प्रतिजैविके
समज आणि गैरसमज.
सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय?
सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ
यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत.
यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू.
या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव
जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके.
यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला.
जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो.
१) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही.
२) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात.
दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात.
काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात.
दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो
नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात.
३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा.
४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे.
५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही.
६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे.
७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला
(आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच
प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात.
८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते.
काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण?
"अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच.
९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल.
यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ"
मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १
पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1
१०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल.
बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे.
प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे
१) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते
२) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो.
३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो.
४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात.
हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.
प्रतिक्रिया
8 Jul 2016 - 4:20 pm | स्पा
8 Jul 2016 - 4:35 pm | असंका
=))
आपल्याला या विषयाबाबात काही शंका होत्या असं वाटलं नवतं आपला लेख वाचताना ....
8 Jul 2016 - 5:00 pm | शान्तिप्रिय
त्या लेखातली मते काही आयुर्वेदीक आणि होमिओपाथिक वैद्यांच्या माहितिवरुन
बनवण्यात आली होती. कबुल!
8 Jul 2016 - 4:23 pm | कानडा
अतिशय सुंदर माहिती आहे. यासाठी शतःश धन्यवाद डॉ. साहेब.
माझी एक विनंती आहे. "आयुर्वेदाचे साईड ईफेक्ट नाही" या "शुद्ध मुर्खपणा" बद्दल कृपया लिहा (e. g., severe side effects of ayurvedic medicines having heavy metals on kidneys, use of high potassium medicines in kidney diseases, etc).
---
कानडा
8 Jul 2016 - 4:30 pm | सतिश गावडे
आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू असतात हे आजच कळले मला. माझ्या मनात आयुर्वेदिक औषधे = झाडपाला हेच समिकरण होते.
8 Jul 2016 - 4:36 pm | कानडा
कशा कशाचे भस्म नाही ऐकले का?
---
कानडा
8 Jul 2016 - 8:11 pm | अनुप ढेरे
सुवर्ण भस्म असतं की. पारा देखील वापरतात. याशिवाय काही औषधांमध्ये चुकून आलेलं आर्सेनिकवगैरे देखील अढळल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत.
8 Jul 2016 - 4:40 pm | कानडा
"झाडपाला" चे साईड ईफेक्ट नाही हे सुद्धा खोटे आहे.
किडनीच्या रोगावर Parsley चा काढा सुचवला होता एका BAMS ने. (ना रहेगा बास ना बजेगी बासरी असे वाटले असेल त्याला कदाचित).
---
कानडा
8 Jul 2016 - 6:02 pm | पैसा
अतिशय उपयोगी माहिती. नेहमीप्रमाणे सहज सोपे करून सांगितले आहे. धन्यवाद डॉक्टर!
8 Jul 2016 - 7:34 pm | अप्पा जोगळेकर
फारच सरसकटीकरण करणारे प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटते आहे.
माझा एक मित्र आयुर्वेदिक डॉक्टर असून देसाई गाव इथे तो रुग्णालय चालवतो.
रुग्ण आणि रोग पाहून जे सर्वात अचूक वाटेल ते (मॉडर्न किंवा आयुर्वेदिक) औषध तो देत असतो.
अवघी ३ वर्षे झाली. त्याच्या हातगुणाची साक्ष तिथली झुंबड गर्दी तर देतेच.
या माणसाने माझ्या बायकोचा डेंग्यूसारखा रोग मॉडर्न मेडिसीनने बरा केला. हे सांगण्यात त्याला कोणाताच कमीपणा वाटत नाही.
याच माणसाने माझी लिगामेंट इंजुरी एका आयुर्वेदिक तेलाने बरी केली ( आणि त्यावेळी इंटर्नल ब्लीडींग होऊन साकळलेले रक्त जळू लावून काढले).
आता यावर देखील हा तुमचा वैयक्तिक अनुभव वगैरे म्हणून दुगाण्या झाडल्या जातील.
पण वर काहीजणांनी आयुर्वेदाला 'अंधश्रद्धा निर्मूलन कायदा' लावा वगैरे निरर्थक विधाने केली आहेत. म्हणून हे लिहिले. बाकी आम्ही डॉक्टर नाही त्यामुळे आमचे ते वैयक्तिक अनुभव आणि हेच जर एखाद्या डॉक्टरने लिहिले तर ती शास्त्रकाट्याची कसोटी असे असेल तर विषयच संपला.
8 Jul 2016 - 8:07 pm | विजय_आंग्रे
Aappa,Tumhi Dombivlikar Ka ho?
Desai gavan kuthe aah रुग्णालय?
8 Jul 2016 - 10:33 pm | अप्पा जोगळेकर
जिवदानी हॉस्पिटल, देसाई गाव. डॉ. दरे.
8 Jul 2016 - 8:12 pm | अनुप ढेरे
डिग्र्यादेखील दोन्ही आहेत की एकच?
8 Jul 2016 - 10:36 pm | अप्पा जोगळेकर
आयुर्वेदिक डॉक्टरला मॉडर्न मेडिसीनची औषधे देण्याची परवानगी असते हो.
रच्याकने, बी.ए.एम.एस ला ही असते. म्हणजे एम.डी. ला नक्कीच असावी.
12 Jul 2016 - 12:57 pm | सुबोध खरे
अप्पासाहेब
In June last year, the Maharashtra Government had given its approval to the bill that allowed homeopaths and ayush doctors to practice allopathy after a one-year bridge course in pharmacology.हा कोर्स अजून चालू झालेला नाही त्यामुळे आजमितीस ही औषधे देणारे व्यावसायिक बेकायदेशीर पणे देत आहेत.
दिल्लीत जर आयुष व्यावसायिकांनी आधुनिक औषधे दिली तर त्यांना ३ वर्षे तुरुंगवास आणि २००००/- दंड केला जाईल.
http://medicaldialogues.in/3-years-jail-rs-20000-fine-if-ayush-practione...
12 Jul 2016 - 3:04 pm | चंपाबाई
तो कोर्स सुरु झालेला आहे.
...
भरपुर लिहायचे आहे. एक दोन दिबसात लिहिन
12 Jul 2016 - 4:59 pm | अप्पा जोगळेकर
दिल्लीत जर आयुष व्यावसायिकांनी आधुनिक औषधे दिली तर त्यांना ३ वर्षे तुरुंगवास आणि २००००/- दंड केला जाईल.
म्हणजे काय ? दिल्लीबाहेर आयुरेवेदिक औषध दिले तर तुरुंगवास नाही का ?
शिवाय हा लेटेस्ट अपडेट दिसतो. मी ज्या रुग्णालयाचा संदर्भ दिला ते अधिक्रूतरीत्या नोंद झालेले आयुरेव्द रुग्णालय आहे. तसेच तेथे अनेक मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर येऊन मॉडर्न मेडिसिनची ट्रीटमेंट देखील देत असतात. शल्यक्रियाही करत असतात.
एकंदर वैद्यक क्षेत्रात जात व्यवस्था बोकाळली आहे असे दिसते. प्रत्येक पॅथीचे डॉक्टर दुसर्या पॅथीवर चिखल फेकताना दिसतात.
12 Jul 2016 - 5:03 pm | अप्पा जोगळेकर
आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन हेच हंतिम सत्य असे तुम्ही ठरवून टाकले आहे असे वाटते. या संदर्भात हा माझा शेवटचा प्रतिसाद. तुमच्या ज्ञानाबद्दल आदर आहेच.
12 Jul 2016 - 5:08 pm | गवि
मॉडर्न मेडिसिन सत्य आणि बाकी खोटं असं नसून बाकी सर्व पॅथींमधे कोणतंही तथ्य आढळलं तर ते स्टँडर्डाईझ करुन स्वीकारणं आणि मुख्य प्रवाहात काटेकोरपणे आणणं हे म्हणजेच मॉडर्न मेडिसिन. कितीतरी मॉडर्न मेडिसिनची औषधं मुळात काष्ठौषधी किंवा पारंपरिक औषधांतला मूळ उपयुक्त घटक वेगळा करुन, चाचण्या करुन आणि डोस वगैरे प्रमाणित करुन घेतली गेली आहेत.
12 Jul 2016 - 5:22 pm | अनुप ढेरे
गेल्यावर्षी चायनीज हर्बल औषधांचा अभ्यास करून मलेरिआच्या नवीन औषधाबद्दल संशोधन करणार्या बाईंना औषधशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं आहे.
आयुर्वेदातून देखील असं काही मिळू शकेल. पण हे संशोधन कोणी करतं का हे माहिती नाही.
12 Jul 2016 - 5:30 pm | गंम्बा
बेसिकली कुठल्याही पॅथीचे किंवा देशातले औषध शास्त्राप्रमणे टेस्ट आणि ट्रायल घेऊन सिद्ध केले की ते मॉडर्न मेडिसिनचे औषध बनते.
मॉडर्न मेडिसिन हा कुठलाही विषेश धर्म , पंथ नाहीये.
जर कोणी केले तर आयुर्वेदातील सर्वच्या सर्व औषधे मॉडर्न मेडिसिन मधे येऊ शकतील की.
त्यानी मॉडर्न मेडिसिन ची शास्त्रीय पद्धत वापरली होती. आमच्या ग्रंथात २००० वर्षापूर्वी असे लिहुन ठेवले आहे म्हणुन ते बरोबरच आहे असा त्याने सिद्धांत मांडला नव्हता.
त्यानी अजुन हा पण सिद्धांत मांडला नाही की - हे मलेरीयाचे औषध सिद्ध केले म्हणजे सर्वच चिनी औषधे बाय डीफॉल्ट सिद्ध झाली.
12 Jul 2016 - 7:01 pm | सुबोध खरे
वरिल तिन्हि प्रतिसादाना बाडिस
सर्पगंधा या वनस्पती पासून तयार केलेले रेसरपाईन हे औषध रक्तदाबाचा अनेक वर्षे प्रचलित होते. ( त्यातील अजून सुधारित औषधे आल्यावर ते औषध मागे पडले). अफू पासून वेगवेगळी द्रव्ये शुद्ध करून त्यांचे वेगळ्या गुणधर्मासाठी उपयोग करू लागले. केवळ अफूचा काढा किंवा अर्क काढला तर त्याची नशा येते. परंतु कोडीन हे द्रव्य शुद्ध स्वरूपात दिले तर कोरडी ढास लागणाऱ्या खोकल्यावर ते अतिशय गुणकारी आहे आणि त्याने नशा अजिबात येत नाही त्यामुळे ग्लायकोडीन सारखे औषध केमिस्टकडे सहज मिळते. मॉर्फिनसारखे द्रव्य सुद्धा दिले तर जीव वाचवते.
कोणत्याही द्रव्याचा मग ते प्राणिजन्य वनस्पिजन्य असो किंवा खनिज संपूर्ण अभ्यास करून त्याचे रासायनिक शुद्धीकरण करून पृथक्करण करून त्याचा प्रथम प्रयोगशाळेत, मग प्राण्यांच्या शरीरावर आणि नंतर मानवी शरीरावर होणार्या परिणामांचा पूर्ण अभ्यास केल्यावरच त्याला आधुनिक औषधात मान्यता मिळते. यांनंतरही कोणत्याही औषधात जर नको असलेले परिणाम आढळले तर असे औषध त्याज्य ठरवले जाते. आणि ही उपचार पद्धती भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतांप्रमाणे चालते. स्वतः ठरवलेल्या तत्वज्ञानाने किंवा तर्कशास्त्राने नव्हे. इतकी काटेकोर अभ्यास पद्धती असल्यामुळे आधुनिक उपचार पद्धती ही जगमान्य आहे.
12 Jul 2016 - 10:39 pm | आनंदी गोपाळ
तेच खरे व अंतीम सत्य आहे, (हंतीम नव्हे) ही कडू गोळी कृपया गिळायचा प्रयत्न करा.
