27 Jan 2009 - 2:24 pm | विनायक प्रभू

तु काय मी काय आपण 'कालीदास' नव्हे. आणि आपले प्रतिसाद किंवा लेखन म्हणजे काय महाकाव्य नव्हे. तेंव्हा प्रतिसाद किंवा लेख उडवण्यावरुन थोबाड फुगवायचे काम नाही. मस्तीमधे टारगटपणा केला तर उडवाउडवी होणारच. संपादकांच्या जागेवरचे काटे त्यांचे त्यांना माहित. कधी कधी त्यांचे सुत्र चुकत असेल सुद्धा. पण छोटी गोष्ट आहे ती इतर फायद्याची तुलना करता. तुझ्या किंवा माझ्या लेखाचे मिपा मिंधे नाही हे आपणच समजायला पाहीजे.
कट्टा छान झाला. सर्व शॉर्ट नोटीस वर आले ह्याचे खुप बरे वाटले. पुढचा कट्टा हा जेवणाचा होइल. मेनु ठरलेला आहे.

स्पृहा's picture

27 Jan 2009 - 2:43 pm | स्पृहा

टार्‍याचे आणि प्रभु काकांचे वर्णन एकदम छान केले आहेस ...

मऊमाऊ's picture

27 Jan 2009 - 2:54 pm | मऊमाऊ

तिन्ही भाग एकत्र वाचले..छान लिहिले आहे..आवडले.

ब्रिटिश's picture

27 Jan 2009 - 5:15 pm | ब्रिटिश

मस्त लीवलयस.

आय मीस्ड द कट्टा. जंगल का राजा तेरेकु मीलनेकी भोत ईच्चा हय

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

दशानन's picture

27 Jan 2009 - 5:18 pm | दशानन

>>>जंगल का राजा तेरेकु मीलनेकी भोत ईच्चा हय

=))

मेरी भी... पण तु मिलाचं नै.. :(

दाही देशाचा वारा अनेक वेळा पिलेला...
जैनाचं कार्ट

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

टारझन's picture

27 Jan 2009 - 9:31 pm | टारझन

आबे दो किलो राजू ... द्राक्षासवाच्या अंमला खाली लिहीलंय का बे ?
मी तिकडेच लांब उतरलो होतो ... मोबाईलची बॅटरी दिवसभर फोटू काढून पुर्ण डाऊण झालेली. आता प्रभूबाबाचं बोलणं असतं ४४०० केबीपीएस/३४ मेगाहर्ट्झ ने .. ते काय समजायंच .. बरं लंबरं पण फोणमधी .. आता काय करायचं ?
तेच एक डेअरी दिसली... त्यात एक चिपाडछाप पोरगं बसलेलं .. त्याला आधी विणंतीच्या सुरात फोण चार्जिंग साठी पॉवर सॉकेटची मागणी केली .. त्याणे गिर्‍हाईक दिसत णाही म्हणून जरा दुर्लक्ष केल्यावर मग जरा धमकीवजा विणंती केल्यावर सॉकेट मिळालं , फोण चालू झाला .. आणि प्रुभु बाबाला फोणवल .. लांबुण बॉक्सरच्या साईझची(बर्मुडा नव्हे) चड्डी घातलेले एक लांबुळके गृहस्थ दिसले. म्हंटलं हाच्च मास्तर , दोघांनी एकमेकांना पाहिल्यावर मास्तर तिथे माझी वाट पहात बसतील अशी अपेक्षा होती . त्याउलट मास्तरने मला पाहुन तिथूनच यु टर्ण मारला .. म्हंटलं आता थांबतील तेंव्हा थांबतील ... बाबा थांबला तो मिपाकरांच्या घोळक्यात जाऊण.. घोळक्यांपैकी फक्त निळूभौंना भेटलेलो आणि इजुभौंना फोटूतून पाहिलेलं... अपेक्षेप्रमाणे लेट आल्याबद्दल शिव्या खाल्ल्या . आणि पुढे कट्टा सुरू झाला... रामदास आणि सर्वसाक्षी आपल्याला ओळखतात हे कळून सुख्खद आश्चर्य वाटलं .. मला तिथे "कलंत्री" बाबा आहेत की काय ? अशी भिती २ मिनिटं चाटून गेली.
बाकी प्रभु मास्तरांचं पोरगं अंमळ आमच्याच सारखं आहे .. :) आवडलं .. पण प्रबू त्याच्याशी फकस्त इंग्रजी का बोलले हे मात्र कळ्लं णाही :)

