Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुबोध खरे on Wed, 07/06/2016 - 19:52
प्रतिजैविके समज आणि गैरसमज. सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय? सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत. यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू. या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके. यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला. जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो. १) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही. २) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात. दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात. काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात. दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात. ३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा. ४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे. ५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही. ६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे. ७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला (आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात. ८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते. काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण? "अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच. ९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल. यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ" मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १ पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1 १०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल. बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे. प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे १) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते २) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो. ३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो. ४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात. हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
  • 129479 views

प्रतिक्रिया

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 20:55

In reply to वा! काय कन्क्लूजन आहे. शाब्बास्स! by आनंदी गोपाळ

Permalink

मर्यादेत रहा.... माझ्या

मर्यादेत रहा.... माझ्या बुद्धीमत्तेबद्दल टीप्पणी करायचा आपल्याला हक्क नाही. आणि समझवून वगैरे स्वत:लाच सांगा की अपमानास्पद भाषा वापरली म्हणजे आपला मुद्दा सर झाला असं नसतं. लाथांच्या सुकाळात मला इंटरेस्ट नाही. तेव्हा सभ्य भाषेत लिहिणार नसाल तर लेखनसीमा... रच्याकने अ‍ॅनाटोमी सुद्धा होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमात नसते असा आपल्या वरच्या प्रतिसादातनं अर्थ निघतोय...
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Tue, 07/12/2016 - 21:14

In reply to मर्यादेत रहा.... माझ्या by असंका

Permalink

समजवून असं व्यवस्थित लिहा.

समजवून असं व्यवस्थित लिहा. ज ज जहाजातला!
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 21:17

In reply to समजवून असं व्यवस्थित लिहा. by धनंजय माने

Permalink

मीही तुम्ही म्हणता तसंच

मीही तुम्ही म्हणता तसंच लिहितो एरवी..पण ज्यांना प्रतिसाद देत होतो त्यांना समजावा म्हणून त्यांच्या प्रतिसादातून कॉपी पेस्ट करून टाकला...
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 23:40

In reply to मीही तुम्ही म्हणता तसंच by असंका

Permalink

तयाचं काये, की समजनेवाले को

तयाचं काये, की समजनेवाले को इशारा काफी होता हय. आमच्याकडे समझनेवालेको इशारा काफी होता है. लय सभ्य आवरणं आणलीत की रस वगैरे निघतात. तुमच्याशी लाथाळ्या खेळायची आमची औकात नाही, तुम्ही त्यातले एक्षपर्ट. पण सुरुवात तुम्ही केल्यावर नाइलाज झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 23:56

In reply to तयाचं काये, की समजनेवाले को by आनंदी गोपाळ

Permalink

चुक.

चुक. चौकटराजा जे म्हणत होते त्याचा विपर्यास आपण केलात. ते मी दाखवलं तर लगेच माझ्यावर वैयक्तिक शेरेबाजी केलीत. मी एकही वैयक्तिक शेरा अजूनही दिलेला नाही. त्यामुळे म्हणायला आपण काहीही म्हणलात की मी लाथाळ्या सुरु केल्या, तरी ते खरं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sun, 07/10/2016 - 22:38

In reply to कदाचित असे असेल..... by चौकटराजा

Permalink

त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ

त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ इटरनल मेडिसिन, किवा ग्रेज अनॉटोमी ही पुस्तके पाहिली आहेत. माझा असा कयास आहे की त्यानाही इमेजेस त्याचा अर्थ असे काही भाग अभ्यासासाठी असावेत. फक्त फार्मसी हा विषय वेगवेगळा असावा
अॅनॉटॉमी, इमेजिंग आणि तत्सम गोष्टी शिकवून फक्त फार्मसी होमिओपथीची वेगळी शिकवण्यात काय पॉईंट आहे? म्हणजे मेकॅनिकला फ्युएल इंजेक्शन, इंजिन कूलिंग, इलेक्ट्रिकल सिस्टीम वगैरे सर्व थियरी शिकवून शेवटी दुरुस्तीच्या अभ्यासक्रमात मात्र कार स्टार्ट होत नसल्यास बॉनेटवर पेढा ठेवायला शिकवण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 07/11/2016 - 00:41