मॉडर्न मेडिसीन हे मानवी इतिहासातल्या सर्व साडेतीन लाख वर्षांच्या इतिहासातून आलेल्या अनुभवसिद्ध वैद्यकाचा अर्क आहे.
अमुक उपचाराने जर रुग्णास खरेच बरे वाटत असेल, तर त्यावर संशोधन करून, त्या क्ष झाडपाला/प्राण्याची आतडी/धातूभस्माचा नक्की कोणता घटक, कोणत्या प्रमाणात सर्व ज्ञाति वंशाच्या, स्त्री पुरुष लहानमोट्यांस, किती मात्रेत कसा फायदेशीर ठरेल, याचा साधकबाधक अभ्यास करून, 'रिस्क वि. बेनिफिट' रेशो हा रुग्णाच्या बाजूने 'सिग्निफिकंटली' झुकत असल्यास, अंतर्भूत करून, त्या उपचारास समाविष्ट करून घेणार्या उपचारपद्धतीस "मॉडर्न" मेडिसीन म्हणतात.
याचे प्रॅक्टिशनर्स (म्हणजे, ही पद्धती वापरात आणणारे. तिची सवय करण्याचा परयत्न करणारे नव्हेत) यांना झालेला बोध, नव्या उपचार पद्धती, एकमेकांना फुकट सांगतात, त्या नव्या पद्धती वापरून पाहताना आलेल्या अडथळ्यांची, दुष्परिणामांची, निष्पक्ष चर्चा करतात, दुष्परिणाम असतील तर त्याबद्दल जनतेस चटकन साम्गतात, व त्यावर इलाज शोधतात.
होम्योपदी ही तद्दन भंकस आहे, हे सिद्ध झालेले आहेच.
इतर "प्याथी"त, अनुभवसिद्ध ज्ञान आहे, व त्यातील बरेचसे ऑलरेडी मॉडर्न मेडिसिनमधे सामावले गेलेल आहे. प्ण त्या आधारावर या प्याथीवाल्यांनी पब्लिकला चुतिया बनविणे थांबवावे, असे माझे स्पष्ट मत आहे.
भारतातील सर्व होम्योपदी, आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध व इतर बिण्डोक तथाकथित उपचारपद्धतींच्या "कॉलेजेस"चे संपूर्ण मॉडर्न मेडिसिन कॉलेजांत रूपांतर करून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण द्यावे. त्यांना "अॅलोपॅथी" डॉक्टरांकडे कंपाऊंडरकी करत "तापाला प्यारासिटामॉल" या हिशोबाने मॉडर्न मेडिसिन शिकायला भाग पाडू नये, असे माझे विनम्र मत आहे.
"मेडिकल" कालेज काढून पब्लिककडून पैसे उपटण्यासाठी उभ्या राहिलेल्या या उपटसुंभ भारतीय राजकारण्यांच्या बिनडोकपणाचा, व तिथे अॅडमिशन घ्यावी लागल्यने फ्रस्ट्रेशन आलेल्या हुशार परंतु संतप्त लोकांनी य देशावर उगवलेल्या सूडाचा प्रवास कुठेतरी थांबावा, ही सदिच्छा..
13 Jul 2016 - 12:58 am | अप्पा जोगळेकर
एकाच प्रतिसादात भंकस, चुतिया,बिण्डोक, उपटसुंभ, बिनडोकपणाचा, कंपाउंडरकी इतके तुच्छतादर्शक शब्द वाचून धन्य झालो.
शिवाय ते कडू गोळी वगैरे काय झेपले नाही. मी डॉक्टर नाही ना कंपाउंडर ना फार्मसिस्ट. उद्या आयुर्वेद/होमिओपथी/मॉडर्न यापैकी कायबी ग्रेट आहे हे सिद्ध झाल्याने माझे काय जाते.
ती चिंता किंवा आक्रस्ताळेपणा ज्यांच्या 'कट' वर परिणाम होतो त्यांनी करावी.
माझ्यापुरते म्हणायचे तर सहसा आजारी पडतच नाही अन पडलो तर ज्याने लवकर बरे वाटते असे औषध एखाद्या विनयशील डॉक्टरच्या सल्ल्याने घेतो.
रच्याकने, तुमची खड्डा कोंबडीची रेसिपी प्रचंड आवडल्या गेली आहे.
12 Jul 2016 - 5:25 pm | गंम्बा
अहो आप्पा - नॉन मॉडर्न मेडिसिन वाल्यानी मॉडर्न मेडिसिनचे औषध द्यायला बंदी आहे फक्त.
माझ्या माहीतीत आयुर्वेदीक किंवा होमिओपाथी औषध द्यायला सर्व जनतेला परवानगी आहे ( डीग्रीची जरुरत नाही ).
अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या ह्या औषधे म्हणुन मानली जात नसल्यामुळे ती ओव्हर द काउंटर मिळु शकतात.
12 Jul 2016 - 10:07 pm | सतिश गावडे
>> अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या ह्या औषधे म्हणुन मानली जात नसल्यामुळे ती ओव्हर द काउंटर मिळु शकतात.
पुण्यातही मिळतात.
12 Jul 2016 - 10:20 pm | आनंदी गोपाळ
हो,
पण पुण्यात त्यांना औषधी "मानले" जाते, व धोकादायक औषधेही ओवर द काउंटर निर्विकारपणे विकली जातात..
8 Jul 2016 - 9:29 pm | सुबोध खरे
अप्पासाहेब
हैदराबादी माशाची गोळी अत्यंत लोक प्रिय आहे म्हणून तिला पण उत्तम वैद्यकीय इलाज म्हणणार काय ?
बाकी आम्ही डॉक्टर नाही त्यामुळे आमचे ते वैयक्तिक अनुभव आणि हेच जर एखाद्या डॉक्टरने लिहिले तर ती शास्त्रकाट्याची कसोटी असे असेल तर विषयच संपला.
मी जे काही लिहिले आहे त्याचे सर्व दुवे मी दिले आहेत. कुठेही केवळ मी म्हणतो किंवा मी पाहिले म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असे मी अजिबात म्हणत नाही. ऐकीव गोष्टी( ANECDOTES) वर इतर पॅथीवाले चालतात.
मला गोमेद किंवा नीलमणी या खड्याच्या उत्तम अनुभव आला आणि माझा व्यवसाय चालू झाला. यात आणि शास्त्रीय कसोटी यात काय फरक आहे?
शास्त्रीय कसोटी ही अनुमानधपका किंवा काकतालीय न्यायाच्या पलीकडे असावी लागते. आणि ती पुराव्यानिशी सिद्ध करावी लागते.
२०c पेक्षा जास्त विरळ केलेल्या द्रव्यात त्या द्रव्याचा एकही रेणू नसतो हे रसायनशास्त्राने सिद्ध करता येतं. यावर होमियोपॅथी वाले पाण्यात त्या द्रव्याचे गुण उतरतात असा दावा करतात. कोणतेही द्रव्य विरळ केले की ते जास्त परिणामकारक होते हा त्यांचा सिद्धांत.
SARS (FLUE) हा श्वसनाचा आजार झाला असताना मुंबईतील काही होमियोपॅथनी आय एम ए ( इंडियन मेडिकल असो.)च्या व्हॉट्स अँप वर "ब्रायोनिया की कोणतेतरी" औषध २००X मात्रेत घेतले तर SARS होणार नाही असा दावा केला होता त्यावर मी त्यांना म्हटले होते की असे जर असेल तर तुम्ही मुंबईची लोकसंख्या किती आहे त्याप्रमाणे हे औषध तुळशी किंवा भातसाच्या पाण्यात टाका म्हणजे सर्व मुंबईचे लोक ते पाणी पिऊन त्यांची प्रतिकारशक्ती इतकी वाढेल की कुणालाच हा आजार होणार नाही SARS पासून संरक्षण होईल. यावर या सर्व दावा करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आणि ते करीत असलेल्या दाव्याचा फोलपणा त्यांच्या लक्षात आला असावा.( निदान यावर कोणी पुढे चर्चा करण्याची हिम्मत दाखवली नाही).
8 Jul 2016 - 11:26 pm | अप्पा जोगळेकर
वर एका महाशयांनी आयुर्वेदाला 'अंधश्रद्धा निर्मूलन कायदा' लावा वगैरे तारे तोडले आहेत. त्यापुढे जाउन त्यांचा वैद्यक क्षेत्राशी संबंध नाही आणि पटत नसेल तर सोडून द्या असे म्हणणे आहे.
आधी पुरावा नसताना बदनामी करायची आणि नंतर पटत नसल्यास दुर्लक्ष करा असे म्हणायचे असा हा उफराटा प्रकार आहे.
जर आयुर्वेद अंधश्रद्धा आहे तर प.य.खडीवालेंपासून ते टिळक आयुर्वेद रुग्णालय या सगळ्यांना सत्य साईबाबाच्या रांगेत बसवणार का ?
बाकी तुमच्या धाग्याबद्दल, ज्ञानाबद्दल आणि अनुभवांबद्दल संदेह नाहीच.
पण प्रत्येकाने स्वतःला डॉ. खरे समजून एखाद्या वैद्यक क्षेत्राबद्दल पिंका टाकणे कितपत योग्य आहे ?
होमिओपाथी बद्दल माहिती नाही त्यामुळे पास.
अवांतर -
क्लिनिकल डायग्नोसिस करणारे साधे डॉक्टर कमी होत जाऊन सगळीकडे स्पेशालिस्ट्च दिसतात ही काळजी करण्याची बाब वाटते. स्टेथास्कोप हातात न घेताच अमकी टेस्ट करा आणि रिपोर्ट दाखवा असे सांगणार्या मॉडर्न मेडिसीनच्या डॉक्टरांबद्दल तरी काय बोलणार ?
अलीकडे पेशंटसुद्धा मी डायरेक्ट स्पेशालिस्ट कडे जातो असे ऐटीत सांगतात.
स्पेशलायझेशन करता अमक्या वर्षांची प्रॅक्टिस असावी असा काही नियम नाही का ?
12 Jul 2016 - 11:32 pm | आनंदी गोपाळ
डॉक्टरांच्या 'हलगर्जीपणाच्या' केसेस रिपोर्ट करताना तुम्हीआम्ही किंवा पॉप्युलर मेडिया काय करीत असतो म्हणता? ;)
12 Jul 2016 - 11:35 pm | आनंदी गोपाळ
साहेब, नक्कीच आहे.
उदा. एम्बीबीएसनंतर ३ वर्षे एमएस करता, अन त्यापुढे ३ वर्षे एमसीएचकरता लागतात. हे किमान अभ्यास केल्यानंतर "सरकारमान्य" अर्हताप्राप्तीसाठी लागणार्या किमान कालावधीचे वर्णन आहे. या ३ वर्षांत (हजार दिवसांत) किमान १००० मेजर व ४-६ हजार तरी मायनर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात.
10 Jul 2016 - 6:27 am | चंपाबाई
पोटंटायझेशन म्हणजे नुसते पाणी घालून विरळ करणे नव्हे .
त्याला ट्रिचुरेशन / खलणे याची जोडही असावी लागते.
हे बेसिकही तुम्हाला माहीत नसल्याने तो होमिओपथईवाला बिचारा गप्प बसला.
11 Jul 2016 - 2:30 pm | सुबोध खरे
चंपाबाई / मोगा
ट्रिचुरेशन ही पद्धत घन पदार्थांच्या पोटंटायझेशन साठी वापरतात आणि
सक्सेशन ही पद्धत द्रव पदार्थांच्या पोटंटायझेशन साठी वापरतात.
हे असाच खलायचं आणि तशीच बाटली हलवायची इ तर्हेची अजब कर्मकांडे आहेत.