बाकी लेट आल्याबद्दल सर्व कट्टाकरांची माफी ... तात्यांना(यांचा पण वॉईस ४४००केबीपीएस्/३४किलोहर्ट्झ चाच आहे) भेटणं शक्य झालं णाही .. ब्रिट्स पण मिस झाला.
तो प्रभु बाबा खरंच डेंजर आही

बाकी आमच्या वजणाचा चुकीचा उल्लेख केल्याबद्दल राजेंचा णिशेध...
आम्चं वजण अजुन मोजता आलेलं णाही कारण वजणकाट्यावर उभं राहिलं की तो काटा सताठ वेळा गोल गोल फिरतो .. काउंट करणं अवघड आहे ....

राजे सुप्पडकाण्या माफी मागतोस चोच्या ... एक शिक्रेट , राजेंनी संतुर फासला आहे, त्यांचं खरं वय सांगणार्‍याला १० वडापाव .

- टारझण

लिखाळ's picture

27 Jan 2009 - 10:18 pm | लिखाळ

राजेंचा लेख आणि टार्‍याचा प्रतिसाद आवडला. :)

-- लिखाळ.

छोटा डॉन's picture

28 Jan 2009 - 9:03 am | छोटा डॉन

>>राजेंचा लेख आणि टार्‍याचा प्रतिसाद आवडला.
+१, असेच म्हणतो ..!
शिवाय राजेंनी भेटलेल्या प्रत्येक मिपाकराचे केलेले वर्णन अंमळ मजेशीरच आहे.
खास करुन टार्‍याभौ आणि विप्रकाका ...!

फोटु असते तर अजुन मज्जा आली असती ...
"साक्षीदेवांना" विनंती की शक्य असल्यास त्यांनी फोटो टाकावेत ..!

------
छोटा डॉन

दशानन's picture

28 Jan 2009 - 10:11 am | दशानन

टार्या लेका,

तुझा मी ड्रायव्हींग कार्ड वरील फोटोचा उलेख टाळला आहे ;)

बाकी संतुर .. =)) जबरा !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

संदीप चित्रे's picture

27 Jan 2009 - 10:02 pm | संदीप चित्रे

एका वेळी इतक्या मिपाकरांच्या गाठीभेटी ... धन्य झाला असाल :)
लेख आवडला हेवेसांन

प्राजु's picture

27 Jan 2009 - 11:07 pm | प्राजु

मस्तच भेटीगाठीचा कार्यक्रम आणि वर्णन.
ऋणानुबंधाच्या चुकुन पडल्या गाठी.. भेटीत .... मोठी!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकदम भेटल्याचे वाचून आणंद झाला!

चतुरंग

शितल's picture

28 Jan 2009 - 7:16 pm | शितल

मिपाकरांना भेटत दिल्ली ते दिल्ली झालेली सफर आवडली. :)

सुक्या's picture

29 Jan 2009 - 1:37 am | सुक्या

अगदी सुंदर.
कट्टावृत्तांत, प्रवासवर्णन अन् व्यक्तीचित्र, सारं एकत्र सुरेख जमलय.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

दशानन's picture

29 Jan 2009 - 9:37 am | दशानन

सर्व वाचकांचे आभार !

धन्यवाद.

पुन्हा कधी कट्टा जमलाच तर काही मिस्टेक टाळेन ज्या ह्यावेळी केल्या.

काही गोष्टी कळत नकळत अतिरंजित होतात त्यामुळे कट्टा सदस्यांनी माफ करावे भाउ ;)

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.