In reply to त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ by गवि

Permalink

हा हा हा

हा हा हा खतरनाक उपमा दिली आहे .... पण चुकीची । इथे कोणीही बोनेट वर पेढा ठेवा म्हणत नाहीये , गाडी सुरु होत नाहीये तर त्यात इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरा किंवा व्हाईट पेट्रोल वापरा किंववा डिझेल वापरून पहा किंववा केरोसीन वापरून पहा असे म्हणत आहेत । गाडी नक्की कोणत्या इंधनावर चालते हे कोणालाच खात्रीलायक माहीत नाहीये , त्यातल्यात्यात पेट्रोल वर चालते असे म्हणायला बर्यापैकी इव्हीडान्स आहे इतकेच।
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/11/2016 - 06:31

In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले

Permalink

नाही ना.

नाही ना. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पाणी, गोमूत्र, गंगाजल, गुलाबपाणी, एरंडेल... यापैकी काही टाकीत म्हणजे टाकीच्या आत बरं का.. म्हणजे थेंबभर तरी इंजिनात पोहोचेल अशा रितीने घालणार्या पद्धती अनेक आहेत. त्यापैकी कोणाला विरोध करण्याचा उद्देश नाही. पण अशांमधे मेकॅनिकच्या कामाविषयी किंवा इंधनाच्या ज्वलनक्षमतेबद्दल माहिती नसणारे लोकही जी बॉनेटवर पेढा ठेवणारी एक पद्धत आहे तिचाच विरोध करु शकतात. आणि म्हणून ते उदाहरण योग्यच आहे. कारच्या सिस्टीममधे पेढा पोचला इतकं जरी सिद्ध केलं तरी बास आहे. पेढ्याने गाडी चालत असेल हेही मान्य करु. रोना है तो इसी बात का की तेही सिद्ध होऊ शकत नाही. आडात नाही हे कळतंय पण पोहर्यात येतंय असं म्हटलं जातं.. खरं तर बॉनेटवर पेढा ही उपमा चुकलीच हे ऑन सेकंड थॉट मान्य करतो. पेढा बॉनेटभोवती हवेत ओवाळून दूर टाकणे ही उपमा योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 07/11/2016 - 07:45

In reply to नाही ना. by गवि

Permalink

आतापर्यंत सुरु न होणारी गाडी

आतापर्यंत सुरु न होणारी गाडी जर बॉनेटभोवती पेढा ओवाळून सुरु झाली....
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/11/2016 - 07:59

In reply to आतापर्यंत सुरु न होणारी गाडी by असंका

Permalink

उत्तम प्रश्न आहे.

उत्तम प्रश्न आहे. कुठेतरी साठलेली आर्द्रता, काहीतरी गरम किंवा थंड पडलेला भाग कालानुरुप थंड किंवा गरम झाला की गाडी स्टार्ट होते हे ५०% केसेसमधलं कारण आणि उपाय असतो अशी परिस्थिती दुर्दैवाने असते तेव्हा चालू होण्याचं श्रेय ५०% वेळा पेढ्याला जातं आणि "आमची गाडी सकाळपासून बंद होती,बारा वाजेपर्यंत सगळे उपाय झाले पण दुपारी पेढा ओवाळून मग. चावी फिरवताच चालू झाली".. अशा सक्सेस स्टोरीज फैलावतात. त्यांना शास्त्रीय किंवा तार्किक सिद्धता म्हणत नसून सांगोवांगीच्या गोष्टी म्हणतात. अशा (फक्त चालू झालेल्याच केसेस जगभरातून निवडून घेतलेल्या कथांचं -ज्या खोट्या नसतात), पूर्ण पुस्तक जरी संकलित केलं तरी पेढा ओवाळून गाडी सुरु होण्याला आधार मिळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 07/11/2016 - 08:51

In reply to उत्तम प्रश्न आहे. by गवि

Permalink

मान्य...