दोन्ही पद्धती कर्मकांडे आहेत आणि त्या आधुनिक भौतिक आणि रसायनशास्त्राच्या मूलभूत सिद्धांताच्या विरुद्ध आहेत.
http://homeopathyplus.com/trituration-making-insoluble-substances-soluble/
http://homeopathycommunity.com/TriturationandSuccussion.asp हे एकदा जिज्ञासूंनी वाचूनही घ्यावे
उदा. दोन एकमेकांत विरघळणारे द्रव पदार्थ कसेही ठेवा. त्याचे रेणू इतस्ततः हालचाली मुळे (random motion) एकमेकांत मिसळणारंच.
औषध कसे आणि कुठे वापरायचे हे मी त्या होमियोपॅथ वरच सोडले होते मी काही त्या औषधाला हातही लावणार नव्हतो.
त्या होमियोपॅथ चे होमियोपॅथी तील ज्ञान माझ्यापेक्षा जास्तच असणार यात शंका नाही पण मूलभूत वैद्यकशास्त्राचे मी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले आहे तेंव्हा तुमच्यासारखे हे फालतू वाद त्यांना माझ्याशी घालणे शक्य नव्हते म्हणून एक दोन नव्हे डझनांनी होमियोपॅथ गप्प बसले.
8 Jul 2016 - 8:02 pm | पिलीयन रायडर
होमिपदीचा अनुभव वाईट आहे. आयुर्वेदाचा अगदी उत्तम! अॅलोपथी शक्यतो टाळते आणि ताप, सर्दी इ आपोआप बरे होतील असा शरीराला वेळ देते.
पण खरे काकांनी इतकं सोप्पं करुन लिहीलय की आपल्या शरीरात नक्की घडते काय हे आज पहिल्यांदाच समजले.
काका, खुप छान लेख आणि प्रतिसाद!
8 Jul 2016 - 8:05 pm | पिलीयन रायडर
हो पण हे ही महत्वाचं आहे की आयुष्यात सर्दी तापाहुन कित्येक पटींनी जास्त गुंतागुंत असलेले त्रास झाले तेव्हा अॅलोपथीच कामास आली. तेव्हा इतर कोणत्याही पॅथीच्या नादी लागणे शक्यच नव्हते. जीवन मरणाचा प्रश्न असताना अॅलोपथीच मदतीला आली आणि तिने जीव वाचवला. बाकी पॅथींनी पुरक गोष्टी झाल्या (ताकद वाढणे, पित्त उठलेलं कमी होणे इ.) पण जीव मॉडर्न मेडिसिनच वाचवु शकले.
9 Jul 2016 - 2:14 pm | नगरीनिरंजन
हा लेख लिहिल्याबद्दल डॉक्टरसाहेबांचे आभार. बर्याच लोकांना सगळं चमच्याने भरवावं लागतं याचं हे मस्त उदाहरण आहे.
सामान्य लोकांना विषाणू आणि जीवाणूतला फरक कळत नाही असं कोणीतरी वर म्हटलंय. खरंच? पाचवी-सहावीच्या जीवशास्त्रातच विषाणू आणि जीवाणू हे शब्द येतात. पेनिसिलिनबद्दलही लिहिलेले आढळते.
शिवाय आता इंटरनेटमुळे ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना प्रत्येकाच्या अक्षरशः हातात असतो. थोडंसं शोधलं तरी प्रतिजैविकांचे प्रकार, वेगवेगळ्या प्रतिजैविकांची कार्यपद्धती, कोणत्या प्रोटीनफॉर्मेशनवर काय परिणाम होतो वगैरे सगळं डिट्टेलवार माहिती मिळू शकते.
पण सामान्यपणे मूर्खच राहण्यात धन्यता मानणार्यांना काय त्याचे? लोकांना ऑनलाईन शॉपिंग, चोरुन चित्रपट डाऊनलोड करणे, पॉर्न पाहणे वगैरे गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत; पण ह्या बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टींची गंधवार्ताही नसते.
दारात ज्ञानाची गंगा आली तरी कोरडेठाक राहणार्यांइतके दुर्दैवी तेच.
9 Jul 2016 - 3:02 pm | मार्मिक गोडसे
नगरीनिरंजन ह्यांच्या शब्दाशब्दाशी सहमत.
9 Jul 2016 - 8:49 pm | चौकटराजा
सामान्य लोकांना विषाणू आणि जीवाणूतला फरक कळत नाही असं कोणीतरी वर म्हटलंय. खरंच? पाचवी-सहावीच्या जीवशास्त्रातच विषाणू आणि जीवाणू हे शब्द येतात. पेनिसिलिनबद्दलही लिहिलेले आढळते.
१९८१ चे सुमारास प्रसिद्ध हॉलिवूड नट रॉक हडसन हा एडस ने मरण पावला. त्यावेळी एम बी बी एस , डी ए एस एफ व बी ए एम एस ( त्यावेळी बहुदा बी ए एम एस झाल्यावर एम बी बी एस करता येत असे) अशा तीन डीग्र्या असलेल्या माझ्या डॉक्टर मित्राला एडस म्हणजे काय हे माहीत नव्हते. सबब पाचवीच्या॑ मुलाला जरी अभ्यासाला व्हायरस व जिवाणू हे असले तरी त्यांची
वर्तणूक माहिती असण्याची शक्यता कमी. उदा विषाणू आपल्या खास आवडत्या पेशीत शिरून तिला "मला" बनव असे सांगतो व आपली पुनरूत्पती करतो सबब डॉ खरे यानी म्हटल्या प्रमाणे त्याचे काम हे पेशीच्या आत गेल्यावरच चालते.हे पाचवीच्या मुलाला काय नर्सेसना तरी माहिती असते काय याची शंका आहे. आय सी यू त रात्रपाळीला नोकरीवर असलेल्या एका डॉ ने अॅन्जिओ प्लास्टी झाली की डेब्री ब्ल्ड सर्क्युलेशन च्या बाहेर काढली जाते का ? या माझ्या प्रश्नाला उत्तर " होय " असे दिले होते. आता बोला ! तेंव्हा व्यासंग किती आहे हे महत्वाचे. करीक्युलम सर्व पूर्ण करतात.
9 Jul 2016 - 10:28 pm | मार्मिक गोडसे
१९८१ मध्ये न्युयॉर्कमध्ये एड्सने म्रुत्यु पावलेला पहिला रुग्ण निक रॉक होता. हॉलिवूड नट रॉक हडसन हा १९८५ ला मरण पावला. मला नाही वाटत त्यावेळच्या एम बी बी एसच्या अभ्यासक्रमात एड्सबद्दल शिकवले जात असेल. त्यामुळे कदाचीत तुमच्या तीन डीग्र्या असलेल्या मित्राला एड्सबद्दल माहीती नसावी.
10 Jul 2016 - 8:34 am | चौकटराजा
१९८१ चे ऐवजी १९८५ हा फरक इतक्या वर्षानंतर मी विसरलो असेन पण माझ्या मित्राला एडस् बद्द्ल माहिती नसताना ती मला
माहिती होती हे विशेष. कारण त्या दरम्यान काही ठिकाणी या बद्दल मी वाचले होते.
11 Jul 2016 - 9:00 am | कानडा
शिकले सवरलेले लोकही (उ.दा. ३ डिग्रीज असलेला डॉक्टर) किती अपडेटेड (न)असतात हेच तर वर म्हटले आहे ना?
---
कानडा
10 Jul 2016 - 10:08 am | मार्मिक गोडसे
१९८३ मध्ये वैज्ञानीक HIV ला HTLV ह्या व्हायरसचाच प्रकार समजत होते. गूगलवरील माहीतीप्रमाणे रॉक हडसनच्या मृत्युनंतरच अमेरिकेत सर्वसामान्य लोकांना एड्सबद्दल माहीत झाले. त्याकाळी भारतात इंटरनेटसारखी माध्यमे उपलब्ध नव्हती, माहीतीचे स्त्रोत मर्यादीत होते, त्यामुळे एखाद्याचे अवांतर वाचन नसेल तर असे होऊ शकते.
9 Jul 2016 - 2:15 pm | शिद
अतिशय उपयुक्त माहिती. वाचनखूण साठवली आहे.
धन्यवाद डॉक्टर.
10 Jul 2016 - 9:28 am | कैलासवासी सोन्याबापु
आयुर्वेदिक वैद्यांनी, आधुनिक इमेजिंग अर्थात एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय वापरू नये त्यास सरकार ने इमेजिंग वापरण्यापासून थांबवावे म्हणून अलोपॅथीक लोकांनी एक केस केलेली असून ती न्यायप्रविष्ट होती असे ऐकिवात होते,
डॉक्टरसाहेब, ह्यावर माहिती दिलीत तर आनंद होईल,
(तुम्ही स्वतः अलोपॅथ तर आहातच, शिवाय रॅडिओलॉजिस्ट सुद्धा आहात म्हणून तुमचे मत ऐकायची इच्छा आहे)
11 Jul 2016 - 8:38 pm | सुबोध खरे
बापूसाहेब
आपण एक गहन प्रश्न विचारला आहे यावर मी "माझे" मत मांडत आहे.
इतर पॅथी मध्ये आधुनिक शास्त्रांचा किती अभ्यास होतो हे मला माहीत नाही. परंतु आधुनिक निदान तंत्रे ही भौतिक, रसायन आणि जीवशास्त्राच्या पायावरच उभी आहेत आणि इतर पॅथीचे आपले "तत्वज्ञान" आहे आणि त्यात (शास्त्र आणि तत्वज्ञान) एकवाक्यता नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे त्या पॅथीच्या व्यावसायिकांना आधुनिक निदान तंत्रांबद्दल कितपत माहिती आहे( असायला पाहिजे) हा एक संदिग्ध मुद्दा आहे.
दुर्दैवाने त्या पॅथीच्या "मूळ" अभ्यासाच्या वेळेस ही निदान तंत्रे नव्हती आणि नंतर त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांचा अंतर्भाव आणि त्याचे एकात्मीकरण त्यांना किती झेपणारे आहे हे ही मला माहीत नाही. यामुळे तांत्रिक कारणासाठी त्यांना ही तंत्रे वापरू द्यावी की नाही यावर टिप्पणी करणे कठीण आहे.
राहिली गोष्ट रुग्णांच्या हिताची.. -- याबाबत मी असे म्हणेन की इतर पॅथीच्या व्यावसायिकांना आधुनिक तंत्रे वापरू द्यावी याचे साधे कारण आहे की केवळ लक्षणांवर या पॅथी रुग्णांवर उपचार करीत असतात आणि आमची पद्धती "सावकाश पण गुणकारी आहे" या दाव्यात अमूल्य असा वेळ फुकट गेलेला कित्येक रुग्णाबाबत दिसून येतो.
एक अलीकडचेच उदाहरण देतो आहे. दीड महिन्यापूर्वी एक ७५ वर्षांच्या बाई माझ्याकडे बद्धकोष्ठाच्या आजारासाठी सोनोग्राफीसाठी आल्या. त्यांना हा त्रास सहा महिन्यापासून होत होता.त्यावर त्यांचा आयुर्वेदिक इलाज चालू होता. परंतु त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे आणि आता त्यांना उलट्या होऊ लागल्या मुळे त्यांच्या मुलीने त्यांच्या डॉक्टरकडे आपण सोनोग्राफी करू म्हणून मागणी केली. माझ्याकडे सोनोग्राफी केल्यावर पोटात नाभीच्या डावीकडे एक मोठा गोळा (८ x ९ सेमी) तयार झालेला दिसला.त्यांच्या मुलीला तो मी हाताला "लागतो" आहे हेही दाखवून दिले. अर्थात मला कर्करोगाची दाट शंका आल्याने मी ताबडतोब त्यांना सीटी स्कॅन करून त्याची खात्री करण्यास सांगितले. सीटी स्कॅन मध्ये माझ्या शंकेची पुष्टी झाली परंतु दुर्दैवाने हा रोग बऱ्यापैकी पसरलेला आढळला आणि आता शल्यक्रियेने पूर्ण बरा होण्याच्या पलीकडे गेलेला होता. यानंतर त्यांच्या बाबतीत बऱ्याच गुंतागुंती झाल्या( तो आत्ताच विषय नाही) आणि आज सकाळीच त्या बाईंना दुर्दैवाने देवाज्ञा झाली असे माझ्या स्वागत सहायिकेने सांगितले.
