आठवतेय का?
पावसातली पहिली भेट
धुक्याची दुलई पांघरूण
लपुन बसलेली वाट
आणि तोल जाता जाता
तू हाती घेतलेला हात
ओल्या गवताळ मातीचा
थंड हुळहुळता स्पर्श
आणि भिजल्या पापण्यात
तुझ्या श्वासांची ऊब
मला उगीच असलेली
घरी जायची घाई
आणि तुझ्या आर्जवात
शहारलेली जाईजुई
डोळ्यांनीच दिलेघेतलेले
कितीतरी मुके निरोप
आणि परतीच्या वाटेवर
हरवलेली दोन मनं
आठवतेय ना?
पावसातली पहिली भेट
प्रतिक्रिया
6 Jul 2016 - 2:31 pm | टवाळ कार्टा
:)
6 Jul 2016 - 2:44 pm | चांदणे संदीप
:)
6 Jul 2016 - 3:07 pm | नीलमोहर
:)
6 Jul 2016 - 3:13 pm | नाखु
..
6 Jul 2016 - 3:39 pm | अभ्या..
अत्यंत अप्रतिम अशी कविता आहे, आशयघनता तर इतकी आहे की मी तर प्रत्येक शब्दाच्या प्रेमात पडलोय, म्हणजे कसंय की मराठी सारस्वताच्या दरबारात सादर केलेल्या ह्या काव्यरचनेने जे अभूतपूर्व असे मापदंड तयार झालेले आहेत त्या मापदंडांनी उरलेल्या सार्या स्वयंघोषित नवकविंना मजबूत मार देउन त्यांच्याकडून ह्याच तोडीची एखादी तरी ओळ लिहिल्याशिवाय मराठी काव्याच्या दरबारात पुनः पाउल ठेवण्याची बंदी करायला पाहिजे. धुक्याची दुलई, हुळहुळता स्पर्श, शहारलेली जाइजुई, मुके निरोप अशा ज्या अनवट कल्पनांचा स्वयंघोषित कवयित्रीने (सौ. बिरुटे सर) अलवार वापर केलेला आहे त्याला दडप्या पोह्यावर पेरलेल्या कोथिंबिरीशिवाय दुसरी उपमा सुचत नाही. दुसरी उपमा असो की तिसरा उपमा, रवा भाजताना जो खरपूस सुवास किचनभर व्यापून उरतो त्याच पध्दतीने ह्या काव्यरचनेचा काव्यगंध मिपाभर घुमत आहे.
.
(सगळ्यांच्या स्मायल्यांचे प्रतिसाद बघून बोअर झाले म्हणून एवढे खरडण्यात आलेले आहे. त्या स्मायल्याप्रमाणेच हाही प्रतिसाद हिजहायनेस रातराणी हलकेच घेतील एवढे बोलून मी भाषण संपवतो. धन्यवाद. जय सगळे,)
6 Jul 2016 - 3:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सौ.बिरुटे सर चा लॉंग फॉर्म सौजन्य बिरुटे सर असं स्पष्ट लिहित जा भो. :(
बाकी कवितेवरील भाष्य अप्रतिम. अभ्या कवितेतील दोन ओळी ज़रा उलगडुन दाखवता का प्लीज -
"डोळ्यांनीच दिले घेतलेले
कितीतरी मुके"
हे डोळ्यांनी ''मुके''कसे घेतात. की कविता समजण्यात माझा काही घोळ होत आहे. ;)
-दिलीप बिरुटे
6 Jul 2016 - 3:58 pm | धनंजय माने
सर निरोप पण घ्या की!
6 Jul 2016 - 3:59 pm | अभ्या..
सॉरी बरका सर, मनापासून माफी मागतो मी.
बाकी डोळ्यांचे मुके ट्रॅडिशनल मुक्याप्रमाणेच असावेत असे वाटते, बुबळे बाहेर आले नाहीत म्हणजे बरे (कोणाचा घेतलाय ते बघायला बरका)
6 Jul 2016 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>बुबळे बाहेर आले नाहीत म्हणजे बरे...
=))
अभ्या, ओठांनी डोळ्याचं घेतलेलं चुंबन हे प्रेमाचं प्रतीक असतं. डोळ्यांनी घेतलेलं चुंबन कशाचं प्रतिक मानलं पाहिजे ?
"उसने कहा था
मेरे सिवा किसी से
मोहब्बत ना करना....
बस फिर क्या था
मोहब्बत की नजर से हमने
खुद को भी नहीं देखा...."
-दिलीप बिरुटे
6 Jul 2016 - 11:41 pm | अभ्या..
आहाहाहा, क्या नजाकत, क्या आशिकी..
.
डोळ्यांनी घेतलेलं चुंबन हे माझ्या मते अस्सल रसिक मनाचे प्रतीक असावे. प्रेमाचे रसग्रहण ओठ करू शकतील हो पण दीदार ए यार जो चीझ है,
अहाहा..... ती डोळ्यांची भाषा समजायचे म्हणजे खायचे काम नाही.
6 Jul 2016 - 3:55 pm | टवाळ कार्टा
=))
6 Jul 2016 - 4:30 pm | रातराणी
अभ्या लका तुझ्या कीबोर्डला काही हाड. :)
आपण सगळे प्रतिसाद हलकेचं घेतो.