मान्य... फक्त एक शंका, पेढा ओवाळण्याआधी "बाकी सगळे उपाय" मग का केले गेले - (म्हणजे गॅरेजवाल्याने; गाडी मालकाने नाही)? त्यांना तर हे सगळं कालानुरुप गरम थंड माहित असतं ना?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडा on Mon, 07/11/2016 - 09:08

In reply to मान्य... by असंका

Permalink

त्यांना तर हे सगळं कालानुरुप

त्यांना तर हे सगळं कालानुरुप गरम थंड माहित असतं ना?
हो ना. पण मालकाला घाई असते ना गाडी सुरु करायची. त्याची थांबायची तयारी नसते. आणि ५०% केस मधे गाडी "अशी" सुरु होत नसते हे ही त्याला (गॅरेजवाल्याला) माहित असते. --- कानडा
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 07/11/2016 - 10:02

In reply to त्यांना तर हे सगळं कालानुरुप by कानडा

Permalink

अच्छा? आपण काय म्हणत आहात ते

अच्छा? आपण काय म्हणत आहात ते आपल्याला नक्की माहित आहे ना? मी जे वाचलं - जे मला कळलं, ते मी वेगळ्या शब्दात मांडतो- माझं चुकत असेल, तर कृपया दुरुस्त करा- "५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय फाय/मॉडर्न गॅरेजवाले) गरज नसताना खुडबुड करून त्याचे पैसे वसूल करतात." हे असंच म्हणत आहात का आपण?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडा on Mon, 07/11/2016 - 10:18

In reply to अच्छा? आपण काय म्हणत आहात ते by असंका

Permalink

जाऊ द्या. प्रोबॅबिलिटी चा

जाऊ द्या. प्रोबॅबिलिटी चा अभ्यास करावा लागेल हे समजण्यासाठी. --- कानडा
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 07/11/2016 - 10:21

In reply to जाऊ द्या. प्रोबॅबिलिटी चा by कानडा

Permalink

कुणाला काय समजण्यासाठी कुणाला

कुणाला काय समजण्यासाठी कुणाला हा अभ्यास करावा लागेल?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडा on Mon, 07/11/2016 - 10:29

In reply to कुणाला काय समजण्यासाठी कुणाला by असंका

Permalink

अच्छा च्या पुढे " ? " नसता तर

अच्छा च्या पुढे " ? " नसता तर ऊत्तर दिले असते. पण म्हणुनच वर म्हटलय " जाऊ द्या ". --- कानडा
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 07/11/2016 - 10:35

In reply to अच्छा च्या पुढे " ? " नसता तर by कानडा

Permalink

जाउ देत नाही असं मी म्हणलं

जाउ देत नाही असं मी म्हणलं तरी त्याला काय अर्थ आहे ?...आपली मर्जी...
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/11/2016 - 14:10

In reply to अच्छा? आपण काय म्हणत आहात ते by असंका

Permalink

"५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय

"५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय फाय/मॉडर्न गॅरेजवाले) गरज नसताना खुडबुड करून त्याचे पैसे वसूल करतात."
यात तथ्य असू शकेल. किमान असे मेकॅनिक खूप असण्याची सत्य शक्यता आहे. बट द्याट डजन्ट इन एनी वे ऑटोमॅटिकली मेक पेढा ओवाळणे मेथड जेन्युईन. मॉडर्न मेडिसिनचे अनेक प्रॅक्टिसकर्ते खरोखर अजिबात हिस्टरी विचारत नाहीत, नीट ऐकून घेण्याइतकाही वेळ देत नाहीत, साध्या शब्दात पेशंटला डायग्नोसिस आणि उपचार / उपचार न देण्यामागची कारणं असं नीट समजावून सांगायला लागणार्या एक्स्ट्रा पाच मिनिटांना ते महाग असतात.. तीन मिनिटांत एक पेशंट हाकलतात.. हे खरंच आहे. त्यामुळे मॉडर्न मेडिसिनचं म्हणणं पेशंटपर्यंत पोहोचतच नाही. मग अन्यांकडे वळलेल्या पेशंटांना "चांगले" अनुभव आल्याचं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Mon, 07/11/2016 - 16:38

In reply to "५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय by गवि

Permalink

तो पेढा इकडे द्या बघू आधी....