जर आधुनिक तंत्रज्ञानाची अगोदर मदत घेतली गेली असती तर "कदाचित" त्यांचे आयुष्य अजून वाढले"ही" असते. त्यांच्या दैवात किंवा नशीबात काय आहे/होते ते मी सांगू शकत नाही.
कित्येक वेळेस पोटात दुखत असेल तर त्याचे निदान झाल्याशिवाय उपचार कसे करणार. पोटाला हात लावून १००% निदान करणारे डॉक्टर इतिहासात नव्हते आणि पुढेही होणार नाहीत. असे असंख्य वेळेस माझ्या सारख्या रोग निदान तज्ज्ञांना आढळून आले असल्याने तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तर "रुग्णांना" आधुनिक तंत्राचा फायदा द्यावा असेच मला वाटते. निदान झाल्यानंतर त्यांनी कुठे इलाज करून घ्यावा आणि त्यामुळे त्यांचे नुकसान होईल की नाही हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे.( जसे सिगरेट प्यायल्यामुळे आर्थिक आणि शारीरिक नुकसानच होते हे माहीत असूनही लोक ती पितातच).
जाता जाता -- जुन्या पिढीतील फॅमिली डॉक्टरांचे निदान अचूक असे हा एक गैरसमज आहे कारण त्यांना निदान होईपर्यंत रोग बहुसंख्य वेळेस बराच "पुढे" गेलेला असे. आज मूत्रात रक्त पडत असेल तर आज तुमच्या मूत्रपिंडात एक सेमीच्या कर्करोगाचे सुद्धा सहज निदान होते जेंव्हा तो स्टेज १ किंवा २ असतो. हाच कर्करोग सरासरी ४-५ सेमी होईपर्यंत (जोवर तो बहुधा चौथ्या स्टेजला पोहोचलेला असतो) हाताला जाणवत नसल्याने पूर्वीचे फॅमिली डॉक्टर "परफेक्ट" निदान करेपर्यंत रोग हाताबाहेर गेलेला असे.
11 Jul 2016 - 8:55 pm | कैलासवासी सोन्याबापु
उत्तर अतिशय आवडले डॉक्टर साहेब, ह्याहून चांगले समजवले नसते कोणी, परत एकदा आभार
10 Jul 2016 - 9:46 am | चौकटराजा
मी राहात असलेल्या जागी शेजारी होमिऑपाथी मधे वैद्यकाचे पदवी शिक्षण घेणारे काही विद्यार्थी होते. त्यांचे कडे प्रिन्सिपलस
ऑफ इटरनल मेडिसिन, किवा ग्रेज अनॉटोमी ही पुस्तके पाहिली आहेत. माझा असा कयास आहे की त्यानाही इमेजेस त्याचा
अर्थ असे काही भाग अभ्यासासाठी असावेत. फक्त फार्मसी हा विषय वेगवेगळा असावा. जर त्याना एक्स रे, एम आर आय ई ई चे ज्ञान मिळत असेल तर अलोपथी वाल्यांचा वरील दावा कोर्टात टिकणार नाही.
अर्थात एखादे अप्लीकेशन कायद्याने रेडिओलॉजि चे खास शिक्षण घेणार्यानीच वापरायचे असेल व त्यानी हा दावा टाकला असेल तर..... त्याचे उत्तर पुन्हा
"शेवटी सर्व देव शंकराना शरण गेले " या चालीवर डॉ खरे........
10 Jul 2016 - 9:54 pm | आनंदी गोपाळ
बी जे मेडिकल कॉलेजच्या होस्टेलमधे, काही मुलांकडे, हरजाई, कली अशा नावांची पुस्तके असत.
त्याचप्रमाणे काही मुलांकडे नाटकाची किंवा इतिहासाचीही पुस्तके असत.
त्याचा अर्थ, असे भाग अभ्यासासाठी असावेत.
11 Jul 2016 - 6:38 am | असंका
आता बघा...
होमिओपॅथ अभ्यास करतात अॅनाटोमीचा आणि बीजे वाले हरजाई / कली / नाटक किंवा इतिहास यांचा....
नॉट वेरी कॉन्फिडन्स इन्स्पायरींग....इज इट?
12 Jul 2016 - 2:22 pm | आनंदी गोपाळ
आता, तुमच्या प्रगल्भ बुद्धीला समजेल अशा भाषेत मी काय म्हटलंय ते परत सांगतो.
पहा, समजतंय का. नसेल तर पुन्हा इच्चारा. माझ्या भाषेत पुन्हा समझवून सांगायचा प्रेत्न करीन.
12 Jul 2016 - 8:55 pm | असंका
मर्यादेत रहा.... माझ्या बुद्धीमत्तेबद्दल टीप्पणी करायचा आपल्याला हक्क नाही.
आणि समझवून वगैरे स्वत:लाच सांगा की अपमानास्पद भाषा वापरली म्हणजे आपला मुद्दा सर झाला असं नसतं.
लाथांच्या सुकाळात मला इंटरेस्ट नाही. तेव्हा सभ्य भाषेत लिहिणार नसाल तर लेखनसीमा...
रच्याकने अॅनाटोमी सुद्धा होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमात नसते असा आपल्या वरच्या प्रतिसादातनं अर्थ निघतोय...
12 Jul 2016 - 9:14 pm | धनंजय माने
समजवून असं व्यवस्थित लिहा.
ज ज जहाजातला!
12 Jul 2016 - 9:17 pm | असंका
मीही तुम्ही म्हणता तसंच लिहितो एरवी..पण ज्यांना प्रतिसाद देत होतो त्यांना समजावा म्हणून त्यांच्या प्रतिसादातून कॉपी पेस्ट करून टाकला...
12 Jul 2016 - 11:40 pm | आनंदी गोपाळ
तयाचं काये, की समजनेवाले को इशारा काफी होता हय. आमच्याकडे समझनेवालेको इशारा काफी होता है.
लय सभ्य आवरणं आणलीत की रस वगैरे निघतात. तुमच्याशी लाथाळ्या खेळायची आमची औकात नाही, तुम्ही त्यातले एक्षपर्ट. पण सुरुवात तुम्ही केल्यावर नाइलाज झाला.
12 Jul 2016 - 11:56 pm | असंका
चुक.
चौकटराजा जे म्हणत होते त्याचा विपर्यास आपण केलात. ते मी दाखवलं तर लगेच माझ्यावर वैयक्तिक शेरेबाजी केलीत.
मी एकही वैयक्तिक शेरा अजूनही दिलेला नाही. त्यामुळे म्हणायला आपण काहीही म्हणलात की मी लाथाळ्या सुरु केल्या, तरी ते खरं नाही.
10 Jul 2016 - 10:38 pm | गवि
अॅनॉटॉमी, इमेजिंग आणि तत्सम गोष्टी शिकवून फक्त फार्मसी होमिओपथीची वेगळी शिकवण्यात काय पॉईंट आहे?
म्हणजे मेकॅनिकला फ्युएल इंजेक्शन, इंजिन कूलिंग, इलेक्ट्रिकल सिस्टीम वगैरे सर्व थियरी शिकवून शेवटी दुरुस्तीच्या अभ्यासक्रमात मात्र कार स्टार्ट होत नसल्यास बॉनेटवर पेढा ठेवायला शिकवण्यासारखं आहे.
11 Jul 2016 - 12:41 am | प्रसाद गोडबोले
हा हा हा
खतरनाक उपमा दिली आहे .... पण चुकीची ।
इथे कोणीही बोनेट वर पेढा ठेवा म्हणत नाहीये , गाडी सुरु होत नाहीये तर त्यात इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरा किंवा व्हाईट पेट्रोल वापरा किंववा डिझेल वापरून पहा किंववा केरोसीन वापरून पहा असे म्हणत आहेत । गाडी नक्की कोणत्या इंधनावर चालते हे कोणालाच खात्रीलायक माहीत नाहीये , त्यातल्यात्यात पेट्रोल वर चालते असे म्हणायला बर्यापैकी इव्हीडान्स आहे इतकेच।
11 Jul 2016 - 6:31 am | गवि
नाही ना.
पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पाणी, गोमूत्र, गंगाजल, गुलाबपाणी, एरंडेल... यापैकी काही टाकीत म्हणजे टाकीच्या आत बरं का.. म्हणजे थेंबभर तरी इंजिनात पोहोचेल अशा रितीने घालणार्या पद्धती अनेक आहेत. त्यापैकी कोणाला विरोध करण्याचा उद्देश नाही.
पण अशांमधे मेकॅनिकच्या कामाविषयी किंवा इंधनाच्या ज्वलनक्षमतेबद्दल माहिती नसणारे लोकही जी बॉनेटवर पेढा ठेवणारी एक पद्धत आहे तिचाच विरोध करु शकतात. आणि म्हणून ते उदाहरण योग्यच आहे. कारच्या सिस्टीममधे पेढा पोचला इतकं जरी सिद्ध केलं तरी बास आहे. पेढ्याने गाडी चालत असेल हेही मान्य करु.
रोना है तो इसी बात का की तेही सिद्ध होऊ शकत नाही. आडात नाही हे कळतंय पण पोहर्यात येतंय असं म्हटलं जातं..
खरं तर बॉनेटवर पेढा ही उपमा चुकलीच हे ऑन सेकंड थॉट मान्य करतो. पेढा बॉनेटभोवती हवेत ओवाळून दूर टाकणे ही उपमा योग्य ठरेल.
11 Jul 2016 - 7:45 am | असंका
आतापर्यंत सुरु न होणारी गाडी जर बॉनेटभोवती पेढा ओवाळून सुरु झाली....
11 Jul 2016 - 7:59 am | गवि
उत्तम प्रश्न आहे.
कुठेतरी साठलेली आर्द्रता, काहीतरी गरम किंवा थंड पडलेला भाग कालानुरुप थंड किंवा गरम झाला की गाडी स्टार्ट होते हे ५०% केसेसमधलं कारण आणि उपाय असतो अशी परिस्थिती दुर्दैवाने असते तेव्हा चालू होण्याचं श्रेय ५०% वेळा पेढ्याला जातं आणि "आमची गाडी सकाळपासून बंद होती,बारा वाजेपर्यंत सगळे उपाय झाले पण दुपारी पेढा ओवाळून मग. चावी फिरवताच चालू झाली".. अशा सक्सेस स्टोरीज फैलावतात. त्यांना शास्त्रीय किंवा तार्किक सिद्धता म्हणत नसून सांगोवांगीच्या गोष्टी म्हणतात. अशा (फक्त चालू झालेल्याच केसेस जगभरातून निवडून घेतलेल्या कथांचं -ज्या खोट्या नसतात), पूर्ण पुस्तक जरी संकलित केलं तरी पेढा ओवाळून गाडी सुरु होण्याला आधार मिळत नाही.
11 Jul 2016 - 8:51 am | असंका
मान्य...
फक्त एक शंका,
पेढा ओवाळण्याआधी "बाकी सगळे उपाय" मग का केले गेले - (म्हणजे गॅरेजवाल्याने; गाडी मालकाने नाही)? त्यांना तर हे सगळं कालानुरुप गरम थंड माहित असतं ना?
11 Jul 2016 - 9:08 am | कानडा
हो ना. पण मालकाला घाई असते ना गाडी सुरु करायची. त्याची थांबायची तयारी नसते. आणि ५०% केस मधे गाडी "अशी" सुरु होत नसते हे ही त्याला (गॅरेजवाल्याला) माहित असते.