डोळ्यांनी मुके न घेता येणाऱ्या सर्वानी आर्चीकडे शिकवणी लावावी.
निरोप घ्यायचं मग शिकवते.
6 Jul 2016 - 3:56 pm | धनंजय माने
वर :) असं केलेले सगळे दुदुदुदु लोक आहेत.
:)
6 Jul 2016 - 3:57 pm | अजया
=))))
अभ्याजींचा प्रतिसाद कवितेचं रसग्रहण कसे करावे याचा वस्तुपाठच!
6 Jul 2016 - 4:02 pm | टवाळ कार्टा
सध्ध्या चेकाळलय ते
6 Jul 2016 - 4:07 pm | अभ्या..
गप्पे, आज बुधवार हाय. साप्ताहिक सुट्टीचा हापिसात बसलोय. गिर्हाईक नाही. मग करावे लागते काहीतरी असे.
6 Jul 2016 - 4:14 pm | धनंजय माने
तुमच्यात कोण 'तो' आहे का नाही?
'ते' टक्या, 'ते' अभ्या???
काय चाललंय काय???
(तो फळा ती शाळा ते मास्तर)
6 Jul 2016 - 4:26 pm | अभ्या..
'ते' कसं असतंय म्हैते का प्यार्या,
आदरार्थी टोपनणाव हाय ते, जसे 'ते अभ्या' हे प्रेमाने प्लस आदराने मिळणारे संबोधन आहे.
तुला त्याची सवय नाही आणि मिळनारही नाही तेव्हा सोड इचार. गप्प राव्ह हाय त्या आयडीत.
6 Jul 2016 - 4:36 pm | धनंजय माने
खिक्क्क!
एक इचारलं तर धा सांगायलंय. उगा हानायलंय.
आसु दे आसु दे.
6 Jul 2016 - 4:36 pm | धनंजय माने
खिक्क्क!
एक इचारलं तर धा सांगायलंय. उगा हानायलंय.
आसु दे आसु दे.
6 Jul 2016 - 4:06 pm | अभ्या..
ह्या प्रतिसादासाठी मा. अजयाताईचा कट्टयाचे आमंतरण परहस्ते पाठवल्याचा गुन्हा माफ करण्यात आला आहे. ;)
6 Jul 2016 - 4:27 pm | अजया
बस का अभ्या :-/
6 Jul 2016 - 4:34 pm | प्रचेतस
छान पावसाळी कविता.
अभ्याच्या प्रतिसादानं हहपुवा झाली.
6 Jul 2016 - 4:57 pm | कपिलमुनी
आजकल तो बिस्कीटको भी पारले जी केहना पडता है
6 Jul 2016 - 5:05 pm | अभ्या..
कपिल पा जी, आपके जी मे काड्या करनेका बहोत जी कर रहा है. ;)
.
बादवे कप्प्या लका पार्टी दे की.
(ह्या रातराणीच्या कवितेचा न्हाय दिवसभरात खरडफळा केला तर नावाचा अभ्याजी नाही ;) ओ तुम्ही परत एकदा दुस्सरी टाका हो.)
6 Jul 2016 - 5:12 pm | रातराणी
आणि मग खरडफळ्याचं काय करणार हैस रे लिंबूटिन्बु?
6 Jul 2016 - 5:16 pm | अभ्या..
हायला टक्याच वाटला मला.
खरडफळ्याला लिंबू बांधायचेय आता. नजर लागली कुणाची तरी. :(
6 Jul 2016 - 5:30 pm | रातराणी
टक्याकडेचं असतील बघ लिंब. एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू म्हणत होत्या म्हणे काही ललना कट्ट्याला.
6 Jul 2016 - 5:43 pm | अभ्या..
ललना???
त्या पूर्वी जेम्स बॉण्ड च्या पिक्चरच्या झैरातीत लिहायचे तसल्या ललना आलेल्या कट्ट्याला??
6 Jul 2016 - 5:48 pm | टवाळ कार्टा
हो आहेत...मिर्ची आणि लिंब...एकत्रच...कोणाला हवीत
6 Jul 2016 - 5:51 pm | धनंजय माने
बकरी ईद ला वेळ आहे अजून. आत्ताच कापाकापी नको. आत्ता आहे ती रमजान ईद.
6 Jul 2016 - 6:02 pm | टवाळ कार्टा
आपण तेव्हाच कापू हं तुला =))
6 Jul 2016 - 6:19 pm | अभ्या..
बघ रे टक्या, जरा जपून.
ते काही प्राणी निषिद्ध वगैरे असतात म्हणे.
6 Jul 2016 - 6:40 pm | धनंजय माने
जे म्हणतं तेच असतं.
लुलुलुलुलु वगैरे!
6 Jul 2016 - 5:17 pm | धनंजय माने
पेटतंय आता युद्ध!
6 Jul 2016 - 6:09 pm | जगप्रवासी
छान आहे कविता
6 Jul 2016 - 6:55 pm | चांदणे संदीप
लैच्च धुरळा उडला हिथे... =))
6 Jul 2016 - 11:18 pm | रातराणी
चांगले प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार आणि दंगा करणाऱ्या सर्वांना :) :) :)