तो पेढा इकडे द्या बघू आधी.... उगाच बोनेट वर, इंजिन मध्ये, ओवाळुन लांब वगैरे करायचं असल्यास पेढे नाही माती दगड वगैरे घ्या. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/11/2016 - 16:43

In reply to तो पेढा इकडे द्या बघू आधी.... by धनंजय माने

Permalink

तुम्ही आधी इस्रायलहून

तुम्ही आधी इस्रायलहून मागवलेलं औषध द्या अन मग बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Mon, 07/11/2016 - 16:45

In reply to तुम्ही आधी इस्रायलहून by गवि

Permalink

आपण कोण?

आपण कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/11/2016 - 16:50

In reply to आपण कोण? by धनंजय माने

Permalink

हा शुद्ध हलकटपणा आहे माने.

हा शुद्ध हलकटपणा आहे माने. सत्तर रुपये टाका आधी.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Tue, 07/12/2016 - 21:15

In reply to हा शुद्ध हलकटपणा आहे माने. by गवि

Permalink

वाट बघा!

वाट बघा!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 07/11/2016 - 07:40

In reply to त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ by गवि

Permalink

ओ म्हणून

ओ गवि साहेब म्हणून आम्ही " कयास" हा शब्द वापरला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 07/12/2016 - 13:33

In reply to त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ by गवि

Permalink

हा हा हा, पेढ्याची उपमा

हा हा हा, पेढ्याची उपमा खतरनाक आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 07/10/2016 - 23:56

Permalink

खरे डॉक्टरांना एक प्रश्न....

डॉक्टरसाहेब, काविळीवर आलोपथीचं काय मत आहे? एक स्वानुभव आहे. आम्ही ठाण्याला होतो तेव्हाची गोष्ट आहे. माझ्या धाकट्या भावाला कावीळ झाली होती. बारातेरा वर्षांचा होता. चार दिवस चरईतल्या एका आलोपथीवाल्याच्या दवाखान्यात सलाईनवर होता. तेव्हढ्यापुरती पोटदुखी थांबायची. सुई काढली की पोट बोंब मारायचं. पोटात चार दिवसांत अन्नाचा कण जाऊ शकला नाही. प्रचंड अशक्तपणा आलेला. शेवटी फ्याडॉच्या सांगण्यावरून घरी आणलं. नेमका त्याच दिवशी माझा मित्र मला भेटायला आला तर त्याच्याकडून एका आयुर्वेदिक औषधवाल्या गृहस्थांचा पत्ता मिळाला. ठाण्यातच रहायला होते. त्यांच्या घरी भावाला घेऊन आम्ही सगळे (आईबाबा आणि मी) गेलो. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दह्यात घालून औषध दिलं. दोन दिवसांत कावीळ उतरली. सोबत तीन महिने कडक पथ्य सांगितलं. ते आम्ही पाळलं. माणूस भला होता. कुटुंबीयही सालस होते. सेवाभाव म्हणून काविळीचं औषध द्यायचे. औषध विकण्यासाठी नाही असा दंडक होता म्हणून पैसे आजिबात घेतले नाहीत. तर मूळ प्रश्न असा आहे की आलोपथीच्या मते कावीळ म्हणजे काय? आणि ती दूर करावी का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 07/11/2016 - 15:03