---
कानडा
11 Jul 2016 - 10:02 am | असंका
अच्छा? आपण काय म्हणत आहात ते आपल्याला नक्की माहित आहे ना?
मी जे वाचलं - जे मला कळलं, ते मी वेगळ्या शब्दात मांडतो- माझं चुकत असेल, तर कृपया दुरुस्त करा-
"५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय फाय/मॉडर्न गॅरेजवाले) गरज नसताना खुडबुड करून त्याचे पैसे वसूल करतात."
हे असंच म्हणत आहात का आपण?
11 Jul 2016 - 10:18 am | कानडा
जाऊ द्या. प्रोबॅबिलिटी चा अभ्यास करावा लागेल हे समजण्यासाठी.
---
कानडा
11 Jul 2016 - 10:21 am | असंका
कुणाला काय समजण्यासाठी कुणाला हा अभ्यास करावा लागेल?
11 Jul 2016 - 10:29 am | कानडा
अच्छा च्या पुढे " ? " नसता तर ऊत्तर दिले असते. पण म्हणुनच वर म्हटलय " जाऊ द्या ".
---
कानडा
11 Jul 2016 - 10:35 am | असंका
जाउ देत नाही असं मी म्हणलं तरी त्याला काय अर्थ आहे ?...आपली मर्जी...
11 Jul 2016 - 2:10 pm | गवि
यात तथ्य असू शकेल. किमान असे मेकॅनिक खूप असण्याची सत्य शक्यता आहे. बट द्याट डजन्ट इन एनी वे ऑटोमॅटिकली मेक पेढा ओवाळणे मेथड जेन्युईन.
मॉडर्न मेडिसिनचे अनेक प्रॅक्टिसकर्ते खरोखर अजिबात हिस्टरी विचारत नाहीत, नीट ऐकून घेण्याइतकाही वेळ देत नाहीत, साध्या शब्दात पेशंटला डायग्नोसिस आणि उपचार / उपचार न देण्यामागची कारणं असं नीट समजावून सांगायला लागणार्या एक्स्ट्रा पाच मिनिटांना ते महाग असतात.. तीन मिनिटांत एक पेशंट हाकलतात.. हे खरंच आहे. त्यामुळे मॉडर्न मेडिसिनचं म्हणणं पेशंटपर्यंत पोहोचतच नाही.
मग अन्यांकडे वळलेल्या पेशंटांना "चांगले" अनुभव आल्याचं वाटतं.
11 Jul 2016 - 4:38 pm | धनंजय माने
तो पेढा इकडे द्या बघू आधी....
उगाच बोनेट वर, इंजिन मध्ये, ओवाळुन लांब वगैरे करायचं असल्यास पेढे नाही माती दगड वगैरे घ्या. ;)
11 Jul 2016 - 4:43 pm | गवि
तुम्ही आधी इस्रायलहून मागवलेलं औषध द्या अन मग बोला.
11 Jul 2016 - 4:45 pm | धनंजय माने
आपण कोण?
11 Jul 2016 - 4:50 pm | गवि
हा शुद्ध हलकटपणा आहे माने.
सत्तर रुपये टाका आधी.
12 Jul 2016 - 9:15 pm | धनंजय माने
वाट बघा!
11 Jul 2016 - 7:40 am | चौकटराजा
ओ गवि साहेब म्हणून आम्ही " कयास" हा शब्द वापरला आहे.
12 Jul 2016 - 1:33 pm | अनुप ढेरे
हा हा हा, पेढ्याची उपमा खतरनाक आहे.
10 Jul 2016 - 11:56 pm | गामा पैलवान
डॉक्टरसाहेब,
काविळीवर आलोपथीचं काय मत आहे? एक स्वानुभव आहे.
आम्ही ठाण्याला होतो तेव्हाची गोष्ट आहे. माझ्या धाकट्या भावाला कावीळ झाली होती. बारातेरा वर्षांचा होता. चार दिवस चरईतल्या एका आलोपथीवाल्याच्या दवाखान्यात सलाईनवर होता. तेव्हढ्यापुरती पोटदुखी थांबायची. सुई काढली की पोट बोंब मारायचं. पोटात चार दिवसांत अन्नाचा कण जाऊ शकला नाही. प्रचंड अशक्तपणा आलेला. शेवटी फ्याडॉच्या सांगण्यावरून घरी आणलं. नेमका त्याच दिवशी माझा मित्र मला भेटायला आला तर त्याच्याकडून एका आयुर्वेदिक औषधवाल्या गृहस्थांचा पत्ता मिळाला. ठाण्यातच रहायला होते.
त्यांच्या घरी भावाला घेऊन आम्ही सगळे (आईबाबा आणि मी) गेलो. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दह्यात घालून औषध दिलं. दोन दिवसांत कावीळ उतरली. सोबत तीन महिने कडक पथ्य सांगितलं. ते आम्ही पाळलं.
माणूस भला होता. कुटुंबीयही सालस होते. सेवाभाव म्हणून काविळीचं औषध द्यायचे. औषध विकण्यासाठी नाही असा दंडक होता म्हणून पैसे आजिबात घेतले नाहीत.
तर मूळ प्रश्न असा आहे की आलोपथीच्या मते कावीळ म्हणजे काय? आणि ती दूर करावी का?
आ.न.,
-गा.पै.
11 Jul 2016 - 3:03 pm | सुबोध खरे
गामा साहेब,
मुळात कावीळ हा एक आजार नसून ते एक आजाराचे लक्षण आहे. आपल्या रक्तात असणारे हिमोग्लोबिन जेंव्हा विघटन पावते तेंव्हा त्यातील लोह हे शरीरात परत वापरले जाते आणि इतर घटक टाकून दिले जातात यातील बिलिरुबिन हा घटक तुमच्या यकृतातून स्रवला जातो आणि पित्ताशयात साठवला जातो आणि तो शेवटी आपल्या विष्ठेतून बाहेर टाकला जातो. ( विष्ठेस पिवळा रंग येण्याचे हे कारण आहे)
शरीरातून आतड्यात हे बिलिरुबिन टाकण्याच्या प्रक्रियेला एक मर्यादा असते. त्यामुळे
१)जर जास्त प्रमाणात बिलिरुबिन तयार झाले तर ते रक्तात पसरते किंवा
२) आपल्या यकृताला सूज आली उदा. विषाणू जन्य कावीळ, दारू पिणे किंवा
३) यकृतातून आतड्यात उतरण्याच्या मार्गात अडथळा आला. उदा. पित्ताशयातील खडा, यकृत, पित्ताशय, स्वादुपिंडाचा कर्करोग(स्टीव्ह जॉब्स यांना झालेला )
यातील कोणत्याही कारणामुळे हे बिलिरुबीननं आतड्यात पोहोचू शकले नाही तर ते रक्तात पसरते आणि ज्याला आपण प्रचलित भाषेत कावीळ म्हणतो तो रोग होतो.
म्हणजेच कावीळ हा रोग नसून ते एक लक्षण आहे.
कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख कारण हे विषाणू आहे आणि त्यातील ९९ % रुग्ण स्वतःहून बरे होतात मग तुम्ही त्याला झाडपाल्याची औषधे द्या किंवा साबुदाण्याच्या गोळ्या द्या.या विषाणूंमुळे यकृताला सूज येते यामुळे आपल्या पित्त मालिकेवर दबाव पडतो आणि बिलिरुबिन आतड्यात उतरत नाही म्हणून आपले शरीर पिवळे पडते. आपली पचन शक्ती आणि प्रतिकार शक्ती बिघडून जाते आणि आपल्याला प्रचंड अशक्तपणा येतो. जेंव्हा ही सूज उतरू लागते तेंव्हा हा पित्त नलिकेवरिल दबाव नाहीसा होतो आणि वेगाने शरीरातील बिलिरुबिन आतड्यात उतरू लागते.
चार दिवस आधुनिक शास्त्राचे औषध घेऊन कावीळ बरी होत नाही म्हणून लोक इतर मार्गाला जातात त्या वेळपर्यंत तुमचे शरीर काविळीच्या विषाणूंना निष्प्रभ करण्याच्या मार्गाच्या शेवटास आलेले असते. त्यामुळे काकतालीय न्यायाने त्या वेळेस जे औषध घेतलेले असते ते गुणकारी म्हणून ठरवले जाते. मला स्वतः ला झालेली कावीळ ली कोणतेही औषध न घेता केवळ विश्रांती साधा आहार आणि जीवनसत्त्वे यांनी बरी झाली.
विषाणू जन्य कावीळ सोडून इतर कावीळ अशा औषधे देणार्यांनी बरी करून दाखवावी उदा. हिमोलिटिक अनेमिया, पित्ताशयाच्या कर्करोग. हे माझे त्यांना आव्हान आहे.
11 Jul 2016 - 3:07 pm | स्पा
डॉक्टर काका स्नायपर वाटायला लागलेत
एकेकाचा टिपून गेम करतायेत ;)
11 Jul 2016 - 3:15 pm | गवि
सुखसाहेब, तुमच्या संयमाने समजावत राहण्याचा प्रचंड आदर वाटतो. पण लोक इन जनरल इर्रॅशनल गोष्टी अजिबात सोडू शकत नाहीत याची एव्हाना खात्री झाली आहे. बहुधा काहीतरी न समजणारी मिसिंग लिंक, काहीतरी तर्कापलीकडलं , काहीतरी फक्त डॉक्टर, गुरु वगैरेंनाच कळतं आणि आपल्याला कळत नाही अशाच गोष्टींचं आकर्षण जास्त असतं आणि विश्वासही. नेमकं कशाने काय होतं हा कार्यकारणभाव खरंच समजून घेणं अनेकदा रुक्ष, नीरस , रखरखीत असतं. त्यापेक्षा anecdotal इज मच मोअर अट्रॅक्टिव्ह.
11 Jul 2016 - 3:21 pm | स्पा
बरे तुम्ही काय म्हणता म गवी, काय करायचे ,
जग किती लो आय क्यू वाले आहे नै. काही कळतच नाही कुणाला
11 Jul 2016 - 3:31 pm | गवि
काहीच नाही करायचं रे स्पा. फक्त समजून घ्यायचं आणि समजावणं थांबवायचं इतकंच. कधीकधी असं समजावू पाहणार्याच्या तळमळीने कौतुकाची उबळ येते. व्यर्थताही दिसते. मागोमाग येणारे प्रतिसाद उबळही थांबवतात. धन्यवाद.
11 Jul 2016 - 3:37 pm | कैलासवासी सोन्याबापु
फक्त समजून घ्यायचं आणि समजावणं थांबवायचं इतकंच.
एका वाक्यात खूप मोठा अर्थ आहे हा गवि, मी आपला वैयक्तिक ऋणी आहे ह्या वाक्या करता :)
11 Jul 2016 - 3:55 pm | स्पा
असो
12 Jul 2016 - 11:06 am | असंका
=))
11 Jul 2016 - 4:10 pm | टवाळ कार्टा
७०-८० वर्षांपूर्वी लोक कावीळीला जीवघेणा रोग समजायचे...अगदी आजही या रोगाला लोक टरकून असतात असे का?
11 Jul 2016 - 4:18 pm | चौकटराजा
माझ्या माहितीप्रमाणे हेपेटायटीस बी व पाचापैकी इतर एक कोणता तरी असे लिव्हर वर गंभीर परिणाम करणारे प्रकार आहेत.
ते झाले तरच हा रोग जीवघेणा ठरतो.
11 Jul 2016 - 4:16 pm | चौकटराजा
काविळीत विश्रान्ति व स्निग्ध सेवन टाळणे हे दोन महत्वाचे उपचार आहेत असे आहे काय? तसेच आडवे झाले काही एन्झाईम्स शरीर क्रियेत भाग घेतात किंवा घेत नाहीत या कारणास्तव काविळीत आडवे पडून आराम करणे याला खास महत्व आहे असे आहे का खरे साहेब ?
11 Jul 2016 - 7:15 pm | सुबोध खरे
यकृत हा शरीरातील रासायनिक प्रक्रियांचा कारखाना आहे आणि तो कधीच बंद पडत नाही. त्याला सूज आलेली असताना त्यावर भार टाकणे हे श्रेयस्कर नाही. don't flog a tired horse.
आडवे झोपल्याने आपल्याला तसा काही परंतु उभे राहून आपण दमता आपल्याला श्रम होतात तसे आडव्याने होत नाही. एवढंच
12 Jul 2016 - 3:28 am | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
आता असं बघा की, चार दिवस भाऊ इस्पितळात दाखल होता. सुईपाणी लावलं होतं. पण जरा म्हणून सुई काढली की पोटदुखी उसळी मारायची. प्रकृतीत काहीच सुधारणा नव्हती आणि अशक्तपणा जाम वाढला होता. फ्याडाँच्या मते चार दिवसांत कावीळ उतरायला हवी होती. पण तसं काहीएक चिन्ह नव्हतं.
मग फ्याडाँच्या सल्ल्यानेच आयुर्वेदिक औषध केलं. याअगोदर कधीही आयुर्वेदिक औषध केलेलं नव्हतं. आता परिस्थितीच अशी उद्भवल्याने दह्यातलं औषध केलं. ज्या दिवशी सकाळी पहिली मात्रा (डोस) घेतली त्याच दिवशी संध्याकाळी भाऊ व्यवस्थित हिंडूफिरू लागला.
हा योगायोग होता का? कावीळ हा जीवघेणा आजार (किंवा लक्षण) आहे. दोन प्राणघातक केसेस डोळ्यासमोर घडल्या आहेत. (एक अगोदर आणि एक नंतर.) त्यामुळे भावाची विकारमुक्ती हा माझ्यामते तरी योगायोग नाही.
आ.न.,
-गा.पै.
12 Jul 2016 - 1:50 pm | आनंदी गोपाळ
खरं तर खऱ्यांना ठाऊक नाही की तुमच्याशी डोकं लावणं म्हणजे कुणाशी कुस्ती खेळणं आहे.
तेव्हा योगायोग जौद्या. तुमची होम्योपदीने केलेली अँजिओप्लास्टी कशिये? सिग्रेट सोडली की नाही अजून?
13 Jul 2016 - 5:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर साहेब, आपण स्वतंत्र लेख लिहा बरं, आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे, ते तरी कळेल.
-दिलीप बिरुटे
12 Jul 2016 - 11:45 am | अप्पा जोगळेकर
डॉक्टर साहेब,
कांजिण्या हा ऑटो इम्युन आजार आहे असे परवा परवा पर्यंत आधुनिक शास्त्रांचे डॉक्टर सांगत होते.
निदान मला तरी आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरने असेच सांगितले होते. तेच आधुनिक शास्त्राचे डॉक्टर आता कांजिण्यांवर औषधे देउ लागले आहेत हे खरे आहे ना?
असे असेल तर काय समजावे ? म्हणजे पूर्वी त्यांच्याकडे औषध नव्हते म्हणून ऑटो इम्युन असे ठोकून तर दिले नाही ना ?
माझ्या निष्कर्षांमधे गल्लत असेल पण तपशील अचूक आहेत. तुम्ही यावर कदाचित प्रकाश टाकू शकाल .
हेच आधुनिक शास्त्रांचे डॉक्टर अगदी आत्तापर्यंत तूप खाऊ नका असे सांगत होते आणि हेच लोक आता ओमेगा-३ की कायसे असते म्हणून तूप खा असे सांगू लागले आहेत.
विज्ञान परिवर्तनीय असते हे मान्य आहेच पण काल एक सांगितले आज एक सांगितले असे होऊ लागले तर आमच्यासारख्या सामान्य लोकांनी काय समजायचे ?
आधुनिक मेडिसिन क्षमतेत कमी पडले किंवा पारदर्शकतेत कमी पडले म्हणून लोक ओल्टर्नेटीव्हज कडे वळले असे वाटते.
आपण तज्ञ आहात म्हणून हे निव्वळ उत्सुकतेपोटी विचारत आहे.
12 Jul 2016 - 12:41 pm | सुबोध खरे
अप्पासाहेब
कांजिण्या हा विषाणूजन्य रोगाचा आहे आणि तो "ऑटो इम्युन" कधीच नव्हता. आजही हा रोग मर्यादित स्वरूपाचा आणि स्वतः हून बरा होणारा आहे. लहानपणी कांजिण्या झाल्या तर त्या लवकर बऱ्या होतात पण मोठेपणी जर हा आजार झाला तर तो जास्त तीव्रतेचा असतो.
यावर पूर्वी औषधे होती पण ती आजच्या इतकी सुरक्षित नव्हती. या आजारावर औषध दिल्याने त्याचा येणार ताप पाच दिवस ऐवजी दोन दिवसात आटोक्यात येतो वयस्कर माणसांना या रोगातून होणाऱ्या गुंतागुंती उदा. न्यूमोनिया सारखेच आजार टाळता येतात.
याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा म्हणजे कांजिण्यांच्या विषाणू मुळे उत्तर आयुष्यात होणार "नागीण" हा रोग आपल्याला होत नाही.नागीण हा रोग आपल्या नसे मध्ये सुप्त किंवा निष्क्रिय अवस्थेत राहतात आणि जेंव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेंव्हा परत जागृत होऊन आपल्याला नागीण होते. हे टाळायचे असेल तर औषध घ्यावे लागते. अन्यथा कांजिण्या हा रोग आठवडा ते १० दिवसात पूर्ण बरा स्वतःहून होतो.
12 Jul 2016 - 11:01 am | अनुप ढेरे
होमिओपदीची औषधे एवढी छान असते तर होमिओपदीचे डाक्टर आम्हाला पण आधुनिक औषधं प्रिक्राइब करता यावी ही मागणी का करतात?
12 Jul 2016 - 11:11 am | असंका
तुम्हाला माहित नाही? अहो हे वाचा. पेशंटची गरज म्हणल्यावर सगळं करावं लागतं ना...
12 Jul 2016 - 12:47 pm | सुबोध खरे
ढेरे साहेब
साधं सरळ आहे
"प्रच्चंड" प्रमाणात रोगी बरे होत असले तरी ते ५ % च असतात. मग इतर ९५ टक्के च काय?
माझ्या मित्राचे वडील म्हणाले ते बरोबर -- BHMS किंवा BAMS किंवा BUMS(युनानी) चे प्रवेश एम बी बी एस च्या अगोदर संपतात का?
जाऊ द्या झालं. अशी उगाच कुणाच्या चड्डीला हात घालू नका.
12 Jul 2016 - 11:09 am | असंका
तुम्हाला माहित नाही? अहो हे वाचा. पेशंटची गरज म्हणल्यावर सगळं करावं लागतं ना...
12 Jul 2016 - 11:24 am | वेल्लाभट
एका सुरेख घुमजाव साठी डॉक्टर साहेबांचं कौतुक
12 Jul 2016 - 12:42 pm | सुबोध खरे
झोपी गेलेला जागा झाला
12 Jul 2016 - 2:37 pm | धनंजय माने
डॉक्टर साहेब, धाग्याच्या त्रिशतकपूर्तीवेळी तुम्हाला एक किलो साबुदाणा, मराठी माध्यमाची पुस्तकं आणि अल्कोहोल असं दिलं तर आवडेल का?
12 Jul 2016 - 2:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
ससुरे तोहर कारण हमर अंतडीया हस हस के लपेटा मार देईस, पहले हमर अंतडीया ठीक करने का इलाज म जो लागत आयेगा ओकर भुगतान करीबे करो तुम
=)) =)) =))
12 Jul 2016 - 2:47 pm | आनंदी गोपाळ
इ का कहत हो बापू? मिलिटरी अस्पतालवा बंद हुई गवा का ;)
12 Jul 2016 - 2:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
लो तेरी तो! आपको का बताए पॅरामिलिटरी का भंगटा!!, ऐसा समझो हमारे वास्ते बंद है अस्पताल औरो उपरसे इ धनंजया हमर जबडा भी दुखाई दिया हसा के
12 Jul 2016 - 3:02 pm | टवाळ कार्टा
ज्या रोगांमुळे माणसे मरतात (जर वेळेत उपचार नाही झाले तर...उदा. टिबी)...अश्या रोगांसाठी होमिओपदीकडे औषधे आहेत का?
12 Jul 2016 - 8:09 pm | असंका
तुम्ही कुठून आले!!!
ज्या रोगांमुळे माणसं मरत नाहीत (..उदा मायग्रेन/अर्धशिशी) ...अश्या रोगांसाठी मॉडर्न मेडिसीन्कडे औषधे आहेत का?
12 Jul 2016 - 8:39 pm | टवाळ कार्टा
म्हणजे ज्या रोगांमुळे माणसे मरू शकतात ते रोग होमिओपॅथीने बरे नाही होत?
12 Jul 2016 - 8:59 pm | असंका
म्हणजे जे रोग प्राणघातक सुद्धा नाहीत तेही मॉडर्न मेडीसीनने बरे होत नाहीत?
12 Jul 2016 - 9:17 pm | टवाळ कार्टा
एका साध्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नानेच.....तुम्ही पुण्याचे का?
12 Jul 2016 - 9:22 pm | असंका
तुम्ही मला थोडीच विचारत होतात? तुम्ही तुमचे प्रश्न विचारतो होतात, मी माझे प्रश्न विचारत होतो इतकंच.
म्हणलं सगळे प्रश्न एकत्र असले की उत्तर मिळायचा चान्स वाढेल कदाचित.
थोडी वाट बघू या. कुणी ना कुणी नक्कीच आपल्या प्रश्नांना उत्तरं देइल.
12 Jul 2016 - 11:01 pm | टवाळ कार्टा
तुम्ही तुमचे प्रश्न विचारत होता तर "तुम्ही कुठून आले!!!" असे का विचारले माझया प्रतिसादावर
बाकी तुम्ही उत्तर ना देता शेपूट घालणार हे माहीतच होते
झेपत नाही तर उंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला जावेच का =))
टीप - वरील वाक्यात काहीही अश्लील नाहीये, पुलंनीच लिहिले आहे ते
12 Jul 2016 - 11:22 pm | असंका
आपलं पहिलं वाक्य तर्क दृष्ट्या चुकीचं वाटतं. तुम्ही आलात का अरे वा...!! असं म्हणलं असतं आणि मग प्रश्न विचारला असता तर?
बाकी मी जर शेपूट घातली असेल, तर तुम्हीही तेच केले आहे.
पण माहितच होते म्हणताय ते कसं काय? तुम्ही काय खरंच मला विचारत होते काय हे प्रश्न? अहो मी डॉक्टर नाही...
आणि अश्लिल वगैरे कुठे विचार करता ? इतक्या गोष्टी इतक्या नामांकित आय डींनी ऐकवल्या आहेत की बोलायची सोय नाही
भोळसट, मूर्ख, इर्रॅशनल, प्रगल्भ बुद्धी, सर्वज्ञ, लो आय क्यू . काही कसर राहिली असेल तर तुम्हीही पूर्ण करा.
12 Jul 2016 - 11:34 pm | असंका
"तुम्ही कुठून आलात" म्हणजे तुम्ही इतका वेळ या धाग्यावर कुठे दिसत नव्हता, तर कुठे होतात असं मला म्हणायचं होतं.
खाली एक जण काहीतरी वेगळेच अर्थ लावत आहे या वाक्याचे त्यामुळे हा खुलासा करत आहे. माझ्या डोक्यात असले विचार येत नाहीत. कुणाच्या तरी डोक्यात येउ शकतील हेही माझ्या लक्षात आलं नाही, नाही तर मी असं लिहिलंच नसतं.
तरीही तुम्हाला माझ्या प्रश्नाचा त्रास झाला असल्यास क्षमस्व....