In reply to खरे डॉक्टरांना एक प्रश्न.... by गामा पैलवान

Permalink

गामा साहेब,

गामा साहेब, मुळात कावीळ हा एक आजार नसून ते एक आजाराचे लक्षण आहे. आपल्या रक्तात असणारे हिमोग्लोबिन जेंव्हा विघटन पावते तेंव्हा त्यातील लोह हे शरीरात परत वापरले जाते आणि इतर घटक टाकून दिले जातात यातील बिलिरुबिन हा घटक तुमच्या यकृतातून स्रवला जातो आणि पित्ताशयात साठवला जातो आणि तो शेवटी आपल्या विष्ठेतून बाहेर टाकला जातो. ( विष्ठेस पिवळा रंग येण्याचे हे कारण आहे) शरीरातून आतड्यात हे बिलिरुबिन टाकण्याच्या प्रक्रियेला एक मर्यादा असते. त्यामुळे १)जर जास्त प्रमाणात बिलिरुबिन तयार झाले तर ते रक्तात पसरते किंवा २) आपल्या यकृताला सूज आली उदा. विषाणू जन्य कावीळ, दारू पिणे किंवा ३) यकृतातून आतड्यात उतरण्याच्या मार्गात अडथळा आला. उदा. पित्ताशयातील खडा, यकृत, पित्ताशय, स्वादुपिंडाचा कर्करोग(स्टीव्ह जॉब्स यांना झालेला ) यातील कोणत्याही कारणामुळे हे बिलिरुबीननं आतड्यात पोहोचू शकले नाही तर ते रक्तात पसरते आणि ज्याला आपण प्रचलित भाषेत कावीळ म्हणतो तो रोग होतो. म्हणजेच कावीळ हा रोग नसून ते एक लक्षण आहे. कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख कारण हे विषाणू आहे आणि त्यातील ९९ % रुग्ण स्वतःहून बरे होतात मग तुम्ही त्याला झाडपाल्याची औषधे द्या किंवा साबुदाण्याच्या गोळ्या द्या.या विषाणूंमुळे यकृताला सूज येते यामुळे आपल्या पित्त मालिकेवर दबाव पडतो आणि बिलिरुबिन आतड्यात उतरत नाही म्हणून आपले शरीर पिवळे पडते. आपली पचन शक्ती आणि प्रतिकार शक्ती बिघडून जाते आणि आपल्याला प्रचंड अशक्तपणा येतो. जेंव्हा ही सूज उतरू लागते तेंव्हा हा पित्त नलिकेवरिल दबाव नाहीसा होतो आणि वेगाने शरीरातील बिलिरुबिन आतड्यात उतरू लागते. चार दिवस आधुनिक शास्त्राचे औषध घेऊन कावीळ बरी होत नाही म्हणून लोक इतर मार्गाला जातात त्या वेळपर्यंत तुमचे शरीर काविळीच्या विषाणूंना निष्प्रभ करण्याच्या मार्गाच्या शेवटास आलेले असते. त्यामुळे काकतालीय न्यायाने त्या वेळेस जे औषध घेतलेले असते ते गुणकारी म्हणून ठरवले जाते. मला स्वतः ला झालेली कावीळ ली कोणतेही औषध न घेता केवळ विश्रांती साधा आहार आणि जीवनसत्त्वे यांनी बरी झाली. विषाणू जन्य कावीळ सोडून इतर कावीळ अशा औषधे देणार्यांनी बरी करून दाखवावी उदा. हिमोलिटिक अनेमिया, पित्ताशयाच्या कर्करोग. हे माझे त्यांना आव्हान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 07/11/2016 - 15:07

In reply to गामा साहेब, by सुबोध खरे

Permalink

डॉक्टर काका स्नायपर वाटायला

डॉक्टर काका स्नायपर वाटायला लागलेत एकेकाचा टिपून गेम करतायेत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/11/2016 - 15:15