12 Jul 2016 - 11:59 pm | आनंदी गोपाळ
आमच्याही डोक्यात सब्य इच्चारच अस्तात.
http://www.misalpav.com/comment/856894#comment-856894 हाच संदर्भ घेऊन लिहिलंय तिथे. आता तुम्हाला वैट्ट वाट्टे तं आम्ही काय करावं बा?
बाकी दांभिक म्हणजे काय रे भाऊ?
13 Jul 2016 - 10:09 am | टवाळ कार्टा
कोणत्या धाग्यावर कधी यायचे याचे काही नियम असतात का? इतका वेळ या धाग्यात जी चर्चा सुरु आहे त्यावरुन मला एक शंका विचारावीशी वाटलेली...कोणीही "उत्तर" दिले असते तरी चालले असते...ते न होता तुम्हीच सरसकट मला अॅलोपॅथीवाल्यांमध्ये ढकलून उलट प्रश्न विचारत आहात
झाले गेले गंगेला मिळाले...माझ्याबाजूने कोणताही वैयक्तीक आकस नाही
12 Jul 2016 - 11:44 pm | आनंदी गोपाळ
संवेदनशील, सुसंस्कृत, सलज्ज राहिलं होतं.
दांभिक पण अॅडवू का? :)
12 Jul 2016 - 11:49 pm | असंका
मी काय दांभिकपणा केलाय?
12 Jul 2016 - 11:53 pm | आनंदी गोपाळ
आपल्या पहिल्या प्रतिसादापासून वाचा व आपणच सांगा महोदय, आपण दांबहिकपणाव्यतिरिक्त काय केले आहेत?
13 Jul 2016 - 10:09 am | टवाळ कार्टा
दोन्हीत बराच फरक आहे
इतका वेळ जशी उत्तरे तुम्ही दिलित तसेच मीही करत आहे
मुळात प्रश्न तुमच्यासाठी अथवा कोणा एकासाठी नव्हताच...जे लोक होमिओपॅथीची बाजू घेत आहेत त्यांच्यासाठी होता...तुम्ही स्वतःवर ओढून घेतलात
ते संपादकांसाठी होते ;)
असे काही करण्यापेक्षा बरीच इतर चांगली कामे आहेत माझ्याकडे
12 Jul 2016 - 9:01 pm | आनंदी गोपाळ
"ज्या लोकांना अर्धशिशी आहे,
त्यांनी एरंडेल घ्यावे.
म्हणजे त्यांना पूर्ण शिशी होईल"
<<
आजचेच व्हॉट्सॅप फॉर्वर्ड.
बाकी,
मायग्रेन म्हणजे नक्की काय, त्यात शरिरात काय होते? (रक्तवाहिन्यांना), सिंटिलेटिंग स्कोटोमा म्हणजे काय? ट्रिगर फॅक्टर्स कोणते, अर्गट अल्कलॉईड्स काय असतात, कॉफीचा व मायग्रेनचा काय संबंध, इ. प्रश्न होम्योपाद्सना जरा इच्चारून बघा, मग मॉडर्न मेडिसिनातल्या मायग्रेन उपचारांबद्दल बोलणे सुरू करा.
तुमच्यासारख्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या माणसानं, किमान गूगल तरी करून पहायचं होतं, असं मला तरी वाटतं बा!
12 Jul 2016 - 9:03 pm | आनंदी गोपाळ
वरील प्रतिसाद 'असका' नामक तैलबुद्धी, व सर्वज्ञानी व्यक्तीमत्वास आहे, हे नमूद करतो.
12 Jul 2016 - 10:56 pm | टवाळ कार्टा
इतके समजते हो डॉक्टर ;)
12 Jul 2016 - 11:19 pm | आनंदी गोपाळ
तुम्हाआम्हाला समजते, कारण तुम्ही आम्ही सामान्य आहोत.
ते असामान्य, कुशाग्र बुद्धीमत्तेचे, सर्वज्ञ, तैलबुद्धी इ. आहेत. त्यांना समझवून साम्गावे लागते, की सगळेच आपापल्या आईच्या पोटातून येतात. आपण चुकीच्या ठिकाणून आलो नसलोत, तर कोण कुठून आले हा प्रश्न मुळातच गैरलागू व स्वतःचे प्रगाढ ज्ञान प्रदर्शित करणारा असतो, हे यांना उमजेल तो सुदिन. ;)
12 Jul 2016 - 11:48 pm | असंका
इतकी घाण भाषा?
12 Jul 2016 - 11:52 pm | आनंदी गोपाळ
यात नक्की काय घाण आहे?
12 Jul 2016 - 11:55 pm | आनंदी गोपाळ
ते "खाली ते एक चुकीचा अर्थ लावत आहेत"
तसे "वर ते एक चुकीचा अर्थ लावत आहेत" असे लोकांना दिसत नाही, असे यांना वाटते का?
12 Jul 2016 - 8:55 pm | आनंदी गोपाळ
कैतरीच काय!
एड्सपासून क्यान्सरपर्यंत सगळे आजार बरे होतात. आहात कुठं तुम्ही?
12 Jul 2016 - 8:36 pm | चंपाबाई
तीन दिवस टीबी ट्रेनिंगमध्ये बिजि असल्याने लिहिता आले नव्हते.
१. ट्रेनिंग का होते हे महत्वाचे. २००० साली सरकारने टीबीसाठी एक आड एक दिवस उपचाराची नवीन पद्धत आणली, तेंव्हा सांगितले होते की जुनी रोज औषध घ्यायची पद्धत तितकीशी चांगली नाही, म्हणून ही नवी पद्धत आणली आहे.
आज २०१६ साली, पुन्हा तीच जुनी पद्धतच चांगली आहे यावर सरकार, जागतिक आरोग्य संघटना व सर्व तज्ञांचे एकमत झाले असुन पुन्हा जुनी पद्धत आता सुरु होणार आहे.
तात्पर्य : एखादी प्रचलित पद्धत चुकीची / निरुपयोगी आहे, असे नंतर सिद्ध झाले, हे अॅलोपथीतही होऊ शकते. मग होमिओपथीची एखादी वॉटर मेमरीची थेअरी नंतर चुकीची निघाली यावर अॅलोपथी तज्ञानी शिमगा करणे कितपत योग्य आहे?
२. होमिओपथीची कुठलीही थेअरी म्हणे लाच घेऊन मांडली होती. असे अॅलोपथीत घडत नसेल की काय ? का, अॅलोपथीवाले सारे सोने चांदी मृत्तिकेसमान मानणारे संत आहेत ?
३. एका रेडिओलोजिस्टला कुणी विचारले की तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर नाही. मग औशाधे का प्रिस्क्राइब करता ? ते बोल्ले : आँ ! असे कसे ? मी एम बी बी एस ही आहे. मला डिग्री देणारे ते मिनिस्ट्री ऑफ म्याजिक उर्फ एम एम सी सरकारमान्य - अधिकृत आहे. मग शंका का घेताय ?
होमिओपथीवाल्यांची डिग्री व त्यांचे महामंडळही सरकारमान्यच आहे. त्यांच्यावर शंका का घ्यायची म्हणे? पुढार्यानी काढलेली कॉलेजेस / कमी मार्कवाले अॅलोपथीला न मिळालेले तिथे जातात म्हणे , इ इ फोडणी घालुन त्यांच्यावर चिखलफेक व्हायला नको होती.
४. ट्रिचुरेशन / खलणे इ वर भाष्य करायची आमची ताकत नाही. पण घोटून केलेली कॉफी , पाण्यात उकळून मग दूध घालणे, दुधात कॉफी मिसळणे... वस्तू त्याच ठेउन पद्धत बदलली तरी चव बदलते. मिक्सरमधली चटणी व पाट्यावरली चटणी यात फरक असतो, इतके लिहायचे ज्ञान नक्कीच आहे.
12 Jul 2016 - 8:49 pm | चंपाबाई
होमिओपथीची कुठलीशी थेअरी ....
12 Jul 2016 - 9:20 pm | सुबोध खरे
मोगाखान
होमिओपथीची एखादी वॉटर मेमरीची थेअरी नंतर चुकीची निघाली यावर अॅलोपथी तज्ञानी शिमगा करणे कितपत योग्य आहे?
पण ती थिअरी चुकीची आहे असे होमे पदीचे लोक म्हणत नाहित ना तिथेच तर गोची आहे. त्यानि आपली थिअरी बदलावी (मग सगळंच डोलारा कोसळेल ना).
एका रेडिओलोजिस्टला कुणी विचारले की तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर नाही. मग औशाधे का प्रिस्क्राइब करता ? ते बोल्ले : आँ ! असे कसे ? मी एम बी बी एस ही आहे. मला डिग्री देणारे ते मिनिस्ट्री ऑफ म्याजिक उर्फ एम एम सी सरकारमान्य - अधिकृत आहे. मग शंका का घेताय ?
उगाच ताकाला जाऊन भांडे कशाला लपवताय? मी एम बी बी एस केलं त्यानंतर तीन वर्षे सगळे रुग्ण पाहिले त्यानंतर परत अखिल भारतीय स्तरावर प्रवेश परीक्षा देऊन रेडियोलॉजिस्ट झालो त्यानंतरही लष्करात २० वर्षे नोकरी करेपर्यंत आपल्याला सर्वच रोगी पाहायला लागतात हेही त्याच प्रतिसादात लिहिले होते त्याचे तुम्हाला विविक्षित विस्मरण(selective amnesia) झाले काय. मूळ मुद्दा मी आधुनिक शास्त्रातच एम बी बी एस केले आहे होमेपदी किंवा युनानी नव्हे. तेंव्हा ती औषधे देण्याचा मला हक्क कायद्याने दिलेला आहेच. (आपल्या माहितीसाठी इंडियन मेडिकल कौन्सिल ऍक्ट १९५७)
होमिओपथीवाल्यांची डिग्री व त्यांचे महामंडळही सरकारमान्यच आहे -- मग त्यांनी आपलीच औषधे द्यावीत की कशाला सरकारकडे भीक मागावी की आम्हाला पण आधुनिक औषधे द्यायची परवानगी द्या. आणि कशाला आधुनिक औषधाच्या साईड इफेक्ट्स चा डांगोरा पिटावा
ते त्रिचूरेशन आणि सक्सेशन करून त्यात ६६ भाग लॅक्टोज आणि ९९ भाग पाणी मिसळतात तेवढे वाचले नाही वाटतं. आणि त्यातील परत एक भाग घेऊन त्यात ६६ भाग लॅक्टोज /९९ भाग पाणी घालतात. असे २० वेळा केले की ते औषध २० पटीने "स्ट्रॉन्ग" होते.
घोटून केलेली कॉफी मध्ये १५ लिटर पाणी घालून पिता काय? किंवा पाण्यात उकळून मग दूध घालणे यात १००० लिटर पाणी मिसळता काय?
रच्याकने --तुम्ही होमे पदी वाले काय ? की टी बी ला होमेपदी देता येते काय याचे ट्रेनिंग घ्यायला गेला होतात?
तीन दिवसांच्या "बिझि" नेस चा डोंगर पोखरून उंदीर सुद्धा नाही झुरळच निघाले.
असो.
कुठे तरी जळल्याचा वास येतोय
12 Jul 2016 - 9:29 pm | रुस्तम
हा हा हा
12 Jul 2016 - 9:27 pm | रुस्तम
टीबी ट्रेनिंगमध्ये :O चंपाबाई पण (होमिओपॅथी) डॉक्टर की काय?
12 Jul 2016 - 9:41 pm | आनंदी गोपाळ
ये कुछ जम्या नै.
"तिथे" मी तुमची बाजू घेऊन भांडलो होतो. इथे, तुम्ही चुकीचे भांडण करीत आहात हे नमूद करतो.