In reply to गामा साहेब, by सुबोध खरे

Permalink

सुखसाहेब, तुमच्या संयमाने

सुखसाहेब, तुमच्या संयमाने समजावत राहण्याचा प्रचंड आदर वाटतो. पण लोक इन जनरल इर्रॅशनल गोष्टी अजिबात सोडू शकत नाहीत याची एव्हाना खात्री झाली आहे. बहुधा काहीतरी न समजणारी मिसिंग लिंक, काहीतरी तर्कापलीकडलं , काहीतरी फक्त डॉक्टर, गुरु वगैरेंनाच कळतं आणि आपल्याला कळत नाही अशाच गोष्टींचं आकर्षण जास्त असतं आणि विश्वासही. नेमकं कशाने काय होतं हा कार्यकारणभाव खरंच समजून घेणं अनेकदा रुक्ष, नीरस , रखरखीत असतं. त्यापेक्षा anecdotal इज मच मोअर अट्रॅक्टिव्ह.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 07/11/2016 - 15:21

In reply to सुखसाहेब, तुमच्या संयमाने by गवि

Permalink

बरे तुम्ही काय म्हणता म गवी,

बरे तुम्ही काय म्हणता म गवी, काय करायचे , जग किती लो आय क्यू वाले आहे नै. काही कळतच नाही कुणाला
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/11/2016 - 15:31

In reply to बरे तुम्ही काय म्हणता म गवी, by स्पा

Permalink

काहीच नाही करायचं रे स्पा.

काहीच नाही करायचं रे स्पा. फक्त समजून घ्यायचं आणि समजावणं थांबवायचं इतकंच. कधीकधी असं समजावू पाहणार्याच्या तळमळीने कौतुकाची उबळ येते. व्यर्थताही दिसते. मागोमाग येणारे प्रतिसाद उबळही थांबवतात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 07/11/2016 - 15:37

In reply to काहीच नाही करायचं रे स्पा. by गवि

Permalink

फक्त समजून घ्यायचं आणि

फक्त समजून घ्यायचं आणि समजावणं थांबवायचं इतकंच. एका वाक्यात खूप मोठा अर्थ आहे हा गवि, मी आपला वैयक्तिक ऋणी आहे ह्या वाक्या करता :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 07/11/2016 - 15:55

In reply to काहीच नाही करायचं रे स्पा. by गवि

Permalink

असो

असो
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 11:06

In reply to असो by स्पा

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 07/11/2016 - 16:10

In reply to गामा साहेब, by सुबोध खरे

Permalink

कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख

कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख कारण हे विषाणू आहे आणि त्यातील ९९ % रुग्ण स्वतःहून बरे होतात
७०-८० वर्षांपूर्वी लोक कावीळीला जीवघेणा रोग समजायचे...अगदी आजही या रोगाला लोक टरकून असतात असे का?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 07/11/2016 - 16:18

In reply to कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख by टवाळ कार्टा

Permalink

माझ्या माहितीप्रमाणे

माझ्या माहितीप्रमाणे हेपेटायटीस बी व पाचापैकी इतर एक कोणता तरी असे लिव्हर वर गंभीर परिणाम करणारे प्रकार आहेत. ते झाले तरच हा रोग जीवघेणा ठरतो.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 07/11/2016 - 16:16

In reply to गामा साहेब, by सुबोध खरे

Permalink

आडवे पडणे व एन्झाईम्स

काविळीत विश्रान्ति व स्निग्ध सेवन टाळणे हे दोन महत्वाचे उपचार आहेत असे आहे काय? तसेच आडवे झाले काही एन्झाईम्स शरीर क्रियेत भाग घेतात किंवा घेत नाहीत या कारणास्तव काविळीत आडवे पडून आराम करणे याला खास महत्व आहे असे आहे का खरे साहेब ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 07/11/2016 - 19:15

In reply to आडवे पडणे व एन्झाईम्स by चौकटराजा

Permalink

यकृत हा शरीरातील रासायनिक

यकृत हा शरीरातील रासायनिक प्रक्रियांचा कारखाना आहे आणि तो कधीच बंद पडत नाही. त्याला सूज आलेली असताना त्यावर भार टाकणे हे श्रेयस्कर नाही. don't flog a tired horse. आडवे झोपल्याने आपल्याला तसा काही परंतु उभे राहून आपण दमता आपल्याला श्रम होतात तसे आडव्याने होत नाही. एवढंच
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 07/12/2016 - 03:28

In reply to गामा साहेब, by सुबोध खरे

Permalink

स्वानुभव असा आहे की ....