होम्योपदीची बाजू व्यक्तिगत रागातून घेऊन तुम्ही संपूर्ण बावळटपणा करीत आहात. (असंच काहीसं तिथेही यांच्याकडून झालं होतं, त्याबद्दल मी बरंच अकांडतांडवनृत्य केलं होतं) तेंव्हा, आवरा, ही विनंती.
12 Jul 2016 - 9:42 pm | आनंदी गोपाळ
तुमच्या पोलिटिकल व्ह्यूजबद्दल सॉफ्टकॉर्नर असल्याने प्रतिसाद थोडा मवाळच दिलाय नै? ;)
12 Jul 2016 - 10:17 pm | चंपाबाई
माझे डिग्री व माझे कौन्सिल सरकारमान्य आहे असे ठासुन सांगणारा मनुक्ष इतरांची डिग्री व कोर्सही सर्कारमान्य आहे , हे विसरतो याचे नवल वाटले.
12 Jul 2016 - 10:23 pm | आनंदी गोपाळ
सरकारमान्य हा शब्द तुम्ही बीफ ब्यान, स्वच्छ भारत सेस, इ. बाबींबद्दल मान्य करता का?
झालं ना एकदा? ट्राय टु फर्गेट पर्सनल व्हेंडेटा..
12 Jul 2016 - 10:42 pm | चंपाबाई
माझ्या इच्छेविरुद्ध असले तरी सरकारचा नियम मानावाच लागेल ना ?
12 Jul 2016 - 10:53 pm | आनंदी गोपाळ
तुमच्या इच्छेचे सरकार आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत ;)
चला. जवळ-जवळ झोपायची वेळ झाली.
13 Jul 2016 - 3:41 am | गामा पैलवान
आगोबुवा,
>> ट्राय टु फर्गेट पर्सनल व्हेंडेटा..
हाहाहा. तुम्ही म्हणजे लोकां सांगे ब्रह्मज्ञान .... !
माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी करतांना उपरोक्त निकष आठवलं नाही वाट्टे?
आ.न.,
-गा.पै.
12 Jul 2016 - 10:39 pm | चंपाबाई
आणि आयुर्वेदवाल्याना महाराष्ट्रात अॅलोपथीची परवानगी पुर्वीपासुनच आहे... होमिओपथीवाल्याना नवीन अॅलोपथीचा अॅडिशनल कोर्स केल्यावर तेही आता ही औषधे वापरु शकतील.
आता वादाचे मुद्देच संपुष्टात आले ना ?
अर्जुन बोलला होता.... हा सूतपुत्र आहे. राजकुमार नाही.
तसंच झालं.
सरकार बोललं ... आता त्यानाही फार्म्याकॉलॉजीचा अभिषेक करतो. झाले ना आता बरोबरीचे ?आता लढा !
12 Jul 2016 - 10:19 pm | अजया
चंपाबाई असे प्रतिसाद देऊन काय मिळालं? तुम्ही क्वालिफाईड डाॅक्टर आहात ना? मग तुमच्यातला डाॅ असा विचित्र प्रतिसाद कसा देऊ शकतो? आपले राजकीय धार्मिक व्ह्यु काहीही असले तरी आपल्या व्यवसायाशी प्रतारणा करुन लोकांचा गोंधळ होईल असे प्रतिसाद का द्यावा?
या धाग्यावर डाॅ खरे पोटतिडकीनं लोकांचे गैरसमज दूर करायचा प्रयत्न करत आहेत.तुम्ही बरोबर उलट करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला?
नुसता अचरट टाइमपास करण्यापेक्षा प्रशिक्षित डाॅक्टर असाल तर या विषयावर लेखमाला लिहून प्रबोधन करुन दाखवा.
13 Jul 2016 - 12:24 am | रुस्तम
बाडीस
13 Jul 2016 - 12:04 am | अर्धवटराव
पण मिपावर एकही होमिओपेथी तज्ञ असु नये हि मिपाची लिमिटेशन नक्कीच जाणवली :)
होमिओपॅथीचा किल्ला लढवणारे अगदीच फुसके बार निघाले इथे. चॅम्पस् बाई बद्दल बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास झाला, पण इतरांनी केवळ अनुभवाधारीत प्रतिवाद केले आहेत. थेरपीचं तार्कीक वर्णन कुणीच केलं नाहि.
अवांतरः माझा मोठा भाऊ होमिओपेथीचच औषध घेतोय व त्याला त्याचा फायदादेखील होतो आहे.
13 Jul 2016 - 8:45 am | सतिश गावडे
माझा एक होमिओपाथ मित्र आणि त्याला गुरुस्थानी असणारे एक ज्येष्ठ होमिओपाथ मिपावर होते. (या ज्येष्ठ होमिओपाथ मिपाकराचे काही महिन्यापूर्वी निधन झाले)
मात्र ते होमिओपथी विरोधी भडीमाराला तोंड देऊ शकले नाहीत. आणि त्यांनी होमिओपथीबद्दल लिहिणे बंद केले.
काही दिवसांपूर्वी मी या धाग्याचा दुवा त्याला दिला होता आणि त्याच्याशी चर्चाही केली होती. या चर्चेतून दोन मुद्दे समोर आले:
१. होमिओपथी औषधं कशी काम करतात हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र ती काम करतात हे मात्र नक्की.
२. काही होमिओपाथनी अवास्तव दावे करुन होमिओपथीला बदनाम केले आहे.
इथे एक मुद्दा काहींनी विचारात घेतलेला नाही तो म्हणजे काही होमिओपाथ क्लासिकल होमिओपथीची प्रॅक्टिस करतात. ते कधीच अॅलोपथिक किंवा आयुर्वेदिक औषधं देत नाहीत. जर अशा औषधांची गरज भासल्यास ते आपल्या पेशंटला त्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांना रेफर करतात.
अवांतर:
१. पुण्यातील डॉ. शैलेश देशपांडे हे "होमिओपथिक क्युअर फॉर कॅन्सर" यावर संशोधन करत आहेत.
२. वरील संशोधनावर आधारीत शिवराज गोर्ले यांचे "होय, होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते" नावाचे पुस्तक आहे. हे पुस्तक बुकगंगावर उप्लब्ध आहे.
13 Jul 2016 - 1:06 pm | अर्धवटराव
असं सर्वमान्य असेल तर वादच मिटला. एक पेशंट म्हणुन आपल्याला रोग बरा होण्याशी मतलब. तसं खात्रीने होत असेल तर होमिओपेथीने एलोपेथीच्या निकषांवर स्वतःला सिद्ध केलं काय, न केलं काय, काहि फरक पडत नाहि. होमिओपॅथीचं गुढ कधितरी उकलेलच. तोवर त्या थेरपीचे सिद्धांत समजले नाहि तरी फॉर्म्युले सेट होऊन त्याची परिणामकारकता सिद्ध झाले तरी पुष्कळ आहे. तसंही आयुष्य जगताना आपण क्वचीतच कार्य-कारणभावाच्या नादी लागतो :)
13 Jul 2016 - 6:31 pm | अप्पा जोगळेकर
सगळेच पेशंट कार्यकारण भावाच्या मागे लागले तर ते एकंदरच कोणत्याच पॅथीवाल्यांना परवडणारे नाही.
अडचणीत आणणारा प्रश्न विचारला तर समोरच्याला इतकी भव्य दिव्य, वैद्यकीय संज्ञांनी खचाखच भरलेली माहिती दिली जाते की झाले. प्रश्नकर्ता बिचारा मूळ प्रश्न काय होता हे स्वतःच विसरुन जातो.
13 Jul 2016 - 6:43 pm | सुबोध खरे
अर्धवटराव साहेब
कुणाच्या कोंबड्याने उजाडले तरी चालेल ही गोष्ट मान्य आहे.
पण अंधारात विजेरी दाखवून तोच सूर्य आहे आणि तुम्ही खड्यात पडलात तर तुमचे नशीब असे असेल तर कसे चालेल ?
असे अनेक रोग आहेत जेथे सहज सहजी कोणती पॅथी काम करते की नाही हे स्पष्टपणे दाखवता येते तेथेही हे लोक लंब्याचवड्या बाता मारून शेंडी लावत असतात.
कालच एक मिपाकर माझ्याकडे गप्पा मारायला आले असता एक रुग्ण पित्ताशयातील खडे घेऊन परत सोनोग्राफीसाठी आली होती. त्यांना त्यांच्या "आयुष" व्यावसायिकाने औषध देऊन खात्रीने खडे बरे होतील सांगितले होते. १८ दिवस औषध घेऊन बरोबर १९ व्या दिवशी सोनोग्राफी करा. सर्वच्या सर्व खडे जैसे थे होते याबद्दल काय म्हणायचे?
या बाबत निदान आधुनिक पद्धती बरी. आमच्या कडे या रोगाला औषध नाही शल्यक्रिया हाच उपाय असे स्पष्ट सांगतात. उगाच रुग्णाला चोळत बसत नाही.
असो तोच मुद्दा उगाळण्यात काही मजा नाही.
13 Jul 2016 - 10:21 pm | अर्धवटराव
शेंडी लावण्याचे प्रकार आपल्याकडे नवीन नाहितच. आरोग्याशी खेळ करणारे सर्वपॅथी डॉक्टर्स, स्वतः पेशंट, सल्ला देणारे 'हितचंतक', जाणुनबुजुन किंवा खोट्या अभिमानापाई अवैद्यकीय उपाय करणारे... असे अनेक लोक आपापले कंदील घेऊन केवळ रोग्यालाच नव्हे तर प्रत्यक्ष्य सूर्याला देखील प्रकाश दाखवायला कमि करायचे नाहि. तो वेगळा विषय आहे. माझा मुद्दा इतकाच कि एखाद्या थेरपीची वैधता ठरवताना त्याची मोजता येण्याजोगी परिणामकारकता पुरेशी असावी काय? आणि होमिओपॅथी तो निकष पूर्ण करतो काय? त्यातला ग्रे एरीया साफ करायला होमिओपॅथीवाल्यांनी स्वतः प्रयत्न करायला हवेत हे कबूल. पण एकुणच विवेकाशी वावडं असणार्या आपल्या सिस्टीममधे अशा अनेक ग्रे/काळ्या एरीयांची सफाई व्ह्यायला अजुन अवकाश आहे.
13 Jul 2016 - 11:15 pm | चंपाबाई
प्रॅक्टिस करणे व वैधता तपासणे या दोन स्वतंत्र कहाण्या आहेत.
मी कुठल्या का पॅथीची प्रॅक्टिस करेना , सरकारमान्य व पुस्तकात आहे ते सर्व वैधच आहे असेच मी बाय डिफॉल्ट मानून चालणार .
वैधता तपासणे हे प्रॅक्टिशनरचे काम नाही.
अजुन एक उदाहरण टीबी बाबतच...
काही वर्शापुर्वी टी बी एलायजा ही टेस्ट बाजारात उपलब्ध होती.. जेंव्हा एक्स रे बडखा कशातच टीबी दिसत नसेल पण टीबीची शंका असेल तर रक्ताची एलायझा टीबी करुन त्या आधारे उपचार दिले जात.
काही वर्षानी सरकार बोल्ले .. हॅ टेस्ट निरुपयोगि आहे. बंद करा. सध्या ही टेस्ट कुणी करत नाही.
प्रॅक्टिस करणार्या माणसाने प्रत्येक औषध / तपासणीची वैधता पडताळ्य्न पहाणे हे अशक्य आहे. जे आज पुस्तकात आहे व सर्कारमान्य आहे ते त्या दिवसाकरिता वैधच असते
13 Jul 2016 - 1:11 am | अप्पा जोगळेकर
प्रतिजैविकांची चर्चा बाजूला राहून वैयक्तिक लढाया सुरु झाल्या.
13 Jul 2016 - 6:28 am | चंपाबाई
मिसळपावाचे सर्व धागे वीरगळाने सुरु होतात व गधेगाळाने संपतात.