खरे डॉक्टर, आता असं बघा की, चार दिवस भाऊ इस्पितळात दाखल होता. सुईपाणी लावलं होतं. पण जरा म्हणून सुई काढली की पोटदुखी उसळी मारायची. प्रकृतीत काहीच सुधारणा नव्हती आणि अशक्तपणा जाम वाढला होता. फ्याडाँच्या मते चार दिवसांत कावीळ उतरायला हवी होती. पण तसं काहीएक चिन्ह नव्हतं. मग फ्याडाँच्या सल्ल्यानेच आयुर्वेदिक औषध केलं. याअगोदर कधीही आयुर्वेदिक औषध केलेलं नव्हतं. आता परिस्थितीच अशी उद्भवल्याने दह्यातलं औषध केलं. ज्या दिवशी सकाळी पहिली मात्रा (डोस) घेतली त्याच दिवशी संध्याकाळी भाऊ व्यवस्थित हिंडूफिरू लागला. हा योगायोग होता का? कावीळ हा जीवघेणा आजार (किंवा लक्षण) आहे. दोन प्राणघातक केसेस डोळ्यासमोर घडल्या आहेत. (एक अगोदर आणि एक नंतर.) त्यामुळे भावाची विकारमुक्ती हा माझ्यामते तरी योगायोग नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 13:50

In reply to स्वानुभव असा आहे की .... by गामा पैलवान

Permalink

आनगापै

खरं तर खऱ्यांना ठाऊक नाही की तुमच्याशी डोकं लावणं म्हणजे कुणाशी कुस्ती खेळणं आहे. तेव्हा योगायोग जौद्या. तुमची होम्योपदीने केलेली अँजिओप्लास्टी कशिये? सिग्रेट सोडली की नाही अजून?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 07/13/2016 - 05:16

In reply to आनगापै by आनंदी गोपाळ

Permalink

डॉक्टर

डॉक्टर साहेब, आपण स्वतंत्र लेख लिहा बरं, आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे, ते तरी कळेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Tue, 07/12/2016 - 11:45

In reply to गामा साहेब, by सुबोध खरे

Permalink

डॉक्टर साहेब,

डॉक्टर साहेब, कांजिण्या हा ऑटो इम्युन आजार आहे असे परवा परवा पर्यंत आधुनिक शास्त्रांचे डॉक्टर सांगत होते. निदान मला तरी आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरने असेच सांगितले होते. तेच आधुनिक शास्त्राचे डॉक्टर आता कांजिण्यांवर औषधे देउ लागले आहेत हे खरे आहे ना? असे असेल तर काय समजावे ? म्हणजे पूर्वी त्यांच्याकडे औषध नव्हते म्हणून ऑटो इम्युन असे ठोकून तर दिले नाही ना ? माझ्या निष्कर्षांमधे गल्लत असेल पण तपशील अचूक आहेत. तुम्ही यावर कदाचित प्रकाश टाकू शकाल . हेच आधुनिक शास्त्रांचे डॉक्टर अगदी आत्तापर्यंत तूप खाऊ नका असे सांगत होते आणि हेच लोक आता ओमेगा-३ की कायसे असते म्हणून तूप खा असे सांगू लागले आहेत. विज्ञान परिवर्तनीय असते हे मान्य आहेच पण काल एक सांगितले आज एक सांगितले असे होऊ लागले तर आमच्यासारख्या सामान्य लोकांनी काय समजायचे ? आधुनिक मेडिसिन क्षमतेत कमी पडले किंवा पारदर्शकतेत कमी पडले म्हणून लोक ओल्टर्नेटीव्हज कडे वळले असे वाटते. आपण तज्ञ आहात म्हणून हे निव्वळ उत्सुकतेपोटी विचारत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 07/12/2016 - 12:41

In reply to डॉक्टर साहेब, by अप्पा जोगळेकर

Permalink

अप्पासाहेब

अप्पासाहेब कांजिण्या हा विषाणूजन्य रोगाचा आहे आणि तो "ऑटो इम्युन" कधीच नव्हता. आजही हा रोग मर्यादित स्वरूपाचा आणि स्वतः हून बरा होणारा आहे. लहानपणी कांजिण्या झाल्या तर त्या लवकर बऱ्या होतात पण मोठेपणी जर हा आजार झाला तर तो जास्त तीव्रतेचा असतो. यावर पूर्वी औषधे होती पण ती आजच्या इतकी सुरक्षित नव्हती. या आजारावर औषध दिल्याने त्याचा येणार ताप पाच दिवस ऐवजी दोन दिवसात आटोक्यात येतो वयस्कर माणसांना या रोगातून होणाऱ्या गुंतागुंती उदा. न्यूमोनिया सारखेच आजार टाळता येतात. याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा म्हणजे कांजिण्यांच्या विषाणू मुळे उत्तर आयुष्यात होणार "नागीण" हा रोग आपल्याला होत नाही.नागीण हा रोग आपल्या नसे मध्ये सुप्त किंवा निष्क्रिय अवस्थेत राहतात आणि जेंव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेंव्हा परत जागृत होऊन आपल्याला नागीण होते. हे टाळायचे असेल तर औषध घ्यावे लागते. अन्यथा कांजिण्या हा रोग आठवडा ते १० दिवसात पूर्ण बरा स्वतःहून होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 07/12/2016 - 11:01

Permalink

होमिओपदीची औषधे एवढी छान असते

होमिओपदीची औषधे एवढी छान असते तर होमिओपदीचे डाक्टर आम्हाला पण आधुनिक औषधं प्रिक्राइब करता यावी ही मागणी का करतात?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 11:11

In reply to होमिओपदीची औषधे एवढी छान असते by अनुप ढेरे

Permalink

तुम्हाला माहित नाही? अहो हे

तुम्हाला माहित नाही? अहो हे वाचा. पेशंटची गरज म्हणल्यावर सगळं करावं लागतं ना...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 07/12/2016 - 12:47

In reply to होमिओपदीची औषधे एवढी छान असते by अनुप ढेरे

Permalink

ढेरे साहेब

ढेरे साहेब साधं सरळ आहे "प्रच्चंड" प्रमाणात रोगी बरे होत असले तरी ते ५ % च असतात. मग इतर ९५ टक्के च काय? माझ्या मित्राचे वडील म्हणाले ते बरोबर -- BHMS किंवा BAMS किंवा BUMS(युनानी) चे प्रवेश एम बी बी एस च्या अगोदर संपतात का? जाऊ द्या झालं. अशी उगाच कुणाच्या चड्डीला हात घालू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 11:09

Permalink

तुम्हाला माहित नाही? अहो हे

तुम्हाला माहित नाही? अहो हे वाचा. पेशंटची गरज म्हणल्यावर सगळं करावं लागतं ना...
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 07/12/2016 - 11:24

Permalink

एका सुरेख घुमजाव साठी डॉक्टर

एका सुरेख घुमजाव साठी डॉक्टर साहेबांचं कौतुक
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 07/12/2016 - 12:42

In reply to एका सुरेख घुमजाव साठी डॉक्टर by वेल्लाभट

Permalink

झोपी गेलेला जागा झाला

झोपी गेलेला जागा झाला
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on Tue, 07/12/2016 - 14:37

Permalink

डॉक्टर साहेब, धाग्याच्या

डॉक्टर साहेब, धाग्याच्या त्रिशतकपूर्तीवेळी तुम्हाला एक किलो साबुदाणा, मराठी माध्यमाची पुस्तकं आणि अल्कोहोल असं दिलं तर आवडेल का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com